ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
22 Mar 2012 - 3:24 pm

नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे.
आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत -
''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.
दुकानदारी नजरेत आणि अत्यंत किंचीत तुच्छतेने पुन्हा नीट निरखून पहात -
''सब प्रकार के पीस मिलेंगे, आपका बजट कितना है ? ''
म्हटलं बुवा चांगला असेल तर घेऊ सात आठशेपर्यंत. मग त्यानं आतून एक लाकडी केस आणून दाखवली.
जिनहाओ - छोटे छोटे लाल डोळे असलेल्या बाकदार ड्रॅगनचं हूक आणि उत्थित चिनी अक्षरे, आकृत्यांनी सजवलेला फिकट राखाडी शाईपेन - व्वॉव्व!
मी आपलं घिसाडघाईत खस्स्कन झाकण उघडलं. सुरी हातात घ्यावी तसं वाटतं होतं.
दुकानदार महाशय जे पेटले ते तसं झाकण उघडलेलं पाहून, अरारा!
''आपके पास कितने पेन है? आपको ठिक से ढक्कन खोलना नहीं आता.'' मी चमकलो. नाटकी आवेशात हात जोडून म्हणालो -
''महाराज आपही कृपा करो''
पुन्हा त्याचा भडीमर - ''मुझसे कुछ सिख के जाईये, आप क्या खाक कलेक्शन में इसे रखोगे, इधर, इधर दिजीए. मै सिखाता हुं.'' म्हणून त्यानं एका हाताच्या तीन बोटांच्या आधारावर तर्जनी व अंगठ्यात शाईपेन पकडून, पायात मोडलेला काटा काढावा तसं हळुवार झाकणावर दाब दिला. क्लिक् ! वाजलेलं आम्हालासुद्धा ऐकू आलं.
''इसे ऐसा खोलते है, तलवार की तरह उखाडोगे तो इसका नीब् घीस घीस के खतम् हो जाता है, फिर इसमें मजा नहीं.. अब ये ध्‍यान में रखिए, यहांसे खरीद के ले गये तो भी...''
मग त्यानं त्या कोर्‍या पेनचं नीब् तसंच काळ्या शाईच्या दौतीत बुडवलं.. एकदोन रेषा काढून
''चलाईये, मख्खन की तरह चलता है''
ते पुरेसं वजनदार शाईपेन स्वत:च चालत असाव तसं हळुवारपणे नीब् मधून काळ्याभोर बाकदार महिरपी चितारु लागलं. आपण खलास! आत्मशून्याकडंही पेन दिलं - तो म्हणे अक्षर चांगलं नाहीय रे, तुच लिही. म्हटलं बघ तर. त्यानंही चालवून पाहिलं. तो म्हणे सेल्फ गायडेड मिसाईल आहे.
''चीज़ ही ऐसी रखतें है, हाथ में लोगे तो वापस नहीं रख पाओगे. जिंदगी गुजर गई कलम की दुनिया में, मै कोई दुकानदार लगता हुं?''
दुकानदार जबराट माणूस होता, ही खास इंदौरी दुकानदारी होती. दाम भी वाजिब, मुनाफा भी खरा. ग्राहकी नहीं, जैसे अपने ही घरवालों को कुछ बेच रहे हो. और जाओगे भी कहां?
काही बोलण्‍यासारखं नव्हतंच, पण एवढं ज्ञान मिळाल्यानंतर महाराष्‍ट्रातले लोकही कृतज्ञ असतात, हे त्याला जाणवावं म्हणून म्हणालो -
''आप भी फाऊंटन के चहेते है.. कितने तक के फाऊंटन पेन रखते हैं...''
तो काही बोलला नाही - आत निघून गेला. त्या फारशा झकपट नसलेल्या त्याच्या दुकानाबद्दलच्या कात्रणांचे बाड घेऊन परत आला. हिंदुस्तान टाइम्स, ‍दैनिक भास्कर, दबंग ‍दुनियाची कात्रणे काऊंटरवर विखरुन टाकत -
''ये डेढ लाख, ये दो लाख.. ये साडेसात लाख''
इंदुरमध्‍ये तो लाख लाख रुपयांचा शाईपेन आला तेव्हा तेव्हा बातम्या आलेल्या होत्या.
''हमें तो आप जैसे परखी मिल जाए, ‍दुनिया के किसी भी कोने से जो चाहे वो फाऊंटेन पेन मँगवा लेते है''
''ये अपने बस की बात नहीं.. मै तो बस ऐसे ही..'' वाक्ये आपोआप बाहेर पडली.
''हम किसलिए है, इसीलिए सभी की बस की चीज़ लिए बैठे है...''
आता त्यानं रजिस्टर काढलं.
''ये कौन है? प्रोफेसर श्रीवास्तव, इन्होंने डेढ हजार का लिया है, ये हमारे डाक्‍टर शुक्ला, आठ सौ का, ये यहां देखीए एडवोकेट भाटिया..
शोधूनशोधून तो नावं बघायला लावत होता.. डेढ हजार.. ये हमारे सालों से ग्राहक है.. पसंदीदा चीज आ जाए, तो बस इन्हे फोन करने की देरी.. आकर ले जाते है...''
''बस, बस.. बस..इसको पैक कर दिजीए.. और आपका कार्ड हो तो दे दिजीए..''
कार्ड काही छापली नव्हती की संपली होती माहित नाही. रजिस्टरमध्‍ये नाव, फोन नंबर लिहून घेतला. शाईपेन कॅरीबॅगेत टाकलं, पैसे दिले.
''कुछ ऐसा ही आये तो जरुर बताईये.. मै आ जाऊंगा.''
''मार्च के एंड में नया माल आनेवाला है, फोन करुंगा''
''धन्यवाद!'' म्हणून बाहेर पडू लागलो.
''और एक बात..'' त्याला काहीतरी सांगायचं असावं.
हात जोडून म्हटलं, ''महाराज!''
''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?''
खळखळून हसलो आणि जोडलेले हात डोक्यापर्यंत नेऊन झटकन् दुकानाबाहेर पडलो.

