डिस्क्लेमर: नाजुक तब्बेतीच्या मिपाकरांनी जरा इनो जवळ ठेवूनच हा धागा वाचण्याचे करावे.
नुकताच पुण्यनगरीत डेक्कनच्या पूनम नामक ‘तीर्थ’क्षेत्री एक कट्टा झाला. कट्टा नव्हे दंगा... नव्हे... नव्हे दंगलच झाली.
या या या, खी खी खी, ठो ठो ठो, ठॅ ठॅ ठॅ अश्या गोंगाटातच ही दंगल झाली.
या दंगलीचे दंगेखोर होते बिका, परा आणि योगप्रभू, बाकीचे सर्व (मि)पा(क)मर दंगलग्रस्त होते ;).
(मागच्या ओळख धाग्याचा कट्टा फारच सोवळ्यातला कट्टा होता. तेव्हा मी सर्वांना पहिल्यांदाच भेटणार असल्यामुळे सर्वजण सोवळ्यात आले असावेत अशी आता दाट शंका येतेय ;) )
या वेळी जे. पी. मॉर्गन याची भेट असे कट्ट्याचे कारण होते. बाकी कोण कोण येणार याचा काहीच अंदाज नव्हता. तर हजर असणारे आणि प्रथमच भेट्णारे मिपाकर होते योगप्रभू, जातीवंत भटका, जे. पी. मॉर्गन, मृत्यून्जय, असुर तर जुणॆ मिपाकर होते परा, बिका, धम्या, श्रामो आणि मी.
या दंगलीस कारणीभूत असलेल्या दंगेखोर मिपाकरांची आणि दंगलग्रस्त मिपाकरांची ही ओळख.
दंगेखोर
परा (परिकथेतील राजकुमार): या गृहस्थाशी, अरे नाही; मुंज्या आहे हा अजून, नव्यानेच ओळख झाली. ही ओळख अशी की “नभोवाणी केंद्र किंवा आकाशवाणी केंद्र”. हे केंद्र जसे 24*7 काही ना काही प्रसारीत करत असते तसा परा यावेळी काही ना काही प्रसारीत करत होता (की प्रसवत होता ;)). तेही त्याच्या ‘तार’वाणीने. बहुधा तो आधीच ‘कावेरी’ नामक तीर्थक्षेत्री जाउन ‘पावन’ होउन आला असावा, अशी दाट शंका मला आणि धम्याला अजूनही येतेय. या कट्ट्याचे सोवळे मोडून त्याचे दंगलीत रुपांतर करण्याची सुरुवात याने केली. अतिशय ‘भन्नाट’ जोक्स आणि किस्से सांगायला सुरुवात करुन. (लेका भन्नाटचे पुढचे भागही याच जोमात येउदेत की रे!)
बिपीन कार्यकर्ते: मागच्या भेटीत यांनी पुस्तक वगैरे भेट दिले होते हे मी जाहीर केले आणि यांची खरडवही दुथडी भरुन वाहुन गेल्यामुळॆ यावेळी ते असल्या फंदात पडले नाहीत (माझी सुपारी देणाच्या विचार त्यांनी केलेला आहेच, पण म्हणून मी भितो की काय...). तर यावेळी ते आले होते ‘अरेबिअन नाइट्स’ चा खजिना बरोबर घेउन, आणि या खजिना लुटीमुळेच दंगलीने उग्र रुप धारण केले. काय त्या एकेक अरबी उंटिणींच्या सुरस आणि चमत्कारीक कथा. अरबी मानवी (पक्षी:माणूस) विश्व त्यांनी उलगडून दाखविले :P पण त्यांचा संचार यावेळी फक्त अरबस्तानापुरता मर्यादित नव्हता. ‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीप्रमाणेच त्यांनी तमाम दंगलग्रस्तांना विश्वसंचार घडवून आणला. मानवी मनाच्या कंगोऱ्यांबरोबरच शारिरीक कंगोरेही उलगडून दाखावले, अगदी अलगद पदर (कांद्याचा हो) उलगडावा तसे. पण त्यामुळे दंगलीचा प्रभाव वाढतच होता आणि झिंग चढलेल्या जातियवादी नेत्याच्या आवेशात ते दंगलीला चिथावणी देत होते.
