ब्राऊ..६

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
2 Aug 2011 - 1:14 pm

और गिटार..६

ब्राऊ..१

ब्राऊ..२

ब्राऊ..३

ब्राऊ..४

ब्राऊ..५
...........

मला एकदम एकटा पडल्याचं लक्षात येऊन थरथरायला व्हायला लागलं. क्लासकडून हळूहळू घराकडे निघालो. परांजप्याही गप्पच होता. घरापर्यंत पोचलो तर बंद फाटकाबाहेर मोमीन वाट बघत उभा.

"काय रे..?", मी धडधडत विचारलं.. मला आता येणारा प्रत्येकजण काहीतरी गलिच्छ माहिती घेऊनच येणार असं वाटायला लागलं होतं. आणि तसंच झालं.

"पाप्या भेटला होता अँड्य्रूच्या गाडीवर.. केळ्या..जाधव सिरियस आहे..त्याचं काही खरं नाही.."

मग मात्र एवढे दिवसभरातले धक्के विसरून नव्याने पायाखालची धरणी फाटायला सुरुवात झाली.

थोडावेळ चक्कर आल्यासारखं झालं आणि मी खालीच बसलो. ब्राऊ माझ्याजवळ उभा राहून माझा वास घेत हाताला चाटायला लागला. आई आठवडाभर मुंबईला गेल्यामुळे घरी तसंही कोणीच नव्हतं. परांजप्या आणि मोमीनने मला हाताला धरुन उठवलं आणि घरात नेलं. जरा वेळाने भान आल्यासारखं वाटलं. ते दोघे थोडावेळ काहीच न बोलता बसून राहिले आणि मी ठीक दिसतोयसं बघून निघाले. मग घरात मी आणि ब्राऊ दोघेच उरलो. बाहेर रात्र झालेली. मी कसातरी उठलो आणि ब्राऊची अंडी उकडायला ठेवली. मीही त्यातलीच एकदोन खायचं ठरवलं. एरवी आई घरी नसताना मी आनंदरावाकडे ऑम्लेट सँडविचचंच जेवण करुन घरी येतो. पण आज मी घरात कोंडला गेलो होतो. एकतर पाप्या आणि गँगच्या भीतीने बाहेर पडता येत नव्हतं आणि तशीही खायची इच्छा मेली होती.

मग मी स्वतःहून कुठे काही चौकशी करायला जायचं नाही असं ठरवलं. पण मग आता पोलीस आले कीच काय ते कळेल अशा विचाराने एकीकडे थरकापही होत होता. दाराकडे सारखी नजर लागली होती. ठकठक आवाज येईल अशी भीती उसळत होती.

ब्राऊ एकदम सिरीयस होऊन बसला होता. मला एकदम भरून आलं. कधीच मोठं न होणारं तीनचार वर्षाचं पोर घरात असावं तसा माझा ब्राऊ..जेव्हा घरी आणला तेव्हा दोन विती लांबीचं तांबूस पिल्लू होतं. घरभर नुसता सरपटत होता. जागीजागी मुतून ठेवायचा. आता मात्र इतका शहाणा झालेला की अजिबात घाण होऊ द्यायचा नाही. माझे इतके मित्र होते, पण कुठल्याही काळात माझ्या सोबत नेहमी राहील तो माझा ब्राऊच हे मला माहीत होतं. मधे बाबा गेले तेव्हा मी खूप घाबरलो होतो. त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला तेव्हा त्यांचा श्वास अडकत होता. ते बोलायचा प्रयत्न करत होते. पण मला काय बोलताहेत ते कळतंच नव्हतं. तेव्हा मी खूप घाबरलो होतो. त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले आणि परत आणलं ते नाकात कापूस घातलेलंच.

माझी अशा काहीतरी भयंकर गोष्टीसाठी अजिबातच तयारी नव्हती. मग त्यावेळी ब्राऊच्या गळ्याला मिठी मारुन एकटाच माझ्या खोलीत रडलो होतो. आत्ताही तसं करावंसं वाटत होतं. मला पोलीस अचानक घेऊन गेले तर आईला मुंबईहून बोलावून घेईपर्यंत त्याच्याकडे कोण बघणार या विचाराने मला एकदम भडभडून आलं. पण ब्राऊला रडून दाखवण्यात अर्थ नव्हता. लगेच त्याने अजूनच दु:खी होऊन खाणं सोडलं असतं. म्हणजे पुन्हा मलाच काळजी.

