ओकसाहेब, तुम्ही पब्लिककडे लक्ष न देता काय बिनधास्त हवं ते लिवा हो नाडीवर. आपला साला तुम्माला फुल्ल सपोर्ट आहे!
...तात्यांच्या वरील आश्वासनात्मक प्रतिक्रियेमुळे यापुढे ही नाडी ग्रंथांवर लेखन करून लोकांना नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची अनोखी ओळख व्हावी उद्देशाने लेखन होत आहे....
अगत्यार जीव नाडीचे अनुभव भाग ...२
अगत्यार किंवा (अगस्त्य) जीव नाडीचे वाचन श्री.हनुमत दासन वडपळणी भागातील केंद्रातून करत असतात. त्यांच्या जीव नाडीवाचनात आलेले काही अनुभव, किस्से "दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचे स्वैर भाषांतर श्री.विश्वनाथ गोपी करतात. मराठी वाचकांना त्यातील काही अनुभवांची ओळख करून देणे हा य़ा लेखाचा उद्देश आहे. त्या अनुरोधाने नाडी ग्रंथ भविष्याची सामान्य ओळख करून देऊन नाडी लेखनकर्त्या महर्षींचा भविष्य लेखनामागील उद्देश स्पष्ट करण्याचे कार्यही घडेल.
जीव नाडी असा एक विशेष नाडीचा एक प्रकार आहे. त्यात महर्षींशी आपण सद्यपरिस्थितीत आपल्या समस्या कथनकरून, त्यावर सल्ला-विचार विनिमय करून त्यातून वाट शोधू शकतो. सामान्य नाडी पट्टीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर करून सांगताना अनेकदा तात्कालिक समस्यांवर महर्षी काही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांचा विरस होतो. नाडी ग्रंथ भविष्याबद्दल नाही नाही त्या शंका येऊ लागतात. जीवनाडीतून अशा समस्यांचे-शंकांचे समाधान होते. असो.
एकदा श्री. हनुमत दासन यांच्याकडे एक मध्यम वयाचे ग्रहस्थ चिंताक्रांत मुद्रा घेऊन आले. म्हणाले, "माझा मुलगा मरीन इंजिनीयर आहे. तो सध्या नेदरलँड मधे शिपवर आहे. तेथे त्याला वरिष्ठांचा फार त्रास होत आहे. जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत पाळी आली आहे. काही उपाय सुचवा."
हनुमत दासम यांनी अगत्यार जीव नाडीची पाने उलटून वाचनाला सुरवात केली. महर्षींनी त्याच्या कामाचे स्वरूप सांगितले, "त्या मुलाला हा त्रास गेले दोन वर्षांपासून होता. आता त्याच्या आय़ुष्याला धोका आहे. त्याने नोकरीचा राजिनामा द्यावा" अशी सध्याची माहिती सांगितली. ती ऐकून त्या ग्रहस्थांची खात्री झाली की ते आपल्या मुलाबद्दलच बोलत आहेत. पण नोकरीचा राजिनामा देण्याच्या आदेशाने त्यांचा गोंधळ झाला. ते म्हणाले, "ते कसे शक्य आहे? माझा मुलाला ही नोकरी करायला फार आवडते. इतक्या वर्षांनंतर पुढल्या काही महिन्यात तर त्याला चीफ इंजिनियरची बढती मिळणार आहे असे तो म्हणत होता."
दासन म्हणाले, "महर्षी म्हणतायत, त्याच्या वरिष्ठांना ते ठरवू दे."