मांडणीकथासमाजजीवनमानराहती जागाप्रतिसादआस्वादअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

गवि's picture

22 Mar 2012 - 3:36 pm | गवि

लव्हली..

-(यकुफॅन) गवि..

मिपवर असे किति यक्कु आहेत? कि हि काहि पदवी वगैरे आहे?

किचेनकाकू/ताई, केलात ना माझा बल्ल्या ऽ !
यक्कू एकटाच आहे, तो उगी सतत जिकडे तिकडे यक्कू, यक्कु लिहित रहातो..
तो यक्कु मीच आहे, ही अशी नावंपण बदलतो नेहमी.. सगळे दुर्गुण भरलेला महाहलकट माणूस आहे तो.. डोंट वरी :)

लोक तुम्हाला यक्कु म्हणतील असा काही शाप मिळाला आहे का तुम्हाला ?

पेनाचा किस्सा भन्नाट. :)

मी-सौरभ's picture

22 Mar 2012 - 11:23 pm | मी-सौरभ

अरे भावा,
तू तुझ्या लहानपणि 'चंद्रकांता' नावाची मालिका पहिलेली दिसत नाहीस.
त्यातल्या क्रूरसिंग चा हा मिपावतार आहे रे.

प्यारे१'s picture

22 Mar 2012 - 3:39 pm | प्यारे१

मख्खन ...

शैलेन्द्र's picture

22 Mar 2012 - 3:42 pm | शैलेन्द्र

आवडला आपल्याला हा प्राणी... याला म्हणतात निष्ठा..

अशीच दर्यादीली, सराफा बाजारातल्या त्या दहीवडावाल्याकडे आहे.. बहुदा भट नाव आहे का त्याचं?

मनराव's picture

22 Mar 2012 - 3:48 pm | मनराव

भारी........

मी-सौरभ's picture

22 Mar 2012 - 3:58 pm | मी-सौरभ

किस्सा आवडेश :)

पैसा's picture

22 Mar 2012 - 4:01 pm | पैसा

दुकानदार पण खास इंदुरी आणि लेखन खास यशवंत श्टाईल! वा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Mar 2012 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा....! सालं हा यक्कु लिहितो लै बेष्ट.

-दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी's picture

22 Mar 2012 - 4:30 pm | सर्वसाक्षी

किस्सा आवडला.

मस्त सही किस्सा आवडला.
क्या बात है
मस्त

अच्छा तर म्हणुन आयडि बदलला होय,

बाकी किस्सा भारीच होता, असे काही मोह होउ नये म्हणुन मी हल्ली असली दुकानंच टाळतो. शेवटचं पेन घेतलं ते जयंतसरांना देण्यासाठी, त्यानंतर या उद्योगाला गेलो नाही. आता परत खुमखुमी आली आहे.

यकु, येताना माझ्यासाठी एक घेउन ये, तुझ्या लग्नपत्रिकेवर नावं टाकुन देईन त्या पेनानं.

मालोजीराव's picture

22 Mar 2012 - 5:45 pm | मालोजीराव

असे काही मोह होउ नये म्हणुन मी हल्ली असली दुकानंच टाळतो

अगदी अगदी...सेम हियर...लिखाण आणि शैली जबराट एकदम...सलाम तुम्हाला यशवंतराव

- मालोजीराव

चिंतामणी's picture

24 Mar 2012 - 4:02 pm | चिंतामणी

>>>तुझ्या लग्नपत्रिकेवर नावं टाकुन देईन त्या पेनानं.

