अगस्त्य जीव नाडी भाग ४...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
10 Mar 2010 - 7:18 pm

अगस्त्य जीव नाडी भाग ४...

महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’

....

‘महर्षी म्हणतात, इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’

आलेले संकट अगस्त्य जीवनाडीच्या पॅकेटच्या बंदुकीच्या सदृश दिसणाऱ्या आकारामुळे टळले होते!.... पुढे वाचा...

....एक गाडी अशी एकाकी का थांबलेली आहे असे पाहून आन्ध्रप्रदेश राज्य परिवहनमंडळाची बस थांबली. त्या पाठोपाठ एक पोलिसांची गाडी येऊन थडकली. त्यांना सांगितले गेले काय काय झाले ते, ते ऐकून त्यातील पोलिस प्रमुखाला जीवनाडीबद्दल उत्सुकता वाटली. घटनेची पोलिस कंप्लेंट करायला लक्षाधीश लागले. इकडे पोलिस गाडीत बसून जीवनाडी वाचायला दासन यांनी सुरवात केली. ते म्हणाले की तुझा एक भाऊ लहानपणीच हरवला व वारला असा समज आहे. पण तसे नाही. तो जीवंत आहे. काही वाईट लोकाच्या संगतीत राहून तो चोऱायला, डाके घालण्यास लागला व नंतर दहशतवादी कृत्ये करू लागला. नक्षली बनून टोळ्याकरून डाके घालू लागला. त्याने आपले नावही बदलले आहे. तो आता ‘नागी रेड्डी’ म्हणवतो. ते सर्व ऐकून त्या पोलिस अधिकाऱ्याला आपल्या धाकट्या भावाबद्दल फारच आश्चर्य वाटले. त्याची चिंता वाटून ‘आता तो कुठे असेल?’ असे त्याने अगस्त्यांना विचारले. हनुमत दासनी त्याच्या काळजीचे कारण लक्षात घेऊन पट्टी पुढे वाचून सांगितले की ‘महर्षी म्हणतात, आत्ता तुला तुझे लक्ष्य दाखवले आहे. यानंतरचे शोधायचे काम तुला करायचे आहे. मात्र इतके सांगतो की तू त्याच्या शोधाचे पहिले पाऊल उचललेस की तुला सर्व काही सापडेल.’

ते वाचन संपले व ताडपट्ट्या गुंडाळता गुंडाळता दासनना वाटले की पूरग्रस्त परिस्थती, नंतर ही नक्षली लोकांची धाड, त्यांच्याकडून पट्ट्या पळवल्या जाण्याची व सर्वकाही लुटले जाण्याची शक्यता, या सारख्या सध्याच्या भीषण परिस्थितीला ते तर जबाबदार नाहीत? माझ्याकडून काही आगळीक तर झाली नाही? त्यांनी आपल्यासाठी पुन्हा पट्ट्या उघडल्या. त्यात त्यांनी वाचले की हे सर्व होण्याला त्या लक्षाधीशाच्या आणखी एका अंबॅसेडरकारमधील एक स्त्री कारणीभूत आहे. तिला धडा शिकवण्यासाठी हे घडले आहे. महर्षी म्हणाले, ‘तिने नजरचुकवून या पट्ट्यांतील दोन ताडपट्ट्याची पाने पळवली आहेत. ती तिने आपल्या साडीत लपवली आहेत. त्यातच तिची मासिक पाळी चालू असल्याचे तिने इतरांपासून लपवून ठेवले आहे. तिचा उद्देश चोरी करण्याचा नाही पण उत्सुकते पोटी तिने ते केले आहे. तिला तिच्या कृत्याचा धसका बसावा व अद्दल घडावी म्हणून नक्षली लोकांच्या धाडीचा उपद्रव वाटेत घडवला गेला.’ ते ऐकून दासन विचारात पडले. त्या पट्ट्या तिच्याकडून परत कशा मिळवायच्या? महर्षींना म्हणाले, ‘आता मी काय कराय़चे? महर्षी म्हणाले, ‘तू काही करु नकोस. त्या बाईकडून मिळवल्या तरी त्या आता काही कामाच्या नाहीत. कारण त्या चोंबाळून दुमडून खराब झाल्या आहेत. त्यात मी नाही आहे.’ ते सर्व ऐकून हनुमत दासन सर्द झाले. त्यांना वाटू लागले की असे वारंवार घडले तर पट्यांची निगराणी व संरक्षण करायचे तरी कसे? त्या वाचनात त्यांना या बाबत सांगण्यात आले. ‘त्याची काळजी करायची तुला गरज नाही. मात्र या घटनेमुळे गंगेच्या किनारी गोमुख नावाचे स्थान आहे. तेथे जाऊन तुला एक पूजा करावी लागेल. त्यापुजेत तुला एका आर्मीतील अधिकाऱ्याची मदत मिळेल. त्याच दरम्यान त्याला मोठ्या कौटुंबिक संकटातून मी सोडवेन. त्यावेळी वाटेत तु जीवनाडीपट्ट्यांना घेऊन प्रत्येक ठिकाणी गंगेच्या पवित्र जलाने पुजा करत करत हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ करत गोमुखला न्यावेस. पुजा करून परतल्यावर त्यानंतर या नाडीपट्ट्यांचे समसमान दोन भाग करायचे. त्यातील तू एक ठेवायची व उरलेली पाने कोणाला द्यायची ते मी ठरवेन. तुझ्य़ाकडील पानातून मी गरजूंच्या समस्यांनाना पौर्णिमा ते अमावास्या या काळात व अश्विनी व रेवती या नक्षत्रांच्या दिवशी उत्तरे व उपाय सांगेन.’