चिंतेत पडलेले ग्रहस्थ म्हणाले, "विचारून सांगतो." काही तासात धापा टाकत परत आले व म्हणाले, "माफ करा. मगाशी बोलताना त्याला जीवे मारण्याच्या धोक्याविषयी पुढे काय ते राजिनाम्याच्या विषयांतरामुळे विचारायचा राहून गेले." त्यावर नाडी वाचून दासन म्हणाले, "महर्षी म्हणतात, ह्याच्या जिवाला का धोका आहे ते सांगतो. हा नोकरीला लागला तेंव्हा व्यवस्थित होता.पण नंतर कुसंगतीमुळे व मोहाला बळी पडल्याने स्मगलिंग करू लागला. त्यातून त्याने बराच पैसा व प्रॉपर्टी विकत घेतली. घरच्यांना ती नोकरीत घाम गाळून मिळवली असल्याचे तो अभिमानाने सांगत असे. पुढे त्याच्या वरिष्ठांना त्याच्या चलाखीची कल्पना आली. त्यांनी त्याच्या कडून फार मोठ्या रक्कमेची मागणी केली व ती पुरी न केल्यास त्याला मारून समुद्रात फेकून देण्याची धमकी दिली. "ते ऐकून हादरलेले ते ग्रहस्थ म्हणाले, "महर्षींनी यावर काही उपाय सांगावा."
महर्षी म्हणाले, "त्याने आधी त्याची गैरमार्गाने मिळवलेली सर्व रक्क्म व प्रॉपर्टी वरिष्ठांना परत करावी. अशा कुकर्मातून मिळवलेल्या पैशातून काही दैवी उपाय करायला मी सांगणार नाही. त्याच्या कष्टाच्या कमाईतून त्याने आपल्या कुलदेवतेला पूजा व अर्चना करावी नंतर ‘तिरुकडायूरला’ अभिरामी अम्मन मंदिरात जाऊन दीप लावावा व तेथील कार्तिकेयाच्या मूर्तीला गुलाबाच्या फुलांचा हार घालावा. हे सगळे त्याला तेथून करता येणे शक्य नाही. त्याच्या ऐवजी ही कामे त्याच्या आईवडिलांनी आजच्या रात्रीच्या आत करावीत. अन्यथा त्याच्या जिवाला काहीही बरे-वाईट होऊ शकते. त्याची हमी मी घेऊ शकत नाही."
ते ऐकून त्याचे कुटुंब त्वरेने कामाला लागले. काही दिवसांनी ते ग्रहस्थ परत भेटावयास आले तेंव्हा त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा होता. तो म्हणाला, "माझ्या वरिष्ठांनी पैसे घ्यायला संपूर्णपणे नकार दिला. माझ्यावरील बालंट गेले व मला प्रमोशन पण मिळाले! शेवटी मी गैरमार्गानी कमावलेली रक्कम भारतात परतल्यावर गोरगरिबांत वाटली! प्रॉपर्टी अनाथालयाला दान केली!" अशा तऱ्हेने महर्षींची कृपा झाल्याने धन्य वाटून पाया पडून ते लोक गेले!
महर्षींना कुकर्मांचा वाटणारा तिटकारा व चांगल्या जीवात्म्याबद्दलची कळकळ यातून दिसते.
एका जोडप्याला मुल नव्हते, तेंव्हा महर्षींनी सांगितलेले उपाय केले संतती झाली. पण त्याआधी दैवीउपाय करूनही संततीचा लाभ का झाला नाही याची काही कारणे सांगताना महर्षी म्हणाले, ‘१) पूर्वी केलेल्या पूजा विधीपुर्वक व त्याच क्रमाने केल्या गेल्या नव्हत्या. २) पुजाकरताना पैशाचे गणित मांडून फारच कोतेपणा केला तो नडला. ३) ज्या पुजाऱ्याने मंत्र म्हणून पूजा सांगितली त्याने गडबडगुंडा करून काम आटपले. ४) पुजा करते वेळी स्वच्छता व पावित्र्य पाळले गेले नाही. ’
नाडी ग्रंथ भविष्य पाहून शांती-दीक्षेचे सोपस्कार करूनही योग्य तो परिणाम का झाला नसावा याची कारणे यावरून शोधावीत.
....२)....एकदा एक जण श्री.दासन अगत्यार जीव नाडीपट्टीत पाहून जे सांगतात ते खरेच असते का? त्यातील ज्योतिष खरे होते का? त्यात सांगितलेल्या दैवी उपायांनी खराच काही उपयोग होतो का की सगळी बनवाबनवी आहे? असे प्रश्नांचे किडे वळवळत परीक्षा करायला आला. दासनना म्हणाला, "माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. मी देवाला मानत नाही. या नाडी ग्रंथ भविष्यावर तर माझा बिलकुल विश्वास नाही. तरीही तुमच्या महर्षींची कसोटी घ्यावी व जमलेच तर माझ्या समस्येचे निराकरण करावे म्हणून मी इथे आलो आहे."
