भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.
या विषयावर आजपर्यंत अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. लढाईनंतर लगेच बखरी लिहिल्या गेल्या जाऊ लागल्या. आधुनिक काळात मराठी इतिहासाचे भीष्मपितामह वि का राजवाडे, शेजवलकर, फाटक, पगडी, पांडुरंग बलकवडे, विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी ही या विषयावर लिहिलेल्या साहित्यातील अगदी काही निवडक ढोबळ नावे. डॉ उदय कुलकर्णी यांनीही गेल्या काही वर्षात इंग्रजी आणि मराठीत पानिपताबद्दल लिहिले आहे, व्याख्यानांच्या द्वारे लोकांसमोर मांडले आहे. माझ्या मित्राच्या भाषेत सांगायचे तर "अगदी पिळून कोरड्या केलेल्या" अश्या या विषयावर मी का अजून एक पुस्तक प्रकाशित करतो आहे?
त्याचं कारण असं आहे की, कित्येक पुस्तकांमधून आपल्याला लेखक स्वतः मराठ्यांच्या बरोबर पानिपतमध्ये "लढताना" आढळतात. मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम हा प्रशंसनीय तर आहेच. आपल्या पूर्वजांचे स्मरण करताना आपल्याला अभिमान वाटेल अश्या गोष्टी समोर ठेवायच्या असतात, त्यामुळे अशी पुस्तके लिहू अथवा वाचू नयेत असे माझे म्हणणे नाही. पण वस्तुनिष्ठ दृष्टीने या लढाईबाबत मराठी साधने काय सांगतात, एवढेच नव्हे तर शत्रूच्या बाजूची फारसी, दारी, पश्तो साधने काय सांगतात, या लढाईत भाग न घेतलेले इंग्रज, फ्रेंच आपल्याला काय सांगतात हे तपासून पाहिलं तर एक आजवर न उलगडलेलं विश्वच आपल्यासमोर अवतीर्ण होतं. त्या विश्वात रंग भरण्याचं काम करतात ती परदेशातील आणि भारतातील आजवर अप्रकाशित असलेली चित्रे. या विश्वानं मला मोहात पाडलं. वाचकांनाही या गतकाळातील स्मृतिचित्रांचा मोह पडेल अशी मला अशा आहे.
कित्येक दिवस, महिने, वर्षे, महिने अभ्यास केल्यावर इतक्या विस्तीर्ण विषयावर लिहिलेल्या अनेक पुस्तकांतील न उलगडलेल्या बाबी मला समजू लागल्या. त्या पक्क्या करण्यासाठी मी ज्या मूळ साधनांवरून हे ग्रंथ लिहिले आहेत ती मिळवण्याचा प्रयत्न केला. ही वाट खूप खडतर होती. त्यासाठी आवश्यक असणारे फारसी, दारी, पश्तो वाचनाचे ज्ञान, मोडी लिपी वाचन हे शिकताना मला अनेक लोकांची प्रचंड मदत झाली. श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि दिल्लीचे फारसी प्राध्यापक डॉ चंद्रशेखर यांच्या मदतीने अनेक वाटा खुल्या झाल्या. मूळ साधने घरबसल्या अभ्यासून पाहताना या पुस्तकाची कल्पना माझ्या मनात साकारत गेली. या पुस्तकासाठी मी जगभरातून अनेक तपशील मिळवले आहेत. नावंच सांगायची तर इंग्लंड, अमेरिकेतील साधने तर आहेतच, पण पॅरिस येथील फ्रेंच साधने, मध्य-पूर्वेतील कुवैत, अफगाण शाहनामा-पेशावर, पाकिस्तानातील लाहोर, खैबर-पख्तुनवा, भारतातील सागर, डीग, हैदराबाद, जोधपूर, जयपूर अश्या अनेक मराठी वाचकांना अपरिचित अश्या जगातून इतिहासाचे कण गोळा केलेले आहेत. या नवीन पुस्तकाच्या रूपाने मागच्या पंचवीस-तीस वर्षातील संशोधन आणि अनेक अप्रकाशित नवीन चित्रे, साधने अन माहिती वाचकांच्या समोर ठेवताना मला आनंद होत आहे.
