मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
11 Feb 2016 - 9:08 pm

नमस्कार,
मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही.
पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये"
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.

पाकक्रियावाङ्मयबालकथाचारोळ्यामुक्तकविडंबनप्रतिशब्दशुद्धलेखनप्रकटन

प्रतिक्रिया

धागा उडवला तरी कै हरकत नै.

एस's picture

11 Feb 2016 - 10:37 pm | एस

सहमत आहे.

चेक आणि मेट's picture

11 Feb 2016 - 10:51 pm | चेक आणि मेट

प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.
सहमत.

अवांतर - एक पाऊल मागे घेण्यात कधीच कमीपणा नसतो/किंवा चूक मान्य करण्यातही.
उलट त्यामध्येच खरे शौर्य असते.

पैसा's picture

11 Feb 2016 - 11:04 pm | पैसा

सहमत रे जेपी.

जेपी भाऊ का पेटले आहेत याचे कृपया कारण कळेल का? धागे का संदर्भ नही लाग्या मेरकु.

हेमंत लाटकर's picture

16 Feb 2016 - 10:19 am | हेमंत लाटकर

जेपी भाऊ का पेटले आहेत

जेपीला संपादक करा, ते शांत होतील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2016 - 9:27 am | कैलासवासी सोन्याबापु

जेपी भाऊ ला बाड़ीस अन +१००००००००

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2016 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा काथ्याकूट आहे की कोणाला हिनवण्यासाठी काढलेला धागा आहे ?

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

12 Feb 2016 - 10:11 am | मुक्त विहारि

जेपी "कुणी लिहिलय" हे न बघता, "काय लिहिले आहे" ते वाचून मगच प्रतिसाद देतात, असे माझे वैयक्तिक मत आहे.

डिस्क्लेमर : जेपीला अद्याप मी प्रत्यक्षात भेटलेलो नाही. व्यक्तीपुजा आम्हाला पण मान्य नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2016 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिही धाग्याचा लेखक न पाहता ''लिहिलंय काय आणि कोणत्या उद्देशाने ते पाहूनच'' प्रतिसाद लिहितो.

-दिलीप बिरुटे

ओके....

पॉइंट नोटेड...

आता "लिहिलंय काय" आणि "कोणत्या उद्देशाने" ते जरा शोधून आणि पडताळून बघतो.

तोपर्यंत "टाइम प्लीज."

हा काथ्याकूट आहे की कोणाला हिनवण्यासाठी काढलेला धागा आहे ?

नाही हो बिरुटे सर्,तसा काही उद्देश नव्हता,उगा मनात आल ते बोलुन टाकल,

बाकी धागा उडला तरी हरकत नव्ह्ती, पण धागा राहीला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2016 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली बोच मला केव्हाच समजली मीही तुमच्या मताशी सहमत आहे, पण कसं होतं आपल्याला मिपा विविध लेखनाने आणि सदस्यांनी समृद्ध करायचं करायचं असेल तर असं कुठे तरी अडकून चालणार नाही, वाटलं ते बोललो कदाचित मी चुकतही असेन.

-दिलीप बिरुटे

आता खूद्द धागाकर्त्यानेच उद्देश सांगीतल्याने, मी (न केलेली) शोधाशोध थांबवतो.

@ जेपी,

धन्यवाद

१. माझा तुझ्यावरचा विश्र्वास दृढ केल्याबद्दल आणि

२. पुढचे मुद्दे प्रत्यक्ष भेटलो की सांगीनच.

जेपी's picture

12 Feb 2016 - 10:55 am | जेपी

धन्यवाद ,भेटु लवकरच

नीलमोहर's picture

12 Feb 2016 - 10:52 am | नीलमोहर

गेले काही दिवस मिपावर बरीच चिखलफेक दिसून येतेय, हे असं लिहीण्याची वेळ येऊ नये पण गरज होती नक्कीच.
एखाद्याचे मत पटत नाही, मतभेद आहेत म्हणून कोणीही कोणालाही कसेही बोलणे चुकीचेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2016 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अब बात को क्यों आगे बढ़ा रहे हो, रोको इसे. आता कशाचं विडंबन करता ते सांगा ! :)

मराठी संस्थळावर सदस्यांची चिखलफेक कल भी होती थी, आज भी होती है, और वह आगे भी होती रहेगी. आपल्याला चीखलफेक न करता मिपा किती इंजॉय करता येईल ते महत्वाचं.

-दिलीप बिरुटे
(जालसंत)

नीलमोहर's picture

12 Feb 2016 - 11:23 am | नीलमोहर

'चिखलफेक न करता मिपा किती इंजॉय करता येईल ते महत्वाचं.'
- तेच तर करत असतो ना आपण,

'मराठी संस्थळावर सदस्यांची चिखलफेक कल भी होती थी, आज भी होती है, और वह आगे भी होती रहेगी.'
- आगे भी होऊ नये ही प्रामाणिक इच्छा.

'आता कशाचं विडंबन करता ते सांगा'
- अरे हो, माझ्या धाग्याकडे लक्षच नाही, काही प्रतिसाद देणे बाकी आहे, बघते आता. आणि विडंबन असं सांगून नाही करता येत हो, ते होतं :)

