'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
19 Jan 2013 - 9:45 am

*******************************************************

धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..

सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये.

*******************************************************

शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही
बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना?
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा
'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला'
'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला'
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा
'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो.
बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

"आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी .
'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.

कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन??
तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.

भूछत्रीभयानकरौद्ररसधर्मकविताप्रेमकाव्यगझलव्याकरणव्युत्पत्तीसमाजजीवनमानऔषधोपचारमौजमजा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2013 - 9:50 pm | अत्रुप्त आत्मा

@सचिन आणि विमे ही लोकं पण भास आहेत.
हे असले प्रतिसाद खरडणारी पैसाताई आणि ते ढापणारा मी पण एक भासच आहे.>>> =)) चायला हा त्रासच आहे ;-) कि मला होणारा त्रास पण भास(च) आहे :-b

मोदक's picture

20 Jan 2013 - 10:07 pm | मोदक

शंका नंबर एक.
तुम्ही आत्मे पाहिलेत का?

(आत्मे पाहिले नसल्यास तुम्हाला भास / भ्रम होतात हे आमचे मत तुम्हाला मान्य करावेच्चच्च्च्च्च्च्च्च्च लागेल.)

शंका नंबर दोन.
जीवन म्हणजे काय? ("पाणी म्हणजे जीवन" वगैरे 'इयत्ता दुसरी तुकडी ब' छापाचे उत्तर देवू नये)

अवांतर - या धाग्याच्या सुरूवातीच्या प्रतिसादांमध्येही तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे - त्याचे उत्तर द्यावे.

अतिअवांतर - तुमचा प्रतिसाद निखालस आत्मकेंद्रीतता आणि आपपरभाव दर्शवितो. तुम्ही केलेल्या विडंबनांवर येणारे प्रतिसाद म्ह्णजे "चर्चा" आणि आम्ही केलेल्या विडंबनांवर येणारे प्रतिसाद म्हणजे "त्रास".

(अशिंरोधाव्हावामाजिपा संघाचा स्वघोषीत अध्यक्ष) मोदक.

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
तृप्ती हाच्च्च्च्च जीवनाचा मूलाधार आहे. (असे "मीं" म्हणतो!) :-D

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2013 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा

@तृप्ती हाच्च्च्च्च जीवनाचा मूलाधार आहे. (असे "मीं" म्हणतो!) smiley>>> =)) म्हणा...आमच्या बा चे काय जाते? :-p

@ तुमची स्वाक्षरी "मला" अतर्क्य वाटते.>>> ''तुंम्ही'' गेलात तेल लावत.... :-p

मोदक's picture

20 Jan 2013 - 11:02 pm | मोदक

रोखठोक उत्तरांबद्दल आभारी आहे.

तुमची ही उत्तरे मिपावरच बर्‍याच जणांना बर्‍याच ठिकाणी वापरायच्या मोहात पाडू शकतात - आत्ताच कॉपीराईट करून घ्या. :-D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Jan 2013 - 8:31 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कसचं कसचं (लाजल्याची स्मायली)

- - - - - पैसा, लीमाऊजेट आणि "माझ्याशी" वाद घालू इच्छिणार्‍या सर्वांसाठी - - - - -

फक्त स्वाक्षरीचा विषय संपला.

बाकी लै मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांमध्ये "माझेच मत" बरोबर असणार आहे.

(बाकी स्वतःच्या धाग्यावर स्वतःचेच लै लै प्रतिसाद टंकायची इच्छा आज पूर्ण झाली. :-D)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2013 - 9:57 pm | अत्रुप्त आत्मा

@स्वतःच्या धाग्यावर स्वतःचेच लै लै प्रतिसाद टंकायची इच्छा आज पूर्ण झाली. >>> =)) काय रे मोदका ? आज का पेटलायस इतका ? :-b

काय रे मोदका ? आज का पेटलायस इतका ?

तुम्हाला "फुल्ल डिटेल" उत्तर हवे आहे की "संक्षिप्त"..?

अवांतर - तुमची स्वाक्षरी "मला" अतर्क्य वाटते.

