महागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय?) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी! अभिनय, दिग्दर्शन, नृत्य यातलं म्हाग्रुंचं कर्तृत्व सगळ्यांना आतापर्यंत माहित झालंय(त्यांनीच कान किटेपर्यंत ऐकवलंय ते.) पण 'तू माझी पाठ खाजव, मी तुझी खाजवतो' ही सहकारी संस्था महेश मांजरेकरबरोबर सुरू करण्याचं श्रेय देखिल त्यांचंच. आता, त्यालाच 'चला हवा येऊ द्या' म्हणतात. स्वतःच्या पिक्चरमध्ये 'सुबल सरकार' यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली नाचायचे, पण कुठलाशी हिंदी नृत्यस्पर्धा जिंकली काय आणि क्षणात नृत्याचे महागुरू झाले(म्हाग्रुला काय कठीण हो?). आता, तर ते इतक्या गोष्टींचे म्हाग्रु आहेत की त्यांना महाविद्यापिठच म्हणने योग्य ठरेल. मराठीतले अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले सगळेच नवे लोक त्यांच्याकडे शिकलेत. उदा. स्वप्निल जोशी नावाचा उकडलेला बटाटा, त्यांच्याच कुकरमधला(सॉरी तालमीमधला).
म्हाग्रुंकडे पाहिले की क्षणात ठसते ते त्यांचे आत्मसंतुष्ट स्मित(महाराष्ट्राचा नार्सिसस जणू.) स्वतःवर इतका खुष असणारा दुसरा मराठी माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही. पंचावन्न वर्षे झाले मराठी चित्रपटसृष्टीत डेरा टाकून बसलेले आहेत पण तरी सुद्धा त्यांचं म्हणावं असं चीज झालं नाही. एक चिंचपोकळीचा 'बोर'कर पुरस्कार सोडला तर फार सन्मान त्यांच्या वाट्याला नाही आले. रशियाचा प्रतिष्ठीत 'चावलास्की' पुरस्कार मिळाला आणि तो त्या पुरस्काराचाच सन्मान झाला अशी रशियनांची भावना झाली. पण म्हाग्रुंचा विनय की त्यांनी याचा कधी गाजावाजा केला नाही. आता मात्र, आमची विनंती मान्य करून त्यांनी त्यांचं मौन सोडायचं ठरवलंय. 'पिळून दाखवलं!' या त्यांच्या दुसऱ्या आत्मचरित्रातून ते आपल्यासमोर येणार आहेत. आमचंच प्रकाशन आहे. त्यासाठी त्यांच्या डायरीची काही पाने मागितली, पण त्यात फक्त 'जय मी' हा एकच मंत्र १००८ वेळा लिहिलेला आढळला. त्यांच्या 'मी'लाखतींचं (हो 'मी'लाखतच, मुलाखत असते ती सामान्यांची..) शब्दांकन करून प्रस्तुत 'मी'चरित्र संपन्न केले आहे. त्याचाच थोडा वानवळा खाली देत आहे..
१. अवघा साडेचार वर्षाचा होतो तेव्हा मी. राजाभाऊ परांजपे नव्या चित्रपटाची जुळणी करत होते. त्यांच्या कानी माझी किर्ती गेलेली. 'हा माझा मार्ग एकला' हा चित्रपट मग त्यांनी माझ्यासाठी काढला. त्यातला एक डायलॉग राजाभाऊंच्याने काही जमेना. राजाभाऊंना महाराष्ट्राचा पॉल म्युनी म्हणायचे पण मी पण महाराष्ट्राचा जॅक निकोल्सन+ अल पचिनो+ रॉबर्ट डि निरो थ्री इन वन होतो. शिवाय मागच्या चार जन्मापासून मी अभिनेता. माझा या क्षेत्रातला अनुभव असा दांडगा. राजाभाऊंनी पृच्छा केली, 'बाबा रे, हा एवढा डायलॉग कसा म्हणायचा ते सांग'. मी पण काय आढेवेढे नाय घेतले, शिकवलं त्यांना. असा तो चित्रपट पूर्ण झाला. शेवटी मला काय, सग्गळं सग्गळं येतं....
- (म्हागृचे पाय.. या प्रकरणातून)
२. सन १९८९..
अशी ही बनवाबनवी ह्या अभिनव, कुणी कधीही ऐकलेल्या, न पाहिलेल्या अश्या संकल्पनेवर आधारीत चित्रपटाला माझ्यामुळे अफाट यश मिळालेले, सक्सेस पार्ट्यांत मी व्यग्र.