त्यावर दासन म्हणाले, "जर तुझा नाडी ग्रंथ भविष्यावर विश्वास नाही. महर्षींच्या शब्दावर आस्था नाही तर इथे येऊन का वेळ व्यर्थ घालवतोस ?"
"इथून जर काही उपाय सापडले तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवायला तय़ार आहे. म्हणूनच ते पहायला मी आलो आहे. तरी मला काय ते मार्गदर्शन करावे. कारण दीड महिन्यापूर्वी मला कॅन्सर झाल्याचे कळले. तेंव्हापासून औषधपाणी चालू आहे. पण मी बरा होऊन वाचेन का? हे विचारायला आलो आहे."
"जर तुला उपाय हवे असतील तर अगस्ती महर्षी जे करायला सांगतील त्यांच्या वर संपूर्ण विश्वास हवा." त्यावर तो म्हणाला, "हो हो मी विश्वास ठेवेन."
दासन म्हणाले, "तू माझ्या समाधानासाठी तोंड देखले म्हणून मला काय उपयोग? मी फक्त महर्षीच्या शब्दांना कथन करणारा नाडीवाचक आहे. ते काय म्हणतात, ते मी सांगेन ते तुला ऐकले पाहिजे."
"हो पण माझी एक अट आहे की मी उपाय वगैरे करणार नाही. पण मला बरे करा अशी माझी विनंती आहे. " दासन त्याच्या उद्धटपणावर रागावले व विचार करु लागले की महर्षींनी सुचवलेले उपाय याला सांगावेत तरी कसे?
"बर बघतो ते काय म्हणतात ते". असे म्हणून दासन वाचायला लागले.
"एक व्यक्ती राजा रामचंद्रांचे नाव घेऊन देशावर राज्य करण्याच्या इराद्याने उङी घेत आहे. अयोध्या नगरीतील मंदीर बांधण्याच्या आवेशाने काही दारुड्या, मवाली, पैसे चारून जमवलेल्या लोकांना हाताशी धरून लोकांना बहकवले जात आहे. असत्याची कास धरणारे देशावर राज्य करत आहेत. आपल्या जवळच्या नातलगांना धडधाकट असूनही रोगी आहोत असे म्हणून त्यांच्या नावाची मालमत्ता गिळंकृत करण्याची चाल खेळली जात आहे. फसवले जात आहे."
दासनांच्या लक्षात आले की मजकूर तुटक व असंबंद्ध असून समोर बसलेल्याच्या संदर्भात हा लागू नाही. म्हणून त्यांनी त्याला पुन्हा कधीतरी ये म्हणून कटवला. जाताना तो म्हणाला, "पाहिलेत, मी म्हटले नाही असे बाष्कळ काहीतरी तुम्ही सांगता भविष्य म्हणून. बर मग मी उद्या येतो. "
दुसऱ्या दिवशी...
कालच्या वाचनावर भाष्य करताना महर्षी म्हणाले, "काल मी जे म्हटले की रामाच्या नावाचा बहुरुपी देशावर राज्य करू इच्छितो तो म्हणजे ‘एन टी रामाराव’. ज्याने रामाचे रोल सिनेमात केले व तेलगू देसम नावाची पार्टी काढली आहे. उद्याच्या पेपरात ती बातमी वाचायला मिळेल. पुढे मी रामजन्मभूमी वादाविषयी बोललो. तिसरी गोष्ट होती जो तुझ्या समोर बसला होता त्याच्या बद्दल. तू माझा वाचक असूनही तुला माझे शब्द कळले नाही. त्या समोर बसलेल्याला कॅन्सर वगैरे काही झालेला नाही. घरच्यांची सहानुभूती मिळवणे व आपल्या प्रेमपात्राच्या नावावर प्रॉपर्टी करायच्या उद्देशाने ही त्याची चाल आहे. पण मला फसवून त्याला काय मिळणार?