मिसळपाव हे संकेतस्थळ माझ्यासाठी खास आहे, कारण इथे लिहिलेल्या माझ्या लेखनाला अनेक इतिहासप्रेमी वाचकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी खूप प्रोत्साहन दिले आहे. एवढेच नव्हे तर नुसतं पुस्तक लिहितो आहे हे समजताच काहींनी त्याच वेळी आपली प्रत राखून ठेवली आहे! आज पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु करताना मला आपल्या सर्वांचा असाच भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
पुस्तकाचे प्रकाशन २० डिसेंबर २०२० रोजी करण्याचं ठरवलं आहे. ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांनी आपले नाव इथे नोंदवावे.
https://panipat-signup.web.app/
दोन पर्याय उपलग्ध आहेत:
१) गूगल पे, अँपल पे अथवा क्रेडिट कार्ड इत्यादीद्वारे रुपये ७५०/- देऊन नोंदणी
किंवा
२) सध्या पैसे न देता फक्त नाव,पत्ता देउन नोंदणी करता येईल
- (पुणेरी स्वभावाला न अनुसरून!) कुठलीही काटकसर न करता उत्तम दर्जाच्या जाड कागदावर, ८०+ चित्रे सुबकपणे या जाड पुठ्ठयाच्या (hardcover) पुस्तकात छापली आहेत.
- पुस्तक जगभर कुठेही पाठवता येईल अशी सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे
- पुस्तकाची किंमत रुपये १५००/- आहे, पण २० डिसेंबरपर्यंत ते रुपये ७५०/- म्हणजे ५०% सवलतीत मिळेल
- पुस्तक दिलेल्या पत्त्यावर प्रकाशन झाल्यावर हणजे २० डिसेंबरनंतर पाठवले जाईल
- पुस्तक प्रकाशन झाल्यावर amazon किंवा दुकानातही मिळू शकेल, तशी व्यवस्था करणे चालू आहे
- नोंदणी करताना काही अडचण आल्यास panipat.rediscovered अँट gmail.com या पत्यावर किंवा इथे संपर्क करावा
धन्यवाद !
प्रतिक्रिया
1 Dec 2020 - 5:25 am | राज२००९
पुस्तकाची अनुक्रमणिका इथे देऊ शकाल का? धन्यवाद.
1 Dec 2020 - 5:51 am | मनो
अनुक्रमणिका
1 Dec 2020 - 8:33 pm | राज२००९
पुस्तकाची मागणी नोंदवुन पैसे भरले. अमेरिकेत शिपिंग्चा वेगळा चार्ज असेल तर प्लीज कळवा. सध्या फक्त $१०.१७ चार्ज झालेले आहेत...
1 Dec 2020 - 10:23 pm | मनो
हो नक्कीच. USPS द्वारे standard cost ने जात असेल तर अजून काही shipping लागणार नाही.
1 Dec 2020 - 8:18 am | सनईचौघडा
अभिनंदन मनो.
1 Dec 2020 - 8:52 am | श्रीगुरुजी
अभिनंदन!
1 Dec 2020 - 9:03 am | प्रचेतस
अभिनंदन मनो.
पुस्तक इंग्रजीत असल्याने जगभर जाईलच यात शंकाच नाही पण मराठीत आणण्याचाही अवश्य प्रयत्न करा.
1 Dec 2020 - 9:08 am | गवि
अभिनंदन. अत्युत्तम..
1 Dec 2020 - 9:34 am | सोत्रि
मनःपुर्वक अभिनंदन!!
- (पुस्तक मिळण्याची इच्छा असलेला) सोकाजी
1 Dec 2020 - 9:55 am | खेडूत
मागणी नोंदवत आहे... मराठीत सुद्धा यायला हवे असे वाटते.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
1 Dec 2020 - 11:50 am | मराठी_माणूस
सहमत. इंग्लीश मधे लिहण्यामागे काही खास विचार आहे का ?
