युजी कृष्णमूर्तींची ओळख इथल्या बहुतेक लोकांना आता झालेली असेल. यापूर्वी मी केलेल्या लिखाणात मी युजींना भेटलो नसल्याचे किंवा तशी संधी मिळाली नसल्याचे मी सांगितले असले तरी ते तेवढे खरे नाही. मी त्यांना जरुर भेटलो आहे. त्या भेटीला दिलेले हे शब्दरुप. युजी त्यावेळी बंगळुरला आले होते. ती त्यांची शेवटची भारत भेट ठरली कारण पुढे दोनच वर्षांत इटलीतील व्हॅलेक्रोशिया इथे त्यांनी शरीर सोडले. श्री. रामकृष्ण रेड्डी हे युजींचे निकटवर्तीय आणि नातेवाईक बंगळुर येथे रहातात. त्यांच्या घरी मी त्यांना भेटलो. अर्थात या भेटीपूर्वी मी युजींचे आणि त्यांच्याबद्दल उपलब्ध असलेले बहुतांश साहित्य वाचले, ऐकले असल्याने युजी ही काय चीज आहे याची मला पुरेपूर कल्पना होती. म्हणजे माझी शिव्या खाण्याची तयारी होती. तरी माझे प्रश्न होतेच ज्यांची उत्तरे मला त्यांच्याकडून अपेक्षित होती.
पण नुसती अपेक्षा असून काय उपयोग? एवढा अवघड माणूस आपल्याला पहायला मिळेल तेच मोठे भाग्य आणि बोलणे झालेच तर ती परमावधी असे विचार मनात असताना ते तिथे आल्याचा निरोप मिळाला. मी युजींना भेटण्यासाठी बंगळुरला गेलो. युजींच्या भेटीतील उल्लेखनीय बाब ही की त्यांच्यापर्यंत कुणालाही पोहोचता येत होते. त्यासाठी तुम्ही कुणी विशेष असण्याची अट नव्हती. धर्मगुरु, राजकारणी, पत्रकार, लेखक, अभिनेते-अभिनेत्री, आध्यात्मिक साधक असली लेबलं असलेले आणि इतर सगळेच लोक युजींसमोर लहान बाळे होऊन बसत. कसलेही लेबल आहे किंवा त्यांना कसला प्राधिकार आहे म्हणून त्यांना युजी भेटत नसत, हे लोक इतर काहीही असले तरी शेवटी माणूस आहेत - माणूस असणे युजींच्या भेटीसाठी पुरेसे होते. युजींच्या भेटीसाठी अपॉइंटमेंटची गरज नव्हती, कारण शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या आसपास कोणतीही संस्था उभी केली नाही. युजी थांबले होते त्या ठिकाणी मी गेलो ती वेळ दुपारची होती. कोणत्याही सर्वसामान्य बंगल्यात जेवढी प्रशस्त असू शकते तेवढ्या प्रशस्त बैठकीत युजी सोफ्यावर बसून होते आणि भोवती लोकांचा गराडा होता.
लोक येत होते आणि भेटून, झालंच तर बोलून परत जात होते. मी आत गेलो तेव्हा पहिली जाणीव झाली - 'अशा वातावरणात आपण आयुष्यात पहिल्यांदा आलोय!' अर्थातच तो एका मुक्तात्म्याच्या सान्निध्याचा परिणाम होता. जागा होती तिथे बसलो आणि चाललेल्या गप्पा ऐकू लागलो. विशेष चर्चा सुरु नसावी कारण लोक हसत खिदळत होते आणि पाय खाली सोडून सोफ्यावर निवांत बसलेले, तोंडात दात नसलेले, पांढरी स्वच्छ कांती असलेले युजी मध्ये मध्ये कॉमेंट करीत होते. वाव मिळताच मी माझा पहिला प्रश्न विचारला -
''UG, Do you think whatever this enlightenment is, is it has necessariliy to be on physical & mental level for whoever makes such a claim?''
बोलायला सुरुवात करण्यापूर्वी माझ्याकडे नजर न टाकताही युजी म्हणाले, ''You must be a Rajneesh freak, I call them divorcee of Rajneesh.''
ते वाक्य ऐकताच नाही म्हणलं तरी मी मनातून चरकलोच. थोडंस थांबून म्हणालो -
''Yes I was, until I read about you'' मी हे वाक्य बोलत असताना यावेळी युजींची नजर माझ्यावर खिळल्याचं आठवतंय.
