भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

गॅरी शोमन's picture
गॅरी शोमन in जनातलं, मनातलं
19 Mar 2016 - 9:18 am

"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे.

ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता. परिणमी स्थानिय सत्ता टिकवण्यासाठी परकियांना आमंत्रणाची राजनिती पुढे संस्कृतीला मारक ठरली. याचाच परिपाक म्हणुन ओवेसी आवश्यकता नसताना असली विधाने करत आहे.

संघाचे उदगाते डॉ. हेडगेवार काँग्रेसमधे होते. कॉग्रेसच्या अधिवेशनात त्यांची उपस्थीती आणि सहभाग असायचा. अश्यावेळी पं. पलुसकरांच्या वाद्यासहीत वंदेमातरमला काही मुस्लीम विरोध करायचे. सभात्याग करायचे. कारण गाणे- वाजवणे इस्लाम मधे हराम आहे म्हणायचे. इथे त्यांचा मुस्लीम असल्याचा काय संबंध होता असा प्रश्न विचारला जात नसे. याकडे काँग्रेसनेते दुर्लक्ष करत आणि तुष्टीकरण करुन पुन्हा त्यांच्या जवळ जात. काँग्रेसचे हे मुसलमानांच्या वृतीकडे झालेले दुर्लक्ष किंवा अशी अनेक उदाहरणे असलेले प्रसंग डॉ. हेडगेवारांना देश पुनर्निमाणाच्या कार्यात व्यत्यय वाटे. त्यांच्यामते देश टिकवुन ठेवायचा असेल तर याला खतपाणी नको.

संघावर अनेक टिका झाल्या. स्वयंसेवक गौरवाने भारतमाता की जय म्हणतात याकडे मात्र टिकाकारांनी कायम डोळेझाक केली. मुस्लीमांना बरोबर घेऊन राष्ट्रप्रेमाचे संस्कार करता येतील का या विचाराने अनेक संघाला पर्यायी प्रवाह आले ज्यात राष्ट्र सेवा दल, कॉग्रेस सेवा दल किंवा अन्य काही असतील. मुस्लीम समाजाने जणु राष्ट्रप्रवाहात जायचेच नाही असा अट्टाहास धरत या पर्यायी संघटनांना नाकारले. शेवटी या पर्यायी विचारधारेत मुख्य सहभाग हिंदुंचाच राहीला.

सुदैवाने काँग्रेस विचारधारेने अद्याप राष्ट्रप्रेमाचे प्रतिक असलेल्या घोषणा टाळल्या नाहीत याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या विधान सभेत आला. यात राजकीय स्वार्थ होताच. अनेक मतदार संघात एम आय एम च्या अस्तित्वामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना विधानसभेत हार पत्करावी लागली होती. याचा परिपाक म्हणुन विधानसभेच्या निवडणुका संपताच प्रणिती शिंदे आणि निलेश कि नितेश पैकी एकाने एम आय एम ला जातियवादी ठरवुन टिका सुरु केली.

काँग्रेसने आणलेला वारीस पठाण यांच्या अधिवेशन संपेपर्यंतच्या निलंबनाच्या प्रस्तावाला राजकीय झालर आहे. हा प्रस्ताव पुर्ण देशप्रेमाच्या भावनेने भरलेला नक्कीच नाही. एम आय एम हा मुस्लीम मतदारांना काँग्रेसपेक्षा जवळचा वाटतो ही खरी काँग्रेसची अडचण आहे.

भाजपने कम्युनिस्टांच्या विरोधात काँग्रेसला एकत्र निवडणुका लढण्याचे आवाहन केले ते काँग्रेसने मानले नाही. कधी काळी जम्मू काश्मिरमध्ये एकत्र लढण्याचे आवाहन केले त्याला काँग्रसने प्रतिसाद दिला नाही. यावेळेला मात्र आश्चर्यकारक रित्या काँग्रेसने आघाडी घेत सर्वांना धक्का दिला. पण त्यामागे ही राजकीय खेळी होती.

काँग्रेस व भाजप देशविरोधी असलेल्या सर्वच स्थानिक किंवा ज्यांची नाळ देशविरोधी आहे अश्या राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात एकत्र येणे गरजेचे आहे असे या निमीत्ताने वाटते. अन्यथा देशविरोधी गरळ ओकणार्‍या या सापांचा फुत्कार राजकीय स्वार्थासाठी लक्षात न घेणे म्हणजे फुटीरता जोपासणे असे ठरेल.