योगप्रभू: यांना मी प्रथमच भेटत होतो. आल्या आल्या यांनी अगदी खांद्यावर हात वगैरे टाकून अगदी पार चड्डीतली (संघाची नव्हे, शाळेतली) ओळख असल्यासारखे गप्पा मारायला सुरुवात केली आणि मला जिंकूनच घेतले. पण पुढे येणाऱ्या दंगलरुपी वादळापूर्वीचा हा शांत भाव आहे हे कुठे मला ठाऊक होते. पर्या आणि बिकांनी दंगा करायला सुरुवात केली आणि मग योगप्रभू ही काय चीज आहे ते कळले. तोपर्यंत वैश्विक सूत्रे मांडुन वैश्विक सुसूत्रता आणणारा एक अभ्यासू असंच समजून बसलो होतो मी. बिकांनी त्यांची 'माझी लालच' असे म्हणून दर वेळेप्रमाणे "लाल वारुणी" ऑर्डर केल्या; मग डरकाळी फोडून योगप्रभूंनीही माझीही लाल हे दाखवले... म्हणजे "लाल वारुणी" ऑर्डर केली. पण त्याआधी त्यांनी 'कमी तिथं आम्ही' या भूमिकेतून मर्दानी दारु व्हिस्की माझ्याबरोबर शेअर केली होती. मग पुढे ती वारुणी आणि व्हिस्की यांची जी काही दंगल योगप्रभूंच्या शरिरात झाली ती बाहेरच्या दंगलीला उग्र करुन गेली. बरं झाले पण हे झाले. यामुळे योगप्रभूंची पोतडी हळुहळू उघडली जाऊ लागली आणि बाहेर येऊ लागल खरंखुरं 'वैश्विक सत्य'. अस्सल रोमनाळ, खंग्री, चावट, वाह्यात, इरसाल, दांडगट, रासवट, भयंकर.....(शब्द संपले) असल्या किश्शांची आणि फटाक्यांची माळ चालू झाली. यांचाही मग वैश्विक संचार सुरू झाला आणि त्याचा शेवट कॅंपातुन फिरुन सदाशिव पेठेत झाला. कॅम्पातल्या मुली आणि सदाशिव पेठेतील मुली यांच्यामध्ये फरक काय? हे त्यांनी तोंडी तर सांगितलेच, वर अक्षरश: "मांडूनही" दाखवले. ;) 'शब्द'प्रभू असण्याबरोबरच योगप्रभू हे कलाकारही आहेत, हाडाचे नाही कागदाचे. त्यांचे 'वैश्विक सूत्र' त्यांनी चक्क ओरी'गामी' मधूनच मांडून दाखवले. तसेच ओरी या शब्दाचा एक नवीन अर्थही समस्तांना विषद केला. गामी सगळ्यांनाच माहिती असते म्हणा. योगप्रभूंनी आता 'ओरीगामी'ची मालीका लवकर चालू करावी अशी मी त्यांना विनंती करतो.
दंगलग्रस्त
जे. पी. मॉर्गन: याला भेटण्यासाठी हा कट्टा आयोजीत केला आणि हाच पठ्ठ्या सर्वात उशीरा आला. कारण काय तर म्हणे 'कसे असतील सगळेजण कोनजाने' हा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे कुंपणावरच बसून गंमत बघु असा विचार करुन तो आला होता. पण त्याचे टायमिंग एकदम हुकले. तो येइपर्यंत कट्ट्याचं दंगलीत रुपांतर झालं होतं. आणि मग आल्यावर नुसताच बावचळून आणि भंजाळून गेला होता. कोणाचे ऐकू आणि किती ऐकू असा एकदम बिचारा झाला होता की काहीच बोलला नाही. शेवटी मात्र धीर करुन जोकचा एक फटाका फोडलाच त्याने, लवंगीच होता कारण दंगलग्रस्त होता तो यावेळी.
मृत्यून्जय: एक धीरगंभीर व्यक्तिमत्व दंगलीत पार झाकोळुन गेलं असं मला वाटत. पण दंगलीच्या सुरुवातीपासून असल्यामुळॆ दंगलीचा आनंद घेउन जोकचा एक आपटबारही फोडून घेतला पठ्ठ्याने. पण याचीही पहिलीच वेळ असल्याने (सर्वांना भेटण्याची) जास्त काही न बोलता ऐकतच बसल्यामुळे अजून एकदा त्यांना घेउन बसावे लागणार आहे असे दिसते.
असूर: टेबलावरील बाटल्या, ग्लास आणि धडाधड सुटणार्या ऑर्डरी बघुन, "च्यायला मी पितही नाही आणि खातही नाही तरीही या बलदंड बिलाचा भागीदार व्हावे लागणार" असा विचारी चेहरा करुन खर्या अर्थाने दंगलग्रस्त झाला होता. त्यात अजून नवीन लग्न झाल्यामुळे फोनवरुन "रिमोट कंट्रोल्ड" होऊन 'लग्नग्रस्त' असल्याची जाणीवही करुन देत होता. त्याने घेतलेल्या चॉकलेटचे रहस्य या "सध्या लग्न झाले आहे" (हे विधान त्याचेच आहे) या परिस्थितीत दडलेले होते, हे दिसत होतंच.