हे खडे बोल ऐकून ती व्यक्ती थोडी वरमेल असे दासनना वाटले. ते पुढे वाचून म्हणाले, "माझ्या भविष्य कथनाची सत्व परीक्षा घ्यायला हा देवावर विश्वास नसलेला आला आहे. नाडीवाचका, माझ्या कथनावर विश्वास ठेव की हा काही काळाने पुन्हा माझ्याकडे येणार आहे! विचार काय कारण? त्या वेळी त्याला तोच रोग खरोखरच झाला असेल. जो रोग त्याने सध्या खोटेपणाने झाल्याचे पसरवले आहे.
हे सर्व वाचून श्री.हनुमत दासना वाटले आता तरी हे ऐकून तो महर्षींची आपल्या कुकर्माबद्दल क्षमा मागेल. पण झाले उलटेच. तो उर्मटपणाने म्हणाला, "हे सगळे भविष्य कथन मी खोटे ठरवीन. आणि उठून चालता झाला!"
तीन महिन्यानंतर...
एक दिवस एका माणसाला दोन जण बखोट्याला धरून आणताना दिसले. त्याला चालता येणे शक्य नव्हते. विचारपूस करता त्यापैकी एक म्हणाला, "याना पॅऱॅलेसिसचा अटॅक आला आहे. त्यांना धड बोलताही येत नाही. म्हणून त्यांनी एका चिठ्ठीवरील मजकूर वाचून दाखवला. "अगस्त्य महर्षींनी पुर्वी सांगितलेले कथन अगदी सत्य झाले.
"मग मी आता काय करू?" दासननी विचारले. "आता काही तरी करून यांना वाचवा अशी विनंती आहे". दासन विचारात पडले. पट्टया काढून वाचायला लागले. महर्षी त्यात म्हणाले, "हा आलेला माणूस तोच आहे, ज्याने कॅन्सर झाल्याचे खोटे सांगितले होते. आता त्याला पोटातला ट्युमर झाला आहे. त्याची ही प्राथमिक अवस्था आहे व माझ्याकडे बरे होण्याच्या उद्देशाने आला आहे. म्हणून मी त्याला एक औषध सांगतो त्याने तो बरा होईल. ती जडीबूटी कोणती, ते औषध बनवायची कृती व डोस कसा घ्यायचा ते ही सांगेन!" महर्षी पुढे म्हणाले, "याने आपल्या भावाबहिणींची मालमत्ता हडप करण्याचा घाट घातला होता. पुर्वीच हा माझे आशीर्वाद घेऊन गेला असता व कुकर्मे केली नसती तर ही वेळ त्याच्यावर आली नसती. बर असो. ह्या जडीबूटीच्या झाडाचा शोध सदुरगिरीपर्वतावर घ्यावा. सांगितलेले औषध काटेकोरपणे बनवून घ्यावे. "
त्यानंतर त्याने ते औषध घेतले व पॅऱॅलेसिस व ट्यूमर मधून बरा झाला व निरोगी जीवन जगू लागला. महर्षींच्या लेखी विश्वास ठेवणारा वा न ठेवणारा असा दुजा भाव नाही. शरण आलेल्या कोणावरही ते कृपा करु शकतात. हे या उदाहरणावरून दिसून येते.
वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी अनेक कथने सादर करता येतील.
(भाग – २ समाप्त क्रमशः पुढे चालू) -----------------
प्रतिक्रिया
26 Feb 2010 - 8:30 pm | JAGOMOHANPYARE
अनुभव आहे का सत्यनारायणाच्या कथेतील पान? :)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
26 Feb 2010 - 9:00 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
एवढ्या विनोदी वाक्यानंतर लेख पुढे वाचावल्या गेला नाहीये ! बाकी मनोरंजनाचे पान - संध्यानंदात सहज खपेल हे =))
असो ! लिहीत र्हा .. आम्ही मुड आला की चावत राहू :)
- (महर्षी) टारानंद
संततीप्राप्ती साठी कधीही कॉल करा :) यज्ञकर्मी.कॉम
26 Feb 2010 - 9:12 pm | नंदू
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) ........
मेलो मेलो......... =)) =)) =)) =)) =))
ह ह पु वा.
27 Feb 2010 - 6:16 am | राजेश घासकडवी
प्रकाटाआ...नवीनच धागा काढावा म्हणतोय...
