नाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से १
लेखनप्रकार
नाडीग्रंथांवरील अभिनव विलक्षण किस्से १ - किस्सा १७ डिसेंबर २००९ चा.
सहज आणलेल्या ताडपट्टीतील एका अज्ञात व्यक्तीच्या नाडी पट्टीवाचनाची निघालेली ती अचुक तारीख निघते काय!स्थळ - श्री. ईश्वरन यांचे कोथरूड डहाणूकर कॉलनीतील केंद्र पुणे. त्यांच्या केंद्राचा वर्धापनदिवस ते दरवर्षी १७ डिसेंबरला हवन व गणेशयागाच्या सोहळ्याने संपन्न करतात. महाप्रसाद नंतर गरजूंना वस्त्रदान वगैरे कार्यक्रम संपल्यावर यावर्षी जे घडले ते विलक्षण म्हणावे लागेल. त्याचे असे झाले की पिंपरी-चिंचवड भागातील श्री केबल टीव्हीवर या कार्यक्रमाचा भाग वेळोवेळी दाखवला जातो. ते आपली टीम घेऊन दरवेळी हजर असतात तसे ते यावेळी ही आले होते. सर्व लोक पांगल्यावर आम्ही काही जण गप्पा मारत होतो. त्यावेळी मला अचानक आठवले की नुकतीच मी दक्षिण भारताची सफर संपवून परताना विंग कमांडर राकेश नंदानी मला एक ताड़पत्रावरील लिखाणाचे पॅकेट नाडीग्रंथांचा अभ्यास करायला मदत म्हणून आवर्जून हाती दिले होते. पट्टया नाडी ग्रंथांच्याच आहेत की आणखी कशाच्या त्याचा शोध घ्यावा व कळवावे. असे त्याने मला ते सुपूर्त करताना म्हटले होते. घरून निघताना मी लक्षात ठेऊन त्या पॅकेटमधील पट्ट्यांना ओवलेली नाडी सोडवून त्यातली पटकन निघेल अशी वरचीच एक पट्टी सॅम्पल म्हणून कागदात अलगद गुंडाळून बरोबर घेतली होती. कार्यक्रमानंतर श्री केबलच्या प्रवीण येलमारांनी, ‘सर, आपण एक इंटरव्ह्यू घ्यावा’ असे सुचवले. मी तोपर्यंत बरोबर आणलेली ताडपट्टी काढून ईश्वरनजींच्या हाती दिली व त्यांच्या केंद्रातील नाडीवाचकाकडून त्यातील मजकूर वाचायला विनंती केली. त्यावर नाडीवाचक सेल्वमोहनन यांनी नाडीपट्टी हातात घेऊन मोठ्य़ाने त्यातील मजकूर वाचायला सुरवात केली. थोडेसे थांबून त्यांनी सांगितले की ही नाडी ग्रंथाची पट्टी असून त्यात एका व्यक्तीचे जनरल कांडाचे कथन आहे. आमची उत्सुकता वाढली. नाडीवाचक सेल्वमोहनननी ती पट्टी पुन्हा पहिल्यापासून वाचायला चालू केले, तेंव्हा श्री. ईश्वरन त्या पट्टीतील तमिळ मजकुराचा मराठीत अनुवाद करून सांगत होते. त्या नाडीपट्टीत त्या व्यक्तीची जन्मदिनांकाची नोंद अशी होती - सिद्धार्थी संवत्सर, वैकासी मासम्, तमिल तिथी-२२, सित्तरै नक्षत्रम्, कन्नी रासी, मेष लग्नम्. मंगलवार. नवग्रहांची मांडणी अशी सांगितली होती – मेष लग्नम तेथे शुकिरन व मंगल, माडत्तील (वृषभेत) सुर्य, मिधुनम्मत्तिल पुधम् (बुध), कर्काटकात्तील अरसन(गुरु), सिम्मत्तील राघूम् (राहू) व शनी, कन्नीत्तिल तिंगल (चंद्र), कुंबमत्तिल केतुम. आपल्या सध्याच्या कॅलेंडरप्रमाणे तो दिवस सांगताना मोहनन म्हणाले, सिद्धार्थी संवत्सर म्हणजे (सन १९७९-१९८०), त्या मधील वैशाख महिन्यात (१५ मे ते १५ जून पर्यंत) तमिळ तिथी २२, साधारण ६ किंवा ७ जून १९७९ ही तारीख असावी. लगेच मी माझ्या मोबाईलवर सन १९७९च्या जूनच्या ६ तारखेला ‘बुधवार’ असल्याचे लक्षात आणुन दिले. त्यावर सेल्वमोहनन म्हणाले, ‘बरोबरच आहे. सुर्य जेथे आहे त्यावरून ६ तारखेच्या मध्यरात्रीनंतर पर्यंतच्या काळातला हा जन्मला असावा. म्हणजेच भारतीय कालमापनाप्रमाणे सुर्योदयापासून सुर्योदयपर्यंत वार मंगळवार असेल’. त्यापुढे श्री ईश्वरन यांनी म्हटले, ‘ज्या दिवशी या पट्टीचे वाचन होईल त्यावेळी तो व्यक्ती ते ऐकायला प्रत्यक्ष हजर नसेल. त्या दिवशी त्याच्या आयुष्याची ३०वर्षे ६ महिने व ११ दिवस झाले असतील’. त्यावरून आम्ही गणित घातले ते असे - दिवस – महिने - साल जन्मदिनांक – ०६ - ०६ - १९७९ आयुष्य - ११ – ०६ – ००३० नाडीपट्टी वाचनाची तारीख - १७ - १२ - २००९ आश्चर्यकारकपणे नेमक्या त्याच तारीखेला त्या व्यक्तीच्या अपरोक्ष हे वाचन बरोब्बर दिनांक १७ डिसेंबर २००९ लाच होत होते. मागे वळून विचार करता - या पट्टीचे गूढ अधिक वाटू लागले. 