कुंपणावरचे दंगलग्रस्त
जातीवंत भटका : मी यायच्या आधीच याचे आगमन झाले होते. मी पावसातून, गारव्यातून असा आत आडोश्याला आलो तोच बहदराने मला पेटती शिग्रेट ऑफर केली. त्यावेळी त्या शिग्रेटीचे इतके महत्व होते की त्या पुण्याबद्दल त्यालाही त्याच्या बायकोकडे परदेशात भटकंती करायला मिळो अशी इश्वरचरणी मी प्रार्थना करतो. त्या ऑफर केलेल्या शिग्रेटीच्या झुरक्यातला आनंद शब्तातीत आहे. बरं, हे कुंपणावरचे दंगलग्रस्त आयटीग्रस्त आहेत माझ्यासारखेच. मग काय सूर आणखीनच जुळले. पण हा "आयटीग्रस्तांचा दोस्ताना" बिकांना कुठे बघवतोय, दंगलखोर ना हे. लगेच 'अतिशय गंभीरपणॆ' त्यांनी त्यांचा जळजळीत निषेध तिथल्या तिथे नोंदवला :(
धमाल मुलगा: मागच्या आणि या जन्मी केलेल्या महाभयंकर पापांमुळे याच्या खाण्या-पिण्याला डॉक्टरांनी 'बुच' लावले आहे. तरीही त्या बुचाला थोडे भगदाड पाडुन याचे पापं करण चालुच आहे. पण पुर्वाश्रमीचा दंगेखोर असला तरीही या कट्ट्याचा आयोजक या नात्याने त्याला ना धड दंगेखोर होता आले ना धड दंगलग्रस्त. ना पोलीसही.
श्रावण मोडक: वादाच्या वेळी मिपावर यांची साक्ष घेतली जाते ते काही उगाच नाही याची प्रचिती यांनी करुन दिली. अतिशय पोक्त होउन सगळ्यांची मजा बघत बसले होते. दंगल थोडी कमी होतेय, असे झाले की लगेच काहीतरी काडी लावायचे योगप्रभूंना. पण दंगल पेटली पुन्हा की लगेच पोक्त हौन मिश्कीलपणे सगल्यांकडे बघत बसायचे. शिका शिका यांच्याकडुन.....
सोकाजी: 'सगळ्यात महत्वाचे, मादक द्रव्य' या तत्वाला चिकटून बसला होता हा सोक्या, दंगलग्रस्ताचा आव आणून. असो आत्मप्रौढीचा प्रमाद नाही करत, नाहीतर आहेतच बिका निषेधाचा खलिता घेऊन. (मरतोय आता मी ;))
आता जरा सचित्र ओळख
डावीकडुन : जे.पी. मॉर्गन, बिका, श्रामो, जातीवंत भटका, असुर, सोकाजी, योगप्रभु, परा, मृत्युन्जय आणि फोटो काढणारा धमु :)
बाकी चित्रांसाठी इथे टिचकी मारा.
नोट: पराठा कट्ट्यालाही जायचे फार मनात होते, पण ते जमले नाही :( तो धागा वाचुन ऑलरेडी इनो घेतल्या गेला आहे.
प्रतिक्रिया
30 Aug 2011 - 4:27 pm | विजुभाऊ
हम्म......
करा मज्जा लेको.
त्या धम्याला नक्की कसले बुच मारले आहे हो? मागल्यावेळॅस्ला बरा होता की.
(खा मटर उसळ ख शिकरण असे म्हणणार होतो पण..........)
30 Aug 2011 - 4:32 pm | अन्या दातार
घरीच बसलो होतो तंगड्या वर करुन असे म्हणणारेमृत्युंजय, आणि नागफणी ट्रेकहून यायला उशीर झालेले सोकाजी इथे अवतरलेले पाहून यांचा परकाया प्रवेश झाला होता का अशी शंका येत आहे!!
30 Aug 2011 - 4:44 pm | सोत्रि
अन्या लेका,
ही दंगल शुक्रवारी, दिनांक 26 ऑगस्ट रोजी झाली होती.
नागफणी ट्रेक आणि पराठा कट्टा शनिवारी, दिनांक 27 ऑगस्ट रोजी होता
हे मी जाता जाता नम्रपणे नमुद करू इच्छितो.
- (विनम्र) सोकाजी
30 Aug 2011 - 4:51 pm | अन्या दातार
ओक्के! स्वारी.
(क्षमाप्रार्थी) अन्या
30 Aug 2011 - 4:49 pm | सोत्रि
द्विरुक्तीमुळे प्रकाटाआ
30 Aug 2011 - 4:47 pm | मृत्युन्जय
हो. शनिवारी तंगड्या वर करुन घरीच बसलो होतो. हा कट्टा शनिवारी झाला म्हणुन कोण म्हणतय रे? :P
30 Aug 2011 - 4:37 pm | अर्धवट
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेला सवंग लोकप्रियतेचा प्रयत्न असे निरिक्षण नोंदवतो..
सूड घेतल्या गेला आहे.
30 Aug 2011 - 4:54 pm | आत्मशून्य
फटू छान आलेत म्हणून कट्टाविरहीत ओळखीला उपस्थीत असणार्यांसोबत धमुचे विशेष अभीनंदन.
30 Aug 2011 - 5:33 pm | धमाल मुलगा
क्यामेर्याची कमाल ती.
हां, आता दोन घोट पोटात गेल्यावर हात एकदम स्थिर झाल्यानं फोटू ब्लर आहे नाहीत असं म्हणशीला तर द्याट इज अॅक्शेप्टेड. ;)
30 Aug 2011 - 5:03 pm | सुहास..
काय रे ! ऑर्कुट चे टेस्टोमेनियल सदर मिस करतो आहेस की काय ?? ये तिकडे , मी तुझे लिहीतो , तु माझे लिही..हवे तर बरहाच्या कृपेने मराठीत लिहुन तिथे कॉपी-पेस्ट करु ! काय म्हणतोस ?
