पुरावा मिळाल्याशिवाय नाडी ग्रंथांवर माझा विश्वास बसणार नाही.

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
17 Mar 2010 - 11:39 pm

दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.

राजेश घासकडवी जी आता कसे बोललात... मग आपले व माझे पटेल...
जर सत्यनिष्ठेने पुरावा मिळवाल तर मग बदलाल की नाही का तरी ही नाहीच...
मी पुराव्यानेच नाडी ग्रंथांना अवैज्ञानिक, थोतांड, खोटे ठरवायचा चंग बांधून गेलो...
पुराव्यासाठी जंग जंग पछाडून तमिळींना हाताशी धरून, इंडॉलॉजीच्या ताडपत्रांच्या तज्ञांनी पारखून जे ठरवले, समजले. त्याला ठोकरून मी प्रचलित विज्ञानाला कवटाळून बसलो तर ती सत्याशी प्रतारणा होईल असे वाटून लेखणी हातात घेतली...
आपण ही या शोधाच्या वाटेने चला. मग जे सापडेल त्यावर मत ठरवा. नुसतेच विज्ञानाच्या पुस्तकी तर्कांच्या खांद्यावर बसून जर बोलणार असाल
तर मग आपले पटणार नाही...

धोरणमांडणीसंस्कृतीभाषावाङ्मयव्युत्पत्तीप्रकटनविचारआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

18 Mar 2010 - 12:12 am | राजेश घासकडवी

आपलं पटेल याबाबत कधीच शंका नव्हती. फक्त आपल्या विचारांचं पटेल की नाही याबाबत खात्री नाही.

शोधाच्या वाटेवर ज्यांनी आयुष्यं वेचून वाटेतले दगडधोंडे बाजूला केले अशा शेकडो हजारो विज्ञानमहर्षींच्या वाटेवरच - राजरस्त्यावर मी चालतो आहे. मला आता रस्ता बदलणं खूप अवघड, व अनावश्यक वाटतं.

पुस्तकी तर्कापलिकडे काय तर्क असतो हे नीट समजलं नाही.

१. महर्षी नाडीवाचक/लेखक आहेत.
२. सर्व नाडीवाचक/लेखक हे मानव असतात.
३. सर्व मानव स्खलनशील असतात.
४. महर्षी स्खलनशील आहेत.

पहिली तीन विधानं गृहीत धरली तर चौथं आपोआप सिद्ध होतं. या तर्कात काही चूक असेल, किंवा तुम्ही वेगळा तर्क वापरत असाल तर सांगा.

राजेश

टारझन's picture

18 Mar 2010 - 12:31 am | टारझन

आपण नक्की विंग कमांडर होतात की एम.आर. होतात साहेब ?

:)

सही संपादित केली आहे. कुणाही सभासदनामाची टर उडवली जाऊ नये. - संपादक

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Mar 2010 - 1:23 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री टारझन, एम. आर. म्हणजे मेडिकल रिप्रेजेंटेटिव की आणखी काही?

पाषाणभेद's picture

18 Mar 2010 - 6:13 am | पाषाणभेद

मला तर हा एमएलएम चा प्रकार वाटतो आहे. एक मनोरंजन लेख म्हणून ठिक आहे पण किती विश्वास ठेवायच हा मोठा प्रश्न आहे.
अन केवळ कितीही वेळा आमचा मेंदू धूतला म्हणजे आम्ही विश्वास ठेवू असेही नाही म्हणा.

संपादकांनी अशा लेखांना (ओक साहेब तुमचा एकट्याचाच नाही, वैयक्तीक घेवू नका.) सरळ विनोदी लेख म्हणून टॅग लावावा.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

रामपुरी's picture

18 Mar 2010 - 3:07 am | रामपुरी

:) :)
प्रत्येक नाडी लेख बघितला कि अगदी हाच प्रश्न मनात येतो. (असले लोक जर लष्करात असतील, ते सुद्धा वायुदलात, तर देशाचं अवघड आहे. असे नग थोडेच असतील अशी आशा करू.)

