मिसळपाव प्रतिष्ठान..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
26 May 2009 - 2:18 pm

राम राम मंडळी,

संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे. आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा यांच्या कृपाशीर्वादामुळे येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत!

वरील देवतांच्या कृपेमुळे जगभरातून अनेकानेक दानशूर मराठमोळ्या मंडळींचे मदतीचे हात पुढे आले आहेत, येताहेत, त्यातूनच मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था उभी राहणार आहे!

मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे -

१) संगीत, साहित्य व कला यांच्याशी निगडीत नानाविध कार्यक्रम प्रामुख्याने मुबै-पुण्यात व कोणी जबाबदारी घेणार असल्यास जमल्यास जगभरातदेखील करणे. मिसळपाव प्रतिष्ठानला योग्य वाटल्यास संगीत, साहित्य व कला यांच्याशी निगडीत इतर काही कार्यक्रमही प्रायोजित करणे,

२) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे,

३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे.

४) मिसळपाव प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एक ठराविक रक्कम भारयीत सैन्य दलाला देणे,

५) मिसळपाव प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एक ठराविक रक्कम पुण्यातील महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था आणि इंडियन कॅन्सर सोसायटी या संस्थांना देणे.

मिसळपाव डॉट कॉम ज्या प्रमाणे आंतरजालावर मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करत आहे, त्याचप्रमाणे मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था नुसती आभासी किंवा ऑनलाईन न राहता संगीत, साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करेल.

आदिशक्ति आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहेतच, परंतु मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..!

मिसळपाव धर्म वाढावा
मिसळपाव धर्म जागवा..!

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
१) मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम
२) प्रमूख कार्यकारी विश्वस्त (संकल्पित),
मिसळपाव प्रतिष्ठान.

कलानृत्यसंगीतसंस्कृतीनाट्यवाङ्मयप्रकटनमाहिती

प्रतिक्रिया

अनंता's picture

26 May 2009 - 3:03 pm | अनंता

मदत करायला अवश्य आवडेल!
तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 4:03 pm | विशाल कुलकर्णी

व्वा तात्या, अभिनंदन. खुप चांगली संकल्पना आहे. आम्हालाही आपाप्ल्या परीने हातभार लावायला मनापासुन आवडेल.

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री

विनायक पाचलग's picture

26 May 2009 - 7:31 pm | विनायक पाचलग

कोल्हापुर विभागात काम करायला मनापासुन अवडेल

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

मेघना भुस्कुटे's picture

26 May 2009 - 3:03 pm | मेघना भुस्कुटे

वा वा तात्या, सुंदर बातमी. मनःपूर्वक शुभेच्छा!

आनंदयात्री's picture

26 May 2009 - 3:16 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो तात्या. अभिनंदन !!
चला आता पुण्यातली कामे सांगा.

छोटा डॉन's picture

26 May 2009 - 3:26 pm | छोटा डॉन

तात्यांचे अभिनंदन असेच म्हणतो.

आमच्या करण्यायोग्य काही कामे असल्यास अवश्य कळावावे.
संगीत वगैरे आमच्या बस की बात नाही पण कला, साहित्य ह्यात आम्ही जरुर ४ हात मारु शकतो ...

जेव्हा केव्हा असे काही येईल तेव्हा जरुर साद घालावी.
तुर्तास शुभेच्छा ...!!!!

