नाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से १ - किस्सा १७ डिसेंबर २००९ चा.
सहज आणलेल्या ताडपट्टीतील एका अज्ञात व्यक्तीच्या नाडी पट्टीवाचनाची निघालेली ती अचुक तारीख निघते काय!
स्थळ - श्री. ईश्वरन यांचे कोथरूड डहाणूकर कॉलनीतील केंद्र पुणे.
त्यांच्या केंद्राचा वर्धापनदिवस ते दरवर्षी १७ डिसेंबरला हवन व गणेशयागाच्या सोहळ्याने संपन्न करतात. महाप्रसाद नंतर गरजूंना वस्त्रदान वगैरे कार्यक्रम संपल्यावर यावर्षी जे घडले ते विलक्षण म्हणावे लागेल.
त्याचे असे झाले की पिंपरी-चिंचवड भागातील श्री केबल टीव्हीवर या कार्यक्रमाचा भाग वेळोवेळी दाखवला जातो. ते आपली टीम घेऊन दरवेळी हजर असतात तसे ते यावेळी ही आले होते. सर्व लोक पांगल्यावर आम्ही काही जण गप्पा मारत होतो. त्यावेळी मला अचानक आठवले की नुकतीच मी दक्षिण भारताची सफर संपवून परताना विंग कमांडर राकेश नंदानी मला एक ताड़पत्रावरील लिखाणाचे पॅकेट नाडीग्रंथांचा अभ्यास करायला मदत म्हणून आवर्जून हाती दिले होते. पट्टया नाडी ग्रंथांच्याच आहेत की आणखी कशाच्या त्याचा शोध घ्यावा व कळवावे. असे त्याने मला ते सुपूर्त करताना म्हटले होते.
घरून निघताना मी लक्षात ठेऊन त्या पॅकेटमधील पट्ट्यांना ओवलेली नाडी सोडवून त्यातली पटकन निघेल अशी वरचीच एक पट्टी सॅम्पल म्हणून कागदात अलगद गुंडाळून बरोबर घेतली होती. कार्यक्रमानंतर श्री केबलच्या प्रवीण येलमारांनी, ‘सर, आपण एक इंटरव्ह्यू घ्यावा’ असे सुचवले. मी तोपर्यंत बरोबर आणलेली ताडपट्टी काढून ईश्वरनजींच्या हाती दिली व त्यांच्या केंद्रातील नाडीवाचकाकडून त्यातील मजकूर वाचायला विनंती केली. त्यावर नाडीवाचक सेल्वमोहनन यांनी नाडीपट्टी हातात घेऊन मोठ्य़ाने त्यातील मजकूर वाचायला सुरवात केली. थोडेसे थांबून त्यांनी सांगितले की ही नाडी ग्रंथाची पट्टी असून त्यात एका व्यक्तीचे जनरल कांडाचे कथन आहे. आमची उत्सुकता वाढली. नाडीवाचक सेल्वमोहनननी ती पट्टी पुन्हा पहिल्यापासून वाचायला चालू केले, तेंव्हा श्री. ईश्वरन त्या पट्टीतील तमिळ मजकुराचा मराठीत अनुवाद करून सांगत होते.
त्या नाडीपट्टीत त्या व्यक्तीची जन्मदिनांकाची नोंद अशी होती - सिद्धार्थी संवत्सर, वैकासी मासम्, तमिल तिथी-२२, सित्तरै नक्षत्रम्, कन्नी रासी, मेष लग्नम्. मंगलवार. नवग्रहांची मांडणी अशी सांगितली होती – मेष लग्नम तेथे शुकिरन व मंगल, माडत्तील (वृषभेत) सुर्य, मिधुनम्मत्तिल पुधम् (बुध), कर्काटकात्तील अरसन(गुरु), सिम्मत्तील राघूम् (राहू) व शनी, कन्नीत्तिल तिंगल (चंद्र), कुंबमत्तिल केतुम.