30 Aug 2011 - 5:20 pm | मृत्युन्जय
" क्षीण " शब्द अॅडवायचा राहिला का ;)
30 Aug 2011 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार
ह्याच ह्याच प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती ;)
कित्ती कित्ती तो जळफळाट म्हणतो मी. मागच्यावेळी आमचे विजुभौ किती आग्रहाने थांबवत होते तर थांबला नाहीस, आणि आता सूड घेतोस होय रे ?
अवांतर :- असुर्या नेहमी गणपतीच्या दिवसातच कसा अवतिर्ण होतो हा मला कायम पडत आलेला प्रश्न आहे. मागच्यावेळी भेटला तेव्हा देखील भाद्रपदच चालु होता.
30 Aug 2011 - 5:22 pm | धमाल मुलगा
आम्ही सांगितलं होतं की बाबा, जा आणि दिल्लीत ठाण मांडून बस म्हणून?
पण नाही, तुलाच दत्ताजी शिंदे व्हायची हौस फार! आम्ही काय करणार? ;)
30 Aug 2011 - 4:42 pm | प्रास
एकूण तुमचा पुण्यभूमधला हा कट्टाही चांगला पार पडला असं दिसतंय. ग्रेट ग्रेट मिपाकरांना याची देही बघणे तुमच्या कॅमेराच्या डोळ्यांद्वारे शक्य झालेय हे ही नसे थोडके.....
आता तुम्ही म्हणता तसे नाजुक प्रकृतीचे नसूनही दुसर्यांदा जाऊन इनो घेणे क्रमप्राप्त....
30 Aug 2011 - 4:46 pm | साबु
च्यायला... तो पराठा कट्टा आणि हा...वारुणि कट्टा.... मजा करताय.... :)
30 Aug 2011 - 6:07 pm | प्रचेतस
फोटू व वृत्तांत झकास.
काही किस्से मिपावर पण येउ द्यात की. ;)
30 Aug 2011 - 6:16 pm | सोत्रि
ते किस्से जर इथे मिपावर लावले तर माझा आयडी बॅन होइल ;)
- (किस्सेबाज) सोकाजी
30 Aug 2011 - 6:32 pm | आत्मशून्य
थोडक्यात जर अजून धमाल हवी असेल तर तिथं उपस्थीत असणेला काही पर्याय नाही तर :)
- पर्यायशून्य
30 Aug 2011 - 7:06 pm | सूड
अगदी अगदी !!
31 Aug 2011 - 1:46 pm | बिपिन कार्यकर्ते
च्यायला! ते किस्से इथे टाकले तर माझाही आयडी ब्यान होईल, कायमचा. आणि काही किश्श्यांसाठी योगप्रभूंना पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनचा आधार घ्यावा लागेल ते वेगळंच. त्याशिवाय नीट कळणार नाहीत.
त्यापेक्षा करा अजून एखादा कट्टा आणि बसू सगळे एकत्र! काय म्हणता?
31 Aug 2011 - 2:25 pm | धमाल मुलगा
एक फोटू कटाक्षानं टाळलाच मी. तू सुरस आणि चमत्कारिक अरेबियन नाईट्सचे किस्से सांगत होतास तेव्हा तुझ्या पाठीमागे ३ वेटर्स, आणि दोन्ही कॅप्टन्स उभे राहून गम्मत ऐकत होते :D
>>त्यापेक्षा करा अजून एखादा कट्टा आणि बसू सगळे एकत्र! काय म्हणता?
फकस्त येकच इनंती, येताना सगळं सोवळं ओवळं खुंटीला टागूनच यावे.
अहो, कुस्त्यांची दंगल बघायला जायाचं तर भट्टीची पांढरीफेक कापडं घालून जाऊच ने! भट्टी सगळी मोडणार अन कापडं लाल मातीनं रंगल्याबिगर र्हातील व्हय? :)
30 Aug 2011 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकर मित्रहो, भेटीगाठी चालू ठेवा.
फोटू बघून आनंद वाटला.
-दिलीप बिरुटे
30 Aug 2011 - 7:16 pm | धमाल मुलगा
आणखी किती दिवस शेंड्या लावणार आहात? ;)
त्या यशवंत्याला एक दिवस घाला गाडीत अन् या इकडं! पायजे तं आपण पिरंगुटला एखादं फार्महौस घेऊ भाड्यानं. काय म्हंता? ;)
31 Aug 2011 - 1:47 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रा. डॉ. ... बरेच दिवस झाले तुम्ही येणार येणार असे ऐकतो आहे. का येऊन गेलात आणि आम्हाला पत्ताच नाही?
31 Aug 2011 - 7:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धमु, यशवंतला दीव्य मराठीच्या कार्यालयातून उचलून थेट पुण्यात हजर केले असते
पण मीच जरा माझ्या कामात जरा गुंतून गेलो आहे.
