मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
11 Feb 2016 - 9:08 pm

नमस्कार,
मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही.
पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये"
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.

पाकक्रियावाङ्मयबालकथाचारोळ्यामुक्तकविडंबनप्रतिशब्दशुद्धलेखनप्रकटन

प्रतिक्रिया

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 11:50 am | विवेक ठाकूर

ऑरगॅजमचा अनुभव विचारमैथुनातून येईल ही अपेक्षा, बिभित्सरसातून सौंदर्य निर्मिती होईल या अपेक्षेइतकीच भाबडी आहे.

जयंत कुलकर्णी's picture

16 Feb 2016 - 2:56 pm | जयंत कुलकर्णी

अंहं तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते नीट कळले नाही किंवा मला नीट सांगता आले नसेल. मला म्हणायचे आहे की तुमची तुमच्या विचारांशी कुस्ती संपली आणि तुम्ही एकदाचे दमलात की आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकायला मोकळे.... असो हलके घेणे..

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 11:11 am | विवेक ठाकूर

एक साधी गोष्ट आहे, प्रणयाची योजना निसर्गानं आपल्या पुनरावृत्तीसाठी केली आहे, हे सर्वमान्य आहे. त्यात पुरुषाला जर ऑरगॅजमचा आनंद मिळत नसेल तर जगभरातले पुरुष, स्त्रीयांच्या मागे कशाला लागतील? माझं स्टेटमंट जेनरिक आहे आणि ते तुम्ही सिंगल आउट करुन वाचत असल्यामुळे साधासा अर्थ काँप्लिकेट होतो आहे.

मूळ प्रतिसाद असा आहे:

ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही. तुमच्या माहिती करता, पुरुषाच्या ऑरगॅजम सदृश स्त्रीला आलेला अनुभव ही फार दुर्मिळ घटना आहे, त्यामुळेच तर प्रणयविश्वात त्याची चर्चा आहे.

तुम्ही इतक्या सरळ आणि उघड गोष्टीत सेक्शुअल डिसॉर्डर, अतीश्रम वगैरे एक्सेप्शनल फॅक्टर्स जोडता आहात. तर्काचा एक साधा नियम आहे : एक्सेप्शन प्रूवज द रूल !

आणि त्याही पुढे जाऊन ` डिसऑर्डर असेल तर तो "पुरुष" नसतो का? असा भलताच आणि मला कदापिही अभिप्रेत नसलेला अर्थ काढता आहात.

तुमच्या नम्रपणा विषयी कायम आदर आहे आणि राहील. त्यामुळे वेळ पडल्यास, माझ्याकडे मुद्दा असून सुद्धा, प्रतिवाद न करता, कमीपणा घ्यायला मी तयार आहे.

पण हे विधान म्हणजे निव्वळ, अधारहीन तर्क आहे :

केवळ एक केसचा अभ्यास करून संपूर्ण ज्ञान माझ्याच कडे आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास हास्यास्पद आहे एवढेच म्हणतो.

त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु. पण तुमची ही विधानं, तुमच्याही अनुभवविश्वाच्या मर्यादेतली आहेत.

वाटेल तितका अभ्यास करा. स्त्रीमन समजण्यासाठी तुम्हाला स्त्रीच असायला लागेल किंवा देव.

तुम्ही एक फार उघड गोष्ट दुर्लक्षितायं, चर्चा स्त्रीच्या ऑरगॅजमवर चालू आहे आणि एखादीनं ऑरगॅजम अनुभवला की नाही हे कळायला पुरुष असणं पुरेसं आहे, स्त्रीचा जन्म घेण्याची गरज नाही.

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2016 - 12:26 pm | पिलीयन रायडर

तुम्ही ऑरगॅझमचं स्टेशन सोडुन चर्चा ब्रेस्ट कॅन्सरच्या दिशेने पुढे नेलीत (समजा.. यदा कदाचित..) तर प्लिझ मला बोलवुन घ्याल का?

तुम्ही मनानीच माझ्या प्रश्नांचे.. उत्सुकतेचे कारण ठरवु नयेत किंवा अजुन कुणी तुम्हाला मी उचकवायला / भिकारचोट राजकारण करायला हे विचारतेय असा निष्कर्ष काढु नये म्हणुन आधीच सांगतेय की माझा हेतु काय

विठा / संक्षी --- वैयक्तिक प्रश्न (मुल न होणे) ---- अनुषंगिक वाचन / चिंतन / मनन / अभ्यास ( हेतु:- वैयक्तिक , विचारात घेतलेला प्रश्न - वैयक्तिक , उपाययोजना / निरीक्षण - वैयक्तिक ) ---- मुल झाले ------------------------------------------------------------------ ब्रेस्ट कॅन्सरचा समस्त स्त्री जातीला लागु पडेल असा खात्रीलायक १००% उपाय ज्याने रोगाची शक्यता शुन्य होते.