दासन यांच्या मनांत दोन गोष्टींची रुखरुख होती. ‘एक त्या बाईने घेतलेल्या पट्ट्यांची तिला सजा होणार की तिला माफ केले जाणार? व दुसरे असे की या जीवनाडीच्या पट्यांचे असे दोन भाग करायची अगदीच गरज आहे काय? त्या संपुर्ण माझ्याकडेच का नकोत? महर्षी म्हणाले, ‘थांब थोडे. गंमत पहा.’

असे म्हणेपर्यंत करकचून ब्रेक लावून गाडी थांबल्याच्या आवाजाने दासन यांचे भान तुटले. ती गाडी होती ज्यात त्या बाई बसलेल्या होत्या त्या गाडीची! ती गाडी मागून आली होती. ‘त्यातील मागे बसलेल्या एका व्यक्तीचे जोरजोरात विव्हळणे ऐकू येऊ लागले. ते पाहून दासनांच्या सह सर्व तेथे धावले. त्या बाईच्या पोटात अत्यंत जोरात कळा येत होत्या. ती वेदनेने कळवळत होती. तिच्या त्या भयानक पोटदुखीचे कारण दासनांच्या ताबडतोब लक्षात आले. ते त्या लक्षाधीश व्यक्तीच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्या बाईला साडीत लपवलेली नाडीग्रंथाची पाने परत करायला सांगितले.

‘ती म्हणाली मला त्या चोरायच्या नव्हत्या. पण आपल्याजवळ असाव्यात असे वाटून मी त्या लपवल्या होत्या. आधीच माझे पोट दुखत होते. ते यापट्ट्या लपवल्या पासून अतिशय तीव्र झाले. आता मला सहन न होण्यापलिकडे गेले आहे.’ असे म्हणून तिने त्या लपवलेल्या पट्ट्या दूर फेकल्या. त्यानंतर तिची व्यथा एकदम कमी झाली. त्यावर त्याकुटुंबाने घडलेल्या घटनेबद्दल माफी मागून दासनांचे व महर्षी अगस्त्यांचे आभार मानले.