1 Dec 2020 - 10:59 pm | मनो
जगभर पोचावे, मराठीच नाही तर अ-मराठी अश्या पानिपतमधील जाट बांधवाना, भारताबाहेर राहणाऱ्या इतिहास-प्रेमींना वाचता यावे म्हणून सुरुवात इंग्रजीत केली. मराठी आवृत्ती नक्कीच करेन.
25 Dec 2020 - 7:23 pm | खटपट्या
मराठी आव्रुत्ती लवकरच यावी
1 Dec 2020 - 10:06 am | मनो
पुस्तकाचे manuscript काळजीपूर्वक वाचून मिसळपावकर बॅटमॅन यांनी अनेक चांगल्या सूचना केल्या. प्रकाशन आणि छपाई यातील अनेक खाचाखोचा मला अभ्याशेठ यांनी स्वतः खूप कामात आणि गडबडीत असताना देखील समजावून सांगितल्या. त्याबद्दल या दोघांचे आभार!
1 Dec 2020 - 10:33 am | मित्रहो
मनःपूर्वक आभिनंदन
पुस्तकाची प्रत राखून ठेवण्याची नोंदणी पैसे भरुन पूर्ण केली. आता पुस्तक मिळायची वाट बघतोय
1 Dec 2020 - 10:37 am | प्रसाद_१९८२
पुस्तका बद्दल अभिनंदन !
--
पुस्तक नोंदणीसाठी जो दुवा दिलाय त्यावर क्लिक केल्यावर एरर येतोय.
1 Dec 2020 - 10:48 am | मनो
माझ्याकडे आत्ता व्यवस्थित उघडते आहे साईट. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहाल का? कदाचित temporary error असेल. नाहीच जमलं तर panipat.rediscovered@gmail.com या पत्त्यावर तुमचे नाव, पत्ता, मोबाईल देऊन ठेवा.
1 Dec 2020 - 12:11 pm | अनिंद्य
अभिनंदन मनो.
इंग्रजीत असल्याने पुस्तक अधिक वाचकांपर्यंत पोहचेल, हे उत्तमच आहे.
1 Dec 2020 - 12:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त बातमी,
अभिनंदन,
पैजारबुवा,
1 Dec 2020 - 1:24 pm | सौंदाळा
अभिनंदन,
कृपया मराठी अनुवाद करण्याबाबत विचार करा.
1 Dec 2020 - 3:23 pm | केदार-मिसळपाव
नोंदणी केली आहे.
वाट बघतो आहे, तुम्हाला अनेक शुभेच्छा.
1 Dec 2020 - 3:59 pm | कुमार१
पुस्तका बद्दल अभिनंदन !
1 Dec 2020 - 5:29 pm | पुष्करिणी
अभिनंदन आणि शुभेच्छा
ऑनलाइन मिळेल का? किंडल आवृत्ती?
ऑडिओ बुक पण विचार करा. माझ्यासारखे खूप लोक्स प्रवास करताना ऑडिओ बुक ऐकतात.
1 Dec 2020 - 5:29 pm | पुष्करिणी
अभिनंदन आणि शुभेच्छा
ऑनलाइन मिळेल का? किंडल आवृत्ती?
ऑडिओ बुक पण विचार करा. माझ्यासारखे खूप लोक्स प्रवास करताना ऑडिओ बुक ऐकतात.
1 Dec 2020 - 11:02 pm | मनो
पुस्तकाचा एक खास विशेष म्हणजे त्यातील दुर्मिळ अप्रकाशित चित्रे. ऑडिओबुकमध्ये ते करणे शक्य नाही, म्हणून त्याचा विचार सुरुवातीला केला नाही.
1 Dec 2020 - 6:20 pm | pspotdar
गुगल पे चा option नाही दिसला
1 Dec 2020 - 10:18 pm | मनो
मी stripe checkout वापरतो आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तुमच्या फोनवर जर गूगल पे असेल तरच तो option दिसतो. कदाचित त्यांच्या detection मध्ये गडबड झालेली असेल. तुम्ही केली नसेल तर सध्या payment न करता साधी नावनोंदणी करा, मी हा option test करून पाहतो.
29 Dec 2020 - 2:13 pm | pspotdar
पुस्तक मिळाले
1 Dec 2020 - 6:36 pm | दुर्गविहारी
पुस्तकाबध्दल हार्दिक अभिनंदन मित्रा, बाकी पुस्तक मराठीमध्ये अनुवादीत केल्यास आपल्या मातृभाषेत वाचनाचा आनंद घेता येइल.पुस्तकाची काही सँपल पेजेस उपलब्ध केउन दिली तर बरे होईल.पुस्तक नक्कीच बुक करणार आहे.
1 Dec 2020 - 10:13 pm | मनो
माझं दहावीपर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालं आहे, त्यामुळं मराठीतून करण्यास अडचण काहीच नाही. इंग्रजीत प्रथम करण्याचा हेतू असा की हे पुस्तक जगभर पोचावे, भारतीयच नाही तर जे पाश्चात्य संशोधक भारतीय इतिहासावर काम करतात, त्यांना वाचताना काही अडचण येऊ नये. एकाच दिवसात इंग्रजी पुस्तकाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादावरून असं वाटतंय की मराठी आवृत्ती लगेच काढावी लागेल!
1 Dec 2020 - 6:50 pm | चित्रगुप्त
अभिनंदन. महत्वाच्या ऐतिहासिक घटनेवर खास जुन्या चित्रांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश हा विषयच अद्भुत आहे. आपल्याकडे असा प्रयास प्रथमच होत असावा. पुस्तक बघण्याची खूपच उत्सुकता दाटली आहे.
मला पुस्तक नक्कीच हवे आहे. नोंदणी करतो. मात्र सध्या पुढील साताठ महिने भारताबहेर असल्याने आणि घरी कुणी नसल्याने ते कोणत्या पत्त्यावर मागवावे हा प्रश्न आहे. अमेरिकेत मागवता येईल का? कृपया कळवावे. अनेक आभार.
1 Dec 2020 - 10:14 pm | मनो
हो नक्कीच, तुमच्या अमेरिकेतील पाट्यावर पाठवेन
1 Dec 2020 - 10:14 pm | मनो
*पत्त्यावर :)
1 Dec 2020 - 7:02 pm | चित्रगुप्त
आत्ताच अमेरिकेतील पत्ता देऊन नोंदणी केली आहे. आत्ता मला पैसे भरता आले नाहीत. पुढील प्रक्रिया काय आहे ?
1 Dec 2020 - 10:04 pm | मनो
चित्रगुप्तकाका, मी सध्या अमेरिकेतच आहे. पुढची प्रक्रिया साधारण (covid-permitting) अशी ठरवली आहे. २० डिसेंबरला प्रकाशनाचा समारंभ पुण्यात करतो आहे. बहुतेक online livestream करू, त्यामुळे बऱ्याच लोकांना घरबसल्या पाहता येईल. प्रतिसादावरून मला कोणत्या देशात किती प्रती लागतील याचा अंदाज येईल (आणि भरभरून प्रतिसाद आला आहे!), त्यावरून तिथे amazon FBA द्वारे, अथवा स्वतःच कुरिअरने पाठवता येतील. अमेरिकेसाठी मी स्वतःच २४ डिसेंबर तारखेला लागतील तितक्या प्रती घेऊन येणार आहे. त्या amazon FBA द्वारे पाठवण्याचा विचार आहे. ज्यांनी नावनोंदणी केली आहे, पण payment झालेलं नाही, त्यांच्यासाठी एक स्पेशल कुपन कोड पाठवतो, तो वापरून ५०% किमतीत amazon वरून तुमच्या पत्त्यावर पुस्तक डिसेंबरच्या शेवटी येऊ शकेल. तुम्हाला अजून सोपा मार्ग सापडला तर मला नक्की कळवा, मी प्रयत्न करेन.