विषय अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्वाचा आहे. तो अधिक विस्ताराने तार्कीकतेने हाताळला असता तर बरे वाटले असते..
अशी दोन ओळीत आवेगात केलेली मांडणी ज्या वृत्तीचा ज्या असंयमी उथळ वृत्तीचा निषेध करता आहात त्याचीच एका अर्थाने निदर्शक आहे असे मला तरी वाटते.
यावर उपायही सुचवले पाहीजेत असे वाटते. आपण सर्वांनी एकत्र विचार करुन यावर उपाय शोधुन काढले पाहीजेत. नवसदस्यांना उपयोगी पडतील असा एखादा मार्गदर्शनाचा दुवा मुख्य पानावर ठेवावा. त्यावर उत्तम सभ्य दर्जेदार प्रतिसादकांचे प्रतिसाद नमुना म्हणुन दिले पाहीजेत. उदा. धनंजय, इंद्राज पवार, जयंत कुलकर्णी, गवि, अवतार इ. मंडळी ज्या शालीनतेने व सभ्यतेने दर्जेदार प्रतिसाद स्फोटक विषयांवरही सहजतेने नोंदवतात ते व अशा संयमाने हाताळल्या गेलेल्या चर्चांचे दुवे अभ्यासासाठी ठेवावेत. त्याने प्रेरणा मिळेल. दुसर म्हणजे भाषेचे शब्दांचे काही मुलभुत नियम बनवता येतील का यावरही विचार होणे गरजेचे आहे.
मुळ विचार जर अर्थपुर्ण असेल तर किंचाळण्याची काहीही गरज नसते. आक्रस्ताळेपणा हा आपल्या मुळ विचारातील कमकुवतपणाच दाखवतो. आणि सर्वात महत्वाच म्हणजे सहीष्णुता एखादी व्यक्ती आपल्या संस्कार अनुभव धारणा आदींच्या अगदी विरोधी १०० % विरोधी विचार मांडत असेल तर त्यावर संवेदनशीलतेने संयमाने आपण तो समजुन घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच तो विचार पटत नसला तरी त्या व्यक्तीचा मुलभुत आदर करणे यायला हवे.
संवादात उथळ अपरीपक्वता टाळुन प्रौढता आणणे आवश्यक आहे. विचार न मान्य करण्याचे अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री इन अ डिसेंट मॅनर सहज शक्य आहे. ही काय फार अवघड बाब नाही. विरोधी विचारांचा प्रगल्भतेने अंगिकार प्रतिकार प्रतिसाद झाला पाहीजे. आपल्या वाद चर्चांना किमान दर्जा हवा आपली किमान संवेदनशीलता चर्चेतल्या इतर सदस्यांप्रती असली पाहीजे.
अस माझ प्रामाणिक मत आहे.

राही's picture

13 Feb 2016 - 10:08 pm | राही

वरील प्रतिसादही सभ्य, संयत, संवेदनशील, समंजस प्रतिसादाचा नमुना ठरावा.

शान्तिप्रिय's picture

12 Feb 2016 - 11:12 am | शान्तिप्रिय

जे पीं शी सहमत.
प्रतिसाद देताना लेखकाला हिणवण्याचा प्रयत्न होत आहे असे वाट्ते मिपावर.

ब़जरबट्टू's picture

12 Feb 2016 - 11:17 am | ब़जरबट्टू

संवादात उथळ अपरीपक्वता टाळुन प्रौढता आणणे आवश्यक आहे.

नाहीतर चेपू आणि मिपा मधे फरक काय राहिला.
बाकी अश्या विषयांवर कोण चर्चा करायला किव्हा आपले मत व्यक्त करायला येणार असे दिसत नाही. नको त्या धाग्यावर तुटून प्रतिसाद देणार.
सहमत मारवाजींशी. आणि जेपी जी शी .
बाकी मी माझं मत व्यक्त केलं आहे.

मृत्युन्जय's picture

12 Feb 2016 - 12:00 pm | मृत्युन्जय

जे पी भाउंशी सहमत.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे भ्रम आहे. हे खाजगी संस्थळ आहे आणि आपापल्या लहरीप्रमाणेच चालणार.

(लेस बांधून बसलेला) बॅटमॅन.

बॅटोबाला सहमत असणारच. खाजगी संस्थ्ळ आहे वेळोवेळी बजावले गेले आहे त्यामुळे लोकशाही मूल्याचे अरुण्यरुदन इथे करण्यात काही अर्थ नाही.
पोकळ तत्वांचा अनुनय करुन फुकट चमकोगिरी यापलिकडे ह्या धाग्याला किंमतही नाही.
.
(लेस बांधून उभारलेला) अभ्या..

चेक आणि मेट's picture

12 Feb 2016 - 1:51 pm | चेक आणि मेट

पोकळ तत्वांचा अनुनय करुन फुकट चमकोगिरी यापलिकडे ह्या धाग्याला किंमतही नाही.
.

हे काय पटले नाही.
पण तुम्ही या धाग्यावर प्रतिक्रिया देवून ह्या धागाला किंमत दिली,त्याबद्दल जेपीभाऊंतर्फे मी तुमचे अभिनंदन करतो.

अभ्या..'s picture

12 Feb 2016 - 1:58 pm | अभ्या..

तुम्ही या धाग्यावर प्रतिक्रिया देवून ह्या धागाला किंमत दिली,त्याबद्दल जेपीभाऊंतर्फे मी तुमचे अभिनंदन
करतो.

फुकट चमकोगिरी उदाहरण देऊन सिध्द केल्याबद्दल धन्यवाद.

चेक आणि मेट's picture

12 Feb 2016 - 2:27 pm | चेक आणि मेट

तुमची मानसिकता दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!
(तुमच्याबद्दल चांगले मत आहे अजूनही.)

गॅरी ट्रुमन's picture

12 Feb 2016 - 2:49 pm | गॅरी ट्रुमन

फुकट चमकोगिरी उदाहरण देऊन सिध्द केल्याबद्दल धन्यवाद.

मला वाटते की जेपी महाशयांनी "पण अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये.प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही" हे म्हटले आहे ते अशाच प्रवृत्तींविरूध्द.तुम्हाला एखाद्याची मते पटली नाहीत तर ते लिहायला कोणाचीच आडकाठी नाही.पण "फुकट चमकोगिरी" वगैरे शब्दप्रयोग अप्रस्तुत वाटतात.

(लेस बांधून उभारलेला) अभ्या..

तुम्ही लेस बांधून उभे रहा की अनवाणी उभे रहा त्यामुळे इतरांना शष्प फरक पडेल असे वाटत नाही.जेव्हा आपल्याला मिपासारख्या दर्जेदार संकेतस्थळावर वावरायला मिळावे यासाठी कोणीतरी स्वतःचे पैसे खर्च करत असतो, वातावरण निकोप रहावे म्हणून स्वत:चे नोकरीधंदे सांभाळून संपादकपदाची जबाबदारी सांभाळत असतो अशा ठिकाणी वावरताना मिपा संचालक/संपादकमंडळ/सल्लागार आणि इतर जे कोणी असतील त्यांच्याविषयी किमान कृतज्ञता असावी ही संचालक/संपादक्/सल्लागार यांची अपेक्षा असल्यास (तशी त्यांची अपेक्षा आहे की नाही हे माहित नाही) तर त्यात काहीही चुकीचे मला तरी वाटत नाही.तसेच त्यांच्याविषयी काही आक्षेप असतील तर त्यांच्याशी बोलून त्यातून मार्ग नक्कीच निघू शकतो हे मी स्वानुभवातून सांगतो. कुणाही सदस्यावर तुम्ही इथे या अशी निमंत्रणपत्रिका घेऊन कुणी गेले होते असे वाटत नाही.तेव्हा मिपावर वावरता येणे हा आपला जन्मसिध्द अधिकार वगैरे नाही.तेव्हा लेस बांधून तयार आहे वगैरे भाषा अप्रस्तुत वाटते हे परत एकदा लिहितो.

लेस बांधायची भाषा या धाग्यावर अगोदर मी केली म्हणून प्रतिसाद लिहितो. मधल्या काळात इथे जो सालस वेडाचार झाला त्यामुळे असे उद्वेगजनक प्रतिसाद अधूनमधून येत असतात. ते तुम्हांला माहिती नसावे बहुधा, असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2016 - 3:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''तुम्ही लेस बांधून राहा की अनवाणी उभे राहा'' पासून ते ''लेस बांधून तयार आहे वगैरे भाषा अप्रस्तुत वाटते'' इथपर्यन्त एकून एक विचार पतला.

-दिलीप बिरुटे
''

अभ्या..'s picture

12 Feb 2016 - 4:33 pm | अभ्या..

फुकट चमकोगिरी" वगैरे शब्दप्रयोग अप्रस्तुत वाटतात

का वाटावेत? जर सर्व अधिकार मालकांच्या हातात आहेत तर

मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही.
पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये"
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.

ही वाक्ये मालकांनी म्हणावीत. कुणीही उठून धागा काढून हा आव आणायलाच फुकट चमकोगीरी म्हणलेय.

तुम्ही लेस बांधून उभे रहा की अनवाणी उभे रहा त्यामुळे इतरांना शष्प फरक पडेल असे वाटत नाही

नाही पडत ना? मग का मनावर घेताय येवढे. तुम्ही पण करा ना दुर्लक्ष.

आपल्याला मिपासारख्या दर्जेदार संकेतस्थळावर वावरायला मिळावे यासाठी कोणीतरी स्वतःचे पैसे खर्च करत असतो,

योगदानाची भाषा मला आपणांकडून शिकायची नाही क्लिंटनभाऊ. आम्ही रोख पैसे देत नाहीत पण जे दिलेय त्याचे बाजारमूल्य आम्हाला चांगलेच माहीत आहे. ते मिपासाठीच म्हणून दिलेय. बोलून काढायचे नसतात पण परत परत जन्मसिध्द अधिकार नसतात वगैरे सांगितल्यामुळे काढावे लागले.

विवेक ठाकूर's picture

12 Feb 2016 - 8:31 pm | विवेक ठाकूर

संकेतस्थळ जरी मोफत असलं तरी ते रिकाम्या स्टेजसारखं आहे. त्यावर दर्जेदार लेखन करणारे सदस्य नसतील तर नुसत्या रिकाम्या स्टेजला अर्थ नाही. त्यामुळे संकेतस्थळ मोफत आहे ही एकमेव गोष्ट नेहमी ठासून सांगितली जाते त्याचा दुसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे.

चेक आणि मेट's picture

12 Feb 2016 - 9:58 pm | चेक आणि मेट

त्यावर दर्जेदार लेखन करणारे सदस्य नसतील तर नुसत्या रिकाम्या स्टेजला अर्थ नाही

तुमच्या ब्रेस्ट कॅन्सर बाबतच्या दर्जेदार लेखनाबद्दल धन्यवाद!

सतिश गावडे's picture

13 Feb 2016 - 3:09 pm | सतिश गावडे

ज्या अर्थी त्यांच्या लेखनाला तुम्ही दर्जेदार म्हणत आहात त्याअर्थी दर्जेदार लेखनाचे काय निकष असतात हे तुम्हाला ठाऊक आहे. आम्हालाही सांगा ना.

चेक आणि मेट's picture

13 Feb 2016 - 3:45 pm | चेक आणि मेट

उपहासात्मक आहे ते.

तुम्ही धागा काढा आणि तुमची मतं मांडा. माझा जो स्टँड आहे त्या अनुषंगान मी उत्तरं देईन . सुबोधजींचा धागा सुद्धा सेल म्युटेशनची नक्की कारणं देऊ शकत नाही . आणि तिथे किंवा इथे मी त्या विषयावर बोलू इच्छीत नाही .

आणि धागा काढू शकत नसाल तर माझा उपहास वगैरे करण्यापूर्वी दोनदा विचार करा .

तुमचे ते अध्यात्म, निराकार विचार, ती कसलीतरी कायतरी मेथड वापरली तर ब्रेस्ट कॅन्सर होत नाही हा तुमचा दावा आहे ना?

