यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग पाच

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Oct 2010 - 3:46 pm

यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग दोन
यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार

मागच्या भागात युजी आणि परवीन बाबीबद्दलचे तपशील या भागात लिहायचे ठरवले होते. अगदी अलिकडे म्हणजे २००५ साली परवीन बाबीचा मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये एकलकोंड्या स्थितीत मृत्यू झाला. दोन दिवसांपासून दूध आणि वृत्तपत्रे दारात तशीच पडलेली असल्याने त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरीने पोलींसाकडे फिर्याद दिली. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर, मृत्यू पावलेल्या परवीन बाबीच्या पायाला गॅंगरीन झाल्याचे पोलीसांना आढळून आले होते. सत्तरच्या दशकात भारतातील चित्रपट क्षेत्र गाजवून सोडणारी आणि टाईम मॅगझीनच्या मुखप्रृष्ठावर झळकलेली पहिली भारतीय अभिनेत्री परवीन बाबी.
जे. कृष्णमूर्तींच्या साहित्याची निष्ठावान वाचक असणार्‍या परवीन बाबीची युजींशी कशी भेट झाली होती त्याबद्दलचा परवीन बाबीनेच लिहीलेला तपशील जिज्ञासूंना इथे वाचायला मिळेल. परवीन बाबी या चित्रपटाच्या चमचमत्या दुनियेतील दैदिप्यमान तारकेला त्या उद्योगातील ताणतणावांनाही सामोरे जावे लागत असे. ती पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया या मानसिक विकाराची रूग्ण होती. या विकाराचे मूळ जनुकीय रचनेत असल्याचे मानले जाते ज्यात रूग्णाला त्याच्या अवतीभवतीच्या कोणत्याच गोष्टीवर, कोणत्याच व्यक्तीवर विश्वास राहात नाही; सगळे लोक आपल्याला मारायला टपले आहेत अशी भावना निर्माण होते आणि असा रूग्ण स्वत:ला सतत कोंडून घेतो.


परवीन बाबी

या विकाराची लक्षणे दिसत असल्याने परवीन बाबी जे. कृष्णमूर्तींच्या वाङमयाकडे आकर्षित झालेली होती, त्यांची अनुयायी बनलेली होती. कबीर बेदीच्या प्रेमात पडलेली असताना, मुंबईमध्येच परवीन बाबी आणि युजींची भेट झाली. या भेटीत परवीनने युजींसमोर जे. कृष्णमूर्तींचा उल्लेख करताच युजी त्यांच्या नेहमीच्या ब्रॅण्डेड शैलीत गरजले - " फक्त पोकळ शब्द आणि वाक्यप्रचारांशिवाय त्यात काहीही नाही." पुढे युजींनी जेके "बनावट" असल्याचेही ठासून सांगितले. युजी कितीही कठोरपणे जेकेंबद्दल प्रत्येक गोष्ट खोडून काढत असले तरी, युजींच्या बोलण्यातील ठामपणा आणि लोकांसोबत वागण्यातील युजींची अकृत्रिम सहजता, आनंददायकता याकडे परवीन बाबी आकर्षित झाली; पण जेके "बनावट" कसे? युजीच खोटे आणि "बनावट" कशावरून नसतील हे ठरविण्यासाठी त्यावेळी तिच्याकडे कोणताही "मापदंड" नसल्याचे परवीन बाबी वर लिंक दिलेल्या कन्फेशनमध्ये सांगते. पुढे परवीन बाबी युजींना भेटत राहिली, युजींनी "अंदाजावर आधारीत" राहून केल्याप्रमाणे भाकीताप्रमाणे कबीर बेदींसोबतचे तिचे संबध संपुष्टात आले (करियर सोडून कबीर बेदींसोबत काही काळ लंडनमध्ये राहून परतल्यानंतर), नंतर महेश भट यांच्यासोबत परवीनचे संबंध जुळले, पुन्हा एकदा युजींनी "अंदाजावर आधारीत" भाकीत केल्याप्रमाणे महेश भट यांच्यासोबतचेही तिचे संबध संपुष्टात आले (पाहा किंवा आठवा: महेश भट यांचा "वो लम्हें" हा चित्रपट) आणि तिला असलेला पॅरानॉईड स्किझोफ्रिनियाचा विकार बळावू लागला. यादरम्यानच्या काळात परवीन बाबी जीव तोडून चित्रपटांत कामे सुरू केली होती, सतत प्रसिध्दीच्या झोतात होती. तिला असलेल्या विकाराच्या अमलाखाली शेवटी ती पूर्णत: मोडून पडली - कुणावरही विश्वास राहिला नाही. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांवरही विश्वास राहिला नाही, कुणीतरी तिला मारून टाकणार असल्याचे भ्रम वाढू लागले. फक्त एक आधार होता - युजी ! नाहीतरी युजी कृष्णमूर्तींभोवती वेड्या लोकांचा जास्त गराडा पडलेला असतो असा समज होताच (महेश भट यांनी युजींच्या आत्मचरित्रात सांगितलेला किस्सा - "पप्पा, तुमच्याकडे सतत डोके फिरलेल्या लोकांचा एवढा का राबता असतो?" इति पुजा भट. "मी त्यांनी आणखी पागल करून सोडतो आणि त्यांना युजींकडे पाठवतो म्हणून!" महेश भट).