मी पोलिसांच्या लफड्यात सापडलो तर परांजप्याला ब्राऊकडे बघायला सांगायचं असं मी ठरवलं.

रात्र जागूनच काढली. पहाटे तीन चार वाजता निव्वळ थकून डोळा लागला. तरीही मी पहाटेच्या क्लासला जायचं ठरवलं. सरांनी क्लास कॅन्सल केला नसला तर त्यांना भेटायचा तेवढाच एक चान्स होता. दचकून जाग आली आणि बघितलं तर एकदम क्लासची वेळच झाली होती. धडपडत झोंबणार्‍या डोळ्यांनी क्लासवर पोचलो तेव्हा थोडासा उशीर झाला होता. बघितलं तर सर चक्क हजर होते. च्यायला.. मग काल मुतनाळ उगा सस्पेन्स का करत होता समजेना. सर दिसले, खरं पोरं आधीच जमली होती, त्यामुळे सरांशी बोलता येईना. सर नेहमीच्याच कणखर आवाजात पुशअप्सचे काउंट्स घेत होते. मीही सगळ्या पोरांच्यात मिसळून कुंथत पुशअप्स मारायला लागलो.

जेव्हा मनात जाम टेन्शन असतं तेव्हा मला व्यायाम करायला खूप त्रास होतो. नुसतं पडून रहावंसं वाटत असताना फक्त सरांना भेटायला म्हणून यायचं तरी हा दीडतासाचा व्यायाम सहन करायला हवा होता. मी नुसता चडफडत होतो. सरांचा चेहराही काहीही न झाल्यासारखा निर्विकार. शेवटी माझ्या सहनशक्तीचा अंत बघत व्यायामाचं सेशन संपलं. मी जास्त विचार न करता सरळ सरांपाठोपाठ शेडमधे शिरलो.

"बोल केळकर..काय म्हणतोस?", सर माझ्याकडे न बघता म्हणाले.

"सर..जाधवचं कळलं ना तुम्हाला?..आता ..?"

"काय होणार नाही. घाबरतोस कशाला?"

मला आता सरांची चीड यायला लागली. सालं इथे आभाळ फाटलं तरी यांचं सोल्यूशन एकच. "काय होणार नाही..घाबरु नको.."

"सर, घाबरु कसा नको.. तो मेला तर काय होईल सर?.."

"अरे काही मरत नाही तो.."

सरांना एवढी खात्री कशी?.. माझा चेहरा प्रश्नचिन्हाइतका वाकडा झाला असणार.. तेवढ्यावरुन माझी शंका वाचून सर पुढे बोलले..

"अरे मी त्याला किती मारलाय आणि कुठे मारलाय ते मला माहीत आहे. मरण्यासाठी मारलेलाच नाहीये त्याला."

सरांच्या वाक्याने मी मिनिटभर आ करुन विचार करत बसलो. मग मला सरांच्या शांतपणाचं कारण उलगडलं.

सरांचं मारहाणीतलं स्किल वादापलिकडचं होतं. ते अंगाच्या कुठल्यातरी ठराविक भागांवर मारुन समोरच्याला ठार करु शकतील एवढी त्यांच्याविषयी मला नक्कीच खात्री होती.. मी जे ऐकलं होतं त्याप्रमाणे त्यांना अ‍ॅनॉटॉमीचं भरपूर ज्ञान होतं. कराटे क्लास म्हटलं तरी त्याउप्पर सर कुंग फू आणि इतरही खूप चायनीज नॉलेज मिळवून बसले होते. त्यामुळे एखाद्याला भरपूर धुवूनही तो मरणार नाही याची काळजी ते नक्की घेऊ शकत होते. सरांचा क्लासेस सुरु करण्यापूर्वीचा इतिहास ज्या प्रकारचा होता त्यात त्यांच्या हातून काही मुडदे पडले असतील यात जराही शंका नव्हती. तेवढं न समजण्याइतका मी पांडुनंदन नव्हतो.