मुल झाले ते उपाय ह्यामध्ये नक्की काय घडले हे मला समजुन घ्यायचे आहे.

तुम्ही विचारात घेतलेले पॅरामीटर - स्त्री देह, मानसिकता, प्रणय , तृप्ती, देहाचा अभिमान इ इ - सर्व न मोजता येण्यासारखे

न मोजता येणार्‍या पॅरेमीट्र्स ची तुम्ही दृश्य आणि मोजता येणार्‍या ब्रेस्ट कॅन्सरशी कशी सांगड घातली हे समजुन घ्यायला आवडेल.

धन्यवाद!

(वि सू:- ऑरगॅझम वरील चर्चा अतोनात कंटाळा आल्याने थांबवत आहे. जितं मया! म्हणुन डान्स करु नये.)

सुरुवात तुम्ही केली होती आणि तुम्हाला सगळं माहिती आहे असा दावा केला होता :

१. स्त्री देह आणि त्याची प्रणयतृप्ती ह्यावर तुम्ही फक्त "ओबझर्व्हर" म्हणुनच बोलु शकता. प्रत्यक्षात त्या देहाची अनुभुती तुम्हाला अजिबात शक्य नाही. त्यामुळे त्यातली गुंतागुंत तुम्हाला समजण्यापेक्षा मला समजण्याचे चान्सेस नेहमीच जास्त असतील. तेव्हा तुम्ही मला मल्टिपल ऑरगॅझम आणि नो ऑरगॅझम वगैरे सांगु नका. तो असतो की नसतो की "समोरच्याला वाटतं असतो.. पण खरं तर नसतोच"... वगैरे प्रकार तुमच्यापेक्षा निश्चितच मला जास्त ठाऊक आहेत. काळजी नसावी.

तुम्हाला कंटाळा आला की तुमचा दावा पोकळ निघाला हे तुमचे प्रतिसाद दर्शवतात. मला `जितं मया!' वगैरेची गरज नाही, तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला की झालं.

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2016 - 1:32 pm | पिलीयन रायडर

गाडी ब्रेस्ट कॅन्सरकडे गेलीच ह्या जन्मात तर बोलु.. धन्यवाद!

सुबोध खरे's picture

16 Feb 2016 - 1:33 pm | सुबोध खरे

ठाकूर साहेब
"ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच."
"अतिश्रमामुळे पुरुषांना ऑरगॅजम होत नाही". हे साधे विधान आपले वरिल विधान असत्य आहे हे दाखवण्यास पुरेसे नाही काय? अतिश्रम हे एक्सेप्शनल फॅक्टर्स मध्ये कसे येणार?
फारतर शब्द्च्छल नको असेल तर अतिश्रम च्या ऐवजी थकवा म्हणा.
त्यासाठी एवढा शब्दांचा डोगर रचण्याची गरज नाही.

बॅटमॅन's picture

16 Feb 2016 - 2:41 pm | बॅटमॅन

विठाकाकांच्या शब्दबुडबुड्यांपुढे तुमचे मेडिकल ज्ञानही फिके पडते, डोक्टरसाहेब.

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 5:51 pm | विवेक ठाकूर

तुम्ही एकतर मुद्दा लक्षात घेत नाही किंवा मग लक्षात येऊन सुद्धा मुद्यावर येत नाही.

ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच.

हे जेनरिक स्टेटमंट आहे. त्याचा अर्थ, (नॉर्मली) ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच, पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव (नॉर्मली) येत नाही.

आणि तुम्ही थकवा आलेल्या पुरुषाचं ( आणि आधी तर सेक्शुअल डिसऑर्डर असलेल्या पुरुषाचं) उदाहरण देतायं.

आता हा तुमच्याच प्रतिसादातला उतारा आहे :

Only about a third of women experience orgasm regularly during intercourse.
Another third can reach orgasm with intercourse but need extra stimulation.
A third never achieve orgasm during intercourse but can by manual and oral stimulation. ....

यानं माझ्या विधानाचा दुसरा भाग सिद्ध होतो.



रा

अ‍ॅण्ड द नोबेल गोज टू......

