धुयानी होयी नि धुयवड
लोकेसहो!
धुयवड खेयनात ना! आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस.
मन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये.
आते आम्ही ६वी गल्ली ना लोके तुम्हले माहीती नैत. धुळामां हरेक गल्ली म्हन्जे इशेष शे. म्हंजे पाहा, हाई माशाना काटा र्हास ना तसा धुयाना मझार पारोया रोड जास. त्याले लागून काटकोनमा पह्यली गल्ली, २री गल्ली(तेली गल्ली) ४थी, ५वी, ६वी, ७वी गल्ली शेतस. ६वी गल्ली म्हण्जे दादा लोकेस्नी गल्ली समजेत. सहावी गल्लीना एक साईडले माधवपुरा. बठठा.... काय म्हंतस त्याले संवेदनशील भाग बरं!! गल्लींन एक टोकले सुभाषनगर. म्हणजे जुन धुळे. जुन धुयामा खुनी मस्जिद. हाई मस्जिद मुघल राजा शहाजहाननी (हाऊ तोच तो 'ताजमहाल' वाला) १६३० मा चढाई करेल व्हती तव्हय बांधेल शे.
सुभाषपुतळाना जोडेच अमळनेर स्टॅन्ड व्हये पह्यले. धुळे अमळनेर प्रायव्हेट गाड्या तठे खड्या राह्येत. ५वी गल्ली बाम्हन लोकेस्नी. तीन्हा बाजुले खोलगल्ली- गल्ली नंबर ४. बारीशमां आख्खा गावनं पाणी खोलगल्ली मां भरे. खोलगल्लीना जोडे मुंबई आग्रा रोड म्हंजे ३री गल्ली. ... कपडास्ना आणि सराफ बाजार. आग्रा रोडना एक साईडले पाच कंदील. तं हाइ धुयानी नगररचना ब्रिटीश अधिकारी कैप्टन ब्रिगनी १८१९ मा करेल शे.
हा, तं काय सांगी राहयनु! पयले ना लोक माघ पौर्णिमा ले म्हन्जे होळीना पह्यले नी पौर्णिमालेच रस्तामां खड्डा खणीसन येरंडनं झाड गाडी देत. मग बठ्ठा लोकेस्नी समझी लेवानं की होळी महिनाभर शे आते. होळीना पह्यले आठ दिन पोरेसोरेस्नी लगबग सुरु व्हये....वर्गनी आणि लाकडं मांगानं करता. जर गल्लीमां कुणी लाकडं नै दिधी तं बस्स...त्याले असा तर्रास देये पोरे!! एक साल, एक डॉक्टरने वर्गणी मांगाना करता ज्या पोरे जाएल व्हते त्यास्ले हाकलुन दिन्थं. बस्स्...पोरे चिडी ग्यात. रातमां, त्यान्हा डॉक्टरनां बोर्ड काढुन त्या टुकार पोरेस्नी 'न्हाई'ना घरना बाहेर टांगी दिधा. आणि न्हाईना बोर्ड... हाई डॉक्टरना घरना भायेर. सकायले उठीसन ही बोम्ब व्हयनी व्हती. एक बार एकने पैसा नै दिनथा त त्यान्हा वट्टावर मैला टाकी दिंथा. मरी जाय जो... काय काय करेत लोके.
हां तर धुळवडनी बात करी राह्यनु. तव्हय गल्लीना कोपरा कोपरामां ह्या मोठा रंगपाणीना ड्रम बैलगाडीमां भरी लईयेत. आणि तठा ठी देत. अन मग रस्तावरुन जानारा एक भी माणुस सुटे नै. त्या काय आसं इचकुपिचकु पिचकारी लिसन नै खेयेत. इतली मोठी डोलची मां पाणी लिसन माणसास्ले पाठवर सपका मारे तं तुमन्हा शर्ट काय करतस्...बनियन बी फाटी जाए लोकेस्ना, पाठवर वय उमटेत!!! कोनी मजाकना व्हई साला मेव्हणा तं त्याले उचलीसन ड्रममां बुचकाळी देत.
बहु दांगडो बी व्हयेत.
तर आशी हाई धुय्यानी धुयवड!!!
प्रतिक्रिया
5 Mar 2018 - 7:10 pm | अमरेंद्र बाहुबली
छान लेख
5 Mar 2018 - 9:55 pm | जानु
आक्का, मी खुनी मस्जिद ना वरते खुनी गणपती जोडे राउ ना. गावना मानसे भेटनात का मनमा आनंद व्हस....
होळी ना त्या गाना
लुट सका तो लुटले राजा...
मुंगळा
बांगो बांगो बांगो
दिलमे होली जल रही है
अजुनबी मनमा तीच होळी शे
6 Mar 2018 - 12:59 pm | आर्या१२३
बरोबर शे दादा... गावाकडना माणसे भेटतत तर अप्रुप वाटस! :)
कव्हय ग्यात धुळाले तर, खुनी मस्जिद ना फोटो द्या आठे.
5 Mar 2018 - 10:27 pm | जयन्त बा शिम्पि
उत्तम लेख.मी बी धुयाना शे, म्हनिसन लेख माले आवडना. डोलचीना फोटो टाका ते बरं व्हयनं, मना दोन्हीबी नात-नातुस्ले आते दखाडसू.धुयामा मी राह्येलशे आनि धुयवडनी
मजा लिधी व्हती.
6 Mar 2018 - 11:14 am | सस्नेह
कोणती बोली ही ?
गोड आहे...
6 Mar 2018 - 12:45 pm | आर्या१२३
धुळ्याची अहीराणी आहे ही.
तशी बागलाणी अहीराणी, जळगावी अहिराणी आणि धुळ्याच्या अहिराणी बोलीत थोडाफार फरक आहे.
जळगाव कडे 'ळ' चा 'ड' होतो. जडगाव, धुडे अस म्हणतात तिकडे. तर धुळ्याच्या अहीराणी मधे "ळ' चा 'य' होतो. :)
7 Mar 2018 - 10:12 am | पैसा
धुळे आणि धुळवड आवडली. डॉ. देवरे यांनी म्हटले तसे अहिराणी वेगवेगळ्या प्रकारची आहे हे कळते आहे.
15 Mar 2018 - 6:50 am | निशाचर
मस्त धुळवड