काहीच का गं कळत नाही तुला माझ्या पोटातलं?
नेहमीच तो मोबाइल घेऊन तासन् तास बसायचं!
मैत्रिणींना सांगायची ती दुसर्यांची लफडी नी कथा
जाणशील तरी कधी तु माझ्या पोटातली व्यथा?
मला म्हणे फोनवर बोलता येत नाही
कधी केला असाच लाडाने तर एक 'हॅलो' पण येत नाही?
म्हणे सांगायला कशाला हवं? समजायचं असत ते!
काय समजू मी की मेली तुझी भुक आहे?
अकलेचे तारे तोडायचं नको बोलू ते सर्व माहीतच आहे
पण 'लगेच ठेवुन पोळ्या करते' हे वाक्य काय अवघड आहे ?
प्रेरणा: जागुताईंचे बोल
प्रतिक्रिया
7 Mar 2009 - 5:46 am | धमाल नावाचा बैल
बेला राग मानू नये पण हे विडंबन तितके आवडले नाही. मध्ये तो केशवटूकार करायचा तसल्या दर्जाचे वाटले. केशवसुमार टच नाही :(