सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक
पृथ्वी गोल आहे हे विज्ञानानी सांगितलेल सत्य आपण बहुसंख्य भारतीय लोक बर्यापैकी सहजतेन स्विकारतो नाही ? पृथ्वी गोल आहे हे सत्यच आहे पण युरोपियन आणि ख्रिश्चन लोकांना हे सत्य स्विकारण एककाळी कठीण गेल हे ठिक पण आजही आमेरीकेत फ्लॅट अर्थ सोसायटी आहे ज्यांच्या मतानुसार पृथ्वी सपाटच आहे. हा विनोद नाही आजच्या काळात अत्यल्प असेल पण एका अत्याधुनिक राष्ट्रातलेही काही नागरीक का होईनात वस्तुस्थितीस नाकारतात.