एव्हाना सावल्या पायात येऊ लागल्या होत्या. आम्ही निघायचे ठरवले. समोरुन एक उंटांचा काफीला आम्हाला वळसा घालुन गेला.
आम्ही वाळवंटातुन पावले उचलत गाडीत येउन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिड्सच्या अगदी समोरुन आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफु आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो. पिरॅमिड्सच्या बरोबर मधून जाताना रस्त्याच्या पलिकडे वाळुतुन घोडागाडी व उंटवाले देखिल आता धंदा संपवुन खालच्या अंगाने निघाले होते. वर काहीसं मळभ, सर्वत्र प्रकाश परावर्तित करणारी वाळु आणि त्या पार्श्वभूमिवर ती घोडागाडी व उंट यांचे छायाकृती चित्र टिपायची संधी मी सोडली नाही. क्षणात गाडी थांबवुन खाली उतरलो आणि ते दृश्य टिपुन परत आलो व गाडी उताराला लागली.
दोन अंगाला दोन महा पिरॅमिड्स मागे राहिली होती व समोर उजव्या अंगाला स्फिंक्सचे मंदीर दिसले. दगडात कोरलेली ती २१ मीटर उंच आणि ७३ मीटर लांब स्फिंक्सची भव्य आकृति दूरूनही स्पष्ट दिसत होती. अंगात पुन्हा उत्साह संचारला. गाडी थांबताच आम्ही स्फिंक्सच्या दिशेने निघालो. संपूर्ण परिसराला पर्यटकांचा वेढा पडला होता. आम्ही क्षणभर मागे वळुन पाहिले तर डावीकडे खाफ्रेचे पिरॅमिड, उजवीकडे खुफुचे पिरॅमिड, मधून उतरत येणारा रस्ता आणि खाली सर्वत्र वाळुचे साम्राज्य तर वर निळे आकाश असे विलोभनिय दृश्य दिसले.
आणि नजरेत पुन्हा एकदा भरली ती भारून टाकणारी भव्यता. समोर पासष्ट फूट उंचीचा स्फिंक्स चा पुतळा खुजा ठरविणारी भव्यता. खाली दिलेल्या चित्रातील स्फिंक्सच्या डाव्या बाजुने पिरॅमिड्सच्या दिशेने जाणाऱ्या मानवी आकृत्या पाहताच त्या भव्य वास्तूंची कल्पना येईल.
स्फिंक्स विषयी अनेक हकिकती प्रचलीत आहेत. सिंहाचे शरीर व मानवाचे मस्तक हे सिंहाचे सामर्थ्य, चापल्य व माणसाची बुद्धिमत्ता याचे प्रतिक मानले जाते. अशी एक हकिकत आहे की त्या वाटेने जाणाऱ्या वाटसरूला स्फिंक्स प्रश्न विचारीत असे आणि उत्तर बरोबर देणाऱ्याला पुढे जाउ देत असे. मात्र उत्तर चुकले तर तिथेच खतम! कुणी म्हणे की हे स्फिंक्स सर्वत्र नजर ठेवुन असतात. ते आपल्या कानांनी ऐकत असतत, डोळ्यांनी पाहत असतात मात्र तोंड उघडुन बोलत मात्र नाहीत. बोलतात ते दहा हजार वर्षातुन एकदा, आणि तेही देवाला काय घडत आहे त्याचा वृत्तांत सांगण्यसाठीच. हे मानवी मस्तक म्हणजे राजाचे मस्तक आहे. इजिप्तमध्ये इथेच नव्हे तर सर्वत्र असलेले राजे - राण्यांचे पुतळे पाहताना प्रकर्षाने नजरेत भरतात ते मोठे व टवकारलेले कान. आपल्या जनतेचे म्हणणे राजा ऐकुन घेण्यासाठी दक्ष राजा सदैव जागरुक असतो याचे प्रमाण म्हणजे मोठे व पुढे झुकलेले कान.
