मजेमजेशीर हँगओव्हर निवारण उपाय!

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
11 Apr 2010 - 8:26 pm

मिपा वर पार्टी रे पार्टी पाहिल्यावर माझ्या मनात विचार सुरु झाले..... बिच्चारे पार्टीजीव!!! :S
आधी पार्टी पार्टी करत ढोस ढोस ढोसतील आणि दुसर्‍या दिवशी डोकं धरून बसतील. मग दुखर्‍या डोक्यानं घरात बायको, पोरं, हापिसात हाताखालचे लोक आणि सहकारी ह्या सर्वांवर चिडचिडाट करतील.... सर्वांचाच दिवस खराब होऊन जाईल!!! :<

हँगओव्हर हा प्रकार टाळता येऊ शकतो असा सल्ला/ मत अनेक आहारतज्ञ व डॉक्टर्स प्रदर्शित करतात. त्याचे गमक तुम्ही मद्यपानाच्या अगोदर खाणे, मद्यपानादरम्यान पाणी पीत राहणे व मद्यपानानंतर काही ठराविक पथ्ये पाळणे [उदा. झोपण्याअगोदर डोकेदुखीवरच्या गोळ्या घेणे, पाणी पिणे, मल्टि व्हिटॅमिन गोळ्या घेणे, उठल्यावर ताज्या फळांचे रस पिणे इ.इ.] यात आहे. B)

पण वेगवेगळ्या देशांमध्ये, प्रांतांमध्ये ''पियक्कड'' किंवा दारूबाज असणारे लोक ह्या हँगओव्हरचा सामना व निराकरण आपापल्या पध्दतीने, घरगुती पातळीवर करताना दिसतात. <:P

अशाच काही मजेमजेशीर हँगओव्हर निराकरण उपायांची ही जंत्री :

१. लोणच्याचा खार :

पोलंडमध्ये हँगओव्हरवर उपाय म्हणून लोणच्याच्या खारात मध घालून तो पितात. मधातील फ्रुक्टोज व ग्लुकोज आणि लोणच्याच्या खारातील मीठ ह्यांच्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस पुन्हा संतुलित होण्यासाठी मदत होते म्हणे!

२. पेडियलाईट :

लहान मुलांना जुलाब - वांत्या होऊ लागले की जे पेडियलाईट देण्यात येते तेच मोठ्या माणसांना हँगओव्हरचा सामना करण्यासही उपयुक्त ठरते. त्यामुळे पाश्चात्य देशांत लोकप्रिय असणारा हा उपाय!

३. केळे :

मद्यपानामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी घटते, ती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी केळे खाल्ल्यास फायदा होतो. केळ्यात पोटॅशियम असल्याने ते शरीरात निर्माण झालेली त्रुटी भरून काढते.

४. अंडी :

अंड्यांमध्ये अ‍ॅसिटाल्डिहाईड हे शरीरात हँगओव्हर निर्माण करणारे एक विषद्रव्य मोडून काढणारे सिस्टाईन नामक द्रव्य असते.

५. लिंबू :

प्युअर्टो रिको प्रदेशातील लोक अगदी शपथेवर सांगतील की काखा-बगलांमध्ये लिंबाचा ताजा रस चोळल्याने हँगओव्हर शिवत नाही म्हणून! त्यामागे तर्क असा आहे की लिंबाच्या रसामुळे घाम कमी येतो व शरीरातील द्रावांचे संरक्षण होते.

६. आल्याचा रस/ आल्याचा चहा :

आले हे पाचक आहे. त्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास किंवा आल्याचा चहा प्यायल्यास हँगओव्हर कमी होण्यास मदत मिळते असे जाणकारांचे मत आहे.

७. तेलकट, पचायला जड, भरपूर कार्बोहायड्रेट्स असलेला नाश्ता :

जर आदल्या रात्रीच्या कर्माची फळे तुम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळी भोगणे जड जात असेल तर भरपूर तेल, तूप असलेला भरपेट नाश्ता करा. त्यामागील तर्क असा की तुमच्या जठराच्या अंतर्भागाला त्या तेल, तूपाचे आवरण घालेल आणि जरा पोटशूळही कमी करेल.