बिका, पुण्यात यायचं असेन तेव्हा तुम्हाला कळवणार नाही, असे होणार नाही.
-दिलीप बिरुटे
30 Aug 2011 - 6:24 pm | jaypal
यकदम खंग्री कट्टा जमिवलाय की पठ्यांनो. च्या मारी आमसनीच टाईम घावना. एक डाव सम्द्यास्नी बघतोच आता.
30 Aug 2011 - 6:34 pm | धमाल मुलगा
तू नुसती आश्वासनं दे !
हल्ली ठाण्याच्या जंगलात हिंडणंही बंदच दिसतंय तुझं. तू कधी यावास कट्ट्याला?
30 Aug 2011 - 6:38 pm | jaypal
की जंगल भट्कंती चालु होईल(पावसात केमरा वापरता येत नाही :-(). सध्या भटकंतीस आराम आहे.
30 Aug 2011 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार
त्यानी आधी दोन दिवस सलग मिपवर येऊन दाखवावे ;) बाकी सगळे नंतर.
तो येणार, मग आपण कट्टा करणार... हे ऐकुन ऐकुन आणि बोलून बोलून माझ्या एका मोबाईलचा स्पिकर हेडफोन बंद झाला.
अवांतर पण महत्वाचे :- येतो , बघतो, जमवतो अशा स्वरुपातली आश्वासने देऊन, साधा फोन देखील न करणार्या काही इसमांची अब्रु ह्या धाग्यात वेशीला का टांगलेली नाही ?
30 Aug 2011 - 6:51 pm | jaypal
30 Aug 2011 - 6:54 pm | धमाल मुलगा
>>त्यानी आधी दोन दिवस सलग मिपवर येऊन दाखवावे Wink बाकी सगळे नंतर.
+१ :D
कारण त्यांच्या अब्रुला फ्ल्यू झाला होता असं कळते. =))
31 Aug 2011 - 1:01 am | पाषाणभेद
>> कारण त्यांच्या अब्रुला फ्ल्यू झाला होता असं कळते. =))
तुला तशरीफ अर्थ अभिप्रेत आहे काय?
31 Aug 2011 - 2:22 pm | धमाल मुलगा
>>तुला तशरीफ अर्थ अभिप्रेत आहे काय?
=)) =)) =))
नुसता तेव्हाढ्याच जागी कसा फ्ल्यू होईल? तेव्हढंच होतं त्याला............. जाउदे. पब्लिक हाणेल मला. ;)
30 Aug 2011 - 7:11 pm | गणपा
तुला अजुन जित्ता पाहुन लय आणंद झाला हाय.
30 Aug 2011 - 7:17 pm | श्रावण मोडक
+१
31 Aug 2011 - 1:48 pm | बिपिन कार्यकर्ते
जयपालाचे स्वागत! आता तसाच एकदा आपला ब्रिटिस दादूस कुठे गायबलाय ते शोधा बरं!
30 Aug 2011 - 7:15 pm | विजुभाऊ
ए कोन रे त्यो जैपालाला बोल्तोय.
हितं ठान्याच्या पोरोग्रामला जैपाल भौ हास्पिट्लात्न येळात येळ काडुन हाज्री द्युन ग्येले व्हत्ये
31 Aug 2011 - 1:04 am | पाषाणभेद
विजूभौ, जयपालजी तुम्हाला भेटले? आम्हाला तर ते कधीचे हरवल्याचे समजले होते.
30 Aug 2011 - 7:48 pm | रेवती
वाईट.
30 Aug 2011 - 8:07 pm | धमाल मुलगा
काय वाईट?
-(साईट) ध.
30 Aug 2011 - 8:19 pm | रेवती
वाईट आहात सगळेजण!
मी येते डिसेंबरात्........तू सगळ्यांसाठी कट्टा ठरवायचास्.......आहे कबूल?
(बाईट)
30 Aug 2011 - 8:25 pm | jaypal
विसंबला त्याचा ..................... ;-)
30 Aug 2011 - 8:29 pm | रेवती
वाटलच होतं.......आता गप्प बसलाय धम्या!
30 Aug 2011 - 8:33 pm | धमाल मुलगा
ये जुर्रत?
नुसती बोलाची कढी अन बोलाचा भात नको!
सोयीच्या तारखा आधी (मराठीतः वेल इन अॅडव्हान्स) कळवल्यास, योग्य ती कार्यवाही केली जाईल. :)
अर्रे, समजलात काय? आँ? मिपाच्या आद्य कट्टा संयोजकावर हा असा अविश्वास? हा हन्त हन्त!
30 Aug 2011 - 8:49 pm | रेवती
कळवल्या जाईल.;)
30 Aug 2011 - 8:59 pm | jaypal
30 Aug 2011 - 9:04 pm | रेवती
अगदी छान!
जैपाला, तुझ्या त्या चित्रांची सवय लावलियेस आम्हाला!
30 Aug 2011 - 9:54 pm | प्रीत-मोहर
चित्रपाल इज ब्याक :)
वेल्कम चित्रपाल दा :)
31 Aug 2011 - 1:10 am | पाषाणभेद
तेच म्हणतो मी. कुठे हरवले होते कोण जाणे इतक्या दिवस.