परवीन बाबी

युजींनी पॅरानॉईड स्किझोफ्रिनीयाने गांजलेल्या परवीन बाबीला आधार दिला. हा विकार टाळायचा असेल तर चित्रपट क्षेत्रच सोडण्याचाही सल्ला दिला. ती युजी आणि व्हॅलेण्टाईन डि कार्व्हान, महेश भट यांच्यासोबत दक्षिण भारताचे पर्यटन करीत हिंडू लागली. राहाण्याच्या ठिकाणात बदल झाल्याने किंवा कामाचे ताणतणाव कमी झाल्याने म्हणा पण परवीन बाबीला युजींसोबत पूर्णत: बरे वाटू लागले. वरील लिंक मध्ये परवीन बाबीने केलेल्या कन्फेशनमध्ये तर ती काहीवेळा युजींनी तिचे तळवे हातात घेऊन त्यांची "एनर्जी" दिल्यानेच ती बरी झाल्याची नोंद करते. ती पुन्हा एकदा तिच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करू लागली, मुंबईला परतली - कारण प्रोड्यूसर्सशी करार झालेले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी ते तगादा लावत होते. याच काळात परवीनने जुहूतील एका बंगल्यात युजींना जागा शोधून दिली; व्हॅलेण्टाईन आणि युजी तिथे राहू लागले. या काळात परवीनचे दूर झालेले आजारपण पुन्हा एकदा उचल खाणार असल्याबद्दल, चित्रपटाच्या जीवनशैलीला रामराम ठोकण्याबद्दल युजी सतत तिला बजावत होते मात्र ती तसे करू शकत नव्हती कारण प्रसिध्दी, पैसा आणि वलय देणारे जग सोडणे सोपे नव्हते. शिवाय लोकांसोबत नवीन चित्रपटाचे करारही झालेले होते.