८. ज्यांना हे उपाय नको वाटतील त्यांना रशियन/ फिन्निश उपाय खुले आहेत :

रशियात हँगओव्हरचा इलाज म्हणजे बाष्पस्नान किंवा सौना बाथ. वाफेने आपल्या शरीरातील विषद्रव्यांचा निचरा होण्यास मदत होते! ह्या प्रक्रियेत थोडा वेळ गरम वाफेत तर थोडा वेळ थंडगार पाण्याखाली/ बर्फाळ हवेत आलटून पालटून स्नान केले जाते. आणि तरीही तुमचा हँगओव्हर जात नसेल तर मग बर्च वृक्षाच्या फांदीने स्वतःला जरा फटके द्यायचे असतात!! त्याने का होईना, हँगओव्हर लवकर पळतो म्हणे!!

९. कोबीचा/ सोअरक्रॅट रस :
नुसता कोबीचा रस किंवा त्याला टोमॅटोच्या रसात मिसळून पिणे हीदेखील एक क्लृप्ती आहे हँगओव्हरमधून बाहेर यायची!

१०. कुत्र्याचा केस ;-) :

जे मद्य तुम्ही प्यायलेत त्याच्यामुळे हे सारे हँगओव्हर प्रकरण झाले.... मग काट्याचा काटा काट्यानेच काढायचा.... त्यासाठी अत्यल्प प्रमाणातप्रमाणात, टोमॅटो रस, टोबॅस्को सॉस, लोणच्याचा खार, क्रीम असे विविध पदार्थ एकत्रित करून हे शिक्षादायी पेय एका घोटात संपविण्याचा प्रयत्न करणे!

११. व्हीट ब्रेड टोस्टवर व्हेजेमाईट :

व्हेजेमाईट हे यीस्टचा अर्क समजा. व्हीट ब्रेडचा टोस्ट करून त्याला थोडे व्हेजेमाईट लावून खाल्ल्यास शरीरातील मीठ व ब जीवनसत्त्वाची पातळी वाढते व तुम्हाला पूर्ववत यायला मदत करते.

१२. काकडीचा रस :

रशियातला अजून एक आवडता उपाय!

१३.वाळूत पुरून घेणे :

आयरिश लोक ओलसर वाळूत स्वतःला पुरून घेतात आणि त्यामुळे म्हणे त्यांना हँगओव्हरमधून मुक्ती मिळते!!

तसे इतरही बरेच रोचक उपाय आहेत.... पण ते ज्यांना ट्यूना फिश, प्राण्यांची यकृते - आतडी, डोळे तळून खाणे वगैरे पसंत आहे त्यांच्यासाठी!

तेव्हा पुढील खेपेस पार्टी कराल त्यावेळी अगोदरच दुसर्‍या दिवसाचे हे नियोजन करून ठेवा. अल्कोहोल सेवन केल्यावर वाहन चालवू नका. स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका! धन्यवाद!! :)

-- अरुंधती

औषधोपचारवावरपाकक्रियासमाजजीवनमानराहणीमौजमजामदतमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

11 Apr 2010 - 9:25 pm | सुचेल तसं

जबरदस्त माहिती.... पुण्यातले एक पट्टीचे पिणारे सर नेहेमी सांगतः प्यायच्या अर्धा-एक तास आधी नुसता ब्रेड खायचा भरपूर. म्हणजे नंतर त्रास होत नाही.

काही लोक नुस्तं पितात. मग नंतर त्यांना त्रास होतो.. म्हणून जाणकार सांगतात की पिल्यावर व्यवस्थित जेवण करावं ...म्हणजे नंतर त्रास होत नाही..