शशिकांत ओक's picture

18 Mar 2010 - 12:48 am | शशिकांत ओक

...१० वेळा छापकाटा ओळखता येण्याची शक्यता सुमारे हजारात १ आहे, तर ९ आकडे क्रमाने ओळखण्याची शक्यता अब्जात एक आहे. ते जर कोणी (लबाडी नाही याची खात्री असताना) ओळखले, तर ही दिव्यशक्ती असू शकेल म्हणायला व पुन्हा काही वेळा प्रयोग करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करायला काहीच हरकत नाही. जर अनेक वेळा हा प्रयोग यशस्वी झाला, व इतर शास्त्रज्ञांना पडताळून पाहाता आला तर विज्ञानाचे काही मूलभूत विचार बदलावे लागतील,

आपण उपक्रमचा उल्लेख केलात म्हणून मी आपले तेथील विचार वाचले. पैकी वरील भावला.
तोच माझा विचार होता, आहे. जर लबाडी न करता नाडी ग्रंथांतील ताडपत्रात व्यक्तीच्या संदर्भातील व्यक्तींची नावे, जन्मदिनांक, संतता भावाबहिणीं संख्या शिक्षण, नोकरी-व्यवसाय आदि व अन्य उल्लेख एकदा नव्हे वारंवार नव्हे आत्तापर्यंत अनंत वेळा१०० टक्के अचुक येत असतील तर...
तर ते सत्य व्यक्तीनिष्ठ न राहता व्यक्तिसापेक्ष होऊन जाते.
अध्यात्मिक अनुभूती व्यक्तीगत पातळीवर असल्याने त्याचा पडताळा विज्ञाननिष्ठ कसोटीवर खरा उतरत नाही म्हणून, तो मानणे विज्ञानाला असंभव आहे. मान्य आहे....
... नाडी पट्टीतील लेखनाचा पुरावा जो प्रयोगशाळेत भाषा, इतिहास, लिपी, व अर्थांच्या विविध अंगांनी वारंवार तपासता येतो आहे. नव्हे तो प्रत्येक नाडी केंद्रात दर रोज नवी पट्टी शोधताना सामान्य लोकांच्या नाडी पट्टया, सापडताना आपसुकच तपासला जात आहे...
विज्ञान महर्षींच्या त्या लेखनाला दुर्लक्ष करणार असेल तर ती सत्याची प्रतारणा किती व कशी चालू द्यायची. या नाडी ग्रंथांवर विविध देशात शोध कार्य झाले आहे. ज्यांनीज्यांनी तो शोध घेतला व मान्य केले की काही अतर्क्य यात आहे त्यांच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह टाकून काही विवेकवादी लोक व संघटना विज्ञानाची किती फसवणूक करणार. ज्यांना हे तत्वतः पटणार नाही की या नाडी पट्टयातून मिळणारा मजकूर असतो त्यांना वर म्हटल्याप्रमाणे तर्क करण्यापलिकडे गत्यंतर उरत नाही.
आपण म्हणता तसे महर्षी स्लनशील असतील ही पण त्यामुळे नाडी ग्रंथातील लेखनाताल मजकुरात बाधा कशी येते वा ते खोटे कसे ठरतात हे आपण नाडी ग्रंथांचे अवलोकन करून ठरवावे लागेल. ते शोधकार्य आपण करावे.

नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

राजेश घासकडवी's picture

18 Mar 2010 - 8:26 am | राजेश घासकडवी

नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील.

१. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी. त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील.
२. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल.
३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील.
४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील.
५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील.

जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही.

नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे.

कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा.

राजेश

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Mar 2010 - 8:43 am | अक्षय पुर्णपात्रे

राजेशच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

श्री ओक यांचे लिखाण पाहिल्यास राजेशप्रमाणे अनेक प्रतिसादकांनी प्रामाणिकपणे सूचना केल्या आहेत. श्री ओक यांना या सूचनांमध्ये फारसा रस नसावा असे वाटते. वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधू इच्छिणार्‍या लोकांच्या मतांचा त्यांनी विपर्यास केल्याचेही आढळते. त्यामुळे राजेशच्या सूचनांचा विचार होईल असे वाटत नाही.

II विकास II's picture

18 Mar 2010 - 9:14 am | II विकास II

श्री घासकडवी ह्यांच्या लेखनाशी सहमत.

हे घ्या काही नवीन श्री ओक यांचे लेखन.
काही मदत होइल.
http://www.scribd.com/shashikant%20oak

धनंजय's picture

18 Mar 2010 - 7:43 pm | धनंजय

अशा प्रकारचा प्रतिसाद मी मागे लिहिला होता :
(नाडी-भविष्याबद्दल) प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे
त्या साखळीत उत्तर म्हणून माझ्याबद्दल ही टिप्पणी आली :

असे करतांना आपल्या सुप्तमनांत 'विलक्षण' नाडिग्रंथांच्या बाबतीत 'विलक्षण उत्सुकता' असेल कदाचित् - ती दिसते. (असणारच, त्याशिवाय आपण श्री. ओक ह्यांच्या लेखास थेट प्रतिसाद लिहिला नसता! हे घडतांना मी तरी प्रथमच पाहतो आहे!)

(त्या विचाराचे उत्तर मी दिले, पण) माझ्या सुप्तमनाबद्दल लोकांनी कुठलाही चुकीचा निष्कर्ष काढू नये म्हणून या चर्चांमध्ये थेट भाग घेणे मी तेव्हापासून सोडले आहे.

हा उपप्रतिसाद नाडीग्रंथाबद्दल नाही, पण श्री. घासकडवी यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने आहे. पूर्णपणे अवांतर नव्हे. श्री घासकडवी यांच्या प्रतिसादावरून जुनी आठवण मनात आली इतकेच...

आपले या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद,
खरे तर माझ्याकरवी नाडी ग्रंथांना विज्ञानाच्या धारेत आणणे मला अभिप्रेत नाही. कारण तो माझा प्रांत नाही. तरीही गेल्या काही वर्षांत मी जे प्रामाणिक प्रयत्न केले ते आपणां सर्वांना ज्ञात व्हावेत म्हणून हे लेखन.
माझ्यासारख्याला एकच गोष्ट या कामाला लावते असे वाटते. ती ही की जर कोठल्याही प्रकारची अजिबात लबाडी नसेल आणि तरीही जर नाडी ग्रंथ पट्ट्यात व्यक्तीचे नाव व अन्य मजकूर कोरून येत असेल तर त्याला काय मानायचे.
ते नाडीशास्त्री लबाडी करतात किंवा नाही याचा शोध घेणे फार अवघड नाही. तसा माझ्यासकट तो अनेकांनी घेऊन ते लबाडी करत नाहीत असे प्रामाणिकपणे मान्यही केले आहे. तसे असल्यास ते सध्याच्या प्रचलित विज्ञानाला आव्हान ठरते. त्याचा शोध व्हावा असे प्रामाणिकपणे वाचून मी लेखन करत आलो आहे. कधी ते प्रचारकी थाटाचे होते. असो.
याच मनोधारणेतून आपल्याला प्रतिसाद देत आहे.
नाडी ग्रंथांवर जशी प्रयोगशाळेत परीक्षण करता येँणारी कार्बन १४ टेस्ट अपेक्षित आहे तशी नाडीग्रंथांचे इतिहास, भाषा, काव्य, लिपी, लेखन पद्धती व सामुग्री असे पुरातत्व विभागीय व त्याशिवाय त्यातील पराज्ञानामुळे ब्रह्मविद्येतील संकल्पनांचा शोध - अध्यात्मशास्त्र म्हणून घेण्याची गरज आहे. असे वरवर तपासता वाटते.

नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील.

१. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी.
१) आपले पुर्व राष्ट्रपती व जगतमान्य शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलामांना लिहिलेले सन २००६ मधील विनंती पत्र. त्यांनी यासाठी त्यांना योग्य वाटतील त्या शास्त्रज्ञांना हा विषय हाताळायला प्रेरणा वा आज्ञा करावी असा त्या पत्रातील मजकूर होता. पत्र मिळाल्याचे उत्तर आले. पुढील कारवाईच्या प्रतीक्षेत.
२) डॉ. विजय भटकरांना सन २००३ पासून प्रत्यक्ष भेटलो. माझ्या अपरोक्ष डॉ. भटकरांनी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन थक्क झाल्यावर अन्य मान्य वर त्यांच्या शास्त्रज्ञमित्रांना दाखवून व त्यांनी मान्य करून झाल्यावर त्यांनी अशा शोध प्रकल्प कार्याच्या कामात सक्रीय भाग घेण्याचे व डॉ. नारळीकरांबरोबर यासाठीच्या शोधकमिटीचे संयुक्त अध्यक्षपद स्वीकारायचे लेखी मान्य केले आहे.
३) डॉ. नारळीकरांना प्रत्यक्ष भेटून सन १९९५ त्यांनी माझ्या पुस्तकावर दिलेल्या लेखीअभिप्रायाला अनुसरून अंनिस मधे पडली. त्यावेळच्या ठरलेल्या ५ लाखांचे आव्हान मला देऊन नाडी ग्रंथ थोतांड असल्याचा दावा केला. त्यांनी केलेल्या दाव्यातील त्रुटी वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींनी दाखवून दिल्या. मी त्यांना व इतरांना आपण सर्व एकत्र येऊन या विषयावर अभ्यास कार्य करायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. या वर डॉ. नारळीकरांचा काही प्रतिसाद नाही. नाही तर नाही.
४) आपण म्हणता तसे या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी या साठी निदान नाडी ग्रंथांचा अनुभव घेणे अपेक्षित आहे. तसा कोणी शास्त्रज्ञ घ्यायला तयार नाही. ज्या शास्त्रज्ञांनी असे अनुभव घेतले आहेत- असे अनेक आहेत - पण ते काही ना काही कारणांनी पुढे येत नाहीत वा येऊ इच्छित नाही.
प्रतिसाद देऊन त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील.
आपण, धनंजय, हैयोहैयैयो, आणि कोणीही तज्ञांनी या विषयी काही मार्गदर्शन केले तर आवडेल.
२. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल.

या बाबत आपण म्हणताय तसे कार्य आधीच अन्य देशांतील विचारवंतांनी केले आहे. हे प्रयोग करून त्यावर प्रबंध लिहून ते वेगवेगळ्या विश्वविद्यालयांना पाठवून देण्याचे व मान्यवर जर्नलमधून प्रसिद्ध केले गेले आहेत.

३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील.

इतर वैज्ञानिक त्यांचे लेखन व प्रयोग वाचून प्रयोग करायला पुढे यावेत असे आवाहन मी मिपावरून व अन्य फोरम वरून करत आहे.

४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील.

यापुढीलच्या सर्व गोष्टी जर तरच्या आहेत. त्या मला तरी सध्या अपेक्षित नाहीत.
५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील.

जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही.

नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे.
नाडीग्रंथाना सिद्ध किंवा असिद्ध करण्याची कोणा एकाच्याची जबाबदारी आहे असे नाही. मात्र अनेकांनी एकत्र येऊन यावर विचार करावा असे म्हटले तर चुकले काय

कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा.
जरूर मात्र इतरांनी केलेल्या टिपा टिप्पण्यांना व्य नि पाठवणे शक्य नाही म्हणून या प्रतिसादाला आपल्याशिवाय सर्वत्र प्रकाशित करत आहे. राग नसावा.नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

राजेश घासकडवी's picture

22 Mar 2010 - 5:47 am | राजेश घासकडवी

तुमचे एकंदरीत जोरदार प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय. या प्रकल्पावर काम करण्यात मला रस नाही. नेचर किंवा सायन्स मध्ये आर्टिकल आलं की जरूर कळवा.

राजेश

शशिकांत ओक's picture

22 Mar 2010 - 8:13 am | शशिकांत ओक

जरूर .
ओक.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

टारझन's picture

22 Mar 2010 - 8:29 am | टारझन

तुम्ही ल्ह्या हो ससिकांत राव ... अगदी सगळं मोकळं सोडुन ल्ह्या ... आपला फुल ब्याकप आहे तुम्हाला ... च्यायला कोण आला नाय तं एकेकाचं मुंडकं पकडुन ण्हेऊ .. :)

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Mar 2010 - 1:22 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री ओक, श्री घासकडवी यांचे व तुमचे पटण्यासाठी ठरवायचे निकष हा तुम्हा दोघातील व्यक्तिगत मुद्दा आहे. श्री घासकडवी यांच्या उपप्रतिसादातही वरील मजकुर लिहिता आला असता. वेगळी नाडीचर्चा प्रत्येकवेळी सोडायलाच हवी असे नसावे. हा कसलातरी (नाडीचा उपयोग बांधण्याकरता, घट्ट करण्याकरता होतो) अपव्यय आहे.

