अंतर ठेवा...

विनीत संखे's picture
विनीत संखे in जनातलं, मनातलं
29 Mar 2011 - 9:40 pm

मिपाचे सदस्यगण हो,

कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय.

जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती.

धन्यवाद
विन्या.
(मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)

धोरणमांडणीप्रकटनविचारशुभेच्छामतसंदर्भचौकशीसल्लाप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

शेखर's picture

29 Mar 2011 - 9:52 pm | शेखर

खरोखरच अंतर ठेवा... लोकांना पुढचे लेखन कधी येतय याची हुरहुर लागली पाहिजे.
अतिपरिचयात अवज्ञा असे व्हायला नको.

रेवती's picture

29 Mar 2011 - 10:23 pm | रेवती

सहमत. पण क्रमश: असलेल्या लेखांमध्ये मात्र नको.:)

रेवतीताईशी सहमत. फक्त दीर्घ लेख टाकताना काळजी घ्या. कारण लेख वाचायला वेळ मिळत नाही.

- पिंगू

चिरोटा's picture

30 Mar 2011 - 12:35 am | चिरोटा

दोन लेखांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे!.

की फार लांब दीसणार नाही.

हा तर मूद्याच म्हणजे जर लेखन क्रमश: नसेल ना तर नीवांत महीना दोन महीने गॅप घेतलीत तरी हरकत नाही पण जर क्रमश: असेल तर आठवड्यात ३-४ भाग टाकायचे.

मूकवाचक's picture

30 Mar 2011 - 1:32 am | मूकवाचक

एखाद्या कवड्याला (कवी चा आदरार्थी उल्लेख) असह्य प्रसव वेदना होऊन मग जुळे, तिळे होऊ शकते. अशा वेळी ते होऊ द्यावे. नाहीतर धोकादायक ठरते.

एखाद्या कवड्याला (कवी चा आदरार्थी उल्लेख)
असे बोलणे बरोबर नाही. वरील वाक्यात आदरार्थी ते काय?

पर्नल नेने मराठे's picture

30 Mar 2011 - 1:17 pm | पर्नल नेने मराठे

कवड्याला =)) =)) मस्त्च !!!

आत्मशून्य's picture

30 Mar 2011 - 4:53 am | आत्मशून्य

हा हा हा

@रेवती
मी ताइला (वयाने मोठी आणी आदरणीय व्यक्ती) तायडे म्हणतो मग कवीला त्याच हक्काने कवडे म्हटलं तर चूक काय ?

गणेशा's picture

31 Mar 2011 - 4:58 pm | गणेशा

भारीच ...

विनीत सारेच जण भराभर लागोपाठ त्यांच साहित्य इथ चढवु लागले तर जे खरच कसदार असत त्या कडे दुर्लक्ष होउ शकत. जस की आज काल काव्य विभागाच झालय, एका दिवसात इतक्या कविता येतात की त्यातली एखादी मनात रुणझुणावी असा वेळच नाही मिळत. थोड संयमान हळु हळु टाकत गेलात तर आम्ही ही रसाळपणे वाचु, दाद देउ.

आदिजोशी's picture

30 Mar 2011 - 10:36 am | आदिजोशी

एकाच लेखकाने रोजच्या रोज लेख प्रसवल्याने इतर लेखकांचे लेख मागे पडतात व ते अनेकदा वाचले जात नाहीत. असा अनुभव ह्या आधी इथे आला आहे की एका दिवसात आपल्या ब्लॉगवर लिहिलेले ५-६ लेख टाकण्यात आले. आणि मुखपॄष्ठावर ते एकच नाव चमकत राहिले.

जर लेख आधीच लिहून झाले असतील आणि इथे पूर्वी टाकले नसतील तर ते आत्ताच एकापाठी एक टाकायची घाई समजू शकत नाही. तशी आवश्यकताही नाही. सवडीने सावकाश टाका.

