नाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से २ - भाग दुसरा - किस्सा श्रीनगरच्या ३१ मार्चचा
सर्व घटना काही मिनिटांत झाल्या होत्या. माझ्या नावाची ओळख कशी द्यायची नाही हे सरावाने मी जाणून होतो. त्या दिवशीच्या सर्व अशक्यप्रायः घटना आठवून हे कथन ऐकायला मी येणार असे सिद्ध व्हायला काय काय घडत गेले ते आठवून मला अंगावर शहारे आले.
लेह हून चंदीगडला चाललेले विमान श्रीनगरला वाटेत डायव्हर्ट होते काय! मी त्यात जाऊ? असा सवाल टाकतो काय! माझे बॉस मला जा म्हणून आग्रहाने कसे म्हणतात काय! रिक्षावाल्याला ही नेमके याच ठिकाणी मला नेण्याचे कसे काय सुचावे! सर्वच अदभूत होते!!
या घटनामालिकेत सर्वात महत्त्वाचे होते माझे बॉस! ते अन्य दुसरे तिसरे कोणी नसून सध्याचे चीफ ऑफ एअर स्टाफ - एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक होते!
त्यांच्याशी नंतर बोलताना मी खोदून खोदून विचारले, ‘सर तुम्ही त्यादिवशी कोटीरुपयांची कॅश व अन्य कामे असताना मला जा म्हणालात तरी कसे? त्यांनी खांदे उडवून म्हटले, ‘'मला वाटले तू जावेस म्हणून म्हणालो असेन’'.
मी रिटायर व्हायच्या आधी २००३मधे नवी दिल्लीत त्यांनी घरी भेटायला बोलावले. तेंव्हा मला ते म्हणाले, 'शशिकांत, मी पाहून आलो बर का नाडी ग्रंथ सिकंदराबादला असताना!'
'बरच काही लिहिलय पाहू या काय काय होतय ते' असे वहिनी म्हणाल्या होत्या त्यावेळी!
नंतर योग्य वेळ आल्यावर ते सध्या कोणत्या स्थानावर आहेत यावरून त्या कथनाची प्रचिती येते.
आधीचा संदर्भ...मी विमानात स्थिर झाल्यावर इतरांशी बोलून चंदीगडला उतरल्यावर पुढे काय करावे असे ठरवत होतो. जनरलांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एकातून मी चंदीगडच्या बस स्टँडला पोचलो. एक बस पठानकोटला जायच्या अगदी तयारीत होती. त्यात उडी मारून चढलो. करता करता होशियारपुर आले. तोवर हिवाळी संध्याकाळ व्हायला आली होती.
सायकल रिक्षात चढलो. 'कहा जाना बाबूजी? 'किसी भीरगू शास्त्री के पास ले चलो.' मी रिक्षावाल्यावर ठरवायचे काम सोपवत म्हटले.
'तो मोहल्ला गोकुल नगरवाले के पास चलते है' । एका टिपिकल पंजाबी घरापाशी त्याने सोडले. ....
....'हांजी, क्या लेंगे थंडा या गरम?' वगैरे शाब्दिक पंजाबी आदरातिथ्य झाल्यावर, 'अब तो टायम खतम हो गया सी. कल आना' पंजाबी ढंगाचे हिंदी बोलत स्व.वेद प्रकाश यांचे चिरंजीव प. महाशिव मला म्हणाले.
मी एका दिवसासाठी आलो आहे. काहीही करून भृगुसंहिता पाहायला मिळावी अशी इच्छा आहे. मी डबल पैसै द्यायला तयार आहे. कृपा करून आत्ताच शोध चालू करा असा विनंती वजा आग्रह केला. त्यावर महाशिव म्हणाले, ' चलो जी, इतनीही जिद पर अटके हो तो आपको भी मदद करना पडेगा?
त्यांनी उठत एका भिंतीवरचे पोटली वजा एक गाठोडे माझ्यासमोरच सोडले. त्यात हस्तलिखित कागदाचे पिवळे जुनाट कागद अस्ताव्यस्तपणे भरलेले वाटले. पैकी काही माझ्या हातात सोपवत पं. महाशिव म्हणाले, ' ऐसे करना, आपकी जनमकुंडली के हिसाब से इसमें से आपका टेवा याने जनम कुंडली वाली परची को ढूँढना पडता है।'
लगेच मी कामाला लागलो. मला टेवा उर्फ माझी कुंडली माहीत होती. मला मिळालेल्या पत्रावळ्यावजा कागदातून मी पटापट नको असलेल्या परचा वेगळ्या करताना पाहून पं. खुष होऊन म्हणाले, 'आप ते बडी जल्दी सीख गए?"
साधारण ४०-५० परचे हाताळले असतील तेव्हड्यात एका पर्चीत मी माझे नाव 'शशीकान्त' लिहिलेले वाचले. त्यापर्चीवरती काढलेली कुंडली तंतोतंत जुळणारी होती. मात्र चेहऱ्यावरून काही न दाखवता म्हणालो, ' देखो पंडतजी, इस परचे में कुंडलीके तारे मिलते लगते है क्या?