रेवती's picture

20 Jan 2013 - 11:07 pm | रेवती

बरोबर शब्द वापरता येतात म्हणून कुठेही वापरण्याला माझा आक्षेप आहे.
बाकी माझ्याकडील मुद्दे संपले आहेत. यापुढे गुद्दे वापरले जातील. ;)
आज तुझी चलती आहे म्हणून बोलून घेतोयस पण तुझ्या भविष्यातील एखाद्या धाग्यावर जेंव्हा जास्त संख्येने लोक असहमती दर्शवत असतील तेंव्हाच मी दर्शवीन. एकट्याने असहमती दाखवण्याचे बळ नसल्याने असे म्हणत आहे. दहा लोकांने टपल्या मारल्या की अकरावी आपण मारल्यास खपून जाते शिवाय स्कोअर सेटल होतो. ती वेळ माझ्यावर येण्याआधी मी पळून जाईन मिपावरून हेही आत्ताच सांगत्ये. ;)

प्रतिसादाची प्रिंटाऊट घेतली आहे. :-D

तरीही माझ्या बुद्धीला झेपले नाही तर तर व्यनी करून अर्थ विचारेन.

लॉजीकल प्रश्नाला फाट्यावर न मारता उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2013 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

=)) बास ...अरे...बास... =)) एखाद्याची अशीhttp://www.sherv.net/cm/emoticons/fighting/cannonball.gifआत्म-हत्या घडवून आणणं बरं नै रे...! =))

पैसा's picture

20 Jan 2013 - 11:24 pm | पैसा

मिळ.लि.: मा. मोदक यांचे मुद्दे पूर्ण पटून आज मला सदेह मोक्षप्राप्ती झाली आहे. अजून काही शंका आहेत त्यांचे निरसन कृपया व्यनिद्वारे करावे. सबब या धाग्यावरून मी निवृत्ती घेत आहे. धन्यवाद! लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती.

जळ.लि. ; या शिंच्या मादकाला नाही उद्योग. सापडला कीबोर्ड की बडव. आपल्या धाग्याचा खफ करायची कला मात्र भारी जमलीय मेल्याला. माझ्या पुढच्या धाग्यासाठी याला सुपारी देणे भाग आहे. शिवाय मला याच्याशी वाद घालण्यापेक्षा दुसरी बरीच कामे आहेत. तेव्हा तो मरो आणि त्याचा धागा उडो. आपल्याला काय! :D व्यनि कर म्हणे! गिग्याबायटी व्यनि करून मिपाची ब्यांडविड्थ जाळा फुकटची. वेळ मिळाला तर वाचेन आणि वायफळ उत्तरे देईन!

जिंकलो.. जिंकलो.. जिंकलो.. :-D

आजचा दिवस सार्थकी लागला. उद्या आणखी तीन चार आयडींच्या मेंदूचे चावे घेतो. मग काय बिशाद आहे कुणाची माझ्या वाटेला जायची!

कोण रे तो.. You are Full of Yourself and What a Waste of Space! म्हणतोय..? ऑ..? :-))

पैसा's picture

21 Jan 2013 - 9:18 am | पैसा

:D

तुम्हाला पायजे तर कोकणातल्या दशावतारी खेळ्यातल्या शंकासुराप्रमाणे ४/५ गड्यांना आडवे पाडून लाकडाची तलवार नाचवत "जीतं, जीतं" असं म्हणत नाचू शकता, कोणी अडवलंय?? :D

मोदक's picture

21 Jan 2013 - 10:13 am | मोदक

जिंकल्यावर आम्ही आमच्या पध्दतीने आनंद साजरा करू, तुम्ही सांगायचे काम नाय. आम्ही नाचू नाहीतर कवितांची निरर्थक परिक्षणे करू नाहीतर समुद्रकिनार्‍यावर जावून **** (जिज्ञासूंनी व्यनी करावा - या धाग्यावर कुणालाही टारगेट करून काही लिहायचे नाही असे "मीं" ठरवले आहे! :-D

अवांतर - तुमची स्वाक्षरी शरणागती दर्शवते.

तुम्ही या जगात बदल करायला आला नाहीयेत? मग तुमचे जीवनध्येय काय?

"मीं"च्या मनींच्या बाता - मराठी संस्थळावर इंग्रजी स्वाक्षरी केली म्हणून हिला त्रास द्यायला सुरू करू काय..?
कोण बोलतो कंपू नाही माझ्यामागे.. हॅट्. आपल्याला कंपू बिंपूची गरज नाय. एकटाच पुरेसा आहे. 'वन मॅन आर्मी' आहे "मीं"!