आपल्या सध्याच्या कॅलेंडरप्रमाणे तो दिवस सांगताना मोहनन म्हणाले, सिद्धार्थी संवत्सर म्हणजे (सन १९७९-१९८०), त्या मधील वैशाख महिन्यात (१५ मे ते १५ जून पर्यंत) तमिळ तिथी २२, साधारण ६ किंवा ७ जून १९७९ ही तारीख असावी. लगेच मी माझ्या मोबाईलवर सन १९७९च्या जूनच्या ६ तारखेला ‘बुधवार’ असल्याचे लक्षात आणुन दिले. त्यावर सेल्वमोहनन म्हणाले, ‘बरोबरच आहे. सुर्य जेथे आहे त्यावरून ६ तारखेच्या मध्यरात्रीनंतर पर्यंतच्या काळातला हा जन्मला असावा. म्हणजेच भारतीय कालमापनाप्रमाणे सुर्योदयापासून सुर्योदयपर्यंत वार मंगळवार असेल’. त्यापुढे श्री ईश्वरन यांनी म्हटले, ‘ज्या दिवशी या पट्टीचे वाचन होईल त्यावेळी तो व्यक्ती ते ऐकायला प्रत्यक्ष हजर नसेल. त्या दिवशी त्याच्या आयुष्याची ३०वर्षे ६ महिने व ११ दिवस झाले असतील’.
त्यावरून आम्ही गणित घातले ते असे -
दिवस – महिने - साल
जन्मदिनांक – ०६ - ०६ - १९७९
आयुष्य - ११ – ०६ – ००३०
नाडीपट्टी वाचनाची तारीख - १७ - १२ - २००९
आश्चर्यकारकपणे नेमक्या त्याच तारीखेला त्या व्यक्तीच्या अपरोक्ष हे वाचन बरोब्बर दिनांक १७ डिसेंबर २००९ लाच होत होते.
मागे वळून विचार करता - या पट्टीचे गूढ अधिक वाटू लागले.
1. विंग कमांडर राकेश नंदा मला सहज नाडीपट्ट्चे पॅकेट देतो काय!
2. मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी आठवणीने मी त्यातील नेमकी तीचपट्टी सहजपणे हाती घेतो काय!
3. इतरांची नाडी पट्टी वाचायला नकार देणारे नाडीवाचक नेमके त्याच वाचनाला काहीही खळखळ न करता तयार होतात काय!
4. त्यातील मजकुराची वही बसल्या बैठकीला करून माझ्या हाती देतात काय!
5. सहज आणलेल्या ताडपट्टीतील एका अज्ञात व्यक्तीच्या नाडी पट्टीवाचनाची निघालेली ती अचुक तारीख निघते काय!
6. शिवाय हे सर्व शूटींग होऊन ते लोकांसमोर सादर होते काय!
सर्व ऐकून उपस्थित थक्क झालो!!
त्यानंतर याच कथनावर आधारित चर्चेचे व्हीडीओ शूटिंग दिनांक 19 Dec 2009 ला प्रसारित झाले. आपल्यापैकी काहींनी ते पाहिले देखील असेल. त्या पट्टीचा स्कॅनफोटो तयार झाला. वही तयार झाली. त्याची सीडी नाडीग्रंथावरील कार्यशालेसाठी उत्सुकांना पहायला तयार ठेवली आहे.
या ठिकाणी नाडी ग्रंथांची एकांगीपणे टिंगल-टवाळीकरून नाडीपट्ट्यांना थोतांड म्हणून हिणवणाऱ्यांना ही पट्टी सत्यान्वेशण करायला उद्युक्त करेल अशी आशा वाटते.
प्रतिक्रिया
10 Mar 2010 - 9:09 pm | कौंतेय
समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचे छान काम चालले आहे.
10 Mar 2010 - 9:42 pm | JAGOMOHANPYARE
अजबच..
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
10 Mar 2010 - 10:46 pm | विसोबा खेचर
ओके, तारीख अचूक निघाली.. पण पुढे काय?
येत्या महिन्याभरातल्या प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला माझ्या आयुष्यात काय होणार आहे आणि गेली ४० वर्ष माझ्या आयुष्यात काय काय, घडलं आहे हे जर पर्फेक्ट सांगू शकलात तर मानलं तुमच्या नाडीशास्त्राला आणि नाडीपट्टीला!
अन्यथा, नाडीशास्त्र आणि नाडीपट्टी हा सर्व केवळ अन् केवळ बकवास आहे असंच म्हणावं लागेल!
बोला ओक साहेब, घेताय चायलेंज?
तात्या.