तरीच साला सरांचा चेहरा जाधवला कुदवताना एकदम शांत होता. त्यांनी रागाच्या भरात मारला असता तर कदाचित तो जागीच मेला असता आणि मग सर भानावर आले असते. त्यांच्या मनात मारतानाही जाधवबद्दल स्वतःचा असा काही राग डूख नव्हता..म्हणून पूर्ण भानावर राहून त्यांनी हे काम केलं होतं. ड्यूटी असल्यासारखे ते फक्त त्याला मारुन आले होते.

एवढ्यावरुन मला मनातल्या मनात हीसुद्धा खात्री पटली की सरांच्या मनात मराठेविषयी तसलं काही नव्हतं. त्यांनी काल जे केलं ते माझ्यासाठी आणि मराठेसाठीच केलं होतं.

पण मग त्याला पाय काढण्याची धमकी देताना त्यांनी फक्त मराठेचंच नाव का घेतलं..केळकरच्याही मागे नको लागू असं का नाही म्हणाले?

"काय विचार करतोयस रे? तोंड मीट आधी..", खरखरीत आवाजाने माझी तंद्री भंगली. मी आ मिटून घेतला.

"सर. पण त्याने पोलीस कंप्लेंट केली तर?"

"नाय करणार तो कंप्लेंट..मी सांगतो.."

मला त्यांच्या आत्मविश्वासाचं खूप म्हणजे खूप विचित्र आश्चर्य वाटत होतं पण त्याचवेळी खूप धीरही येत होता. च्यायला, सरांना काही शाट पडली नाहीये झाल्या गोष्टीची अन मी तर त्यांनी हाणला तेव्हा नुसता बाजूला उभा होतो. मी कशाला काळजी करु एवढी? ..

तरी विचारणं आलं, म्हणून विचारलं, " का नाय करणार तो कंप्लेंट सर?"

"तो पोरगा पण तुझ्यासारखाच घाबरट आहे केळकर. पोलीसाच्या लफड्यात पडणारच नाही तो. त्याला माहीत आहे की पोरीची भानगड आहे..मी नुसतं बघूनसुद्धा ओळखतो रे असल्या लोकांना..काही होत नाही."

"सर..पण तो आणि पाप्या मला सोडणार नाहीत.."

"ते येतील नंतर तुला रस्त्यात गाठून घाबरवायला.. तू घाबरलास की मेलास..घाबरू नको.."

मी शहारुन गप्प झालो.

"अरे, ते लोक आत्ता लगेच नाही काही करणार.. अजून वेळ आहे..आधी त्याला नीट उभा तर राहू दे पायांनी.."

"सर..पाप्या पाटील खतरनाक आहे. त्याने काल जाताजाता धमकी पण दिलीय.."

"धमकी दिलीय ना.. मग अजिबात काळजी करु नको. काही करणार नाही तो. आणि कुठे गाठून जरा मारलं तुला तरी काही तेवढ्याने मरणार नाहीस तू. जमेल तसं त्यालाही मार. नुसता मार खाऊन येऊ नको. आपण खाली पडलो की सगळे आपल्यावर चढतात हे लक्षात ठेव. आपण पडायचं नाही."

मी मूढ होऊन उभा राहिलो.

"माझा स्टुडंट असूनपण कसला डरपोक आहेस रे. लाज वाटते मला तुझी.. पोरगी आहेस काय तू? आपल्या क्लासच्या पोरीपण तुझ्याहून जास्ती बिंधास असतील."

मी तसाच ऐकत उभा राहिलो. प्रवचन सुरु झालं असं समजून.

"जा आता पळ घरी..", नेहमीप्रमाणे सरांनी मला अर्ध्या बोलण्यातून हाकलला..

घरी येऊन ब्राऊला अंडी घातली, मुतवून आणला आणि रात्रीची उरलेली झोप काढण्यासाठी पडलो. सरांच्या बोलण्याने धीर तर खूपच आला होता. आणि खरंच, जर पोलीसात प्रकरण गेलं असतं तर एव्हाना मला शोधत हवालदार घरी आलाच असता. मी काही कुठे पळून गेलो नव्हतो.

