णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!
*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार
कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी
वेळ- दुपारी बारा वाजता
जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
प्रतिक्रिया
30 Jun 2016 - 10:32 am | प्रणवजोशी
अरे हो माझा भ्रमणध्वनी क्रमांक-९६१९९८९०७४
30 Jun 2016 - 11:40 am | रुस्तम
जंगी कट्टा होणार असं दिसतंय. मिपा महाकट्टा...
30 Jun 2016 - 11:57 am | योगी९००
यावेळी शक्य नाही.नेमके ३ लाच बरोड्याला चाललो आहे.
कट्ट्याला शुभेच्छा आणि वृत्त्तांत वाचण्यास व फोटो बघण्यास उत्सुक.
30 Jun 2016 - 12:14 pm | कंजूस
"तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!"
-
पण एन्ट्री फी आहे का?
30 Jun 2016 - 1:25 pm | टवाळ कार्टा
एंट्री फी पाँसर्ड आहे :)
30 Jun 2016 - 7:51 pm | अभ्या..
गोळा कर की इचारतेत तर. ;)
तेवढेच वरखर्चाला.
.
लग्नात आहेर घ्यायला बसला नाही दिसतयस कधी. ;)
30 Jun 2016 - 8:21 pm | टवाळ कार्टा
इत्ता सस्ता नै रे मेरा इमान ;)
30 Jun 2016 - 8:24 pm | अभ्या..
बरोबरे. स्वस्त इमाने घेतली की ती क्रॅश होतात.
मागनं धुर सोडणारे जेट बिट आहे का?
30 Jun 2016 - 8:36 pm | टवाळ कार्टा
जेट धूर नाही सोडत रे ;)
30 Jun 2016 - 3:59 pm | अनिरुद्ध प्रभू
खर तर हा माझा पहिला कट्टा ठरला असता पण तस होण नाहीए. २८जुन पासुन मी नेमका कोकणात आहे........
कट्ट्यासाठी शुभेच्छा, व्रुतांत आणि छायाचित्रे पाहण्यास उत्सुक राहिन....
अनिरुद्ध....
30 Jun 2016 - 7:48 pm | आनन्दा
पुढच्या वेळेस एक कार्यालयच बूक करून टाका.. हा का ना का.
1 Jul 2016 - 9:42 am | पैसा
३०० नको का? आता काय दुसरा धागा येणार नाय. निदान ३०० तरी करा! शिका कायतरी पुणेकरांकडून.
1 Jul 2016 - 11:12 am | धनंजय माने
अरे कोन म्हंतो करनार नाय, केल्याशिवाय रहानार नाय
आरे आव्वाssssssssज कुनाचा
...... (ज़रा बसलाय या कमळीच्या नादात)
-उपगट प्रमुक सानपाडा शाका क्रमांक २५६
2 Jul 2016 - 7:21 am | रुस्तम
उद्या दुपारी पावसानं थोडी उसंत घ्यावी अस वाटतंय.
2 Jul 2016 - 7:53 am | हेमन्त वाघे
उद्या सानपाडा हून येईन . अंतर फारच कमी आहे . तरी ही कोणाला वाटेत "उचलायचे" असेल तर सांगा .. - हेमंत वाघे
2 Jul 2016 - 12:11 pm | टवाळ कार्टा
वाघ स्वतःच उचलायची गोष्ट करत असेल तर कोण हो म्हणेल =))
2 Jul 2016 - 12:28 pm | टवाळ कार्टा
आत्ता पर्यंत खालील आयडींनी नक्की येतोय असे कळवले आहे...यापैकी कोणी टांग दिल्यास पुढला कट्टा त्यांना पाँसर करावा लागेल...यादीत कोणाचे नाव नसल्यास इथे कळवा
मिपाकर
बोका-ए-आझम (आयोजक)
विपा (NMSA च्या आत घेउन जाणारे संयोजक)
मी
प्रचेतस
सतिश गावडे "सर"
गणामास्तर
नाखु"न" अंकल
डॉ.सुबोध खरे
माझीही शँपेन
किसन शिंदे
संदीप डांगे
अत्रन्गि पाउस
पक्षी
मंदार भालेराव
पिंगू
सुश मय
अदि
मारवा
प्रणवजोशी
हेमन्त वाघे
अनाहिता ग्यांग
अजया
त्रिवेणी
मनिमौ
सुरन्गी
लीमाउजेट "उमा जेटली"
उल्का
मीता
कुटुंबे
मुक्त विहारि आणि सौ. मुवि
स्वीट टॉकर आणि स्वीट टॉकरीणबाई
माम्लेदारचा पन्खा आणि सौ. माम्लेदारचा पन्खा
निलापी आणि बेटर हाफ
जमल्यास उशीरा येणारे
गॅरी ट्रुमन
सुनील
2 Jul 2016 - 12:33 pm | किसन शिंदे
=)) =))
अजया ताई, बघताय नं?
2 Jul 2016 - 12:51 pm | टवाळ कार्टा
शेवटी आजी पा* माजी संपादकच तुम्ही =))
2 Jul 2016 - 12:38 pm | प्रचेतस
मी बहुतेक येणार नाही असे कळविले आहे.
2 Jul 2016 - 2:01 pm | माम्लेदारचा पन्खा
आमाले कित्ती मज्जा येत होती तुमी हाये मनून....!
2 Jul 2016 - 1:17 pm | पद्मावति
वाह, सगळे who's who ऑफ मिपा हजर असणार आहेत उद्या.मस्तं!
2 Jul 2016 - 2:08 pm | बोका-ए-आझम
असे तिघे येतोय.
2 Jul 2016 - 7:39 pm | कवितानागेश
अधिक २ मनुष्ये.
मी हल्ली एकटी हिन्डत नाही! :)
2 Jul 2016 - 8:42 pm | बोका-ए-आझम
असे तिघे येतोय. शिवाय मकीताई आणि निदे हेही येणार आहेत.
2 Jul 2016 - 8:53 pm | माझीही शॅम्पेन
वाह भारी एकदम कट्टा एकदम बोभाटा -कट्टा होणार म्हणजे , आम्ही पण येतोय फुल गॅंग घेऊन , टकाच्या घरच कार्य असल्यावानी (वर टाकलीत नाव)
2 Jul 2016 - 9:16 pm | किसन शिंदे
चक्क विमे येतोय??
2 Jul 2016 - 12:39 pm | अजया
घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय लिवतंय ;)
@ लाडोबा ये हां उद्या! टोमॅटो भात या धाग्याचा होमवर्क करुन ये.ग्यांग तुझा अभ्यास घेणारे.
2 Jul 2016 - 12:51 pm | टवाळ कार्टा
=))
2 Jul 2016 - 12:39 pm | अजया
घाबरलंय ते.चळाचळा कापत कायबाय लिवतंय ;)
@ लाडोबा ये हां उद्या! टोमॅटो भात या धाग्याचा होमवर्क करुन ये.ग्यांग तुझा अभ्यास घेणारे.
2 Jul 2016 - 1:28 pm | अजया
सोनुली
भुमी
कविता१९७८
आरोही
2 Jul 2016 - 12:47 pm | एस
कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
2 Jul 2016 - 12:59 pm | किसन शिंदे
तुम्हाला भेटायची इच्छा आहे सर, अर्थात तुमची इच्छा असेल तर! :)
3 Jul 2016 - 12:44 am | एस
:-)
(बादवे, मला सर वगैरे नका म्हणू. आयम वोन्लि एकवीस वर्षे ओल्ड! ;-) तरूण, तडफदार इ. इ. )
2 Jul 2016 - 1:05 pm | अत्रुप्त आत्मा
अशेच म्हन्तो. !
2 Jul 2016 - 1:16 pm | अत्रुप्त आत्मा
@कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा! ››› अशेच म्हन्तो. !
2 Jul 2016 - 1:22 pm | प्रचेतस
पांडू आला असता तर तुम्हीही आला असता अशेच म्हन्तो.
2 Jul 2016 - 1:28 pm | टवाळ कार्टा
गुर्जी आले अस्ते तर तुम्हीही आले अस्ते अशेच म्हन्तो.
2 Jul 2016 - 1:29 pm | प्रचेतस
तसाही मी येतोय.
2 Jul 2016 - 5:16 pm | नाखु
आलो असतो कट्ट्यास जर नसत्या दुसर्या उचापती.
वदले मनापासून टकाश्री रावास छत्रपती !
महाकट्ट्यास भरघोस शुभेच्छा...
अखिल मिपा पुणे महानगर मित्रमंडळ आणि नाखुन परिवार
2 Jul 2016 - 11:03 pm | टवाळ कार्टा
भारी
2 Jul 2016 - 11:02 pm | टवाळ कार्टा
आँ??? वर लिहिलेत कि येणार नाही
3 Jul 2016 - 12:02 am | प्रचेतस
बहुतेक येणार नाही असं लिहिलंय.
घाटात जाम पाऊस असेल. तिथे टाइमपास करत बसू उगाच :)
3 Jul 2016 - 8:11 am | अत्रुप्त आत्मा
खंडाळ्याच्या घाटातील आगोबा..