26 Feb 2010 - 10:09 pm | II विकास II
लेख रोचक झाला आहे. पण तो पुराणकथा प्रकाराकडे जास्त वळला आहे
---
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
26 Feb 2010 - 10:48 pm | शैलेन्द्र
आमच्या नाडीत जे असेल ते होइल...
जे लिहीलेय तेच होइल, कोणी टाळु शकणार नाही... तिच्यायला, मग कश्याला बघा नाडी...
(नाडी न बघता सोडणारा व बांधणारा..)
शैंलेन्द्र..
27 Feb 2010 - 1:08 pm | विजुभाऊ
वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी अनेक कथने सादर करता येतील.
बहुधा नसावी.
27 Feb 2010 - 1:36 pm | विसोबा खेचर
ओकसाहेब, औरभी आने दो..
नाडीदेवींचा विजय असो.. :)
तात्या.
27 Feb 2010 - 4:31 pm | शैलेन्द्र
" ओकसाहेब, तुम्ही पब्लिककडे लक्ष न देता काय बिनधास्त हवं ते लिवा हो नाडीवर. आपला साला तुम्माला फुल्ल सपोर्ट आहे!
...तात्यांच्या वरील आश्वासनात्मक प्रतिक्रियेमुळे यापुढे ही नाडी ग्रंथांवर लेखन करून लोकांना नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची अनोखी ओळख व्हावी उद्देशाने लेखन होत आहे...."
तात्या, तुम्ही फार चालु आहात, मिपाचा टी आर पी कसा वाढवायचा ते तुम्हाला बरोबर माहीत आहे...
27 Feb 2010 - 1:41 pm | अनंत छंदी
ओकसाहेब तुम्ही लिहा हो, काही वाचतील आणि वाचतील तर काही वाचून हसतील म्हणजे त्यांचेही मनोरंजन होणारच आहे. बरे ही जीवनाडी पुण्यात कुठे आहे मला जायचे आहे.
28 Feb 2010 - 11:45 am | महेश हतोळकर
म्हणाले, "माझा मुलगा मरीन इंजिनीयर आहे. तो सध्या नेदरलँड मधे शिपवर आहे. तेथे त्याला वरिष्ठांचा फार त्रास होत आहे. जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत पाळी आली आहे. काही उपाय सुचवा."
हनुमत दासम यांनी अगत्यार जीव नाडीची पाने उलटून वाचनाला सुरवात केली.
बोटांचे ठशे न घेताच? तुम्हीच आधी सांगितल्या प्रमाणे फक्त बोटांचे ठशे पुरेसे असतात. जातकाने भाष्यकाराच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे बंधन कारक नाही. आणि येथे तर जातकच उपस्थित नाही, ना त्याच्या बोटांचे ठशे दिल्याचा उल्लेख आहे. बोटांचे ठशे जर वडिलांनी कागदवर आणले असतील तर, मी आधीच विचारलेला प्रश्न परत विचारतो: "मी माझे ठसे फॅक्स करून पाठवले तर माझी नाडी मिळेल काय?"
महर्षी म्हणाले, "त्याने आधी त्याची गैरमार्गाने मिळवलेली सर्व रक्क्म व प्रॉपर्टी वरिष्ठांना परत करावी. अशा कुकर्मातून मिळवलेल्या पैशातून काही दैवी उपाय करायला मी सांगणार नाही.
१. प्रॉपर्टी गैरमार्गाने मिळवलेली होती पण ती वरीष्ठांची नव्हती. मग वरिष्ठांना का परत करायची? हा एक खूप गंभीर मुद्दा आहे. गुन्हेगाराने गुन्ह्यातून सुटण्यासाठी मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचा सल्ला देणारा माणुसही गुन्हेगारच असतो.
२. तुमच्या आधीच्या लेखानुसार महर्षी फक्त नाडी वाचून दाखवतात. "उपाय" सांगत नाहीत.