1. विंग कमांडर राकेश नंदा मला सहज नाडीपट्ट्चे पॅकेट देतो काय! 2. मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी आठवणीने मी त्यातील नेमकी तीचपट्टी सहजपणे हाती घेतो काय! 3. इतरांची नाडी पट्टी वाचायला नकार देणारे नाडीवाचक नेमके त्याच वाचनाला काहीही खळखळ न करता तयार होतात काय! 4. त्यातील मजकुराची वही बसल्या बैठकीला करून माझ्या हाती देतात काय! 5. सहज आणलेल्या ताडपट्टीतील एका अज्ञात व्यक्तीच्या नाडी पट्टीवाचनाची निघालेली ती अचुक तारीख निघते काय! 6. शिवाय हे सर्व शूटींग होऊन ते लोकांसमोर सादर होते काय! सर्व ऐकून उपस्थित थक्क झालो!! त्यानंतर याच कथनावर आधारित चर्चेचे व्हीडीओ शूटिंग दिनांक 19 Dec 2009 ला प्रसारित झाले. आपल्यापैकी काहींनी ते पाहिले देखील असेल. त्या पट्टीचा स्कॅनफोटो तयार झाला. वही तयार झाली. त्याची सीडी नाडीग्रंथावरील कार्यशालेसाठी उत्सुकांना पहायला तयार ठेवली आहे. या ठिकाणी नाडी ग्रंथांची एकांगीपणे टिंगल-टवाळीकरून नाडीपट्ट्यांना थोतांड म्हणून हिणवणाऱ्यांना ही पट्टी सत्यान्वेशण करायला उद्युक्त करेल अशी आशा वाटते.
वाचने
15318
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
हम्म
अजबच.. **************
सहज
In reply to सहज by विसोबा खेचर
तात्या
In reply to सहज by विसोबा खेचर
नाडी
बोला ओक साहेब, घेताय चॅलेंज
In reply to बोला ओक साहेब, घेताय चॅलेंज by शशिकांत ओक
नाडी
चावट !
In reply to चावट ! by मिसळभोक्ता
+१
नवीन वाचकांसाठी
http://www.misalpav.com/node/9218
http://www.misalpav.com/node/9219
http://www.misalpav.com/node/9231
http://www.misalpav.com/node/3607 बाकी ओकसाहेब डहाणुकर कॉलनीत आला होतात तर मी तिथेच राहतो. आला असतात तर (इतर) विषयावर तरी गप्पा मारल्या असत्या. आपण आमची प्रेरणा आहात. आमचा पत्ता आपल्याला माहित आहेच. अवांतर- ओकसाहेब एकदम दिलखुलास माणुस आहे बरका. आम्ही आता नाडी च नाही तर बिडी काडी ताडी माडी सोडलय. तस शास्त्रापुरतीच कधी कधी बियर घेतो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
नाडी महर्षी प्रेरणास्थान आहेत
In reply to नाडी महर्षी प्रेरणास्थान आहेत by शशिकांत ओक
ओकसाहेब,
In reply to ओकसाहेब, by बिपिन कार्यकर्ते
नाडी बद्दल थोडेसे..
In reply to नाडी बद्दल थोडेसे.. by कवितानागेश
बिकाजी हे म्हणजे कसं
ठसा
प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर बरे
श्री. ओक,
नाड़ीपट्टीत.....
In reply to नाड़ीपट्टीत..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो जिथं करोनाने देवाला देखील
ज्या जाणकारांना?
In reply to ज्या जाणकारांना? by शशिकांत ओक
प्रश्न देशहिताचा आहे...
In reply to प्रश्न देशहिताचा आहे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१, प्राडॉ सरांशी सहमत
In reply to प्रश्न देशहिताचा आहे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून त्यांना सापडल नसाव.
नाडीग्रंथ भविष्य कथन
In reply to नाडीग्रंथ भविष्य कथन by शशिकांत ओक
उत्तर नसेल तर राहू द्या...!
In reply to उत्तर नसेल तर राहू द्या...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला जे म्हणायचे आहे ते वर सादर केले आहे.
In reply to मला जे म्हणायचे आहे ते वर सादर केले आहे. by शशिकांत ओक
यावर मला नाना पाटेकरांचा एक
In reply to यावर मला नाना पाटेकरांचा एक by सुबोध खरे
१०० % सहमत सुबोध खरे साहेब !
In reply to मला जे म्हणायचे आहे ते वर सादर केले आहे. by शशिकांत ओक
सुयोग्य प्रतिक्रिया
नाडीपट्टी ज्योतिष
In reply to नाडीपट्टी ज्योतिष by Prajakta२१
देशाची रास कशी काय ठरवतात?
देशाचा स्वातंत्र्य दिन आणि वेळ
आपली नाडी ट्रम्पच्या हातात.