तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु.
पहिला भाग तुम्हाला " यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... " येथे पहायला मिळेल. ह्याच लेखाला तुम्ही पर्यायाने टारुबाबाच्या "अवांतर प्रतिसादांवर उपाय ह्याचाही "भाग-२" म्हणु शकता.
असो. काहीही म्हणा त्याने काही फरक पडत नाही.
तर आमच्या मागच्या लेखाप्रमाणे ह्या भागात सुद्धा नवोदितांनी मिपावर सुप्रसिद्ध प्रतिसादकर्ता होण्यासाठी प्रतिसाद कसे लिहावेत ह्यासंबंधी " ४ शब्द" लिहणार आहोत. ( कोण आहे रे तो "ह्याच्या ४ शब्दांनी मिपाची बँडविड्थ बोंबलते" म्हणणारा, काहीही बोलतात लेकाचे. )
असो.
३. जनातलं - मनातलं :
जर तुम्ही सुक्ष्मात जाऊन निरीक्षण केलेत तर तुम्हाला मिपावरच्या दर ३ लेखामागे १ लेख हा "जनातलं मनातलं " ह्या सदरात आल्याचे दिसेल, थोडक्यात हा भाग महत्वाचा. बर्याच वेळा आपला लेख नक्की "काथ्याकुट / कविता / आणखी काही " ह्या पैकी कशात मोडतो हे ( वेळीच ) लक्षात न आल्याने बरेच लोक तो थम्ब रुलप्रमाणे "जनातलं मनातलं" ह्य सदरात बिनधास्त टाकुन देतात. असो.
ह्यावर कसे प्रतिसाद द्यावेत ह्याचेसुद्धा मी थोडे वर्गीकरण केले आहे.
जर लेखन "कथा" ह्या वर्गात मोडत असेल तर प्रतिसाद देण्याच्या व्याख्या थोड्या भिन्न आहेत. पहिल्यांदा ( जमल्यास ) कथा वाचुन ती नक्की कसली आहे ह्याचा निर्णय करावा. म्हणजे ती भयकथा आहे की सिरीअस आहे की विनोदी आहे की विडंबन करुन कुणाच्या टोप्या उडवणारी आहे ह्याचा निर्णय करुन घ्यावा. नाहीतर काय होते एखादी "भयकथा" असते आणि त्याला तुम्ही चुकुनच " व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो " असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो. तर काळजी महत्वाची हे लक्षात आलेच असेल.
जर कथा ही विनोदी असेल तर तुमचे काम सोपे होते, फक्त " अशक्य , ठ्ठ्या ऽऽऽऽऽ , फु ट लो , आग्गायायाया ऽऽऽ , कळफलकावर + मॉनीटरवर वर कॉफी सांडली , खुर्चीवरुन पडलो , हसुन हसुन मेलो " अशी ५-६ आतिशयोक्तीपुर्ण वाक्ये जवळ बाळगावीत. पण फक्त एवढेच लिहुन प्रतिसाद पुर्ण होत नाही, त्या लेखातीलच २-४ वाक्ये निवडुन ती आहे तशी आपल्या प्रतिक्रीयेत टाकुन त्याखाली वरील तुकडे वापरल्यास प्रतिसादाला "वजन येते" असा अनुभव आहे. सम्जा जर वाक्ये सुचली नाहीत तरीही काळजी नाही, नुसत्या " =)) =)) " अशा स्मायली टाकल्या तरी काम भागते. ह्यातलेसुद्धा काहीही करायचा कंटाळा आला असेल तर एखादी भलीमोठ्ठी प्रतिक्रीया निवडावी ( ह्या देणार्यांची संख्या मोप आहे, फिकर नॉट ) आणि त्यालाच "असेच म्हणतो , +१ " असा प्रतिसाद टाकुन मोकळे व्हावे ( मात्र ह्याला आम्ही कर्मदरिद्रीपणा म्हणतो. असो. )
जर लेखक एखादा "मिपावरील थोर व्यक्ती " असे तर मात्र " व्वा , भाईकाकांची आठवण आली ( पुलं म्हणणे म्हणजे घोर पाप बरे का. ) , चिंवी जोश्यांची शैली वाटते , हा प्रकार तुम्हाला चांगला जमतो " वगैरे लिहावे लागते, नाहीतर तुमच्या प्रतीक्रीयेला काडीइतकी किंमत नाही, तुम्ही नाही लिहले तर अजुन दुसरे कोणीतरी लिहतेच व लोक त्याला "सहमत आहे" असा उपप्रतिसाद देत राहतात, म्हणुन "स्टाईकर्स ऍडव्हान्टेज " कधीही सोडु नये ...
जेवढा मोठ्ठा प्रतिसद तेवढे तुम्ही जास्त फेमस हे लक्षात आले मग पुढे काही अवघड नाही.
जर कथा ही भयकथा "कॅटेगिरी" तली असेल तर मामला जरासा कठीण आहे, ह्यांना प्रतिक्रीया देण्यासाठी अभ्यास लागतो. नुसत्या " भयानक, दरदरुन घाम सुटला , सरसरौन काटा आला अंगावर , कच्चकन दचकलो " ह्या अगदीच सर्वसामान्य प्रतिक्रीया झाल्या. जर आपली छाप जमवायची असेल तर उगाच आपलं लेखकाची एखाद्या "प्रसिद्ध भयकथा लेखकाशी " तुलना करणे आवश्यक ठरते.
उदा : शेवट जरा मतकर्यांसारखा (उल्लेख असाच करावा, जर तुम्ही "रत्नाकर मतकरी यांच्यासारखा" असे लिहलेले तर तुम्ही नवशिके आहात हे मिपावरचे पोरटे सुद्धा ओळखेल ) केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला.
किंवा
अगदी तंतोतंत धारपच, मला वाटतं त्यांची "अखेरचा प्रमाद ( म्हणजे काय कुणास ठाऊक ? ) " ही कथा ह्याच अंगाने जाते.
किंवा
ते त्या "मुडदे की जान खतरे मे है / सुखी नदीं मे बहती हुई लाश" मधल्या कथानकासारखे वाटते नाही ?
असे प्रतिसाद टाकणे आवश्यक बनते, म्हणाजे काय होते की लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढुन तो आपला सुमडीत "हॅहॅहॅ, कसेच कसे. त्यात शेवटी माणुस मरुन भुत होत नाही तर भुताला उ:शाप मिळुन त्याचा माणुस होतो व ते दोघे लग्न करतात " असे स्पष्तीकरण देत बसतो, तुम्ही आपलं " हम्म, पण शैली तशी वाटली बॉ,असो." असा ठेका सोडु नका ...
हे एकदा जमले की झालेच ...!
तिसरा प्रकार आहे तो म्हणजे "मुक्तक अथवा सिरीअस लिखाण " करणार्याचा ...