राजकारणप्रकटनविचारप्रतिक्रियासमीक्षाबातमीमतशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

19 Mar 2016 - 9:41 am | उगा काहितरीच

संघ आपला निवांत आपल्या गतीने जे काय कामे करायची ते करतोच. कुणी वंदा वा निंदा . संघाचा एवढा विरोधच का करतात लोक तेच कळत नाही. ब्राम्हणी ब्राम्हणी म्हणून हिणवणार्या संघात तुमची जात कधीच कुणी

उगा काहितरीच's picture

19 Mar 2016 - 9:46 am | उगा काहितरीच

प्रतिक्रिया अर्धवट प्रकाशीत झाली क्षमस्व.. विचारीत नाही. बरं तसं बघायला गेलं तर गावागावात सकाळ संध्याकाळ मैदानावर जमून सुर्यनमस्कार काढणारे, खेळणारे १०-१५ लोक असं कितीसं नुकसान करू शकणार आहेत ?

वारीस पठाण यांना निलंबित करणे समजले नाही.. मुळात तो विषय या लेखात कुठे आला हे देखील समजले नाही.

जाताजाता -
लढाई जिंकण्यापेक्षा युद्ध जिंकणे महत्वाच्चे आहे. नाहीतर लढाई जिंकले आणि युद्ध हरले असे होईल.

(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

#BJP ke Leader Ne Bhari #Assembly Mein Gaali di Uske Bawajood bhe Sirf #AIMIM MLA WARIS PATHAN ko Suspend kiya Gaya ??? Kahan hai #Media ??? Kyun Nahe Dikhate Sachaiye ??? Kabhe Yeh Bhe Dikhaya Karoo..!!!!Posted by Hzt Aurangzeb Alamgir - RA on Friday, March 18, 2016

आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात. मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?

नाना स्कॉच's picture

19 Mar 2016 - 6:34 pm | नाना स्कॉच

सदनाच्या आत कुत्तो वगैरे म्हणले गेले ! :O ?

बोका-ए-आझम's picture

19 Mar 2016 - 10:47 pm | बोका-ए-आझम

मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?

राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 11:25 pm | तर्राट जोकर

मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Mar 2016 - 9:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुरुवात आपण करायची आणि दुसर्‍यानी हाच्चं प्रश्ण तुम्हाला विचारला की पलटवार करायचा. ये क्या रित हुई तर्राट जोकरजी?

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 10:03 pm | तर्राट जोकर

महोदय, आम्ही हा प्रश्न जनतेच्या वतीने सदनात जनतेची हीच कामे करायला धाडलेल्या जनतेच्या प्रतिनीधींसाठी उपस्थित केला होता. ह्यात कोणती सुरवात तुम्हाला दिसली? बाकी वार कराल तर पलटवार होईलच. मी बोकाशेठला विचारलं नव्हतं, ना त्यांना उद्देशून माझी प्रतिक्रिया होती. तरी ते वैयक्तिक होत आहेत. हे आपण सोयीस्कर टाळलं ये क्या रित हुई?

ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?

आपल्या अंगातली रग आणि मस्ती दाखवायला देशभक्तांना फक्त मुस्लिम दिसतात.

विदा आहे का?

का इथेही "मी वाकडा विचार करतो. माझ्या वाटेला जाऊ नका" असे सांगणार आहात?

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 10:15 pm | तर्राट जोकर

इथे प्रत्येक प्रतिसाद हा फक्त कायदेशीर भाषेत, कुठलीही अलंकारिक भाषा इत्यादी न वापरता पुरेसे खुलासे देउन लिहिला पाहिजे असे मिपाधोरणात आहे ह्याचा विदा आहे काय?

मोदक's picture

20 Mar 2016 - 10:17 pm | मोदक

:))

अपेक्षित प्रतिसाद. चालूद्या.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 10:21 pm | तर्राट जोकर

मी वाकडा विचार करतो. माझ्या वाटेला जाऊ नका >> नसांगतासमजले? व्वा!

बोका-ए-आझम's picture

21 Mar 2016 - 12:21 am | बोका-ए-आझम

समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो

तुम्हीच असं बोलताय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Mar 2016 - 10:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा प्रश्ण

मराठवाडा-लातुरात आपल्या मायभगिनींना रात्री-बेरात्री पाणी भरायला जागरणं करायला लागतात, पायपीट करायला लागते तेव्हा देशभक्ती कुठे जाते ह्यांची?

बोकोबांचा नीट विचारलेला प्रश्णः

राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.

ह्याला तुमचं उत्तरः

मी कुठे काय करतो, बोलतो, खरडतो ह्याच्या चौकशा करण्याऐवजी तुम्ही लातुरातल्या मायभगिनिंसाठी काहीतरी करत आहात हे कळले ह्याचा फार आनंद झाला. धन्यवाद बोकाशेठ, तुमच्यासारख्या लोकांवर आम्हाला अभिमान आहे. असेच चांगले काम करत राहा. तुमची पद्मश्री पक्की, अनुपमखेरना ज्यासाठी मिळाली त्यासाठी.

ह्यावर अपेक्षित उत्तर म्हणा किंवा योग्यं उत्तर म्हणा असं असु शकलं असतं की, मी लोकप्रतिनिधिंना प्रश्ण विचारतोय. किंबहुना मी काहीचं करत नाही हे उत्तरही चाललं असतं.