------
( शुभेच्छुक ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नंदन's picture

27 May 2009 - 9:16 am | नंदन

सहमत आहे, उत्तम बातमी. शक्य तितकी मदत करायला नक्कीच आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2009 - 3:04 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा... सवडीने बोलतो.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

26 May 2009 - 3:07 pm | स्वाती दिनेश

तात्या, बातमी वाचून आनंद झाला, संकल्पाला मनापासून शुभेच्छा!
स्वाती

दिपक's picture

26 May 2009 - 3:19 pm | दिपक

तात्या, बातमी वाचून आनंद झाला, संकल्पाला मनापासून शुभेच्छा!
हेच म्हणतो..
खुप खुप शुभेच्छा मिसळपावची भरभराट होवो :)

मराठमोळा's picture

26 May 2009 - 3:09 pm | मराठमोळा

तात्या तुमचे व सर्व मिपाकरांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन.
=D> =D> =D> =D> =D>

खुप आनंद झाला. त्रिवार अभिनंदन. खुप छान उपक्रम आहे.
मला यासाठी काही करता आले तर आनंदच होइल. मार्गदर्शन करावे.

माझ्या माहितीप्रमाणे ९ एप्रिल २००९ ला मिपाला अंतर्जालावर २ वर्षे झाली एवढे वृद्धींगत झाले हे संस्थळ.
त्यातच भर म्हणुन मिसळपाव प्रतिष्ठान ची स्थापना. हा उपक्रम भरगोस यश प्राप्त करो हीच सदिच्छा!!!

पुन्हा एकदा अभिनंदन!!!!!!

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मस्त बातमी.

मिसळपाव धर्म वाढावा
मिसळपाव धर्म जागवा..!

धनंजय's picture

27 May 2009 - 12:19 am | धनंजय

ध्येयधोरणे आवडलीत.

अभिनंदन आणि शुभेच्छा.

सूहास's picture

26 May 2009 - 3:11 pm | सूहास (not verified)

<<<मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..!>>>

काय तात्याहे !!!आपण मोठे आहात मानाने ही आणी मनाने. आम्ही काय आशीर्वाद देणार..आपल्या सक॑ल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा!

बाकी

मदत करायला अवश्य आवडेल!
तात्या, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!

हेच म्हणतो.........

सुहास
पेश॑ट :डॉक्टर, मला अलीकडे स॑डा*ला होत नाही..
डॉक्टर : ठीक आहे ,मग पलीकडे बसत जा....

श्रावण मोडक's picture

26 May 2009 - 3:13 pm | श्रावण मोडक

शुभेच्छा. ध्येयधोरणे आवडली.

शाल्मली's picture

26 May 2009 - 3:14 pm | शाल्मली

तात्या,
छान बातमी.
नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा!

--शाल्मली.

सचिन बडवे's picture

26 May 2009 - 3:14 pm | सचिन बडवे

नविन संकल्पाला खुप खुप शुभेच्छा !!!
नक्किच या कार्याला हातभार लावायला आवडेल. लवकरच व्यनि करुन तुम्हास कळवितो.

सचिन

सुनील's picture

26 May 2009 - 3:15 pm | सुनील

उत्तम संकल्पना. सक्रीय सहभाग घ्यायला आवडेल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धमाल मुलगा's picture

26 May 2009 - 3:20 pm | धमाल मुलगा

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आवडला.
कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी.

ह्या नव्या निर्णयाबद्दल अभिनंदन आणि प्रतिष्ठानास शुभेच्छा!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

निखिल देशपांडे's picture

26 May 2009 - 3:25 pm | निखिल देशपांडे

तात्या मस्तच उपक्रम आहे हा....
कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी.
माझा पण हाच प्रश्न आहे??? बाकी काय भी काम सांगा आपण तयार आहोत करायला
==निखिल

अमोल केळकर's picture

26 May 2009 - 3:22 pm | अमोल केळकर

आपल्याला हार्दीक शुभेच्छा
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

मोहन's picture

26 May 2009 - 3:30 pm | मोहन

तात्या

मनापासुन शुभेच्छा. मिसळपाव असेच "वाढता वाढता वाढे ... " होवो.

मोहन.

Meghana's picture

26 May 2009 - 3:34 pm | Meghana

अभिनंदन

ऋषिकेश's picture

26 May 2009 - 3:35 pm | ऋषिकेश

वा! सुंदर कल्पना/योजना. सक्रिय पाठिंबा राहिलच
तुर्तास अनोकोत्तम शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

शिप्रा's picture

26 May 2009 - 3:38 pm | शिप्रा

तात्या अभिनंदन व नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा!