युजी आणि परवीन बाबी - बाली बेटे

यादरम्यानच परवीन बाबी युजींसोबत बाली बेटांच्या पर्यटनासाठी निघुन गेली. युजी कृष्णमूर्ती आणि परवीन बाबी यांनी लग्न केले असून हनिमूनसाठी ते बाली बेटांवर गेले आहेत अशी बातमी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने छापली. परवीन बाबीचे मानसिक आजारपण वाढले असताना बंगलोर आणि मुंबईमध्ये युजींनी तिच्याकडे दिलेले लक्ष, तिला घ्यायला एअरपोर्टवर जाणे, तिचा फोन येताच तिच्याकडे जाणे यातून खुद्द परवीन बाबीलाच युजी हे तिच्या प्रेमात पडले असल्याचा, व्हॅलेण्टाईन डि कार्व्हान ही युजींची आश्रयदाती आणि त्यांच्या देशविदेशाच्या प्रवासात त्यांना सतत सोबत करणारी सोबतीण आता वयोवृध्द झाल्याने "परवीन बाबी" ही आर्थिकदृष्ट्या सबल, तरूण असामी तिची जागा घ्यायला सुयोग्य असल्याचा वहिम निर्माण झाला होता आणि तिने ही गोष्ट खासगीमध्ये मित्रमैत्रिणींना बोलूनही दाखवली होती.
युजी आणि परवीन बाबीचे लग्न झाल्याच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीमुळे खळबळ माजली. युजी बालीहुन परत आल्यानंतर विमानतळावर पत्रकारांनी युजींना त्या बातमीच्या सत्यतेबद्दल खुलासा करायला सांगितला. युजी म्हणाले, "ती बातमी खरी असायला हवी होती असे मला वाटते. माझ्यासारख्या थेरड्याला त्यापेक्षा जास्त काय हवे असणार? परवीन ही श्रीमंत, सुप्रसिध्द, सुंदर अभिनेत्री आहे. त्यापेक्षा जास्त मला काय मिळू शकते?" टाईम्स ऑफ इंडियाने ही खोटी बातमी दिल्याबद्दल त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा युजींच्या मित्रांनी त्यांना सल्ला दिला. यावर हसतहसत युजी उत्तरले, " ती बातमी खरी असली तर त्यामुळे मला वाईट वाटायला नको, खोटी असली तरीही वाईट वाटायला नको - कोणत्याही बाबतीत त्यामुळे मला कसलीच इजा झालेली नाही !"
परवीन पुन्हा एकदा कामाकडे लक्ष देऊ लागली. पण तिला पुन्हा एकदा तिचा वेडेपणा उचल खाणार अशी भीती वाटत असे. तिचे प्रोड्यूसर्सदेखील आता जास्त आक्रामक झाले होते आणि काहींनी तिच्यावर दावेही दाखल केले होते. परवीनकडे लोकांना ती त्या काळात जात असलेल्या परिस्थितीबद्दल पटवून देण्याचा कोणताच मार्ग नव्हता. युजींनी पुन्हा एकदा परवीनला मदतीचा हात दिला - तिला स्वित्झरलॅण्ड सोबत घेऊन जाऊन तिथे एका नवीन जीवन सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. गोंधळात सापडलेली परवीन बाबी युजींसोबत स्वित्झरलॅण्डला गेली. तिथे गेल्यानंतर करायला काहीच काम नसल्याने परवीन बाबी दिवसातील चौदा तास झोपून राहात असे - नवीन जीवन सुरू होण्याची वाट पाहत. पण पुढे काहीही घडेना. परवीन आणखी जास्त एकाकी, निराश होऊ लागली. पण तिच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत पूर्वी कधीही झाली नव्हती एवढी सुधारणा झाली. तिने युजींना भारतात परत जायचे तिकीट देण्याबद्दल विचारणा केली. युजींनी तिला परत जाण्यापासून थांबवण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न करून पाहिला आणि यावेळी मात्र आजाराने उचल खाल्ल्यास ते घातक ठरेल हे बजावले. पण परवीनने ते ऐकले नाही.