मग तुम्ही पेपर पब्लीश करून जगन्मान्यता का मिळवत नाही?

आणि निष्कारण प्रतिसाद देतायं. माझा प्रतिसाद ऑरगॅजमच्या अनुषंगानं होता . प्रथम शांतपणे वाचायला शिका . आणि पेपरचं राहू द्या , स्त्रीयांच्या ऑरगॅजम विषयी तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही धागा काढा आणि मग काय होतयं ते बघा .....नाही तर शक्यतो माझ्याशी पंगा घेऊ नका .

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2016 - 8:39 pm | पिलीयन रायडर

स्त्रीयांच्या ऑरगॅजम विषयी स्त्रियांपेक्शा तुम्हालाच जास्त माहिती आहे हो. ईथे आक्खा स्त्री देह असुनही मी जगातल्या सर्व स्त्रियांना लागु होईल अशी एकच थिअरी ठामपणे मांडु शकत नाही.. तुमची बातच और!

विवेक ठाकूर's picture

13 Feb 2016 - 9:56 pm | विवेक ठाकूर

स्त्री देह आहे याचा अर्थ ऑरगॅजमचा अनुभव असेलच असं नाही.

त्यात तुम्ही म्हणतायं की

जगातल्या सर्व स्त्रियांना लागु होईल अशी एकच थिअरी ठामपणे मांडु शकत नाही

हे तर विषयाचं उघड अज्ञान दर्शवतं. कारण पुरुषांना जसा ऑरगॅजमिक आनंद मिळतो अगदी तसाच आणि त्याही पुढे जाऊन मल्टीपल ऑरगॅजमिक अनुभव स्त्री देहाला लाभू शकतो. हा अनुभव नसल्यानंच तर, जननानंतर काही काळातच, स्त्री प्रणयविरक्त होते. पुरुष देह हा सिंगल ऑरगॅजमिक आहे आणि स्त्री देह मल्टी-ऑरगॅजमिक आहे. ही जगनमान्य आणि सर्व स्त्री देहांना अ‍ॅप्लिकेबल थिअरी आहे.

ऑरगॅजमचे स्त्री देहावर, विषेशतः तिच्या मानसिकतेवर आणि इंडोक्राइन सिस्टमवर दूरगामी परिणाम होतात. पण इथे कुणालाही त्यातलं काहीएक गम्य दिसत नाही. कारण तसं असतं तर याविषयावरची चर्चा निश्चित विधायक वळणानं गेली असती. तुम्ही ही माझ्याशी वेळोवेळी, कधी पोस्टवर तर कधी खवत, निष्कारण वाद घालता आहात. त्यातून मला काही समजलेलं नाही हा तुमचा गैरसमज, तुम्हाला स्वतःलाच पटवून द्यायचा असेल तर विषयच काढू नका!

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2016 - 10:20 pm | पिलीयन रायडर

काका.. सर्व स्त्रियांना शाररिक पातळीवर एक अनुभव मिळणे हा मुद्दा आहे का माझा? प्लिझ नीट वाचाल का? "तुम्ही" त्याचा संबंध कोणत्या आधारावर ब्रेस्ट कॅन्सरशी लावलात हे विचारलं. तर consciousness वर उतरलात. तुमचे अनुभव वैयक्तिक आहेत. ते १००% स्त्रियांना लागु होतीलच ह्याची काही खात्री नाही. तुमचा तेवढ्या स्त्रियांचा अभ्यास नाही.
तुम्हाला खोटं पाडणे हे एकच काम मला आहे किंवा इतक्या क्षुल्लक गोष्टींना महत्व देणं हेच एक ध्येय आहे असं तुम्हाला का वाटतं? तुम्ही लिहीताय ते सर्वांनी ताबडतोब मान्य करावं असं का वाटतं? मी तुम्हाला खव मध्येही साधे प्रश्न विचारले होते. तुम्ही धागा काढा.. लोक चर्चा करतील. या त्या धाग्यावर फक्त अवांतर होईल, बाकी काही नाही. ईतकं नीट लिहुनही तुम्ही गैरसमज करुन घेणार असाल तर माझा नाईलाज आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2016 - 3:08 pm | श्रीगुरुजी

+१

स्त्रियांच्या ऑरगॅझम् बद्दल काही जणांची इतकी ठाम मते वाचून मला आदि शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यातील वादविवादाची आठवण झाली.

विवेक ठाकूर's picture

14 Feb 2016 - 3:18 pm | विवेक ठाकूर

तुम्ही तुमची मतं लिहा ना, मग बघू काय होतं ते.

श्रीगुरुजी's picture

15 Feb 2016 - 10:24 pm | श्रीगुरुजी

स्त्रियांच्या ऑर्गॅझमबद्दल फक्त स्त्रियाच अधिकारवाणीने सांगू शकतात. आम्ही कसे सांगणार? अर्थात तुम्ही स्त्री नसतानासुद्धा त्याबद्दल तुम्हाला स्त्रियांपेक्षा जास्त व सखोल माहिती व परीपूर्ण माहिती आहे म्हणूनच मला श्री श्री आदि शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांच्यातील वादविवादाची आठवण झाली. प्रसूती होतानाही स्त्रियांना किती वेदना होतात किंवा अजिबात वेदना होत नाहीत याविषयी स्त्रियांपेक्षा तुमच्याकडेच जास्त व सखोल माहिती असणार यात अजिबात शंका नाही.

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2016 - 2:02 pm | पिलीयन रायडर

स्त्री देह आहे याचा अर्थ ऑरगॅजमचा अनुभव असेलच असं नाही.

ह्या एका वाक्यावर बोलायचं मुद्दाम ठेवलं होतं कारण मोबाईल वरुन एवढं नीट लिहीणं शक्य नसतं.