पैसा's picture

21 Jan 2013 - 11:19 am | पैसा

मा. मोदक, तुम्ही वैयक्तिक होत आहात.

अवांतरः मी स्वाक्षरी हवी तर ऊर्दूत लिहीन तुला काय करायचं आहे? मी जगात बदल करायला आले हे तुला कोनी सांगितलं? माझे जीवनध्येय फक्त पैसा हे आहे. माझा आयडी काय आहे हे बघ.

अति अवांतरः शिवाय गोव्यातल्या बीचवर जायचे असेल तर मला आधी कळवणे आवश्यक आहे.

अति अति अवांतरः कंपू कुठचा नवा की जुना?

मोदक's picture

21 Jan 2013 - 11:41 am | मोदक

ओ..

त्या आमच्या मनीच्या बाता आहेत. माझ्या प्रतिसादाने तुमच्या मेंदूत उजेड पडला असेल तर बोला नाहीतर आजची शरणागतीसुद्धा मान्य करा. (आणि हो.. तुम्ही तुमचा मेंदू बघितला आहे का? नसल्यास तो असल्याचा तुमच्याकडे पुरावा आहे का?)

आज जर तुम्ही शरणागती मान्य केलीत तर पहिल्याच ओव्हर मध्ये 'नाईट वॉचमन' बाद केल्याचा आनंद मिळेल "मला". (तुम्हाला 'स्ट्रार बॅट्समन' असे संबोधले तर तुमच्या प्रति आदर दिसेल अशी चिंता वाटते)

[ आवरते घेवू काय गं? बहुतेक सगळे स्कोर सेटल झालेत :-D ]

पैसा's picture

21 Jan 2013 - 11:52 am | पैसा

ये नहीं हो सकता.

इनिगोय's picture

21 Jan 2013 - 11:51 am | इनिगोय

पैसातै, असहमत..

या धाग्यावर कुणालाही टारगेट करून काही लिहायचे नाही असे "मीं" ठरवले आहे!

धागाकर्त्याचा निर्वैयक्तिक अप्रोच इथे स्पष्ट नै का होत? (आधी अथवा नंतर त्याने पलटी खाल्लेली दिसली तर तो भास आहे असे समजावे काय..?)

तशी शक्यता नाकारता येत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

21 Jan 2013 - 5:13 pm | प्रभाकर पेठकर

आज 'मोदक' ह्या आयडीरुपी मारुतीच्या शेपटास कोणीतरी आग लावून लंकेत सोडून दिले आहे.
(कि हा ही माझा एक 'भास' आहे.)

लीलाधर's picture

20 Jan 2013 - 11:20 pm | लीलाधर

चालु द्या चावतोय आपलं वाचतोय :))

राघव's picture

20 Jan 2013 - 11:44 pm | राघव

अंमळ जास्तच उशीर झालाय वो इथं येण्यात.
बाकी, सर्व भासच म्हटल्यावर मी उगाच टंकीत बसलो होतो म्हणायचे! ;)
मोदकशेठ त्याबद्दल अपुनको माफ करनेका... ___/\___

मिळ. लि : मोदकराव, आमची "तसली" कविता वापरून तुम्ही "असलं" विडंबन केलंत आणि खोर्‍याने प्रतिसाद ओढलेत. आम्हाला एक चहा पाजायला हवा.

जळ. लि : काही नाही हो खोर्‍याने वगैरे. माझ्या धाग्याचं काश्मिर करु नका, माझ्या धाग्याची गाझापट्टी करु नका म्हणत स्वतःच ढीगाने प्रतिसाद देत धागा भरकटवला आहे. म्हणून प्रतिसाद वाढले.

मोदक's picture

21 Jan 2013 - 10:00 am | मोदक

मिळ. लि : वा वा वा! धनाजीरावांनी आणखी एक प्रतिसाद देवून धाग्याच्या प्रतिसादांमध्ये भर घातली वर मागून मागून मागितले काय, तर चहाच. कंपूमध्ये ओढायला हरकत नाही याला. माझ्या आज्ञेखाली राहील कायम. चला एक तरी पाठीराखा मिळाला.