तुझ्या लग्नपत्रिकेवर म्हणजे ............................

५० फक्त's picture

27 Mar 2012 - 12:03 pm | ५० फक्त

एकदा भेटु वैद्यांच्याकडे खुलाशासाठी, कधी या शुक्रुवारी जमवायचं का ?

प्रास's picture

22 Mar 2012 - 4:56 pm | प्रास

तुस्सी ग्रेट हो.....!

आयला, कुणी तरी सांगा रे याला, स्साला, काय नि कसली भाषांतरं करून जबरदस्त लेखन-प्रतिभा फुक्कट घालवतोय.....

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2012 - 8:17 pm | अत्रुप्त आत्मा

@काय नि कसली भाषांतरं करून जबरदस्त लेखन-प्रतिभा फुक्कट घालवतोय....>>>++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

सहज's picture

22 Mar 2012 - 5:15 pm | सहज

किस्साकथन आवडले!

लेखकाच्या भाषेला भारदस्तपणा आलेला आहे हे स्पष्ट जाणवले. किस्सा आवडला.

श्रावण मोडक's picture

22 Mar 2012 - 7:19 pm | श्रावण मोडक

भाषेच्या भारदस्तपणाविषयी सहमत.
या किश्शावर गाडी थांबवू नकोस. हा माणूस व्यक्तिचित्राचा आहे.

चिंतामणी's picture

22 Mar 2012 - 5:41 pm | चिंतामणी

"इंदुरी दुकानदारीची एक झलक:" आवडली.

अन्या दातार's picture

22 Mar 2012 - 5:42 pm | अन्या दातार

स्सही किस्सा! शौकिन असावं तर या दुकानदारासारखं. उगीच गोळ्या-चॉकलेटं विकल्यासारखे पेन विकत बसला नाही. यासाठी लागते ती पॅशन! पोटार्थ्याचे काम नाही हे.

जाता जाता: सुधांशु यांचा शाईपेनावरचा लेख काय आला, सगळ्यांच्याच लेखण्या झरझरु लागल्या की. :)

चिगो's picture

23 Mar 2012 - 3:54 pm | चिगो

हेच म्हणतो. खरा दर्दी दुकानदार आहे, राव..

>>''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?''

ह्याला म्हणतात पॅशन.. "विकलाय ना आता, मग काय करायचं ते कर." ही वृत्ती नाही बंद्यात.. साला, ही असली पॅशन, आपल्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल आत्मीयता (ह्यातूनच कधीकधी गर्वाचा भास होत असला तरी) असली तर मग खरी मजा येते..

चाणक्य's picture

22 Mar 2012 - 5:53 pm | चाणक्य

आवडला. दुकानदार खरा पेन चा चाहता दिसतोय

प्रचेतस's picture

22 Mar 2012 - 6:34 pm | प्रचेतस

झकास.
यकु रॉक्स.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2012 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम ओघवते लिखाण.

संगणकाच्या जमान्यात तुम्हा दोघांचे (तूम्ही आणि दुकानदार) पेनावरचे प्रेम बघून खूप आनंद झाला.

नंदन's picture

22 Mar 2012 - 11:55 pm | नंदन

सहमत आहे. लेख आवडला.

चित्रा's picture

23 Mar 2012 - 7:09 am | चित्रा

सहमत आहे. लेख आवडला. !

धनंजय's picture

25 Mar 2012 - 8:23 pm | धनंजय

+१
दुकानदार दर्दी दिसतो.

यक्कुशेठ, मला पण एक फांऊटन पेन पाहिजे. पुण्यनगरीत कधी येणार आहेस ते सांग? म्हणजे ऑर्डर बुक करता येइल.. :)

- (फांऊटन पेन आणि यक्कु दोघांचा पंखा) पिंगू

मस्त अनुभव.
फाऊंटन पेन मलाही आवडते पण सांभाळणे ही एक पेन असते.
तुमच्या पेनाचा फोटू डकवा की 'महाराज'.;)


चित्र जालावरुन विनाआभार

सर्वांचे खूप खूप आभार. :)

(आनंदीत) यक्कु

बॅटमॅन's picture

22 Mar 2012 - 7:40 pm | बॅटमॅन

सही हो यकु!! मस्त लेख.दुकानदाराचे चित्र डो ळ्यांसमोर उभे राहिले एकदम!

मोहनराव's picture

22 Mar 2012 - 7:58 pm | मोहनराव

सही किस्सा!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Mar 2012 - 8:23 pm | अत्रुप्त आत्मा

अरे शापित गंधर्वा,,, मलापण जगण्यावर असेच पूर्ण प्रेम करायचा एक शाप दे ना...!
बाकी काय बोलू...? नेहमीची प्रतिक्रीया देतो आधी... यक्कूशेठ खतम झालो हाय...! आणी मे महिन्यात काय वाट्टेल ते झालं तरी इंदौरला खतम होण्यासाठिच येणार हाय...!

प्रचेतस's picture

22 Mar 2012 - 10:24 pm | प्रचेतस

मलापण जगण्यावर असेच पूर्ण प्रेम करायचा एक शाप दे ना...!

तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. एकदाचे काय ते त्रुप्त व्हा. मग शाप वैग्रे द्यायची काही जरूर नाही.

इंदौरला खतम होण्यासाठिच येणार हाय..

आत्मा अमर, अविनाशी असतो ना? मग खतम कसा होईल?

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2012 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. एकदाचे काय ते त्रुप्त व्हा. मग शाप वैग्रे द्यायची काही जरूर नाही. @आत्मा अमर, अविनाशी असतो ना? मग खतम कसा होईल? >>> दुष्ट... दुष्ट... दुष्ट... अग्यावेताळ...
तुंम्ही जिवंत माणस आंम्हा लोकांच्या मधे कशाला पडता हो...? तो यक्कू आणी मी आत्मू ;-)

प्रचेतस's picture

24 Mar 2012 - 6:19 pm | प्रचेतस

तुमच्यासारखे आत्मे जेव्हा आमच्यासारख्या मनुक्ष्यांच्या आसपास घुटमळायला लागतात तेव्हा आम्हाला मध्ये पडणे भाग असते हो.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2012 - 10:22 pm | अत्रुप्त आत्मा

@तेव्हा आम्हाला मध्ये पडणे भाग असते हो.>>> ब्वार...ब्वार... पडा,पण चिडु नका ;-)

अता आंम्ही अ***** ऐवजी मांत्रिकवल्ली म्हणणार... ;-)

दादा कोंडके's picture

23 Mar 2012 - 12:14 am | दादा कोंडके

_/\_ यकुशेठ!

किसन शिंदे's picture

23 Mar 2012 - 12:25 pm | किसन शिंदे

किस्सा मस्तच रे यकु! आणि लिहलंय सुध्दा ब्येष्टच.
पण आयडी कधी बदली केलास?

यशोधरा's picture

23 Mar 2012 - 3:11 pm | यशोधरा

लेख एकदम आवडला.

क्या बात.. मस्त किस्सा रे.

क्या बात.. मस्त किस्सा रे.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

23 Mar 2012 - 8:19 pm | भीमाईचा पिपळ्या.

मस्त किस्सा यशवन्ता. ज्यान्च्या लिखाणावर जीव ओवाळून टाकावा अशी दोन माणसे मिपाचे एक गवि आणि दूसरा येसू.

स्वाती दिनेश's picture

23 Mar 2012 - 8:34 pm | स्वाती दिनेश

किस्सा आवडला,
अवांतर- शाई पेनाने लिहून युगं लोटली.. :( शाळेत असताना शाई पेनाने लिहिणे मस्ट असायचे,त्यातही हिरोपेनने लिहिणे म्हणजे एकदम भारी.. मग पुढे पायलट पेन्स आली आणि रेनॉल्ड ची बॉलपेनं आली आणि मग फाउंटनपेने मागेच पडायला लागली.
स्वाती

मन१'s picture

23 Mar 2012 - 9:09 pm | मन१

पेन्-फुल(pen ful) किस्सा आवडला.
दुकानात यकु पेनने टर उडवला गेलेला पेन्टर(पेन टर) ठरतो की कायसे वातून गेले.

RUPALI POYEKAR's picture

24 Mar 2012 - 3:24 pm | RUPALI POYEKAR

मस्तच किस्सा

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2012 - 10:56 pm | बिपिन कार्यकर्ते

छानच!

मितभाषी's picture

25 Mar 2012 - 4:44 pm | मितभाषी

असेच म्हणतो.

सुहास झेले's picture

26 Mar 2012 - 12:20 am | सुहास झेले

सही रे !! :) :)

प्रसाद प्रसाद's picture

26 Mar 2012 - 6:00 pm | प्रसाद प्रसाद

किस्सा उत्तम, तो कथन करण्याची तुमची लेखनशैलीही उत्तम.
असल्या भारी फाऊंटन पेनची (ड्रॅगनचं हूक इ.) किंमत काय होती ते नाही सांगितली...... (बरीक इंटरेस्ट हो)

लेख आणी प्रतिसाद दिसत नाहीत

सुर's picture

30 Nov 2012 - 11:29 am | सुर

धन्यवाद