एका अस्सल मर्दाची कहाणी

प्राध्यापक's picture
प्राध्यापक in जनातलं, मनातलं
8 Jul 2012 - 4:13 pm

बोरिस पलेवोय या सोविएत लेखकाच एक सुंदर पुस्तक "स्टोरी ऑफ रीयल मॅन"नुकतच वाचण्यात आल्,एका अस्सल देशभक्ताची ही कहाणी आहे,हि कादंबरी एका खर्‍या व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे.तो व्यक्ती म्हणजे अलेस्केइ मेस्सेरेव्ह जन्म २० मे १९१६,रशियातील एका सामान्य कुटुंबातला. काम्यशिन हे त्याच गाव कादंबरीत त्याच्या बालपणाबद्दल ही विस्तारानं लिहलेलं आहे,पण मला मुख्य मुद्द्या कडे यायच असल्याने तसेच विस्तार भयामुळे ते मी टाळतो.

तर हा अलेस्केइ,बाल पणा पासुनच विमानांबद्दल एक आकर्षण मनात घेउन मोठा झाला,साहजीकच मिलीटरी स्कुल मधुन शिक्षण घेउन पायलट बनला,विमानातुन उंच भरार्‍या मारण्याच त्याच स्व्प्न अशा रितीन साकार झाल,आता प्रत्यक्ष युध्दावर जाउन पराक्रम गाजवण्याची आस त्याला लागली होती ,तीही त्याला लवकरच मिळाली,१९४१ ला दुसरे महायुध्द सुरु झाल पोलंड वरच्या आक्रमणाची जबाबदारी त्याच्या तुकडीला मिळाली,अर्थात एका बाजुन जर्मनी व दुसर्या बाजुन रशिया अशा पोलादी पकडीत सापडलेल्या पोलंड सारख्या चिमुकल्या राष्ट्राकडुन प्रतिकार तो काय होणार म्हणा,त्यामुळे अलेस्केइला आपल्या कौशल्याचा कस लागल्यासारख वाटलच नाही.
रशियाचा खरा कस लागला तो जर्मनांच्या विरोधात. लुफ्तवाफ हे जर्मनांच विमानदल अत्यंत कसलेल व आक्रमक होत ,साहजीकच अलेस्केइ सारख्या शेकडो पायलटसचा आता खरा कस लागणार होता.
जर्मनीच आक्रमण रशियाला थोपवुन धरण अवघड होत,तरीही रशियन विमानदल पोलंडच्या प्रदेशात घुसुन हल्ले करत होत,मार्च १९४२ पर्यंत अलेस्केइनेही ४ जर्मन विमाने पाडली होती.
४ जुलॅ १९४२ अलेस्केइ नेहमी प्रमाणे आपल्या "पोलीकरपोव्ह-आय-१६"या आवडत्या विमानात बसुन आपल्या तुकडी सह निघाला. "सत्रय रुसा " या त्याच्याच मायभुमीतील एका भागात ठाण मांडून बसलेल्या गनिमाला मागे रेटण्याची जबाबदारी त्याच्या तुकडी वर होती. तुल्यबळ अशा जर्मन वॅमानिकांशी संघर्ष त्याला नेहमीच आवडत असे,मात्र आजचा दिवस त्याचा नव्हता,त्याचे विमान शत्रुने पाडले,आणी शत्रुने व्याप्त केलेल्या प्रदेशात त्याचे विमान अपघात ग्रस्त झाले.त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला मात्र त्याच्या पायांना जबरदस्त दुखापत झाली होती,त्यात विमान पडले ते ही बर्फाळ जंगलांमधे,आसपास मनुष्यप्राणी नाही आणी असलाच तर तो शत्रु असण्याची शक्यता आधीक. अपघातामुळे एका पायाच हाड सरकलेलं तर दुसर्या पायाला मोठी जखम झालेली, अशा परीस्थितीत जखमी पायांनी शत्रुला न दिसता जवळच एखाद रशियन गाव गाठण्याच प्रयत्न करणे हे एक आव्हान होते.
पण या पठ्ठ्याने ते आव्हान स्विकारले ,सरकलेल हाड प्रचंड वेदना सहन करत त्याने शक्य तितक बसवण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यावर काठ्या वेलींच्या साह्याने बांधुन एक काठी कुबडी सारखी बनवुन बरोबर घेतली,आणी त्याचा प्रवास सुरु झाला,जवळ पाणी नव्हत फक्त हवाबंद मांसाचा एक डबा त्याच्या कडे होता,तो ही लवकरच संपला आणी मग सुरु झाला एक संघर्ष अन्न मिळवण आणी शत्रुला चुकवण याचा. या प्रवासात त्याला प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या दोन-दोन दिवस खायला काही न मिळाल्यान त्यान साळींदराची शिकार कशी केली व ते कच्चेच अधाशी पणे त्याने खाल्ले . याच जबरदस्त वर्णन या पुस्तकात आहे.या प्रवासात जिवंत राहण्या साठी मुंग्या, किडे,कंद्,झाडाची पाने त्याने खाल्ली.