सुबोध खरे's picture

16 Feb 2016 - 6:00 pm | सुबोध खरे

प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात
आता हे जेनेरिक स्टेट मेंट आहे म्हणून पळ काढू नका.स्पष्ट पुरावा दाखवा. पहिल्यांदा बेफाट विधाने करायची आणि नंतर पलायन करायचं हे सोडून द्या. दुसरा भाग सिद्ध करा हे कुणी सांगितले आहे. पहिल्यांदा "पहिला भाग सिद्ध" करा.
आणि मी दिलेले दुवे मलाच दाखवण्याची गरज नाही. ते अर्थातच मी वाचलेले आहेत. ( न वाचता ढकलायची मला सवय नाही).

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 6:23 pm | विवेक ठाकूर

आता मात्र हद्द झाली!

जर माझं विधान चुकीचं असेल तर तुमचं म्हणणं काय आहे ते सांगितलंत तर बरं होईल. कारण मग तुमच्या अनुभवाचा अर्थ असा निघेल :

ऑरगॅजमचा अनुभव कुणाही पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच असं नाही !

मग पुरुष स्त्रीयांसाठी दिवाणे का आहेत? यू आर डिफाइंग द नेचर. पुरुषासाठी ऑरगॅजम नॉर्मल आहे म्हणून तर तो कायम प्रणयोत्सुक असतो. पहल पुरुषाला करावी लागते.

सुबोध खरे's picture

16 Feb 2016 - 6:47 pm | सुबोध खरे

प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात ऑरगॅजम होतोच"
हे विधान करून तुम्ही पुरुषांची पातळी खालावली आहे हेच मला म्हणायचे आहे.आणी आता सारवा सारव चालली आहे. नॉर्मल असतं वगैरे.
"साधारणपणे" आणी "कायम" यात स्पष्ट असा फरक आहे.
पुरुष हा केवळ संभोगासाठी आतुर असतो असे आपण म्हणता हे अतिशय चुकीचे आहे.
"मग पुरुष स्त्रीयांसाठी दिवाणे का आहेत?" ई विधाने आपण करता.
आपण एक टोकाची भूमिका घेऊन फक्त मलाच सर्व समजते अशा आत्मतुष्टीत वावरता आहात आणी चूक झाली तर मान्य न करता मेगाबायटी प्रतिसाद देत त्याचे समर्थन करता याचा हा वितंड वाद आहे. असे समजू नका कि मला वितंड वाद घालता येत नाही. किंवा मी पळ काढेन.
सुस्पष्ट आणी मुद्देसूद विवेचन न करता गोल शब्द बम्बाळ लिखाण करून चूक असलेली गोष्ट बरोबर सिद्ध होत नाही
चुकीची गोष्ट सुद्धा आत्मविश्वासाने आपण कशी लिहिलेली आहे हे मी तुम्हाला दुसर्या धाग्यात दाखवेन.

सुबोधजी, काय लिहीतायं? ऑरगॅजमनं पुरुषांची पातळी खालावते?

आहो, ऑरगॅजम ही पुरुषासाठी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात पातळीचा प्रश्न कुठे येतो ? ती निसर्गाची योजना आहे. आणि पुरुषाला ऑरगॅजमिक सुख मिळालं नाही तर तो केवळ जननासाठी संभोग करेल का?

एनी वे सर, आय रिस्पेक्ट यू. तुम्हाला निरुत्तर करण्यात मला रस नाही पण किमान, मी वितंड वाद घालतोयं असं समजू नका.

सुबोध खरे's picture

16 Feb 2016 - 7:19 pm | सुबोध खरे

हे विधान करून तुम्ही पुरुषांची पातळी खालावली आहे
हे माझे विधान आहे.
माझे विधान काय आणी त्याचा तुम्ही अर्थ काय काढताय?
ऑरगॅजमनं पुरुषांची पातळी खालावते? असे आपण कसे वाचलेत?
याचा साधा अर्थ हाच आहे कि आपण विधान नीट वाचतच नाही.
वाद घालणे तर दूरच

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 7:55 pm | विवेक ठाकूर

प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात ऑरगॅजम होतोच"
हे विधान करून तुम्ही पुरुषांची पातळी खालावली आहे हेच मला म्हणायचे आहे

काय अर्थ होतो याचा?

सुबोध खरे's picture

16 Feb 2016 - 8:11 pm | सुबोध खरे

विधान आता नीट वाचलं वाटतं?