मी वर म्हणतेय की "स्त्री देह असुनही.." आणि तुम्ही त्याला म्हणताय की "स्त्री देह आहे म्हणून ऑगॅझम माहिती असेलच असे नाही." म्हणजे तुम्ही माझ्या वैयक्तिक अनुभवाविषयी टिपण्णी करत आहात का?

तसे असल्याने केवळ ते अशिष्टच नाही तर मुर्खपणाचेही आहे.

संक्षी / विठा,
तुम्ही ज्या काही थिअरीज मांडत आहात त्या कितीही म्हणलं तरी अखेर कल्पनेच्या भरार्‍याच आहेत. दोन कारणांसाठी

१. स्त्री देह आणि त्याची प्रणयतृप्ती ह्यावर तुम्ही फक्त "ओबझर्व्हर" म्हणुनच बोलु शकता. प्रत्यक्षात त्या देहाची अनुभुती तुम्हाला अजिबात शक्य नाही. त्यामुळे त्यातली गुंतागुंत तुम्हाला समजण्यापेक्षा मला समजण्याचे चान्सेस नेहमीच जास्त असतील. तेव्हा तुम्ही मला मल्टिपल ऑरगॅझम आणि नो ऑरगॅझम वगैरे सांगु नका. तो असतो की नसतो की "समोरच्याला वाटतं असतो.. पण खरं तर नसतोच"... वगैरे प्रकार तुमच्यापेक्षा निश्चितच मला जास्त ठाऊक आहेत. काळजी नसावी.

२. हा मुद्दा मी अगणित वेळा आधी मांडलेला आहे. परत मांडते. आणि ह्यावेळेस नाईलाजाने काही बोलावे लागणार आहे. संक्षी तुमचा डेटापॉईंट एक आणि एकच आहे. त्यापेक्षा जास्त तुमच्या अनुभवाच्या कक्षा नाहीचेत. तुम्ही मागे एकदा तुमच्या मुल होतानाच्या अनुभवाविषयी लिहीले होते तेव्हा साधारण हेच मुद्दे आले होते. तुम्ही कदाचित तेव्हा बरेच वाचन केले असेल. काही प्रयत्नही केले असतील. तुम्हाला मुलगा झाला. तुम्हाला तुमच्या मेथडवर विश्वास बसला असेल. पण दुर्दैवाने तेच समस्त स्त्री जमातीला लागु करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात असे वाटते. तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव सार्वत्रिक आहे असे मानणे हा ही एक कल्पनाविलासच आहे.

धागा काढण्याइतपत काही शिल्लक असेल आता तर काढा. (मला तसं काही आता बोलायला असेल तुमच्याकडे असं वाटत नाही हा भाग वेगळा...)

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2016 - 2:03 pm | पिलीयन रायडर

तसे असल्यास*

विवेक ठाकूर's picture

15 Feb 2016 - 3:28 pm | विवेक ठाकूर

खाली दिला आहे.

अरे व्वा.. दोन दिवसात लै राडा झाला आहे की.

डिट्टेल उत्तर द्यायची लै इच्छा होती पण पिराने बरेचसे मुद्दे कव्हर केले आहेतच.

तुमच्याशी पंगा घेण्याबद्दल - तुम्ही तितकेही महत्वाचे नाही आहात हो. तुम्ही काय लिहित आहात ते तुमचे तुम्हाला कळत आहे का? आणि जे दावे करत आहात ते सिद्ध करू शकता का?

सिद्ध करू शकत असाल तर करा, अन्यथा दावे करण्याचे बंद करा. इतकेच.

बाकी तुमच्या जुन्या आयडीप्रमाणे तुम्हाला फाट्यावर मारण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहेच. ते घेत आहोत.

सुनील's picture

15 Feb 2016 - 9:43 am | सुनील

संकेतस्थळ जरी मोफत असलं तरी ते रिकाम्या स्टेजसारखं आहे. त्यावर दर्जेदार लेखन करणारे सदस्य नसतील तर नुसत्या रिकाम्या स्टेजला अर्थ नाही

एकेकाळच्या चांगल्या नांदत्या पण आता अगदीच ओस पडलेल्या एका संस्थळाची आठवण आली!

मिपाच्या बाबतीत तरी बर्‍यापैकी अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.

उगाच कुणाला तरी टार्गेट करणे, एखाद्या व्यक्तीबाबत अनावश्यक घालून-पाडून बोलणे, कंपूबाजी करणे आणि आपलेच प्यादे कसे पुढे राहिल ह्याची काळजी घेणे, ह्या गोष्टी जितक्या सहजतेने मायबोलीवर (इथे मायबोलीचे नांव घेणे भाग आहे, सामान्यतः मी मुद्दामहून मायबोलीचे नांव घेत नाही.पण इथे मुद्दा स्पष्ट करायला मायबोलीचे नांव घेतले आहे.संपादकांनी हा प्रतिसाद उडवलात तरी चालेल.) होतात, तितक्या सहजतेने इथे होत नाहीत.

काही काही व्यक्ती परत परत वेगळी वेगळी नावे घेवून इथे येत असली आणि त्या व्यक्तीने परत्=परत तीच चूक केली तर आणि तरच मिपाचे संपादक मंडळ कारवाई करते.

बादवे,

तू वैयक्तिक टीका-टिपणी करत नाहीस, हे माहीत असल्याने आणि आपले मतभेद ह्या विषयापुरतेच मर्यादित असतील ह्याची खात्री असल्यानेच लिहीत आहे.

उगाच कुणाला तरी टार्गेट करणे, एखाद्या व्यक्तीबाबत अनावश्यक घालून-पाडून बोलणे, कंपूबाजी करणे आणि आपलेच प्यादे कसे पुढे राहिल ह्याची काळजी घेणे,

आपणास ह्या गोष्टींचा इथे अनुभव मिळाला नसल्याने अभिनंदन आणि शुभेच्छा.
निरागस मैत्रीसाठी धन्यवाद.
कळावे.