पुढला प्रवास दासनांनी त्यांच्या कारमधून न करता पोलिसांच्या गाडीतून करायचे ठरवले. पोलिसांची गाडी रेल्वे स्टेशनचा 20 किमीचा रस्ता कापू लागली. ते चेन्नईचे तिकिट काढून ते पोलिसांसह प्लॅटफॉर्मवर येऊन बसले. पुढची ट्रेन रात्री 1 नंतर येणार असे कळले. त्यामुळे मधे खूप वेळ होता. काही वेळ गेला असेल, तेवढ्यात हातात शस्त्रे परजत कोणी लुटारू लोक आलेले पाहून तिकिटविक्रीची खिडकी व तेथील दिवे घाईने बंद केल्यामुळे अंधारगुडुप्प झाला. रात्रीच्यावेळचा चंद्रप्रकाश व दूरवर मिणमिणते लाईट फक्त होते. त्यांनी लोकांना वेढा घातला. मात्र ते पोलीस असल्याचे लक्षात आल्यावर ते पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग पोलीस करू लागले. अंधाराचा फायदा घेऊन काही जण पसार झाले. काही वेळाने एकाला पोलिसांनी पकडून आणलेला दासनांनी पाहिला. ज्या पोलिसाला दासनांनी अगस्त्य नाडीचे वाचन पोलिसांच्या लॉरीत केले होते त्याला विचारता कळले की पकडला गेलेला माणूसही त्या आधीच्या नक्षली टोळीपैकी होता. हा पकडला गेला. बाकीचे पसार झाले. ते त्याला घेऊन कारवाई करायला निघुन गेले. नंतर गाडी आली. घडलेल्या घटनेची गाडी थांबल्यावर प्लॅटफॉर्मवर चर्चा झाली. दासननी जनरल डब्यात प्रवेश केला नंतर त्यांना टीटीईने कनफर्म्ड बर्थ दिला. त्यांच्या आपापसातील बोलण्यातून त्यांना कळले की पकडला गेलेल्या माणसाचे नाव ‘नागीरेड्डी’ होते. ते नाव त्यांच्या कानावर पडताच तो त्या पोलिसाचा लहानपणी हरवला भाऊ तर नव्हे? असे वाटून ते महर्षींकडून जाणून घ्यायची उत्सुकता त्यांना लागली. यथावकाश त्यांना वाचनातून नागीरेड्डी तोच होता असे महर्षींनीही सांगून खात्री केली! ... क्रमशः

(अशीच एक जीव नाडी सध्या पुण्यात उपलब्ध आहे. इच्छुकांनी लेखकाशी रात्री ९ ते १०च्या दरम्यान संपर्क करावा)
संकलक – विंग कमांडर शशिकांत ओक . मो - 9881901049,

संस्कृतीधर्मकथाज्योतिषविचारसद्भावनाअनुभवभाषांतर

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

10 Mar 2010 - 7:55 pm | प्रमोद देव

ओकसाहेब,आपल्यासाठी महर्षींचा आदेश आहे की ह्या कथांवर आपण चित्रपट बनवावा,जेणेकरून लोकांच्यात नाडीशास्त्राबद्दल भक्तीभाव निर्माण होऊन आपल्याला आणि समस्त नाडी पंडीतांना उज्ज्वल भविष्यकाल प्राप्त होईल. :)

मजा येतेय वाचायला. अजून येऊ द्या तुमच्या पोतडीतून..अद्भूत आणि सुरस कथा.

चतुरंग's picture

10 Mar 2010 - 8:03 pm | चतुरंग

लहानपणी हरवलेला भाऊ एक गुंड, दुसरा पोलीस!! :D
फुल टू विंटरेस्टिंग, येऊ दे अजून!!

(खुद के साथ बातां : रंगा 'दीवारची' पटकथा अगस्त्य नाडीवरुन चोरली असावी की काय? काय हे चौर्यकर्म!! B) )

(नागीरेड्डींचा चांदोबा)चतुरंग

नितिन थत्ते's picture

10 Mar 2010 - 8:38 pm | नितिन थत्ते

बी ग्रेड हिंदी सिनेमाचीच आठवण येत्ये. कशानंतरही काहीही घडतंय. आणि सगळ्या घटना एकमेकांशी जुळण्याचे योगायोग तर त्या सिनेमांसारखेच.

ओक साहेबांनी पटकथा लेखन चालू करावे.

नितिन थत्ते

jaypal's picture

10 Mar 2010 - 8:39 pm | jaypal

आमची बी नाडी दाखवुन घ्यावी म्हणतोय. कवा?,कुठ आणि कशी दाखवु?

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

कौंतेय's picture

10 Mar 2010 - 8:57 pm | कौंतेय

!

नावातकायआहे's picture

10 Mar 2010 - 10:42 pm | नावातकायआहे

नाडी दा़खवायची आहे.... गुंडाळुन आणू का सुट्टी?

---------------------------------------------------

टारझन's picture

11 Mar 2010 - 1:00 am | टारझन

आज आमच्या "भल्या मोठ्या बंदुकीचा" मुड नाही .. हॅहॅहॅ ..

-(शिकार प्रेमी) गोळीकांत ठोक