महत्वाची सुचना : वर दिलेल्या "शँपल प्रतिक्रीया / सल्ला " ह्याचा वापर इथे अजिबात करु नये. ह्याचा साज पुर्ण वेगळा आहे.
नेहमीप्रमाणे ( जमल्यास ) पुर्ण कथा वाचुन काढावी, शक्यतो हा प्रकार "मान्यवर व जाणाकार" व्यक्तीच हाताळत असल्याने ह्यांच्या लेखाला वजन असते, उगाच फालतु प्रतिक्रीया इथे टाकल्यास तुमच्यावर "बदनाम मिपाकर" व्हायची दुर्दशा येऊ शकते.
सर्वसाधारण अशा लेखाला " सलाम ..! , केवळ अ प्र ति म , खल्लास वगैरे वगैरे " टारुने सांगितलेल्या प्रतिक्रीया प्राथमीक अवस्थीत टाकता येतील. पण आता तुम्ही जम बसवायचे ठरवल्याने तुम्हाला हे अलाऊड नाही.
आता तुम्ही थोडाश्या कलात्मक, नाजुक व साहित्यीक प्रतिक्रीया टाकाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणजे बघा की " जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो " अशा व तत्सम प्रतिक्रीया टाकणे आवश्यक ठरते. जेवढे जास्त "अनाकलनीय" लिहताल तेवढेच जास्त वजन पडते. साध्या सरळ प्रतिक्रीयेला जास्त भाव मिळत नाही. असो.
अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळेला लेखकाचे " अप्रतिम बॉस , आत्तापर्यंत लेखणी का म्यान केली होतीत ? / रुद्ध प्रतिभा भरभरुन वाहु देत / अबक हे मिपावरचे मोठ्ठे फाउंड आहे असे मी आधीच म्हणलो होतो / तुमचे नाव वाचले आणि लेख वाचायला घेतल, नेहमीप्रमाणे निराशा झाली नाही. " वगैरे वगैरे प्रतिक्रीया टाकाव्यात, ह्याला समर्थन तर मिलतेच शिवाय तुम्ही लेख्काच्या "बडी लिस्ट" मध्ये जायला मोकळे होता.
शेवटचा "अनकॅटेगराईझ्ड प्रकार " म्हणजे उगाच आपले काहीही लिहणार्यांचा, ते आपले उगाच " पुण्यात गादी कुठे मिळेल ? पंखा कुठे दुरुस्त करायचा ? सगळ्यात भारी शेवपापडी /अनारसे कुठे मिळतात ? संघाने चालवलेला गांधीवाद . सलमानने कत्रिनाला काय म्हटले " अशा विषयांवर काहीबाही खरडतो तो, ह्याला विषयांचे बंधन नाही, तुम्ही काहीही लिहु शकता.
ह्याला जास्त भाव मिळत नसल्याने "तुम्ही ह्याकडे ढुंकुनही न पहाणे योग्य" ठरेल. तिकडे फिरकुच नका.
उलट आपल्यासारख्याच एखाद्या पप्रथितयश प्रतिसादकर्त्याचा खरडवहीत "काय फालतुपणा चालला आहे, अक्षरशः उबग आला आता , आयला गिरणी लावल्यासारखे लेख पाडतात " अशा पिंका टाकुन द्याव्यात, आपली चर्चा मस्त रंगते व "भोचकपणे आपल्या खव वाचणार्यांना" आपण फार "अभिरुचीसंपन्न, चोखंदळ, साहित्याचे खरे वारसदार, गुणग्राहक " वगैरे असल्याचा उगाच गैरसमज होतो व आपली "इज्जत वाढते" , मग हा "गैरसमज" हळुहळु पसरवायला हीच मंडळी मदत करतात. मधुन आधुन त्यांच्याही खरडवह्यात "काय मग, काय नवे लिखाण ? " असे लिहुन यावे त्यावर रिप्लाय म्हणुन " बस का मालक, चेष्टा करता का गरिबाची ? आम्ही कसले लिहणार , आम्ही तर तुमचे फॅन. बोला कधी लिहताय ? " अशी खरड आलीच म्हणुन समजा. त्यावर उत्तर म्हनुन फक्त " लवकरच, सध्या थोडा बिसी आहे, मनासारखे लिहायला निवांत वेळ पाहिजे हो " असे ठोकुन द्यावे. म्हणजे पुढ्च्या वेळी तुम्ही काहीही लिहले तरी "ह्यांचा तुमची तोंड फाटुस्तोवर स्तुती" करणारा प्रतिसाद नक्की ...
असो.
४. कलादालन :
हा एक नवा प्रकार मिपावरच प्रथम अस्तित्वात आला आहे, अजुन नाविन्य असल्याने तुम्हाला हात चालवायला बर्याच संधी आहेत. पण इथे मात्र फक्त फोटाँवर प्रतिक्रीया द्यायची असल्याने फाफटपसारा चालत नाही, मुद्द्याचे बोलावे लागते. आता हे कसे जमवावे ते सांगतो.
नेहमीप्रमाणे टारुबाबाने सांगितल्याप्रमाणे "फो टू के व ळ अ प्र ति म , ४ नंबरचा फोटू झकास आला आहे , डोळ्यचे पारणे फिटले, डेस्कटॉपवर लावला आहे, मस्तच " ह्यासारख्या प्रतिक्रीया टाकुन ठेवाव्यात.
आता महत्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रतीक्रियेच्या खालीच लगेच "अवांतर " ह्या सदराखाली आपला मोठ्ठेपणा, शहाणपणा , गर्व दाखवणार्या कमेंट्स द्याव्यात.
जसे की "सेटिंग काय लावले हो ? नाही , जराशे दुसर वाट्तात फोटो, आय एस ओ ४००० वापरले असते तर अजुन ब्राईट आले असते. असो.
लेन्स कुठली हो ? फोकस कसा मारलात ? जरा अजुन क्लोजअप हवा होता असे वाटते.
जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ...
शटर स्पीड थोडे जास्त झाले असे वाटते, एवढ्या प्रकाशाला थोडे कमीच वापरा पुढ्च्या वेळी ..."
ह्या प्रतिक्रीया ठोकल्या की तुम्ही म्हणजे अगदी जगप्रसिद्ध फोटोग्राफरचा आव आणायला रिकामे. लोक सुद्धा ह्यावर मनोसोक्त भांडतात. बिचारा लेखक सुद्धा आपल्याला "टेक्नीकल डिटेल्स्ची" काडीइतकी माहिती न्सल्याचे मान्य करतो व तुम्हाला सांगायची विनंती करतो. तुम्ही मात्र " हम्म, सांगायला हरकत नाही तसे, पण सध्या एवढा मोठ्ठा लेख लिहायला वेळ नाही, बघतो सवडीने " असे ठोकुन द्यावे. लोक वाट बघत बसतात पण कुणी विचारायची हिंमत करत नाही. थोडक्यात तुम्ही जिंकलात स्पष्टपणे ....