अशात स्पिलबर्गांच्या स्टिव्हनचा(हॉलिवूडचा महेश मांजरेकर) फोन आला. म्हणाला, अरे आपल्या रॉबिन विल्यम्सला तुझ्याशी बोलायचेय. म्हटले, ठीकाय. रॉबिन आपला टेन्शनमध्ये, म्हंटला 'अहो, म्हाग्रु, नविन पिक्चर करतोय, मिसेस डाऊटफायर, त्यात अहो, बाईचा रोल करायचाय'. मी म्हटलं बरं मग? तर म्हणतो कसा, 'अहो, मला काही बेअरींग जमेना, तुम्ही तो सुधाचा रोल कसा केलात तो मला शिकवा ब्वा..' आता, सुधाच्या रोलसाठी मी काय अभ्यास केला होता! शेकडो बायका न्याहाळल्या(कितीदातरी थोबाड फुटलं, ते एक असो..) माझ्या प्रदीर्घ अभ्यासाने, तो रोल मला करता आलेला. आता, याला शिकवायचं म्हणजे, वेळ जाणार, पण सुप्रिया म्हटली, जा की एवढा म्हणतोय तर.. आता बायकोपुढं म्हाग्रुचं तरी काय चालणार.. मग काय गेलो हॉलिवूडला आणि शिकवलं रॉबिनला सगळं..
मग तिथं आपला जिम कॅरी आला, त्याला पण थोडं टायमिंगचे धडे दिले..
आता, बिचारा रॉबिन नाही, पण दोन वर्षांपुर्वीपर्यंत महागुरूपौर्णिमेला(म्हणजे माझ्या वाढदिवसाला) त्याचा फोन यायचा. मी काय अश्या गोष्टी बोलून नाय दाखवत.. पण मला कसंय सग्गळं सग्गळं येतं....
- ('म्हागृ हॉलिवूडमध्ये' या प्रकरणातून)
प्रेर्णा
प्रतिक्रिया
30 Aug 2017 - 1:44 pm | एस
हाहाहाहा!
1 Sep 2017 - 10:03 am | कुंदन
तु नळी दुवा साठी लै लै धन्यवाद
30 Aug 2017 - 2:10 pm | आदूबाळ
लौल.
आणखी एक पानः
30 Aug 2017 - 3:20 pm | पुंबा
हाहाहाहा...
ROFL....!!
30 Aug 2017 - 4:38 pm | संग्राम
आधी लक्ष्या म्हणजे बेर्डेंचा वाटला ...मग म्हटलं रावल्या कोण .... :-)
(त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.)
अगागागा .......
30 Aug 2017 - 5:02 pm | mayu4u
बेक्कार हसतोय राव!
30 Aug 2017 - 2:22 pm | सूड
भारीच
30 Aug 2017 - 2:38 pm | राजाभाउ
हे लै भारीय
30 Aug 2017 - 2:38 pm | राजाभाउ
हे लै भारीय. हाहापुवा
30 Aug 2017 - 2:42 pm | श्रीगुरुजी
जबरदस्त! मझा आला.
31 Aug 2017 - 1:32 am | रुपी
मझा नही महामझा!! (हेही एका ज्युनियरने अॅडसाठी ढापलेलं..)
30 Aug 2017 - 2:54 pm | बाजीप्रभू
हाहाहाहा!
30 Aug 2017 - 3:18 pm | पुंबा
एस, आबा, श्रीगुरुजी, सूड, राजाभाऊ, बाजीप्रभु, धन्यवाद..
30 Aug 2017 - 3:26 pm | एमी
लॉल =))
30 Aug 2017 - 3:44 pm | इरसाल
म्हागृंचा अपमान हे.
तेंच्या आतम्चरित्रातुन घेतलेल्या तुकड्यांच सुद्ध्हा एक पुस्तक(ग्रंथ ~ जाडजुड बाड)) व्हईल. तुम्ही लैच लवकर आवरलत.
ते रमेश सिप्पी, अमिताभ बच्चन, ए.के. हंगल, धर्मेण्द्र, वगैरेंवर्च्या उपकारांना का फाटा दिलात ?????
##सही##
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
30 Aug 2017 - 7:13 pm | पुंबा
हो ना, महागृंवर कितीही लिहिलं तरी कमीच..अमजद खान तर टिकला तोच म्हागृंमुळे हो..
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
30 Aug 2017 - 3:47 pm | जेम्स वांड
ये बीक चुकी है मीडिया वाचून, एकदम पाकिस्तानातल्या सुप्रसिद्ध अश्या 'गोरमिंट आंटी' ची आठवण आली अन तिचे (कदाचित एआयबीनेच) बनवलेले हे शे ग्वेरा स्टाईल पोस्टर पण
30 Aug 2017 - 3:51 pm | चांदणे संदीप
जब्रा!!
Sandy
30 Aug 2017 - 4:52 pm | प्रीत-मोहर
अगागागागागा!!