जळ. लि : च्यायला स्वतःच्या टुकार धाग्यावर आले नाहीत इतके प्रतिसाद या अतिटुकार विडंबनावर आलेत म्हणून किती जळजळ व्हावी एखाद्याची. वर जळजळ झाली ते झाली आता "ही आणि हि" प्रतिसाद देवून माझ्यावर आणखी हल्ला करायचा प्रयत्न करतोय.
प्रत्युत्तर म्हणून "मेघना" चे "भिगना" असे अध्यात्मीक विडंबन करावे काय? पाऊस, त्याचे दुष्परिणाम, पूर, अतीवृष्टी, त्याचे सामाजिक, आर्थिक परिणाम, शेतकरी आणि शेतमजूर भिजल्यामुळे त्यांच्या बिघडलेल्या तब्बेती आणि आजारी मजूरांचे अध्यात्मिक अधिष्ठान (मस्त शब्द सुचला आहे! काय अर्थ सांगावा बरे कुणी विचारला तर?) वगैरे वगैरे लिहून धनाजीरावांवर राळ उडवतो आता. मला आडवा जातो म्हणजे काय???

नाखु's picture

21 Jan 2013 - 8:58 am | नाखु

महाराज हे अ.भा.व्.धा. साहीत्य संघाचे तहहयात अध्यक्ष आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे.. लगे रहो..

मोदकांच्या समग्र (लेखन साहीत्याचा) पंखा

"मीं"च्या मनींच्या बाता.

हाच सदस्य खरडवहीत सुप्रभात असे लिहून गेला आहे. याला पण कंपूत ओढावे काय?

मला परवा कुणीतरी म्हणाले होते की "तुम्ही लवकरच एक नवीन संस्थळ सुरू कराल" तिथे हेच सगळे पाठिराखे उपयोगी पडतील.

आजच संस्थळाचे नाव रजिस्टर्ड करतो "उसळपाव.कॉम" मिपाच्या ट्यार्पीचा फायदा पण मिळेल मग मला. :-D

नाखु's picture

21 Jan 2013 - 12:26 pm | नाखु

महाराज म्हनून सुद्धा जर शंखा असेल तर काय कराव आम्ही?

मोदक's picture

21 Jan 2013 - 10:41 am | मोदक

"मीं"च्या मनींच्या बाता.

हा १०० वा प्रतिसाद मीच देतो.

उगाच माझ्या लोकप्रियतेला अवांतराचे लेबल लावून कुणी धागा वाचनमात्र करायला नको.

आता जरी वाचनमात्र केला तरी १०१ वर करेल. म्हणजे इथेही मीच जिंकलो बेट्या...

स्पंदना's picture

21 Jan 2013 - 11:07 am | स्पंदना

मला हा प्रतिसाद वाचुन असे भास होताहेत.

मोदकराव हा प्रतिसाद नव्हे हं. निव्वळ भास आहे.

अजूनही या कढीला ऊत येतोच आहे का !! मोदका, अरे एखाद्या आयडीन् धसका घेऊन आंतरजालीय आत्महत्या केलंन् तर त्याचं पाप कुठे फेडशील!!

मोदक's picture

21 Jan 2013 - 12:11 pm | मोदक

असूदे की रे...

आत्म्हत्या केलेला आयडी आणि अंतर्धान पावलेल्या (तुमच्या) मीनाक्षीताई चित्रगुप्ताचे* डोके खावूदेत.

*चित्रगुप्त म्हणजे स्वर्गातला अकाऊंटंट - जो आता क्वालीफीकेशन वाढवून सीए वगैरे झाला असेल. वरील वाक्याचा आपल्या मिपावरच्या चित्रगुप्त आयडीशी काहीही संबंध नाही.

सूड's picture

21 Jan 2013 - 12:42 pm | सूड

>>अंतर्धान पावलेल्या (तुमच्या) मीनाक्षीताई चित्रगुप्ताचे* डोके खावूदेत.
ऑस्ट्रेलियात आहे असं म्हणायची खरी, काय झालं बिचारीचं देव जाणे. दादरच्या लोकांकडे चौकशी करायला हवी, कोणाला दिसली होती का वैगरे. असो !! (डोळे पुसणारा स्मायली कल्पावा.)

आहेत आहेत ऑस्ट्रेलियातच आहेत, परवाच मला फोटो पाठवले आहेत, नविन कॅमेरा घेतलाय मोठा थेट सिडनीतुन सिएसटिचे फोटो काढलेत. मस्त आलेत.

मला नाय दाखवलेन फोटो!! बाकी सिडनीतनं सियेष्टीचे फोटो काढलंनीत हे वाचून बरं वाटलं. असो, आता पुन्हा मिपावर दर्शन कधी देतेय बघू.

