बुरा ना मानो दिवाली है!!

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
6 Nov 2010 - 2:50 am

उगाच आपापल्या नादात जगत असणार्‍या लोकांना, लहान-सहान लेकरांना भडडाम्म!!! असा आवाज करून दचकवणं वाईटच! भलेही मग तुम्ही लक्ष्मीपूजन करीत असाल की दिवाळीत फटाक्यात हजारो रूपये जाळून स्वत:चा माज दाखवत असाल. पर ये नहीं हो सकता मेरी जान! लोक जसं वागतात तसंच आपणही वागलं पाहिजे. पागल म्हणतील ना नाहीतर लोक. अख्खं शहर फटाक्यांच्या धुराने न्हाऊन निघत असताना इथे कुणाला शुध्द आहे? दिवाळी आहे ना.. बजाव फटाकाऽऽऽ अ‍ॅटम बॉम्ब लावा‌‍ऽऽऽ पाच-पाच हजारांच्या लडी लावाऽऽऽ लोकांच्या कानाच्या पडदे फुटले तर फुटले!
सहा सव्वा सहाची वेळ. छाट्छूट फटाक्यांचे आवाज गल्लीत सुरू झाले होते. त्यांचा काही त्रास होत नाही. पण कामात मन गुंतलं असताना, कशात तरी तंद्री लागलेली असताना मध्येच मोठ्ठा धड्डाम्म्म!! असा आवाज झाला तर कोण चिडणार नाही?? मी पण चिडलो होतो. एकतर समोरा-समोर दारं. तीस-चाळीस फूटांचं अंतर. शेजारी त्याच्या घराबाहेर फटाके, अ‍ॅटम बॉम्ब वाजवणार म्हणजे रस्त्याच्या मधोमध माझ्या घरापासून बारा पंधरा फूटांवर ! माय गॉड! घरात लहान बाळं आहेत - दिवाळी म्हणजे काय त्यांना अजून माहितही नाही. ती बिचारी इवले-इवले हात गाला-खांद्यांशी घेऊन झोपलेली असतात... इकडेतिकडे टुकूटूकू पाहात असतात...मध्येच भड्डाम्म्म!!!! आवाज झाला की फूटभर उंच उडून केकाटायला लागतात ना ती? पर दिवाली है!! चालायचंच!
पण अ‍ॅटम बॉम्ब फारच जोरात वाजत होते. घरातही ठिणग्या उडून येत होत्या.
शेवटी उठलोच.
"ए‌‍ऽऽऽ ये बम वगैरा अपने घर में बजाओ..हम भी दिवाली मना रहे है.. कहांसे लाये ये बम?? धमाके से घर चौंक रहा है..."
समोरचे शेजारी हिंदी भाषक होते. काय झाले माहीत नाही पण आवाज तेवढ्यापुरता थांबला. मला हायसं वाटलं. आणि वाईटही. सणासुदीच्या दिवशी काय आरडा-ओरडा करायचा? पण तेच चांगलं झालं. ताव मारून ओरडल्याशिवाय, अर्वाच्य बोलल्याशिवाय सालं कुणी ऐकतंच नाही. तास अर्धा-तास किरकोळ आवाजांत, म्हणजे तुलनेने शांततेत गेला. पण पुन्हा तेच! अ‍ॅटम बॉम्बच्या धडाक्यानं भिंतीवरचं घड्याळ खाली पडलं. पुन्हा उठलो.
"मै लास्ट बार बोल रहा हूं... इतनी बडी आवाज के पटाखें मत बजाओ.. वर्ना मै पुलिस को बुलाऊंगा.."
आता ती माणसं पण चिडली असावीत. ती पण जोरात आली.
"क्या बात कर रहे है साहब, अभी तो लक्ष्मीपूजा भी नहीं हुयी है.. फिर देखना आप कितनी आवाजें होंगी.. दिवाली है इसलिये बजा रहे है.. बुलाओ पुलिस को.. देखेंगे हम भी.."