''And there you learnt it has necessarily to be on physical level. Because that bastard hadn't and you want me to confirm how really it is to be enlightened? You read him, watch him for years and ultimately you realize whatever he did or preached at a great length was nothing but garbage. This comes to your head, this has to be so because whatever he spoke was nothing but mixture of schoolboy logic and emotional promotion towards filthy goal of enlightenment. Ultimately you cannot make head or tail of his garbage when it comes to your own condition, as you are and stay always..."
डेंजर काम होतं. शिव्या खायची तयारी भरपूर करुन गेलो असलो तरी हे शब्द ऐकताना ह्रदय आतल्या आत चळचळ कापू लागले. काहीच बकबक करायची गरज नव्हती. पण आता इथे करु शकतो. कित्येक वर्षांपासून मी रजनीशांचं साहित्य वाचलं होतं आणि ध्यानही बराच काळ केलं होतं. पण रजनीश नेहमीच काहीतरी लपवत आहेत हे अगदी आतून जाणवायचं. युजींच्या 'कॅलॅमिटी' बद्दल वाचल्यानंतर तर एन्लायटन्मेंट ही शारीरिक आणि मानसिक या दोन्ही पातळ्यांवर झालेली असेल तरच ती परिपूर्ण असं माझ्या मनात पक्कं मानून मी चाललो होतो. त्या निष्कर्षावर मी कसाही आलो असलो तरी, युजी म्हणाले तसे जागृत होणं खरोखर कसं असतं हेच तर विचारायला मी युजींसमोर जाऊन बसलो होतो.
''Not a confirmation as such, becuase I know, you will not give. But on its own it makes whole thing as you are saying.."
''What do you want me to say? I don't guide anybody, I don't have any disciples.'' युजी
''But you speak on these matters'' मी
''Yes, when fools like you are around, they make me speak. I say get lost, that is my favorite quote ..'' युजी
''No I already got lost so I am here'' हसून मी म्हणालो.
''No, no, don't play with words.. I don't play with them.. I just said you get lost to make you out of this place physically, you got it?''
माझा घसा खाडकन कोरडा झाला. पण तिथेच बसून राहिलो.
(इथे पुढे वाचण्यात वाचकांना इंटरेस्ट असेल तर क्रमश:, नसता माझ्या ब्लॉगवर)
प्रतिक्रिया
25 Mar 2012 - 10:55 am | प्रास
पुन्हा एकदा युजी....
तुमची युजींशी चाललेली झकाझकी वाचायला आणखी मजा येईल (यापुढे तुम्ही तिथे थांबून काही बोलला असलात तर).
बाकी, यक्कुशेठ, तुमच्या लिखाणात आम्हाला नेहमीच इंट्रेस्ट असतो तेव्हा पुढचा भाग टाका लवकर. असा अर्धामुर्धा अनुभव वर्णून तुम्ही आमची तुमच्या लिखाणाच्या वाचनाची तृष्णा न शमवणं हे आत्यंतिक निषेधार्ह आहे.
पुलेप्र :-)
25 Mar 2012 - 11:07 am | पैसा
सहमत. अट एकच. युजींना उद्देशून असलेल्या धाग्यांचा पूर्वेतिहास पाहता तू उद्यापर्यंत या धाग्याकडे फिरकायचं नाही! :D
25 Mar 2012 - 11:14 am | प्रास
संपादकांच्या इच्छांशी पंगा घेण्याइतका निबर बनचुकेपणा अजून आलेला नसल्याने सदर अटीची पूर्तता करण्यात येईल. ;-)
25 Mar 2012 - 11:17 am | पैसा
ते यकुसाठी होतं. तुझ्यासाठी नाही.
25 Mar 2012 - 11:27 am | प्रास
आता मला इथे धुडगूस घालायला फुल्ल पर्मिशन? ;-)
25 Mar 2012 - 11:30 am | पैसा
हम कुश नहीं बोलेगा! ;)
25 Mar 2012 - 11:15 am | बॅटमॅन
मस्त हो यकुशेठ.यूजींबद्दल तुमच्या ब्लॉग वर वाचले होते आधी थोडेसे. येऊद्या पुढचा भाग, तयार हाओतच वाचायला :)
25 Mar 2012 - 11:19 am | विलासराव
वाचतोय.
25 Mar 2012 - 11:25 am | जाई.
वाचतेय
25 Mar 2012 - 1:02 pm | पिंगू
वाचतोय खरा. पण युजी असो किंवा ओशो. त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान जास्त रुचले नाही. कदाचित माझे तेवढे वाचन नसल्याने हे मत असू शकेल.