स्पा's picture

21 Jan 2013 - 12:15 pm | स्पा

पुरे कि

मोदक's picture

21 Jan 2013 - 12:21 pm | मोदक

लो कल्लो बात.

बाकीचे अती करतात तेंव्हा तुम्ही फुल्ल सपोर्ट करता त्यांना.. जनरेट्याचे नाव देवून माघार काय घेता तिकडे.. आमच्या चिमुकल्या हातात चिमुकली कुर्‍हाड पाहून तुम्हाला तुमच्या डोक्यावरच्या छताची भिती वाटायला लागली आहे का? :-D

स्पा's picture

21 Jan 2013 - 2:11 pm | स्पा

त्याचं काये ना साहेब, आता अति झालंय आणि हसूही येत नाहीये, उगा बळे बळे विनोद निर्मिती सुरुये
असो
शेवटी काय कोणी कसे वागावे ... हॅ हॅ

प्रचेतस's picture

21 Jan 2013 - 2:13 pm | प्रचेतस

उगा एखाद्याला इतके टार्गेट करणेही बरे नाही.

प्वाईंटाचा मुद्दा हा आहे की इतका दंगा करूनही 'पालथे घडे' उलथे होतील का ?

प्रचेतस's picture

21 Jan 2013 - 2:24 pm | प्रचेतस

त्या घड्यांचे जाऊ द्या. पण त्यामुळे इथले उलथे घडे 'पालथे' व्हायला लागलेत त्याचे काय?

स्पा's picture

21 Jan 2013 - 2:40 pm | स्पा

एखाद्या व्यक्तीसाठी/ID साठी गेला एक आठवडा धाग्यांवर धागे निघ्तायेत , तेच तेच विषय सर्वकडे सुरु आहेत , कंटाळा आलाय राव , कधीतरी गम्मत ठीके , पण विरंगुळा म्हणून काही वाचायला मिपा वर याव आणि हेच धागे तेच तेच विषय !

असो

हे बाकी खरंय. दुसरे विषय घ्या बे सगळ्यांनी, किती ते चघळणार?

मोदक's picture

21 Jan 2013 - 3:46 pm | मोदक

मुद्दा मान्य.

"विचार मांडताना कन्सिस्टन्सी असेल तर विचाराला वजन प्राप्त होते" असे वाटते.

बाकी तुम्ही सुज्ञ आहातच.

(एकाच बाजूने बोलणारा) मोदक

सस्नेह's picture

21 Jan 2013 - 2:45 pm | सस्नेह

आता 'उलथ्यांचीसुद्धा अशी अवस्था झालिये...
a

मोदक's picture

21 Jan 2013 - 4:02 pm | मोदक

धन्यवाद,

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

मोदक's picture

21 Jan 2013 - 3:38 pm | मोदक

मी ही सहमत आहे.

स्पा आणि तुमच्या मंडळाची "खंत" आणखी बर्‍याच ठिकाणी व्यक्त होवू शकली असते असे वाटते.

विषय रिपीट होत आहेत पण याला जबाबदार कोण याचाही विचार झाला तर आनंद आहे.

स्पा आणि तुमच्या मंडळाची "खंत" आणखी बर्‍याच ठिकाणी व्यक्त होवू शकली असते असे वाटते.

शहाण्याला शब्दांचा मार मोदक राव ;)
वादाने वाद घालून जास्तच चिघळतो
' तुझीच लाल ' म्हणायचं मोकळ व्हायचं, पटत नसेल तर दुर्लक्ष करावं.

हे असे धागे काढून प्रकरण निकालात निघेल असे वाटत नाही

पुन्हा असोच :D

' तुझीच लाल ' म्हणायचं मोकळ व्हायचं, पटत नसेल तर दुर्लक्ष करावं.

अबे दुर्लक्ष किती करणार..??

काळ सोकावतोय. चांगल्या कवितांच्या धाग्यावर पण कवितांची चिरफाड होतेय, अहं ब्रह्मास्मि तर सगळीकडेच आहे.
बघू काही फरक पडतोय का ते. ;-)

हे असे धागे काढून प्रकरण निकालात निघेल असे वाटत नाही

ठीक आहे, हा झाला आमचा उपाय. तुमचा उपाय काय?
'तुझीच लाल' म्हणून, आपण मोकळ व्हायचं, पटत नसेल तर दुर्लक्ष करायचं. पण प्रकरण निकालात निघते का रे अशाने?