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2009 - 3:44 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या संकल्पना खुपच आवडली.
आणी त्याहुन मुख्य म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ही आपली कृती जास्ती भावली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सायली पानसे's picture

26 May 2009 - 3:57 pm | सायली पानसे

तात्या नविन संकल्पासाठी हार्दिक अभिनंदन आणि मनापासुन शुभेच्छा!

निखिलराव's picture

26 May 2009 - 4:00 pm | निखिलराव

तात्या,
नवीन संकल्पाला मनापासून शुभेच्छा!

मीनल's picture

26 May 2009 - 4:11 pm | मीनल

ग्रेट जॉब.
मनःपूर्वक शुभेच्छा!

मीनल.

अ-मोल's picture

26 May 2009 - 4:13 pm | अ-मोल

शुभेच्छा!

कपिल काळे's picture

26 May 2009 - 4:13 pm | कपिल काळे

झकास.
पुण्यातील कामे सांगा.

घासू's picture

26 May 2009 - 4:20 pm | घासू

नविन सकंल्पास हार्दिक शुभेच्छा!

विकास's picture

26 May 2009 - 4:35 pm | विकास

अभिनंदन तात्या!

=D>

ही सुवार्ता ऐकून खूप आनंद झाला. आमचा सक्रीय सहभाग राहील.

"आधी केले मग सांगितले" हे आपण परत एकदा आचरणाने दाखवून दिलेत!

योगी९००'s picture

26 May 2009 - 4:49 pm | योगी९००

तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा..!!

कृपया ह्या कार्यात आम्हाला हातभार कसा लावता येईल ह्याची माहिती द्यावी.

खादाडमाऊ

स्मिता श्रीपाद's picture

26 May 2009 - 5:18 pm | स्मिता श्रीपाद

तात्या,

अभिनंदन आणि शुभेच्छा....

-स्मिता

अभिज्ञ's picture

26 May 2009 - 5:25 pm | अभिज्ञ

तात्या,

नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

विंजिनेर's picture

26 May 2009 - 5:27 pm | विंजिनेर

मिसळपावसारख्या "काव्यशास्त्रविनोदार्थ" चालवल्या जाणार्‍या संकेतस्थळाला आणि पर्यायाने इथल्या रहिवाशांना/आगंतुकांना "वास्तवात" घेऊन जाणार्‍या तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!
शुभाऽस्ते पंथानः सन्तु!

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

अवलिया's picture

26 May 2009 - 5:36 pm | अवलिया

वा! मस्त !!
मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे अतिशय योग्य.
नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2009 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा !!!

-दिलीप बिरुटे

प्रमोद देव's picture

26 May 2009 - 6:22 pm | प्रमोद देव

मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा !!!

:)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

हर्षद बर्वे's picture

26 May 2009 - 6:16 pm | हर्षद बर्वे

वा ! वा !
एकदम झकास....अतिशय उत्तम संकल्पना....

एच.बी.

श्रीयुत संतोष जोशी's picture

26 May 2009 - 6:16 pm | श्रीयुत संतोष जोशी

तात्या !!!!!!
क्या बात है !!!!
"लक्ष्मी केशव कार्यालय ठाणे " अशा चांगल्या कार्यक्रमांसाठी नेहमीच विनामूल्य उपलब्ध असेल याची खात्री बाळगा.
काही महान व्यक्तींचे पाय त्या निमीत्ताने माझ्या जागेला लागतील तेव्हढं पुरेसं आहे.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सँडी's picture