दुसरे असे की:
>>> नोट: पराठा कट्ट्यालाही जायचे फार मनात होते, पण ते जमले नाही तो धागा वाचुन ऑलरेडी इनो घेतल्या गेला आहे.
>>> Submitted by रेवती on Tue, 30/08/2011 - 20:49.
>>>कळवल्या जाईल.
इनो घेतल्या गेला आहे, कळवल्या जाईल हे काय आहे?
मान्य आहे की शुद्धलेखनाला फाटा आहे पण इतके अपभ्रंशीत शब्दरचना अपेक्षीत नाही. हा मटा नव्हे.
31 Aug 2011 - 1:52 pm | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर भेद, साधारण ३०-३५ टक्के मराठी जनतेसाठी प्रमाण बोली भाषा आहे ती... असं नका बोलू!
2 Sep 2011 - 12:10 am | मी-सौरभ
>>इनो घेतल्या गेला आहे, कळवल्या जाईल हे काय आहे?
हे तो माल़कांची भाषा....
30 Aug 2011 - 8:29 pm | श्रावण मोडक
बर्रं!!!
30 Aug 2011 - 9:05 pm | रेवती
श्रामो आणि रामदास येताजाता मला चिडवत असतात असं फक्त मलाच वाटत असतं कि तसंच आहे ते!
31 Aug 2011 - 1:52 pm | बिपिन कार्यकर्ते
तसंच आहे ते! बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुबहान अल्लाह! ;)
31 Aug 2011 - 2:22 pm | धमाल मुलगा
=)) =)) =)) =)) =))
मोडक आणि रामदासकाका 'बडे मियाँ-छोटे मियाँ' सिनेमातल्यासारखे रंगीबेरंगी धोतरं आणि झगामगा कुडते अशा वेशात डोळ्यापुढं आले ना राव!
हसता हसता खुर्चीतून सांडलोच.
31 Aug 2011 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी.
तशीही रंगाशेठ कडे एक प्यार्टी पेंडीग आहेच. ;)
31 Aug 2011 - 6:51 pm | चतुरंग
मागल्या वेळेला बोलावलं तर तुझी कामं संपता संपेनात शेवटी शेवटी सगळे निघताना तू अन धम्या आलात!
-रंगा
1 Sep 2011 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार
घोर अपमान !
धम्या डायरेक्ट दारात भेटला आपल्याला, त्यानंतर पुढे आपण बहूदा परत पूनमक्षेत्री गेलो धम्यासाठी.
मी चांगला ८ वाजता हजर होऊन शेवटपर्यंत मुक्कामाला होतो.
ह्यावेळी आता श्रामोंऐवजी बिका किंवा केसुंची साक्ष काढायला लागणार ;)
30 Aug 2011 - 8:02 pm | स्मिता.
आम्ही असले दंगलखोर धागे उघडत नाही... वाचत नाही.
31 Aug 2011 - 1:53 pm | बिपिन कार्यकर्ते
तुम्ही पण करा की असले कट्टे! कोणी नाही म्हणलंय?
31 Aug 2011 - 3:12 pm | स्मिता.
नाही... कोणी नाही म्हणत नाही. पण कट्टा करायला ४ टाळकी तरी हवीत ना आमच्या शहरात!
30 Aug 2011 - 9:51 pm | योगप्रभू
सोकाजी,
आपली मिरवणूक छानच होती. शिंगांना लावायला बेगडं आणि गोंडे कमी पडले, असं आता वाटायला लागलंय. कुणी तरी संधी साधून मला शेपटीचे फटके मारत होते. शेवटपर्यंत कळलं नाही. (पर्या असावा का तो?)
फोटो छान आलेत. मेजवानीचे फोटो उशिरा काढण्याचा एक फायदा असतो. कुणाला 'स्माईल प्लीज' किंवा 'से चीज' असे सांगावे लागत नाही. रंगीत पाण्याच्या गुणधर्माने प्रत्येकजण जमेल तितके तोंडभरुन हसतो.
भेटलेले सगळे मिपाकर महान अवली आहेत. प्रत्येकाला 'लाल (वारुणीचा) सलाम'.
आता एक मोठा (लार्ज) मिपा कट्टा होऊन जाऊदे. सगळ्यांना भेटायचंय. :)
30 Aug 2011 - 10:23 pm | चतुरंग
मारणारी शेपटी खरखरीत केसवाली होती का? विचारतोय कारण तुमच्या समोरच बिका बसलेले दिसताहेत चित्रात त्यांच्या अरबी उंटांची शेपटी असते तसली खरखरीत! ;)
(खरमरीत) रंगा
31 Aug 2011 - 1:55 pm | बिपिन कार्यकर्ते
माझ्या आणि योगप्रभूमधे तसे बरंच अंतर होतं. पण त्याच्या एका बाजूला सोक्या आणि दुसर्या बाजूला बोक्या आय मीन परा... त्यामुळे तसा अनकंफर्टेबलच होता तो! ;)
+१०००
30 Aug 2011 - 10:15 pm | पप्पु अंकल
या नात्याची विण दिवसेंदिवस अधिक घट्ट होत जावो हिच इश्वर चरणी प्रार्थना.