बोकोबांनी कुठेही वैयक्तिक वार केलेला नाही तस्मात तुमचा सो कॉल्ड पलटवार नसुन वार आहे.

तसचं हा तुमचा प्रश्णः

ज्या पद्धतीने व भावनेने बोकाशेठ यांनी मला प्रश्न विचारला ती पद्धत तुम्हाला मान्य असावी असे दिसते. यापुढे ह्याच पद्धतीने मिसळपाववर दिल्या गेलेल्या कुणाच्याही प्रतिसादाला असे बोका स्टाईल प्रतिप्रश्न केले गेले तर कुणाची हरकत नसावी?


राज्यकर्त्यांना नावं ठेवण्याव्यतिरिक्त तुम्ही काय करताय का लातुरातल्या मायभगिनींसाठी ते जाणण्यास उत्सुक आहे.

असा नीट प्रश्ण विचारला असेल तर कोणाची हरकत का असावी?

कारण विषय होता भारतमाता की जयचा. आपण आपल्या स्वभावाला जागुन तिथे विनाकारण अत्यंत इर्रिलेवंट अश्या दुष्काळाच्या बाबतीत प्रश्ण उपस्थित करुन अवांतर करायची काडी टाकलीत. आपणास नित्यनेमाने असं अवांतर करुन स्वतःचं हसं करुन घ्यायचा छंद आहे का? कारण आपल्या टेराबायटी प्रतिसादांमधुन माहिती कमी, विनाकारण म्हणणार नाही पण सबळ कारणं नसताना ओढवलेल्या वादावाद्या आणि अवांतर जास्तं असा प्रकार असतो.

त्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह लिहिलतं तर इथल्या लोकांनाही नवी माहिती कळेल ना. त्यामधे टंकनशक्ती वापरलीत तर जास्तं चांगलं वाटेल. तुमच्या प्रतिसादांवरुन चांगल्या विषयांवर चांगलं लिहु शकाल असं वाटतं पण तसं घडताना मात्र क्वचितचं दिसतं. बरेचं दिवस तुम्हाला हे सांगायचं डोक्यात होतं आज सांगितलं. धन्यवाद.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 12:53 am | तर्राट जोकर

तुमच्यासाठी खास छोट्टासा प्रतिसाद. उकल जमली तर बघा.

जा की रही भावना जैसी.
प्रभू मूरत देखी तिन तैसी.

अद्द्या's picture

21 Mar 2016 - 1:17 am | अद्द्या

पळ चांगला काढता तुम्ही हो

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 10:43 am | तर्राट जोकर

असं का वाटलं तुम्हाला? त्या छोट्ट्याशा प्रतिसादात गंभीर अर्थ आहे. कॅप्टनना टेराबायटी प्रतिसाद वाचायला नको वाटतात. परत त्यांना माझ्या प्रतिसादांवर वेळ वाया घालवायचा नाही. एकाच टीमला बॅटींग मिळणार असेल तर आम्ही बॉलींग का करावी?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Mar 2016 - 6:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या एवढा हुशार नसल्याने किंवा रिकामा नसल्याने किंवा आपला प्रतिसादावर अगदी ३० सेकंदही वाया घालवायच्या योग्यतेचा वाटत नसल्याने आपला पास ब्वॉ!!

धाग्यांवर अवांतर टाळा.

भंकस बाबा's picture

21 Mar 2016 - 1:19 pm | भंकस बाबा

का म्हणुन मला तर्राट जोकरच्या आयडिला मोगाचा वास येतो आहे?
भ्रम असावा बहुतेक?
राइट बन्धुचि का आठवण झाली बर्र?

बोका-ए-आझम's picture

21 Mar 2016 - 12:20 am | बोका-ए-आझम

समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो

हे तुम्हीच म्हटलंय. मग झालं तर. तुमच्या कुठल्याही मुद्द्यावर उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.

तर्राट जोकर's picture

21 Mar 2016 - 12:34 am | तर्राट जोकर

(तुमच्या लेखी) समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतो >> असे होते ते बोकाशेठ.

वागळेंचा प्रभाव बराच टिकून आहे अजून. खरंच प्रभावशाली माणूस असला पाहिजे.