26 May 2009 - 6:24 pm | सँडी

छान संकल्प!
नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

अभिनंदन, शुभेच्छा आणी सहभाग

शशिधर केळकर's picture

26 May 2009 - 6:35 pm | शशिधर केळकर

आता लक्षात आले, गेले काही दिवस तात्या अतिशय कामात होते, ते कोणते!
उपक्रम चांगलाच आहे; 'हाती घ्याल ते तडीस न्या' असे साधारणपणे करायला तुम्हाला जमत असल्यामुळे हाही उपक्रम उत्तम पुढे जाईल यात शंका नाही.
मी टांझानिया मधे असतो. इथे संगीत विषयक काही कार्यक्रम करण्यासारखा असेल तर जरूर सांगा.
कलाप्रेमी शशिधर

संदीप चित्रे's picture

26 May 2009 - 6:40 pm | संदीप चित्रे

हार्दिक अभिनंदन तात्या.
या उपक्रमासाठी मदत करणं नक्की आवडेल.
सविस्तर नंतर बोलू
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

सुबक ठेंगणी's picture

26 May 2009 - 6:45 pm | सुबक ठेंगणी

मन:पूर्वक अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा! =D>
अवांतर: आता माझी ख. व. आणि व्य. नि. कधी सुरु होतात कुणास ठाऊक!:W

स्वाती२'s picture

26 May 2009 - 6:45 pm | स्वाती२

छान उपक्रम तात्या!
अनेक शुभेच्छा! मदत करायला नक्की आवडेल.

क्रान्ति's picture

26 May 2009 - 7:25 pm | क्रान्ति

प्रतिष्ठानला हार्दिक शुभेच्छा. ध्येयधोरणे आणि उद्दिष्टांबद्दल काय बोलावे! अत्यंत उच्च अभिरुचीसंपन्न उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन तात्या. =D> =D>
[मदतीसाठी सदैव तत्पर ] क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

चित्रा's picture

26 May 2009 - 7:27 pm | चित्रा

प्रतिष्ठानाला शुभेच्छा, आणि अभिनंदन!

प्राजु's picture

26 May 2009 - 7:44 pm | प्राजु

खूप छान. माझ्या हार्दिक शुभेच्छा!
जशी जमेल तशी मदत नक्कीच करेन या प्रतिष्ठानला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवराव's picture

26 May 2009 - 8:33 pm | केशवराव

खरोखरच छान उपक्रम !
पाहिजे ती मदत करण्यास तयार !
सविस्तर नंतर बोलूच !!
केशवराव .

सूर्य's picture

26 May 2009 - 10:14 pm | सूर्य

मनापासुन शुभेच्छा..

- सूर्य.

घाटावरचे भट's picture

26 May 2009 - 10:24 pm | घाटावरचे भट

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

पिवळा डांबिस's picture

27 May 2009 - 12:17 am | पिवळा डांबिस

मिसळपाव प्रतिष्ठानला आमच्या शुभेच्छा!!!

संकल्प सिद्धीस जावो ही सदिच्छा! :)

२) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे

ह्या बद्दल एक विचार मांडतो -बुजुर्ग व्यक्तिमत्व निवडताना शक्यतोवर ज्यांनी त्यांच्या उमेदीत काही मौलिक देणे दिले आहे पण सध्या ते विस्मरणात गेलेले आहेत (वयाने म्हणा, आता काम करत नसल्याने म्हणा, प्रसिद्धीपराङमुखतेमुळे म्हणा) अशा व्यक्तींची निवड व्हावी. अशी माणसे बर्‍याचदा गेल्यावरच त्यांची ओळख जगाला व्हायची शक्यता असते आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही.

चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 May 2009 - 9:13 am | डॉ.प्रसाद दाढे

हार्दिक शुभेच्छा! नक्की मदत करू!

साक्षी's picture

27 May 2009 - 9:31 am | साक्षी

हार्दिक शुभेच्छा!
जमेल तशी मदत करण्याची ईच्छा आहे.

~साक्षी

यन्ना _रास्कला's picture

27 May 2009 - 10:00 am | यन्ना _रास्कला

संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.

