मुलांनो आज अतिशय रोचक अशी गम्मत पाहूयात. हि गम्मत आहे १९८४ पासून निवडणुकीतल्या काळात रुपयाच्या डॉलर च्या तुलनेत झालेल्या घसरणीची. खालील काही आकृत्या पहा बरे...तर या आकृत्यांवरून खालील निष्कर्ष निघतात.
१. ऑक्टोबर २०१२ ते जुलै २०१३ या काळात डॉलर च्या तुलनेत रुपया २०% घसरला.
२. जानेवारी २००८ ते जुलै २००९ या काळात डॉलर च्या तुलनेत रुपया २५ % घसरला.
३. जुलै १९९८ ते जानेवारी २००० या काळात डॉलर च्या तुलनेत रुपया १४% घसरला.
४. जुलै १९९७ ते जानेवारी १९९८ या काळात डॉलर च्या तुलनेत रुपया १३ % घसरला.
५. जुलै १९९५ ते जानेवारी १९९६ या काळात डॉलर च्या तुलनेत रुपया १९ % घसरला.
६. जुलै १९९० ते जानेवारी १९९१ या काळात डॉलर च्या तुलनेत रुपया २२ % घसरला.
७. जुलै १९८८ ते जुलै १८८९ या काळात डॉलर च्या तुलनेत रुपया २४% घसरला.
८. जुलै १९८३ ते जुलै १९८४ या काळात डॉलर च्या तुलनेत रुपया २१% घसरला.
आता आपण पाकिस्तानी सार्वत्रिक निवडणुकांच्या काळातले डॉलर आणि पाकिस्तानी रुपीचे नाते बघुयात. पुन्हा आता खालील काही आकृत्या पहा बरे....
१. जानेवारी २०१२ ते जानेवारी २०१३ या काळात डॉलर च्या तुलनेत पाकी रुपया १९% घसरला.
. जुलै २००७ ते जानेवारी २००८ या काळात डॉलर च्या तुलनेत पाकी रुपया १२% घसरला.
मुलांनो आता खालील आकृती डोळ्यात तेल घालून पहा,
निष्कर्ष धक्कादायक आहे ! जेव्हा भाजप प्रणीत आघाडी NDA सत्तेत होती त्यावेळेस निवडणुकीच्या आधी रुपया डॉलरच्या तुलनेत ११% नि चक्क आणि चक्कच वधारला !!!!
आता असे का झाले याची पुढील पर्यायांमधून निवड करा, वेगळी मते असतील तर प्रतिक्रिया मारा.
१. खरच इंडिया शाईनिंग मारत होती आणि हि भावना पूर्ण देशभरात सळसळत होती.
२. भाजप कडे काँग्रेस पेक्षा कमी काळा पैसा होता आणि म्हणूनच काँग्रेस ला एक्स्चेंज रेट कमी मिळावा हा भाजपचा डाव होता.
३. भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची पूर्ण खात्री होती आणि म्हणून त्यांनी त्यांचा काळा पैसा भारतात आणायची तसदी घेतलीच नाही.
४. भाजपला असल्या मार्गांची त्यावेळी गरजच भासली नाही कारण त्यांच्या केलेल्या कामावर त्यांचा विश्वास होता.
रुपयाच्या घसरणीची अनेक करणे असू शकतात हे उघड आहे. उदाहरणार्थ,
१. राजकीय अस्थिरतेची चाहूल
२. विदेशी गुंतवणूक दारान्मधील अस्वस्थता
३. अमेरिकेन सरकारने नवीन पैसा बाजारात आणल्याने भारतातून काढून घेतलेली गेलेली गुंतवणूक
वगैरे वगैरे ...
पण मुळात भारतातील भ्रष्ट नेत्याला काळा पैसा आणि त्यापासून निवडणुकीच्या काळात असे गैरफायदे कसे मिळू शकतात ते बघू.
१. डॉलर आधी ४० रु होता तो आता ८० झालाय असे गृहीत धरू.
२. नेता त्याच्या स्विस बँकेतून एका 'क्ष' उद्योगपतीच्या स्विस बँक खात्यात एक कोटी डॉलर पाठवतो.
३. आता 'क्ष' त्याच्या भारतातल्या माणसांकरवी एक कोटी डॉलर च्या सामायिक रक्कम रुपयात नेत्याला भारतात देतो. हि रक्कम पाच महिन्यात दुप्पट झाली आहे हे लक्षात घ्या (४० वरून ८० चे गणित).
४. नेता हीच रक्कम निवडणुकीत वापरतो.
५. रिझर्व बँकेला कायदेशीर किंवा बेकायदेशीर अशा कोणत्याही मार्गाने डॉलर भारतात आला आहे हे कळतच नाही आणि त्याच मुळे exchange रेट वर या हवाला व्यवहाराचा कोणताही प्रभाव पडत नाही.
६. रिझर्व बँक किंवा निवडणूक आयोग यांच्या गणितातच हा पैसा बसत नसल्याने तो गणला हि जात नाही. सर्व पैसा एक कवडीही भारताबाहेर न जाता भारतातच निवडणुकीसाठी किंवा लाच देण्यासाठी खर्च होतो.
तर असे हे सगळे हवाल्याचे तर्कट आहे. यात तुम्हाला तथ्य वाटते का? का काही वेगळी मते आहेत?
*मूळ लेख : http://www.newslaundry.com/2013/08/hawala-logic/
**लेखकाची रीतसर परवानगी घेतलेली आहे.
***All data is correct and sourced from http://www.tradingeconomics.com/
****Research borne out of a tea-time conversation of the writer with a cynical scientist who attributed the current exchange rate to the homecoming of black money for the 2014 elections.
The author can be contacted at anand.icgeb@gmail.com
प्रतिक्रिया
26 Aug 2013 - 6:26 pm | मुक्त विहारि
असेही असेल....
नेरे महान भारत में कुछ भी हो सकता है....
26 Aug 2013 - 11:14 pm | पैसा
काहीही शक्य आहे!
27 Aug 2013 - 1:16 pm | इष्टुर फाकडा
मिपावरच्या अर्थतज्ञांनो गोंधळाला या ssss :)
शिवाय थत्ते काकांनाही सस्नेह आमंत्रण आहेच !
27 Aug 2013 - 1:29 pm | सुनील
सदर आलेखांची (आणि त्याच्या निष्कर्षांची) यथास्थित चीरफाड मिपावर इथे अगोदरच झाली आहे. तेव्हा पुन्हा ह्या गोंधळाचे प्रयोजन समजले नाही!
27 Aug 2013 - 1:39 pm | इष्टुर फाकडा
सुनील राव त्या लिंका याच लेखावरून घेण्यात आल्या आहेत. हा लेख आधी टाकला होता इथे पण त्यावर आलेखांची गोची झाल्यामुळे काल पुन्हा सुधारून टाकला आहे. असो, उहापोह होणे महत्वाचे आहे. कोठेही झाला तरी :) तो आधीच झाला आहे याची कल्पना न्हवती.
27 Aug 2013 - 1:26 pm | गवि
मी अर्थतज्ञ नसूनही आलो.
आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार रुपया ६६ पर्यंत खाली आला आहे आजच.