मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

गॅरी शोमन · · जनातलं, मनातलं
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे. ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता. परिणमी स्थानिय सत्ता टिकवण्यासाठी परकियांना आमंत्रणाची राजनिती पुढे संस्कृतीला मारक ठरली. याचाच परिपाक म्हणुन ओवेसी आवश्यकता नसताना असली विधाने करत आहे. संघाचे उदगाते डॉ. हेडगेवार काँग्रेसमधे होते. कॉग्रेसच्या अधिवेशनात त्यांची उपस्थीती आणि सहभाग असायचा. अश्यावेळी पं. पलुसकरांच्या वाद्यासहीत वंदेमातरमला काही मुस्लीम विरोध करायचे. सभात्याग करायचे. कारण गाणे- वाजवणे इस्लाम मधे हराम आहे म्हणायचे. इथे त्यांचा मुस्लीम असल्याचा काय संबंध होता असा प्रश्न विचारला जात नसे. याकडे काँग्रेसनेते दुर्लक्ष करत आणि तुष्टीकरण करुन पुन्हा त्यांच्या जवळ जात. काँग्रेसचे हे मुसलमानांच्या वृतीकडे झालेले दुर्लक्ष किंवा अशी अनेक उदाहरणे असलेले प्रसंग डॉ. हेडगेवारांना देश पुनर्निमाणाच्या कार्यात व्यत्यय वाटे. त्यांच्यामते देश टिकवुन ठेवायचा असेल तर याला खतपाणी नको. संघावर अनेक टिका झाल्या. स्वयंसेवक गौरवाने भारतमाता की जय म्हणतात याकडे मात्र टिकाकारांनी कायम डोळेझाक केली. मुस्लीमांना बरोबर घेऊन राष्ट्रप्रेमाचे संस्कार करता येतील का या विचाराने अनेक संघाला पर्यायी प्रवाह आले ज्यात राष्ट्र सेवा दल, कॉग्रेस सेवा दल किंवा अन्य काही असतील. मुस्लीम समाजाने जणु राष्ट्रप्रवाहात जायचेच नाही असा अट्टाहास धरत या पर्यायी संघटनांना नाकारले. शेवटी या पर्यायी विचारधारेत मुख्य सहभाग हिंदुंचाच राहीला. सुदैवाने काँग्रेस विचारधारेने अद्याप राष्ट्रप्रेमाचे प्रतिक असलेल्या घोषणा टाळल्या नाहीत याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या विधान सभेत आला. यात राजकीय स्वार्थ होताच. अनेक मतदार संघात एम आय एम च्या अस्तित्वामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना विधानसभेत हार पत्करावी लागली होती. याचा परिपाक म्हणुन विधानसभेच्या निवडणुका संपताच प्रणिती शिंदे आणि निलेश कि नितेश पैकी एकाने एम आय एम ला जातियवादी ठरवुन टिका सुरु केली. काँग्रेसने आणलेला वारीस पठाण यांच्या अधिवेशन संपेपर्यंतच्या निलंबनाच्या प्रस्तावाला राजकीय झालर आहे. हा प्रस्ताव पुर्ण देशप्रेमाच्या भावनेने भरलेला नक्कीच नाही. एम आय एम हा मुस्लीम मतदारांना काँग्रेसपेक्षा जवळचा वाटतो ही खरी काँग्रेसची अडचण आहे. भाजपने कम्युनिस्टांच्या विरोधात काँग्रेसला एकत्र निवडणुका लढण्याचे आवाहन केले ते काँग्रेसने मानले नाही. कधी काळी जम्मू काश्मिरमध्ये एकत्र लढण्याचे आवाहन केले त्याला काँग्रसने प्रतिसाद दिला नाही. यावेळेला मात्र आश्चर्यकारक रित्या काँग्रेसने आघाडी घेत सर्वांना धक्का दिला. पण त्यामागे ही राजकीय खेळी होती. काँग्रेस व भाजप देशविरोधी असलेल्या सर्वच स्थानिक किंवा ज्यांची नाळ देशविरोधी आहे अश्या राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात एकत्र येणे गरजेचे आहे असे या निमीत्ताने वाटते. अन्यथा देशविरोधी गरळ ओकणार्‍या या सापांचा फुत्कार राजकीय स्वार्थासाठी लक्षात न घेणे म्हणजे फुटीरता जोपासणे असे ठरेल.

वाचन 13439 प्रतिक्रिया 0