अनुभव

साद

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
1 May 2017 - 9:11 am

माझ्या आजोबांना एक सवय होती, ते कुठल्याही लहान मुलाला 'देवा' अशी हाक मारायचे. खूप गम्मत वाटायची त्या गोष्टीची. त्यांची ती हाक ऐकण्यासाठी म्हणून मग मी मुद्दाम लपून बसायचो कुठेतरी. घराच्या एखाद्या अनोळखी कोपऱ्यात दडून त्यांची हाक ऐकण्यामध्ये एक अपूर्व असा आनंद होता. या म्हाताऱ्या लोकांच्या आवाजात काय जादू असते कळंत नाही. सतत मुरत असलेल्या मुरंब्याची गोडी असते त्यांच्या स्वरात. त्यांच्या स्वरांची जादू असेल किंवा त्या शब्दाची असेल पण कसलीतरी भूल पडत होती त्या वेळी.

मुक्तकप्रकटनविचारअनुभव

गती

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
22 Apr 2017 - 9:46 am

अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते.
काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही.

समाजजीवनमानतंत्रशिक्षणप्रकटनअनुभवमाहितीप्रतिभा

माझे बँकानुभव

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
11 Apr 2017 - 8:57 pm

माझी बँक माझे अनुभव

आज बँक ही गोष्ट खरं तर या देशात सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी बनलेली आहे. अगदी करोडपती पासून रोडपतीपर्यंत प्रत्येकाचे बँकेत खाते असतेच. बँकेतले व्यवहार टाळण्याकडे कल असणारा आणि रोखीचा आग्रह धरणाराही पूर्णपणे बँक व्यवस्थेपासून अलिप्त राहू शकत नाही. उलट आमचे कोणत्याही बँकेत खाते नाही असे म्हणणार्‍या मनुष्याचा सत्कार करावा इतकी ती विशेष बाब आहे.

असो.

मांडणीअनुभव

गजावरील राणी

हृषिकेश पांडकर's picture
हृषिकेश पांडकर in जनातलं, मनातलं
11 Apr 2017 - 1:35 pm

परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले.

रेखाटनअनुभवमत

हागणदारीमुक्तीचा तमाशा

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in जनातलं, मनातलं
11 Apr 2017 - 1:17 pm

कथा आणि व्यथा
*****************
हागणदारीमुक्तीचा तमाशा
*******
पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती
समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून...
आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू...

संस्कृतीकथाप्रतिसादअनुभव

स्वारस्याची अभिव्यक्ती

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
11 Apr 2017 - 8:16 am

वामन आणि मी, आम्ही दोघेही बसमध्ये बसून तासभर कसा काढावा ह्याचा विचार करत असता, ही चर्चा सुरू झाली. आणि मग उत्तरोत्तर रंगतच गेली. तिचाच हा वृत्तांत. हा संवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्यक्षात असाच घडलेला आहे.

समाजजीवनमानतंत्रप्रकटनअनुभवविरंगुळा

जिममधल्या गमती, किस्से

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
9 Apr 2017 - 11:13 pm

जिम म्हटलं की तिथे गेलं, व्यायाम केला, परत आलं असं सर्वसाधारणपणे होतं. पण म्हणजे; प्रत्येकाचं नाही. किंवा अगदी प्रयत्न केला तरी तिथे काही किस्से असे घडतात की ते कायम लक्षात राहतात. जेंव्हापासून व्यायाम करायला, किंबहुना जिमला जायला सुरुवात केली तेंव्हापासून आजवर घडलेले निवडक काही किस्से सांगावेसे वाटतात. तसं व्यायामाबद्दल बोलायला #मिपाफिटनेस धागा आहेच; इथे जरा अवांतर.

आरोग्यप्रकटनअनुभवविरंगुळा

संध्याकाळचा एक पर्पल-प्रसन्न संवाद

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 Apr 2017 - 8:59 am

आटपाट परगावात आटपाट काम निघाले आणि अस्मादीकांनी एजंट महोदयांना मोबाईल फिरवला, रेल्वेचे कन्फर्म्ड तिकीट उपलब्ध झाले नाही तेव्हा बसगाडी शिवाय पर्याय नव्हता, शिवनेरी शिवाय इतर बससेवांवर मागची बरीच वर्षे चालवलेला बहीष्कार उठवण्याची वेळ आली होती. एजंट महोदयांनी टूरीस्ट बस सर्वीसचे दोन च्यार ब्र्यांड सांगितले म्हटले आडल्या पांथस्थाला कुठलेही ब्र्यांड चालेल, उन्हाळा आला आहे तेव्हा सावली एसीगार असावी म्हणजे झाले, स्लिपर सीट खालची का वरची अशी चौकशी करून झाली एजंट मोहोदयांकडून प्रिटंऔट मिळण्याच्या आधीच बस सर्वीसने एसेमेस पोचचा निरोप दिला आणि बस सर्वीसचे नाव वाचले 'प्रसन्ना पर्पल'!

बालकथासमाजअनुभव

तुझ्यात जीव रंगला

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in जनातलं, मनातलं
7 Apr 2017 - 8:09 am

कथा आणि व्यथा
***************
कुणात जीव रंगला ?
*****
परवा आमच्या शहरातल्या मोठया कपडयाचा दुकानात जाण्याचा योग आला.असा योग नेहमीचं येतो.
सौ.चा हट्टच होता.मेहूणी आली होती.
आम्ही त्या अलीशान, भव्य दुकानात शिरलो.ते पण कसबसं... यात नेहमीचं प्रचंड गर्दी असते. दुकानातल्या गर्दीला एक प्रकारची शिस्त असते.या दुकानात तसं काही नाही नसतं.तो एक बाजारचं असतो. नुसता गर्दा... कसं उभा राहयचं .
लेडीज विभात गेलोत. त्यात पुन्हा वयानुसार, फॅशननुसार विभाग ...

संस्कृतीकथाविचारअनुभव

खरा भक्त आणि भोंदूबाबा

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in जनातलं, मनातलं
1 Apr 2017 - 11:42 am

कथा आणि व्यथा
***************
भक्ती
त्या दिवशी मी निवांत चहाच्या टपरीवर बसलो होतो. कामचं नव्हतं काही. टाईम पास चाल्ला होता.
टाईम पास करणं ही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही.काय करावं हेचं कळतं नाही मुळी .डोकचं बंद पडतं.
तेवढयात माने गुरूजी आला.माने म्हणजे सज्जन माणूस...खोट बोलायचं ते ठरवून ही तो बोलू शकत नाही. का तर ? त्याला पाप लागेल. देवाधर्माचा लयं नाद. नाद म्हणजे निव्वळ याडचं त्याला. सकाळ संध्याकाळ पूजा करायची. नुसता देवदेव करायचं याड.

कथाशुभेच्छाअनुभव