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 8:23 pm | विवेक ठाकूर

विधान वाचल्याशिवाय प्रतिसाद दिला असता तर तुमच्या विधानाचा वेगळा अर्थ निघू शकतो का? आणि अर्थ तोच असेल तर, विधान प्रतिसाद देण्यापूर्वी वाचलं नव्हतं असं म्हणता येईल का?

एनी वे,

प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात ऑरगॅजम होतोच"
हे विधान करून तुम्ही पुरुषांची पातळी खालावली आहे हेच मला म्हणायचे आहे

काय अर्थ होतो याचा?

सुबोध खरे's picture

16 Feb 2016 - 8:32 pm | सुबोध खरे

याचा साधा अर्थ असा कि जर एखाद्या पुरुषाला एखादे वेळी ऑरगॅजम झाला नाही तर त्याला काही तरी आजार आहे असाच अर्थ निघतो. मग बहुसंख्य "पुरुष"आजारी आहोत असा अर्थ निघतो.
शिवाय पुरुष स्त्रीच्या जवळ फक्त ऑरगॅजम साठीच येतो असा अर्थ निघतो. हे म्हणजे पुरुषांची मानसिक पातळी खालावल्याचा निर्देशक नाही काय?
प्रेम, आपुलकी ओलावा या शब्दांना काही किमतच नाही का?
असो. या धाग्यावर याच्या पुढे वाद घालण्यात काही अर्थ नाही. कारण आपण सर्वज्ञ आहात असे आपण ठरवलेलेच आहे.
आता दुसर्या धाग्यावर भेटू.

होबासराव's picture

16 Feb 2016 - 8:38 pm | होबासराव

शिवाय पुरुष स्त्रीच्या जवळ फक्त ऑरगॅजम साठीच येतो असा अर्थ निघतो. हे म्हणजे पुरुषांची मानसिक पातळी खालावल्याचा निर्देशक नाही काय? प्रेम, आपुलकी ओलावा या शब्दांना काही किमतच नाही का?

अगदि अगदि...

विवेक ठाकूर's picture

16 Feb 2016 - 8:57 pm | विवेक ठाकूर

जर एखाद्या पुरुषाला एखादे वेळी ऑरगॅजम झाला नाही तर त्याला काही तरी आजार आहे असाच अर्थ निघतो.

हा तुम्ही काढलेला अर्थ आहे. पुरुषाच्या आजाराविषयी (सेक्शुअल डिसऑर्डर) लिहून तुम्ही, तुमचंच विधान बॅक-ट्रिगर केलं आहे.

मग बहुसंख्य "पुरुष"आजारी आहोत असा अर्थ निघतो

ही तर हद्द झाली!

शिवाय पुरुष स्त्रीच्या जवळ फक्त ऑरगॅजम साठीच येतो असा अर्थ निघतो.

कल्पनेपलिकडे नेलायं तर्क !

प्रेम, आपुलकी ओलावा या शब्दांना काही किमतच नाही का?

हा पुन्हा तुम्हीच काढलेला अर्थ आहे!

शेवटी तुम्ही व्यक्तिगत झाला आहात. तुमच्याविषयी आदर आहे म्हणून मीही थांबतो. पण वरचे सगळे अर्थ, स्वतःच स्टेटमंट बॅक-ट्रिगर करुन तुम्हीच काढलेले आहेत. माझ्या विधानाचा तुम्ही काढलेल्या अर्थाशी काहीही संबंध नाही हे नम्रपणे नमूद करतो.

सामान्य वाचक's picture

16 Feb 2016 - 7:24 am | सामान्य वाचक

१ मिपा आणि हतबुद्ध होणे
२ मिपा आणि डोक्यावर पडणे
३.....

पैसा's picture

16 Feb 2016 - 11:52 am | पैसा

अजून त्याचं लग्न व्हायचंय. त्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा धागा सेक्स आणि ऑर्गॅझमकडे पोचलेला बघून पुन्हा जालीय संन्यास घेऊन गेला वाटते! जेपी, परत ये. तुला संपादक करू. तुला कोणीही काहीही बोलणार नाही.

इरसाल's picture

16 Feb 2016 - 3:04 pm | इरसाल

इतर काका काकु मावश्याच्या डोळ्यांचे पाणी तु गेल्यापासुन (सोडुन हं) खंडलेले नाही. बालक पालक कोणीही तुझ्यावर राग धरुन नाही.......हे राहिले काय ?

