डिजीटल डिजीटल

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
15 Sep 2018 - 7:31 am

जी माणसे कुठल्याच
डिजीटल प्रोफाईल मध्ये
नसतात,
त्यांचे जगणे कसे असेल,
हा प्रश्न मला
छळू लागला,
आणि मला माझ्या डिजीटल
विचारांची भिती वाटू लागली...

जी माणसे ऑफलाईन असतात
त्यांचे लाईफ कसे असेल
या प्रश्नाने मला परेशान केले
आणि मला माझ्या
डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली...

मग, या डिजीटल तुरुंगातून
सुटका होण्याची वाट पाहताना
मी विंडोजमध्ये डोकावून पाहते...
तर,
खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून
डिजीटल तुरुंगात येणारे
लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला
वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत
24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात...

मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून
हादरून जाते,
आणि परत विंडोजमधून आत येऊन
माझ्या डिजीटल प्रोफाईलमध्ये
सुखीआनंदीसुंदर होऊन
खऱ्या जगाचा डिजीटल विचार करू लागते...

-शिवकन्या

अदभूतअविश्वसनीयइशाराकविता माझीकालगंगामांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकवितामुक्तकसमाजजीवनमानतंत्र

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

15 Sep 2018 - 12:58 pm | अभ्या..

ओह्हो. मस्तच
.
डिजीटलभ्या..

शिव कन्या's picture

21 Sep 2018 - 10:05 am | शिव कन्या

अभ्याभौ धन्यवाद.

श्वेता२४'s picture

15 Sep 2018 - 1:00 pm | श्वेता२४

खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून
डिजीटल तुरुंगात येणारे
लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला
वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत
24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात...

एक नं

जव्हेरगंज's picture

15 Sep 2018 - 3:06 pm | जव्हेरगंज

मस्त!!

खिलजि's picture

15 Sep 2018 - 5:47 pm | खिलजि

वाईट आहे , हा नैसर्गिकपणा वाईट आहे

या डिजिटल युगात , सर्वजण घाईत आहे

पत्र वाचायला नि बोलायला वेळ कुठे ?

हाय नि बाय या दोन शब्दांनाच लाईक आहे

डिजिटल युगात माणूस नाती शोधत शोधत , मातीपर्यंत आला

तरीदेखील डिजिटलपणा सोडून , नॅचरल नाही झाला

सातासमुद्रापारचा गोळा , माय डोळे भरुनी पाहते

अश्रुंचे बांध सोडिता , बॅटरी डाऊन होते

डिजिटल मित्रा, सारेच डिजिटल , नॅचरल काहीही नाही

मरणासन्न झाला तरीही " नैसर्गिक " कळत नाही

सिद्धेश्वर विलास पाटणकर

यशोधरा's picture

15 Sep 2018 - 6:35 pm | यशोधरा

कविता आवडली.

दुर्गविहारी's picture

16 Sep 2018 - 9:53 pm | दुर्गविहारी

खूपच छान ! पटण्यासारखी कविता आहे.

शिव कन्या's picture

21 Sep 2018 - 10:06 am | शिव कन्या

सर्व जाणकार वाचकांचे मन:पूर्वक आभार.

नाखु's picture

23 Sep 2018 - 5:48 pm | नाखु

ढकलपत्र ढकलणार्यांना, तसेच ढकला ढकलीत कुठलीही चालढकल न करता आभासी जगात रमणार्या अभ्यासूंना समर्पित....
अशी अर्पणपत्रिका हवी.

जमिनीवरील नाखु

तृप्ति २३'s picture

29 Sep 2018 - 4:59 pm | तृप्ति २३

Very nice kavita. I like it very much. Also you can watch my Marathi Kavita Video from this link :-
https://www.youtube.com/channel/UC5AsDuTsDM--VKz0EkMB8ZA