हे मस्तक बहुधा राणी हॅशेप्सूट हीचे असावे असा एक प्रवाद आहे. स्फिंक्सच्या पुतळ्या भोवती बव्हंशी नष्ट झालेले त्याचे मंदिर आहे. या पुतळ्याकडे पाहता त्याचा चेहरा बराच विद्रूप केला गेला असल्याचे जाणवते. मूर्तीपूजेच्या कट्टर विरोधात असलेल्या अरब मुस्लिमांनी सूर्यदेवता, नाग देवता वगैरे देवतांना मानणाऱ्या या चेहेऱ्याचे नाक तोडुन काढले आहे तर डोळेही खोबनीतुन काढले आहेत. इथल्या मूर्तीकलेचे असामान्य वैशिष्ट्य म्हणजे काही विशिष्ठ दगडातुन कोरलेले व मूर्तीच्या चेह्ऱ्यावरील खोबण्यात बसविलेले विलक्षण जीवंत डोळे. चित्रातील मूर्तीच्या डोळ्यांच्या खाचा पाहिल्या असता त्यातील बुबुळ हे काढुन टाकलेले सहज समजतात.
मघाशी पिरॅमिड बघुन परत येण्या आगोदर आलेले मळभ दूर होऊन आता पुन्हा आकाश स्वच्छ निळे दिसु लागले होते. वर रणरणीत उन तर मधेच शिरशीरी आणणारी आल्हाददायक शितल झुळुक असा विरोधाभासी प्रकार होता. आम्ही समोरच्या अंगाने स्फिंक्सच्या डावीकडुन आत मांदिरात प्रवेश केला. मजबुत चौकोनी खांब व अजस्त्र डग्डांची चिरेबंदी भींत सोडता बाकी तिथे फारसे काही शिल्लक नव्हते. पुढे जाताच पुन्हा एकदा चिर्यांच्या चौकटीतुन पिरॅमिडचे दर्शन घडले.
मग आतल्या पिरॅमिडकडे जाणरा मार्ग सोडुन आम्ही उजवी कडच्या चौथऱ्यावर गेलो आणि त्या स्फिंक्सच्या नाना अंगानी वविध्यपूर्ण दिसणाऱ्या प्रतिमा टिपल्या. मग जरा आचरटपणाही केला, जे सहसा मी करत नाही: मी मागे सरकत अगदी भिंतीपर्यंत गेलो, पुढे चिरंजीवांना कड्याच्या अगदी जास्तीत जास्त पुढे स्फींक्सच्या रेषेत उभे केले वा कोन साधुन त्याला हात वर करत बरोबर तो त्या पुतळ्याच्या हनुवटीला हात लावतो आहे अशी छबी टिपली.
प्रत्यक्षात त्याच्या व पुतळ्याच्या मध्ये किमान शे दिडशे फूटाचे अंतर होते. लगोलग त्याच कड्यावरून अगदी मागच्या पायांपसून ते थेट मस्तका विस्तार टिपला.
याच मंदिरात एक भुयारी मार्ग आहे जो अर्थातच आता बंद केला आहे; पण हा भुयारी मार्ग थेट पिरॅमिडजवळ उघडतो. बहुधा खुफुच्या पिरॅमिडजवळ. मग ते पिरॅमिड्स व स्फिंक्स यांचे अनेक कोनातुन एकत्र दृश्य टिपले.
जसजसे आपले स्थान बदलावे तसे स्फिंक्सच्या पार्श्वभूमिवरचे पिरॅमिडही आपले स्थान बदलताना दिसत होते. कितीही वेळ पाहिले तरी समाधान होत नव्हते असा त्या वास्तूचा गुण असावा.
पाय निघता निघत नव्हता. मात्र रात्र थोडी आणि सोंगे फार अशी एकाच दिवसात अजुन वस्तुसंग्रहालय, पॅपायरसची निर्मिती व चित्रकला, इजिप्ती अत्तर, व अखेर खान ई खलिली बाजार असे सर्व काही पाहायचे होते व रात्रीच कैरोला अलविदा करायचे होते. आम्ही मुक्काम हलवला. जाताजाता 'शेवटचा एकच' मारलाच.
प्रतिक्रिया
2 Jun 2010 - 11:57 pm | टारझन
काय बोलु ? अप्रतिम .. तुर्त जाउ शकत नाही ... पण फोटु पाहुन धन्य झालो
- सर्वभक्षी
2 Jun 2010 - 11:59 pm | प्रियाली
वर्णन फोटो दोन्ही मस्तच.
3 Jun 2010 - 12:06 am | भडकमकर मास्तर
सारे फोटो छान...
शेवटचा विशेष आवडला...
3 Jun 2010 - 12:07 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
3 Jun 2010 - 12:14 am | विकास
आत्तापर्यंतचे सर्व फोटो आणि वर्णन एकदम मस्त! स्फिंक्सच्या हनुवटीस हात लावल्याचा मुलाचा फोटो आणि त्यातील कल्पकता पण विशेष आवडली!