आणि मला अजिबात तसं वाटत नाही. मी तुम्ही जिथे चुकीचे वाटताय तिथे चूक म्हणणारच आणि जिथे बरोबर आहात तिथे पाठिंबाही देणारच. रच्याकने वागळ्यांचा मुद्दा चुकीचा आहे. ते जर इथे असते तर तुम्ही लिहिल्याचाही पुरावा त्यांना लागला नसता. पु.लं.चे हरितात्या जसं ' पुराव्याने शाबित करीन ' असं म्हणत तसं वागळेंचं वाक्य ' पुरावा नसला तरी शाबित करीन ' असं आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Mar 2016 - 6:20 pm | श्री गावसेना प्रमुख

इच्छा शक्ती असली कि नेता अधिकारी काहीही करू शकतो,नांदेड जिल्ह्यात आंध्रातून कॅनॉल ने पाणी आणलेलं आहे।
आताचा दुष्काळ संधी मानून पाण्याचे व्यवस्थापन केले पाहिजे।
पाणी अडवून जिथल्या तिथे जिरवने हि काळाची गरज आहे,जमिनीवर दुष्काळ असला तरी वर्षभर वापरायला पुरेल इतका पाऊस तर नक्की पडतो,ते पाणी वाहून जाण्या ऐवजी जर शिरपूर पॅटर्न चे बंधारे बांधून जर अडवले गेले तर जमिनीत पाण्याची पातळी नक्की वाढेल ,त्यात स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे,शेताच्या बांधावरून वाहून जाणारे पाणी हे शेत तळे किंवा विहरीत टाकले तरी शेतीला उपयोगी पडू शकते,आता त्यासाठी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ह्या स्कीम चालू आहेत,सर्व कामे मुख्यमंत्रांनी बांधावर किंवा गावात येऊन स्वतः करण्याची अपेक्षा करू नये,हि कामे ग्राम सभेच्या मार्फत करता येतील ग्राम सभा(रोजगार हमी योजनेत आता पैशाचं लिमिट नाही ग्रामपंचायत कोट्यवधी रुपयाचं काम करू शकते,पण मजूर तिथे काम करायला कमी पणाच मानत(आमच्याकडे तरी)ती कामे यंत्राने करायचं ठरलं तरी गावातील विरोधी मंडळी तक्रार करतात आणि अशाने काम न होता निधी परत जातो,आता मजूर जर मिळत नसेल आणि काम जर लोकहिताचे असेल तर ते यंत्रानेही करून घेतात फक्त गावात एकी पाहिजे) तेव्हढ्या सक्षम आहेत ,शहरातील व ग्रामीण भागातील नवीन इमारतीच्या बांधकामाला परवानगी देतांना गच्ची च पाणी हे शोषखड्यात जिरवन बंधनकारक केलं पाहिजे ई ई.
(विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता येऊ नये,कसे जमेल शेतीसंग्रहाचा त्यांना पवारांसारखा छंद होता म्हणे)

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 8:14 pm | तर्राट जोकर

नाही तुमचं ठिक आहे सर्व म्हणणं. मग ह्या सदनात पाठवलेल्यांच काम कोण भारतमाता की जय म्हणतं की नाही, त्यांना कुत्तो वैगरे म्हणावं हेच आहे असे समजायला पाहिजे. वरील प्रकरनात नेत्यांची इच्छाशक्ती कुठे आहे ते दिसते, राज्यांचे प्रश्न असेच एका फटक्यात निकालात काढन्यासाठी दिसली तर तो सुवर्णक्षण.

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2016 - 6:34 pm | श्रीगुरुजी

वारीस पठाणने भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्यावर अधिवेशनाचा एक संपूर्ण दिवस त्यावर खर्च करून शेवटी त्याला निलंबित करणे हा मूर्खपणा होता. त्यापेक्षा तो दिवस इतर काही महत्त्वाच्या कामाकरीता सत्कारणी लावता आला असता.

अर्थात असल्या विषयांवर पूर्ण दिवस घालविणे हे नवे नाही. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या एका निमंत्रण पत्रिकेत जोतिबा फुल्यांचा उल्लेख/नाव नव्हते या मुद्द्यावरून सर्व पक्षांनी गोंधळ घालून एक संपूर्ण दिवस त्यावर खर्ची घातला होता.

प्रदीप साळुंखे's picture

20 Mar 2016 - 12:34 am | प्रदीप साळुंखे

सरकारने अशा लोकांना इग्नोर करावं आणि आपल्या कामात लक्ष द्यावं.
आणि समजा इग्नोर करावं असं वाटत नाही तर त्यांच्याविरूद्ध हिडन अजेंडा राबवावा.

तर्राट जोकर's picture

20 Mar 2016 - 11:05 am | तर्राट जोकर

प्रचंड सहमत

असल्या लोकांना संसद / विधानसभा सदस्य म्हणुन शपथ घेतानाच त्या मसुद्यात बदल करुन गोपनियता इ. बरोबर राष्ट्रभक्ती जागृत ठेऊ तसेच त्याचा भाग म्हणुन भारत माता की जय या सारख्या घोषणा किंवा कार्येक्रमात भाग घेणे अनिवार्य करणे आवश्यक ठेवावे.

मला तर असे वाटते ( हा संशोधनाचा विषय आहे ) की वारीस पठाण किंवा ओवैसी १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या कार्येक्रमात नक्कीच जाणे टाळत असणार कारण हे तरी कुठे घटनेत लिहले आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Mar 2016 - 11:04 pm | निनाद मुक्काम प...