अजून पोलीसाची काही वार्ता नव्हती, म्हणजे अजूनतरी जाधवाने काही कंप्लेंट केली नव्हती. आणि आता जवळजवळ वीस तास होऊन गेल्यावर नव्याने पोलीसांकडे कंप्लेंट करेल असं वाटेना.

पडलो तरी झोप मात्र येत नव्हती. आज कॉलेज होतं. रविवार संपला होता. सकाळची लेक्चर्स टाळता आली असती आणि तेच्यायला आम्ही ती टाळायचोच. पण निदान दुपारी प्रॅक्टिकलला तरी जायलाच हवं होतं. कॉलेजला जायचं म्हणजे तो कॉलेजचा सायकल स्टँड आलाच. आणि त्यावर बसलेला पाप्या पाटीलही. मला अजिबात उठायची इच्छा होईना. तरी कसातरी पाय ओढत बाथरूममधे जाऊन स्वच्छ झालो. तेवढ्यात ब्राऊला दिलेलं प्रॉमिस आठवलं. त्याचा कालचा उत्साही चेहरा आठवला. मुकाट्याने त्याला दोरी लावली आणि राणेंच्या घराकडे फुटत चाललेल्या उन्हातून निघालो.

राणे बागेतच पाईप घेऊन पाणी उडवत उभे होते. त्यांनी गेट उघडायपूर्वीच ब्राऊ गेटवर पुढचे दोन पाय ठेवून उभा राहिला. आता हा तिथेच काही विचित्र हालचाली सुरु करतो की काय अशी भीती वाटून मला आधीच ऑकवर्ड व्हायला सुरुवात झाली. तरी बरं, राणेंच्या मिसेस समोर नव्हत्या ते. राणेंच्या स्वागताचीही वाट न पाहता ब्राऊ थेट बेगमच्या डॉगहाऊसमधे घुसला. मग आम्ही फार सीन न पाहता आत जाऊन बसलो. बराच वेळ गेल्यावर खिडकीतून पाहून सगळं झाल्याची खात्री केली आणि बाहेर आलो. ब्राऊच्या तृप्तीसोबत प्रत्येक वेळी मला मात्र फक्त कोकम सरबत मिळत होतं.

दुपारी प्रॅक्टिकलला गेलोच शेवटी दबकत दबकत. आज सायकल स्टँडवरही पाप्या किंवा गँगचा कोणी मेंबर बसलेला नव्हता. पार्टनर मोमीन आधीच लॅबमधे पिपेट धुवत होता. त्याने मला बघताक्षणीच सांगितलं की जाधव आता ठीक आहे. आजच त्याला घरी सोडणार आहेत. मोमीन साला एरवी सुमडीत असतो पण सगळ्या बातम्या ठेवून असतो साला. हे ऐकल्यावर मला बरंही वाटलं आणि फाटलीसुद्धा. कारण तो मरतबिरत नाहीये हे कळून सुटल्याचा फील आला पण आता तो मला लगेचच कुठेतरी गाठणार याचा गार ओघळ कण्यातून गेला.

प्रॅक्टिकल संपेपर्यंतच परांजप्या त्याच्या लॅबमधून माझ्याकडे आला. त्याच्या म्हणण्यावरून आम्ही अँड्र्यूजकडे सँडविच खायला गेलो.

अँड्र्यूचा कट्टा पूर्ण रिकामा होता. मला एकदम हुश्श वाटलं. भुकेची खरी खरी जाणीव झाली. एकदम दोन ऑम्लेटची ऑर्डर गेली. तव्यावर चर्र करुन अंडं पडलं. तिखट मसाल्याचा खाट आला. दोन मिनिटात पावात भरून ऑम्लेट हातात आलं. तोंडात चळ्ळकरुन लाळ आली.

पहिला लचका तोडला आणि बुलेटचा भक भक आवाज कानात घुसला. मागे वळून बघितलं तर पाप्या. त्याच्या मागच्या सीटवर त्याच्याच गॅगमधला तो जाड्या रेडकर होता. माझा थरकाप झाला.