-------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
3 Jun 2010 - 12:22 am | पंगा
फोटो आवडले.
पुढेमागे लेखही वाचेन म्हणतो.
अतिअवांतरः 'अॅस्टेरिक्स अँड क्लिओपात्रा'मध्ये स्फिंक्सच्या तुटक्या नाकाची काही वेगळीच कहाणी दिलेली आहे. :P
- पंडित गागाभट्ट.
3 Jun 2010 - 12:24 am | प्रियाली
हं! हं! असावी.
3 Jun 2010 - 7:17 am | मिसळभोक्ता
'अॅस्टेरिक्स अँड क्लिओपात्रा'मध्ये स्फिंक्सच्या तुटक्या नाकाची काही वेगळीच कहाणी दिलेली आहे.
हे वाचून, का कोण जाणे, "टग्या, साल्या, हमसे पंगा?" असा प्रश्न "उगीचच" विचारावासा वाटतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
3 Jun 2010 - 10:22 am | सर्वसाक्षी
अभिप्रायासाठी धन्यवाद.
आपली कहाणी ऐकायला उत्सुक आहे.
अनेकदा प्रवासात तिथे काहीतरी ऐकायला मिळते, मग आपण त्या अनुषंगाने काही वाचतो व ते गृहित धरतो. अठराव्या शतकात नेपोलियनच्या सेनेने स्फिंक्सचे मीटरभर रुंदीचे नाक निशाण म्हणून नेमबाजीच्या सरावासाठी वापरल्याचेही वाचनात आले होते.
अर्थात इजिप्तच्या प्राचिन संस्कृतिचा माझा अभ्यास नाही तेव्हा मला जे काही माहीत झाले त्या व्यतिरीक्त व त्यापेक्षा वेगळे व अधिक वास्तविक असे जर काही वाचायला मिळाले तर मला निश्चितच आवडेल.
कलोअ
साक्षी
3 Jun 2010 - 12:39 am | प्रभो
मस्तच!!!!!!
दुसरा फोटो खूप आवडला....
3 Jun 2010 - 12:50 am | अरुंधती
छान फोटू! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
3 Jun 2010 - 2:31 am | रामदास
एक चांगला लेखक आणि कॅमेरा हे सुंदर काँबीनेशन आहे.
3 Jun 2010 - 4:59 am | चित्रा
असेच म्हणते. सुंदर फोटो, प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान नाही, पण थोडे का होईना, बरे वाटले.
3 Jun 2010 - 6:17 am | सहज
हेच म्हणतो.
3 Jun 2010 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
"क्रमश:" शब्द राहिला आहे का?
अदिती
3 Jun 2010 - 10:39 pm | अनिल हटेला
सहमत :)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
3 Jun 2010 - 8:28 am | भाग्यश्री
अगदी सहमत !!
इजिप्तला जायचेच आहे एकदा! आत्तापुरते व्हर्चुअली फिरले..
3 Jun 2010 - 6:08 am | धनंजय
वर्णने, चित्रे छानच
3 Jun 2010 - 6:16 am | सन्जोप राव
एकूण लेखमालाच फार्फार आवडली.
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह
3 Jun 2010 - 7:20 am | मिसळभोक्ता
चिंतेची बाब असली, तरीही संजोपरावांशी सहमत.
इजिप्तमध्ये संगणक वैज्ञानिक असतील, तर संपर्क साधून काहीतरी कोल्याबोरेशन करावे, म्हणतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
3 Jun 2010 - 7:57 am | चतुरंग
आउटडोअर शूटिंगवर गेल्यासरखे वाटते आहे फोटो बघून! झकासच आलेत सगळे फोटू.
इजिप्त बघून यायची इच्छा प्रबळ झाली!
(आता आधीचे भाग वाचतो.)
चतुरंग
3 Jun 2010 - 8:11 am | मदनबाण
झकास्स्स्स्स... :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
3 Jun 2010 - 11:32 am | भारद्वाज
व्वा... फोटो-लेख दोन्ही मस्तच.
जय हिंद जय ब्राझील
3 Jun 2010 - 12:00 pm | शिल्पा ब
लेख आणि फोटो दोन्ही छान....पिरॅमिड्स खूपच प्रचंड आहेत एखाद्या डोंगरासारखे....कसे काय बांधले असतील त्या काळी ? विलक्षण...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
3 Jun 2010 - 5:25 pm | स्वाती२
छान सफर!