पैसा's picture

16 Feb 2016 - 3:05 pm | पैसा

मला ते नीट आठवत नव्हते. =))

अजया's picture

16 Feb 2016 - 12:36 pm | अजया

=))))))

चेक आणि मेट's picture

16 Feb 2016 - 12:48 pm | चेक आणि मेट

छळी मिपास कोणी | त्याची अमंगळवाणी ||
येऊ न द्यावा समोर | अभागी तो दुराचार ||
नावडे मिपाधोरण | त्याची मती व्याभिचारीण ||
चेकमेट म्हणे याति | भ्रष्ट तयाची ते मति ||

जेपी's picture

16 Feb 2016 - 3:35 pm | जेपी

अर्रर्र,
संमु,
धाग्याच्या शिर्षकात " फक्त प्रौढांसाठी" असे प्रमाणपत्र टाकावे.
धन्यवाद.

नीलमोहर's picture

16 Feb 2016 - 4:18 pm | नीलमोहर

थोडा थोडा सा लम्बा लम्बा सा,
धीरे धीरे उसने खेचा आहाहा..
फिर उसका पल्लू बनके उसका दास,
धीरे धीरे मैने खेचा आहाहा..
घबराहटमें फिर अपना अपना हाथ,
उसने खेचा मैनें खेचा आहाहा..
हम थे वो थे और समा रंगीन,
समझ गए ना..

जाते थे जापान पहुच गए चीन,
समझ गए ना.. ;)

पैसा's picture

16 Feb 2016 - 5:53 pm | पैसा

त्याने धाग्याची मालकी पहिल्या प्रतिक्रियेतच सोडून दिलीय!

नाव आडनाव's picture

16 Feb 2016 - 5:57 pm | नाव आडनाव

फोन आला आणि राँग नंबर आहे हे फोनवर बोलणार्‍या दोघांनाही माहित आहे, दोघं थोड्याथोड्या वेळाने एकमेकांना सांगत आहेत की राँग नंबर आहे, पण चांगल्या तासभर गप्पा हाणल्या असं वाटतंय :)

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2016 - 6:03 pm | पिलीयन रायडर

=))

बेक्कार हसतेय!!

खरंय.. तसंच झालं खरं!!

मन१'s picture

16 Feb 2016 - 6:09 pm | मन१

=))
---/\---

एस's picture

16 Feb 2016 - 6:53 pm | एस

हाहाहा!

ऋषिकेश's picture

16 Feb 2016 - 7:25 pm | ऋषिकेश

तर मंग मंडली,
मिपावर ऑर्गॅजमसारख्या एरवी बुजल्या आवाजात चर्चा होणार्‍या 'विषया'वर इतकी तारस्वरात रसभरीत चर्चा होत असेल तर इथल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला काही धाड भरलेली नाही असा निष्कर्ष काढून हा (वितंड)वाद थांबवावा काय?

मुक्त विहारि's picture

16 Feb 2016 - 9:36 pm | मुक्त विहारि

+१

आणि विशेषतः एकही प्रतिसाद न उडता किंवा संपादित न होता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2016 - 7:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठल्या वाक्याला जास्तं अर्थ आहे तो सांगा बरं?

बेमट्या, आंबा गोड असतो बरं का रे चवीला.

बेमट्या, काल हापुस आंबा खाल्ला लैचं गोड होता की रे.

अता हि टेस्टकेस ह्या धाग्यावरच्या आणि इतरत्र झालेल्या गिगाबायटी प्रतिसादांना लावा. उत्तर मिळेल. नो ऑफेन्स टु संक्षी/ विठा.

होबासराव's picture

16 Feb 2016 - 7:42 pm | होबासराव

कोनाड्यात उभि व्हिंदमाता
बेमटेरावांचे नाव घेते माझा नंबर पयला.

दिगंबर काका: अग नवर्‍याला बेमटा म्हणतेस खुळि का तु..त्याचे पाळण्यातले नाव धोंडु...आता परत घेच तो उखाणा...मग व्हिंदमाता पुन्हा एकदा कोनाड्यात उभि राहिलि.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2016 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालु द्या.

-दिलीप बिरुटे

मी-सौरभ's picture

16 Feb 2016 - 11:54 pm | मी-सौरभ

हा प्रतिसाद टिकला तर इथे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे असे म्हणायचे का?

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2016 - 12:31 pm | गॅरी ट्रुमन

बरं काय ठरलं मग? मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे की नाही?

नाखु's picture

17 Feb 2016 - 1:08 pm | नाखु

कौल्या मास्तरांना बोलावणं धाडलयं येतील हातातली कामं संपली की !!!

मिपावर (फक्त) कौले काढून आत बघणार्यांसाठी खास शब्द