पायाच्या जखमा व बर्फ यामुळे शेवटी शेवटी तर चालणेही त्याला जमेना म्हणुन शेवटी सरपटत त्याला काही अंतर काटावे लागले,तब्बल १८ दिवस त्याने जंगलामधुन बर्फामधुन त्याने प्रवास केला, व अखेर शत्रुला चुकवुन एका रशीयन गावातअर्धमेल्या अवस्थेत तो पोहचला.गावकर्यांनी ८ दिवस कुणालाही न कळू देता त्याची सेवा केली,या ८ दिवसात रशीयन लष्करा लाही त्याच्याबद्दल कळवण्यात आले.व त्याला लष्कराने तातडीने मॉस्को च्या लष्करी अस्पताळा मधे दाखल करण्यात आले.तो पर्यंत पायाच्या जखमा विकोपाला गेल्या होत्या,त्याला प्रचंड धक्का बसणारी बाब म्हणजे त्याचे दोन्ही पाय गुडघ्या पासुन कापावे लागले.
२६ वर्षीय अलेस्केइ ६ महीन्यानंतर व्हिलचेअरवर अस्पताळातुन बाहेर पडला,त्याच्या जागी कुणीही सामान्य माणुस असता तर परीस्थीती पुढे झुकुन पेन्शन घेउन उर्वरीत आयुष्य शांतपणे आठवणींमधे जगला असता,पण...पण .. इथेच अलेस्केइ च वेगळेपण उठून दिसत,तो तिथुन बाहेर पडला तोच एक नवे स्वप्न घेउन,आणी ते अश्क्यप्राय स्वप्न होते ....पुन्हा विमान चालवण्याच.
लवकरच त्याला सरकारतर्फे लाकडी पाय मिळाले दोन्ही गुड्घ्यांवर ते पाय चामडी पट्ट्यांच्या साह्याने चढवुन उभे राहण तो हळूहळू शिकला,अतिशय वेदना सहन करत तासंतास तो लाकडी पायांवर तो उभा राही केवळ त्याचा सराव व्हावा म्हणून,कारण विमान उडवताना पायाचे कंट्रोल फार महत्वाचे होते,त्याचे लाकडी पाय त्याच्या इच्छेबरहुकुम हलावेत म्हणुन त्याने नॄत्य प्रशिक्षण वर्ग लावला,हळूहळु तो नॄत्य हि शिकला.
त्याच्या सहकार्‍यांनी या काळात त्याला साथ दिली. आता त्याच्या समोर मोठे आव्हान होते ते म्हणजे विमान चालवण्याची परवानगी मिळवण्याचे त्याने प्रयत्न सुरु केले.आणी सर्वच ठिकाणी त्याला नकार मिळाला,लष्करी नियमानुसार शारिरीक सक्षमता हिच महत्वाची असते. कित्येक ठिकाणी तर त्याला वेड्यात काढण्यात आले,पण शारिरीक न्युनतेवर आपल्या प्रचंड चिकाटीने मात करणारा अलेस्केइ हार न मानता तितक्याच चिकाटीने प्रयत्नांची शर्थ करु लागला,अखेर त्याच्या प्रयत्नांना यश मिळाल्,त्याला प्रशिक्षित पायलट बरोबर विमान उड्डानाची संधी मिळाली,व त्यात यश मिळाल्यानंतर त्याने स्वतंत्र उड्डान केले.
विमान उडवण्याचा त्याचा आत्मविश्वास आणी देशासाठी त्यागाची भावना लक्षात घेउन(अर्थात त्यावेळी रशियाला प्रशिक्षित पायलट्सची अत्यंत गरज होती)त्याला युध्दाअघाडीवर पाठवण्यात आले.या युध्दात पहील्याच उड्डानात त्याने जर्मनांची तीन एफ डब्लु-१९० फाइटर विमाने पाडली.तर संपुर्ण संघर्षात त्याने ११ शत्रुची विमाने पाडली.
युध्दानंतर त्याच्या या पराक्रमाची दखल रशियन सरकारने घेतली.२४ ऑगस्ट १९४३ ला त्याला "हिरो ऑफ सोव्हिएत युनियन "हा किताब देण्यात आला.हा त्यावेळचा सोविएत रशियातील सर्वोच्य लष्करी व नागरी पुरस्कार होता.
युध्दानंतर त्याने आपले पदवी चे शिक्षण पुर्ण केले.शिवाय इतिहास या विषयात पी.एच.डी. मिळवली.आणी सोविएत पक्षसंघटनेत कार्य करण्यास सुरुवात केली.१९ मे २००१ ला वयाच्या ८५ व्या वर्षी त्याचे निधन झाले.
बोरीस पलेवोय या कादंबर्री काराने त्याच्या जीवनावर ही कादंबरी लिहली,त्यावर आधारलेला "स्टोरी ऑफ रीअल मॅन "हा चित्रपट निघाला.खरोखरीच एखाद्या चित्रपटासारखी त्याची जिवन कथा होती.