युजी, व्हॅलेण्टाईन आणि परवीन बाबी

भारतात परत आल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयाचे काम सुरू करायला परवीनला अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. प्रोड्यूसर्स आता तिला काम द्यायला कचरू लागले. पण परवीनने पुन्हा एकदा कामात दाखवलेले सातत्य आणि तिच्या व्यक्तीगत भेटींमुळी काही प्रोड्यूसर्सनी तिला काम दिले.
असा काही काळ गेल्यानंतर पुन्हा परवीनचे मानसिक आजारपण बळावू लागले. जागेत बदल म्हणून ती मित्राकडे राहायला गेली. डॉक्टरांनी सांगितलेली औषधेही आता तिच्यावर काही परिणाम करीनात. नेमक्या याच स्थितीबद्दल युजी तिला बजावत होते. यावेळी आणखी एक बाब तिला स्पष्ट झाल्याचे परवीन तिच्या कन्फेशनमध्ये सांगते: "गेल्यावेळी मी औषधांमुळे बरी झाले नव्हते, आताही औषधांमुळे मला बरे वाटणार नाही. माझे आरोग्य परत यायला युजींची ऊर्जा कारणीभूत होती. ते नेहमीच माझे जीवन, माझे आरोग्य, माझ्या भविष्याबद्दल मनातून चिंतीत होते."
आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्याने पुन्हा एकदा परवीनला युजींना भेटायचे होते, धन्यवाद देण्यासाठी नाही किंवा मदत मागण्यासाठीही नाही. फक्त त्यांना बोलायचे होते.
१९८३ च्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत होणार्‍या तिच्या कार्यक्रमाच्या दौर्‍यादरम्यान युजीदेखील अमेरिकेत असणार होते. फोनवर झालेल्या बोलण्यात सप्टेंबरमध्ये तिने युजींना भेटायला येणार असल्याचे त्यांना सांगून ठेवले.
बरे वाटू लागावे म्हणून ती स्वत:ला कोंडून घेऊ लागली. पण त्यामुळे ती आणखीच अस्वस्थ झाली. पण तिची परिस्थिती पाहाता तिचे कुटूंबीय किंवा मित्र-मैत्रिणीदेखील परवीनला त्यांच्यापासून एकट्याने दूर जाऊ द्यायला तयार झाले नसते. एके रात्री तिने तिची आई आणि सेक्रेटरीसमोर सगळी परिस्थिती स्पष्ट केली. तिचा कुणावरच विश्वास नव्हता - युजी वगळता.
शेवटी एके रात्री फक्त पासपोर्ट आणि अंगावरचे कपडे यांसह परवीन लंडनला जाणार्‍या फ्लाईटमध्ये जाऊन बसली. प्रवासादरम्यान दुबई विमानतळावरून आपण स्वित्झरलॅण्डच्या मार्गावर असल्याचे तिने युजींना फोन करून सांगितले. यावेळी मात्र युजींचा मोहरा तिला संरक्षण देणाराही वाटला नाही किंवा आधार देणाराही वाटला नाही. ती ठीकठाक असून स्वतचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, आपण तिच्याबद्दल कोणताही सल्ला देऊ शकत नसल्याबद्दल युजींनी तिच्याकडे स्पष्ट केले. मागच्या वेळी परवीन बाबी असल्याच विचित्र मानसिक स्थितीत सापडली होती तेव्हा युजींनी तिच्याबद्दल दाखवलेली काळजी, तिला स्वत:सोबत पर्यटनाला घेऊन जाणे, प्रामाणिकपणे आधार देणे या गोष्टींचा खुद्द परवीन बाबी, प्रसार माध्यमे वगैरे सगळ्यांनी गैर अर्थ काढला होता. यावेळीही तिला आधार द्यावा तर पुन्हा एकदा वृत्तपत्रे, गॉसिप मॅगझिन्स, तिचे प्रोड्यूसर्स, मित्र आणि तिची आई सगळेच पुन्हा एकदा युजींना दोष देणार होते. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, कुठल्याच प्रकारे त्यांना भारतीय चित्रपट क्षेत्रासोबत गुंता निर्माण करायचा नाहीय हे युजींनी तिला स्पष्ट केले.
युजींनी स्वित्झरलॅण्डच्या मार्गावर असलेल्या आणि लंडनमध्ये उतरलेल्या परवीनची त्यांच्या एका मित्राकडे राहाण्याची व्यवस्था केली. ती यथावकाश स्वित्झरलॅण्डला पोहोचली त्यावेळी ती एका निष्प्राण माणसासारखी दिसत होती - परवीन तिच्या कन्फेशनमध्ये सांगते.
युजींच्या सान्निध्यात पुन्हा एकदा हळुहळु परवीनला बरे वाटू लागले. ती पुढेही युजींसोबत गेस्टाड येथे राहिली. इकडे भारतातील चित्रपटाच्या धंद्यातील तिचे भविष्य अंधकारमय असल्याची तिची खात्री पटली होती. तिने चित्रपटाच्या क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला होता. परवीन बाबीचे पुढचे मनोगत तिच्याच शब्दांत जसेच्या तसे -

