महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
6 Dec 2010 - 2:12 pm

भाग १ - http://www.misalpav.com/node/15474
भाग २ - http://www.misalpav.com/node/15500
भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529
भाग ४ - http://www.misalpav.com/node/15586

आज औरंगाबाद मधला शेवटचा दिवस , सुट्टीचे ४,५ दिवस कसे गेले समजलेच नाही.....
भरभरून पाहून घेतलं, महाराष्ट्रात इतकं सौंदर्य असताना लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात कशाला झंक मारायला जातात देव जाणे, आधी आपलं राज्य बघा , देश बघा, आणि नंतर सुद्धा वेळ मिळाला तर बाहेर जा , असो हे बुवा माझं मत ... (कोणी दुखावलं वगेरे गेल्यास हलकं घेणे )

आज होतं अजिंठा .........................
औरंगाबाद पासून ११० किमी दूर .
सकाळी ८.३० ला MTDC ची बस निघाली. वातावरण एकदम झकास होतं , रात्री मजबूत पाउस पडून गेलेला होता.
११.३० च्या सुमारास अजिंठ्याला पोहोचलो. पण प्रत्यक्ष लेणी पाहण्यासाठी ४ किमी . "Eco - Friendly " बस मधून जावं लागतं

जसं वेरूळ "स्थापत्य शैली" साठी प्रसिद्ध .. तसं अजिंठा "कलेसाठी" प्रसिद्ध .. "चित्रकला" ...
रंगवलेली चित्र अजून सुद्धा बऱ्याच चांगल्या अवस्थेत टिकून आहेत ...
हा चित्रांचा इतिहास ८०० वर्षापासून ते १५०० वर्षानपर्यंत मागे जातो ( जाणकार प्रकाश टाकतीलच )

पहिल्याच दर्शनाने अजिंठ्याने जिंकलं...
ती एक प्रकारची "घाटी" होती.... आणि डोंगराच्या कडेकडेने लेण्या
बऱ्याच प्रकारचे पक्षी दिसत होते , कै च्या कै हिरवाई पसरलेली होती...
आपण मराठवाड्यात आहोत कि कोकणात असा प्रश्न पडावा इतकी , आणि वातावरण जबर थंड

अजिंठ्यात लेण्यांमध्ये "flash " कॅमेरा न्यायला बंदी असल्याने ( उरले सुरले रंग पण खराब होतील उष्णतेने म्हणून ) विशेष फोटू काढता आले नाहीत .......

काही बाहेरची छायाचित्र

आतमध्ये आल्यावर एखाद्या पिऱ्यामिड मध्ये आल्यासारखं वाटत होतं

छताला लावलेल्या "tiles ".. अजूनही शाबूत आहेत . त्यावरची नक्षी, आणि रंग अजूनही टिकून आहेत . पण हे काम १५०० वर्षापूर्वीच आहे हे जाणवल्यावर मती गुंग होऊन जाते

आत्तापर्यंत बघितलेल्या सर्व बुद्ध प्रतिमांमध्ये बुद्ध हे पद्मासनात बसलेले होते
पण या लेण्यांमध्ये बुद्ध हे सिंहासनावर बसलेले पहिल्यांदाच पाहिले

नगर जीवन

बुद्ध

हे असं काहीतरी बघितल्यावर माझा ३ वर्षांचा भाचा घाबरून जो बाहेर पळाला तो परत आत आलाच नाही

बाहेरचं कोरीवकाम दृष्ट लागण्यासारख होत

शेवटच्या लेणीत बुद्धांच महानिर्वाण चित्रित करण्यात आलं होत .
बुद्ध निवर्तले आहेत , खाली त्याच्या पायाशी सर्व शोकाकुल अनुयायी आहेत, आणि वर स्वर्गात सर्व यक्ष ते येणार म्हणून "जश्न" मनाव्तायेत.. असं काहीस .....

हा शेवटच्या लेणीबाहेरून घेतलेला फोटो.... सर्व लेण्या इथून दिसत आहेत

सगळं बघून होईपर्यंत ५ वाजलेले होते. पायाचे अक्षरशः तुकडे पडलेले होते.. एखाद्या जादुईनगरीतून बाहेर आल्यावर कसं वाटेल तसं वाटत होतं.... रात्रीची "नंदीग्राम" होती .. त्यामुळे पटापट आवरून "स्टेशन" कडे धावायचं होत. शेवटी आता घराची आठवण यायला लागली होती .. माणसाने घराबाहेर कितीही मजा केली, तरी शेवटी त्याला आपल्या घरट्याची आठवण येतेच येतेच.
पुढच्या वर्षापर्यंत पुरेल एवढा आठवणींचा खजिना घेऊन आम्ही अजिंठ्याचा निरोप घेतला

ता. क - - लेखमाला संपली असं नाही म्हणणार कारण, अजून भरपूर महाराष्ट्र फिरायचाय. नवीन नवीन ठिकाण पहायचीयेत. पण तूर्तास इथेच थांबतो.
प्रवास वर्णन वगेरे कधी मी लिहीन असं मला बाप जन्मात वाटलं नव्हतं. पण प्रयत्न करून बघितला. "मिसळपाव ने मला संधी दिली.खूप खूप आभार.
सुधांशू , सुहास, मनी२७ या सगळ्यांचे आभार लिहिण्यासाठी पाठींबा दिल्याबद्दल.
मन , यशवंत एकनाथ यांचे सुद्धा आभार , फोटूनबरोबर इतिहास उलगडून दाखवल्याबद्दल.
आणि बाकी सर्व तमाम मिपाकरांचे "प्रतिसाद दिल्याबद्दल आणि लेख वाचल्याबद्दल आभार.