कलाकथाधोरणमांडणीवाङ्मयइतिहासप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

प्राध्यापक's picture

8 Jul 2012 - 4:17 pm | प्राध्यापक

फोटो टाकण्याचा प्रयत्न केला ,पण जमले नाही

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jul 2012 - 4:37 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो दिसतोय का आता?

प्राध्यापक's picture

8 Jul 2012 - 5:59 pm | प्राध्यापक

धन्यवाद , बिका

प्रचेतस's picture

8 Jul 2012 - 4:34 pm | प्रचेतस

ते पानिपताचं काय झालं हो?

प्राध्यापक's picture

8 Jul 2012 - 6:01 pm | प्राध्यापक

लवकरच टाकीन पुढचा भाग्,धन्यवाद.

मोरे निलेश's picture

8 Jul 2012 - 4:55 pm | मोरे निलेश

मला आवड्ले

शुचि's picture

8 Jul 2012 - 6:09 pm | शुचि

बाप रे काय अफाट माणूस खरा सुपरमॅन!

jaypal's picture

8 Jul 2012 - 8:08 pm | jaypal

ईच्छाशक्ती, आणि देश प्रेम. सलाम या विराला.

मिपा़करांनो जरा या भारतिय विराचे मनोगत ही ऐका. हि चित्रफित मी माझ्या मोबाईल मधे साठवली आहे.
मोराल डाउन होत आहे अस वाटत तेंव्हा ह्या चित्रफितीने माझी बॅटरी चार्ज केली आहे.

प्रभाकर पेठकर's picture

8 Jul 2012 - 9:32 pm | प्रभाकर पेठकर

कथा एका मर्दाचीच आहे. विरुद्ध परिस्थितीत नियतीशी लढून विजय मिळविण्याची जिद्द अगदी वाखाणण्यासारखी आहे.

आपल्याकडेही सुधा चंद्रन ह्या नर्तकीची जिद्द अशीच वाखाणण्याजोगी आहे. नियतीशी चिवट झुंज देण्यासाठी 'मर्द' असण्याची गरज नाही. जबरदस्त मनोबल आणि हार न स्विकारता ध्येयाप्रती पोहोचण्याची अविरत धडपड, प्रयत्नांची पराकाष्ठा हे तिचे प्रेरणादायी गुण नक्कीच कौतुकास पात्र आहेत.

जाई.'s picture

8 Jul 2012 - 10:31 pm | जाई.

+१

अशा लोकांचं खुप कौतुक वाटतं.

मस्त कलंदर's picture

8 Jul 2012 - 11:02 pm | मस्त कलंदर

'एका अस्सल माणसाची/रशियन माणसाची कहाणी' या नावाने या पुस्तकाचा अनुवाद प्रसिद्ध आहे. साधारण १०-१२ वीत असताना हे पुस्तक वाचले होते आणि अतिशय आवडलेही होते. आणि अस्सल शाळकरी मुलीसारखे जवळच्या डायरीत पुस्तकाचे आणिलेखकाचे नांवही टिपून ठेवले होते. त्यामुळे लेखाच्या पहिल्या ओळीसरशी ते डायरीचे पान डोळ्यासमोर उभे राहिले. :-)

(नॉस्टॅल्जिक)

'एका अस्सल माणसाची/रशियन माणसाची कहाणी' या नावाने या पुस्तकाचा अनुवाद प्रसिद्ध आहे. साधारण १०-१२ वीत असताना हे पुस्तक वाचले होते आणि अतिशय आवडलेही होते.

+१

लेख आवडला.

किसन शिंदे's picture

9 Jul 2012 - 4:53 am | किसन शिंदे

सुंदर परिचय करून दिलाय या पुस्तकाचा.

मराठी अनुवाद कोणी लिहिला आहे याचा?

सहज's picture

9 Jul 2012 - 7:45 am | सहज

निक व्हॉयोचिच

जेसीका कॉक्स

स्वाती दिनेश's picture

9 Jul 2012 - 1:40 pm | स्वाती दिनेश

स्फूर्तीदायी ओळख आवडली,
स्वाती

अमोल केळकर's picture

9 Jul 2012 - 4:44 pm | अमोल केळकर

हॅटस ऑफ :)

अमोल

विसुनाना's picture

9 Jul 2012 - 6:18 pm | विसुनाना

हे मराठी पुस्तक रशियातून प्रसिद्ध झालेले होते. बोरीस पलेवोय यांचे हे पुस्तक श्री. अनिल हवालदार यांनी अनुवादित केलेले होते. (लोकवाङ्मय गृह)...
शाळकरी वयात ते वाचताना मनावर गारूड झाले होते. आता हा मराठी अनुवाद मिळतो की नाही ते माहित नाही. पुनःपरिचयाबद्दल धन्यवाद.

मदनबाण's picture

9 Jul 2012 - 8:50 pm | मदनबाण

एका सुंदर पुस्तकाची आणि व्यक्तीमत्वाची ओळख आवडली. :)