"एक व्यक्ती राजा रामचंद्रांचे नाव घेऊन देशावर राज्य करण्याच्या इराद्याने उङी घेत आहे. अयोध्या नगरीतील मंदीर बांधण्याच्या आवेशाने काही दारुड्या, मवाली, पैसे चारून जमवलेल्या लोकांना हाताशी धरून लोकांना बहकवले जात आहे. असत्याची कास धरणारे देशावर राज्य करत आहेत. आपल्या जवळच्या नातलगांना धडधाकट असूनही रोगी आहोत असे म्हणून त्यांच्या नावाची मालमत्ता गिळंकृत करण्याची चाल खेळली जात आहे. फसवले जात आहे."
तो माणूस असा कोण होता की ज्याच्या साध्या कौटुंबिक भानगडी मध्ये राष्ट्रीय समस्यांचं विवेचन सापडावे?
पुर्वीच हा माझे आशीर्वाद घेऊन गेला असता व कुकर्मे केली नसती तर ही वेळ त्याच्यावर आली नसती.
आशिर्वादाने पुर्वलिखीत भविष्य बदलते?
त्यानंतर त्याने ते औषध घेतले व पॅऱॅलेसिस व ट्यूमर मधून बरा झाला व निरोगी जीवन जगू लागला.
ते दिव्य औषध बनवण्याची कृती जगासमोर उघड का केली नाही? कितीतरी लोक आजूनही पॅरॅलेसिस आणि ट्युमरचा त्रास भोगताहेत.
28 Feb 2010 - 12:46 pm | वेताळ
वाचायला मिळाल्या. चांदोबा मासिकात देखिल अश्याच कथा प्रसिध्द होत असत. अजुन अश्या कथा येवुद्या.
वेळ मिळाला तर सलमान चे लग्न कधी होणार? हा माझ्या कडुन प्रश्न विचारा.
वेताळ
28 Feb 2010 - 1:41 pm | चतुरंग
रे वाटलं की ओकसाहेब लगेच पुन्हा नाडीचा नवा गुंडा सोडायला घेतात! ;)
(अ-नाडी)चतुरंग
28 Feb 2010 - 2:45 pm | मितभाषी
हे नाडी परकर(न) काय हे. #:S
(इलॅस्टीक चड्डीवाला) भावश्या
28 Feb 2010 - 2:57 pm | बिपिन कार्यकर्ते
आयला!!! मला तर नाडी सोडल्यानंतरच अपत्यप्राप्ती होते असा अनुभव आहे ब्वॉ... इथे तर बरोब्बर उलटंच लिहिलंय राव!!!
असो. अनुभव हाच खरा गुरू त्यामुळे आम्ही आमच्या अनुभवाप्रमाणेच वागू.... ;)
बिपिन कार्यकर्ते
28 Feb 2010 - 3:06 pm | प्रकाश घाटपांडे
जीवनाडी इल्याश्टिक सारखी फ्लेक्झिबल असते. तिथे 'महर्षी' नाडीवाचकाच्या मुखातुन बोलतात. चक्क गप्पा मारतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
28 Feb 2010 - 8:00 pm | jaypal
फार उडु नका आणि आम्च्या नाडीची थट्टा कराल तर क्षणात तुमचा![](http://dm.ncl.ac.uk/peterevans/blog/wp-content/uploads/2009/04/string.jpg)
करुन ठेविन. मग येइल तुमच विमान जमिनीवर.
स्वामी
रोखबाय ठोक
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
9 Mar 2010 - 11:24 pm | शशिकांत ओक
मिपाकारंनो,
या घाग्यावरील प्रतिक्रियेने करमणूक झाली. काहींना भल्या मोठ्य़ा बंदुकीने नाडी ग्रंथांचा उंदीर मारल्याचा दंभ झाला. मात्र तात्यांनी नाडीला देवी स्वरूप मानून और आने दो अशी फरमाईश केलेली पाहून हुरुप आला. नाडी ग्रंथ वा नाडीमहर्षी हे जर उंदीर असतील तर ते टॉम आणि जेरी कार्टून मधील जेरी सारखे विरोधकांना जेरीला आणणारे आहेत हे चतुर व सूद्न्य वाचक जाणतात. मी मी म्हणणारे काही काळाने गारद झाले. तेंव्हा इतरांची काय कथा. तर आता सज्ज व्हा कथा भाग ३ साठी.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत