मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"

स्पा · · जनातलं, मनातलं
भाग १ - http://www.misalpav.com/node/15474 भाग २ - http://www.misalpav.com/node/15500 भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529 भाग ४ - http://www.misalpav.com/node/15586 आज औरंगाबाद मधला शेवटचा दिवस , सुट्टीचे ४,५ दिवस कसे गेले समजलेच नाही..... भरभरून पाहून घेतलं, महाराष्ट्रात इतकं सौंदर्य असताना लोक लाखो रुपये खर्च करून परदेशात कशाला झंक मारायला जातात देव जाणे, आधी आपलं राज्य बघा , देश बघा, आणि नंतर सुद्धा वेळ मिळाला तर बाहेर जा , असो हे बुवा माझं मत ... (कोणी दुखावलं वगेरे गेल्यास हलकं घेणे ) आज होतं अजिंठा ......................... औरंगाबाद पासून ११० किमी दूर . सकाळी ८.३० ला MTDC ची बस निघाली. वातावरण एकदम झकास होतं , रात्री मजबूत पाउस पडून गेलेला होता. ११.३० च्या सुमारास अजिंठ्याला पोहोचलो. पण प्रत्यक्ष लेणी पाहण्यासाठी ४ किमी . "Eco - Friendly " बस मधून जावं लागतं जसं वेरूळ "स्थापत्य शैली" साठी प्रसिद्ध .. तसं अजिंठा "कलेसाठी" प्रसिद्ध .. "चित्रकला" ... रंगवलेली चित्र अजून सुद्धा बऱ्याच चांगल्या अवस्थेत टिकून आहेत ... हा चित्रांचा इतिहास ८०० वर्षापासून ते १५०० वर्षानपर्यंत मागे जातो ( जाणकार प्रकाश टाकतीलच ) पहिल्याच दर्शनाने अजिंठ्याने जिंकलं... ती एक प्रकारची "घाटी" होती.... आणि डोंगराच्या कडेकडेने लेण्या बऱ्याच प्रकारचे पक्षी दिसत होते , कै च्या कै हिरवाई पसरलेली होती... आपण मराठवाड्यात आहोत कि कोकणात असा प्रश्न पडावा इतकी , आणि वातावरण जबर थंड Image removed. Image removed. Image removed. Image removed. अजिंठ्यात लेण्यांमध्ये "flash " कॅमेरा न्यायला बंदी असल्याने ( उरले सुरले रंग पण खराब होतील उष्णतेने म्हणून ) विशेष फोटू काढता आले नाहीत ....... काही बाहेरची छायाचित्र Image removed. Image removed. Image removed. Image removed. आतमध्ये आल्यावर एखाद्या पिऱ्यामिड मध्ये आल्यासारखं वाटत होतं Image removed. Image removed. छताला लावलेल्या "tiles ".. अजूनही शाबूत आहेत . त्यावरची नक्षी, आणि रंग अजूनही टिकून आहेत . पण हे काम १५०० वर्षापूर्वीच आहे हे जाणवल्यावर मती गुंग होऊन जाते Image removed. आत्तापर्यंत बघितलेल्या सर्व बुद्ध प्रतिमांमध्ये बुद्ध हे पद्मासनात बसलेले होते पण या लेण्यांमध्ये बुद्ध हे सिंहासनावर बसलेले पहिल्यांदाच पाहिले Image removed. Image removed. नगर जीवन Image removed. बुद्ध Image removed. हे असं काहीतरी बघितल्यावर माझा ३ वर्षांचा भाचा घाबरून जो बाहेर पळाला तो परत आत आलाच नाही Image removed. Image removed. Image removed. बाहेरचं कोरीवकाम दृष्ट लागण्यासारख होत Image removed. Image removed. Image removed. Image removed. शेवटच्या लेणीत बुद्धांच महानिर्वाण चित्रित करण्यात आलं होत . बुद्ध निवर्तले आहेत , खाली त्याच्या पायाशी सर्व शोकाकुल अनुयायी आहेत, आणि वर स्वर्गात सर्व यक्ष ते येणार म्हणून "जश्न" मनाव्तायेत.. असं काहीस ..... हा शेवटच्या लेणीबाहेरून घेतलेला फोटो.... सर्व लेण्या इथून दिसत आहेत Image removed. सगळं बघून होईपर्यंत ५ वाजलेले होते. पायाचे अक्षरशः तुकडे पडलेले होते.. एखाद्या जादुईनगरीतून बाहेर आल्यावर कसं वाटेल तसं वाटत होतं.... रात्रीची "नंदीग्राम" होती .. त्यामुळे पटापट आवरून "स्टेशन" कडे धावायचं होत. शेवटी आता घराची आठवण यायला लागली होती .. माणसाने घराबाहेर कितीही मजा केली, तरी शेवटी त्याला आपल्या घरट्याची आठवण येतेच येतेच. पुढच्या वर्षापर्यंत पुरेल एवढा आठवणींचा खजिना घेऊन आम्ही अजिंठ्याचा निरोप घेतला ता. क - - लेखमाला संपली असं नाही म्हणणार कारण, अजून भरपूर महाराष्ट्र फिरायचाय. नवीन नवीन ठिकाण पहायचीयेत. पण तूर्तास इथेच थांबतो. प्रवास वर्णन वगेरे कधी मी लिहीन असं मला बाप जन्मात वाटलं नव्हतं. पण प्रयत्न करून बघितला. "मिसळपाव ने मला संधी दिली.खूप खूप आभार. सुधांशू , सुहास, मनी२७ या सगळ्यांचे आभार लिहिण्यासाठी पाठींबा दिल्याबद्दल. मन , यशवंत एकनाथ यांचे सुद्धा आभार , फोटूनबरोबर इतिहास उलगडून दाखवल्याबद्दल. आणि बाकी सर्व तमाम मिपाकरांचे "प्रतिसाद दिल्याबद्दल आणि लेख वाचल्याबद्दल आभार. क्रमश:..................................................................................

वाचन 6321 प्रतिक्रिया 0