कळावे,
लोभ असावा,
30 Aug 2011 - 10:27 pm | चतुरंग
नेहेमीचे यशस्वी कलाकार आणि तोंडाला नवीनच रंग लावलेले कलाकार यातला फरक नुसत्या फटूवरुन सुद्धा समजतोय! ;)
-रंगा
खुद के साथ बातां : रंगा, हा बिका आणि श्रामो कायम 'फिंगर्स क्रॉस्ड' पोझमध्ये का बसलेले असतात? :?
31 Aug 2011 - 3:32 am | Nile
शिंच्या असुर्याचा चक्क फोटू!!! नवीन बदल चांगलाच मानवलेला दिसतोय लेकाच्याला.
31 Aug 2011 - 10:20 am | शिल्पा ब
काहो, बायकांना मज्जाव आहे का तुमच्या कट्ट्यांना? आँ?
31 Aug 2011 - 10:32 am | सोत्रि
आमचा बायकांना मज्जाव नाहीयेय, बायकांचाच मज्जाव आहे असल्या कट्ट्यांना, हे हे हे :lol:
- (मज्जा (व) कट्टा आवडणारा) सोकाजी
31 Aug 2011 - 11:03 am | मृत्युन्जय
असल्या
या शब्दातुन तुम्हाला काय उद्धृत करायचे आहे सोकाजी? ;) जाहीर निषेढ करतो मी या शब्दाचा. काय तमाशा लावलाय तुम्ही हा :P
31 Aug 2011 - 11:20 am | श्रावण मोडक
निषेध. 'असल्या', 'असले', 'असली', 'असला' या शब्दांचा या संस्थळावरील इतिहास सोकाजींना माहिती नसेल तर तो त्यांनी माहितगारांकडून (मी नव्हे, धम्या, परा, बिका वगैरे) माहिती करून घ्यावा.
31 Aug 2011 - 11:25 am | परिकथेतील राजकुमार
आमची* एकूणच जाण समज वैग्रे वैग्रे कमी असल्याने आम्ही अक्कलशून्य गटात मोडतो, तरी आमच्या कडून शहाणपणाची अपेक्षा करू नये. आम्ही काय डाँबल माहिती देणार ?
*स्वतः साठी आदरार्थी.
31 Aug 2011 - 11:44 am | सोत्रि
हे नो नो आम्ही "इनो" "इनो" असे वाचले.
काय करणार, आम्हीही अक्कलशून्य गटातच मोडतो ना ! :(
- (अक्कलशून्य) सोकाजी
31 Aug 2011 - 11:21 am | सोत्रि
तमाशा करायची सवयच आहे आम्हाला (हे आदरार्थी एकवचनी आहे), लहानपणापासुनच.
त्यात आम्हि नवयुगात वाढल्यामुळे हे तमाशे सचित्र करयाची जुनी खोडच आहे म्हणा ना.
ते म्हणतात ना "सुंभ जळला तरी....." तसं काहीसे आहे आमचे ;)
- (सचित्र तमासगीर) सोकाजी
31 Aug 2011 - 11:24 am | मृत्युन्जय
अहो तमाशे करायचेच तर जरा ग्रँड करा की. असले छाट छूट काय करताय ;)
31 Aug 2011 - 11:45 am | सोत्रि
त्याचे काय आहे सध्याला आम्ही (आदरार्थी एकवचनी) चॅलेंज घेण/देण बंद केले आहे, कारण आत्मिक उन्नती शुन्य झालीय आमची.
त्यामुळे जरा आत्मिक उन्नतीच्या शोधात जावे असे म्हणतो आम्ही, ती मुळपदावर आली की तुमचा चॅलेंज स्विकारल्या जाइल :)
- (आत्मिक उन्नतीच्या शोधात असलेला) सोकाजी
स्वगत: सोक्या तु 'मराठे' ना रे मग काय खाल्ल्यास खाल्ल्यास आत्मिक उन्नती होउ शकेल?
31 Aug 2011 - 11:47 am | मृत्युन्जय
तुमच्या आत्म्याची शून्य उन्नती झाली आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो. तुम्ही कराठे खाल्यास कदाचित अजुन उन्नती होउ शकेल.
ती मुळपदावर आली की तुमचा चॅलेंज स्विकारल्या जाइल
एक कृपा करा. की च्यालेंज स्वीकारले. पुर्ण केले. तमाशा सक्सेअफुल झाला असले वांझोटे धागे कृपया काढु नका. बाकी तुम्ही च्यालेंज घेता की नाही याच्याशी आम्हाला *ट्टे कर्तव्य नाही.
जय शिवाजी.
31 Aug 2011 - 2:33 pm | आत्मशून्य
अपेक्षीत पण मजेशीर चर्चा.