11 Mar 2010 - 1:51 am | रामपुरी
कसलं चॅलेंज घेउन बसलात? त्या मोहनन ची बेरीज वजाबाकी तयार आहे एवढाच त्याचा अर्थ. त्याने उलट गणित करून सगळ्याना मस्त गंडवलं. :) :) :)
पुण्यातल्या नाडीवाल्याना आपण चॅलेंज दिला होता पण त्यानी शेपुट घातली. लोकाना चु.... बनवायचे धंदे आहेत झालं. "६ अब्ज लोकांच्या नाड्या कुठं ठेवल्या आहेत?" एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर ओक देतात का विचारा मग चॅलेंज द्या.
11 Mar 2010 - 6:03 pm | तिमा
अहो, २०१२ बद्दल काही आहे का या नाडीग्रंथात ?
कारण ते खरे असेल तर त्यानंतर कोणाच्याही कुठल्याच नाड्या शिल्लक रहाणार नाहीत! (अगदी लेंग्याच्या सुध्दा!)
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
10 Mar 2010 - 11:33 pm | शशिकांत ओक
तात्या, आपण नाडी ग्रंथांना चॅलेज करताय. मला नाही.
हे म्हणजे कोणी पॅरिसला जाऊन एफेल टॉवर पाहून आला व म्हणाला की असा असा भव्य लोखंडी मनोरा मी पाहून आलोय. तर इथे घर बसल्या मला इथे तो मनोरा दाखवता का? घेताय चॅलेंज? असे म्हटल्यासारखे झाले. तो मनोरा प्रत्यक्ष पहायचा तर तुम्हाला पॅरिसला जायला हवे.
म्हणून नाडीच्या विषयावर मी म्हणतोय की मला नाडी ग्रंथांचे आलेले अनुभव असे असे आहेत. आपणाला ते सत्यनारायणाच्या कथेप्रमाणे भाकड किंवा अतिरंजित वाटत असतील तर आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. नाडी ग्रंथांचे अवलोकन करावे व आपला अनुभव सांगा. त्यात आपले दैनंदिन कथन येईल का नाही हे आपणच तपासून पहा. आपणास माझ्याप्रमाणेच अदभूत अनुभव येतील असा माझा दावा नाही.
मी आत्ता पर्यंत काय करतोय. फक्त डोळसपणे नाडी ग्रंथांचे अनुभव घेत आहे. नाडी महर्षी कोणी माझे काका मामा नाहीत का नाडी शास्त्री मला नाडी ग्रंथांच्या सेवेबद्दल काही मानधन देत नाहीत.
आत्ता पर्यंत आलेल्या अनुभवांमुळे महर्षींच्या कार्याला श्रद्धापुर्वक वंदन करावेसे वाटले तर त्यात लाज कसली?
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
10 Mar 2010 - 11:49 pm | विसोबा खेचर
ओक्के...!
ओकसाहेब, खुलासा पटला!
स्वगत: साला या शश्या ओकवर मला रागावताच येत नाही, ना त्याच्याशी काही वाद घालता येत! म्हणजे म्हटलं तर घालता येईल पण आपण साला या शश्या ओकचे फ्यॅनच आहोत...:)
असो,
नाडीदेवींचा विजय असो..
ओकसाहेब, अजूनही येऊ द्या असे काही अनुभव!
आपला,
(फ्यॅन) तात्या.
11 Mar 2010 - 4:48 am | मिसळभोक्ता
मेष लग्नम तेथे शुकिरन व मंगल, माडत्तील (वृषभेत) सुर्य, मिधुनम्मत्तिल पुधम् (बुध), कर्काटकात्तील अरसन(गुरु), सिम्मत्तील राघूम् (राहू) व शनी, कन्नीत्तिल तिंगल (चंद्र), कुंबमत्तिल केतुम.
संपादकांनो,
इतके सगळे अपशब्द अद्यापही मिसळपावावर आहेत ! सर्व संपादकांनी आत्मशोध करावा.
कन्नीतिल तिंगल सारखी घाणेरडी शिवी मिसळपावावर पाहून मला व्यक्तिशः मिसळपावाचा सदस्य असल्याची लाज वाटते. (कोणरे तो ? लाजेचा लज्जागौरीशी संबंध नाही !)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
11 Mar 2010 - 6:24 am | शुचि
मला "कुंबमत्तिल" फार उत्तान शब्द वाटतोय..... लवकर संपादीत करावा अशी विनंती.
(ह. घे.)