‘लाईये, म्हणत ते पान त्यांनी हातात घेऊन त्यातील ग्रहमान चेक केले व म्हणाले, सही परचा लगता है। त्वाडा नाम शशिकांत तो नही?
मी ‘हांजी’ म्हणताच त्यांनी पुढे वाटायला सुरवात केली. मी त्यांना आपण हिंदीत भाषांतर करून न सांगता मुळ संस्कृतमधूनच वाचावे अशी विनंती केली. ‘आजकल कोई संस्कृत जानता नही’ अशी तक्रार करत त्यांनी वाचायला सुरवात केली.
ओंम श्री शुक उवाच, भारतवर्षे एवम् गतिकाले को योग तस्य किंम फलम ओं श्री. भृगु उवाच एवम ग्रहगति काले मनोरथ इति योग प्रभावे परमवचा, (मनोरथ या नावाच्या योगावर)) नंदवेद नंद९, वेद ४ (म्हणजेच ४९ व्यावर्षी) शशीकान्त या पितृ ज(नार्दन?) सत(लज)व्यास नदी मध्ये(दोआबात) चंचलपुरी, (होशियारपुरचे भृगुसंहितेतील नाव) चैत्रमासे (महिन्याच्या) तीज(तृतिया) – मंगळ(वारी) आज म्हणजेच दि. ३१ मार्च १९९८ ,हा जातक हे कथन ऐकायचा योग आहे. आदी आदी...
ते ऐकून मला धक्का बसला कारण ती परची मी माझ्या हातानी त्या पोटलीतील कागदातून काढली होती. बर ती देवनागरीतील असल्याने मी स्वतःती वाचू शकत होतो. त्यातील शशीकान्त व अन्य अक्षरे तर मराठी वाचणाऱ्या कोणालाही अगदी स्पष्टपणे वाचता येतील अशी होती. पंडीतजीच्या हातचलाखीचा प्रश्नच नव्हता.
सर्व घटना काही मिनिटांत झाल्या होत्या. माझ्या नावाची ओळख कशी द्यायची नाही हे सरावाने मी जाणून होतो. त्या दिवशीच्या सर्व अशक्यप्रायः घटना आठवून हे कथन ऐकायला मी येणार असे सिद्ध व्हायला काय काय घडत गेले ते आठवून मला अंगावर शहारे आले.
लेह हून चंदीगडला चाललेले विमान श्रीनगरला वाटेत डायव्हर्ट होते काय! मी त्यात जाऊ? असा सवाल टाकतो काय! माझे बॉस मला जा म्हणून आग्रहाने कसे म्हणतात काय! रिक्षावाल्याला ही नेमके याच ठिकाणी मला नेण्याचे कसे काय सुचावे! सर्वच अदभूत होते!!
या घटनामालिकेत सर्वात महत्त्वाचे होते माझे बॉस! ते अन्य दुसरे तिसरे कोणी नसून सध्याचे चीफ ऑफ एअर स्टाफ - एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक होते!
त्यांच्याशी नंतर बोलताना मी खोदून खोदून विचारले, ‘सर तुम्ही त्यादिवशी कोटीरुपयांची कॅश व अन्य कामे असताना मला जा म्हणालात तरी कसे? त्यांनी खांदे उडवून म्हटले, ‘'मला वाटले तू जावेस म्हणून म्हणालो असेन’'.
मी रिटायर व्हायच्या आधी २००३मधे नवी दिल्लीत त्यांनी घरी भेटायला बोलावले. तेंव्हा मला ते म्हणाले, 'शशिकांत, मी पाहून आलो बर का नाडी ग्रंथ सिकंदराबादला असताना!'
'बरच काही लिहिलय पाहू या काय काय होतय ते' असे वहिनी म्हणाल्या होत्या त्यावेळी!
नंतर योग्य वेळ आल्यावर ते सध्या कोणत्या स्थानावर आहेत यावरून त्या कथनाची प्रचिती येते.
सन १९९८ च्या कॅलेंडरवर ३१ मार्चला मंगळवार तीज होती का नव्हती ते चिकित्सकांनी हवेतर ताडून पहावे.
अशाच आणखी एका ३१ मार्चच्या घटनाक्रमाची विलक्षणता क्रमशः ...
प्रतिक्रिया
31 Mar 2010 - 7:12 pm | कराडकर
सुरेख, उत्कंठता वाढते आहे,
लवकर टाका पुढील भाग,
(न)नाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से २ >> एक "न" जादा का आहे ?
31 Mar 2010 - 8:04 pm | शशिकांत ओक
चुकुन झाले आहे
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
31 Mar 2010 - 8:15 pm | शशिकांत ओक
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही
{कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते.
नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत.
आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.
नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल.
नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे.
भागाच्या वाचकांसाठी प्रतिक्रिया परत टाकली आहे. पुन्हा वाचणाऱ्यासाठी क्षमस्व.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत