मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
22 Jun 2016 - 11:22 pm

णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे.
कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे!
च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!

*****************************************
तारीख - ३ जुलै,रविवार

कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी

वेळ- दुपारी बारा वाजता

जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल.
रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.
निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती!
NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.

हे ठिकाणमांडणीसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

24 Jun 2016 - 12:35 pm | अत्रन्गि पाउस

आम्हालाही ...तेव्हा ...आम्हाला ही बोलवा 'चालत असेल तर'

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2016 - 12:51 pm | टवाळ कार्टा

+१११११११
इथे रगडोत्तम भारती बाप्पूसाहेब फ्यानक्लब आहे :)

रुस्तम's picture

24 Jun 2016 - 1:24 pm | रुस्तम

+१११११११

धनंजय माने's picture

24 Jun 2016 - 1:48 pm | धनंजय माने

+१२३४५४३२१

महासंग्राम's picture

24 Jun 2016 - 3:04 pm | महासंग्राम

म्हमईत आलेत सांगजा बावा, तेवढंच गाववाल्याले भेटणं हुईन......

निवेदिता-ताई's picture

24 Jun 2016 - 8:18 am | निवेदिता-ताई

मन:पूर्वक शुभेच्छा !!! :)

नमकिन's picture

24 Jun 2016 - 8:54 am | नमकिन

कशाला बाहेर चरायचं अन् पोटाला घोर लावायचा इकतचा, उगं बसावं की घरी हरी हरी करित.
इच्छा आहे, पण पैशे किती ? २०० त भागंल का?

सर्व मिपाकरांना नमस्कार,
मी मिपाचा खूप दिवसांपासून सदस्य आहे. सदस्य असलो तरी फक्त वाचनमात्र आहे. नव्या मुंबईत कट्टा होतोय वाचून आनंद झाला. कट्ट्यासाठी "नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन" (NMSA) वाशी हे ठिकाण सुचवू इच्छितो. ऐसपैस जागा, खाण्यापिण्याची सर्व सोय, पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. मी येथील सदस्य असल्याने कट्ट्यास परवानगी मिळेल.
आयोजकांशी संपर्क कसा साधावा ते माहीत नाही. माझा नंबर देत आहे : विलास पाटील - 9323245857.

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2016 - 9:20 am | टवाळ कार्टा

खाण्याची जागा ऐसपैस आहे...पण चव कशी आहे...आम्ही खादाडी करायला येणार हौत =))

अजया's picture

24 Jun 2016 - 9:25 am | अजया

चांगलं असतं रे

NMSA छानच आहे.संपर्क करत आहे.

स्वीट टॉकरीणबाई's picture

24 Jun 2016 - 10:53 am | स्वीट टॉकरीणबाई

मी आणि स्वीट टॉकर येणार आहोत. पुण्यापासून गाडी. आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तीन जणा/जणींचं स्वागत आहे.

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2016 - 11:20 am | टवाळ कार्टा

अरे वा...

त्रिवेणी's picture

24 Jun 2016 - 1:24 pm | त्रिवेणी

आम्ही ४ जनी तर फिक्स आहोत yenaryat.पण इतके लोक नाही मैनेज होणार गाडीत.आम्ही दुसऱ्या गाड़ी ने येवू.
पुण्यातून कोणत्या एरियातून nighnar आहात.

मंदार कात्रे's picture

24 Jun 2016 - 12:49 pm | मंदार कात्रे

येण्याचा प्रयत्न करीन
आत्ताच फायनल सांगता येत नाही

कट्ट्यास शुभेच्छा

सगळ्या येणाऱ्यांचे स्वागत आणि एक विनंती.एक तारखेपर्यंत येण्याचे पक्के कळवल्यास आयोजनास बरे पडेल.

रुस्तम's picture

24 Jun 2016 - 8:32 pm | रुस्तम

मी सहकुटुंब येतोय..

सोनुली's picture

24 Jun 2016 - 8:19 pm | सोनुली

nmsa ठरवलंय का?

नक्की झाले की धागा अपडेट करूच.स्टे ट्युन्ड!

धनंजय माने's picture

24 Jun 2016 - 8:42 pm | धनंजय माने

पुणेकरांची सवय लागली काय बृहन्मुम्बई आणि रायगड वाल्यांना???

याचे २०० झाले की दुसरा धागा येऊ दे.
मौक़ा भी हाउ दस्तूर भी!

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2016 - 10:47 am | टवाळ कार्टा

ओ माने, पुणेकरांना कट्ट्याचे ठिकाण ठरवायला ३ धागे लागतात...इथे तारिख, जागा आणि वेळ याबाबत कोणाचे नखरे नाहित

पिंगू's picture

24 Jun 2016 - 10:29 pm | पिंगू

मी पण येतोय. कळंबोलीवरुन यायला जेमतेम पाऊण तास लागेल. अर्थातच काही काम आले तर मात्र येता येणार नाही..

बोका-ए-आझम's picture

25 Jun 2016 - 12:50 pm | बोका-ए-आझम

कळंबोली म्हणजे फार काही लांब नाही. काम adjust होत असेल तर बघा.

उद्या सकाळी प्रथम साईटवरील कामे आटपून डोंबिवली मार्गे कट्ट्याला दाखल होईन.

धनावडे's picture

25 Jun 2016 - 12:41 am | धनावडे

आम्हाला कोण ओळखत नाही तरी तिथे येउन जाईन

बोका-ए-आझम's picture

25 Jun 2016 - 12:48 pm | बोका-ए-आझम

जरुर या!

कवितानागेश's picture

25 Jun 2016 - 12:45 am | कवितानागेश

रविवारी सगळीकडेच गर्दी असते. इन ऑर्बिट मध्ये तर फारच.
मी येतेय नक्की.

कट्ट्याचे ठिकाण अपडेट केले आहे.आता नो गर्दी! श्री पाटील यांच्यामुळे आपल्याला नवी मुंबई स्पोर्टस् असो.मध्ये निवांत कट्टा करता येणार आहे.

उल्का's picture

25 Jun 2016 - 1:25 pm | उल्का

श्री पाटील यांना धन्यवाद!
आणि आयोजकांना सुद्धा!

उल्का's picture

25 Jun 2016 - 1:25 pm | उल्का

श्री पाटील यांना धन्यवाद!
आणि आयोजकांना सुद्धा!

काल एक डोंबिवली कट्टा ( मिनी ) झाला.दीपककुवेत,मुवि,मी,भाते आणि विनोद१८.डॅा सुबोध स्काइपवरून आले होते.जागा नेहमीचीच.

बोका-ए-आझम's picture

25 Jun 2016 - 9:02 am | बोका-ए-आझम

दीपककुवेत ३ तारखेला आहेत का? कट्ट्याला जरुर या! आणि या कट्ट्याचे फोटो टाका की!

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2016 - 10:49 am | टवाळ कार्टा

डॅा सुबोध स्काइपवरून आले होते

हे "...आणि त्यांच्या आत्म्याला प्लँचेटकरून बोलवले..." या टैपचे वाटतेय =))
डॉक बहुतेक इंजेक्शन देणार नेक्ष्ट टैम दवाखान्यात गेलो की....गेलाबाजर फी तरी घेतीलच :D

महासंग्राम's picture

25 Jun 2016 - 9:38 am | महासंग्राम

डबल सेंचुरी झाली की हबीनंदण

धनंजय माने's picture

25 Jun 2016 - 11:29 am | धनंजय माने

अच्छा हॉस्पिटल समोरच आहे तर!