पाप्याने बुलेट उभी केली आणि थेट माझ्याकडे आला. हातातलं ऑम्लेट सँडविच हातातच राहिलं. भूक एकदम नाहीशी झाली.

पाप्याने जवळ येऊन डायरेक्ट माझ्या कॉलरला धरलं आणि काही कळायच्या आत मला एकदम चकचकीत प्रकाश दिसल्यासारखा झाला. त्याचा जोरदार लाफा माझ्या डोळ्याजवळ बसला होता हे जराजरा समजेपर्यंत थड करुन अजून एक आवाज आला आणि दातांतून कळ आली. एकदोन श्वास कसेतरी घेतले तेवढ्यात तोंडात खारट चव आली. रक्त असणार. डोळ्यासमोरही अंधार येतोयसं वाटायला लागलं.
..
. (टू बी कंटिन्यूड..)

कथाभाषाप्रकटनप्रतिसादआस्वाद

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

2 Aug 2011 - 1:16 pm | कच्ची कैरी

पूर्ण वाचुन झाले कि मग योग्य तो प्रतिसाद देईल

पल्लवी's picture

2 Aug 2011 - 1:26 pm | पल्लवी

गेलं बेनं बाराच्या भावात. :|

(" .....परत आणलं ते नाकात कापूस घातलेलंच." काटा आला सरसरून.. )

अपेक्षे प्रमाणे हा भाग मोठा आलाय. :)
आता दवाखान्याची पाळी केळ्यावर का?
पुभाप्र.

मेघवेडा's picture

2 Aug 2011 - 2:22 pm | मेघवेडा

मस्त. पुभाप्र.

पियुशा's picture

3 Aug 2011 - 12:16 pm | पियुशा

+१ हेच म्हणते
पु.ले.शु. :)

साबु's picture

2 Aug 2011 - 1:32 pm | साबु

लवकर टाकता आले तर टाका पुढचे भाग... आता राहवत नाहिये...

नन्दादीप's picture

2 Aug 2011 - 1:34 pm | नन्दादीप

आता माझी सटकली.......

आयच्या गावात आणि बाराच्या भावात........
.
.
.
(गोजिरा चिंगम)

किसन शिंदे's picture

2 Aug 2011 - 1:36 pm | किसन शिंदे

खाल्लाच मार शेवटी.....आता फक्त मारच खावून घेतोय कि जाधव सरांचा गुरुमंत्रही लक्षात ठेवतोय.

पुढाचा भाग टाका पटकन..:)

छान छान चाललंय चालु द्या चालु द्या,या दुनियेत दोन देताना दोन घेण्याची तयारी ठेवुनच राहावं लागतं.

>>>>या दुनियेत दोन देताना दोन घेण्याची तयारी ठेवुनच राहावं लागतं.

'चोता दोन'चं बारसं सुरु आहे. इकडुन एक सवाष्णंबाई दुसरीच्या हातात 'कुणी दोन घ्या कुणी दोन द्या' करताना डोळ्यापुडं हुब्या र्‍हायल्या आणि ड्वाळे पाणावले. ;)

बाकी त्या 'गव्या'ला चांगलं ल्हितोस आजून येऊ द्या वगैरे सांगून दमलोय.
गणप्याच्या दुधी हलव्यासारखं ह्या 'गव्या'चं काय चुकलंच (चुकणं चुकून माकूनच असतंय) तरच आपण बोलणार. :)
पियुशाला कोणी काही बोलतं का पंगाकाका सोडले तर? ;)

प्रचेतस's picture

2 Aug 2011 - 1:40 pm | प्रचेतस

गवि रॉक्स.
हा भाग एकदम शिरेस झालाय.
केळ्या पण आता उलटून पाप्याला मारतंय की काय कुणास ठाउक.

आनंदयात्री's picture

2 Aug 2011 - 6:34 pm | आनंदयात्री

>>केळ्या पण आता उलटून पाप्याला मारतंय की काय कुणास ठाउक.

केळ्या नक्की हाणतय पाप्याला रे !! हिरो आहे तो !!