फेबुवर अनेक मित्रांनी बाजार उठवलेला त्यांच्याइतकच हेही आवडलं. पण फार लवकर आवरतात का पीळ गावकर?
30 Aug 2017 - 5:00 pm | mayu4u
पार बाजार उठिवला की तुम्ही!
30 Aug 2017 - 5:10 pm | कंजूस
मीनाकुमारीने उर्दू शिकवलं त्यांना.
पण ते इतर कलाकारांचीही स्तुती करतात याकडे दुर्लक्ष करू नका.
30 Aug 2017 - 5:25 pm | दुर्गविहारी
लई भारी!!!!
म्हाग्रुंचे कैसे बोलणे ।
म्हाग्रुंचे कैसे चालणे ।
म्हाग्रुंचे कैसे नाचणे ।
अवघा हलकल्लोळ करावा।
म्हाग्रु मस्तकी धरावा।
महाराष्ट्र कारणे।
30 Aug 2017 - 7:21 pm | पुंबा
Hahaha..
30 Aug 2017 - 5:29 pm | सस्नेह
=)). =)) =))
बेक्कार पंचनामा !
30 Aug 2017 - 5:49 pm | रेवती
ही ही ही.
30 Aug 2017 - 6:19 pm | स्वधर्म
सचिनरावांचं सगळंच न्यारं अाहे भाऊ. अभिनय तर काय विचारता? कुठल्यातरी सिनेमात ते अांधळ्य़ाची भूमिका करत होते. सगळे अंध लोक चाचपडतात, पण म्हाग्रु मात्र इतके ‘जास्त’ चाचपडत होते, की याला म्हणतात मनापासून जोरकस अभिनय. कोण अाहे रे तो? अोव्हर अॅक्टींग म्हणून अोरडणारा?
30 Aug 2017 - 7:20 pm | पुंबा
हाहाहा.. हो.. आणि चित्रपट पण कोणता? एका पेक्षा एक..
:P
30 Aug 2017 - 6:47 pm | पिलीयन रायडर
उकडलेला बटाटासाठी आधी शाबासकी! बटाट्या जोशी कुठला..
बाकी लेख भारीच!
31 Aug 2017 - 1:29 am | रुपी
अगदी अगदी..
मागच्याच आठवड्यात नवरा मला म्हणत होता की माझा स्वप्नील जोशीवर उगाच्च खूप राग आहे.. त्याला दाखवते आता हे =)
30 Aug 2017 - 7:07 pm | बोका-ए-आझम
आणि एक हा पिळगावकरांचा सचिन! (शराबी मध्ये महागुरुंचा ज्युनिअर अमिताभ म्हणून एक सामान्य नट आहे त्याने असाच एक डायलाॅग टाकलेला आहे.)
30 Aug 2017 - 7:19 pm | पुंबा
सर्व प्रतिसादकांचे आभार..
मी पहिल्यांदाच असं काही लिहिलंय ते पण ह्या माणसाचा मनापासून संताप आला म्हणून. एका गुणी माणसाचं हे असं अधःपतन झालेलं नाही बघवत.
30 Aug 2017 - 8:50 pm | कंजूस
साडीतले पात्र कर तुला छान दिसते आणि मला गल्ला मिळेल हे निर्माते सर्व नटानांच सांगतात का?
30 Aug 2017 - 8:51 pm | पैसा
बेक्कार! आदूबाळाचे पुरवणी पानसुद्धा महाळॉळ!
31 Aug 2017 - 3:13 am | गामा पैलवान
ज्याऽम्हसलो !! फकस्त शीर्षकात ते म्हैमा पायजेलोतं.
-गा.पै.
31 Aug 2017 - 12:40 pm | स्वाती दिनेश
पार बाजार उठवून टेंपोत बसवला की..
ह ह पु वा..
स्वाती
31 Aug 2017 - 1:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमच्या महाग्रुं बद्दल बोलियाचे काम नाई, त्ये हिंदी मधले ग्रांड मास्टर मिथुनदा आणि मराठीतले महाग्रू सचिनदा दोघेबी लैभारी आहेत.
आम्ही आधीच त्यांचे लै मोठे फॅन होतो पण एका पेक्षा एक चे चक्रीवादळ आल्या नंतर या महासुर्याच्या तेजाने आम्ही आंधळे मुके बहिरे आणि बधिर झालो.
एका पेक्षा एक मधे जेव्हा ते ढॅन्सरला दोन रुपयांची नोट द्यायला ष्टेजवर जातानाची त्यांची समोरचा माइक बाजुला करुन थाटात चालत जायची इष्टाइल पण कोणीतरी नंतर ढापली म्हणे.
रच्याकने :- त्या कार्यक्रमातले त्यांचे मानसपुत्र आणि कन्या आता काय करतात म्हणे?