ज्या कारणासाठी ते भारताचा माता असे उल्लेख करणे टाळतात त्या मानसिकतेला कट्टर पणाची हिंदू द्वेषाची त्याहून महत्वाचे
आम्ही आधी मुसलमान आहोत मग भारतीय ही विचारसरणी मुस्लिम समाजात रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याला आक्षेप घेणे भारतीय म्हणून मला धोकादायक वाटते कारण उद्या ह्याच विचारसरणीचा प्रादुर्भाव खलिस्तान चळवळीला खतपाणी घालणार .
राष्ट्रवादीचा नबाब मलिक ह्यांच्या साम्राज्याला तडा देऊन त्यांचा भावाला आमच्या कुर्ल्यात महानगर पालिकेत पाडून
सेनेचा उमेदवार निवडणून येण्यास ओविसी चा पक्ष कारणीभूत ठरला.अबू आझमी हवा कि ओविसी
असा प्रश्न मुस्लिम जनतेपुढे आला तर युती त्याकडे कानडोळा करते म्हणूनच ओवीसी ला निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात भाषणबंदी करत नाहीत
मराठवाडा हैद्राबाद जुने नाते आहे व मुंबईत मतदार ओविसी ला भुलतात त्याला मानतात म्हणून राष्ट्रवादी कोन्ग्रेज एवढेच कशाला जावेद सारखे दीड शहाणे वैतागून कधी नव्हे ते युतीच्या समवेत युती करून ओविसी ला ठोकतात.
ह्यावर एक दिवस वाया गेला नाही असे मला वाटते एरवी सुद्धा विधानसभेत असे काय दिवे लावतात , हतबल व विखुरलेले विरोधक राष्ट्रवादाच्या मुद्यावर युतीला साथ देतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील राष्ट्रीय नेत्यांना झाले ते बरोबर आ चूक ह्याचे राजकीय गणित अजून मांडता आले नाही आहे तर डाव्याच्या अधीन प्रसार माध्यमे जेव्हा राष्ट्रवादाचे प्रशस्ती पत्रक वाटायचा अधिकार ह्यांना कोणी दिला असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ह्या नावावर उमर कानैह्या ला वाचवू पाहतात व भाजपच्या विरुद्ध राजकीय पोळी पिकावू पाहतात त्यांना ओविसी प्रकरणामुळे एक पाऊल माघारी घ्यावे लागते
नाहीतर उमर चे भाषण ह्याची देही ह्याची डोळा जनतेला दाखवले गेले असते.
किंबहुना ओविसी ने उमरच्या जामिनाच्या निकालाच्या काही दिवस आधी हे प्रकरण उकरले तेव्हा तो सरकारचा डू आयडी असावा असेही त्यांना वाटू शकते
खरे तर कोन्ग्रेज मुक्त भारत मोहिमेस ओविसी ची भाजपला जहि प्रमाणात मदत होते
बंगाल आसाम मध्ये तो जाऊन कितपत प्रभाव पाडेल हे सांगता येत नाही.
पण त्यावर अजून भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, व तो जय हिंद म्हणतो तेव्हा तो राष्ट्रद्रोही ठरत नाही
मात्र मुसलमानांना धर्म निरपेक्षतेच्या दलदलीतून तो बाहेर काढून आपल्या दावणीला बांधत आहे हे प्रयत्न
सध्यातरी भाजपच्या पथ्यावर पडतील पण भविष्यात देशात एखाद्या मुद्यावरून मुस्लिम समाजाकडून अराजकता पेटवून आपले राजकारण करण्याचे त्याचे आय एस आय ते चीन सगळ्यांना सोयीचे ठरतील
डावे सध्या बंगाल मध्ये दर्गे मशिदी मध्ये जायला लागले आहेत
ममता आधीच मुस्लिम मतांचे राजकारण करत आहे
आसाम मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे
तेव्हा ओविसी त्यांचे राजकारण अनेकांच्या पथ्यावर व अनेकांच्या मुळावर येणार हे येत्या राज्यातील निवडणुकात दिसून येणार आहे
बात निकली हे तो दूर तक जायेगी

महाराष्ट्राच्या विधानसभेची चर्चेची पातळी कधीच लयाला गेली आहे. पण वरच्या चित्रफिती मधली भाषा मात्र खरेच चिंताजनक आहे. सरळ सरळ रस्त्यावरच्या फाळकुट दादासारखी भाषा आहे. खरे तर अशी भाषा वापरल्यावर कारवाई व्हायला पाहिजे. बाकी त्यांचा प्रसिद्धीचा हेतू मात्र बर्यापैकी साध्य झाला असेल
विलासराव 2 /3 टर्म तरी मुख्यमंत्री राहिले असतिल तरीही स्वतःच्या गावाच्या पाणीपुरवठयाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही हे मात्र खरे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Mar 2016 - 11:18 pm | निनाद मुक्काम प...