पावसाळी आगोबा.
भिजलेला आगोबा.
थंड धुंद आगोबा.
आगोबा उर्फ ... =))
असो! ;)
2 Jul 2016 - 1:26 pm | पद्मावति
300 !!!!!
2 Jul 2016 - 1:40 pm | शि बि आय
येणा नक्की झाले आहे. आमचंही नाव यादीत टाका.
2 Jul 2016 - 1:41 pm | शि बि आय
येणे नक्की झाले आहे. आमचंही नाव यादीत टाका.
2 Jul 2016 - 6:08 pm | कंजूस
उद्या कुर्ला ते वाशी ट्रेन्स बंद--
//Mega Block on 3.7.2016
KURLA-VASHI UP AND DN HARBOUR LINES FROM 11.30 AM TO 3.30 PM.
Dn Harbour line services to Panvel/Belapur/Vashi leaving Chhatrapati Shivaji Terminus from 10.41 am to 3.25 pm and Up Harbour line services for Chhatrapati Shivaji Terminus leaving Panvel from 10.29 am to 2.57 pm will remain suspended.
However special local trains will run on Chhatrapati Shivaji Terminus - Kurla and Vashi - Panvel sections during the block period.
///
2 Jul 2016 - 6:52 pm | त्रिवेणी
Mazya sasu bai to ba karun denar het saglyansathi.tya khup chhan banvatata to ba.
2 Jul 2016 - 7:05 pm | धनंजय माने
तो बा तो बा.... तौबा तौबा. म्हणजे काय त्रि काकू?
2 Jul 2016 - 8:07 pm | त्रिवेणी
टोमॅटो भात
3 Jul 2016 - 1:01 am | धनंजय माने
अरे काय राव तुमचे शॉर्ट फॉर्म.... एवढा चांगला टोमॅटो भात त्याचा टोबा केलासा. खावासा वाटायला नको??
2 Jul 2016 - 8:28 pm | यशोधरा
कट्ट्यास शुभेच्छा. मज्जा करा.
2 Jul 2016 - 11:13 pm | किसन शिंदे
तुम्ही फक्त शुभेच्छाच द्या
3 Jul 2016 - 9:12 am | यशोधरा
पुढील वेळी चितळेंच्या बाकरवड्या पाठविणेत येतील हं!
3 Jul 2016 - 9:19 am | अजया
यशो, यायचं होतं गं तू.
3 Jul 2016 - 10:29 am | यशोधरा
तू बोलावलं नाहीस, म्हणून मी आले नाही. =))
2 Jul 2016 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
मज्जाय बाबा लोकांची ! कट्ट्याला हजेरी लावणार्यांची जंगी यादी झालीय. खा लेको, खा टोभा, मटारची उसळ, शिक्रण ! मजा करा !
कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा !
सचित्र वृत्तांत जरूर टाका :)
2 Jul 2016 - 9:29 pm | जेपी
कट्याला अनेक शुभेच्छा.
-जेपी
3 Jul 2016 - 7:19 am | कैलासवासी सोन्याबापु
आज सोनियाचा दिनु! मला उगाच शाळेत 26 जानेवारी ला किंवा 15 ऑगस्टला फुलांची रांगोळी काढून मोठ्या भोंग्यावर लावलेली उस्ताद बिस्मिल्ला खानांची शहनाई आठवली!!
3 Jul 2016 - 8:13 am | सतिश गावडे
मी, गणामास्तर आणि आपल्या साऱ्यांचे लाडके दर्पणसुंदरीहृदयसम्राट, पुरातन मंदिरे आणि लेणी अभ्यासक कातरवेळ फेम प्रचेतस सर पुण्याहून क्षमस्व चिंचवड वरून निघालो आहोत.
3 Jul 2016 - 8:47 am | चौकटराजा
बुवा अले नाहीत त्याला कार्न पांदू नाही येणार म्ह॑णून नाही तर .............. संसार मंदिरी या आनंद नाचतो गं ह्य गाने हाय !
3 Jul 2016 - 1:11 pm | खेडूत
अरे वा!
आनंन्द का नांव ठेवलं? अन नाचायला पण लागला तो?
3 Jul 2016 - 8:48 am | नावातकायआहे
कट्याला अनेक शुभेच्छा!
3 Jul 2016 - 8:48 am | अजया
कातरवेळ फेम=))))
3 Jul 2016 - 8:51 am | रुस्तम
मस्त जोरदार पाऊस लागलाय ईकडे...
3 Jul 2016 - 9:00 am | गोरगावलेकर
मलाही गँगमध्ये सामील करा .
मी सौ. विपा. आपल्या स्वागतासाठी हजर असणार आहे.