31 Aug 2011 - 3:13 pm | धमाल मुलगा
पन सगळ्यात ब्येस ह्ये, का तमाशा म्हंजी तमाशा! उगं 'वरुन किर्तान..' आसली भानगाड न्हाई!
काडा राव, वाईच तंबाक काडा..वाढूळ टायम झाला, पारावं काय फड रंगंच ना गड्या!
:)
-धम्या बारामतीकर,
पार्टनर,
धम्या-पर्या लोकनाट्य तमाशा पार्टी. मौजे मिपागाव (खुद्रुक)
31 Aug 2011 - 3:20 pm | आत्मशून्य
अगदी अगदी. कट्टाविरहीतता म्हणजेच कट्टा.. उगाच वरून कट्टा आतून तमाशा असलं नको है की नै ?
31 Aug 2011 - 3:42 pm | धमाल मुलगा
वरुन कट्टा फिट्टा काय नाय! वरुन, खालून, आतून भाईरुन सगळा तमाशाच! आक्षी वसंत सबनीसांचा तमाशा बगा!
-पठ्ठे धमूराव.
31 Aug 2011 - 6:20 pm | आत्मशून्य
आपल्या मतास मनस्वी अनूमोदन.
31 Aug 2011 - 1:56 pm | बिपिन कार्यकर्ते
बायकांना मज्जाव वगैरे नाही हो! कधी येताय इंड्यात? भेटू सगळे! :)
31 Aug 2011 - 7:27 pm | रेवती
ओ भौ, तुम्ही कशाला मज्जाव कराल पण ऊंटीणीच्या गप्पा अन् मानवी शरिराचे कंगोरे असलं कायतरी बोलल्यावर कोण येणार तिथं? काही अटी आहेत. पहिली म्हणजे हा भजनी कट्टा असेल्.......म्हणजे साधा! आमची वहिनी आल्यास तुमच्यावर जरा वचक राहील. दुसरं म्हणजे जरा बरं बोला. दोन वर्षापूर्वी भेटल्याभेटल्या टार्या आणि धम्यानं कसलातरी ज्योक मारला आणि कुठं तोंड लपवू असं झालं मला! अर्थातच त्यांना ते आठवणार नाही........असले शेकडो ज्योक करून झाले असतील आतापर्यंत! तिसरी अट म्हंजे दोन शेजारची रेस्टॉरंटं बघा. कट्ट्यावर बहिष्कार घालायचा झाला तरी बायकांना (किंवा माझ्यासारख्या मुलींना) उठून शेजारच्या हाटेलात जाता आलं पायजे.;)
31 Aug 2011 - 7:43 pm | धमाल मुलगा
इतरांचे अश्लिल वगैरे विनोद वगैरे बाबतीत मला हीनपातळीत गोवण्याच्या ह्या दुष्ट काव्याचा कडक निषेध करीत आहोत!
आठवत असेल तर पहा, तो जोक मारल्यानंतर मी ठाप्पकन कपाळावर हात मारुन घेतला होता आणि "सोबत कोण आहे, कुठे आहोत ह्याची थोडी भिडभाड बाळगावी माणसानं" अशा आशयाची विनंती केली होती. आणि त्यानंतर आपल्याच कानकोंडं होऊ नये म्हणून शितल-अमर जिथे बसले होते तिकडं टेबलाच्या दुसर्या टोकाला जाऊन बसलो होतो.
व्वाऽऽ....माझ्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवताना काहीच कसं वाटलं नाही?
31 Aug 2011 - 9:31 pm | रेवती
तुला आठवलं यातच सगळं आलं रे बाबा!
नाहीतर, "कोण? कधी? कसे?" असे प्रश्न विचारले असतेस तर माझ्याकडे पुरावा नव्हता.
जगात प्रामाणिकपणा शिल्लक असल्याच्या खुणा आहेत या!
धन्यवाद! त्रिवार धन्यवाद!
31 Aug 2011 - 9:37 pm | धमाल मुलगा
आभारी आहे!
-(प्रामाणिक बंडू) ध.
31 Aug 2011 - 10:14 pm | श्रावण मोडक
कैच्या कैच... इभ्रत पणाला लागल्यानं त्यानं सोयीस्कररित्या जे घडलं ते लिहून टाकलं. तिथं आणखी एक पेचही होता. तो त्यानं जागा बदलून शांतपणे सोडवला. बारामतीकर आहे तो. ;)
आज्जे, कुणालाही सर्टिफिकेटं देऊ नकोस अशी. ;)
31 Aug 2011 - 10:50 pm | Nile
वरील संवाद वाचून जग कोठे चाल्लंय याची चिंता लागली होती, मोडकांनी जगाला पुन्हा रूळावर आणलेले पाहून जीवाला आराम मिळाला. धन्यवाद गुरूजी!
31 Aug 2011 - 11:21 pm | धमाल मुलगा
म्हणतात ना, दृष्टी तैसि सृष्टी! मोतीबिंदू झाला की सगळं धूसर दिसायचंच. ;)
-(सत्यवचनी बंडू) ध.
एऽऽ...माझी उतरायला लागलीए रेऽऽ!
-(वासूची सासू मधला बंडू) ध. ;)