अजुन एक प्रकार म्हणजे "फोटोम्च्या स्थानावर / लोकेशन वर कमेंट्स" द्यायच्या ...
उदा " का हो तिथल्या डाळिंबच्या बागा अजुन तशाच आहेत का ?
आम्हाला आमच्या ट्रीपची आठवण झाली, तुम्ही ज्या दगडाचा फोटो दिलात त्यावरुन पडुन माझा कपाळमोक्ष होता होता वाचला होता.
आयला, डोंगर अजुन तशेच्या तसेच, मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे.
त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ?
तुम्ही नशिबवान खरे, आम्ही गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा तेथे चक्क बर्फ होता, मग आमच्या हीने / ह्यांनी त्यावरुन स्कीईंग करता करता पाय मोडुन घेतला होता. असो.
त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... "
असे जर तुम्ही बोललात तर लोक तुमच्याकडे "काय दर्दी माणुस आहे ?" ह्या नजरेने पाहतील. शिवाय तुम्ही गेलाबाजार निम्मे तरी जग हिंड्ला आहात हे १० लोकात सिद्ध होते. शिवाय तुम्हाला ह्यांची फारच माहिती आहे असा "गैरसमज" भराभर पसरुन तुमचे नाव होते.
मग लोक तिकडे जाताना तुम्हाला विचारतात " शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ, तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले" ...
अशा प्रकारे हा हा म्हणता तुम्ही ह्या प्रकारात "दादा" म्हणुन ओळखले जायला लागता ....
( विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात ...
धन्यवाद ...! )
*** लेख क्रमश : ****
प्रतिक्रिया
18 Dec 2008 - 5:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय लिहिलंयत ........... नि:शब्द!
(पुढच्या भागात ही प्रतिक्रिया वगळू नका हो! आम्ही वशिल्यातले ना?)
--अदितीताई अवखळकर पाटील
18 Dec 2008 - 5:19 pm | घाटावरचे भट
सहमत...
18 Dec 2008 - 5:27 pm | अभिरत भिरभि-या
असेच म्हणतो , +१
(कर्मदरिद्री) अभिरत
बाकी हसून काफी नाही पण पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतले पाणी बाहेर यायला लागले व्हते.
पु. भा. प्रतिक्षेत.
(तुमचा गाववाला)
अभिरत
19 Dec 2008 - 9:53 am | झकासराव
+३
शब्ददरिद्री म्हणलास तरी चालेल. :)
फंटाष्टिक, वंडरफूल्ल जमलाय लेख.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
19 Dec 2008 - 11:43 am | नंदन
असेच म्हणतो :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Dec 2008 - 5:14 pm | लिखाळ
>> विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात <<
मी वस्तर्याच्या भयाने असे चुकून वाचले.
लेख निवांत वाचून प्रतिसाद देतो. आत्ता घाईत आहे.
-- लिखाळ.
18 Dec 2008 - 5:30 pm | धमाल मुलगा
=))
लिखाळराव,
दोन दिवसांपासून् पाहतोय, एकदम जोरात सुसाट सुटलीय तुमची गाडी!
हाबिणंदण :)
18 Dec 2008 - 5:33 pm | विनायक प्रभू
सहज बघताय ना. माझी भविष्यवाणी खरी झाली लिखाळ बाबतीत.
18 Dec 2008 - 5:47 pm | लिखाळ
कस्सं कस्सं..
-- लिखाळ.
18 Dec 2008 - 5:26 pm | विसोबा खेचर
लै भारी.. चालू द्या.. :)
तात्या.
20 Dec 2008 - 10:31 am | आनंदयात्री
असेच म्हणतो .. सहमत.
बाकी या लेखाचा पुढचा भाग पण येउ द्या .. खरडवह्यात लोकप्रिय कसे व्हावे ?
१. पोट आत घेउन बनियनवर डंबेल उचललेले फोटु काढुन खरडवहीत चिटकवावे अन उगाचच आख्ख्या मिपाला नमस्कारची खरड टाकावी. "अय्या काय मस्त फोटो" असे रिप्लाय आले की "आज १०० च रिपीटेशन्स मारले भारतात होतो तेव्हा ५०० मारायचो" ...
२. स्वतःला कोणतातरी पेशवा डिक्लेअर करुन उगाचच इतरांना हंबीरराव वैगेरे सेनापतींच्या पदव्या देउन आदेश सोडत बसावे.
३. सकाळदुपार संध्याकाळ नमस्कार टाकावे.
४. च ची वैगेरे भाषा वापरायला सुरुवात करावी.
५. हाणामार्याच्या बाता कर्याव्यात.
इ.इ. .. येउनच द्या पुढला लेख. तसा एकजरी पॉइंटर दिला असता तरी तुम्ही त्याचा विस्तार करुन एक लेख पाडलाच असता !! आता ५ लेख पाड्तात. :)
18 Dec 2008 - 5:29 pm | विनायक प्रभू
डॉन्या, टारु ने भलतीच आफत आणली. आता नविन प्रतिक्रिया कश्या काय प्रसवायच्या बॉ?
18 Dec 2008 - 5:56 pm | घाटावरचे भट
प्रतिक्रियांचे तिबार पीक घेणे अवघड नसावे.
18 Dec 2008 - 6:01 pm | प्रकाश घाटपांडे
नवीन प्रतिक्रिया प्रसविण्यासाठी बाह्य संप्रेरके वापरावीत. त्याच्या अंमलाखाली प्रतिभा आणी प्रतिमा स्फुरतात. ;)
प्रकाश घाटपांडे
18 Dec 2008 - 6:03 pm | घाटावरचे भट
त्यांच्या वापराने प्रसववेदना कमी होत असतील तर अधिक उत्तम.
18 Dec 2008 - 6:07 pm | लिखाळ
नको असलेला प्रतिसाद दिला गेला तर बांधावर धोतरा डुलतो आहेच. :)
-- लिखाळ.
18 Dec 2008 - 6:06 pm | विनायक प्रभू
संप्रेरकांची नावे सांगा. प्रतिभा आणि प्रतिमा एकाच वेळी स्फुरणार असतील तर त्याची गरज लागेल.
18 Dec 2008 - 6:14 pm | घाटावरचे भट
ही फँटसी वाटते.
18 Dec 2008 - 5:34 pm | सहज
हाही पहिल्या भागासारखाच दमदार. असे फार कमी वेळा घडते.