3 Jul 2016 - 9:10 am | अजया
:)
ग्यांगमध्ये स्वागत आहे ताई!
3 Jul 2016 - 10:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अपडेट प्लीज ?
-दिलीप बिरुटे
3 Jul 2016 - 10:09 am | धनंजय माने
टक्या,
एवढे लोक्स जमत आहेत,
जागा पण आहे,
जेवण सुद्धा आहे
.
.
.
बघ की एखादी तिथल्या तिथे आणि करुन सोड की काय म्हणतात ते....लग्न बिग्न!
3 Jul 2016 - 10:11 am | टवाळ कार्टा
आरारा...अनाहिता? नक्कोच्च =))
3 Jul 2016 - 10:31 am | धनंजय माने
मी तिथल्या लोकांमध्ये नाही म्हणालो, तिथल्या तिथे म्हणालो.
त्या भालेरावांना गाठ की! ते पण लग्नोत्सुक आहेत.
शोध म्हणजे सापडेल एखादी अस्मिता. (पहा फ़क्त झी मराठी वर)
3 Jul 2016 - 10:09 am | धनंजय माने
टक्या,
एवढे लोक्स जमत आहेत,
जागा पण आहे,
जेवण सुद्धा आहे
.
.
.
बघ की एखादी तिथल्या तिथे आणि करुन सोड की काय म्हणतात ते....लग्न बिग्न!
3 Jul 2016 - 11:04 am | हेमन्त वाघे
पाटील फाटका वर सुरक्षा रक्षकाला कै सांगायचे ?
आपला फोन क्रमांक मिळेल का ?
3 Jul 2016 - 11:49 am | खालीमुंडी पाताळधुंडी
काय झालं कट्टा पावसात वाहून गेला काय?
3 Jul 2016 - 12:09 pm | सतिश गावडे
3 Jul 2016 - 12:14 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
मध्ये प्रचेतस आणि आजूबाजूचे कोण?
3 Jul 2016 - 12:50 pm | संजय पाटिल
कंजूस काका आणि टका असावेत बहुतेक....
3 Jul 2016 - 12:53 pm | धनंजय माने
५०% गुण. एक बरोबर एक चूक. याच क्रमाने.
3 Jul 2016 - 12:59 pm | मितभाषी
दुसरा धन्या आहे बहुतेक.
3 Jul 2016 - 1:09 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
प्यारे काका तुम्ही कोठे आहात?
3 Jul 2016 - 1:57 pm | धनंजय माने
यत्र तत्र सर्वत्र!
3 Jul 2016 - 2:19 pm | सतिश गावडे
डावीकडून उजवीकडे: कंजुसकाका, प्रचेतस आणि गणामास्तर.
3 Jul 2016 - 1:46 pm | पद्मावति
कट्टा सुरू झाला..वाह!!. माझा उगाचंच बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना झालाय....
तिथे मुंबईत कट्टा आणि मला इथे घरी बसून तीथे काय काय मज्जा चालली असेल हा विचार करूनच मस्तं वाटतंय:))
3 Jul 2016 - 12:26 pm | नावातकायआहे
सही....
एन्जोय माडी
3 Jul 2016 - 1:21 pm | नीलमोहर
कट्टेकऱ्यांना ( सेफ डिस्टन्स वरून) नमस्कार आणि शुभेच्छा !!
कृपया सर्वांनी मिळून त्या लाडोबा (टकाला) भरपूर फटके द्यावेत ही अति नम्र विनंती.
त्या हृद्य प्रसंगाचे फोटोही काढल्यास चितळयांची बाकरवडी आणि आंबाबर्फी ( कधी ना कधी) भेट देण्यात येईल.
:)
3 Jul 2016 - 2:21 pm | अभ्या..
हाणा तेला खरंच. प्रत्येकाने निदान ४-५ तरी वाजवाव्यात. सुधारायचं न्हाय त्याशिवाय. वाटल्यास ब्लँकेट टाकून हाणा म्हणजे त्याला कळणार नाही. ;)
3 Jul 2016 - 3:09 pm | कैलासवासी सोन्याबापु
टका म्हणजे तोच का तो आमच्या एनफिल्डला श्या घालणारा!! ;)
कंबल परेड तो बनती है बॉस
3 Jul 2016 - 3:25 pm | विजुभाऊ
अरे रामदास काका, प्रभू मास्तर, साक्षी दिसत नाहीत हल्ली
3 Jul 2016 - 5:17 pm | किसन शिंदे
आत्तापर्यंतचा सर्वात मोठा कट्टा झाला. शेवटाचा मोठा टाकावा काय?