काळा पहाड's picture

12 Feb 2016 - 2:37 pm | काळा पहाड

लेस बांधून बसायची गरज नाही. हे सत्य असेल तर त्यात काही चुकीचं नाही. केस झाली तर संस्थळाच्या मालकावर होवू शकते. मेंबरांवर नाही. तेव्हा मालक लोक काळजी घेणारच.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 2:41 pm | पिलीयन रायडर

+१

मुळात ते "मालक" आहेत.. तिथेच विषय संपतो.

बॅटमॅन's picture

12 Feb 2016 - 2:45 pm | बॅटमॅन

केस वगैरे वेगळ्या गोष्टी झाल्या. इथे परीक्षानळीतील भांडणे होतात त्याबद्दलचा अण्भव पाहता...असोच्च...

जे पी भाऊ चा रोख संदीप डांगे साहेबांच्या प्रतिक्रिये वर तर नाही ना???ह्या धाग्या वरील पहिली प्रतिक्रिया.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 2:05 pm | पिलीयन रायडर

मिपा उत्तमच आहे. जगात लोक जसे वागतात तसेच इथेही नाना तर्‍हा दिसणारच. मला इतर संस्थळांचा अजिबात अनुभव नाही. पण आपण लिमिट मध्ये राहिलो की आपल्याला प्रचंड उद्वेगजनक वगैरे अनुभव येत नाहीत असे माझे मत बनले आहे. वाद होतातच, पुन्हा दोस्तीही होते.. गोष्टी तात्पुरत्या असतात.. रात गई बात गई म्हणुन सोडून द्यायच्या.

आपल्याला वाटत असतं की लोक कंपु करतात, वैयक्तिक टिका करतात, जहाल भाषा वापरतात वगैरे वगैरे... आपणही अनेकदा ते करत असतोच.. कुणीही इथे धुतल्या तांदळासारखे पवित्र वगैरे नाहीये. (मुवि सोडुन.. ते फार निरागस आहेत! आय मीन इट मुवि!)

तेव्हा संम वर टिका होणे... पुर्वीचे मिपा राहिले नाही असे कढ निघणे.. दर्जा खालावत चालला आहे अशा चर्चा होणे काही पहिल्यांदा होत नाहीये. ह्यालाच्च मिपा म्हणतात..

संमचे न पटणे शक्य आहेच.. ते ही सदस्य आहेत इथे. पण फायनली नीलकांत (सध्या प्रशांत) आहेत. तुम्हाला न सोसवल्यास त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग नेहमी खुला असतोच. आणि नीलकांतच्या निर्णयावर (सुदैवाने) अजुन कुणाला शंका असल्याचे पाहिलेले नाही. समजा असतीलच तर "हे खाजगी संस्थळ...." वगैरे आहेच.

मी काय म्हणते.. नाही आवडत.. नाही पटत.. जायची तयारी आहेच झालेली.. तर कशाला मुहुर्ताची वाट बघायची?!

मिपा कुणाला आमंत्रणाच्या अक्षता घेऊन आले नव्हते.. आणि इथे रहाच असा आग्रह सुद्धा कुणी करत नसतं.. आणि तरीही अगदी छान चाललय की मिपाचं..

तेव्हा दोस्तहो... पुढचा धागा येउ द्यात!

बॅटमॅन's picture

12 Feb 2016 - 2:15 pm | बॅटमॅन

मी काय म्हणते.. नाही आवडत.. नाही पटत.. जायची तयारी आहेच झालेली.. तर कशाला मुहुर्ताची वाट बघायची?!

हे मिपामालकांनी सांगायचं असतंय, इतरांनी पचकायचं काम नाही.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 2:40 pm | पिलीयन रायडर

"निघा" असं लिहीलय का कुठे त्यात? मला तर मी एक प्रश्न विचारलाय असं दिसतय...नाही म्हणजे तुम्ही विद्वान, नसलेले अर्थ चांगले सापडतात तुम्हाला. म्हणुन विचारलं..
आणि प्रश्न साधा सरळ सोपा आहे. तुम्हाला उद्देशुन लिहीलेलाही नाही.. तुम्हीच स्वतःवर ओढवुन घेताय..

बाकी इथे नीलकांत सोडून कुणीच मालक नाही.. तरी लोकांनी "अमुक करा.. तमुक करु नका" टाईप प्रतिसाद दिलेत, हो की नै? माझाच प्रतिसाद, तुम्हालाच का झोंबला?

असोच.. आपल्या "चर्चांचा" अनुभव तुम्हालाही आहे.. आणि मलाही.. तेव्हा मला तुमच्याशी बोलण्यात रस नाही.. तुम्हालाही नाहीचे.. माहितीये..

जय महाराष्ट्र!

छाण पचकू प्रतिसाद, कसं गं बाई जमतं असं.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 2:49 pm | पिलीयन रायडर

कसचं कसचं... तुमचं बघुन बघुन शिकतेय बै!

सांभाळुन घ्या!

बॅटमॅन's picture

12 Feb 2016 - 2:53 pm | बॅटमॅन

खरं म्हणतील कुणीतरी, बाकी ग्रूपिझम शिकावा तो आपल्याकडूनच. यात कै शंका नाय.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 2:58 pm | पिलीयन रायडर

हे असं असतं.. मी एकटी इथे बोलतेय... पण तुम्ही पोहचलात ग्रुपिझम वर!! मी जनरल लिहीतेय.. मी पर्सनल होताय..!! मी मत मांडतेय.. तुम्ही "पचकते" म्हणताय..!!

सग्ग्गळं जग विखारी आहे.. तुम्हीच तेवढे निरागस हो!
उगी उगी!!

(बरं आता माझ्याकडुन प्लिझच! रामराम)

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 3:00 pm | पिलीयन रायडर

तुम्ही* पर्सनल होताय

बॅटमॅन's picture

12 Feb 2016 - 3:02 pm | बॅटमॅन

ठीक आहे, तुमचंच खोटं.

रिम झिम's picture

13 Feb 2016 - 8:44 am | रिम झिम

मला राहुन राहुन एका म्हणीची उगिचच आठवण येतीय..

"अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी.."

घर सोडुन तर जायचे नसते, पण ..

असो.

काळा पहाड's picture

12 Feb 2016 - 2:39 pm | काळा पहाड

मुवि सोडुन

+१

गॅरी ट्रुमन's picture

12 Feb 2016 - 2:53 pm | गॅरी ट्रुमन

अरे पिराताईंचा हा प्रतिसाद आधी वाचला असता तर माझे टंकण्याचे कष्ट वाचले असते :)

संपूर्ण प्रतिसादाशी सहमती आहे हे वेगळे लिहायलाच नको.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 3:04 pm | पिलीयन रायडर

गॅरी भाउ थॅन्क्यु!

जेव्हा कारवाई होते तेव्हा १००% एकच बाजु चुक किंवा बरोबर असा निर्णय घेता येत नसतो. पण संम जेव्हा असे निर्णय घेतात तेव्हा त्यांना तसा अधिकार मालकांनी दिलेला आहे हे विसरता येणार नाही. म्हणजे मालकांची त्या निर्णयांना संमती असणार. स्वतः मालक येतात तेव्हा तर आपण तसेही बोट दाखवु शकत नाही.

पण एका पार्टीने आपली काही चुक नव्हतीच.. इथे अन्यायच झाला आहे.. इ इ बोलुन सतत मिपाला दुषणे दिली तर त्यातुन फक्त वातावरण बिघडण्याशिवाय काय निष्पन्न होणारे? जे मुद्दे असतील ते मालकांसमोर मांडायला हवेत.

असो.. जाणारे गेले तरी काय फरक पडतो.. कित्येक गेले.. मिपा काही थांबलं नाही..

उगाच लोकांना भ्रम असतात स्वतःविषयी...

जेपी's picture

12 Feb 2016 - 3:07 pm | जेपी

धागा कालचा आहे.
रात गई बात गई.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2016 - 3:40 pm | पिलीयन रायडर

बरं मग ते तुमचे पन्नास झाले म्हणुन मी सत्कार केला तर चालेल का?

जेपींच्या "उडवला तरी चालेल" कॅटेगरीतल्या धाग्याने पन्नाशी गाठल्याबद्दल अगोदरच बांधलेली लेस असणारे बुट आणि "जन पळ भर म्हणतील हाय हाय" ह्या गाण्याची सीडी देऊन "सत्कारसमितीतनवीन्सांभाळुन्घ्या" समिती तर्फे सत्कार करण्यात येत आहे!!

मम्बाजी सर्वज्ञ's picture

12 Feb 2016 - 4:44 pm | मम्बाजी सर्वज्ञ

'रेग्युलर' आयुष्यातल्या मानापमानापेक्षा आजकाल वर्चुअल आयुष्यातले मानापमान महत्वाचे वाटायला लागले आहेत. आभासी जगाची एवढी नशा? यात 'भावना दुखावलेले' जे आहेत ते प्रत्यक्षात बाकीच्या मिपा सदस्यांना किती वेळा प्रत्यक्षात भेटले आहेत?

मुक्त विहारि's picture

12 Feb 2016 - 5:24 pm | मुक्त विहारि

....ते प्रत्यक्षात बाकीच्या मिपा सदस्यांना किती वेळा प्रत्यक्षात भेटले आहेत?"

ह्याला अनुसरून माझा वैयक्तिक अनुभव...

मिपाकर सुनिल आणि मी, आमचे काही वैचारिक (वैयक्तिक नाही) मतभेद होते."ऐसी अक्षरेच्या" कट्ट्याच्या वेळी, आम्ही दोघांनीही त्या मतभेदावर समोरासमोर चर्चा करुन, योग्य तो तोडगा काढला.(अद्यापही सुनिलचे आणि माझे मतभेद होतातच.पण सुनिलही ते तेव्हढ्यापुरतेच ठेवतो.)

असो,

नळावरच्या भांडणाने इतर चाळकर्‍यांची फुकट करमणूक होते.इथे बरेच नळ रुपी धागे आहेत.पाणवठ्यावर गावगप्पा पण होतात आणि भांडणे पण होतात.आपण आपापल्या रिकांम्या घागरीत ज्ञानाचे ४-५ थेंब टाकावेत.जमल्यास आपल्या ज्ञानाचे २-३ थेंब इतरांना द्यावेत.

वरील वाक्य हे एकदम सामान्य आहे.जास्त मनावर घेवू नका.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

12 Feb 2016 - 6:54 pm | मम्बाजी सर्वज्ञ

स्पॉट ऑन!!! समोर समोर होणार्या चर्चे ला बीट नाही!
आणि कित्येकदा समोर समोर चर्चा झाली कि लक्षात येते समोरचा माणूस आपल्या आभासी जगातल्या माणसापेक्षा फार वेगळा आहे. म्हणून तर फोन आणि पत्रातून महत्वाच्या गोष्टी समोरच्याला सांगणे जास्त कठीण आहे.

माझी कॉमेंट कुणालाही वैयक्तिक टोमणा नवता, मला एवढेच म्हणायचे होते कि दिवसातून १० मिनिटे जिथे वेळ घालवतो तिथली आभासी दुनिया सिरीयसली घेण्यासारखी नाही.

"मला एवढेच म्हणायचे होते कि दिवसातून १० मिनिटे जिथे वेळ घालवतो तिथली आभासी दुनिया सिरीयसली घेण्यासारखी नाही."