कनैह्या सारख्या उमरच्या अनेकांनी मुलाखती पार पडल्या नाहीत ह्याचे श्रेय ओविसी ला जाते
किंबहुना मुस्लिम समाजातील एक असंतुष्ट तरुण दिल्ली विद्यापीठात शिकतो व लोकशाहीच्या मर्यदा पाळून मुस्लिम समाजाला दिल्लीत समाजात वावरतांना काय त्रास होते हे मांडण्याचा प्रयत्न करतो तोच तरुण जे एन यु मध्ये येतो
त्याच्या मनातील असंतोषाला तेथील प्राध्यापक कम्युनिस्ट साच्यात ओततात मग हा नवीन कॉम्रेड
आपला पूर्वीचा अजेंडा कम्युनिस्ट आवरणाखाली मोठमोठ्याने लोकशाहीला लाथ मारून राबवतो ,कार्यक्रम करतो ह्यातून मुस्लिम समाजाला लाल झेंड्याखाली आणण्याचा नक्षलवादी व दहशतवादी अशी युती करून
सरफरोश मध्ये दाखवले तसे आय एस आय ची शस्त्रे नक्षलवादि लोकांच्या हाती पाडून अल्ट्रा कम्युनिस्ट अजेंडा राबविण्याचा ये च्यु री चा च्या पक्षाचे कुटील कारस्थान आहे.
गमावलेला जनाधार मिळवण्याचा हा प्रयत्न चालवला आहे. बिहार मधून नेपाळ व बंगाल मधून बांगलादेश मध्ये नक्षलवादी गेले तर तर आय एस आय त्यांना प्रशिक्षित करून भारतासाठी फार मोठी डोकेदुखी निर्माण करू शकते
नेपाळ व बांगलादेश मधील पाकिस्तानी प्रभाव कमी केला पाहिजे असे वाटते .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Mar 2016 - 6:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दोन्ही प्रतिसादांशी सहमत/

+११९२३२९८१

अर्धवट माहितीवर आणि विचारांवर लोक किती जोपासले गेले आहेत याचे उत्तम उदाहरण
हिंदू संस्कृती व हिंदू धर्म यातील फरक आजूनही लोकांना कळत नाही हे खरच दुर्दैव

बाकी विदुषकी प्रतिक्रिया बद्दल काय लिहावे .. आक्रस्ताळेपणा आणि सम्यक चर्चा यातील फरक कळावयास हवा ... आम्ही विरोध करतो म्हणून आम्ही देशद्रोही असे स्वताच ठरवून घ्यायचे व त्याप्रमाणे युक्तिवाद करायचा हे कन्टाळवाणे झ्हाले आता ..

असो यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर परत कधीतरी .. पण या विदुषकी प्रतिक्रियांमुळे एका चांगल्या संस्थळाची खरच दुर्दशा होत आहे ... माझ्ही सर्व वैचारिक सभासदांना विनंती की या विदुषकी भासणार्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून चर्चा चालू ठेवता आली तर पाहावे .. असल्या निव्वळ धूळउडव्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करावे

भाजप आणि काँग्रेस खोटे खोटे का होईना भारतमाता मुद्यावर एकत्र आलेले दिसले. तो दिवस भारताच्या इतिहासात सुदीन असेल जेव्हा हे दोन्ही पक्ष खरे खरे एकत्र येऊन देशद्रोही अजेंड्यावर काम करणारे कम्युनिस्ट असोत की अजुन कोणी यांना संपवतील.

मृत्युन्जय's picture

21 Mar 2016 - 2:56 pm | मृत्युन्जय

बाकी सगळे ठीक आहे. पण या कारणावरुन वारिस पठाण ला निलंबित करायचे अधिकार विधानसभेला आहेत का? आणी ही कारवाई कायदेशीर आहे का ? वारिस पठाणा विरुद्धा निंदाव्यजनक ठराव पास करणे हे नक्कीच कायदेशीर असले असते. पण निलंबनाची कारवाई योग्य ठरते की नाही याबद्दल शंका आहे. पठाण लोकशाही मार्गाने लोकांछ्या मतांनी निवडुन आलेला उमेदवार आहे. त्याने बेकायदा कृत्ये केली आहेत हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत निलंबन वैध ठरेल असेल वाटत नाही (णंतरही तो विधानसभेचा अधिकार आहे असे वाटत नाही). निलंबनाचे खरे कारण लपवले तर जात नाही आहे ना?

सहमत. बहुदा शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबन असे काहीतरी केले असेल.

वरती एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे, या प्रकरणात देशभक्तीपेक्षा "शत्रुचा शत्रु तो आपला दोस्त" या न्यायाने सर्व पक्ष एकमुखाने एकत्र आले असावेत. याची जास्त शक्यता वाटत आहे.