"दिवाली सभी के लिये है, हम भी मना रहें है.. पटाखें बजाकर लोगों के घर गिराना चाहते हो या लोगों को गूंगा करना चाहते हो?"
त्याने उत्तर दिले नाही. पूर्वीपेक्षा जास्त मोठे आवाज होऊ लागले. शेवटी मोबाईलवरून "नियंत्रण कक्ष" नावाच्या पोलिसी खात्याला फोन लावला. हा नंबर असणं एक बरं असतं. हे लोक फार काही करीत नाहीत. पण रस्त्यात फार पोलीस तैनात दिसले, रस्त्यांवरची गर्दी अचानक खूप कमी झाली की - लाव नियंत्रण कक्षाला फोन - ते माहीती तरी देतात काय झालंय त्याची. म्हणजे आज मुख्यमंत्री शहरात येणार आहेत किंवा अमुक मशीदीवर रंग पडल्यानं शहरात वातावरण तंग आहे वगैरे वगैरे. तशीच त्यांनी आताही दिली -
"जै हिंद, नियंत्रन कक्षातून कॉन्स्टेबल वाघमारे बोलतोय, ब्वाला.."
"जय हिंद, साहेब आमचे शेजारी घर पडेल एवढे मोठे फटाके वाजवत आहेत.. सांगितलं तरी ऐकत नाहीत..पोलिसांनाही बोलावलं तरी काहीऽऽऽ"
"कोंच्या कॉलिनीत र्‍हाता तुमी?"
" **** कॉलनी"
"मंग ***** वाडी ठाण्याला ********* नंबरावर फोन लावा"
" बरं लावतो. जय हिंद."
त्या ठाण्यात फोन लावयचा मूड होईना. फोनमधूनच फौजदार आणि मंडळी फोडत असलेल्या फटाक्यांचे आवाज ऐकू यायचे! दिवाली है ना!
चला म्हटले बाहेर थोडे बाहेर फिरून येऊ. च्यायला नसत्या उचापती करून डोकं फिरलंय.
बाहेर फिरायला गेलो तर नाक्यावरच फटाक्यांचे स्टॉल्स लागलेले~! गर्दी ! यॅंव!! आयडीया!
तिथं जाऊन सगळ्यात मोठ्ठ्या सुतळी बॉम्बचे बॉक्स घेतले. सहा. पॅण्टीला सहाच खिसे होते. सहा खिश्यात बॉम्बचे सहा बॉक्स! च्यायला मानवी बॉम्बच झालो ना मी. पट्कन घर गाठलेलं बरं. एक ठिणगी पडायची खिशात आणि अंगाच्या चिंध्या !
सहज फिरून आलोय अशा प्रकारे घरी आलो आणि पटकन रूमच दार बंद करून सगळे खिसे फरशीवर रिकामे केले. पाच-पाच बॉम्बच्या वाती एकत्र जोडल्या आणि अ‍ॅटम बॉम्बचीच लड तयार केली. मादर**द!! दिवाली है क्या! मै भी मनाता अब दिवाली. शेजार्‍यांचा दारूगोळा संपला होता वाटतं. समोर कुणी नव्हतं.
घरासमोरच्या रस्त्याच्या अगदी मधोमध तो पाच सुतळी बॉम्बचा गड्डा नेऊन ठेवला. आणि काय इकडं-तिकडं पाहून पेटवला.
भड्डाम्म्म्म!!!!
आसपासच्या घरांच्या काचा खाली. लोक बाहेर. आरडा-ओरडा.
"क्या लगाया था?? क्या था??"
"लांब जाऊन वाजवा ना राव! काचा फुटल्या ना! म्हतारी उडाली ना आमची जाग्यावरल्या जाग्यावर "
"तेच सांगत होतो साहेब मगाच पासून.. पण कुणी ऐकायलाच तयार नाही.. बुरा ना मानो दिवाली है!"