शैलेन्द्र's picture

12 Apr 2010 - 9:58 am | शैलेन्द्र

पील्यावर नव्हे तर पीत असतानाच भरपुर स्टार्टर्स खावे व चांगले जेवावे, दारु लिव्हरपर्यंत पोचत नाही व नंतर त्रासही होत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2010 - 9:36 pm | प्रकाश घाटपांडे

मिपावर उपयुक्त धागा
काही मान्स पेडियलाईट पेक्षा शिकंदर सरबत घेतात. मद्यामुळे बुळकांडी लागल्यावर यकदम सीलबंद उपाय!
(आता आपल शास्त्रापुरत)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चिरोटा's picture

11 Apr 2010 - 9:38 pm | चिरोटा

पिणार्‍यांसाठी उपयुक्त माहिती.पब्स्/बारच्या आजुबाजुला असे जिन्नस विकणारे दुकान काढले तर?
भेंडी
P = NP

श्रावण मोडक's picture

11 Apr 2010 - 10:07 pm | श्रावण मोडक

अत्यंत उपयुक्त धागा!!! :)
एक उपाय राहिला - सकाळी एक कडक पेग मारावा मस्तपैकी. ;)

गणपा's picture

12 Apr 2010 - 2:07 am | गणपा

हेच म्हणतो की काट्याने काटा काढावा ;)

बाकी ज्ञानात बरीच मौलिक भर पडली या धाग्याने.
वाचन खुण साठवल्या गेलेली आहे :)

मिसळभोक्ता's picture

13 Apr 2010 - 1:42 am | मिसळभोक्ता

एक उपाय राहिला - सकाळी एक कडक पेग मारावा मस्तपैकी. Wink

बीन देअर, डन दॅट !

व्हेरी इफेक्टिव्ह !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पाषाणभेद's picture

11 Apr 2010 - 10:14 pm | पाषाणभेद

हो पण दारू पिलीच नाही तर असले काही करावेच लागणार नाही.
सरकारी झैरात काय म्हणते पहा.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 1:20 pm | अरुंधती

अवं आसं काय म्हन्तायसा..... सर्कारनं त्ये धान्यापास्नं दारुचं लई पीक काढलंया... आता सम्दीकडं दारुच दारु दिस्नार..... ल्हान ल्हान प्वारं बी हातात दारुची बाटली घ्येऊन हिन्डनार.... तवा आतापास्नच त्याना दारु प्यायल्यावर्/पिताना/पिन्या आगुदर काय करावं, करु नये.... दुसर्‍या दिसाला सक्काळी आवशीकडे ''आये, डोस्कं दुखतया'' म्हून भोक्काड पसराया लागले तर काय करावे ह्याचे उपाय हैती ह्ये! आता येक्वेळ पानी न्हाय भेटनार पन छत्रपतींच्या महाराष्ट्रात दारु नक्की गावंल....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

12 Apr 2010 - 1:32 pm | मदनबाण

पन छत्रपतींच्या महाराष्ट्रात दारु नक्की गावंल....
अगदी खरं हाय ताय तुमच...
आता दूधाचे भाव पण वाढलेत तेव्हा स्वस्तात मिळणारी दारुच लोकांना परवडेल असं दिसतय्...त्यात आता इजेचे भाव पण वाढणार हायेत म्हणजे सगळी बोंब्...या मंत्रा संत्र्यांच्या घरच्या यशी चे बिल सरकार भरत असेल,पण सामान्य जनतेने घरात पंखा सुद्धा वापरु नये अशी मायबाप सरकारची इच्छा असावी...
चला १ मे जवळ येतोय्...शिवाजी महाराजेंचे पुतळे आता हार घालुन घ्यायला सज्ज होतील्...मिरवणुका निघतील्...भाषणबाजी आणि आतिषबाजी सुद्धा होईल्...आपण फक्त जय महाराष्ट्र म्हणायच बघा !!!

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

प्राजु's picture

11 Apr 2010 - 11:39 pm | प्राजु

हाहाहा..
एकेक उपाय वाचून मजा आली. बरंच वाचन केलं आहेस हँग ओव्हर निवारणाच्या उपायांवर. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 1:23 pm | अरुंधती

हा हा हा...... काट्याने काटा काढण्यासारखा सूड नाही दुसरा....!!! असले भयंकर उपाय वाचलेत की ते वाचताना पिणार्‍याची नशाच उतरावी.... आणि पिताना नशा उतरण्यासारखे दुसरे दु:ख नाही! ;-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

सुधीर१३७'s picture

12 Apr 2010 - 11:14 pm | सुधीर१३७

अरुंधती तै,

असले काही वाचून पिणारांनी पिणे थांबवले असते , तर मग प्रश्नच नव्हता.............

