मुक्तविहारींची भाषणभरारी

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
4 Mar 2014 - 3:58 pm

१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते.

डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. त्यांच्याकडे एक मोठे ग्रंथसंग्रहालय आहे असे ऐकले आहे. त्यामुळे वाचनाची आवड असलेल्या सदस्यांसाठी त्यांनी अशी स्पर्धा ठेवली यात नवल ते काय! पण विशेष म्हणजे सुमारे १२५ श्रोत्यांच्या समोर आयत्या वेळी तयारी करूनही छाप पाडणारे भाषण करून मुविंनी दुसरे बक्षीस पटकावले. या भाषणाचा विषय होता, "माझा आवडता दिवाळी अंक - मिपा दिवाळी अंक २०१३."

एकूण १२ स्पर्धक होते.त्यातील १० स्त्रिया तर २ पुरुष होते. पैकी १ पुरुष आलाच नाही. मग मुविंनी आयोजकांना विनंती करून त्यांचा नंबर सगळ्यात शेवटी ठेवला होता. शनिवारी १ तारखेला संध्याकाळी ५ वा. स्पर्धा सुरु झाली आणि पहिल्या घारापुरी कट्ट्यात बिज्जी राहिल्यामुळे मुवि स्पर्धेला संध्याकाळी साडे सहाला पोहोचले. २ स्पर्धकांनंतर त्यांचा नंबर लागला.

११ स्पर्धकांमधे मुवि हे एकटेच पुरुष स्पर्धक होते. यावरून सामाजिक कामात महिला आघाडीवर असतात इ. निष्कर्ष सहज काढता येतील. पण तो अजून एका धाग्याचा विषय ठरेल. त्यामुळे सध्या या स्पर्धेची आणि भाषणाची माहिती घेऊया.

१. प्रभा साळवेकर - साधना

२. जयंत फाटक - मिसळपाव (इ-दिवाळी अंक)

३. सुनिता सामंत - कालनिर्णय

उत्तेजनार्थ

४. अनुराधा आपटे - चार चौघी

अशी बक्षीसे मिळाली. कार्यक्रमाचे फटु मुविंकडून मिळवण्यात आले आहेत.

१) मुवि भाषण करताना.

pic1

२) मुवि सौ. बिवलकर यांच्याकडून बक्षीस घेताना

pic2

३) मुवि आभाराचे भाषण करताना (या फोटोत डाव्या बाजूला आहेत त्या मुविंच्या वाचनप्रिय उत्साही आई)

pic3

आता पाहूया, मुविंनी केलेले बक्षीसाचे भाषण.

-----------------------------------

माननीय अध्यक्ष महोदया , परीक्षक मंडळ आणि उपस्थित रसिक जनहो,

कुणीतरी म्हटलेच आहे की....

अक्षरांना नसते दु:ख आणि अक्षरांना नसते सुखही....ते वाहतात जी ओझी ते तुमचे आमचे अनुभव असतात. इथे हजर असलेल्या प्रत्येकालाच बरे-वाईट अनुभव आलेले आहेत. आपल्या प्रत्येकालाच वाटते. की आपले हे अनुभव, कुणाला तरी सांगावेत किंवा कुठल्या तरी मासिकात ते छापून यावेत आणि आपला लेख दिवाळी अंकात लेख छापून आला, तर त्या लेखकाला आनंद होतोच होतो.समजा आपल्याला एखादा चांगला लेख आपल्याला आवडला, तर त्या लेखकाला पत्र पण लिहावेसे वाटते. तसेच लेखकाला पण आपला लेख किती जणांनी वाचला आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. चांगल्या लेखावर झालेली खेळी-मेळीची चर्चा, लेखकाच्या लिखाणातील त्रुटी दूर करायला मदत करते. ज्याचा फायदा वाचकांनाच होतो. त्यांना अधिक सकस वाचायला मिळते. आणि ही अशीच खुले आम चर्चा होते ती एका इ-दिवाळी अंकावर, ज्याचे नांव आहे. "मिसळपाव.कॉम चा दिवाळी अंक"