मांडणीमुक्तकसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनशिफारसअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

आई शप्पत इतकी हसत होते की पासवर्ड मधे थोडा वेळ eeee च टाइप होत राहीलं. =))
आज कॉफी ची गरज नाही. मस्त मूड च बदलून टाकलात.

स्वछंदी-पाखरु's picture

6 Nov 2010 - 3:13 am | स्वछंदी-पाखरु

हसता हसता खुर्चीतुन खाली पडलो कि हो .......

(पडल्या नंतर भड्डाम्म्म्म!!!! असा अवाज आला अजुन हसतोय....)

स्व पा.
मला ह्य दिवळीत एक पण फटाका नाही फोडता आला :(

मितान's picture

6 Nov 2010 - 3:36 am | मितान

धमाल !!!!! =))

मस्त आयडियाची कल्पना केली की राव !!!!

लिहीलंय एकदम मस्त! लिहायची ष्टाईल आवडली, पण स्पष्ट सांगायचं झालं तर हेतू नाय आवडला!

आम्हीही दिवाळीत पेटते फटाके फेकायचो बॉम्बसारखे, त्याचं युद्ध शेजारच्या बिल्डींगच्या पोरांशी! :-) पेटत्या फुलबाज्या, फटाके, वगैरे तर अगदीच कॉमन! भुईनळे, चक्र, सुतळी बॉम्ब वगैरे जबरदस्त फटाके हवेतून यायला लागले की एकदम बॉर्डरवर असल्याचा फील यायचा! अहो, रॉकेटं फेकून मारली आहेत.
पण असं खुन्नसमध्ये कधी काय केलं नाय ब्वॉ! रात्री या असल्या फायटी करुन पुन्हा सकाळी त्याच पोरांबरोबर क्रिकेटच्या म्याच खेळायचो आम्ही!

आता एक शंका:
>>>माय गॉड! घरात लहान बाळं आहेत - दिवाळी म्हणजे काय त्यांना अजून माहितही नाही. ती बिचारी इवले-इवले हात गाला-खांद्यांशी घेऊन झोपलेली असतात... इकडेतिकडे टुकूटूकू पाहात असतात...मध्येच भड्डाम्म्म!!!! आवाज झाला की फूटभर उंच उडून केकाटायला लागतात ना ती? <<<
तुम्ही जेव्हा एक सणसणीत म्हणजे पार काचा खाली येतील इतका सणसणीत बॉम्ब लावलात तेव्हा ही बाळं कानात बोळे घालून बसली होती की काय??? की 'आपल्या तो बाब्या आणि दुसर्‍याचं कार्ट' या न्यायाप्रमाणे बाळांना झाला तो त्रास आणि बाकीच्यांना आणि त्यांच्या घरातल्या कार्ट्यांना झाली ती त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल(?)सजा???

बुरा ना मानो, पण दिवाळी है भौ!! फटाके दिवाळीत नाय लावणार तर काय संक्रांतीला लावणार का??

इतका सणसणीत बॉम्ब लावलात तेव्हा ही बाळं कानात बोळे घालून बसली होती की काय???

ती घराबाहेर पाठविण्यात आली होती. मी इथं कोर्ट -कचेरी करीत नाहीय. म्हणून अवांतर तपशील दिलेला नाही.

या न्यायाप्रमाणे बाळांना झाला तो त्रास आणि बाकीच्यांना आणि त्यांच्या घरातल्या कार्ट्यांना झाली ती त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल(?)सजा???

तो माझा इश्यू नाहीय. ते मला ठरवताही येणार नाही. फटाके मला अजूनही आवडत नाहीत. माझे ते पाच बॉम्ब वाजले तेव्हा माझेही कान सुन्न झाले होते. पुढच्या वेळी फटाके वाजवायचे की नाही ते अजूनही शेजारी म्हणेल त्याप्रमाणे.

पण तो सॉरी म्हणून, फराळ करून निघून गेलाय.
असो. एकूण तुमच्या भावना पोचल्या.

अवांतरः आमच्या गावाकडच्या जत्रेत टूरिंग टॉकीजवरच्या भोंग्यातून एक मस्त आवाज येत असे.
"इच्यारा इच्यारात खेळ गमवू नका‌ऽऽऽ, इच्यारा इच्यारात खेळ गमवू नका‌ऽऽऽ"
ती सध्या माझी रिंगटोन आहे.