असो,
काहींना इतरांच्या दु:खावर आणखीन डागण्या द्यायला आवडतात...... ;) >:)

राजेश घासकडवी's picture

12 Apr 2010 - 12:42 am | राजेश घासकडवी

मस्त, वेगळ्या विषयावरचा लेख. उपाय छान वाटताहेत.

>बर्च वृक्षाच्या फांदीने स्वतःला जरा फटके द्यायचे असतात!!

याने पुढचे हॅंगओव्हर टळायला पण मदत होईल असं वाटतं.

राजेश

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 1:26 pm | अरुंधती

अंधश्रध्दानिवारणवाल्यांना हुरुप येईल एवढ्या अंधश्रध्दा आहेत हँगओव्हर कसा काढावा ह्या बाबतीत वेगवेगळ्या देशात.... अगदी दारूच्या बाटलीला पिण्याअगोदर शिव्या शाप देण्यापासून......

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

12 Apr 2010 - 2:12 am | मुक्तसुनीत

लेखातले उपाय छान (अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो !;-) )
बाकी वर्शिपिंग द पोर्सेलिन गॉड असाही एक उपाय आहे म्हणतात ! ;-)

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 1:34 pm | अरुंधती

हा हा हा.... तो तर दारुबद्दल सश्रध्द लोकांसाठी नवसाला पावणारा उपाय!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

12 Apr 2010 - 2:45 am | इनोबा म्हणे

एकतर आम्ही अगदी हँगओव्हर होईल एवढी घेत नाही आणि झालाच तर अगदी सोपा उपाय असतो. लिंबूपाणी किंवा उतारा. ;)

|| इनोबा म्हणे ||
नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 1:35 pm | अरुंधती

इनोबा, हा उतारा कंचा बुवा?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

12 Apr 2010 - 10:37 pm | इनोबा म्हणे

हँगओव्हर झाला की पुन्हा एक 'स्मॉल' पेग घ्यायचा. हँगओव्हर गायब ;)
बेवड्यांच्या भाषेत याला 'उतारा' म्हणतात.

|| इनोबा म्हणे ||
नावापुढे-नावामागे टाकलेल्या चार रेघोट्यांमुळे आम्ही चारचौघांपेक्षा कसे वेगळे आहोत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ;)

डॉ.प्रसाद दाढे's picture

12 Apr 2010 - 6:58 am | डॉ.प्रसाद दाढे

खूपच उपयुक्त आणि विस्तृत माहिती! मीही थोडी भर घालतो:

१) कडक लिंबू-आल्याचा रसः थोडेसे मीठ घालून हा रस प्राशन केल्यास हॅन्गओव्हर हमखास उतरतो.

२) दही: सकाळी भरपूर दही सेवन करावे, बरे वाटते

३) रॅन्टॅक (रॅनिटिडिन) : असिडिटी कमी करते. डिपेण्डिंग अपॉन द नीड, ह्याचे इन्जेक्शन घ्यावे

४) एमसेट (ओन्डानसेट्रान): मळमळ कमी करते. गरज पडली तर शिरेत टोचून घ्यावे.

एक अफलातून उपाय वाचला होता.. ब्राझीलमध्ये पूर्वी अतिमद्यपान करून हाल्ट झालेल्याला उलटा करून तोंडात ताजी मानवी विष्ठा कोंबत! उतरतच असेल. नव्हे, परत पिण्याचे धाडसच होत नसेल!

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 1:39 pm | अरुंधती

मेक्सिकोत काऊबॉईज सशाची विष्ठा कॉफीत घालून कडक कॉफी पितात म्हणे ;-)!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

12 Apr 2010 - 1:46 pm | टारझन

काय सांगता काय ?