साधारण १९९६ मध्ये मायबोली.कॉमच्या माध्यमातून मराठी माणसे एकत्र यायला लागली आणि मराठी माणसांच्या प्रथेप्रमाणे, ई-दिवाळी अंक पण निघू लागले. मायबोलीचाच आदर्श घेवून इतर पण काही मराठी वेबसाईट्स तयार झाल्या जसे उपक्रम्, मी-मराठी, ऐसी अक्षरे, मनोगत आणि एक तेज तर्रार लोकप्रिय साईट "मिसळ-पाव.कॉम". ह्या वर्षीचा "मिसळपाव.कॉमचा" दिवाळी अंक फारच बहारदार होता.

आपण प्रत्येकजण दिवाळी साजरी करतोच आणि सुट्ट्या मिळाल्या तर भटकंतीला पण जातो. ह्या वर्षी पण काही मिपाकर भटकंतीला गेले होते. पण कुठे तर "मंगळावर". त्याचे एक विनोदी प्रवासवर्णन "मुवि" ह्यांनी लिहीले आहे. अरे हो, ह्या साईटवर बरेच जण टोपण नावाने लिहीतात. तुम्हाला-आम्हाला जसा प्रवास करतांना काही अडचणी येतात. तशाच अडचणी ह्या मिपाकरांना पण आल्या. पण त्यांनी डगमगून न जाता,त्या अडचणी पार केल्या. थोडक्यात काय तर अडचणी आल्या तरी न घाबरता, प्रवास करा. असा मोलाचा संदेश विनोदी ढंगाने लेखक सांगून जातो.

दिवाळीत गोड नसेल तर दिवाळीची मज्जा काय्? आणि इथे अशाच अनेक सुंदर पाककृती वाचायला, पहायला मिळतात.

असे गोडाचे पदार्थ खाल्यावर दांत किडण्याचा संभव असतो. पण "अजया" ताईंनी लिहीलेल्या "दातांची काळजी कशी घ्यावी?" ह्या लेखाने आपण योग्य ती काळजी घेवू शकतो.

दिवाळी म्हटली की, थोडा फार खर्च हा होणारच. नेहेमीच्या तेल आणि साबणाच्या जागी उंची तेल-साबण हे येणारच. थोडा फार खर्च कपडे किंवा फराळ ह्यावर तर होतोच पण त्यातून फटाके पण सुटत नाहीत. कधी कधी वाटते, कशाला करायचा इतका खर्च? पण गवि नावाचे कवि हा खर्च करा असे सांगून, एक दिवस तरी स्वतःसाठी जगा, अशी त्याची कारणमीमांसा करतात.

प्रभाकर पेठकर नावाचे एक लेखक, बालपणीतल्या दिवाळीचे वर्णन करतात. किल्ले आणि आकाशकंदिला बरोबरच, न वाजलेले फाटके शोधण्याचे प्रसंग वर्णन करतात. आज काल फटाके उरतात, ही चैन नसून, तो पैशांचा माज आहे, असे परखड मत ते व्यक्त करतात. मज्जा करा पण अनावश्यक खर्च टाळा, हे त्यांनी योग्य शब्दांत सांगीतले आहे.

आणखीही कित्येक सुंदर लेख, कथा, पाककृती यांनी हा अंक सजलेला आहे.

आणि ह्या दिवाळी अंकातील, माझा सर्वात आवडता लेख म्हणजे, संपादकीय. ह्यात संपादकांनी इ-दिवाळी अंकाची खास वैशिष्टे सांगीतली आहेत.

१. तो हवा तेंव्हा वाचता येतो. वाचनालयात गेल्यावर "आवाज","जत्रा"."किस्त्रीम." नाही मिळाले तर आपला हिरमोड होतो. ह्या इ अंकांमुळे तो होत नाही.

२. कागद,शाई ह्या गोष्टींची गरज नसल्याने, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि साहजिकच प्रदूषण कमी होते.

३. जसा वेळ मिळेल तसा आणि कितीही वेळा, हे अंक वाचता येतात.

तुम्हाला पण कधी हा अंक वाचावासा वाटला तर आमच्या "मिसळपाव.कॉम" ह्या साइटला भेट द्या. हे अंक वाचण्यासाठी तुम्हाला सभासद व्हायची पण गरज नाही. अहो, प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते.

---------------------------------

हे ठिकाणसमाजजीवनमानप्रकटनविचारशुभेच्छाअभिनंदनबातमीमाहिती

प्रतिक्रिया

जेपी's picture

4 Mar 2014 - 4:04 pm | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

मुक्त विहारि's picture

4 Mar 2014 - 5:16 pm | मुक्त विहारि

कारण सगळे मिपाकर, शब्दरूपाने माझ्या बरोबरच होते.

(प्रत्येक कट्याला कुणी ना कुणी, गैरहजर असतेच, पण हा कट्टा मी समस्त मिपाकरांबरोबर साजरा केला.)

कवितानागेश's picture

4 Mar 2014 - 4:05 pm | कवितानागेश

प्रत्येक सुंदर गोष्ट विकत थोडीच घ्यावी लागते!!
किती छान. :)

मदनबाण's picture

4 Mar 2014 - 4:09 pm | मदनबाण

मुवि यांचे अभिनंदन ! :)

प्रचेतस's picture

4 Mar 2014 - 4:12 pm | प्रचेतस

अरे वा, मुविकाका.
हार्दिक अभिनंदन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Mar 2014 - 4:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त,

वृत्तांता बद्दल धन्यवाद पैसा ताई

मुविंचे मनापासुन अभिनंदन.

शिद's picture

4 Mar 2014 - 4:36 pm | शिद

+१०००...असेच म्हणतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2014 - 5:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

असेच म्हणतो !

मुवींचा अजून एक पैलू समजला !!

स्पंदना's picture

5 Mar 2014 - 2:56 am | स्पंदना

मला पण हेच म्हणायच होतं. (मेरे मुंह की बात छिन ली। :( )
पैलुदार मुवि.

आत्मशून्य's picture

4 Mar 2014 - 4:15 pm | आत्मशून्य

मुवींचे करावे तेव्हडे कौतुक कमीच वाटतयं.

दिव्यश्री's picture

4 Mar 2014 - 4:15 pm | दिव्यश्री

अभिनंदन काका ...

भारी भाषण आहे . *clapping* आता पार्टी . :)

सविता००१'s picture

4 Mar 2014 - 4:22 pm | सविता००१

काका, प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते हे वाक्य तर केवळ उच्च!

सूड's picture

4 Mar 2014 - 4:33 pm | सूड

अभिनंदन हो !!

श्रीवेद's picture

4 Mar 2014 - 4:34 pm | श्रीवेद

मुविंचे अभिनंदन!!

ऋषिकेश's picture

4 Mar 2014 - 4:37 pm | ऋषिकेश

बक्षीसाबद्दल अभिनंदन!

पण हे इतकेच भाषण होते? का हा सारांश आहे? का हे बक्षीस घेतानाचे भाषण आहे?

ऋषिकेश's picture

4 Mar 2014 - 4:38 pm | ऋषिकेश

सॉरी मी नीट वाचले नाही, हे भाषण बक्षीस समारंभाच्या वेळचे होते असे कळले.

मुळ भाषण वाचय्/ऐकायला मिळाले तर बहार येईल!

तुषार काळभोर's picture

4 Mar 2014 - 4:37 pm | तुषार काळभोर

प्रत्येक सुंदर गोष्ट विकत थोडीच घ्यावी लागते!!!!!!!!!!!!!!!

-(टाळ्या वाजवणारा) पैलवान.

धन्या's picture

4 Mar 2014 - 4:40 pm | धन्या

अभिनंदन हो मुवि !!!

सौंदाळा's picture

4 Mar 2014 - 4:44 pm | सौंदाळा

सुंदर भाषण मुवि.
अभिनंदन.
आयुष्य अगदी भरभरुन कसं जगायचं हे तुमच्याकडुन शिकावे.

शैलेन्द्र's picture

4 Mar 2014 - 4:47 pm | शैलेन्द्र

मुवी जोर्रात्त..

अभिनंदन..

पैसा ताईंनी लिहीले आहेच.

मी तेच म्हणलो.वेळ ४ ते ५ मिनीटे असल्याने, जास्त वेळ बोलू शकत न्हवतो.

आभाराचे भाषण करणारा मीच तेव्हढा होतो.इतर कुणीही केले नाही.

आभाराच्या भाषणाचा थोडक्यात गोषवारा देतो.

=======
मला बक्षीस दिल्याबद्दल आभार.पण खर तर हे बक्षीस माझे नाही.ही बक्षीस आहे मिसळपाव.कॉमचे.

आपल्या सारखीच सामान्य माणसे, सामान्य शब्दांत असामान्य अनुभव लिहीतात आणि त्यामुळेच ते मनाला भिडतात.

तुम्हाला पण असेच अनुभव आले असतील तर जरुर लिहा.

मिसळपाव आपलेच आहे.

आणि हो मी हे बक्षीस समस्त मिपाकरांतर्फे स्वीकारतो आणि त्यांनाच अर्पण करतो.

------

यासाठी पुनश्च अभिनंदन .

भाते's picture

4 Mar 2014 - 5:30 pm | भाते

पैसा ताईंनी धाग्यावर लिहिलेले तुमचे मुळ भाषण आणि आभारप्रदर्शनाचे भाषण, दोन्ही अप्रतिम.

पुन्हा एकदा अभिनंदन!

सुबोध खरे's picture

4 Mar 2014 - 6:50 pm | सुबोध खरे

+१०००००००.
उत्तम भाषण आणि मुविंचा नम्रपणा दोन्हीही आवडले. कट्ट्याला त्यांनी मोघम असे काहीतरी सांगितले आणि आम्ही नुसते अभिनंदन म्हणून सोडून दिले.

मधुरा देशपांडे's picture

4 Mar 2014 - 4:51 pm | मधुरा देशपांडे

भारी. अभिनंदन मुवि काका. भाषण आवडले.

अजया's picture

4 Mar 2014 - 4:54 pm | अजया

मुवि , अभिनंदन !

जोशी 'ले''s picture

4 Mar 2014 - 5:03 pm | जोशी 'ले'

अ भि नं द न !!!

अस्मी's picture

4 Mar 2014 - 5:05 pm | अस्मी

सह्ही...अभिनंदन!!!
प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते.>>> अप्रतिम.

नाखु's picture

4 Mar 2014 - 5:16 pm | नाखु

अभिनंदन..
मिपाचा "आवाज" दिवाळी अंकाच्या "जत्रे"मध्ये "धूमधमाल्"करून राहीला पण "भटकंती" मुविंनी त्याला "कट्ट्या" समवेत "चार चौघी" नव्हे तर "अक्षर"शःबारा स्पर्धकांचा "सामना" करून, भाषण "मोहिनी" ने मुविंनी दुसरे बक्षीस पटकावले यात "नवल" ते काय?
पुन्हा "अभिनंदन"

मुक्त विहारि's picture

4 Mar 2014 - 5:35 pm | मुक्त विहारि

जबरा.....

मस्तच लिहीले आहे....

स्पंदना's picture

5 Mar 2014 - 2:57 am | स्पंदना

मुजरा सरकार!

मूकवाचक's picture

4 Mar 2014 - 5:18 pm | मूकवाचक

हार्दिक अभिनंदन ...

प्रमोद देर्देकर's picture

4 Mar 2014 - 5:22 pm | प्रमोद देर्देकर

अरे वा मु.विं चा अजुन एक पैलु दिसला. आता तर अष्टपैलु मुवि, असेच म्हणायला हवे.

आणि पैताईला धन्स

हार्दिक अभिनंदन !

भाते's picture

4 Mar 2014 - 5:25 pm | भाते

अभिनंदन मुवि. आता लवकरच तुमच्या अभिनंदनाचा आणखी एक मध्यवर्ती डोंबिवली कट्टा येऊ द्या.

मुवि अभिनंदन कट्टा ,आपण करुया डोंबिवलीकर्स!

मुक्त विहारि's picture

4 Mar 2014 - 9:03 pm | मुक्त विहारि

एक मस्त कट्टा करू या...

अत्रुप्त आत्मा's picture

4 Mar 2014 - 9:45 pm | अत्रुप्त आत्मा

@कट्टा करू या... >>> कब??? *OK* कब है कट्टा????

नानबा's picture

5 Mar 2014 - 2:25 am | नानबा

@कट्टा करू या... >>> कब??? कब है कट्टा????

डोंबिवलीत रेग्युलर बेसीस वर कट्टे होत असतात. डोंबिवलीकर मिपाकर्स भारी अ‍ॅक्टीव्ह आहेत... मुविंनाच बघा की..

बादवे, अभिनंदन मुवि.... भारीच.... :)

किसन शिंदे's picture

4 Mar 2014 - 5:26 pm | किसन शिंदे

अभिनंदन मुवि!!!

गणपा's picture

4 Mar 2014 - 5:26 pm | गणपा

हाबिणंडण हो मुविकाका. :)

आदूबाळ's picture

4 Mar 2014 - 5:42 pm | आदूबाळ

है शाबास मुवि!

आतिवास's picture

4 Mar 2014 - 5:47 pm | आतिवास

अभिनंदन.
आता यानिमित्त कुठं आणि कधी कट्टा?
'भाषणं देणा-या मिपाकरांचा' कट्टा? :-)

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2014 - 5:51 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन!!

रेवती's picture

4 Mar 2014 - 6:00 pm | रेवती

अभिनंदन हो मुवि!

यसवायजी's picture

4 Mar 2014 - 7:00 pm | यसवायजी

कॉन्गो. :)

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2014 - 7:11 pm | श्रीरंग_जोशी

या स्पर्धेत बक्षिस मिळवल्याबद्दल अभिनंदन.
पण या निमित्ताने मिपा वाचनाची आवड असण्यार्‍या इतर अनेक जनांपर्यंत असल्याबद्दल अधिक अभिनंदन. कुणास ठाऊक यातुन नवे मिपाकरही सामील होतील.

भ ट क्या खे ड वा ला's picture

4 Mar 2014 - 7:26 pm | भ ट क्या खे ड वा ला

मला बक्षीस दिल्याबद्दल आभार.पण खर तर हे बक्षीस माझे नाही.ही बक्षीस आहे मिसळपाव.कॉमचे.
मु वि लय भारी

अत्रुप्त आत्मा's picture

4 Mar 2014 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/sport/won-the-trophy-smiley-emoticon.gif अभिनंदन!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-349.gif

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-party-smileys-474.gif

लीलाधर's picture

4 Mar 2014 - 7:47 pm | लीलाधर

अभिनंदन ओ मुवि लय भारी आम्हाला तुमचा अभिमान आहे जय हो मुविजी :)) ;)

पिंगू's picture

4 Mar 2014 - 7:49 pm | पिंगू

हार्दिक अभिनंदन..

विकास's picture

4 Mar 2014 - 7:49 pm | विकास

मुविंचे अभिनंदन! भाषणपण मस्तच आहे!

११ स्पर्धकांमधे मुवि हे एकटेच पुरुष स्पर्धक होते.

अहो पैसाताई स्पर्धा बोलण्याची होती! त्यामुळे निष्कर्ष वास्तवीक वेगळा निघतो असे वाटते! ;)

पैसा's picture

4 Mar 2014 - 8:32 pm | पैसा

कोणीतरी आणखी फाटे फोडणार हे माहित होतं, त्यामुळे वेगळ्या धाग्याचा विषय आहे म्हटलेलं. ;)

स्पंदना's picture

5 Mar 2014 - 2:59 am | स्पंदना

ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ! ह्यॅ!

विनोद१८'s picture

4 Mar 2014 - 8:01 pm | विनोद१८


.....अभिनंदन !!!....मुवि.

विनोद१८

आरोही's picture

4 Mar 2014 - 8:03 pm | आरोही

अभिनंदन मु वि काका ....+)

अभिनंदन मुवि!एइस बात पे एक कट्टा हो जाये और उस कट्टेमें येच भाषण म्हणके दिखाना. :)

भाते's picture

4 Mar 2014 - 8:15 pm | भाते

आतातरी मुक्त विहारि यांना मिपाचे अधिकृत कट्टा नियोजन अधिकारी म्हणुन घोषित करा ही मागणी.

सचिन कुलकर्णी's picture

4 Mar 2014 - 8:23 pm | सचिन कुलकर्णी

मन:पूर्वक अभिनंदन मुवि आणि वृतांत दिल्याबद्दल पैसातैंचे आभार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2014 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुवि अभिनंदन.....! आनंद वाटला.

अरे येऊन येणार कोण मुविशिवाय दुसरं कोण. :)

-दिलीप बिरुटे

मुविंचे हार्दिक हबिणंदण!!!!

टिवटिव's picture

4 Mar 2014 - 10:24 pm | टिवटिव

अभिनंदन मुवि !!!

पाषाणभेद's picture

4 Mar 2014 - 10:31 pm | पाषाणभेद

अभिनंदन.
लेखाचे शिर्षक वाचून भा. रा. भागवतांची कथा आहे की काय असे वाटले.

सर्वसाक्षी's picture

4 Mar 2014 - 10:43 pm | सर्वसाक्षी

मुवि,

आपले हार्दिक अभिनंदन आणि अपार कौतुक! आता एकदा भेटले पाहिजे:)

साक्षी

ज्यांच्या नावात विहार त्यांच्या वागण्यात ही संचार.. म्हणून ते घारापुरच्या लेण्यापहायला हजर होते व दुसऱ्या दिवशी मुक्तपणे डोंबिवलीच्या सभेत मिपाकरांच्या वतीने बक्षिसाचा सन्मान स्वीकार करायला तत्परतेने हजर होते!
मिपाकरांच्या तर्फे अभिनंदन...

मुक्त विहारि's picture

4 Mar 2014 - 11:53 pm | मुक्त विहारि

त्याच तारखेला, संध्याकाळी स्पर्धा होती.त्यासाठीच तर घारापुरी हून लवकर निघालो.

पैसा's picture

5 Mar 2014 - 12:35 am | पैसा

मी लिहिताना तारीख आणि वाराचा घोळ केला होता. आता दुरुस्त केलाय.

सुहास झेले's picture

4 Mar 2014 - 10:55 pm | सुहास झेले

जबरदस्त... मुविकाका तुमचे खूप खूप अभिनंदन :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Mar 2014 - 11:40 pm | निनाद मुक्काम प...

सर्व प्रथम मूवी ह्यांचे एक मिपाकर , डोंबिवलीकर ह्या नात्याने अभिनंदन करतो.
ब्राह्मण सभेच्या बाजूच्या वाड्यात आईचे बालपण गेले,
लग्न तेथेच झाले ,
माझी मुंज तेथेच लागली.
त्याच दिवशी माझ्या आईच्या आईने मला ब्राह्मण सभेच्या वाचनालायचे सभासदस्यत्व घेऊन दिले.
त्यांच्या अनेक उपक्रमात नेहमीच सक्रिय सहभाग माझ्या शालेय जीवनात असायचा,
मूवी त्याच परंपरेचे पाईक आहेत हे पाहून त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध अजूनच दृढ झाले आहेत,

मुवि हे खऱ्या अर्थाने मिपाचे Brand Ambassador आहेत.
मनापासून अभिनंदन

आयुर्हित's picture

5 Mar 2014 - 12:15 am | आयुर्हित

सर्व प्रथम अभिनंदन मुविंचे, मुविंना चांगल्या सवयी लावणाऱ्या त्यांच्या माऊलीचे, डोम्बीवलीच्या ब्राह्मण सभेचे.
लेख लिहिण्याबद्दल पैसाताईंचे व मिपाचेही चांगला इ दिवाळीअंक काढल्याबद्दल अभिनंदन !

स्पंदना's picture

5 Mar 2014 - 3:01 am | स्पंदना

मी विचार करत होते, हे मुवि "आईच्या मागे भुण भुण" कसे करत असतील?
म्हणजे आई साधारण वयस्कर वगैरे असतील.
तर काय? अगदी जास्त भुण भुण केली तर "रपाटे" सुद्धा घालु शकतील अश्या मुविंच्या आई पाहुन अतिशय आनंद झाला.
मुवि अभिनंदन!!

नंदन's picture

5 Mar 2014 - 4:40 am | नंदन

हार्दिक अभिनंदन, 'मूविं'ग स्पीच! :)

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ।
त्याचा तिन्ही लोकी झेंडा ।।

लावा झेंडा देशात
परदेशात मंगळावर ।

त्यादिवशी सहापर्यँत दिपक आणि मी मुविंबरोबर होतो
पण ताकास तूर लागू दिली नाही !

पण त्याचे काय झाले....

१. स्पर्धा ५ वा. सुरु होणार होती.ब्राह्मणसभेत बर्‍याच वेळा वेळेवर कार्यक्रम होतात.जास्तीत जास्त १० ते १५ मिनीटे उशीर होतो.

२. तसे १५ स्पर्धक होते, पण ऐनवेळी २/३ जण गळतात्,त्यामुळे ६ वाजे पर्यंत मला सभेच्या ठिकाणी पोहोचणे भाग होते.माझा नं> जरी शेवटचा होता तरी ६:१० पर्यंत तरी तिथे पोहोचणे भाग होते.आपण डोंबिवली स्टेशन वर पोहोचलोच मुळी त्या सुमारास.त्यामुळे मला बोलता येईल की नाही/ ह्याची खात्री न्हवती.

३. एखादी गोष्ट आपल्या हातात नसेल, तर जास्त बोभाटा न करता, ती गोष्ट साध्य करून, मग सांगीतलेले उत्तम.

४. ह्या अशा त्रिशंकू अवस्थेमुळे , मी त्या दिवशी, कुठल्याच मिपाकराला बोललो नाही.

तुम्हाला राग आला असेल, तर क्षमस्व.तुमचा किंचीत गैरसमज उद्याच दूर करण्यात येईल.

इरसाल's picture

5 Mar 2014 - 9:41 am | इरसाल

अभिनंदन.

पद्मश्री चित्रे's picture

5 Mar 2014 - 10:03 am | पद्मश्री चित्रे

मनःपूर्वक अभिनंदन

स्पा's picture

5 Mar 2014 - 10:07 am | स्पा

वाह मुविकाका

मनापासून अभिनंदन

टाईम मैनेजमेंट का काय ते यांच्याकडे शिका .

नित्य नुतन's picture

5 Mar 2014 - 11:31 am | नित्य नुतन

खुप खुप अभिनन्दन मुविजी ..
आणि ... मिपाकर असल्याचा अभिमान द्विगुणित झाला...

मृत्युन्जय's picture

5 Mar 2014 - 11:48 am | मृत्युन्जय

वाह. अभिनंदन. मुवि म्हणजे जयंत फाटक हे आजच कळाले :)

चिगो's picture

5 Mar 2014 - 1:35 pm | चिगो

मुवि दणक्यात.. अभिनंदन..

चित्रगुप्त's picture

5 Mar 2014 - 4:19 pm | चित्रगुप्त

एका वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून मिपाचे कौतुक आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयोग उत्तमच.

विटेकर's picture

5 Mar 2014 - 4:53 pm | विटेकर

मिपाचे पाऊल पडते पुढे !!

अनन्न्या's picture

5 Mar 2014 - 5:18 pm | अनन्न्या

*secret* तिसय्रा कट्ट्याचे रहस्य उलगडले!
*clapping* *BRAVO*

त्रिवेणी's picture

5 Mar 2014 - 9:51 pm | त्रिवेणी

मुवि काका
अभिनंद्न.

अमित खोजे's picture

6 Mar 2014 - 12:27 am | अमित खोजे

अहो, प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते.

आवडले! छानच