I am now in America with UG and Valentine. Resting, doing everyday chores like cooking, cleaning, watering plants and shopping for food. I have never felt more secure. I am peaceful and happy. What would have happened if UG had turned me away when I came to him from India? It would have been total destruction for me. This man— this extraordinary man—has saved me not once, but twice from destruction. What is it that I can do for him in return? Even if I give away everything I have, including my life, to such an individual it would not be enough. I have no means to repay the enormous debt I owe him. He has no need or use for my gratitude in emotional or material form. He is one person who has given me everything within his power, without expecting or actually receiving anything from me in return. What have I really given him. I have merely shown him some common courte- sies, no more than anybody would do for a friend; arranging a stay for him in Kashmir, hosting him in Bombay, taking him for a drive, and such. Beyond these normal expressions of friendship I have done nothing. In fact, he housed an 1 fed me for months in Bangalore, and, even after denouncing and turning on him, in Gstaad. Reciprocity played no part in our so called relationship'. He gave and I look. I have only received—he helped me when friends, relatives, acquaintances, including my own mother, had either been unwilling or unable to. He has given me strength, support, friendship and affection whenever I have needed it.

I should really consider myself lucky, and my meeting with UG a benediction. He is truly an extraordinary person. I am one person who can say this with certainty because I have witnessed and have been touched and have been affected by that extraordinary energy. I have seen and experienced for myself manifestations of that extraordinary force in him. Even now I see him die physically and come back to life two, maybe three times a day! Valentine, who has be in with UG for 21 years and has seen many people In the world, says, "UG is the nicest, kindest man I have ever known". I agree with her. He goes through people's lives doing and giving whatever he can quietly. So quietly that sometimes even those who receive are themselves unaware of having received from him. He says he is like a migratory bird, and travels only to escape extremes of weather and inflation. 'Not true! I I have seen him travel great distances to be with friends or acquaintances who really need him. He travelled for nearly eight months with me when I was ill. Why do people come to him with their problems, for advice, for help? I think it is because UG is one person who is a part of this world, but not a party to it. He demands no rights and therefore assumes no obligations. He is emotionally attached to nothing and to no one in this world. He is a free individual in the truest sense of the word. if there is anybody who can help anyone in this world, only such an individual can.

His personality is enigmatic. He can be very puzzling. He can be so many different things at different times, from child-like innocence, to extremely sharp wisdom; from gentle kindness to firm ruthlessness, whatever the situation demands. The best way, and, I feel, the only way of dealing with him, is to trust him. The common adjective described to him - saint, sage, guru, holy man, enlightened individual - don’t really describe him. His own striking claim that ho is just an ordinary man', leaves one befuddled. What then is he? I wish I knew!

या भागातच ही लेखमालिका संपवायची असे ठरवले होते. पण समोर येणारी माहिती वाढत गेली आणि विशिष्ट तपशील उपलब्ध झालेल्या सगळ्याच माहितीतून ताडून पहावा लागला. युजींच्या "नॅचरल स्टेट" मुळे निर्माण झालेले प्रश्न, युजींची वेगवेगळ्या विषयावरील मते आणि अंतिमत: युजींचा मृत्यू हे मुद्दे पुढच्या भागात बसतील आणि ही लेखमाला समाप्त होईल अशी आशा!