आनन्दा's picture

21 Mar 2016 - 3:45 pm | आनन्दा

काहीच कळत नाहीये.. वारीस पठाणला का निलंबित केले, आणि एव्हढा राजकीय (अ)शहाणपणा का दाखवला गेला हे माहीत नाही. या घटनेचा निषेधच केला पाहिजे.
विशषतः मला अजून एक गोष्ट कळत नाहीये ती म्हणजे कोंग्रेस आणि राकाँ ने पण त्याला दिलेला पाठिंबा. त्यातून बर्‍याच शक्यता निघतात
१. विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांच्या मागे फरफटत गेलाय. हे लोकशाहीसाठी अत्यंत वाईट आहे.
२. विरोधकांना सत्ताधार्ञांचा हिंदुत्ववादी अजेंडा हायजॅक करायचाय.. किंवा हळूहळू त्यांची वाटचाल देखील हिंदू अनुनयाच्याअ दिशेने सुरू आहे.. याला मी वाईट म्हणणार नाही, पण त्याची परिणीती जर अश्या घटनांमध्ये होणार असेल तर ते नक्कीच वाईट म्हटले गेले पाहिजे.
३. हे स्कोअर सेटलिंग आहे. - तसे असेल तर मात्र याबद्दल काही न बोलणे उत्तम. कारण ज्याप्रकारे सगळे याबद्दल मौन बाळगून आहेत ते पाहता हे प्रकरण तसे सोपे वाटत नाहीये.

भंकस बाबा's picture

21 Mar 2016 - 6:42 pm | भंकस बाबा

उसने देशप्रेम दाखवायच्या नादात सर्वच पक्ष भरकटत गेलेले आहेत.
पप्पूने जेएनयूमधे जे अभिव्यक्तिस्वातंत्रबाबत तारे तोडले त्याला पुष्कळसा कॉंग्रेसचा अंतर्गत विरोध असावा.यात कॉंग्रेसने हात चांगलेच भाजुन घेतले आहेत. आत्ताच पाहिलेल्या बातमित थरूरसाहेब कन्हैयाची
तुलना शहीद भगतसिंग बरोबर करत होते. बातमी विरते ना विरते तोपर्यंत गुलाम नबी आझादानी हे थरूरचे वैयक्तिक मत आहे व् याचा पक्षाचा काही संबंध नाही हे स्पष्ट केले. अनेक कॉंग्रेसिना पप्पुच्या बाबतीत पण हेच म्हणायचे असेल पण तो पडला नेहरू खान्दानाचा वारस , मग तो चूक कसा असेल?
वारिस पठाणच्या वेळी मात्र पप्पुचि काही प्रतिक्रिया येण्याच्या आधीच कोंग्रेसी उदक सोडून मोकळे झाले. आता पंजेवाले पुढे आले बघितल्यावर इशरत जहाँ प्रकरणात तोंड पोळलेले घड्याळवाले कसे मागे रहातील?
आले ते पण! तसे पण महाराष्ट्रात आघाडीचा पत्ता कापण्यात ओवेसी आणि कंपनी आघाडीवर होती, यानी विचार केला आता आलेच आहेत तर मारून घेऊया चार पैजारा, तेवढीच् देशभक्ति दाखवुन होईल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Mar 2016 - 4:36 pm | निनाद मुक्काम प...

वाजपेयी अडवाणी युगात व मोदी शहा पर्वात हाच मोठा फरक आहे
राष्ट्रवादावर वाजपेयी सरकारला धर्मांध असे लेबल चिटकवून राजकीय अस्पृश्य ठरणारे विरोधक मोदी पर्वात त्यांच्या पाठी फरफटत आले आहे,
कनैह्या प्रकरण सरकारने योग्य पद्ध्द्तीने हाताळले नाही असे विधान करण्या लोकांची राजकीय अपरीक्वता पुढील अश्या बर्याच घटनाच्या वरून सिद्ध होईल.
शहा ह्यांच्या घरी चाणक्य व सावरकारंची तसबरि आहेत तर कोन्ग्रेज च्या लोकांच्या घरी गांधी व नेहरू
तसबरि लावणे वेगळे व त्या लोकांच्या राजकीय चातृर्याच्या राजकीय जीवनात वापर करणे ही वेगळी गोष्ट असते.

सेनला शाही फेकून जे साध्य करता आले नाही ते काळ्या डगले वाल्यानी साध्य केले.ह्याने समाजातील एका गटात भाजपच्या कट्टर प्रतिमा संवर्धन आपसूक झाले सेनेला भाजपला पाठिबा देण्यापासून गत्यंतर उरले नाही.
अरुणाचल उत्तरांचल आणि काही पुढील एखाद्या वर्षात ४५ वरून १० ते २० खासदारावर कोन्ग्रेज आणण्याचे मनसुबे भाजपचे असावेत राज्यसभेत बहुमत हवे असेल त्याद्वारे लोकहितवादी विधायाके विनासायास पास करून घ्यायची असतील तर सेक्युलर उर्फ फेक्युलर नांगी ठेसायला ओविसी कार्ड महत्वाचे ठरेल,
बात निकली हे तो दूर तक जायेगी.हाच निलंबन नाट्याचा अन्वयार्थ आहे

मागे कुठेतरी गॅरीभौंनी लिहिले होते, ज्याच्याशी मे सहमत आहे - ते पुन्हा एकदा (माझ्या शब्दात) लिहितो -

काँग्रेसला संपवायला जर भाजपा ओवैसीचा उपयोग करून घेत असेल, तर त्यासारखे करंटेपण नाही.

