ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

पुष्कर विजयकुमार जोशी's picture
पुष्कर विजयकुमा... in जनातलं, मनातलं
16 Mar 2015 - 3:12 pm

"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं.
दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता.

राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले.
पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए…
वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके…

एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ"
त्याचा फोन वाजतो.
"हं बोला सर"

इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.
"बारक्या, उद्यासाठी मैदा आणायला सांगितला होता तुला, आणला ना?"

"अहो पण असा काय करता आपलं ३००० रुपये स्क्क़ेअर फूट ठरला होता ना…"

"हा बे, आणलाय तुझा मैदा… "

"हो पण… आपलं ठरलं होतं ना … मग असं कसं तुम्ही … "

न दिखाओ चलते चलते यूँ कदम कदम पे शोंखी,
कोई क़त्ल हो रहा है, सर-ए-आम चुपके चुपके…

"अहो मला काही माहित नाही, हे बघा मी आता हे वरचे पैसे कुठून द्यायचे तुम्हाला… हलो? हलोssss?"

"बारक्या आज बाकी धंदा एकदम झकास झाला राव, अबे २००-३०० चा गल्ला जमला असेल आरामात!"

दुचाकीवाला माईल्ड पेटवतो…
राक्या निघायच्या तयारीत…

मागून एक भिकाऱ्यांचा घोळका येतोय…

कभी शोखियाँ दिखाना कभी उन का मुस्कुराना

त्यात एक ७-८ वर्षांची मुलगी…
माईल्ड ओढणाऱ्या दुचाकी वाल्या जवळ ती पैसे मागते, तो तिच्या कडे न बघताच नकारार्थी हात करतो…
तिला वाईट वाटत नाही, बहुदा तिचा आजचा कोटा पूर्ण झाला असावा…
भिकारीण पुढे जाते…

यह अदाएं कर न डाले मेरा काम चुपके चुपके!

दुचाकी वाला तिच्याकडे पाहतोय, थोड्या तिरसट पनेच.… पण तिला आपण काही दिले नाही याचा थोडा पश्चाताप जाणवतोय …
ती नेहमीच्या सहजतेने राक्या समोर हात धरते… राक्या हसून तिच्या हातावर मुद्दाम बाजूला काढून ठेवलेली जलेबीची पुडी ठेवतो…

भिकारीण निघते, थोडं पुढे चालणाऱ्या आपल्या मोठ्या भावाला जलेबीची पुडी देते… दोघे आनंदाने खातात…!

तिकडे सातासमुद्रपार काही अर्थतज्ञ "ग्लोबल ह्यापिनेस ईंडेक्स" बद्दल चर्चा करत असतात… !
इकडे नुसरत आपली चीज संपवतो,

"ये जो हिचकियाँ मुसलसल मुझे आ रही है आलम,
कोई ले रहा है शायद ...कोई ले रहा है शायद
मेरा नाम चुपके चुपके !!"

हे ठिकाणसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवमतप्रतिभा

प्रतिक्रिया

बाकी कथा आवडली, फक्त भिकारी मुलीला पैसे देण्याचे सोडून.

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

16 Mar 2015 - 7:23 pm | पुष्कर विजयकुमा...

धन्यवाद!!
तो तिल पैसे देत नाही कारण तो वैतगलेला आहे..आर्थिक पातलिवर वर असणारा तो सुखाच्या शिडीवर मात्र खाली आहे...असा काहीतरी दाखवायचा होता..:)

पिशी अबोली's picture

16 Mar 2015 - 3:40 pm | पिशी अबोली

आवडली.

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

16 Mar 2015 - 7:19 pm | पुष्कर विजयकुमा...

धन्यवाद!!

आनंद's picture

16 Mar 2015 - 3:53 pm | आनंद

मस्त!
संजोप राव साहेबांच्या एका लेखाची आठवण झाली.

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

16 Mar 2015 - 7:19 pm | पुष्कर विजयकुमा...

धन्यवाद!!

चांगलंय... डोळ्यासमोर घडतंय असं वाटलं!

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

16 Mar 2015 - 7:19 pm | पुष्कर विजयकुमा...

धन्यवाद!!

जे.पी.मॉर्गन's picture

16 Mar 2015 - 7:54 pm | जे.पी.मॉर्गन

आवडली.

जे.पी.

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

16 Mar 2015 - 8:58 pm | पुष्कर विजयकुमा...

धन्यवाद!!

नगरीनिरंजन's picture

16 Mar 2015 - 7:59 pm | नगरीनिरंजन

खूपच छान!

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

16 Mar 2015 - 8:59 pm | पुष्कर विजयकुमा...

धन्यवाद!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Mar 2015 - 8:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान.

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

16 Mar 2015 - 8:59 pm | पुष्कर विजयकुमा...

धन्यवाद!!

सभ्य माणुस's picture

17 Mar 2015 - 8:56 am | सभ्य माणुस

एकदम मस्त. खुप छान लिहिलय.

सस्नेह's picture

17 Mar 2015 - 10:44 am | सस्नेह

.....धन्यवाद !!!

पुष्कर विजयकुमार जी विसरले असे वाटले म्हणून धन्यवाद दिले आहेत.
धन्यवाद !

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2015 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा

=))
अ चूक जागी लागुन गोळी..
बंद झाले , सारखी उलटायचि पोळि! :-D

शाळेत असं बघितलं होतं. दंगा करणार्‍या मुलाचं म्हणून चक्क वडलांचंच नाव लिहायचं फळ्यावर!! मग सर आले की कळायचं अरे हे काय याचं आडनाव नाय!!

मुरली विजय तर पत्रकारांवर डाफरला होता. मुरली हे माझ्या वडलांचे नाव आहे. मला मुरली म्हणू नका...

मंजे मी फक्त सावध करतोय बरं का...!!

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

17 Mar 2015 - 1:05 pm | पुष्कर विजयकुमा...

हाहा!!
आम्ही लोक पण मित्रांमधे एकमेकांना पिताश्रींच्या नावाने हक मारायचो! तेव्हा याला अपमान समजायचे!
असाच एक किस्सा आठवला..एका मित्राच्या वडिलांना टिल्या म्हणायचे..म्हणून त्याचा पण नामकरण टिल्या असाच होता..ग्रूप मधे नवीन आलेल्या एकाने पपभिरू पणे त्याला फोन लावला..वडिलांनी फोन उचलला आणि याने विचारले टिल्या आहे का घरी! जूनियर टिल्याने चांगलीच सुजवली होती मित्राची!
असो, धन्यवाद आहेतच!

पुष्कर विजयकुमार जोशी's picture

17 Mar 2015 - 1:19 pm | पुष्कर विजयकुमा...

आमच्या वडिलांना ओळखता म्हणायचे तुम्ही!
लॉल्झ!

एकदा पुण्यात एका गृहास्टांना पत्ता विचारला होता..घाईत होतो म्हणून लगेच निघालो तर मागून आवाज आला, आमच्याकडे मदत केल्यावर धन्यवाद म्हणतात!
त्यामुळे तुमचे पण धन्यवाद!

धन्यवाद लोकांना द्यायचे असतात.
आभार लोकांचे मानायचे असतात.