- (ससा) टारझन

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 1:52 pm | अरुंधती

हो, आणि हा ''कडक'' उपाय ''कडक'' हँगओव्हरवर असतो!! :P

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अक्षय पुर्णपात्रे's picture

12 Apr 2010 - 10:11 pm | अक्षय पुर्णपात्रे

कोपि लुवाक ही जगातील सर्वात महागडी कॉफी आहे. इंडोनेशियन कॉफी बीन्स एका मांजरासदृश प्राण्याच्या आतड्यातून विष्ठेतून बाहेर पडल्यानंतर ही कॉफी बनवतात.
@टारझन, खरडीचे उत्तर कसे द्यावे बरे? तुमची खव किंवा व्यनि तात्पुरते सुरू करा.

अरुण मनोहर's picture

12 Apr 2010 - 7:46 am | अरुण मनोहर

दुसर्या दिवशी हॅन्गओव्हर होऊ नये म्हणून पार्टीला जाण्या आधी दोन तिन चमचे लोणी खाऊन जावे. ह्याने आतड्यांवर स्निग्ध थर जमून रक्तात अल्कोहोल कमी जाते.

टारझन's picture

12 Apr 2010 - 1:28 pm | टारझन

आपल्याला हँग ओव्हरची काही कल्पना नाही .... पण एक इंग्रजी मुव्ही पाहिला होता "हँगओव्हर" नावाचा .. तो तुफान आवडला होता... :)
मस्त मुव्ही !

- ट्रिपल एच - गेमओव्हर

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 2:13 pm | अरुंधती

हँगओव्हरची कल्पना नसल्यास तीच अवस्था उत्तम! ज्याने हँगओव्हर नामक प्रकार अनुभवलाय तो तो प्रत्येक माणूस ''मैने क्यों पी???'' करत स्वतःवरच भारी उखडलाय! पिक्चरचं काय माहीत नाही बॉ! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

नील_गंधार's picture

12 Apr 2010 - 3:10 pm | नील_गंधार

हँगओव्हर वर आमचा उपाय म्हणजे उता-याचा पेग घेणे वा
ते परवडत नसेल तर १ क्रोसिन घेणे.
परंतु हा हँगओव्हर कशाने होतो हे मात्र कोणी सांगेल काय?
माझ्या अनुभवानुसार जरा स्वस्तातली दारू(पक्षी: व्हिस्की) पिली की हँगओव्हर होतो( अपवादः रॉयल स्टॅग) .
एक रॉयल चॅलेंज वगळता महागातल्या व्हिस्की ने सहसा हँगओव्हर होत नाही.
इतर पेयांमध्ये व्होडक्याने हमखास हँगओव्हर होतो. रम हि हँगओव्हर ला अपवाद असावी. परंतु बाकार्डी व्हाईट रम मात्र जोरदार हँगओव्हर देते.
आमच्या बापजाद्यांमध्ये कोणीहि परदेशात गेलेले नसल्याने आम्हि इथे फक्त भारतात मिळणा-या दारुंची नावे दिलेली आहेत.

असो,
दारु पिणा-याने हँगओव्हरची काळजी करू नये. व तो जाण्यासाठी वर दिलेले महागडे उपाय करून पैसा अनावश्यक खर्च करू नये.
:)

स्पंदना's picture

12 Apr 2010 - 3:12 pm | स्पंदना

धन्य आहे बै तुझी!

आगो येक आमच्या गावाकडचा बी ह्यात मिसळ ना!
हॅन्ग ओव्हर आला की जरा बायडी कडन चार लाथा खाउन उद्धार करुन घ्याचा.
लै राम्बाण उपाय सान्गते मी. करुन बघच येकदा.

बाकि चित्र् आणि मजकुर अतिशय छान.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 3:38 pm | अरुंधती

त्यो उपाय तर हैच गं.... गावाकडचा, खनखनीत, झनझनीत आन येकदम रामबान!!
कचकचीत चार श्या खाल्या, चार लाथा खाल्ल्या की कस्ली आलीया डोकेदुखी??
बादलीभर थंडगार पानी डोक्यावर उपडं झालं की पन पळून जातुया म्हनं ह्यँगओव्हर!!
किंवा गोठ्यात म्हशीच्या न्हायतर मारक्या गाईच्या पायाशी लोटांगण घालायचं.... गाय न्हायतर म्हैस जो काय ''परसाद'' द्येईल त्यो गपगुमान घ्याचा, प्याचा, खायचा, सोसायचा म्हन्जे ह्यँगओव्हरचं भूत बी पळून जातंया..... ;-)!!!!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

