पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

पुष्कर's picture
पुष्कर in जनातलं, मनातलं
11 Jul 2008 - 6:34 pm

परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!

-( पटकथा - पुष्कर)

कथाबालकथाप्रतिशब्दभाषामुक्तकव्युत्पत्तीशब्दक्रीडासाहित्यिकमौजमजालेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

11 Jul 2008 - 6:58 pm | ब्रिटिश टिंग्या

'प'चा पार्ट पसंत पडला!

('प'प्रेमी) पिंट्या ;)

अभिरत भिरभि-या's picture

11 Jul 2008 - 7:08 pm | अभिरत भिरभि-या

तुमची प्रतिभा एकदम पाप आय मीन बाप आहे

प्राजु's picture

11 Jul 2008 - 7:08 pm | प्राजु

पुष्करला पंतांचा परमेश्वर पावला. पुष्करने पंतांना पुरंदरला पाठवले पण पुष्कर पावमिसळवर पहाटे पासून पासरला...(ह्.घे.)
मस्त आहे वर्णन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

11 Jul 2008 - 7:09 pm | सहज

पटकथाकार पुष्करनी पंत, पोलीस, पंकजला पळवुन पळवुन पब्लीकला पार पिडलं.

पाचकळपणा पुरे. ;-)

पुष्कर's picture

12 Jul 2008 - 11:16 am | पुष्कर

हे मात्र मनापासून पटलं. याबाबतीत आमची प्रतिभा जरा कमीच पडली.

छोटी चिंगी, मिरमिर्‍या, प्राजू आणि सहज, मनापासून आभार..

लंबूटांग's picture

11 Jul 2008 - 11:25 pm | लंबूटांग

पुष्कळ प पाहून प्रचंड प्रभावित !!

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 7:37 am | विसोबा खेचर

मस्त लिहिलं आहे, मौज वाटली! :)

अनिल हटेला's picture

12 Jul 2008 - 9:41 am | अनिल हटेला

प -प -प प !!!

पुष्कर !!

पूरे !!

पण!!!

प्याक!!!

म्हणजे झ्याक!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

पुष्कर's picture

12 Jul 2008 - 11:23 am | पुष्कर

प्रतिभावंतांच्या प्रेमळ प्रतिसादांमुळे प्रेरित!

-पुष्कर

पुष्कर's picture

13 Jul 2008 - 7:39 pm | पुष्कर

पुढचा पार्ट प्रकाशितोय पहा.

भडकमकर मास्तर's picture

13 Jul 2008 - 8:51 pm | भडकमकर मास्तर

प्रतिभावान प्रप्रतिम...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/