णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!
*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार
कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी
वेळ- दुपारी बारा वाजता
जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.
प्रतिक्रिया
3 Jul 2016 - 6:49 pm | शान्तिप्रिय
मानल पठ्यानो तुम्हला
कट्ता मस्त झालेला दिसतोय
फोटॉ आणी व्रुत्तान्ताची
वाट पाहतोय.
3 Jul 2016 - 7:02 pm | अजया
आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि मस्त कट्टा.धन्यवाद सर्व चाळीस मिपाकरांनो आणि मिपाकरणींनो!
3 Jul 2016 - 7:37 pm | कंजूस
फोटो-
१ ) ओळखपरेड
२ ) ओळखपरेड
३ ) ओळखपरेड
४ ) निघण्याअगोदर
५ ) निघण्याअगोदर
६ ) छत्री धरलेली चि० निलापी
७ ) शेवट गोड तर सर्वच गोड-
3 Jul 2016 - 8:22 pm | किसन शिंदे
काका, सर्व फोटो भारी आले आहेत.
3 Jul 2016 - 9:19 pm | बोका-ए-आझम
असेच म्हणतो!
3 Jul 2016 - 7:43 pm | पिंगू
कट्टा मस्तच झाला. बर्याच दिवसांनी कट्ट्याला हजेरी लावली..
3 Jul 2016 - 8:31 pm | जव्हेरगंज
+१
आता कुठे कट्ट्याची भव्यता लक्षात आली!!!!
लैच भारी!!!
3 Jul 2016 - 8:37 pm | एस
अप्रतिम कट्टा! इतक्या पावसात कट्टेकर्यांनी कट्ट्याला हजेरी लावली याबद्दल जोरदार अभिनंदन!
3 Jul 2016 - 8:43 pm | त्रिवेणी
3 Jul 2016 - 8:45 pm | त्रिवेणी
3 Jul 2016 - 9:35 pm | पिशी अबोली
छान! जंगी कट्टा झालेला दिसतोय..
3 Jul 2016 - 9:56 pm | आदूबाळ
जबरदस्त भारी!
3 Jul 2016 - 10:04 pm | कविता१९७८
कट्ट्याला मज्जा आली, मला अजयाने ६ वाजता पनवेलला पोहोचवल्याने ६.३० ची पनवेल-डहाणुरोड ट्रेन मिळाली आणी आत्ताच १० वाजता घरी पोहोचलेय.
3 Jul 2016 - 10:04 pm | कविता१९७८
कट्ट्याला मज्जा आली, मला अजयाने ६ वाजता पनवेलला पोहोचवल्याने ६.३० ची पनवेल-डहाणुरोड ट्रेन मिळाली आणी आत्ताच १० वाजता घरी पोहोचलेय.
3 Jul 2016 - 10:09 pm | संदीप डांगे
सकाळी साडेसातला निघालो ते आता दहा वाजता घरी पोचलो... हुश्श..
.
पण
.
मज्ज्जा आली राव....!!!!
3 Jul 2016 - 11:00 pm | खटपट्या
जळजळ !!
3 Jul 2016 - 11:15 pm | धनंजय माने
+११११
खूपच!
3 Jul 2016 - 11:02 pm | रुस्तम
खूप मज्जा आली.
3 Jul 2016 - 11:12 pm | Maharani
वा..मस्तच झाला की कट्टा..
3 Jul 2016 - 11:35 pm | शि बि आय
कट्टाला खूपच धमाल आली. एवढ्या पावसात बर्याच लांबून लांबून हजेरी लावल्याबद्दल सर्व मिपाकरांचे आभार.
तसेच कट्टा ठरवणारे बोका भाऊ आणि कट्टयासाठी ठिकाण ठरणारे श्री व सौ पाटील यांना धन्यवाद.
3 Jul 2016 - 11:41 pm | माम्लेदारचा पन्खा
ब्बाबौ.....काय तो भव्य कट्टा...काय ती दिव्य माणसं !
जंक्शन काम झाल्यालं है !
3 Jul 2016 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
जबरदस्त!