सगळ्यांचे लिखाण वाचले जावे हाच ह्या सूचनेमागचा हेतू आहे. गैरसमज न करून घेता सहकार्य करावे.

वपाडाव's picture

30 Mar 2011 - 12:19 pm | वपाडाव

शब्दन शब्द अगदी सुरेख .....
तुमच्याकडे तयार असताना देखील इतक्या घाईघाईने लेख पाडण्याची आवश्यकता नाही....
गै. क. घे. न.
अवांतर : संखे साहेब पाचव्या खोलीतील एकांतवासात जास्तच वेळ बसत आहे असे वाट्टे.. (लिखाण सुचण्यासाठीची सर्वोत्तम जागा) ;)

विनीत संखे's picture

1 Apr 2011 - 12:52 pm | विनीत संखे

तुम्हाला कसे कळले... 'उपेक्षीत ठिकाणी'च प्रतिभा जास्त सापडते असे म्हणतात, ते काय खोटे नाही.

;)

मृत्युन्जय's picture

30 Mar 2011 - 11:17 am | मृत्युन्जय

थोडे अंतर म्हणजे किती अंतर ते तु स्वतःच ठरव बाबा. ७ दिवस की १० दिवस की १५ दिवस की १ महिना. तो तुझा निर्णय असु देत. पण अंतर ठेव म्हणजे झाले. आणि जमल्यास किती अंतर ठेवु हे आणि असे इतर धागे नको काढुस. गविने सुद्धा आल्या आल्या डझनाने धागे काढले ब्लोग वरुन चोप्य पस्ते करुन. त्याला मुद्दा समजावेपर्यंत बराच वेळ गेला होता. पण आता मला खात्री आहे की तो स्वतः मान्य करेल की थोड वेळ प्रत्येक धाग्यामध्ये असावा.

तु चांगले लिहितोस हे तुझ्या लिखाणावरुन कळलेच. आत्त्तापर्यंत वाचलेले सगळे आवडले.

अवांतर: गवि वाचत असाल तर आणि पटले तर पुस्ती जोडा. नसल्यास खव मध्ये शिव्या घाला (इथे नको) ;)

गवि's picture

30 Mar 2011 - 11:28 am | गवि

मान्य.. योग्य.. अ‍ॅग्रीड..चोक्कस..
:)

मृगनयनी's picture

30 Mar 2011 - 11:53 am | मृगनयनी

(मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)

छे छे!... आम्हाला वाटलं की --"ट्रक" किन्वा "ट्रान्स्पोर्ट लॉरी"च्या मागे कोणती पाटी लावणे किन्वा अक्षरे रन्गवणे (पक्षी :सुरक्षित अन्तर ठेवा )अधिक उचित ठरेल"... याविषयी तुम्ही सन्शोधनात्मक प्रबन्ध वगैरे सुरु केलाये की कांय? ;) ;)

आणि हो... बाकी ते "क्षमस्व" वगैरे मागण्याइतकंही "पझेसीव्ह" होऊ नका हो!!! नवीन नवीन असे पर्यंत बरं वाटतं... पण नन्तर याच "पझेसीव्ह्"नेसचा "फोबिया" होतो! ... ;) आणि मग दिवसाला एक लेख पाडण्याच्या मनसुब्याचं रुपान्तर दिवसाला किमान ५ लेख तरी पाडलेच पाहिजे... या प्रखर इच्छाशक्तीमध्ये होतं.....

.आणि मग सुरू होते... एक जीवघेणी स्पर्धा... स्वतःशीच!!!!

मग "मिसळपाव" कारण नसताना बदनाम होतं!'

--- त्यामुळे तूर्तास जास्त विचार करण्यापेक्षा "योगा", "प्राणायाम", "रामदेव बाबा" यांवर जास्त भर द्या!
--- आणि तेही नाही जमलं तर इतर्ही संस्थळे आहेत्च की! उदा. मायबोली, उपक्रम, मी-मराठी. नेट ;) ;)

___________

पु. ले. शु. ! :)

विनीत संखे's picture

30 Mar 2011 - 12:12 pm | विनीत संखे

धन्यवाद् मित्रांनो.