मांडणीधर्मसमाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

विलासराव's picture

18 Oct 2010 - 8:08 pm | विलासराव

लिहा हो. जेवढे भाग होतील तेवढे होतील.

आळश्यांचा राजा's picture

18 Oct 2010 - 9:46 pm | आळश्यांचा राजा

लिहा. लिहा. काय व्हायचे तेवढे भाग होऊ द्यात.

मागचे दोन (म्हणजे हा आणि मागचा एक) म्हणजे चंदेरी/ जी/ स्टारडस्ट मधल्या स्टोर्‍या वाटत आहेत. वाईट वाटून घेऊ नका. माहिती गोळा करण्याचे कष्ट घेऊन लिहित आहात म्हणून बोलतो. दादा कोंडके, महेश भट्ट, विनोद खन्ना, परवीन बाबी ही काही आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वं होती/ आहेत असं वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या(च) संदर्भात किंवा त्यांच्या(च) तोंडून युजींविषयी ऐकायचं म्हणजे काही आध्यात्मिक विचार/ चरित्र ऐकायला मिळेल असं वाटत नाही.

युजींच्या "नॅचरल स्टेट" मुळे निर्माण झालेले प्रश्न, युजींची वेगवेगळ्या विषयावरील मते आणि अंतिमत: युजींचा मृत्यू हे मुद्दे पुढच्या भागात बसतील

हे तर अवश्य आलं पाहिजे. हेच वाचायचं आहे. ते वो लम्हे वगैरे सोडा हो. वाचायला छान आहे, पण इथे या लेखमालेत ते कशाला?

माणूस इंटरेस्टिंग आहे. लेखमाला संपवायची घाई करू नका. सवडीने लिहा.

बाकी लिहिताय छानच.

यशवंतकुलकर्णी's picture

18 Oct 2010 - 9:53 pm | यशवंतकुलकर्णी

दादा कोंडके, महेश भट्ट, विनोद खन्ना, परवीन बाबी ही काही आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वं होती/ आहेत असं वाटत नाही.

नाही हो. ही आध्यात्मिक माणसं होती म्हणून नाही तर त्या वाटेला गेलेली फक्त माणसं होती/ आहेत म्हणून लिहीलंय. आता त्यांचे धंदेच तसे आहेत म्हणजे स्टारडस्ट टाईप होणारच. लिहीतानाच वाटलं होतं की कशाला ही धुळ उठवायची पण एकूणच सगळं चित्र स्पष्ट व्हायला पाहिजे ना? म्हणून. बाकी काही नाही. वाईट वगैरे वाटलं नाही पण तुम्ही तेवढं स्पष्ट बोललात तरी म्हणून धन्यवाद. :)

नाडीग्रंथांतून महर्षींनी युजींबद्दल काढलेले आदराचे उद्गार
युजींनी काही जणांच्या समावेत बंगलोरला नाडी ग्रंथांचे - कदाचित कौमारन नाडी-अवलोकन केल्याचे पुर्वी केंव्हातरी केलेल्या वाचनात आल्याचे स्मरते. कदाचित यशवंतजी त्याचा उल्लेख पुढील भागात करतील ही. त्या घटनेची नोंद करणाऱ्यांनी त्या वाचनाला धक्कादायक असे म्हटले होते. नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यातील नाडी महर्षींच्या मुखातून युजींबद्दलचे गौरवोद्गार मिपाच्या वाचकांना वाचायला आवडतील. कृपा करून यशवंतजींनी आवर्जून त्याबद्दल लिहावे ही विनंती.

युजींच्या "नॅचरल स्टेट" मुळे निर्माण झालेले प्रश्न, युजींची वेगवेगळ्या विषयावरील मते आणि अंतिमत: युजींचा मृत्यू हे मुद्दे पुढच्या भागात बसतील

पुढचा भाग लवकर येउ दे.