नोंदनी कर्मांक आनी पता दीलात त पैसा पन पाटवु. करामधे सवलत मिलल काय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

दशानन's picture

27 May 2009 - 11:35 am | दशानन

नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

थोडेसं नवीन !

जागु's picture

27 May 2009 - 11:40 am | जागु

वा खुप छान उपक्रम. मदत करायला आवडेल.
शुभेच्छा.

मनीषा's picture

28 May 2009 - 11:50 am | मनीषा

अभिनंदन आणि शुभेच्छा !

वेताळ's picture

28 May 2009 - 11:59 am | वेताळ

मलाही आपल्याला ह्या कामात मदत करता आली तर खुप आनंद होईल. काय मदत करता येईल ह्याबद्दल आवश्य कळवा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

१.५ शहाणा's picture

29 May 2009 - 9:05 am | १.५ शहाणा

तात्या, नविन संकल्पाला मनापासून शुभेच्छा

'मिसळपाव प्रतिष्ठान' ला मनापासून शुभेच्छा.
कसली ही मदत करायला तयार, नक्की सांगा.

# येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत!# ह्याचा काही समारंभ होणार आहे का होणार असल्यास कुठे होणार आहे हे कळले तर हजर राहायला नक्की आवडेल.

सुर तेच छेडीता......
:) Waiting For Good Luck To Come In My Life :)

भोचक's picture

29 May 2009 - 6:32 pm | भोचक

तात्या,
मिसळपाव प्रतिष्ठानच्या संकल्पाला हार्दिक शुभेच्छा.
तुमची ध्येयधोरणेही आवडली. त्यासाठी सक्रीय मदत करायलाही नक्की आवडेल. त्यामुळे मदतीसाठी आवर्जून आम्हालाही याद करा.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

बाकरवडी's picture

30 May 2009 - 10:26 am | बाकरवडी

अभिनंदन आणि शुभेच्छा!! :)

प्रश्नच नाही जोरात काम चालू करा.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

शार्दुल's picture

30 May 2009 - 11:58 am | शार्दुल

हार्दिक अभिनंदन तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2009 - 12:34 pm | प्रकाश घाटपांडे

प्रतिष्ठानची ध्येय धोरणे वाचुन समाधान वाटले. केवळ आभासी स्वरुप नाही. मातीशी नाते जोडलय बघुन बरे वाटले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आशु जोग's picture

28 Sep 2011 - 11:15 pm | आशु जोग

>> ३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे <<

अशा दर्जाचे लेख आले तर आनंद होइल.

अलिकडे प्रतिसाद तर फारच भन्नाट असतात

शाहिर's picture

29 Sep 2011 - 12:35 am | शाहिर

एकोळी धागे आणि दुसर्या ठिकाणच्या लिंक सुद्धा फार च वैतागवाण्या असतात ना

आशु जोग's picture

1 Oct 2011 - 2:53 pm | आशु जोग

शाहीर

विषय आणि तुम्ही लिहिताय काय !

विसोबा खेचर's picture

29 Sep 2011 - 10:22 am | विसोबा खेचर

तूर्तास तरी माझ्याकडून प्रतिष्ठानबद्दल काहीही होण्यासारखे नाही. परंतु आज ना उद्या होईल हेही तेवढेच निश्चित..!

हा धागा मुख्य पटलावर आल्यामुळे हा खुलासा..

तात्या.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Oct 2011 - 3:10 pm | अविनाशकुलकर्णी

मिसळपाव प्रतिष्ठानला आमच्या शुभेच्छा!!!

नमस्कार तात्या

बरेच दिवसांनी लेखन भेट होते आहे. फार वर्षापूर्वीपासून मी तुमचे लिखाण वाचतो आहे.

बर्‍याच वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या एका प्रश्नाला माहितीपूर्ण उत्तर देखील दिले होते.
(मिसळपाववर नक्कीच नाही कुठे ते नंतर सविस्तर लिहिन)

असो

गेले ते दिवस