भोळा भाबडा's picture

25 Jun 2016 - 4:26 pm | भोळा भाबडा

मी येत आहे,
हा घ्या माझा नंबर 98######57
हा माझा व्हाट्शअप नं -99######44
हा माझा इमेल bholabhabdaअॅटदरेटजीमेलडाॅटकाॅम
हा माझा पत्ता ---
मु.पो - वैतागवाडी(व्हाय पौड फाटा)
तालुका - जिल्बीपूर
जिल्हा - ट्रोलनगर

साधा मुलगा's picture

25 Jun 2016 - 8:08 pm | साधा मुलगा

कट्ट्याला शुभेच्छा ! जमेलस वाटत नाही काम आहेत त्या दिवशी. बाकी यायचं असेल तर काही वर्गणी लागेल का? कारण आता आपण NMSA मध्ये करत आहोत, त्यांचे भाडे असणारच न?
अवांतर: तुम्ही मूळ धाग्याच्या लेखनामध्ये एडीट कसे केले? आधी काट्याचे स्थान ठरले नवते ते add कसे केलेत? मलाही माझ्या मुंबई लोकलच्या धाग्यामध्ये काही लहानसे बदल करायचे आहेत, संपादक मंडळ मदत करू शकेल का?

तसे संपादन सासंमं ला करता येते.तुम्हाला तुमच्या धाग्यात काय बदल करुन हवा आहे ते कळवा.
भाडे नाहीये. कारण एक मिपाकर सदस्य आहेत तिथले.वर्गणी वेगळी नाही काही.तिथे जो जेवणखाण्याचा खर्च येईल तो आपापला करायचा आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jun 2016 - 9:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी ठळक केलेली वाक्य पूर्णविराम न वाचता एकदम एकाच दमात वाचली,

तसे संपादन सासंमं ला करता येते.तुम्हाला तुमच्या धाग्यात काय बदल करुन हवा आहे ते कळवा.
भाडे नाहीये.

अन सासंमं एडिटिंग भाडे काही टोटलच लागली नाही एकदम काहीक्षण :D :D

अजया's picture

26 Jun 2016 - 6:51 am | अजया

=)))
तुम्ही लिहिल्यावर तसंच वाचलं गेलं खरं!

तसंही सासं भाडं घेत नाही.होऊ द्या खर्च.सासंमं आहे घरचं ;)

णमस्कार.आमाला नुयार्क लंडन मुंबाई समदं सारकंच.जमलं तर यीन.यिकाचा टरक यितो तिकडं मारकिटला पन रैवारी न्हाई येत.एपीएमशी बंद असतंयना.

नूतन सावंत's picture

25 Jun 2016 - 10:02 pm | नूतन सावंत

मंग तुमी शणवारी या.हाकानाका .ह,घ्या.वडापभौ.

नूतन सावंत's picture

25 Jun 2016 - 10:05 pm | नूतन सावंत

मंग तुमी शणवारी या.हाकानाका .ह,घ्या.वडापभौ.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Jun 2016 - 12:18 pm | माम्लेदारचा पन्खा

३ जुलै काय... बर बर...बघू या...

बोका-ए-आझम's picture

26 Jun 2016 - 4:19 pm | बोका-ए-आझम

मुवि आणि सौ.मुवि दोघेही येताहेत.

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Jun 2016 - 12:19 pm | माम्लेदारचा पन्खा

३ जुलै काय... बर बर...बघू या...

त्रिवेणी's picture

26 Jun 2016 - 4:36 pm | त्रिवेणी

आता नविन धागा काढ़ा न.

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2016 - 4:38 pm | टवाळ कार्टा

का? काही गरज नाहीये

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 4:38 pm | सतिश गावडे

असं कसं? असं कसं?

टवाळ कार्टा's picture

26 Jun 2016 - 4:43 pm | टवाळ कार्टा

कारण सगळे ठरलेय....पुणेकरांनाच हौस काथ्या कुटायची

अभ्या..'s picture

26 Jun 2016 - 4:47 pm | अभ्या..

कारण सगळे ठरलेय

हो. कळतेय ते धागा आल्यापासूनच.
कोण ठरवतय कट्टा, धागा कोण काढतंय. नाव कुणाचं, हौस कुणाला... सगळे कळतेय. ;)

कंजूस's picture

26 Jun 2016 - 5:05 pm | कंजूस

सोलापुरापर्यंत पोचलंय बातमीपत्र?

त्याला बातमीपत्र कशाला लागतंय? ह्याच धाग्यावर टेलिप्रिंटरच्या गुंडाळ्यांचा खच पडलाय.

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 4:49 pm | सतिश गावडे

सौ पुणे/पिंचिं की एक मुंबई/ठाणे/डोंब आळी/नवी मुंबई/उत्तर रायगड की ;)

त्रिवेणी's picture

26 Jun 2016 - 5:34 pm | त्रिवेणी

बर राहील
ओक्के
आम्ही आपल्या सारख्या बड्या बड्या मिपा हैस्टिंचे दर्शन लाभ मिळणार म्हणून येतोय.एकुणात सैराट कट्टा होणार अस डिस्टेय.

धनंजय माने's picture

26 Jun 2016 - 5:54 pm | धनंजय माने

पिवळे केस म्हणजे अतिच नाई का वाटत????
मान्य आहे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे पण म्हणून येल्लो येल्लो????

त्रिवेणी's picture

27 Jun 2016 - 12:25 pm | त्रिवेणी

मग पार्लरवालीं दुकान उघडून बसलीय tevadh बिज़नेस दिलाच पाहिजे.
आणि मी कत्त्याला येणार तर तेवढी तैयारी तर क़रणाराच ना.

#सौ पुणे/पिंचिं की एक मुंबई/ठाणे/डोंब आळी/नवी मुंबई/उत्तर रायगड की ;)
सो लुहार की = इक सुनार की।अगदी बरोबर गावडे सर.
( सोनं उसळी मारतंय चाळीसहजाराला डिसेंबरपर्यंत )

अदि's picture

26 Jun 2016 - 8:47 pm | अदि

मी नक्कि येणार..

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 9:09 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मी येवू शकणार नाही,कारण माझं तेजस्वी व्यक्तीमत्व पाहून उगाच इतरांच्या मनात न्यूनगंड उत्पन व्हायला नको

धनंजय माने's picture

27 Jun 2016 - 11:34 am | धनंजय माने

सारा ज़माना गाण्यातल्या अमिताबच्चन सारखं लाइट वाला ड्रेस घालणार आहात काय? वेरिएशन म्हणून त्या छोट्या लाइट्स ऐवजी 60 60 चे पिवळे बल्ब

अजया's picture

26 Jun 2016 - 9:31 pm | अजया

=))))))तुम्ही याच.आम्ही तुमच्या तेजापासून बचाव करायला गाॅगले आणि न्यूनगंडावर इलाज म्हणून अहंगंड उत्पन्न करुन ठेवु

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2016 - 10:15 pm | अत्रुप्त आत्मा

@न्यूनगंडावर इलाज म्हणून अहंगंड उत्पन्न करुन ठेवु››› http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughter.gif

आगागागागा! मार्केटयार्ड उठलं.!

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 11:03 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ओ

रेवती's picture

28 Jun 2016 - 12:59 am | रेवती

हा हा हा. लैच्च मज्जा.......

बोकोबा
एकदा कट्टा अटेंड करायचाय सगळ्यांना भेटायचय यावेळेस काम जमवुन तिथे डायरेक्ट येतो.
आणि मी साला तुमचा फ्यान असुनही मला तुमचा अंधारक्षण धागा तो काय माहीत नाही अस कस ?

जर तुम्हाला अंधार क्षण धागे माहित नसतील तर तुम्ही नशिबवान आहात.(...होतात ?) भयंकर अस्वस्थ करणारी मालिका होती ती...

पक्षी's picture

28 Jun 2016 - 10:50 am | पक्षी

अंधा रक्षण: खरंच जबरदस्त लेखमाला होती ती. त्याला लेखमालिकेमुळे मिपाचं व्यसन लागलं.

माझा मेमरी लॉस झाला होता गझनी टाइप
म्हणुन चुकुन तो प्रतिसाद दिला.
सध्या कनफ्युजनही वाढतय. वयोमान दुसर काय?

सुनील's picture

27 Jun 2016 - 9:56 am | सुनील

काही वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीपासून हजेरी लावता येणार नाही. तरीही दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न राहील.

आशा आहे की निदान काही मंडळी तरी भेटतील.

कैलासवासी's picture

27 Jun 2016 - 11:51 am | कैलासवासी

कट्ट्याला पिंपरी गावठाण तर्फे ट्रक भरून शुभेच्छा <img src="https://ivyprosper.files.wordpress.com/2013/01/chalkboard-enjoy-the-mome... width="876" height="1024" alt="." />

अजून दुसरा धागा नाही निघाला?

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2016 - 7:05 pm | टवाळ कार्टा

गप्रांव...वशाड मेलो

प्रणवजोशी's picture

28 Jun 2016 - 10:31 am | प्रणवजोशी

नक्की येणार कट्ट्याला

धनंजय माने's picture

28 Jun 2016 - 11:11 am | धनंजय माने

एका कट्टा धाग्याचे ३०० करण्यापेक्षा तीन धाग्याचे १००-१०० करणं हे अधिक साम्यवादी आणि सर्वांना सामान संधि देणारं ठरणार असा पुण्याचे लोक विचार करतात.

टवाळ कार्टा's picture

28 Jun 2016 - 11:19 am | टवाळ कार्टा

पुणेकरच ते...त्यात काय नवल =))ए

धनंजय माने's picture

28 Jun 2016 - 11:50 am | धनंजय माने

चुकीचं काय वाटतंय?

टवाळ कार्टा's picture

28 Jun 2016 - 12:33 pm | टवाळ कार्टा

पुणेकर =))

धनंजय माने's picture

28 Jun 2016 - 3:15 pm | धनंजय माने

आयोजक आहेस ना कट्ट्याचा?
पुणेकर जाणारेत कट्टयाला गाड्या करुन आणि भरुन....

सांभाळ हो!

टवाळ कार्टा's picture

28 Jun 2016 - 3:41 pm | टवाळ कार्टा

बर मग?

सूड's picture

28 Jun 2016 - 3:04 pm | सूड

बरोबर आहे, मागे १००० प्रतिसादाचा एक धागा केलंनीत, तेवढ्या प्रतिसादांत काव्यविभागात लिहीणारांचे तीसेक धागे सहज उरकले असते. बोलणार कोण!!

धनंजय माने's picture

28 Jun 2016 - 3:17 pm | धनंजय माने

नायतं काय!

उगाच कपिल ला खेळवला विक्रमासाठी तसं सुरु होतं.

तुम्ही हल्लीच उगवलेले दिसता, तुम्हाला बरं म्हाईत?

टवाळ कार्टा's picture

28 Jun 2016 - 3:41 pm | टवाळ कार्टा

=))

अजया's picture

29 Jun 2016 - 2:36 pm | अजया

कट्टा अपडेट

रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे.सहकुटुंब जरुर उपस्थित राहता येईल.

मीता's picture

29 Jun 2016 - 3:50 pm | मीता

नक्की येणार आहे .

स्वीट टॉकर's picture

30 Jun 2016 - 9:42 am | स्वीट टॉकर

आम्ही दोघे पुण्याहून येणार आहोत. गाडीत तीन जागा रिकाम्या आहेत. कोणाला यायचे असल्यास सांगा.

संदीप डांगे's picture

30 Jun 2016 - 10:21 am | संदीप डांगे

मी येतो. पुण्यात कसं भेटायचं ते व्यनिद्वारे ठरवू.

प्रणवजोशी's picture

30 Jun 2016 - 10:31 am | प्रणवजोशी

मग रविवारी भेटुया सगळे पण मला काही फोन नं व्य.नि.केलेत तर बरे होतील कारण हा माझा पहिलाच कट्टा असणार आहे.