क्रमश:..................................................................................

मांडणीसंस्कृतीप्रवासवावरइतिहाससमाजजीवनमानभूगोलरेखाटनछायाचित्रण

प्रतिक्रिया

माहिपुर्न वर्नन आहे , भटकत राहा आनि लिहित राहा.:)
पु.ले.शु...............

अवलिया's picture

6 Dec 2010 - 3:08 pm | अवलिया

ज ब रा !!

स्पा! आजपर्यंत तुम्ही टाकलेले हे महाराष्ट्र दर्शन मी उघडल की कंम्प्युटर हँग झालाच म्हणुन समजा, अन फोटो तर कध्धीच नाही दिसत? काय करता काय तुम्ही राव? फक्त मलाच दिसु नयेत? अन वर कंम्प्युटर सुद्धा ....आमी नाय जा!

बऱ्याच जणांना दिसत नाहीत .. काय माहित काय कारण आहे ते................

परा मास्तर काहीतरी उपाय सुचवू शकतील

छान, टाईल्सचा फोटु आवडला !!

चांगभलं's picture

6 Dec 2010 - 5:11 pm | चांगभलं

कडक.... झकास फोटू.....

प्राजक्ता पवार's picture

6 Dec 2010 - 5:12 pm | प्राजक्ता पवार

माहितीपुर्ण लेख .

इंटरनेटस्नेही's picture

6 Dec 2010 - 5:18 pm | इंटरनेटस्नेही

अतिशय उत्तम प्रवास वर्णन. मनापासुन आवडले.. सर्व फोटोस देखील लईईईई भारी कॅटेगरीतले. मस्त.
स्पा यांना पुढील प्रवासासाठी आणि लेखनासाठी शुभकामना.

कवितानागेश's picture

6 Dec 2010 - 6:59 pm | कवितानागेश

सगळे फोटो छान आलेत.
अजिंठा आजपर्यंत पाहिले नव्हते मी.
अत्ताची दिवाळीची सुट्टी मी घरीच बसून वाया घालवल्याचे खूप दु:ख झाले!

मदनबाण's picture

6 Dec 2010 - 7:05 pm | मदनबाण

मस्तच... :) तुझ्यामुळे छान चित्र सफर घडत आहे रे... :)
माझे काही भाग वाचायचे राहिले आहेत...सवडीने नक्कीच पाहतो. :)

उल्हास's picture

6 Dec 2010 - 8:52 pm | उल्हास

तिसर्‍यांदा दाखवल्याबद्दल धन्यवाद

अतिशय सुंदर फोटोग्राफी

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2010 - 9:31 pm | नगरीनिरंजन

मस्ताड आहे रे हे सगळं! मजा आली फोटो पाहायला! एक अतिशय चांगले काम केलं आहेस!
फार पूर्वी गेलो होतो आता परत जावंसं वाटतंय.

स्पा, आपली लेखमालिका कधीच खंडित होऊ नये.

आपली भटकंती मनात साठवू ठेवली आहे. (आमची वेळ आली कि आम्ही पण निघू प्रवासाला). बाकी आपण सर्वांना एक सहलच घडवून आणली आहे. छान वाटले.

अजून येउद्यात............थांबू नका. तूर्तास इतकेच म्हणेन.

धन्यवाद.

मन१'s picture

7 Dec 2010 - 3:50 pm | मन१

अजिंठ्याबद्दल तितकसं सांगु शकत नाही .पण इथलं काम ब्बहुदा राष्ट्रकूट्-चालुक्य हे महराष्ट्रावर राज्य करायचे,त्या काळातलं असावं.
माझ्या अजिंठा सफरीमधे आजिंठ्यापेक्षा मला जास्त प्रसन्न कुठं वाटलं असेल तर ते म्हंजे ह्या लेण्यापासुनच जवळ एक सोयगाव का कुठलसं गाव आहे,तिथल्या प्राचीन मंदिरात(फक्त दोनेक किलोमीटर अंतर आहे त्या लेण्यांपासुन).पोचायला अतिशय दुर्गम्,पायी जाणंही अवघड्,वाहनाची तर बातच सोडा. का कुणास ठाउक्,पण मला तरी ही अशी अनवट ठिकाणं आणि अनवट वाटाच जास्त भावतात सहसा.
हे शिव मंदीरही मला त्या लेण्यांच्या प्याटर्नचं वाटलं.
पण खूप शांत,प्रसन्न होतं.अगदि अगदि दूर्,एका आडगावात्,पडकं पण रम्य ,प्रसन्न मंदीर.
जायलाच हवं.(माझी आठवण १०-१५ वर्षापूर्वीची आहे.)

तिथल्या जंगलात ससा,हरीण आणि मोर भरपूर आहेत असं माझा भटक्या (trekking crazy) मित्र सांगत होता.
त्यातले एक्-दोन ससे मला दिसले होते आणि मोराची केकावली मी ऐकली आहे.
हरीण दिसलं नाही.( सलमान च्या तिथल्या फ्यान्सनी त्याचच अनुकरण करत हरणाची चव चाखली की काय ? ;-) )

आपलाच,
मनोबा.