जेव्हा आख्खा देश विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करत होते तेव्हा भारताच्या विजयाच्या शिल्पकाराला आपण विसरत होतो असे मला वाटते. मिपा वर एवढे धागे येउन गेले पण एकानेही विजयाचे योग्य ते श्रेय या इसमाला दिले नाही याचा खेद वाटतो म्हणुन हा धागाप्रपंच. खरे म्हणजे या व्यक्तीशिवाय आपण विश्वचषक जिंकु शकत नाही हे सुरुवातीपासुनच सर्वांना माहिती होते. त्या अनुषंगाने मला सुरुवातीला काही ढकलपत्रे आणि काही भ्रमणध्वनी संदेश देखील आले. पण म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो (अर्थात कोणाला वाटले म्हणुन हा वैद्य मरेल असे नाही). त्या अनुषंगाने लोक या इसमाला विसरले. कोण आहे हा? अहो हा आपला रजनीकांत
विशवचषकाच्या आधीच आपण जिंकणार आणि त्याला रजनीकांत कारणी भूत आहे हे सांगणारे ढकलपत्र आले होते:
Indiais going to win the 2011 Cricket World Cup……101%
Want to know the reason why?
Just scroll down to see the horror
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
virendeR sehwag
sachin tendulkAr
yuvraJ singh
gautAm gambhir
yusuf pathaN
ms dhonI
virat Kohli
harbhAjan singh
zaheer khaN
s sreesanTh
r asHwin
जिस टीम मे रजनीकांत हो वोह टीम कभी हारेगी क्या?
नंतर अंतिम सामन्यादरम्यान भारताची अवस्था २ बाद ३१ असताना एक मेसेज आला:
"टेंशन मत लो. इंडिया जितेगा. स्टेडियम मे रजनीकांत है"
भारत जिंकत आलेला असताना हा मेसेज आला:
"अनहोनी को होनी कर दे
होनी को अनहोनी
एक जगह जब जमा हो तिनो
रजनी, गजनी और धोनी"
विश्वचषक विजयाच्य दुसर्या दिवशी हा मेसेज आला:
"एके दिवशी रजनीकांत क्रिकेटचा सामना बघायला गेला. त्या दिवशी भारत विशवचषक जिंकला. ........................................ हसु नका. हा विनोद नाही, वस्तुस्थिती आहे."
ज्या माणसाने आपल्या विश्वचषक विजयाच्या आशा स्फुल्लिंगित केल्या त्या श्री. रजनीकांत गायकवाड यांना हा लेख सादर समर्पित.
प्रतिक्रिया
5 Apr 2011 - 11:07 am | छोटा डॉन
मस्त लेख.
आमचा रजनी आहेच तसा ग्रेट.
काही हलकट लोकं साली उगाच चेष्टा करतात, पण रजनीचा महानपणा समजणे ही त्यांच्या बस की बात नहीं असे मानुन आम्ही त्यांची गुस्ताखी नजरअंदाज करत असतो. ;)
लेख आवडला.
- ( रजनीप्रेमी ) छोटा डॉन
5 Apr 2011 - 11:52 am | मृत्युन्जय
:)
5 Apr 2011 - 11:09 am | ज्ञानराम
छान
लेख आवडला.
5 Apr 2011 - 11:16 am | अप्रतिम
अक्चुली रजनी ला माहिति होते कि म्याच जिंकणार आहे.तो फक्त हायलाईट्स पहायला आला होता
5 Apr 2011 - 1:09 pm | ५० फक्त
अरे रजनिला वानखेडेच्या गोंधळात टॉस बघता आला नाही म्हणुन दोन वेळा टॉस करावा लागला. तसेच गंभीरने त्याच्या मुलीच्या चित्रपटात भुमिका करण्यास नकार दिल्याने त्याला रजनिने ९७ वर ऑट केले.
5 Apr 2011 - 1:23 pm | परिकथेतील राजकुमार
(आतापर्यंत आलेल्या)पाच प्रतिक्रियांमध्ये पाचही पुरुष आयडी.
यावरुन (रजनीकांत मुळे मॅच जिंकल्यावर) पुरुषांना प्रतिसाद द्यायला आवडतो, आणि स्त्रियांना प्रतिसाद द्यायला आवडत नाही असा निष्कर्ष काढावा काय?
5 Apr 2011 - 1:35 pm | मृत्युन्जय
पाचही प्रतिसाद मराठी भाषिकांचे आहेत. रजनीकांतचे फॅन्स दक्षिणेत नाहीत असाही एक निष्कर्ष निघु शकतो ;)
5 Apr 2011 - 1:38 pm | छोटा डॉन
चुक !
बाकी तुमचे निष्कर्ष आणि आयडिया जिथे संपतात तिथे रजनीकांत सुरु होतो ह्याची आठवण मी तुम्हाला करुन देऊ इच्छितो. बाकी चालु द्यात :)
- छोटा डॉन
5 Apr 2011 - 1:38 pm | गणपा
हा +१ पर्या आणि सुहाश्या दोघांसाठी.
5 Apr 2011 - 2:25 pm | पैसा
असं ऐकताच मुरलीधरन खेळत नाही असं म्हणाला होता म्हणे. खरं खोटं रजनी जाणे!
5 Apr 2011 - 2:35 pm | मृत्युन्जय
आज ढकलपत्रातुन आलेला हा एक फोटो. नविन धागा काढण्या ऐवजी इथेच टाकला थोडे out of context वाटत असेल तरी:
Malinga Before and After World Cup