ना़डीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से क्रमांक ३ भाग - २ --
किस्सा ३१ मार्चचा - दक्षिण भारतातल्या नाडी केंद्रवाल्यावर कोर्टात फिर्याद .
विचार करायला लागलो, कोण तू? तू इथे का आलायस? कोणी तुला बोलावले नसताना! तुझा आणि नाडी ग्रंथांचा काय संबंध? नाडी महर्षी कोणी काका का मामा लागतात तुझे? ना तुला तमिळ येत, ना तू नाडीकेंद्र चालक, कोण तुझे ऐकायला बसलय? एक वेळ अशी आली की सर्व व्यर्थ वाटून मी भिंतीवरील महर्षी अगस्त्यांच्या मोठ्या फोटोकडे प्रचंड विमनस्कपणे पहाता पहाता अश्रुंनी वाट शोधली.
"प्रत्येक घराचा दरवाजा मला भिकारी समजून बंद करून हाकलून देतोय. मी भुकेला आहे. थंडीने शरीराला असंख्य वेदना होतायत. मला अशा परिस्थितीत आणायचे होतेत तर गुरुमाऊली मला पाठवलेत कशाला इथे अशा परदेशात? मी फार हताश झालोय! माझ्याच्याने जेवढे प्रयत्न करायला शक्य होते ते मी केले. यानंतर आता आपणच ठरवावे काय ते "असे म्हणत विवेकानंदांना अश्रू आवरेनात. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर गुरूंचा धावा त्यांनी केला. अचानक ते बसले होते त्या समोरच्या घराचा दरवाजा उघडला गेला कोणीतरी विकल होऊन रस्त्यावर बसकण मारून आहे असे वाटून एका व्यक्तीने विचारपूस केली. त्या हो्त्या ---- त्यानंतर विवेकानंदांच्या संपुर्ण जीवनात कधीच अशी दैन्यावस्था आली नाही.
"आय नो, तू योग्य ठिकाणी न गेल्याने तुला दीप लावायला जमणार नाही. नंतर तू नाडीवरील आलेले खोटे किटाळ घालवायला योग्य ते मार्गदर्शन करशील. आयुष्याच्या चौथ्या भागात नाडी ग्रंथांच्या संदर्भात भावी कामगिरी काय असेल याची त्याला अनुभूती येईल " असे तू गेल्यावर नंतरच्या अगस्त्य महर्षींच्या रात्रीच्या कथनातून आले होते."
माझ्या विचारांची बैठक दृढ होण्याला प्राचार्य अद्वयानंद गळतगे या ऋषी तुल्य महाभागांची वैज्ञानिक सत्यनिष्ठा व लेखणी कारणीभूत ठरली.
भाग २
एकदम मनात आले. उठावे व वैदीश्वरनकोईलच्या मंदिरात जावे. तेथे दीप लावावेत. चालत स्टँडवर आलो. एक बस नव्हती. पण अचानक जाण्याची सोय झाली.मजल दर मजल करत मी वैदीश्वरन कोईलला पोचलो. तोवर बंदचा प्रभाव संपून सर्व काही स्थिरस्थावर झाले होते. तात्काळ मंदिरात जाऊन मी भरपूर दीप लावले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. पोटात कावळे कोकलतहोते. म्हणून मी एका हॉटेलाक़डे निघालो. त्याचा मालक पुर्वीचा हवाईदलातील असलेला. नेहमी गल्ल्यावरबसलेला. मी जेवायला त्याच्याक़डे आवर्जून जात असे. मी लांबून येताना पाहून नेहमी गल्यावरदिसणारा मालक मोटर सायकलवरून घरी जायचे थांबवून भेटला.
त्याच सुमारास तिकडे सर्व माध्यमातून एक बातमी झळकली होती "वैदीश्र्वरन कोईल मधील एका नाडी केंद्रवाल्याने मृत व्यक्तीचे केलेले कथन खोटे ठरले म्हणून त्याच्यावर कोर्टात फिर्याद ".
मी त्याबाबत विषय काढला काय नक्की झाले वगैरे विचारत. रस्त्यावर आम्ही गप्पा मारत उभे होतो. 'तो नाडीवाला शिव सामी हो' तमिळ हेल काढत तो म्हणाला, 'थांबा मी तुमची गाठ त्याच्याशी घालून देतो'. म्हणून त्याने मोबाईलवरून एकाशी संपर्क केला. काही वेळात एक जण मोटर सायकलवरून आला. तो होतो शिवसामीचा दोस्त. त्याला हिंदी व इंग्रजी येत होते म्हणून तो मला भाषांतरकार म्हणून कामाला येईल असे म्हणून व मला कॉफी पाजून हॉटेल मालक गेला. मी त्याच्या मित्राच्या मोटर सायवकलवरून शिवसामीच्या केंद्रात पोचलो. एरव्ही मी त्या केंद्रात गेलो होतो. पण मालक शिवसामीशी कधी गाठ पडली नव्हती. ती नेमकी त्या दिवशी पडली. तो कारमधून बाहेर पडून रस्त्याने केंद्रात जात होता.
शिवसामीला भेटताच त्यावरील कोर्टकेसबद्दल एकदम विचारायला मला संकोच वाटला असता, पण बरोबरच्या माणसाने तोच विषय काढून त्याला बोलते केल्याने मला सोईचे झाले. पुढील अर्धातासात मी ती केस समजून घेतली. एका व्यक्तीने मृतमाणसाचा अंगठ्याचा ठसा पुढे करून नाडी पट्टी शोधली त्यातील कथन हे साहजिक खोटे असल्याचे सांगून कोर्टात फिर्याद केली. शिवसामीला ही ते पेपरमधूनच कळले होते. त्या पुढे काय करावे यासाठी सल्ला हवा होता. एका वकिलांची अपॉइंटमेंटही मिळवली होती. फिर्यादी शिवसामीला भेटून काही लाख पैसे मागून ती केस मिटवायला तयार आहे. असे संकेत देत होता. मामला नाडी ग्रंथांच्या खरे-खोटेपणाचा नसून सनसनाटी पसरवून, बदनामीला भिवऊन पैसे उकळण्याचा होता.
शिवसामी व मी एका प्रतिष्ठित वकिलांना भेटायला गेलो. ते मोठे प्रस्थ होते. कुठेतरी बाहेर जाण्यासाठी ते कारमधे होते. वाटेतून परत फिरून ते पेपर हातात घेऊन म्हणाले, 'प्ली ऑफ नो केस करून पहिल्याच हियरिंगमधे डिसमिस करून टाकू. काळजी नको'.
त्यावर मी त्यांच्याशी चर्चा करून सांगितले, "ही केस तशी न लढवता फिर्यादीने केलेला दावा खोटा आहे. कारण अंगठ्याचा ठशावरून नाडी भविष्य कथन केले जाते हेच मुळात चूक आहे. शिवाय विवक्षित व्यक्तीची नाडी ताडपट्टी शोधताना विचारलेल्या प्रश्नांना चुकीची व दिशाभूल करणारी उत्तरे देऊन नाडीवाचकांची फिर्यादीने फसवणूक केली आहे. नाडी केंद्रवाल्यांनी दावा फिर्यादीवर ठोकायला हवा. कारण मृत व्यक्तीची खरी माहिती लपवून ठेऊन कुठल्यातरी एका नाडी पट्टीला ती त्या मृतव्यक्तीच्या वर्णनाशी जुळते असे खोटेच मान्य करून मृताची वही व कॅसेट मिळवण्याचा सापळा रचला आहे. नाडी ग्रंथांना बदनाम करून पैसे उकळण्याचा हा सोपा धंदा वा मार्ग आहे. ज्याला फिर्यादी म्हणून उभे केले गेले आहे, तो एक वाया गेलेला दारुडा म्हणून गावात ओळखला जातो. त्याला पैसै चारून उभे करण्यामागे काही विरोधी विचाराच्या संस्था व हितचिंतक असल्याने या केसला अवास्तव प्रसिद्धी मिळवता आली आहे".
'आपण व शिवसामी यांनी त्या मृ़त व्यक्तीची खरी माहिती काढून त्यातील विसंगती कोर्टासमोर मांडावी आणि ज्या खऱ्या व्यक्तीची ती नाडी पट्टी असेल त्याला शोधून कोर्टासमोर उभे करून न्याय मागावा."