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
11 Mar 2010 - 9:02 am | प्रकाश घाटपांडे
मिपावरील नवीन वाचकांसाठी नाडीचिकित्साकांडाचे अवशेष
नाडी इतिहास मोठा आहे बरका एक झलक
http://www.misalpav.com/node/9218
http://www.misalpav.com/node/9219
http://www.misalpav.com/node/9231
http://www.misalpav.com/node/3607
बाकी ओकसाहेब डहाणुकर कॉलनीत आला होतात तर मी तिथेच राहतो. आला असतात तर (इतर) विषयावर तरी गप्पा मारल्या असत्या. आपण आमची प्रेरणा आहात. आमचा पत्ता आपल्याला माहित आहेच.
अवांतर- ओकसाहेब एकदम दिलखुलास माणुस आहे बरका. आम्ही आता नाडी च नाही तर बिडी काडी ताडी माडी सोडलय. तस शास्त्रापुरतीच कधी कधी बियर घेतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
11 Mar 2010 - 11:17 am | शशिकांत ओक
नाडी महर्षीच विरोधकांचे प्रेरणास्थान आहेत
काही लोक बिडीच्या काडीवर जाता जाता नाडीला आग लाऊन जातात. चिकित्सा - चिरफा़ड - असे मोठे शब्दयोजून करून मोठा तीर मारल्याचा आव आणतात. नंतर आपण त्या गावचेही नाही असा आव आणून, दोन्ही डगरींवर हात राखून इतरांची मजा पहात बसतात. असल्यांकडून शोध काम दूर मात्र लोकांच्या मनांत संशय आणण्याचे काम तत्परतेने होते. अशा लोकांसाठी देखील नाडी महर्षी प्रेरणास्थान आहेत.
नाडी पट्टीत व्यक्तीचे नाव कोरून कसे आलेले असते ते वाचून मिपाकरांसाठी हैयों व धनंजय यांनी आपला प्रतिसाद सविस्तरपणे नोंदवून दिला असल्याने निदान येथे तरी नाडीपट्ट्यात तमिळ भाषेतून लेखन कार्य केलेले आहे की नाही. हे आणखी सिद्ध करायची गरज आता उरलेली नाही.
ज्यांना नाडी ग्रंथांचे अस्तित्व तत्वतःमान्य नाही - कारण त्यांना नाडीग्रंथातील जो मजकूर असतो तो पडताळून पहाण्यासारखा असतो व त्यातील माहिती खरी आहे असे प्रांजळपणे मान्य करावे लागेल अशी वस्तुस्थिती आहे, असे मान्य केले तर त्यांच्या पुर्व निर्धारित तत्वज्ञानाचा पाया ढासळतो असा पक्का निर्णय आहे - त्यांच्या करता वाद वा समजावण्याची गरज काय? नाही त्यांना मान्य करवत तर नाही. पण कोणी पुर्वग्रह सोडून, निर्मल मनाने नाडी ग्रंथांतील मजकुराचे, अर्थाचे अस्तित्व शोधून पाहू इच्छित असतील तर अशांसाठी माझे लेखन प्रेरणादाय़ी व्हावे.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
11 Mar 2010 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते
ओकसाहेब, मी आणि मिपावरील अजून एक सदस्या, हे नाडी प्रकरण काय आहे हे पडताळून बघण्यासाठी उत्सुक आहोत. तरी त्यासाठी काय करावे लागेल ते सांगावे.
पुण्यात कुठे जावे लागेल?
किती खर्च येईल?
नाडी बघण्याआधी स्वतःची काय आणि किती वैयक्तिक माहिती द्यावी लागेल?
नाडी वाचनाला किती दिवस लागतील?
फक्त भूतकाळच सांगितला जातो की भविष्यकाळही सांगितला जाईल?
किती तपशीलात जाऊन सांगितले जाईल?
नाडीवाचन खरे ठरले नाही तर पैसे परत मिळतील का?
कृपया, कळवणे. वाट बघत आहोत.
बिपिन कार्यकर्ते
11 Mar 2010 - 7:21 pm | कवितानागेश
अर्थात नाडीग्रन्थाबद्दल..
आपण फक्त आपल्या हाताच्या अन्गठ्याचा ठसा द्यायचा असतो, त्यापलिकडे आपली कुठलीही माहिती ते घेत नाहीत.
वाद घालण्यापेक्शा जाऊन आपापली पट्टी वाचून घ्या...
............... जास्त मजा येते!
============
माउ
11 Mar 2010 - 9:10 pm | jaypal
मारुतीच्या बेंबित बोट घालुन बघा कस मस्त वाटत !!! तश्यातल प्रकार वटतो
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
11 Mar 2010 - 9:34 pm | नावातकायआहे
ठसा scan करुन पाठवला तर चालतो का? :?