नावातकायआहे's picture

12 Apr 2010 - 6:11 pm | नावातकायआहे

avoid hangover.......stay drunk.... ;)

विशाल कुलकर्णी's picture

12 Apr 2010 - 6:34 pm | विशाल कुलकर्णी

दारू चढण्यासाठी काहीतरी सांगा हो... ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

गणपा's picture

12 Apr 2010 - 6:51 pm | गणपा

विशाल भौ
पटियाला (व्हिस्की) पेग + बियर + २ गल्लास = विमान + ढग

अविनाशकुलकर्णी's picture

12 Apr 2010 - 6:47 pm | अविनाशकुलकर्णी

दुस~या दिवशी "उतारा" घ्यावा.....एकदम एकदम फ्रेश वाटेल....परत संध्याकाळी गडी तयार

शुचि's picture

12 Apr 2010 - 9:06 pm | शुचि

>> अल्कोहोल सेवन केल्यावर वाहन चालवू नका. स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका! >> हाच विचार माझ्याही मनात आला ग अरुंधती :(
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 9:16 pm | अरुंधती

शुचि,
म्हणूनच अल्कोहोलयुक्त पार्टी करताना कोणीतरी एक नॉन ड्रिंकर सोबत असावा! तो तुमचे वाहन हाकू शकतो व तुम्हालाही हाकू शकतो! सर्वात बेस्ट म्हन्जे अल्कोहोलविरहित पार्टी करावी.... सगळ्यांनी मस्त भेटावे, गप्पा हाणाव्यात, मजा करावी.... पण काहीजणांना त्याशिवाय पार्टी झालीच नाही असे वाटते!!! :(
असो. गप्पांवरही कसे ''हाय'' [इंग्रजी] होता येते ते त्या बिचार्‍या जीवांना काय कळणार!!!!!
:)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

सुधीर१३७'s picture

12 Apr 2010 - 11:22 pm | सुधीर१३७

गप्पांवरही कसे ''हाय'' [इंग्रजी] होता येते ते त्या बिचार्‍या जीवांना काय कळणार!!!!!

..... हे बाकी खरे हो अरुंधती तै..... <:P

शुचि's picture

12 Apr 2010 - 11:43 pm | शुचि

"सोशल ड्रिंकींग" ला एवढं टॅबू मानता कामा नये गं अरुंधती. ते लोक जे पार्टीत पीतात त्यांना त्यांच्या कुवतीचा अंदाज असतो. आणि ते कधी न मिळाल्यासारखे तुटूनही पडत नसतात. मला वाटतं थोडा मॅच्युअर , समजूतदार दृष्टीकोन समाजाने या "अ‍ॅक्टिविटी' कडे ठेवावा. सुरापान हे देव सुद्धा करत असत. आणि थोड्या प्रमाणात वाईन हृदयाला चांगली सुद्धा असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

मला वाटतं थोडा मॅच्युअर , समजूतदार दृष्टीकोन समाजाने या "अ‍ॅक्टिविटी' कडे ठेवावा.

मी "अँटिक्विटी" वाचलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2010 - 11:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ये हूई ना बात...! मस्त उपाय. :)

-दिलीप बिरुटे

II विकास II's picture

12 Apr 2010 - 11:50 pm | II विकास II

भटजीचे, अत्र्यांचे आणि कोळंबीचे विनोद असले की आणखी मजा येते. असो.
कोण किती पंचताराकित आहे ते पण समजते, असो.
विनोदासांठी व्यनी करावा.

---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

मन१'s picture

16 Jul 2012 - 9:16 pm | मन१

drinkers साठी उपयुक्त धागा.

अनुरोध's picture

17 Jul 2012 - 1:41 pm | अनुरोध

माझा प्रश्ण जरा बेशिक आहे पण उत्तर मिळेल अशि अपेक्षा आहे....

हॅन्गओव्हर होतो म्हणजे नक्की काय होते...??

अता दारु पिल्यावर होते ते असे उत्तर नका देउ राव.... :)