यशस्वी परदेश दौर्यानंतर लेखनाला एक नवी धार आली आहे. :-)
*** लेख क्रमश : ****
हे शब्द वाचायला आवडतील असे वाटले नव्हते हो. :-)
18 Dec 2008 - 5:41 pm | छोटा डॉन
>> हे शब्द वाचायला आवडतील असे वाटले नव्हते हो.
बस का सहजशेठ, एवढ्यातच दमलात ?
तुमच्या भाषेत अजुन मिपाची बँडविड्थ बोंबलली कुठे ???
"पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ", बस इतकेच ...
------
छोटा डॉन
18 Dec 2008 - 6:03 pm | सहज
>>बस का सहजशेठ, एवढ्यातच दमलात ?
अरे तसे नाही अजुन एकदा [पुढचा भाग] असे शब्दमोती फुटणार म्हणुन म्हणून खराखुरा आनंद. बरेच वेळा क्रमशः वाचुन च्यायला अजुन आहेच का? असे नकळत शब्द जे कळफलकापर्यंत येउ नये म्हणुन प्रयत्नांची पराकाष्ठा करतो की नाही? म्हणजे क्रमशः शब्द नकोसा वाटतो पण इथे त्याच्या उलट म्हणजे आनंद होतोय की अजुन नवे भाग येणार.
पुढच्या भागाची वाट पहातोय. :-)
18 Dec 2008 - 6:22 pm | छोटा डॉन
>> म्हणजे क्रमशः शब्द नकोसा वाटतो पण इथे त्याच्या उलट म्हणजे आनंद होतोय की अजुन नवे भाग येणार.
भावना पोहचल्या ...
उलट माझाच गैरसमज झाला होता नेहमीप्रमाणे अर्धवट गडबडीत ...
असो.
आपल्याला अजुन वाचन्याची इच्छा आहे हे वाचुन आणंद झाला :)
------
छोटा डॉन
18 Dec 2008 - 5:52 pm | वेताळ
=)) =)) =)) :P <:P >:)
आतासाठी एवढेच पुरे :)) :)) :))
बाकी स्माईली सोनम कडुन घ्याव्या म्हनतोय.
वेताळ
18 Dec 2008 - 6:13 pm | टारझन
मित्रा ................. तोडलंस ... फोडलंस ... झकास !!
आग्गाग्गाग्गा !! =)) =)) =))
- टार्याडॉण
18 Dec 2008 - 6:53 pm | ऍडीजोशी (not verified)
- टार्याडॉण
ऐवजी टॉण कसं वाटतं?
18 Dec 2008 - 7:20 pm | टारझन
ऐडी जौषी साहेब !! आपली कळकळ कळाली !! पण ते वृत्तात मार खातंय ना
छोटा डॉण (७ मात्रा) चं विडंबण करताना मात्रा लक्षात घ्या, सहि विडंबण हे मात्रा वृत्त आहे !!
म्हणून टारडॉण किंवा टॉण न करता टार्या डॉण चपलख आहे
(वृत्ताकार रॉकिपंत) टारपंत
18 Dec 2008 - 6:21 pm | सखाराम_गटणे™
वाह वाह, छानच आहे,
आवडले
पुले शु
----
सखाराम गटणे
18 Dec 2008 - 6:26 pm | शितल
डॉन्या,
डोक्यावरील केसांना तेल लावल्यावर बुध्दी एवढी नॉनस्टॉप जाते माहित नव्हते. (ह.घे.) ;)
हे राहिलेच की,
समज कोणी नुसते
विषय दिलेला नाही असे विषयात म्हटले आणी प्रतिक्रीया फक्त
:)
अशी असेल
तर कधी
विषय -:)
प्रतिसाद दिलेला नाही,
तर कधी
विषय आणि प्रतिसाद - :) असे असेल
तर कधी
विषय आणी प्रतिसाद दोन्ही दिलेले नाहीत अशी प्ततिक्रीया असेल तर
ह्या मार्गदर्शन करावे, मोठ्या प्रतिसादाचे सम्राट. :)
18 Dec 2008 - 6:42 pm | लिखाळ
त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ?
हा हा हा.. एक्दम जोरात.
ट्युलिप्सचा मोरांब्यापेक्षा आम्हाला आमच्या परसातल्या आंब्याचा मुरांबा फार आवडतो. बाय द वे आम्हाला ट्युलिपवरुन आमच्या परसातल्या मोगरीच्या फुलांची आठवण झाली अंमळ हळवा झालो.
--(अ?? (निवासी)भारतीय) लिखाळ.
त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... "
बिपिन यांची भयकथा वाचल्यापासून आम्ही विहिरीत डोकावत नाही.
--(स्पष्टवक्ता) लिखाळ.
18 Dec 2008 - 7:04 pm | कुंदन
पण कैर्या तोडायला नक्की या बर का....
19 Dec 2008 - 12:18 am | इनोबा म्हणे
त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ?
'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल?
-इंटरनैशनल इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
19 Dec 2008 - 9:37 am | छोटा डॉन
>>'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल ?
=)) =))
इनु यु टु ????
क्लासच ... अप्रतिम ..!
"त्या" आठवणीने डोळ्यात पाणी आले शेठ, धन्यवाद आठवणी जागवल्याबद्दल ;)
------
( हलकट ) छोटा डॉन
20 Dec 2008 - 11:52 am | विजुभाऊ
"त्या" आठवणीने डोळ्यात पाणी आले शेठ, धन्यवाद आठवणी जागवल्याबद्दल
डोळ्यात पाणी येउ द्यावयाचे नसेल तर एरन्डेल वापरा. ( आमच्या शेजारांच्या अनुभवावरुन)
अवांतर : ( डोळ्यात तेल घालून पहारा करणे हा वाक्प्रचार नक्की कशावरुन आला असेल)
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
20 Dec 2008 - 11:56 am | आनंदयात्री
>>डोळ्यात पाणी येउ द्यावयाचे नसेल तर एरन्डेल वापरा. ( आमच्या शेजारांच्या अनुभवावरुन)
चामायला शेजार्यांशी काय काय शेअर करता ??
22 Dec 2008 - 9:39 pm | शितल
>>चामायला शेजार्यांशी काय काय शेअर करता ??
=))
=))
19 Dec 2008 - 8:15 pm | लिखाळ
>> 'त्या पोफळीच्या बागेत, जिथे तुम्ही सहकुटूंब फोटो काढला आहे तिथे मी चार वर्षापुर्वी तांब्या घेऊन बसलो होतो.' हे कसे वाटेल? <<
हा हा हा ... :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
18 Dec 2008 - 6:42 pm | विसुनाना
व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो.शेवट जरा मतकर्यांसारखा केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला.जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो.जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ...शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ? तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले.
19 Dec 2008 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विसुनाना,
शेवट जरा मतकर्यांसारखा केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे
हे वाक्य समजल्यासारखं वाटतंय. पण...
जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो.जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता
हे नीटसं समजलं नाही. जरा विस्ताराने सांगाल का? (म्हणजे मी वाचल्याचे कष्ट घेतले असा खोटा अभिनिवेष आणणार नाही, पण तरीही!)
(झालंच तर डान्यासारखा एक प्रतिसाद टर्न्ड लेख लिहाच!) ;-)
18 Dec 2008 - 7:25 pm | अवलिया
मी सर्व भाग पूर्ण झाल्यावरच मग एका बैठकीत सर्व वाचत असतो. त्यामुळे तुमचे जोवर क्रमश: चालले आहे, तोवर मला त्यात खरडवहीत लिंक देऊन गुंतवू नका.
धन्यवाद.
(रामदास, हेच सांगणे तुम्हालाही. जेव्हा समाप्त लिहाल, तेव्हाच मी वाचीन. पी सी जेसी त्यामुळेच अजून वाचलेले नाही, आणि रोशनी न वाचताच "वा वा" म्हटलेले आहे, हे स्पष्ट आहे.)
:)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
19 Dec 2008 - 1:14 am | भास्कर केन्डे
डॉन भाऊ,
तुमच्याकडे शिकवणी लावावी अशी इच्छा झाली. अर्थात मार्गदर्शनात्मक लेख आवडला.... (स्वगत - छे, काहीही लिहायचे ठरवले तरी त्याची पार चिरफाड केलेली आहे. भावना कशा पोचवू बाबा याला? :S )
असो. जे आहे ते खल्लास लिहिले आहे.
आपला,
(पंखा) भास्कर
ता.क. - आम्ही तुमच्या बडी लिस्ट मध्ये नाही वा स्नेह्यांमध्येही नाही तरी पण लेख मनापासून आवडला आहे म्हणून केवळ हा प्रतिसाद.
19 Dec 2008 - 1:41 am | चतुरंग
जनातलं नसलं तरी मनातलं तुला सांगायला हरकत नसावी की इथला हैदोस कमी होण्यासाठी तुला आफ्रिकेला लवकरात लवकर पाठवून द्यावे असा काथ्याकूट तुझ्या हापिसात सुरु झाला आहे! ही बातमी मुक्तक किंवा विडंबन नसून साक्षात भयकथा आहे ह्याची जाणीव असूदे. तुला आगामी थरकापाची जाणीव करुन देणारे हे सूचक लेखन अजिबात क्रिप्टिक नाही हेही लक्षात ठेव.
आफ्रिकेच्या दौर्यावरुन आलास की तू लगेच कविता करायला लागशील असा तुला आशीर्वाद आणि लगेहात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा!! ;)
चतुरंग
19 Dec 2008 - 2:19 am | टारझन
पण ते भयकथेतलं भुत आता काही दिवस तिकडंच भारतात चाल्लय !!!
वार्ड क्र.४२० चे धडाडीचे, उमदे, तरूण , जागतिक किर्तीचे समाजसेवी णेतृत्व मा.श्री चतुरंगजी रावजी यांस मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! जिवेत सहस्त्र शरदम् !!!
ढोलताशे : ढँणण्ण्ण ढँण्ण्ण्ण ढॅंण्ण्ण्ण .. धत्ताड तत्ताड तत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड तत्ताड
शुभेच्छूक
पै.कुबड्या खविस
अध्यक्ष,टारझन मित्र मंडळ,
अफ्रिका, रजि.नं. महा१२/४२०/१२३४४५
(शुभेच्छूक : पै.धमु, पै.इन्या, पै.डॉण, पै.आंद्या, पै.कुंद्या,पै.प्रभु., पै.बिप्स्, पै.सुर्य्, पै.णाणा,पै.लिखाळ.,पै.वरद्या,आणि बाकी रेवड्यांवर कुस्त्या करणारे पै लोक्स )
19 Dec 2008 - 1:37 pm | विनायक प्रभू
टारझन मित्र मंडळात वयाचा भेदभाव न बाळगता माझे नाव पाहुन जीव भरुन आला आणि लगेच उतु गेला.
19 Dec 2008 - 9:36 am | यशोधरा
डान्या, हापिसात काय काम नै वाट्ट सद्ध्या! :)
19 Dec 2008 - 9:42 am | अप्पासाहेब
ह्याच पध्दतीचा (का जशाच तसा) लेख कुठ्तरी वाचल्याचे आठ्वतय बॉ....
(सत्राशे साठ संकेत स्थळे धुंडाळणारा शि.आय. डि.) आप्पा
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
19 Dec 2008 - 9:44 am | छोटा डॉन
तसे असल्यास कॄपया लिंक द्यावी.
हे लेखन अगदीच नवे आहे असा माझा दावा नाहीच पण तरीही "जशाच तसा लेख" आढळल्यास व मी त्याची कॉपी केली हे सिद्ध झाल्यास मी हा लेखच काय पण माझे मिपावरचे अकाउंट डिलीट करुन निघुन जाईन हिमालयात.
असो.
------
( स्पष्टावक्ता )छोटा डॉन
19 Dec 2008 - 9:51 am | अवलिया
निघुन जाईन हिमालयात.
नको तिथे बरीच कार्टी आधीच गेली आहेत. तुम्ही सह्याद्री किंवा सातपुडा या भागात या. हवी ती मदत करण्यास तयार आहे.
फक्त येतांना स्टॉक जास्तीचा आणा. सध्या थंडी जास्त आहे.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
19 Dec 2008 - 10:02 am | इनोबा म्हणे
त्यापेक्षा पर्वतीवर यावे अशी मी डानरावांना इनंती करतो. स्टॉकची काळजी आम्ही घेऊ.
(स्टॉकीस्ट) -इन्यालाडू
पान खाउन कुठेही पचकन थुंकणे ही आमची वैयक्तीक बाब आहे आणि त्याचे कुणालाही स्पष्टीकरण देण्यास आम्ही बांधील नाही.
-हूकूमावरुन
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
19 Dec 2008 - 10:15 am | यशोधरा
डान्या, हिमालय, सह्याद्री -सातपुडा, पर्वती कुठेही जा, ज्यांना हवा त्यांच्यासाठी ष्टाक पण घेऊन जा, पण आधी चाकलिटा दे जर्मनीवरुन आणलेली आणि मग उलथ कुठे तो! :P
19 Dec 2008 - 11:07 am | धमाल मुलगा
लेख फक्कड जमलाय..
शुध्दलेखनाच्या चुका सहज टाळता येण्याजोग्या आहेत. कृपया तिकडे थोडे लक्ष द्या.
बाकी, तुम्हावर सरस्वती देवी प्रसन्न आहेत हे ह्या छोट्याश्या लेखातून जाणवतं आहेच!
परंतु......
एकुणच पाहता, लेखाच्या माध्यमातून व्यक्तींवर, त्यांच्या सवयींवर आडून आडून शिखंडी वार करणे योग्य वाटत नाही.