11 Mar 2010 - 11:57 pm | शशिकांत ओक
बिपिन कार्यकर्ते
बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो,
आपणाला नाडी केंद्रांचे पत्ते द्यायला मला शक्य आहे पण ते या ठिकाणी दिले तर जाहिरात बाजीचा आरोप होईल असे वाटून मी असे सुचवतो की आपण नाडी ग्रंथ भविष्य पुस्तक वाचावे. नितीन प्रकाशन,पुणे. किं ५०.
त्यात पुण्याच्या केंद्रांचे पत्ते व अन्य माहिती आहे.
आपण पुण्यात आहात तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर बरे. मी आपणांला किंवा कोणाला अमुक केंद्रात जा असे सुचवत नाही. आपणाला सोईचे वाटेल तसे पहावे.
फीज ३०ते ६२५ च्या मधे विविध केंद्रांत आहे. ती तशी का वा अन्य आपल्या विचारणा आपण त्यांच्या कडून समजून घेतलेल्या बऱ्या. तमिळजाणकाराला बरोबर न्यावे. म्हणजे नाडी पट्टीतील नावे शोधायला मदत होईल. केंद्राला फोटो काढून देण्यास विनंती करावी. त्याची कॉपी नंतर उपयोगाला येईल.वही देणार का विचारावे. काही कारणांनी ते देत नसतील तर देणाऱ्या केंद्रात जावे. काही कारणानी पट्टी सापडत नसेल तर दुसऱ्या केंद्रात जाऊन सापडेपर्यंत शोध घ्यावा.
आपणांस आणखी एक विनंती आहे की नाडी केंद्रात पट्टीचा शोध होण्या आधी महर्षींना प्रार्थना करावी आम्ही आपली परीक्षा घ्यायला आलेलो नाही. आपले आशीर्वाद मिळावेत यासाठी व पुढील आयुष्यासाठी काही मार्गदर्शन मिळावे म्हणून आलो आहे. कृपा करावी.
हार व फुले घालता आली व दीप दर्शवता आला तर चांगले. आपला अनुभव कळवावा. आपण केंद्रात असताना प्रत्यक्ष भेटता आले तर आवडेल.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
12 Mar 2010 - 12:48 am | वाटाड्या...
श्री. ओक,
एक शंका..विरोध नाही..(कारण स्वानुभव नाही)..पण हे त्याने प्रत्यक्ष सांगितले आहे माझ्या मनचे नाही हे नमुद करु इच्छितो...
माझा एक मित्र जो माझा एक मित्र कोथरुडच्या नाडीग्रंथ केंद्राचा चांगलाच पंखा होता. बराच त्रासातही होता हे नक्की. शेवटी लग्नकार्यासाठी ४-५ वेळा गेलाही त्या केंद्रात. एकुण ४००० रु. खर्च केले. तिरुपतीलाही जाणार होता.(त्यांनी सांगितले म्हणुन) गेला का नाही ते कळ्ळं नाही.
त्याला सांगितले गेलेले की त्याची बायको पुण्यापासुन २०० किमी च्या अंतरामधील असेल. (खोटं ठरलं). त्याची बायको पुण्यापासुन ४०० किमीवरील निघाली.
बायकोचं नाव 'क' अक्षरापासुन असेल..(खोटं ठरलं).बायकोचं नाव 'स' अक्षरापासुन आहे.
एक वर्षाच्या आत लग्न होइल...(खोटं ठरलं). लग्न १.५ वर्षांनी झालं.
अश्या गोष्टींमुळे विश्वास बसत नाही लोकांचा....
- वा
28 Apr 2020 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देशावर मोठं संकट आलंय, त्या ताड़पट्टीत नाड़ीपट्टीत कोरोना कधी येईल आणि कधी जाईल असे दिसते का ? जाणकार अभ्यासकांच्या प्रतीक्षेत.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2020 - 11:38 am | प्रचेतस
अहो जिथं करोनाने देवाला देखील कोंडून ठेवले तिथे त्यास नाडीपट्टीला नाड्या बांधून ठेवणे काय अवघड.
28 Apr 2020 - 11:53 am | शशिकांत ओक
खिल्ली न उडवता अभ्यास करावा अशी इच्छा असेल त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधावा. नाडीग्रंथ प्रेमींच्या ग्रुपवर महर्षींच्या आदेशातून काय मार्ग दर्शन केले आहे ते समजून घेता येईल.
28 Apr 2020 - 2:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रश्न देश हिताचा आहे, आणि सार्वजनिक माहितीचाही आहे. तेव्हा व्यक्तीगत संपर्कापेक्षा खरंच असे काही स्पष्ट चिन्हे, लक्षणे नाडीपट्टीच्या अभ्यासकांना आढळत असतील तर सांगावीत. जसे, काही ज्योतिष मित्रांशीही या विषयावर सहज चर्चा करीत असतो. एक अशी तारीख त्यांच्याही भाकितातून स्पष्ट होतांना दिसत नाही पण ते त्यांच्या परिने लोक थट्टा करो की गंभीरपणे घेवोत माहिती सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात.
नाडीपट्टीवाल्यांची याबाबतीत काय भाकिते आहेत ते जाहिरीपणे सांगायला हरकत नसावी, लोक काय म्हणतील त्याचा काय विचार करायचा. माझाही अशा कोणत्या पट्टीबीटीवर विश्वास नाहीच पण पारंपरिक पद्धती काय संबंध लावतात, शोधतात. ते सांगायला हवे, असे वाटते. इतरवेळी लोकांच्या भूत भविष्याची तंतोतंत माहिती सांगणार्यांनी आता देशहिताच्यावेळी तरी मागे हटू नये असे वाटते.
बाकी, बघा तुमची इच्छा. आम्ही तर लॉकडावूनमधे घरात वैज्ञानिकदृष्टीकोन आणि शोधाकडे तसेही डोळे लावून बसलोच आहोत.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2020 - 3:39 pm | प्रचेतस
+१, प्राडॉ सरांशी सहमत
28 Apr 2020 - 3:45 pm | प्रकाश घाटपांडे
अजून त्यांना सापडल नसाव. नाहीतर एव्हाना त्यांनी ते दिले असते. बर्याच वर्षांनी हा धागा वर आलाय.
28 Apr 2020 - 7:59 pm | शशिकांत ओक
ज्यांचा पट्टीवर विश्वास नाही त्यांना उठाठेव करायची काय? तरीही करायची असेल तर माझ्याशी संपर्क साधावा.
महर्षींच्या वाणीचे वाचन काय आहे ते ज्यांना कदर आहे तिथे सांगितले तर त्याला महत्व.
बाकीच्या कोणाला काय वाटेल तो त्यांचा प्रश्न आहे... मला विचारून भरीला पाडायची गरज नाही...
28 Apr 2020 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा विश्वास नसूत देत हो, पण आपण इतरांचा विश्वास बसेल अशी गोष्ट सांगायला काय हरकत आहे. आपल्याकडे उत्तर नाही असं माझं स्पष्ट मत असलं तरीही माणूस संकटसमयी सर्व अंगारेधुपारे करुन पाहतो, तसे आपल्याकडे काही नाडीकथनात काही भाकित असेल तर माझा किंवा इतर वाचकांचाही विश्वास बसला असता, असे वाटले. विश्वासापेक्षा सध्याचा जीवघेणा प्रश्न सुटला तर कोणाही भारतीयाला आनंदच होईल .
संपर्काची भानगड कशाला ? असेल काही काय सांगायचं तर ते इथेही सांगू शकाल. आदरणीय महर्षींचं काय वाचन आहे, ते इथेही निवांतपणे समजून सांगता येऊ शकेल. बाकी, आपणास भरीस घालत नाही. आपण माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करु शकता. आपणास ते स्वातंत्र्य आहेच, पण धागा इथे जाहीर असल्यामुळे प्रश्न विचारावा वाटला. शक्यता अशी वाटून गेली की काय सांगावे वर मूळ धाग्यातल्या एखाद्या ताडपत्रात- नाडीपट्टीत दोन मार्चला २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात आढळेल आणि शेवटचा रुग्ण २१ जूनला संपवून भारत देश कोरोनामुक्त होईल असे असेल तर, पट्टीत प्रश्नाचे उत्तर असले तर बरे होईल असे वाटले ....:)
-दिलीप बिरुटे
28 Apr 2020 - 9:34 pm | शशिकांत ओक
यावर अधिक लिहायची इच्छा नाही.