की काय? अशा चिंतेत) चतुरंग

ओक साहेब,

नाडीपट्ट्यांचा लुत्फ आम्ही उठवतोच आहे. तुम्ही एकच कुठला तरी धागा चालू ठेवा. मग पहा धाग्याचा ब्रॉडवे कसा होतो ते. ;)

नंदू

विजुभाऊ's picture

18 Mar 2010 - 11:22 am | विजुभाऊ

ओक साहेब तुमच्या चिकाटीचे कौतुक वाटते.
फक्त ती चिकाटी चुकीच्या गोष्टीसाठी अमलात येतेय असे वातते.
असो.
राजेश चे विचार योग्य आहेत. अंधश्रद्धेचा पहिला बळी अज्ञानी /हतबल लोकच जात असतात. ती लोकांची पिळवणूकच करत असते.
श्रीकृष्णाने देखील अंधश्रद्धे विरुद्धा लोकमत जागृत केले होते आणि इंद्रपूजा बंद करवली होती.
गाडगे बाबा नी अम्धश्रद्धेमुळे लोक कसे नागावले जातात ते लोकाना पटवून दिले होते.
इतके असताना अवैज्ञानीक गोष्टी सांगून लोकाना तेच अंतीम सत्य आहे असे कशासाठी भासवायचे?

टिउ's picture

18 Mar 2010 - 9:03 pm | टिउ

अरे काय फालतुपणा चाललाय! बास करा की आता...च्यायला एकदा झालं, दोनदा झालं...यांचं नाडीपुराण काय संपतच नाही! आणी दर वेळी नवीन नाड्या धागे काय चालू करताय राव?

मी विनंती करतो की सर्वांनी एक एक करुन इथे नाडीग्रंथावर विश्वास असल्याचं जाहीर करावं... (म्हणजे रोजचे धागे बंद होतील!)

टारझन's picture

18 Mar 2010 - 9:24 pm | टारझन

टिऊ लका .. एवढा कमी पेशण्स ? कमाल आहे :)
करमणुक णकोय का ? :)
तात्या एवढे कष्ट घेऊन "लिहा ओकसाहेब लिहा नाडी हात मोकळे सोडुन... " ते काय उगाच ..

बहुगुणी's picture

19 Mar 2010 - 12:50 am | बहुगुणी

:?

टारझन's picture

19 Mar 2010 - 1:18 am | टारझन

हो तर .... आणि "वारंवार विचारले जाणारे प्रश्न" बरोबर "उरलेल्या पाकाचे पदार्थांचे काय करावे ? " हा सुद्धा कॉलम अ‍ॅड करावा :)

- सुप्तगुणी

पक्या's picture

19 Mar 2010 - 3:10 am | पक्या

विज्ञानाची कास धरणारे स्वतःला ज्ञानी समजतात. पण ते ज्ञान किती असावे? १००% तले १० -२०% तरी असेल की नाही माहित नाही. ह्या विश्वात अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांचा विज्ञानालाही अजून उलगडा व्हायचा आहे. पण विज्ञानाला जे समजले नाही किंवा ते योग्य त्या पुराव्यानिशी सिध्द झाले नाही म्हणजे ते खोटे असे असू शकत नाही. कारण प्रत्येकाला येणारे अनुभव वेगळे असू शकतात. आणि ते अगदीच झूठ असे आपण कसे म्हणू शकतो? येतही असतील तसे अनुभव.
जेव्हा डॉक्टरचे प्रयत्न फोल ठरतात आणी काही चमत्कार घडला तरच आता पेशंट वाचू शकेल असे डॉक्टर म्हणतात आणी वास्तवात काही केसेस मध्ये असे घडलेले आहे तिथे 'आपण जे समजतो ते' विझान तोकडे पडलेले दिसून येते. मरणाच्या दारात पोहचलेल्या माझ्या आईच्या बाबतीत असे घङलेले आहे. आणि हा अनुभव इतर कोणास जाउदे अगदि जवळच्या मित्रांस, नात्यातील जवळच्या व्यक्तिस सांगितला तरी त्यांस खरा वाटत नाही. पण त्याचा अर्थ आम्हास आलेला अनुभव खोटा होता असे म्हणणे योग्य ठरत नाही.