भंकस बाबा's picture

21 Mar 2016 - 9:50 pm | भंकस बाबा

नेमकी हीच चूक पेशव्यानि आंग्रेच्या आरमाराविरुद्ध इंग्रजाँची मदत घेऊन केलि होती.

पाकिस्तानी सरळ गोळ्या घालतात पण ओवैसी आपल्याच बाजूला गुण्यागोविंदाने रहाणाऱ्या रहीम चाचाला,सुलतानभाईला, सबीना खालाला हिंदुच्या विरोधात भड़कवत आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2016 - 12:45 pm | निनाद मुक्काम प...

भाजपने समर्थन देओ अगर न देओ ओविसी आपले राजकारण करणार
त्याने कोन्ग्रेज चे नुकसान होणार असेल तर भाजपने त्याचा का उपयोग करू नये
भ्रष्टाचार न करणारा ओविसी कोन्ग्रेज हून अधिक वाईट आहे का
त्याने मुस्लिमांचे ध्रुवीकरण केले व संघाचा तो कट्टर विरोधक आहे म्हणून मी त्याला देशद्रोही मनात नाही
मुस्लिम समाजाला पूर्वी पर्याय नव्हते आता ओविसी ची कट्टर विचारसरणी व मोदींच्या विकासाचे राजकारण असे दोन नवीन पर्याय आहेत.
नुकतेच संप्पण झालेले सुफी संमेलन त्यात मोदींचा सहभाग त्याला मिळणारा प्रतिसाद नक्कीच आशादायक आहे.
मात्र ओविसी पेक्ष्या धर्मनिरपेक्ष राजकारणी खरे धोकादायक आहेत,
ओविसी चा इतिहास पहिला तर लोकशाही पद्धतीने तो त्याचे वडील पिढ्यानपिढ्या त्याच्या मतदारसंघातून निवडणून येतात.
तेव्हा जसे समाजातील एक गट संघ म्हणजे गोडसे संघ म्हणजे कट्टर पंथीय असा पूर्वग्रह बाळगतात तसा मी ओविसी बद्दल बाळगत नाही.
त्यांच्या विचार्धारशी अशांत असलो तरी तो येचुरी हून खूप बरा

येचुरी देशहित धाब्यावर बसवून चीनी निष्ठा राबवतो एका कार्यक्रमात भारत अमेरिकेसोबत चीनशी उगाच पंगा घेत आहे चीन भारताचा शत्रू नाही चीन पासून भारताला धोका नाही अशी मुक्ताफळे उधळत होता, राष्ट्रवादाच्या संकल्पना अनेक असू शकतात मात्र राष्टीय हिताची एकच असते , चीन च्या विरोधात विएतनाम जपान अमेरिका फिलिपिन्स सोबत भारत संयुक्त लष्करी सराव करतो हे आपले राष्ट्रीय धोरण आहे जे युपिए ने सुद्धा पाळले , येचुरी ची चीनी निष्ठा भारताच्या मुळावर येणार हे नक्की
त्यामानाने ओविसी पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी मुसलमानांना सुनावतो
येथे एक आवर्जून सांगितले पाहिजे आपल्या भारतीय उपखंडात पाकिस्तान बांगलादेश येथील राजकीय परिस्थिती बाबत त्याची माहिती व समज भारतातील बहुतांशी राजकारणी नेत्याहून जास्त आहे
सदर कार्यक्रमात भाजपाने कीर्ती आझाद ला पाठवले होते
ह्या गुळाच्या गणपतीला पाठीशी घालून ओविसी ने भारतीय किल्ला लढवला पाकिस्तान शी बोलती बंद केली
गुजरात आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही तुमचे पहा
असे सांगणारा ओविसी टिपिकल राजकारणी नाही आहे,
त्याच्या विचारधारेला भाजपने किंवा इतर राजकारणी लोकांनी विकासाचे राजकारण करूनच लढा दिला पाहिजे
आणि एकदा मोदी ह्यांनी सबका साथ सबका विकास म्हंटले आहे मग ओविसी ला त्याच्या पाठीराख्यांना अस्पृश्य का ठरवावे.
त्याने जाहीररीत्या म्हटले आहे हज ची सबसिडी बंद करा तो पैसा मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करा
एवढे बोलून सुद्धा हैद्राबादी व काही मुसलमान त्याला पाठिंबा देतात ते का ह्याचे कारण शोधले पाहिजे

ह्म्म.. विचार करायला पाहिजे.