असो,
ज्याची त्याची मर्जी!
-(खवचट) ध मा ल.
अवांतरः काय डान्या, कसा वाटला प्रतिसाद्द? हाय कं नाय येकदम हायकल्लास ;)
येड्या, तुला काय वाटलं तू एकटाच प्रतिसादांचे अभ्यास करतोयस होय? :P
20 Dec 2008 - 11:58 am | विजुभाऊ
एखाद्याला असे आडवळणाने शिखन्डी का म्हणता? ( हा घ्या)
वैयक्तीक आवडी सार्वजनीक केल्या; की सर्व जण तुम्हाला वैयक्तीक त्रास देतात)
19 Dec 2008 - 12:04 pm | अनिल हटेला
>>>लेखाच्या माध्यमातून व्यक्तींवर, त्यांच्या सवयींवर आडून आडून शिखंडी वार करणे योग्य वाटत नाही.=)) =))
सही रे धम्या.......
डॉनराव ...फूल फॉर्मात आहे सध्या......=D>
आंदे और भी......
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Dec 2008 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार
बर्याच दिवसांनी एक अभ्यासपुर्ण व स्वानुभवावर आधारीत धगधगते लिखाण वाचण्यास मिळाले , त्याबद्दल आभार. उगाच मुळमुळीत आणी गुळमुळीत लिहिणार्यांच्या गर्दीत आपणा सारखा एखादा स्वता:ची वेगळी वाट निवडतो तेंव्हा एक मराठी वाचक म्हणुन अभिमानाने ह्रुदय भरुन येते, भावना उचंबळुन चंबळेच्या नदिप्रमाणे व्हायला लागतात ! आ हा हा आज तुमच्या शब्दवर्षावात एखाद्या पावसाच्या जोरदार सरीत कुत्र्याच्या छत्रीने भिजावे तसे चिंब भिजलो. भावनांच्या कोंडमार्यास आपण ज्या पद्धतीने एक मोकळी वाट करुन दिली आहे ती पाहता , मराठीस आता व.पु. किंवा रणजितांची उणिव नक्किच जाणवणार नाही. आपली लिखाण शैली व एकुणच विषयाची मांडणी बघता मराठी लेखनाचा अश्व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचण्यास काहिच हरकत नाही असे वाटते. साहित्य संघातील काहि जाणत्या वाचकांशी आपल्या लिखाणाबद्दल चर्चा केली असती, विचारांचे अनेक प्रवाह समोर आले पण एकुणच सर्वांचा सुर हा आपल्याला अनुकुल असा दिसला. आपण दिलेले दाखले हे आपले ऐतीहासिक ज्ञान व अभ्यास ह्याचा एक चालता बोलता शब्दकोष ठरेल. बुद्धिभेद करणारे आपले हे एखाद्या नुकत्याच धार केलेल्या समशेरी सारखे लि़खाण मनावर आणी आमच्या बुद्धीवर खोलवर आघात करुन गेले हे निश्चीत ! आता ह्या भळभळ वाहणार्या जखमा घेउन आपला निरोप घेतो.
जखमी राजकुमार
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
19 Dec 2008 - 12:59 pm | धमाल मुलगा
=))
कुठून आलास बाबा येव्हढं सगळं वाचून? ;)
विद्रोही साहित्य संमेलन का?
19 Dec 2008 - 2:06 pm | मैत्र
जखमी राजकुमारा... असं विद्रोही संमेलनात गेलं की कुठे तरी बाण हे लागायचेच :)
एक नंबर लिहिलंय ... =))
19 Dec 2008 - 1:25 pm | छोटा डॉन
च्यामारी काय लिव्हलयं, काय लिव्हलयं !!!
सलाम बॉस ...!
अवांतर : च्यायला असली स्तुती ऐकायची आमाला सवय नाय हो, त्यापेक्षा "डॉन्या फोकलीच्या जोड्याने मारले पाहिजे तुला, आता येच पुण्यात पायच मोडतो तुझा एवढी सगळ्यांची खेचल्याबद्दल " असे लिहले असते तर जरा ओळखीचे ( म्हणजे धमालरावांच्या भाषेसारखे ) वाटले असते. असो.
------
छोटा डॉन
19 Dec 2008 - 12:49 pm | अनिल हटेला
जखमी राजकुमार
तु सुद्धा तोडलस मित्रा.....जिंकलस.....हरवललंस.....
तुझे लिखाण वाचुन ह्रदय भडभडून ,उचंबळून ,गलबलून (इ.इ.) आले....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Dec 2008 - 3:10 pm | पुणेरी मिसळ्पाव
३. जनातलं - मनातलं : जर तुम्ही सुक्ष्मात जाऊन निरीक्षण केलेत तर तुम्हाला मिपावरच्या दर ३ लेखामागे १ लेख हा "जनातलं मनातलं " ह्या सदरात आल्याचे दिसेल, थोडक्यात हा भाग महत्वाचा. बर्याच वेळा आपला लेख नक्की "काथ्याकुट / कविता / आणखी काही " ह्या पैकी कशात मोडतो हे ( वेळीच ) लक्षात न आल्याने बरेच लोक तो थम्ब रुलप्रमाणे "जनातलं मनातलं" ह्य सदरात बिनधास्त टाकुन देतात. असो.
ह्यावर कसे प्रतिसाद द्यावेत ह्याचेसुद्धा मी थोडे वर्गीकरण केले आहे.
जर लेखन "कथा" ह्या वर्गात मोडत असेल तर प्रतिसाद देण्याच्या व्याख्या थोड्या भिन्न आहेत. पहिल्यांदा ( जमल्यास ) कथा वाचुन ती नक्की कसली आहे ह्याचा निर्णय करावा. म्हणजे ती भयकथा आहे की सिरीअस आहे की विनोदी आहे की विडंबन करुन कुणाच्या टोप्या उडवणारी आहे ह्याचा निर्णय करुन घ्यावा. नाहीतर काय होते एखादी "भयकथा" असते आणि त्याला तुम्ही चुकुनच " व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो " असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो. तर काळजी महत्वाची हे लक्षात आलेच असेल.