सेम हियर...

माझेही मत तुमच्यासारखेच असल्याने, तुमच्या प्रतिसादाच्या खाली त्याला टाकले.

गैरसमज झाला असल्यास, आमच्याकडून पांढरा झेंडा आणि बिनशर्त माफी.

मम्बाजी सर्वज्ञ's picture

12 Feb 2016 - 10:22 pm | मम्बाजी सर्वज्ञ

मूवी शेठ. माफी वगरे मागू नका हो. माझा गैरसमज वगरे नाही.
आणि झालाच, तर ती चूक माझीच असायला हवी न!

मी जनरल स्टेटमेंट केले होते. आज काल मिपा काय फेसबुक वर पण लोक जीवावर उठतात कधी कधी. आमिर च्या स्टेटमेंट वर मी त्याला विरोध करणाऱ्या पोस्टर ला लाईक केलं म्हणून माझ्याशी न बोलणारे 'मित्र' आहेत आणि 'नातेवाईक' सुधा. गम्मत म्हणजे तेही देशाबाहेर असतात आणि मी सुधा. आता काय बोलणार!

वेल्लाभट's picture

12 Feb 2016 - 6:25 pm | वेल्लाभट

नाही म्हणता म्हणता ५४ प्रतिसाद झाले की !

अरुण मनोहर's picture

13 Feb 2016 - 8:21 am | अरुण मनोहर

हा घ्या ५५ वा

शब्दबम्बाळ's picture

13 Feb 2016 - 4:09 pm | शब्दबम्बाळ

मिपा आणि सिलेक्टिव अभिव्यक्तीस्वातंत्र्य असे काहीस म्हणायचं होत का आपल्याला?
कसय ना, बरेच महिने मोगा, हितेश आणि नाकी अनेक आयडीना किती आणि कुठल्या भाषेत प्रतिसाद दिले जात होते हे आपणही तेव्हा पहिले असेलच. माझे त्यांच्या विचारला समर्थन नाहीच पण त्यांना विरोध करणाऱ्यांची भाषा त्यावेळी कोणाला आक्षेपार्ह वाटली नाही.
चिखलफेक धाग्यामध्ये काही "विचारवंत" देखील इतरांना मतीमंद वगैरे लेखायला कमी करत नाहीत पण तेव्हा देखील असे धागे येत नाहीत किंवा त्यांचा निषेध होत नाही, एखादे अनुमोदन मात्र मिळते!(ज्याचा त्याचा कंपू शेवटी)
हा धागा देखील नक्की कोणाच्या तरी प्रतिक्रियेनंतरच आला असणार.
असो, तेव्हा थोडक्यात काय हे सगळ आधीपासून होत आणि पुढेही राहणार...

साहित्यिक धाग्यामध्ये या गोष्टी अभावानेच होतात पण काथ्याकुट सुरु झाली कि लगेच भाषा बदलते!

साहित्यिक धाग्याला प्रतिसाद देणे जीवावर येते. तिथे एकट्याने सादर केलेली कलाकृती असते. काकू हिरीरीने अन बहुतांशी कंपूने लढवला जातो. काही मेंबर फक्त त्यासाठीच येतात. टीआरपी पाहिजे हेच धोरण ठेवल्यास हळूहळू काथ्याकूटातील तुच्छ्तावाद अन कंपूशाही सार्वत्रिक होणारच. असो.

विवेक ठाकूर's picture

13 Feb 2016 - 7:27 pm | विवेक ठाकूर

.

राही's picture

13 Feb 2016 - 10:24 pm | राही

'तुच्छतावाद'- नेमका शब्द. आवडला.

बॅटमॅन's picture

15 Feb 2016 - 2:39 pm | बॅटमॅन

टीआरपी पाहिजे हेच धोरण ठेवल्यास हळूहळू काथ्याकूटातील तुच्छ्तावाद अन कंपूशाही सार्वत्रिक होणारच. असो.

त्यात सिलेक्टिव्ह हेडमास्तरकीचे धोरण अ‍ॅडवले तर मग बहारच येणार एक नंबर.

नाना स्कॉच's picture

14 Feb 2016 - 9:44 am | नाना स्कॉच

अभिव्यक्ति स्वातंत्र्य वगैरे नाहीये मिपावर,

साधारण ३ महीने अगोदर आयडी घेतला, त्याच्या अगोदर सहा महीने वाचनमात्र होतो, त्यावर हा निष्कर्ष बेतलेला आहे आमचा.

आयडी घेतल्यावर सहज काही काथ्याकूट धाग्यावर प्रतिसाद देता जी काही उत्तरे मिळाली ती उत्साहवर्धक तरी म्हणवली जाऊ नयेत, कारण माझी मते संबंधितांपेक्षा वेगळी होती.

तस्मात् मिपा वर अभिव्यक्ति स्वातंत्र्य नाहीये पण शेवटी हे एक खासगी संस्थळ आहे हे ही खरे अन बाकी ठिकाणपेक्षा इथे बरं आहे त्यातल्या त्यात, दगडापेक्षा वीट मऊ प्रमाणे.

(लेखन कला नसलेला अन प्रतिसाद मात्र) स्कॉचनाना

अभिव्यक्ती स्वातन्त्र्य हे दोन्ही बाजूने असते.
तुम्ही जर कोणाला कानाखाली हाणायची परवानगी असेल तर त्यालादेखील तुम्हाला बदडायची परवानगी असते हे लक्षात असू द्या.

पिलीयन रायडर's picture

14 Feb 2016 - 10:13 am | पिलीयन रायडर

=))

Classic!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Feb 2016 - 8:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

बॅटमॅन's picture

15 Feb 2016 - 2:42 pm | बॅटमॅन

असं कै नसतं. इथे फक्त काही जणांनाच ते महद्भाग्य लाभलेले आहे.