आणि ओक साहेब , नाडीची महती सांगण्यापेक्षा आपण आपले अनुभव प्रामाणिक पणे सांगा. (म्हणजे कोणाला काही सांगावे वाटते त्या प्रकारच्या हेतूने सांगा, अनुभव शेअर करायला इथे काहिच हरकत नसावी,) ज्याला वाटला इंटरेस्ट तर नाडीकेंद्रात येईल जाऊन आणी बघेल तपासून आपले भविष्य.
नाडी अशी आहे , तशी आहे , इतकी चांगली आहे ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. असे प्रयत्न हे अंधविश्वास पसरवण्याचे काम करीत आहेत असे म्हणण्याला वाव देतात.

हे माझं सर्व साधारण मत आहे , मी नाडीग्रंथ वगैरेच्या बाजूने बोलत नाहिये .

जय महाराष्ट्र , जय मराठी !

सुहास's picture

19 Mar 2010 - 4:02 am | सुहास

ब्रिटीश इंडियातल्या आणि आत्ताच्या पाकिस्तानातल्या लोकांची नाडी बघता येईल का?

देश हितास्तव माजी आयेसाय (ISI) प्रमुख हमीद गुल किंवा मौलाना मसूद अझर यांची नाडी भविष्ये RAW ला कळतील का/ती नाडी भविष्ये सांगणारे ती नाडी भविष्ये सर्कार्ला स्वतःहून कळवतील का?

--(नाडी) सुहास

आपले या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद,
खरे तर माझ्याकरवी नाडी ग्रंथांना विज्ञानाच्या धारेत आणणे मला अभिप्रेत नाही. कारण तो माझा प्रांत नाही. तरीही गेल्या काही वर्षांत मी जे प्रामाणिक प्रयत्न केले ते आपणां सर्वांना ज्ञात व्हावेत म्हणून हे लेखन.
माझ्यासारख्याला एकच गोष्ट या कामाला लावते असे वाटते. ती ही की जर कोठल्याही प्रकारची अजिबात लबाडी नसेल आणि तरीही जर नाडी ग्रंथ पट्ट्यात व्यक्तीचे नाव व अन्य मजकूर कोरून येत असेल तर त्याला काय मानायचे.
ते नाडीशास्त्री लबाडी करतात किंवा नाही याचा शोध घेणे फार अवघड नाही. तसा माझ्यासकट तो अनेकांनी घेऊन ते लबाडी करत नाहीत असे प्रामाणिकपणे मान्यही केले आहे. तसे असल्यास ते सध्याच्या प्रचलित विज्ञानाला आव्हान ठरते. त्याचा शोध व्हावा असे प्रामाणिकपणे वाचून मी लेखन करत आलो आहे. कधी ते प्रचारकी थाटाचे होते. असो.
याच मनोधारणेतून आपल्याला प्रतिसाद देत आहे.
नाडी ग्रंथांवर जशी प्रयोगशाळेत परीक्षण करता येँणारी कार्बन १४ टेस्ट अपेक्षित आहे तशी नाडीग्रंथांचे इतिहास, भाषा, काव्य, लिपी, लेखन पद्धती व सामुग्री असे पुरातत्व विभागीय व त्याशिवाय त्यातील पराज्ञानामुळे ब्रह्मविद्येतील संकल्पनांचा शोध - अध्यात्मशास्त्र म्हणून घेण्याची गरज आहे. असे वरवर तपासता वाटते.

नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील.

१. तुमच्याकडचा प्राथमिक डेटा व्यवस्थित रीतीने एखाद्या प्रस्थापित शास्त्रज्ञाला दाखवून त्याच्या/तिच्या मनात या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी.
१) आपले पुर्व राष्ट्रपती व जगतमान्य शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलामांना लिहिलेले सन २००६ मधील विनंती पत्र. त्यांनी यासाठी त्यांना योग्य वाटतील त्या शास्त्रज्ञांना हा विषय हाताळायला प्रेरणा वा आज्ञा करावी असा त्या पत्रातील मजकूर होता. पत्र मिळाल्याचे उत्तर आले. पुढील कारवाईच्या प्रतीक्षेत.
२) डॉ. विजय भटकरांना सन २००३ पासून प्रत्यक्ष भेटलो. माझ्या अपरोक्ष डॉ. भटकरांनी नाडी ग्रंथांचा अनुभव घेऊन थक्क झाल्यावर अन्य मान्य वर त्यांच्या शास्त्रज्ञमित्रांना दाखवून व त्यांनी मान्य करून झाल्यावर त्यांनी अशा शोध प्रकल्प कार्याच्या कामात सक्रीय भाग घेण्याचे व डॉ. नारळीकरांबरोबर यासाठीच्या शोधकमिटीचे संयुक्त अध्यक्षपद स्वीकारायचे लेखी मान्य केले आहे.
३) डॉ. नारळीकरांना प्रत्यक्ष भेटून सन १९९५ त्यांनी माझ्या पुस्तकावर दिलेल्या लेखीअभिप्रायाला अनुसरून अंनिस मधे पडली. त्यावेळच्या ठरलेल्या ५ लाखांचे आव्हान मला देऊन नाडी ग्रंथ थोतांड असल्याचा दावा केला. त्यांनी केलेल्या दाव्यातील त्रुटी वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींनी दाखवून दिल्या. मी त्यांना व इतरांना आपण सर्व एकत्र येऊन या विषयावर अभ्यास कार्य करायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. या वर डॉ. नारळीकरांचा काही प्रतिसाद नाही. नाही तर नाही.
४) आपण म्हणता तसे या शास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करावी या साठी निदान नाडी ग्रंथांचा अनुभव घेणे अपेक्षित आहे. तसा कोणी शास्त्रज्ञ घ्यायला तयार नाही. ज्या शास्त्रज्ञांनी असे अनुभव घेतले आहेत- असे अनेक आहेत - पण ते काही ना काही कारणांनी पुढे येत नाहीत वा येऊ इच्छित नाही.
प्रतिसाद देऊन त्यासाठी काही सांख्यिकीचे नियम पाळून तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे प्रयोग करावे लागतील.
आपण, धनंजय, हैयोहैयैयो, आणि कोणीही तज्ञांनी या विषयी काही मार्गदर्शन केले तर आवडेल.
२. शास्त्रज्ञ याचं प्रपोजल तयार करून सरकारकडून अगर युनिव्हर्सिटीक़डून ग्रॅंट मिळवेल. अगर तितकंच प्रभावी सत्य असल्यास तो स्वत:च्या आधीच्याच ग्रॅंटचे पैसे वापरून तो/ती अधिक खडतर प्रयोग करेल. या प्रयोगातून येणारे निष्कर्ष चार इतर शास्त्रज्ञ डोळ्याखालून घालतील, व ते योग्य शिस्तीने केलेले आहेत याची खात्री झाली तर एखाद्या मान्यवर वैज्ञानिक नियतकालिकांत ते प्रसिद्ध होईल.

या बाबत आपण म्हणताय तसे कार्य आधीच अन्य देशांतील विचारवंतांनी केले आहे. हे प्रयोग करून त्यावर प्रबंध लिहून ते वेगवेगळ्या विश्वविद्यालयांना पाठवून देण्याचे व मान्यवर जर्नलमधून प्रसिद्ध केले गेले आहेत.

३. ते जर खूप अचूक तंत्र आहे हे त्या प्रयोगांतून दिसलं, तर इतर वैज्ञानिक तेच प्रयोग पुन्हा करून बघतील.

इतर वैज्ञानिक त्यांचे लेखन व प्रयोग वाचून प्रयोग करायला पुढे यावेत असे आवाहन मी मिपावरून व अन्य फोरम वरून करत आहे.

४. या सर्व कसोट्यांना जर ते तंत्र उतरलं तर त्याला काही वर्षात मान्यता मिळेल, जगभरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाडी डिपार्टमेंट्स तयार होतील. दरवर्षी नाडी कॉन्फरन्सेस होतील. आईबाप मुलांना नाडी इंजिनिअरिंगला घालायला धडपडतील.

यापुढीलच्या सर्व गोष्टी जर तरच्या आहेत. त्या मला तरी सध्या अपेक्षित नाहीत.
५. कधीतरी त्याला इतकी मान्यता प्राप्त होईल की त्यावरती नेचर, सायन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या जर्नलमध्ये नाडी भविष्य शास्त्रावर लेख येतील. व वेगवेगळे शास्त्रज्ञ या नवीन ज्ञानामुळे जुन्यापैकी कुठचं कालबाह्य झालं यावर ऊहापोह करतील.

जेव्हा मी एखादा लेख नेचर किंवा सायन्स मध्ये पाहीन तेव्हा मी स्वत: त्या तंत्राने भविष्य पहायला जाईन. त्याआधी नाही. तोपर्यंत नाडीच्या ज्या तुम्ही गमतीजमती सांगता त्या मी केवळ दंतकथा म्हणूनच वाचेन, त्याची वाटलं तर टिंगल करेन, किंवा दुर्लक्ष करेन. नाडी व्यक्तिनिष्ठ म्हणून सिद्ध करता येत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर बोलणंच खुंटलं. जे व्यक्तिनिरपेक्ष नाही, त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही. कविता वा कथेपेक्षा ते काही वेगळं नाही.

नाडी तंत्र असिद्ध करण्याची जबाबदारी माझी नाही. मिपावरील कोणाची आहे असंही वाटत नाही. ते सिद्ध करण्याची (वरील पाच पायऱ्यांनी) जबाबदारी नाडी तंत्र प्रवर्तकांची आहे. तुम्ही मिपावर हे लेखन करून काय साधताय हे मला निश्चित कळलेलं नाही. पण तो तुमचा प्रश्न आहे.
नाडीग्रंथाना सिद्ध किंवा असिद्ध करण्याची कोणा एकाच्याची जबाबदारी आहे असे नाही. मात्र अनेकांनी एकत्र येऊन यावर विचार करावा असे म्हटले तर चुकले काय

कृपया या विषयावर जर माझ्याशी अधिक बोलायचं असेल तर खरडवही अथवा व्यनिचा वापर करावा.
जरूर

राजेश

नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

इंटरनेटस्नेही's picture

24 Mar 2010 - 3:51 pm | इंटरनेटस्नेही

या वादात उडी घेण्यास मी इच्छुक आहे. (पण कोणत्या बाजूने राहावे ते अजून निश्चीत झाले नाही.. (छाप कट करून ठरवेन बहुदा!) (किंवा नाडीच बघावी म्हणतो! )

-
वाद करण्यास उत्सुक (इंटरनेटप्रेमी)

शशिकांत ओक's picture

24 Mar 2010 - 11:26 pm | शशिकांत ओक

वा प्रेमी!!!
आपण स्विमिंगचा पोशाख घालून म्हणजे कपडे काढून - नाडीच्या चड्डीत, उडीच्या थाटात आता पालथे पोहावे कि उलथे असा स्वतःला पेच टाकून काठावर उभे का?
मारा की उडी त्यात अनमान कशाला?
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

इंटरनेटस्नेही's picture

25 Mar 2010 - 2:38 am | इंटरनेटस्नेही

श्री शशिकांत ओक..

मी केवळ विनोद करतोय हो. कृपया मनाला लावून घेवू नका..

(भावनिक) इंटरनेटप्रेमी

खादाड_बोका's picture

25 Mar 2010 - 2:56 am | खादाड_बोका

ऊडी मारताना चड्डीची नाडी घट्ट आवळा...... नाही तर ओक साहेबासारखी तुमची अवस्था न होवो, जशी नाडी सुटल्यावर होते.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

मला तर स्वप्नातही नाडी दिसते....