"ही केस शेवटपर्यंत लढवण्याचे आणखी एक महत्वाचे कारण असे की ही केस तमिळनाडूतील सिरकाळी या तालुक्याच्या कोर्टात चालणार आहे. त्यातील आरोपी, फिर्यादी, दोन्हीकडचे वकील व न्यायाधीश हे सर्व तमिलभाषी असल्याने व नाडी ग्रंथ भविष्य ही काय चीज आहे?,
नाडी ग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीचे इतके अचुक संदर्भ खरोखरच मिळतात का? असतील तर ते शब्द कसे व कुठे शोधायचे? असे प्रश्नही उपस्थित करून, प्रत्यक्ष न्यायाधीश महाराजांना तमिळभाषेचे ज्ञान असल्याने याची शाहनिशा करणे सहज शक्य आहे. शिवाय वेळ पडल्यास त्या राज्यातील इंडॉलॉजिकल संस्थांना पाचारण करून त्याची साक्ष काढून ही नाडी पट्ट्यांची कोर्टकेस म्हणून भक्कमपणे लढवता येईल".
वकील महाशय माझ्याकडे पहात म्हणाले, "तुम्ही कोण?"
मी विनम्रपणे माझे इंग्रजी पुस्तक त्यांना दिले. जाताजाता मी त्यांना विचारले, "आपण स्वतः नाडी ग्रंथ अवलोकन केलेत का? नसेल तर पहा व मग केस हातात घ्या. अन्थथा ही केस आपण न लढवलेली बरी".
---
पुढे ती केस २-३ वर्षे चालून शिवसामीच्याबाजूने निकाल लागून संपली. माझ्या ऑक्टोबर २००९ एडिशनच्या इंग्रजी पुस्तकात त्या केसचे निकालपत्र एका प्रकरणात दिलेले आहे.
---
रमणीगुरुजींच्या आश्रमात भेटून शंकरजींना सर्व कथन केले. मला विवक्षित लोक रस्त्यात कसे भेटत गेले.
मी त्यांना हेही सांगितले की मला एक वेगळी अनुभूती या दरम्यान आली.
शिवसामीच्या एसी ऑफिसमधे मी एकटा बसलो होतो. तो यायची वाट पहात. कंटाळा आला बसून. विचार करायला लागलो, कोण तू? तू इथे का आलायस? कोणी तुला बोलावले नसताना! तुझा आणि नाडी ग्रंथांचा काय संबंध? नाडी महर्षी कोणी काका का मामा लागतात तुझे? ना तुला तमिळ येत, ना तू नाडीकेंद्र चालक, कोण तुझे ऐकायला बसलय? एक वेळ अशी आली की सर्व व्यर्थ वाटून मी भिंतीवरील महर्षी अगस्त्यांच्या मोठ्या फोटोकडे प्रचंड विमनस्कपणे पहाता पहाता अश्रुंनी वाट शोधली. चाळा म्हणून मी टेबलावरील पुस्तक हातात घेतले सहज उघडलेले पान वाचायला लागलो....
"प्रत्येक घराचा दरवाजा मला भिकारी समजून बंद करून हाकलून देतोय. मी भुकेला आहे. थंडीने शरीराला असंख्य वेदना होतायत. मला अशा परिस्थितीत आणायचे होतेत तर गुरुमाऊली मला पाठवलेत कशाला इथे अशा परदेशात? मी फार हताश झालोय! माझ्याच्याने जेवढे प्रयत्न करायला शक्य होते ते मी केले. यानंतर आता आपणच ठरवावे काय ते "असे म्हणत विवेकानंदांना अश्रू आवरेनात. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर गुरूंचा धावा त्यांनी केला. अचानक ते बसले होते त्या समोरच्या घराचा दरवाजा उघडला गेला कोणीतरी विकल होऊन रस्त्यावर बसकण मारून आहे असे वाटून एका व्यक्तीने विचारपूस केली. त्या हो्त्या ---- त्यानंतर विवेकानंदांच्या संपुर्ण जीवनात कधीच अशी दैन्यावस्था आली नाही.
विवेकानंदावरील ते छोटेखानी इंग्रजी पुस्तक ठेवले गेले. नजर अगस्त्यमहर्षींचा चेहऱ्याकडे गेली.त्यांचे सुहास्य मला माझ्या जीवनाकार्याची अनुभूती देऊन गेले असा भास झाला....
---
त्यावर शंकरजी म्हणाले "आय नो, तू योग्य ठिकाणी न गेल्याने तुला दीप लावायला जमणार नाही. नंतर तू नाडीवरील आलेले खोटे किटाळ घालवायला योग्य ते मार्गदर्शन करशील. आयुष्याच्या चौथ्या भागात नाडी ग्रंथांच्या संदर्भात भावी कामगिरी काय असेल याची त्याला अनुभूती येईल " असे तू गेल्यावर नंतरच्या अगस्त्य महर्षींच्या रात्रीच्या कथनातून आले होते."