2 Dec 2020 - 10:27 pm | चित्रगुप्त
@मनो, तुम्ही करणार असलेला अमेरिका- भारत-अमेरिका प्रवास सध्या धोक्याचा ठरू शकतो. हे मी आमचा अनुभव तसेच अलिकडेच एक परिचित फक्त मुंबईहून दिल्लीला विमानाने गेले, त्यातून त्यांना कोविड संसर्ग झाला, यावरून म्हणत आहे. शक्यतो अमेरिकेत राहूनच पुस्तक प्रकाशन करून प्रती इकडे मागवून घेणे सद्यपरिस्थितीत ठीक राहील असे मला वाटते. विमानातील बंदिस्त वातावरणात एवढे तास बसणे धोक्याचेच आहे.
3 Dec 2020 - 8:43 am | मनो
काका, तुमची सूचना अगदी योग्य आहे, पण मला एका जमीन व्यवहारासाठी जाणे भाग आहे. इतके दिवस लांबणीवर टाकला होते, पण २०२० संपण्याच्या आधी करावे लागेल.
13 Dec 2020 - 7:14 pm | शशिकांत ओक
मनो,
काळ बदलला आता हातघाईच्या लढाया नाहीत पण कागदी घोडे नाचवायला पुण्यापर्यंत मुलुख गिरी करणे भाग आहे असे दिसते!
1 Dec 2020 - 10:06 pm | तुषार काळभोर
अतिशय अभिमानास्पद अन कौतुकास्पद..!
मराठी पुस्तकाची जी इच्छा व्यक्त केली जात आहे त्याला जोरदार अनुमोदन.
1 Dec 2020 - 11:27 pm | अर्धवटराव
पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय असेलच यात शंका नाहि. शिवाय अनेक 'कोकोनटां'साठी 'भारत एक खोज'
बुक करतो लवकरच.
3 Dec 2020 - 9:04 am | टर्मीनेटर
अभिनंदन आणि शुभेच्छा!
👍
8 Dec 2020 - 11:54 am | मनो
उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. प्रकाशन समारंभ youtube वर live असेल, त्याचे आमंत्रण ४-५ दिवस आधी जरूर टाकेन.
9 Dec 2020 - 2:49 am | मनो
**(UPDATE 08 December 2020)**
५०% सवलत (रु. ७५०/-) ही फक्त १० डिसेंबर २०२० मध्यरात्रीपर्यंतच उपलग्ध आहे. ११ डिसेंबरनंतर पुस्तकाची किंमत रु. १५०० असेल. अर्थात, amazon, पुस्तकाची दुकाने आणि इतर ठिकाणी अजून काही सवलत नंतरही मिळू शकेल, पण ती एवढी कमी निश्चितच नसेल. प्रकाशनपूर्व किंमत रु. ७५०/- ही फक्त १० तारखेपर्यन्त ज्यांनी नाव-नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठीच असेल. त्यामुळे आजच जरूर तुमचे नाव नोंदवून ठेवा. नोंदणीची वेबसाइट - https://panipat-signup.web.app
9 Dec 2020 - 11:03 am | सुक्या
नोंदणी केली आहे.
10 Dec 2020 - 7:38 pm | रुपी
मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
नाव नोंदणी केली आहे. काही email येणे अपेक्षित होते का?
10 Dec 2020 - 9:04 pm | मनो
धन्यवाद! ई-मेल पाठवतो. मी स्वतःच स्क्रिप्ट चालवले की मग नंतर ई-मेल जाते. तुम्ही अमेरिकेत असल्याने amazon वर डिस्काउंट कोड देईन, तिथून तुमच्याकडे पुस्तक येऊ शकते.
10 Dec 2020 - 10:06 pm | जानु
मी नोंदणी केली आहे. परंतु आता रक्कम द्यायची असेल तर काय करता येईल?
11 Dec 2020 - 4:23 am | मनो
जिथे नोंदणी केली तिथेच (https://panipat-signup.web.app/) पुन्हा एकदा जाऊन या वेळी pay now बटन वापरा. फॉर्म मध्ये कंपलसरी असल्यानं माहिती पुन्हा टाकावी लागेल, पण दोन कॉपी होणार नाहीत. मागच्याच ऑर्डर मध्ये पेमेंट झालं अशी नोंद होईल.
11 Dec 2020 - 5:17 am | बांवरे
मनो, मनःपूर्वक अभिनंदन. पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे.
मी नोंदणी केली आहे. अमेरिकेत पुस्तक पाठवायला जमले तर खूपच बरे होईल.
11 Dec 2020 - 10:45 am | मनो
हो अमेरिकेत नक्की पाठवू शकेन, करण मी स्वतः परत अमेरिकेत येणार आहे, त्यावेळी बरोबर आणेन. इथून USPS ने पाठवीन.
22 Dec 2020 - 7:50 pm | मित्रहो
आजच पुस्तक मिळाले. पुस्तक वाचायला सुरवात केली नाही पण पुस्तकाची एकूण रचना, कागदाचा दर्जा, चित्रे अतिशय सुंदर आहे. हे पुस्तक नक्कीच संग्रहणीय असे पुस्तक आहे.
24 Dec 2020 - 1:30 am | मनो
धन्यवाद!
23 Dec 2020 - 5:09 am | कंजूस
खूप कष्ट घेऊन पुस्तक लेखनाबद्दल
मनःपूर्वक अभिनंदन.
24 Dec 2020 - 1:47 am | मनो
ज्यांनी आत्तापर्यंत घेतलेले नाही, त्यांच्यासाठी पुस्तक या तीन ठिकाणी मिळू शकेल
https://panipat-signup.web.app/
http://sahyadribooks.com/battle-of-panipat/
https://www.amazon.in/Battle-Panipat-Light-Rediscovered-Paintings/dp/B08...
Amazon USA
https://www.amazon.com/dp/B08PW5W3WZ?ref=myi_title_dp
आजच जरूर मागवा.
24 Dec 2020 - 7:08 am | चित्रगुप्त
पुस्तक अमेरिकेत मागवण्यासाठी मी मागे नोंदणी केली होती, तेंव्हा किंमत १० डॉलर दाखवली जात होती. आता अॅमॅझोनवर बघता १९.९९ दाखवत आहे. काय करावे ? सध्या मी अमेरिकेतच आहे.
25 Dec 2020 - 12:27 am | मनो
काका, मी पाठवतो. आजच अमेरिकेत (सुखरूप) परतलो आहे, तुम्हाला कसं करायचं त्याचा पत्ता लावून व्य नि करतो.
24 Dec 2020 - 2:20 pm | नीलस्वप्निल
आजच पुस्तक मिळाले. पुस्तक खुप सुन्दर आहे... उद्या पासुन ३ दिवस सुट्टी आहे, योगायोगाने... :)
31 Dec 2020 - 1:45 pm | चांदणे संदीप
आज पुस्तक मिळाले. मोठा खजिना हाती लागल्याचा फील येतोय.
सं - दी - प
31 Dec 2020 - 8:37 pm | मनो
याचसाठी केला होता अट्टहास. धन्यवाद!
10 Jan 2021 - 2:02 am | चित्रगुप्त
ग्रंथ मिळाला. कागद, छपाई उत्तम आहे. अजून वाचायला सुरुवात केलेली नाही.
... "सदरहू ग्रंथात पार्श्वभूमिचा रंग पांढर्या ऐवजी साधारणपणे हस्तिदंती म्हणता येईल असा वापरल्याने पुस्तक अधिकच देखणे झालेले आहे" .... हे वाक्य टंकल्यावर मी ग्रंथ पुन्हा एकदा उघडून बघितो, तर तो पांढराच कागद असल्याचे दिसून आले. मी काल रात्री कृत्रीम उजेडात, तर आता नैसर्गिक उजेडात पुस्तक बघितले आहे. 5000 Kelvin चे 'ग्लोब' त्यातल्या त्यात नैसर्गिक प्रकाशासारखा उजेड देतात असे वाचून मी मुद्दाम ते मागवून लावलेले आहेत. आज रात्री पुन्हा वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशात जाऊन बघेन. हे मी मुद्दाम प्रकाशाबद्दल/चित्रांबद्दल संवेदनशील असणारांसाठी लिहित आहे, कारण अश्या ठिकाणी चित्रांचा रंग नेमका दिसणे महत्वाचे असते.
नाना फडणविसांच्या आणि अन्य काही चित्रांबद्दल मी पुन्हा नंतर लिहीन.
चिकाटी, तळमळ, याबरोबरच दीर्घ प्रयत्नांनी आगळे-वेगळे संशोधन करून हा अद्वितीय ग्रंथ रचल्याबद्दल ग्रंथकर्त्याचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
10 Jan 2021 - 7:30 am | तुषार काळभोर
चित्रकाराच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाविषयी वाचायला आवडेल.
10 Jan 2021 - 9:00 am | मनो
धन्यवाद. आपल्यासारख्या चित्रकाराकडून अशी दाद मिळणं ही माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. चित्रे योग्य प्रकारे छापली जावीत यासाठी आम्हाला बरेच कष्ट पडले. अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या जाडीचे कागद मागवून त्यातून निवड केली. छापखान्यातले मॉनिटर आणि माझा मॉनिटर एकसारखी चित्रे दाखवतील याकरता त्यांचे कलर कॅलिब्रेशन केले. त्यानंतरही डमी छापल्यावर त्यातील छापाईनुसार CMYK मधील के म्हणजे काळा रंग चित्राची झळाळी (luminance) कमी करणार नाही अश्या प्रमाणात कमीजास्त केला. या सर्व प्रयत्नात स्पेक्ट्रम ऑफसेटचे विभाकर वैद्य आणि त्यांचे मंगेश उत्तेकर यांनी न कंटाळता सुरेख काम केलं त्यांच्यामुळे आज आपल्याला पुस्तक या स्वरूपात दिसते आहे. वर तु.का. अर्थात पैलवान यांनी म्हणल्याप्रमाणे तुमच्या चित्रांवरील प्रतिक्रियांची जरुर वाट पाहतो आहोत. जमल्यास नवीन धागाच काढुयात.
17 Jan 2021 - 12:01 am | चित्रगुप्त
@मनो, तुमच्या ग्रंथातील चित्रे तुम्हाला कसकशी मिळत गेली, त्यासाठी काय काय प्रयास करावे लागले, कुणाकुणाची मदत झाली, कुठकुठे प्रवास करावा लागला तसेच काही मोठ्या चित्रांचे वर्णन, त्यातील तपशीलांबद्दल माहिती यासाठी एक नवीन धागा काढावा असे सुचवतो.
पुस्तकातील नाना फडणविसांचे चित्रातील चेहरा बराच गडद, काळपट दिसतो आहे, त्यावरून मला वाटले होते की ब्रिटिश चित्रकाराला गौरवर्णीय सोडून इतरांची चित्रे रंगवायची म्हटल्यावर अमूक रंग (उदा बर्न्ट सायना, बर्न्ट अंबर वगैरे) वापरायची सवय असावी, त्यामुळे तसे झाले असावे. जालावर शोध घेता मात्र हेच चित्र कुठे काळपट- तैलरंगात केलेले, तर कुठे हलक्या जलरंगात असल्यासारखे दिसले. त्यामुळे हा फरक फोटोग्राफी, छपाई, शिवाय आपण बघत असलेल्या लॅपटॉप आदिंमुळे पडत असल्याचे लक्षात आले.
