गणपतीची आरती
नमस्कार मंडळी-
सध्या गणेशउत्सव सुरू आहे व त्याअनुषंगाने घरी गणपतीची आरती म्हटल्या जाते. आमच्याकडे ह्या आरतीमधे एक कडवे जास्त म्हटल्या जाते. मी हे कडवे फक्त विदर्भात किंवा तिकडच्या भागातुन स्थलांतरीत झालेल्या कुटुंबातच ऐकले आहे. ते कडवे असे आहे:
चरणीच्या घाग-या रूणझूण वाजती। तेणे नादे देवा वाद्ये गर्जती ॥
ताता ठुमकत ठुमकत नाचे गणपती। ईश्वर पार्वती कौतुक पाहती ॥ जय.॥३॥
लंबोदर पीतांबर फणीवरबंधना। ह्या कडव्या आधी हे म्हटल्या जाते. जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी ही विनंती.
कळावे,
आकाश