पैजारबुवा,
4 Sep 2017 - 2:08 pm | राजाभाउ
ते अजुनही कुठल्याही कार्यक्रमात ढॅन्स आवडला कि नोट घेउन ष्टेजवर जातात
31 Aug 2017 - 1:23 pm | संजय पाटिल
महालोल..
लोळलो....
1 Sep 2017 - 8:52 am | पुंबा
अॅमी, इरसाल,जेम्स वांड, चांदणे संदीप, mayu4u, कंजूस, दुर्गविहारी, स्नेहांकिता, रेवती, स्वधर्म, पिलीयन रायडर, रुपी, बोका-ए-आझम, पैसा, गामा पैलवान, स्वाती दिनेश, ज्ञानोबाचे पैजार, संजय पाटिल
1 Sep 2017 - 9:28 am | सुबोध खरे
हायला
लै म्हणजे लै म्हणजे लैच झकास
सकाळी सकाळी हसून पुरेवाट झाली.
1 Sep 2017 - 1:30 pm | गामा पैलवान
आदूबाळ, तुमची सिक्सर खास आहे हां! :-) तुम्ही वेगवेगळी क्षेत्रे फिरा पाहू म्हाग्रूंसोबत. आणि आमच्यासाठी साद्यंत वृत्त प्रसृत करंत चला.
आ.न.,
-गा.पै.
1 Sep 2017 - 1:43 pm | आदूबाळ
लोल. "दाऊद फणसेसोबत म्हाग्रू" आणि "म्हाग्रू आणि ट्रम्पतात्यांची गोरमिंट" असे आणखी दोन सुचले होते. मूड लागला की लिहीन.
1 Sep 2017 - 2:29 pm | पुंबा
आबा, हे तर लिहाच लिहा!!!
:प
1 Sep 2017 - 3:10 pm | स्वधर्म
.
1 Sep 2017 - 5:59 pm | अमितदादा
भारीच.. मजा आली वाचताना.
2 Sep 2017 - 1:16 pm | जव्हेरगंज
कडक!!!
=)))))
2 Sep 2017 - 4:41 pm | चिनार
आयला लयच जबरदस्त लिहिलंय राव..
ह्हपुवा ...
3 Sep 2017 - 9:37 pm | हुप्प्या
अशी ही बनवाबनवी ह्या सिनेमाच्या अफाट यशाबद्दल बोलताना महागुरु म्हणतात "हे मी नाही केलं!...." आता लक्ष्मीकांत बेर्डे वा अशोक सराफ वा सुधीर जोशी ह्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील असे वाटले पण नाही. "हे माझ्या हातून घडलं!" ह्या वाक्याने ह्या अफाट यशाचे श्रेय घेण्याचा "विनय" महागुरुंनी दाखवला. धन्य झालो!
5 Sep 2017 - 12:34 pm | स्वधर्म
.
5 Sep 2017 - 12:49 pm | चांदणे संदीप
लोलच! =))
Sandy
5 Sep 2017 - 8:00 pm | सुबोध खरे
आपला लेखन आणि पैजार बुवांचे विडंबन वाचून हसत हसत लोळलो.
सुरुवातीला वाटायचं कि हे "महागुरू स्वतःला फार शहाणे समजतात" असं फक्त मलाच वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरच एक अतिशहाणपणाची झाक आहे.
पण माझ्यासारखे वाटणारे बरेच आहेत हे पाहून अजूनच हसू आलं.
5 Sep 2017 - 8:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
http://www.misalpav.com/node/34513
झैरात
9 Sep 2017 - 4:10 am | पिलीयन रायडर
तुमच्यामुळे जाऊन ती "संपूर्ण" मुलाखत पाहिली!!!
बादवे, "गोष्ट..." च्या वेळेला महागुरुंना विचारणार होतो आम्ही पण मिपाकरांच्या धाकाने नाही विचारलं!!
12 Sep 2017 - 11:21 am | स्थितप्रज्ञ
दरम्यान दादासाहेब फाळकेंना विलायतेहून आणलेला कॅमेरा काही केल्या चालवता येईना. त्यावेळी यूजर मॅन्युअल लिहायची पद्धत नसावी बहुतेक. फाळकेंनी जंग जंग पछाडलं पण च्छे, नो लक. मग काय, त्यांनी अशा (महा) माणसाचा शोध सुरु केला ज्याला जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. शेवटी त्यांचा शोध म्हागृनपाशी येऊन थांबला. आणि मग काय झाले?
आता हे पण सांगायला पाहिजे का राव! आज आपण सिने क्षेत्रात इथपर्यंत पोहोचलो ते कोणामुळे?
12 Nov 2019 - 2:16 pm | निराकार गाढव
तेजायला... नवीन गुरूजी!! काय "खर" नाय रायलं राव!