वर लिहील्याप्रमाणे ब्रिटिश चित्रकाराबद्दल मला तसे वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वी भारतातील राजे- रजवाडे त्यांच्या राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे रंगवण्यासाठी ब्रिटिश चित्रकारांना पाचारण करीत. ते चित्रकार भरजरी वस्त्रे, दाग-दागिने संगमरवरी खांब, वगैरे उत्तम रितीने रंगवत, मात्र त्यांना भारतियांची अंगकांती, वर्ण हे जमत नसे. त्यामुळे त्या काळी मुंबईला जे.जे मधे शिक्षक असलेले प्राख्यात भारतीय चित्रकार 'त्रिंदाद मास्तर' Antonio Xavier Trindade (1870-1935) यांच्याकडून चेहरे रंगवून घेत. यातून त्रिंदाद यांना भरपूर धनप्राप्ती होत असे, त्यातून त्यांनी माहीमला समुद्रकाठी बंगला बांधला होता. माझ्या सुदैवाने सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी बरेचदा त्या बंगल्यात बरेचदा जाऊन त्रिंदाद यांची उत्तमोत्तम चित्रे बघण्याची संधी मिळाली. (आता तो बंगला आणि ती चित्र तिथे आहेत की नाहीत ठाऊक नाही)
त्रिंदाद मास्त॑रांविषयी वरील माहिती मी बहुधा चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड, यांच्या 'रापण' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. चित्रकला-प्रेमींनी 'रापण' अवश्य वाचावे अशी शिफारस करतो.
त्रिंदाद यांचे माझे अतिशय आवडते चित्रः (दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयातील)
17 Jan 2021 - 12:29 am | मनो
माझा एक अंदाज असा आहे की चित्रातील कपडे पांढरे असल्याने जेंव्हा कॉम्प्युटरवर कलर ऑटो बॅलन्स केले जातायत त्या वेळी compensate केल्याने चेहेरा काळा होतोय. ज्यांना फोटोशॉपची चांगली माहिती आहे त्यांना विचारून पाहतो.
11 Jan 2021 - 10:57 am | रुपी
पुस्तक मिळाले. कागद आणि चित्रे खूप दर्जेदार आहेत. पुस्तक वाचायला सुरुवात केली नाही, लवकरच वाचेन. जमल्यास goodreads वर add करा, म्हणजे पुस्तक तिकडून ही वाचकांना माहीत होईल.
11 Jan 2021 - 12:09 pm | मुक्त विहारि
एक उत्तम विषय परत मांडलात.
पुस्तक, मराठीत आले की नक्कीच वाचणार.
पानिपत हा अभ्यासाचा विषय आहे. पानीपतामुळे 3 गोष्टी शिकायला मिळाल्या....
1. बाजारबुणगे जवळ बाळगू नयेत.
2. अवघड काम असेल तर, बायकामुले घरीच ठेवावीत.
3. रसद भरपूर ठेवावी.
16 Jan 2021 - 5:52 pm | चौथा कोनाडा
+१
बॅटल ऑफ पनिपत या इंग्लिश मधील ग्रंथाचा आजच्या दै लोकसत्ता म्हणजे दि. १६ जाने २०२१, शनिवार च्या अ़ंकात "बुकमार्क" या सदरात "‘पानिपता’चे चित्रचरित्र" या मथळ्याखाली ले. निखिल बेल्लारीकर यांचा रसग्रहणात्मक लेख प्रकशित झालेला आहे.
https://epaper.loksatta.com/2960733/loksatta-pune/16-01-2021#clip/577538...
https://www.loksatta.com/athour-mapia-news/battle-of-panipat-in-light-of...
16 Jan 2021 - 5:57 pm | चौथा कोनाडा
नक्की वाचा. वाचायला विसरू नकात.
16 Jan 2021 - 6:42 pm | जानु
कालच पुस्तक आले. प्रथम दर्शनी आवडले. चित्रे आणि रेखाटने सुंदर आहेत. पेपर सुंदर आणि ग्लॉसी आहे. बाकी वाचल्यावर मत सांगतो.