मी सुद्धा कोर्ट-कचेर्‍या करत नाही, किंवा तुमचा शेजारी माझा अशील नाही, किंवा तुमच्या धाग्याचे निष्कारण काश्मीर व्हावे हाही हेतू नाही! गैरसमज नसावा! तुमची लिखाणाची स्टाईल आवडलीये हे मी आधीच स्पष्ट लिहिलंय! तुमच्या भावना दुखावतील असंसुद्धा काहीच नाही हो!

पण तुमच्या फटाक्याला जशी बाळं बाहेर पाठवण्यात आली तशी ती आधीच्या फटाक्यांना गेली असती तर किमान त्यांचा त्रास तरी वाचला असता की!
आणि बाकीच्या 'कार्ट्यांना' त्रास होणं हा जर तुमचा इश्यू नसेल तर तुमच्या बाळांना त्रास व्हावा हा त्या शेजार्‍याचाही इश्यू नाहीये ना!
तरीसुद्धा तो सॉरी म्हणून गेला म्हणजे भलताच सज्जन शेजारी दिसतोय! तुम्हीपण सॉरी म्हणून फराळ करुन आला असालच! ;-)

अवांतर: तुमची रिंगटोन फारच आवडली बुवा!

--असुर

यकु's picture

6 Nov 2010 - 8:40 am | यकु

कारण नसताना पुन्हा एकदा गंमत म्हणून प्रतिसाद देतोय त्याबद्दल स्वारी... पण मला खालच्या ओळीत थोडीशी अडचण आहे..

पण तुमच्या फटाक्याला जशी बाळं बाहेर पाठवण्यात आली तशी ती आधीच्या फटाक्यांना गेली असती तर किमान त्यांचा त्रास तरी वाचला असता की!

म्हणजे लोक फटाके वाजवतात आणि स्वत:च्या घरातही त्यांच्या आवाजाचा त्रास होतोय म्हणून आम्ही बाळांना बाहेर पाठवायचं..
काही काळानं त्रास होतोय म्हणून आम्ही स्वत:पण स्वत:च्याच घराच्या बाहेर पडायचं.. दुसर्‍यांच्या नालायकपणामुळं बर्का..

मग आम्हाला तात्पुरते दुसरे शेजारी मिळणार.... ते ही फटाके वाजवतील..
मग पुन्हा काही लोकं आम्हाला सांगतील.. अरे‍ऽ‌ तुम्ही तुमच्या स्वत:चे घर सोडून इथे आलात.. तिथेही त्रास.. इथेही त्रास.. यापेक्षा आता असं करा या पृथ्वीवरूनच नाहीसे व्हा ना कायमचे

फिनीश!

सहज's picture

6 Nov 2010 - 6:26 am | सहज

(बेजबाबदार) लोकशाही जिंदाबाद!

रंगपंचमीच्या दिवसाच्या आसपासच्या दिवसांमधे कोणीही कधीही कोणाच्याही अंगावर फुगे फोडणे,
गणपतीच्या दिवसात, लग्नसराई इ मधे वाट्टेल तेवढ्या डेसिबलात मिरवणूका,
दिवाळीत अंदाधुंद फटाके

जाज्वल्य अभिमान आहे. भारतीय लोकशाही जिंदाबाद!!!

लहानशी कथा चांगली आहे पण ह्या जश्यास तसे प्रकाराला चांगले म्हणण्यात बरे वाटावे ह्यातच कुठेतरी ......

गांधीवादी's picture

6 Nov 2010 - 6:47 am | गांधीवादी

थोडक्यात, तुम्ही गांधीगिरी सोडून (मुन्ना)भाईगिरी केलीत तर. आपल्या बाळांना त्रास होत असताना नैतिकतेच्या (बाहेर फटाक्यांसोबत) कश्या चिंध्या होत होत्या हे मी समजू शकतो. ह्या लेखातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे ते सुद्धा सविस्तर लिहा.