अंतर ठेवणे गरजेचे हे जवळजवळ सर्वांचे मत झालेले दिसतेय. मी मनापासून त्याचे स्वागत करतो.

मृगनयनी's picture

30 Mar 2011 - 12:43 pm | मृगनयनी

हा हा हा हा... पण किती तासांचं अन्तर ठेवणार... तेवढं फक्त सान्गा! ;)
___________

मग विनित'जी पुढचा लेख कधी? ;)

प्यारे१'s picture

30 Mar 2011 - 12:54 pm | प्यारे१

नैने,

णवीण आहे गं तो.....किती छळशील त्याला?

मात्र एक 'शहाणपणा' विनीतने केलाय तो लक्षात नाही आला बहुतेक कुणाच्या.

सबुरीसाठी दिलेल्या सल्ल्याचाच लेख केला त्याने. 'मेक लेमोनेड ऑफ लेमन्स थ्रोन अ‍ॅट यू' सारखा.

इरसाल's picture

30 Mar 2011 - 2:15 pm | इरसाल

'मेक ओम्लेट ऑफ अंडाज & टोम्याटोस थ्रोन एत यु' असे झालेय हे.

रात्रभर (दिवसभर) वाचली गीता अन काल(दुपार)चा गोंधळ बरा होता....
नयनीबै.. ततुम्ही अगदी बरोब्बर बोल्लत हो...
अगदी ५-५ तासांच्या अंतरावर लेख पाडत आहे हो...
फक्त सदर वेगळं-वेगळं....
आत्ताच पाकृ घातली आहे...

विनीत संखे's picture

30 Mar 2011 - 11:46 pm | विनीत संखे

अहो वडापाव साहेब,

अजून ठरवलेच नाही किती अंतर ठेवायचे ते. ;)

आता ठरवले ... एक लेख प्रत्येक आठवड्याला.

ष्ट्यांप.

५० फक्त's picture

30 Mar 2011 - 1:37 pm | ५० फक्त

''सबुरीसाठी दिलेल्या सल्ल्याचाच लेख केला त्याने. 'मेक लेमोनेड ऑफ लेमन्स थ्रोन अ‍ॅट यू' सारखा.''

हे केलं नसतं ना तर त्याच सल्ल्याची इथं धमकी झाली असती हे समजलं वाटतं त्याला.

नारयन लेले's picture

31 Mar 2011 - 12:42 pm | नारयन लेले

आ॑दाज आला ना! झालेतर,
कोणतिहि गोश्ट आति करु नये आसे सा॑गुन ठेवले आहे.
हे लक्ष्यात ठेवुन योग्य तेव्हडे आ॑तर ठेवत जावा म्हणजे बरे.

विनित

गणेशा's picture

31 Mar 2011 - 4:51 pm | गणेशा

लेखा मध्ये अंतर किती हा लेखकाचाच प्रश्न आहे.. तरीही साधरणता .. आधीच्या लेखा नंतर १ वीक कमीत कमी अंतर असावे ..

मजेने हे :
आणि या वीक मध्ये स्वताचे लेखन नसल्याने त्याने इतरांच्या त्यांना चांगल्या वाटनार्या लेखनाला प्रतिसाद द्यावेत .. ( ना की स्वताच्या लेखावरील प्रतिक्रीयेवर .. )

बाकी क्रमशः मध्ये मात्र जास्त अंतर नको असे वाटते .. कारण एक लय .. एक चित्र एकसंध वाटले पाहिजे असे माझे मत ..

बाकी तुमचे लेखन खुप आवडते .. असेच लिहित रहा .. वाचत आहे ..

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 1:05 pm | नरेशकुमार

दोनशे किलोमीटर अंतर ठेवा.