बेस्ट लक स्पा. ;-)

प्रभाकर पेठकर's picture

21 Jan 2013 - 5:23 pm | प्रभाकर पेठकर

हे असे धागे काढून प्रकरण निकालात निघेल असे वाटत नाही

पण असूरी आनंद (कधी कधी) मनावरील तणाव (स्ट्रेस) कमी करतो.

या धाग्यावर (पौषातच) झालेला शिमगा पाहून तुम्ही म्हणताय ते पटतंय.

पेठकर काकांशी आणि तुमच्याशी सहमत.

धनाजीरावांच्या खांद्यावर मी ठेवलेल्या बंदुकीतून पब्लीकने आपापल्या गोळ्या मारून घेतल्यात. :-D

बघू काही फरक पडतो आहे का.. पडला तर आनंदच आहे.

(या धाग्यामुळे कुणाचा मिपासन्यासाचा धागा आलाच तर त्याचेही विडंबन करण्यास तयार असलेला :-D) मोदक

कवितानागेश's picture

21 Jan 2013 - 6:51 pm | कवितानागेश

उगा बळे बळे विनोद निर्मिती सुरुये>
स्पारायण जी, तुम्हाला इनोद कळत नाहीत असं कबूल केलत तर तुम्हाला कुणीही हसणार नाहीत इथे. उलट समजावूनच सांगतील
अवांतरः तुम्ही विनोद प्रत्यक्ष पाहिला आहे का?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2013 - 4:46 pm | अत्रुप्त आत्मा

@चिमुकल्या हातात चिमुकली कुर्‍हाड पाहून ;-)
...........................http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/axe-murderer.gif

मोदक's picture

21 Jan 2013 - 8:53 pm | मोदक

बुवा...

माझ्या प्रतिसादाला जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याच्या चिमुकल्या कुर्‍हाडीच्या कथेचा संदर्भ होता.

त्याची स्मायली मिळवून टाका की प्लीज. :-D

माझ्या प्रतिसादाला जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याच्या चिमुकल्या कुर्‍हाडीच्या कथेचा संदर्भ होता.

कोण जॉर्ज वॉशिंग्टन? आम्हाला कुर्‍हाड म्हटलं की फक्त लाकुडतोडयाचीच कथा आठवते.

आत्ताच धनाजीरावांचा मेसेज आल्याप्रमाणे ते संध्याकाळशिवाय मिपावर उपलब्ध नसणार आहेत.

तस्मात त्यांच्या सखूच्या विडंबनावरून आम्ही तात्पुरती रजा घेतो आहोत. अजून कोणाला रंगपंचमी खेळायची असेल तर खेळ सुरू राहूदे.. आम्ही संध्याकाळी कंटिन्यू करू.

धनाजीरावांच्या खिलाडूवृतीचा पंखा - मोदक.

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Jan 2013 - 4:15 pm | लॉरी टांगटूंगकर

फार खाली बघवला गेला नाही म्हणून वर काढतोय

मोमो परत आलाच नाही :(

अमोल खरे's picture

21 Jan 2013 - 1:32 pm | अमोल खरे

डोकं गरगरायला लागलाय. मी कोण आहे ? मोदक कोण आहे ? मी मोदकाला भेटलो होतो की त्याच्या शरिराला ? जर मी त्याच्या शरिराला भेटलो असेन तर मोदकाचे मन / आत्मा वगैरे कुठे होता ? जर तो त्याच्या शरिरातच आहे असं म्हणायचं तर त्याला पुरावा काय ? मी त्याला भेटलो असेन पण माझं मन पण त्याला भेटलं त्याचा पुरावा काय ? ही प्रतिक्रिया मी लिहिलेय त्याचा पुरावा काय ? आयपी अ‍ॅड्रेस बघ असे बाष्कळ उत्तर देऊ नये.

कवितानागेश's picture

21 Jan 2013 - 6:47 pm | कवितानागेश

तुम्ही मन प्रत्यक्ष पाहिले आहेत का?
(मला आता फक्त इतकाच प्रश्न विचारायचे कळतंय!)