संदेश वगैरे देण्याच्या भानगडीत कशाला पडू मी गांधीवादी?
आणि हवाय कुणाला संदेश? इथे सगळेच संदेश देणारे (पाहा: या महिन्याचे स्वत:चे मोबाईल बील आणि आलेले "संदेश").
पण आता तुम्ही विचारतच आहात तर दुसर्‍या कुणाचा तरी पण मी घेतलेला संदेश इथं टाकतो; वरच्या पोस्टच्या ओघात पहा पटतो का. मलातरी पटला आणि हळूहळू प्रक्टीकली प्रूव्हसुध्दा होतोय.

आपल्याला एकत्र जगण्यासाठी दहशतीची मदत होईल, प्रेमाची किंवा बंधुभावाची नव्हे. हा संदेश मानवी जाणीवेत घुसून बसल्याशिवाय काही आशा आहे, असे मला वाटत नाही. - यु. जी. कृष्णमूर्ती

५० फक्त's picture

6 Nov 2010 - 9:42 am | ५० फक्त

"आपल्याला एकत्र जगण्यासाठी दहशतीची मदत होईल, प्रेमाची किंवा बंधुभावाची नव्हे. हा संदेश मानवी जाणीवेत घुसून बसल्याशिवाय काही आशा आहे, असे मला वाटत नाही. - यु. जी. कृष्णमूर्ती "

हा संदेश सगळ्यांना दिला गेला पाहिजे, निसर्ग नियम पणं हेच सांगतो. हरिणांच्या कळपात कोणताही धोका नसताना ३-४ नर एका मादीसाठी एकमेकांचा जीव घेताना दिसतील, पण तेच सगळे शिका-याची चाहुल लागताच सगळे एकत्र येतात आणि त्या आलेल्या शिका-या विरुद्ध लढायला तयार होतात.

भारतीय काय किंवा इतर कोण्त्याही स्वातंत्र्यलढ्यात एकत्र झालेले सगळे प्रेम, बंधूभाव या साठी जमा झाले नव्हते, त्या मागची प्रमुख भावना ब्रिटिश किंवा तत्सम सत्ताधा-यांच्या दहशतीविरुद्ध लढणे हि होती.

हर्षद

गांधीवादी's picture

6 Nov 2010 - 10:09 am | गांधीवादी

राहुल गांधींच्या 'दोन' हिंदुस्तानात काही होईल असे वाटत नाही. त्या साठी 'तिसरा' हिंदुस्थानच जन्मास यायला हवा.

अवांतर : आता हा 'तिसरा' हिंदुस्थान कायदेशीर/घटनात्मक आहे का नाही' हे पालुपद चालू होईल.

स्पा's picture

6 Nov 2010 - 7:11 am | स्पा

खतरनाक लिवलंय राव................

जबरी ideaकेलीत.... ;)

शिल्पा ब's picture

6 Nov 2010 - 8:58 am | शिल्पा ब

भन्नाट...जाम आवडलं.

उग्रसेन's picture

6 Nov 2010 - 10:25 am | उग्रसेन

हा हा हा च्यामारी काल मह्या शेजा-यानं अस्साच
तरास दिला. मी पोरीसंग सुरसुरी पेटाला भायेर आलो
आन ध्यानीमनी नसतांना शेजा-याने सुतळी बोम्ब
लय जवळ फोडला.पार कानाजवळ सुतळी बॊम्ब फोडल्यासारखं वाटलं
कानात कुं...... असा आवाज लय येळ चालू
होता. पोरगीबी दचकली. लय शा घालाव्या वाटल्या.
पण सणासुदीचं भांडण नको म्हून मूकाट बसतो.

बाबुराव :)

लय भारी! स्वतःचं जळतं तेव्हाच कळतं!

फार भयानक प्रकार आहे हा सुतळी बॉम्ब चा.

मी प्रेग्नन्ट होते. अन आम्च्या बिल्डिंग मध्ये असे फटाके लावले. अक्षरशः पोटातल बाळ उडालेल जाणवल मला .
सरळ पोलिस, अन आवाज बंद! पण कशी बशी दिवाळी झाली अन लेक थोडी लवकरच जन्मली दिवाळी नंतर २ दिवसांनी.

सर्व प्रतिसादकर्ते, वाचकमात्रांचे आभार. :)