जर कथा ही विनोदी असेल तर तुमचे काम सोपे होते, फक्त " अशक्य , ठ्ठ्या ऽऽऽऽऽ , फु ट लो , आग्गायायाया ऽऽऽ , कळफलकावर + मॉनीटरवर वर कॉफी सांडली , खुर्चीवरुन पडलो , हसुन हसुन मेलो " अशी ५-६ आतिशयोक्तीपुर्ण वाक्ये जवळ बाळगावीत. पण फक्त एवढेच लिहुन प्रतिसाद पुर्ण होत नाही, त्या लेखातीलच २-४ वाक्ये निवडुन ती आहे तशी आपल्या प्रतिक्रीयेत टाकुन त्याखाली वरील तुकडे वापरल्यास प्रतिसादाला "वजन येते" असा अनुभव आहे. सम्जा जर वाक्ये सुचली नाहीत तरीही काळजी नाही, नुसत्या " " अशा स्मायली टाकल्या तरी काम भागते. ह्यातलेसुद्धा काहीही करायचा कंटाळा आला असेल तर एखादी भलीमोठ्ठी प्रतिक्रीया निवडावी ( ह्या देणार्यांची संख्या मोप आहे, फिकर नॉट ) आणि त्यालाच "असेच म्हणतो , +१ " असा प्रतिसाद टाकुन मोकळे व्हावे ( मात्र ह्याला आम्ही कर्मदरिद्रीपणा म्हणतो. असो. )
जर लेखक एखादा "मिपावरील थोर व्यक्ती " असे तर मात्र " व्वा , भाईकाकांची आठवण आली ( पुलं म्हणणे म्हणजे घोर पाप बरे का. ) , चिंवी जोश्यांची शैली वाटते , हा प्रकार तुम्हाला चांगला जमतो " वगैरे लिहावे लागते, नाहीतर तुमच्या प्रतीक्रीयेला काडीइतकी किंमत नाही, तुम्ही नाही लिहले तर अजुन दुसरे कोणीतरी लिहतेच व लोक त्याला "सहमत आहे" असा उपप्रतिसाद देत राहतात, म्हणुन "स्टाईकर्स ऍडव्हान्टेज " कधीही सोडु नये ...
जेवढा मोठ्ठा प्रतिसद तेवढे तुम्ही जास्त फेमस हे लक्षात आले मग पुढे काही अवघड नाही.
जर कथा ही भयकथा "कॅटेगिरी" तली असेल तर मामला जरासा कठीण आहे, ह्यांना प्रतिक्रीया देण्यासाठी अभ्यास लागतो. नुसत्या " भयानक, दरदरुन घाम सुटला , सरसरौन काटा आला अंगावर , कच्चकन दचकलो " ह्या अगदीच सर्वसामान्य प्रतिक्रीया झाल्या. जर आपली छाप जमवायची असेल तर उगाच आपलं लेखकाची एखाद्या "प्रसिद्ध भयकथा लेखकाशी " तुलना करणे आवश्यक ठरते.
उदा : शेवट जरा मतकर्यांसारखा (उल्लेख असाच करावा, जर तुम्ही "रत्नाकर मतकरी यांच्यासारखा" असे लिहलेले तर तुम्ही नवशिके आहात हे मिपावरचे पोरटे सुद्धा ओळखेल ) केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला.
किंवा
अगदी तंतोतंत धारपच, मला वाटतं त्यांची "अखेरचा प्रमाद ( म्हणजे काय कुणास ठाऊक ? ) " ही कथा ह्याच अंगाने जाते.
किंवा
ते त्या "मुडदे की जान खतरे मे है / सुखी नदीं मे बहती हुई लाश" मधल्या कथानकासारखे वाटते नाही ?
असे प्रतिसाद टाकणे आवश्यक बनते, म्हणाजे काय होते की लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढुन तो आपला सुमडीत "हॅहॅहॅ, कसेच कसे. त्यात शेवटी माणुस मरुन भुत होत नाही तर भुताला उ:शाप मिळुन त्याचा माणुस होतो व ते दोघे लग्न करतात " असे स्पष्तीकरण देत बसतो, तुम्ही आपलं " हम्म, पण शैली तशी वाटली बॉ,असो." असा ठेका सोडु नका ...
हे एकदा जमले की झालेच ...!
तिसरा प्रकार आहे तो म्हणजे "मुक्तक अथवा सिरीअस लिखाण " करणार्याचा ...
महत्वाची सुचना : वर दिलेल्या "शँपल प्रतिक्रीया / सल्ला " ह्याचा वापर इथे अजिबात करु नये. ह्याचा साज पुर्ण वेगळा आहे.
नेहमीप्रमाणे ( जमल्यास ) पुर्ण कथा वाचुन काढावी, शक्यतो हा प्रकार "मान्यवर व जाणाकार" व्यक्तीच हाताळत असल्याने ह्यांच्या लेखाला वजन असते, उगाच फालतु प्रतिक्रीया इथे टाकल्यास तुमच्यावर "बदनाम मिपाकर" व्हायची दुर्दशा येऊ शकते.
सर्वसाधारण अशा लेखाला " सलाम ..! , केवळ अ प्र ति म , खल्लास वगैरे वगैरे " टारुने सांगितलेल्या प्रतिक्रीया प्राथमीक अवस्थीत टाकता येतील. पण आता तुम्ही जम बसवायचे ठरवल्याने तुम्हाला हे अलाऊड नाही.
आता तुम्ही थोडाश्या कलात्मक, नाजुक व साहित्यीक प्रतिक्रीया टाकाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणजे बघा की " जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो " अशा व तत्सम प्रतिक्रीया टाकणे आवश्यक ठरते. जेवढे जास्त "अनाकलनीय" लिहताल तेवढेच जास्त वजन पडते. साध्या सरळ प्रतिक्रीयेला जास्त भाव मिळत नाही. असो.
अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळेला लेखकाचे " अप्रतिम बॉस , आत्तापर्यंत लेखणी का म्यान केली होतीत ? / रुद्ध प्रतिभा भरभरुन वाहु देत / अबक हे मिपावरचे मोठ्ठे फाउंड आहे असे मी आधीच म्हणलो होतो / तुमचे नाव वाचले आणि लेख वाचायला घेतल, नेहमीप्रमाणे निराशा झाली नाही. " वगैरे वगैरे प्रतिक्रीया टाकाव्यात, ह्याला समर्थन तर मिलतेच शिवाय तुम्ही लेख्काच्या "बडी लिस्ट" मध्ये जायला मोकळे होता.
शेवटचा "अनकॅटेगराईझ्ड प्रकार " म्हणजे उगाच आपले काहीही लिहणार्यांचा, ते आपले उगाच " पुण्यात गादी कुठे मिळेल ? पंखा कुठे दुरुस्त करायचा ? सगळ्यात भारी शेवपापडी /अनारसे कुठे मिळतात ? संघाने चालवलेला गांधीवाद . सलमानने कत्रिनाला काय म्हटले " अशा विषयांवर काहीबाही खरडतो तो, ह्याला विषयांचे बंधन नाही, तुम्ही काहीही लिहु शकता.
ह्याला जास्त भाव मिळत नसल्याने "तुम्ही ह्याकडे ढुंकुनही न पहाणे योग्य" ठरेल. तिकडे फिरकुच नका.