- पिंगू
25 Mar 2012 - 1:41 pm | मराठी_माणूस
निश्चित आहे
25 Mar 2012 - 2:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचकांच्या इंट्रेष्टचा काय विचार करायचा ?
एक वाचक म्हणून आम्ही आपलं लेखन झेपलं तर वाचत राहू नै तर पास म्हणू.
तुम्ही आपलं लिहित राहा.........!
-दिलीप बिरुटे
25 Mar 2012 - 2:33 pm | प्रचेतस
लेखन झकास.
25 Mar 2012 - 2:42 pm | भिकापाटील
अरे पोरा तरुनपनात काय काय अवदसा आठवतात रे तूला. लगीन कर. बायकोच्या एका प्रेमळ कटाक्षात तुझी कुंडलीनी जाग्रुत होईल. तनामनात लहरी उठतील. जगाचे अंतीम सत्य क्षणात कळेल. मुक्त होशील. कशाला हे सायास?
25 Mar 2012 - 7:10 pm | चौकटराजा
या यकूचं आजून लगीन न्हाई ? आँ , तर्रीच ह्यो पावना कुटकुटं सानबूती का वाटंत फिरतोया ! त्ये मंग गनीत बराबरच हाय !
25 Mar 2012 - 7:14 pm | चौकटराजा
या यकूचं आजून लगीन न्हाई ? आँ , तर्रीच ह्यो पावना कुटकुटं सानबूती का वाटंत फिरतोया ! त्ये मंग गनीत बराबरच हाय !
25 Mar 2012 - 7:21 pm | यकु
चौकटराजा आजोबा, ययाति वाचलंय का हो तुम्ही ;-)
26 Mar 2012 - 2:01 pm | सुधीर
खांडेकरांचं तत्त्वज्ञान समजतं (कदाचित तेवढीच बुद्धी दिली असावी देवाने!) ययाति, अमृतवेल दोन्ही खूप आवडली आणि मुख्य म्हणजे पटली. अल्केमिस्टची रुपक कथा पण चांगली वाटते. पण ओशो अगम्य वाटतो! नुसतेच शब्दांचे बुडबुडे. युजींबद्धल जे काही वाचलय ते फक्त तुमच्याच ब्लॉगवर! कुठेही लिहा, आवडेल वाचायला तुमचे विचार!
25 Mar 2012 - 5:45 pm | निवेदिता-ताई
वाचतेय...
25 Mar 2012 - 6:28 pm | अत्रुप्त आत्मा
बोंबला... तिच्यायला आम्ची आणी विंग्रजीची जन्माची फारकत..त्यामुळे देवनागरीत टंकलेलंही कळायची सोय न्हाई... यक्कूशेठ दयाळू... त्या विंग्रजीचा थोडा/थोडा मराठी भावार्थ टाका ना...अत्ता आणी (दर वेळी...प्लीज)
26 Mar 2012 - 2:07 pm | मितभाषी
वाचतोय. येऊ द्या अजुन.
26 Mar 2012 - 2:32 pm | ५० फक्त
शक्य असेल तर युजींना अआची भोळा सांब कविता ऐकवा, तुमचं आणि त्यांचं दोघांचंही ज्ञान अज्ञान आहे ते दुर होईल.
26 Mar 2012 - 3:38 pm | मन१
लवकर टाका पुढला पागलपणा.
वाचतोय.
बादवे इंग्लिश भाषेतले संवाद देवनागरीत न टंकता मूळ त्याच भाषेच्या फाँटमध्ये टंकले तर वाचय्ला/समजायला थोडं सोपं पडेल.
किंवा वर अतृप्त आत्मा म्हणतात तसे मराठित त्याचे भाषांतर दिले तरी चालेल.(पण मूळ संवाद जसेच्या तसे दिलेलेच जास्त आवडतील.)
tumhi kaahihi lihila tari chaalel pan marathi bhasha marathit lihaa aani english bhasha english bhaashet.
naahitar he vaaky vaachatana jasa irritate hotay tasach hot raahil.
26 Mar 2012 - 3:51 pm | प्रसाद प्रसाद
इथे पुढे वाचण्यात वाचकांना इंटरेस्ट असेल तर क्रमश:,
आणखी येऊच दे हो यकुशेठ मस्त इंटरेस्टिंग प्रश्नोत्तरे वाटली.
26 Mar 2012 - 7:27 pm | विजुभाऊ
डिव्होर्सी ऑफ रजनीश हे मात्र खरे आहे.
डिव्होर्स घेतला तरी पहिल्या आठवणी सोडून जात नाहीत हेच खरे ;)