29 Apr 2020 - 7:47 pm | सुबोध खरे
यावर मला नाना पाटेकरांचा एक संवाद आठवतो
जर आपण लिपस्टिक लावून नट्टा पट्टा करून खिडकीत बसला तर खालून जाणार्याने शिट्टी मारली किंवा शुकशुक केले तर चिडू नये.
सार्वजनिक जालावर तुम्ही एखादे विधान केले तर त्याचे विश्लेषण आणि समर्थन करण्याची जबादारी तुमच्यावर येते.
उद्या मी जर सार्वजनिक जालावर विधान केले कि उंटिणीच्या दुधात, लेंडीपिंपळीचा रस आणि काटेरिंगणीचा अष्टमांश काढा घालून प्यायला तर आपल्याला करोना विषाणूचा संसर्ग होणारच नाही किंवा कर्करोगा पासून १०० % मुक्तता होईल तर त्याचे पुरावे देणे हि माझी जबाबदारी असेल.
तेंव्हा असे म्हणता येणार नाही कि तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही यात पडूच नये.
3 May 2020 - 11:19 am | चौथा कोनाडा
१०० % सहमत सुबोध खरे साहेब !
2 May 2020 - 8:53 pm | योगविवेक
ज्या गावांमध्ये जायचे नाही तिथला पत्ता मागायचा कशाला?
28 Apr 2020 - 9:48 pm | Prajakta२१
मी माझ्या मैत्रिणीसोबत कोथरूड वनाझ कॉर्नर च्या एका नाडी ज्योतिष केंद्रात गेले होते (२०१४) दक्षिण भारतीय लोक ते चालवत होते एका फ्लॅट मध्ये खूप गर्दी असायची माझ्या मैत्रिणीला त्यांनी जे जे विचारले ते जुळून आले असे तिने सांगितले (एका वेळेस आत एकाच जातक असतो दुसऱ्याला प्रवेश नसतो)
तिला समाधानकारक अनुभव आला होता तेव्हा
त्यावेळच्या अनुभवावरून आणि एकंदर नाडीपट्टी ज्योतिष हे पूर्णपणे वैयक्तिक ज्योतिषाचा प्रकार वाटते ते जरी चांगले असले तरी सामूहिक भविष्यकथनासाठी एप्लिकेबल नाही असे एकंदर त्याच्या माहितीवरून वाटते प्रत्येक व्यक्तीची नाडीपट्टी असते ह्यातच स्पष्ट होते कि फलज्योतिषाप्रमाणे सामाजिक राजकीय भाकितांसाठी ते लागू नाही
सध्याची हि समस्या सामूहिक आरोग्य,सामाजिक,आर्थिक आणि थोडी राजकीय आहे त्याला पारंपरिक फलज्योतिष तसेच मेदिनीय ज्योतिष उत्तर देऊ शकेल असे वाटते मेदिनीय ज्योतिषात भूभागाच्या माणसाप्रमाणेच पत्रिका बनवून गोचर ग्रहभ्रमणाचे त्या देशावर होणारे परिणाम वर्तवले जातात उदा. अमेरिकेची मिथुन रास आहे सध्या मिथुनच्या अष्टमात ग्रहांची गर्दी आहे अष्टमस्थान-मृत्यूस्थान म्हणून सध्या अमेरिका फारच त्रासातून जात आहे पण आत्ता लाभात आलेला सूर्य अमेरिकेला साह्य करेल असे वाटतेय
भारताची मकर रास आहे मकर राशीत सध्या तीन ग्रह आहेत फलस्वरूप भारताची प्रतिमा उजळण्याचे chances आहेत (ते कुठले भावेश आहेत ह्यावर अवलंबून)
28 Apr 2020 - 10:14 pm | सतिश गावडे
देशाची रास कशी काय ठरवतात?
29 Apr 2020 - 4:11 pm | Prajakta२१
देशाचा स्वातंत्र्य दिन आणि वेळ हि त्याची जन्म स्थिती धरून पत्रिका बनवतात भारत १५/०८/१९४७
त्यादिवशी चन्द्र मकरेत म्हणून भारताची मकर रास असे
जे स्वतंत्रच आहेत त्यांची घटना किंवा संसद कधी अस्तित्वात आली ती तारीख धरून तो एक भूभाग एकसंध देश कधी बनला तेव्हापासून (ती तारीख)
2 May 2020 - 10:59 pm | ऋतुराज चित्रे
आपली नाडी ट्रम्पच्या हातात. डोळे वटारले की बदाबदा औषधे खुली करतो आपण.