उलट आपल्यासारख्याच एखाद्या पप्रथितयश प्रतिसादकर्त्याचा खरडवहीत "काय फालतुपणा चालला आहे, अक्षरशः उबग आला आता , आयला गिरणी लावल्यासारखे लेख पाडतात " अशा पिंका टाकुन द्याव्यात, आपली चर्चा मस्त रंगते व "भोचकपणे आपल्या खव वाचणार्यांना" आपण फार "अभिरुचीसंपन्न, चोखंदळ, साहित्याचे खरे वारसदार, गुणग्राहक " वगैरे असल्याचा उगाच गैरसमज होतो व आपली "इज्जत वाढते" , मग हा "गैरसमज" हळुहळु पसरवायला हीच मंडळी मदत करतात. मधुन आधुन त्यांच्याही खरडवह्यात "काय मग, काय नवे लिखाण ? " असे लिहुन यावे त्यावर रिप्लाय म्हणुन " बस का मालक, चेष्टा करता का गरिबाची ? आम्ही कसले लिहणार , आम्ही तर तुमचे फॅन. बोला कधी लिहताय ? " अशी खरड आलीच म्हणुन समजा. त्यावर उत्तर म्हनुन फक्त " लवकरच, सध्या थोडा बिसी आहे, मनासारखे लिहायला निवांत वेळ पाहिजे हो " असे ठोकुन द्यावे. म्हणजे पुढ्च्या वेळी तुम्ही काहीही लिहले तरी "ह्यांचा तुमची तोंड फाटुस्तोवर स्तुती" करणारा प्रतिसाद नक्की ...
असो.
४. कलादालन :
हा एक नवा प्रकार मिपावरच प्रथम अस्तित्वात आला आहे, अजुन नाविन्य असल्याने तुम्हाला हात चालवायला बर्याच संधी आहेत. पण इथे मात्र फक्त फोटाँवर प्रतिक्रीया द्यायची असल्याने फाफटपसारा चालत नाही, मुद्द्याचे बोलावे लागते. आता हे कसे जमवावे ते सांगतो.
नेहमीप्रमाणे टारुबाबाने सांगितल्याप्रमाणे "फो टू के व ळ अ प्र ति म , ४ नंबरचा फोटू झकास आला आहे , डोळ्यचे पारणे फिटले, डेस्कटॉपवर लावला आहे, मस्तच " ह्यासारख्या प्रतिक्रीया टाकुन ठेवाव्यात.
आता महत्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रतीक्रियेच्या खालीच लगेच "अवांतर " ह्या सदराखाली आपला मोठ्ठेपणा, शहाणपणा , गर्व दाखवणार्या कमेंट्स द्याव्यात.
जसे की "सेटिंग काय लावले हो ? नाही , जराशे दुसर वाट्तात फोटो, आय एस ओ ४००० वापरले असते तर अजुन ब्राईट आले असते. असो.
लेन्स कुठली हो ? फोकस कसा मारलात ? जरा अजुन क्लोजअप हवा होता असे वाटते.
जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ...
शटर स्पीड थोडे जास्त झाले असे वाटते, एवढ्या प्रकाशाला थोडे कमीच वापरा पुढ्च्या वेळी ..."
ह्या प्रतिक्रीया ठोकल्या की तुम्ही म्हणजे अगदी जगप्रसिद्ध फोटोग्राफरचा आव आणायला रिकामे. लोक सुद्धा ह्यावर मनोसोक्त भांडतात. बिचारा लेखक सुद्धा आपल्याला "टेक्नीकल डिटेल्स्ची" काडीइतकी माहिती न्सल्याचे मान्य करतो व तुम्हाला सांगायची विनंती करतो. तुम्ही मात्र " हम्म, सांगायला हरकत नाही तसे, पण सध्या एवढा मोठ्ठा लेख लिहायला वेळ नाही, बघतो सवडीने " असे ठोकुन द्यावे. लोक वाट बघत बसतात पण कुणी विचारायची हिंमत करत नाही. थोडक्यात तुम्ही जिंकलात स्पष्टपणे ....
अजुन एक प्रकार म्हणजे "फोटोम्च्या स्थानावर / लोकेशन वर कमेंट्स" द्यायच्या ...
उदा " का हो तिथल्या डाळिंबच्या बागा अजुन तशाच आहेत का ?
आम्हाला आमच्या ट्रीपची आठवण झाली, तुम्ही ज्या दगडाचा फोटो दिलात त्यावरुन पडुन माझा कपाळमोक्ष होता होता वाचला होता.
आयला, डोंगर अजुन तशेच्या तसेच, मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे.
त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ?
तुम्ही नशिबवान खरे, आम्ही गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा तेथे चक्क बर्फ होता, मग आमच्या हीने / ह्यांनी त्यावरुन स्कीईंग करता करता पाय मोडुन घेतला होता. असो.
त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... "
असे जर तुम्ही बोललात तर लोक तुमच्याकडे "काय दर्दी माणुस आहे ?" ह्या नजरेने पाहतील. शिवाय तुम्ही गेलाबाजार निम्मे तरी जग हिंड्ला आहात हे १० लोकात सिद्ध होते. शिवाय तुम्हाला ह्यांची फारच माहिती आहे असा "गैरसमज" भराभर पसरुन तुमचे नाव होते.
मग लोक तिकडे जाताना तुम्हाला विचारतात " शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ, तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले" ...
सहमत
19 Dec 2008 - 3:15 pm | धमाल मुलगा
आयला, जवळपास आख्खा लेखच उचलुन टाकलाय की प्रतिक्रीयेत!
=))
आमचा सादर प्रणाम हो तुम्हाला _/\_
लय भारी हो!
आता बोल डान्या, हाय का तुझी हिंमत ह्याच्यावर भाष्य करायची?
31 Dec 2008 - 4:46 pm | shweta
छोट डॉन .. तु खरा मोठ्ठा डॉन आहेस.
मिसळपाव वरचे बाकिचे लेख नुसते मुळमुळीत आणि "अति शहाणपणा " करणारे वाटतात.
तु तुझ्या लेखना ने त्या लेखकांना त्यांची जागा दाखवली आहेस. अभिनंदन.
31 Dec 2008 - 5:26 pm | limbutimbu
>>>> मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे.
अस लिहिलत की आजोबाच काय, तमाम मिपाकर तुम्हाला पणजोबा खापर पणजोबा समजायला/म्हणायला मोकळे!
मग नावामागे "छोटा" लावा की अजुन काय करा......! बरोबर की नाय "छोटा डॉन"? :D
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
14 Oct 2010 - 5:05 pm | सुहास..
आयला हा धागा कसा काय मिस झाला काय माहीत ? (हा घे नवीन स्टाईलचा धागे ऊकरतानाचा प्रतिसाद)
डॉन्या !!
20 Jan 2012 - 1:13 pm | मितभाषी
;)