तोच तर गोंधळ आहे ना. मनाला पाहायचं कसं ? (मी काही इगतपुरीपर्यंत जाणार नाहीये हं) आणि तेच मन आहे कशावरुन ? मोदक तरी मोदक आहे कशावरुन ? तो लाडु/करंजी/ चिवडा कशावरुन नाही ? म्हणजे तो स्वतःला मोदक म्हणतो पण तो पण एक भासच आहे ना. तो पुरणपोळी वगैरे पण असु शकतो ना. मी त्याला मोदक म्हणतो पण तो तर आइस्क्रीम पण असु शकतो ना. आईस्क्रीमचे व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, मँगो, राजभोग, सिताफळ असे अनेक प्रकार असतात. पुर्वी वाडिलाल होते, नंतर अमुल आलं आता हॅवमोर म्हणुन पण आलाय. जास्त आईस्क्रीम खाऊन सर्दी होते. सर्दी झाली तर क्रोसिन घ्यावी. क्रोसिन नसेल तर गरम पाण्याची वाफ घ्यावी. पाणी तानसा, वैतरणा तलावातुन येतं. त्यावर भांडुप येथे प्रक्रिया करुन ते शुद्ध केले जाते. पुर्वी एक तुरटी घोटाळा म्हणुन पण काहीतरी झालं होतं.... (असं बरच लिहु शकेन....."बदक" ह्या तुफ्फान गाजलेल्या लेखाची आठवण झाली, म्हणुन ट्राय केला. =)) )

कवितानागेश's picture

21 Jan 2013 - 7:06 pm | कवितानागेश

मला वाटते की मोदक हा कडकबुंदी लाडू असून तू एक चिवडा आहेस! :D

अमोला, शुद्धिवर ये बाळा! तरी सांगत होते काहीही ट्राय करण्याचं वय नाही तुझं अजून.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Jan 2013 - 10:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे

खरे तर बरेच काही ट्राय करायचे वय आहे. ते ट्राय कर म्हणावे.
उगाच त्या मोदकाच्या नादी लागू नकोस. घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात टाईमपास करणारी काही मुले असतात. तू फक्त टाईमपास करशील आणि नापास होशील आणि तो तिथे ४-५ विषयात डीसटिंक्शन काढणार.

घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात टाईमपास करणारी काही मुले असतात. तू फक्त टाईमपास करशील आणि नापास होशील आणि तो तिथे ४-५ विषयात डीसटिंक्शन काढणार.

मोदक, हलकट तू अभ्यास सुरु केला हे मुंबईला विमेलासुद्धा कळलं. आणि आम्ही विचारलं की म्हणतोस बाहेर काम आहे त्यामुळे नाही जमणार कटट्याला यायला. ;)

मोदक's picture

22 Jan 2013 - 11:10 pm | मोदक

ढन्या भा******

(तबीयतदारांनी फुल्या भरून काढून धन्याला व्यनी करावा)

काय सगळे भास भास करायलेत बे, भासाची नाटके लिहितात की काय वाटायलंय मायला.

मोदक's picture

22 Jan 2013 - 10:39 am | मोदक

ऑ..???

तिसरा प्रतिसाद कोणता उडाला?

मला दोनच अपेक्षीत होते. :-\

मोदका आजकाल तुझा टारगटपणा वाढत चाललाय. दोन चार प्रतिसाद संमं ने उडवले तर वाईट वाटून घेऊ नकोस. एकंतरीतच दंगा घालणे यासाठीच ही कविता लिहिली आहेस. माझे आनखीही प्रतिसाद या धाग्यावर आहेत याची कल्पना आहे. तूही साधा नाहीस हे दाखवण्यासाठी हा पुरावा आहे.

मोदक's picture

21 Feb 2013 - 9:15 pm | मोदक

खी खी खी खी... ;-)

आज पाढे पुन्हा एकदा वाचले......पाठ असायला हवेत ना !

मोदक's picture

16 May 2013 - 4:03 pm | मोदक

:D

धन्यवाद्स!

सस्नेह's picture

20 Jan 2016 - 4:28 pm | सस्नेह

बे दुने चार झाल्यावर 'मी मी' चा पाढा विसरलास का बा मोदका ?

मोदक's picture

20 Jan 2016 - 5:05 pm | मोदक

अहो.. तो तुमचा भ्रम आहे.

लेख आणि प्रतिसाद नीट वाचा - प्रतिसाद द्यायची घाई करू नका.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

20 Jan 2016 - 5:07 pm | ईश्वरसर्वसाक्षी

मला तरी भास होताहेत