केळ्या आता पाप्याला धु धु धुणार.... हे नक्की

गवि लवकर टाका पुढचे भाग

नगरीनिरंजन's picture

2 Aug 2011 - 2:52 pm | नगरीनिरंजन

धुणार असंच वाटतंय.
बाकी लिखाणाबद्दल नेहमीचंच म्हणत बसत नाही.

अरे काय हा हिंदी शिणुमा वाटला काय तुम्हा लोकांना....
केळ्या मुकाट मार खाईल (आणि मराठेची सिंपथी घेईल) असे आमचे आतले मन आम्हास सांगते.

याला अंदाज म्हण्याचा कि परवाच्या कट्यावर श्टोरी सांगितल्या गेलेली आहे.........

गणपा's picture

2 Aug 2011 - 5:26 pm | गणपा

येवढ आमच भाग्य कुठलं. :)

गणपाशेट गुप्त वेषात हजर होते की काय कट्ट्याला? ;)

तद् माताय दगुड बराबर बसला की काय हो गवि?

झक्कास हो गवि! केळ्याच्या मार खाण्याचं वर्णन इतकं जबर केलय की माझ्याच तोंडातून रक्त आलय की काय असं वाटलं! शॉल्लेट एकदम टेन ऑन टेन!'

ब्राऊ..७ संध्याकाळपर्यंत आले तरी चालेल. ;)

ब्राऊ..७ संध्याकाळपर्यंत आले तरी चालेल. ;)

पुन्हा अप्रतिम..
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ...

विजय नरवडे's picture

2 Aug 2011 - 2:36 pm | विजय नरवडे

वा

मनराव's picture

2 Aug 2011 - 3:09 pm | मनराव

मस्त........!!!

का कुणास ठाऊक....... पण हे........ >>(टू बी कंटिन्यूड..)<<< वाचुन परत एकदा पुढच्या भागासाठी खुप वेळ लागणार अस वाटु राहिलंय..........

इष्टुर फाकडा's picture

2 Aug 2011 - 3:17 pm | इष्टुर फाकडा

वा वा अप्रतिम !! गवि लवकर येवूद्या पुढचा....

बद्दु's picture

2 Aug 2011 - 4:56 pm | बद्दु

बोलेतो..एकदम फसस़क्लास ...केळ्या मार खाईल हे नक्की..परांजप्या तोवर सरांना बोल्वेल का कसे..तेच विचार करतोय्...
जाम रंगतेय् कथा हे मात्र मान्य.. चालु द्या अशीच..

प्रीत-मोहर's picture

2 Aug 2011 - 5:00 pm | प्रीत-मोहर

गवि पुढचा भाग कधी?

इरसाल's picture

2 Aug 2011 - 5:18 pm | इरसाल

आज संध्याकाळी ७ वा भाग वाचायला मिळेल.
आभारी आहे गवि.

इरसाल's picture

2 Aug 2011 - 5:20 pm | इरसाल

डआकाटा.

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2011 - 6:47 pm | स्वाती दिनेश

वाचते आहे, पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
स्वाती

रेवती's picture

2 Aug 2011 - 7:03 pm | रेवती

हम्म..
सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन फटके तरी देवून येतोय का नाही?

dev's picture

2 Aug 2011 - 7:28 pm | dev

पुढचा भाग कधी?

लवकर येवूद्या .......

उत्कंठावर्धक रंगतदार भाग

उत्कंठावर्धक रंगतदार भाग

इंटरनेटस्नेही's picture

3 Aug 2011 - 1:57 am | इंटरनेटस्नेही

आता हिरो व्हिलण ला ण्क्कीच धुणार. उत्सुकता वाढत चाललीय..

उत्कंठावर्धक आहे निश्चितच. पण थोडासा तोच तो पणा येतो आहे.
असो.. लवकर लिहा.

अप्रतिम..
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

VINODBANKHELE's picture

4 Aug 2011 - 12:56 pm | VINODBANKHELE

ब्राऊच्या तृप्तीसोबत प्रत्येक वेळी मला मात्र फक्त कोकम सरबत मिळत होतं.

अजुन काय पाहिजे होते भाऊऊऊऊउ??????