अनुभव

पैठणी दिवस भाग-१

गुल्लू दादा's picture
गुल्लू दादा in जनातलं, मनातलं
3 Aug 2017 - 7:48 pm

झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

कथासाहित्यिकkathaaप्रवासशिक्षणमौजमजाविचारलेखअनुभवमतआरोग्यविरंगुळा

जनरेशन गॅप आणि निळाई

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
2 Aug 2017 - 12:43 pm

CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही.

वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

कलानृत्यनाट्यइतिहासवाङ्मयकथाबालकथासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनआस्वादलेखअनुभवमदतविरंगुळा

या खलनायकांच करायचं काय ?

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जनातलं, मनातलं
23 Jul 2017 - 8:00 am

कथा आणि व्यथा
या खलनांयकांच करायचं काय ?
♻♻♻♻♻♻♻♻♻
आज सकाळची गोष्ट.रस्त्यानं जात असताना.एका काॅर्नरवर एक स्कूल बस थांबली.तो त्यांचा थांबा असावा.तिथं अनेक मुलं थांबली होती.त्या सोबत काहीच्या आया ही होत्या. पाॅश ड्रेस,शूज,टाय.दप्फतर पाठीवर ....आता सरकारानं किती ही दप्फतराच्या ओझ्याचं टेन्शान घेऊ दया .पालक आणि त्यंचे टिचर..हे मात्र गंभीर होत नाहीत .ते होणार पण नाहीत .दप्फतरा विषय फक्त मुलांशी संबधीत राहिलेला नाही .तो पालकांच्या आणि शाळांच्या प्रिस्टेजचा प्रश्न आहे. असो.त्य सोबत पुन्हा टिपिन बॅग ....त्या बाॅटल....

कथाअनुभव

नाच्या बेडुक

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in जनातलं, मनातलं
22 Jul 2017 - 1:01 pm

नाच्या बेडका विषयी दोन तीन वर्षापुर्वी वाचले होते. परवा आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट परीसरात हा बेडुक प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. यशदिप आणि जेवण आटोपुन पसायदाना विषयी एक ऑडीयो ऐकत झोप येण्याची वाट बघत होते. कॅम्पिगला आलेले लोक देखील कॅम्पफायर भोवती गराडा करुन गप्पा टप्पा मध्ये मग्न होते. आमच्या किचन शेड वर नळीचा पत्रा आहे. अचानकच पावसाची एखादी सर यायची आणि आमच्या डोक्यावर (पत्र्यावर) ताशा वाजवुन जायची. असा हा ताशाचा आवाज थोडा कमी झाला की मग मात्र एक विशिष्ट आवाज दुरवरुन कानावर येत होता. चालबध्द, लयबध्द उच्च स्वरात म्हणजे अगदी खर्जातला वाटावा असा हा आवाज लक्ष वेधुन घेत होता.

जीवनमानअनुभव

ठिपक्यांची मनोली (मुनिया) आणि माळमुनिया

सानझरी's picture
सानझरी in जनातलं, मनातलं
22 Jul 2017 - 12:11 pm
छायाचित्रणअनुभव

आमचं पानीपत- द बिगीनिंग.

भीमराव's picture
भीमराव in जनातलं, मनातलं
21 Jul 2017 - 6:50 pm

आमच्या गोष्टीची सुरुवात होते ती एका चकाचक मल्टीन्याशनल कंपनी पासुन,
अँपरेंटीस अँक्ट च्या कृपेने आमचा येथे प्रवेश झाला हे सुरुवातीलाच सांगुन टाकलेलं बरं,
आमचं आव्या मी अन तात्या या सर्वांच्या एका असामान्य संघर्षाची ही कथा, कंपनी मधेच आमची ओळख झालेली, तात्या व मी एकाच डिपार्टमेंट साठी सिलेक्ट झालो होतो, तर आव्याची तात्यासोबत कँटीन मधे ओळख झाली होती,
आमचं आव्या सांगलीच्या कुठल्याशा कॉलेज मधुन यांत्रिक अभियंता झालेलं, मी सोलापुरातुन विद्युत अभियांत्रीकी शिकुन आलेलो, आणि आमच्यामधले सर्वात अँक्टीव, मोस्ट हँडसम असे तात्याबा पुण्यात शिकलेले होते,

संस्कृतीजीवनमानप्रकटनअनुभव

लोकल मधले लोकल्स.

रघुनाथ.केरकर's picture
रघुनाथ.केरकर in जनातलं, मनातलं
20 Jul 2017 - 3:05 pm

असाच एक कुठलासा सोमवार होता, संध्याकाळचे ६.३० होउन गेले होते, मी पावसाचं कारण सांगुन ऑफ़ीस मधुन मोठ्या उत्साहात लवकर पळालो होतो. पण स्टेशन वर येताच पावसानी त्यावर पाणी फ़िरवलं होतं. घाटकोपर स्टेशन च्या १ नंबर फ़लाटावर प्रवांशाचे उधाण आले होते. पहील्या प्रयत्नात गाडी मिळेल ह्याची शक्यताच नव्हती. किमान ३ -४ गाड्या सोडाव्या लागणार होत्या. ते कमी झाले म्हणुन की काय वरुन वरुण राजा बरसत होता. का कुणास ठावुक पण असे वाटतं होत की सगळे डाउन वाले प्रवासी फ़क्त स्लो लाइन वरुनच प्रवास करु इच्छीत होते.

हे ठिकाणजीवनमानमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभव

गटारीगाथा

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
17 Jul 2017 - 8:26 pm

२०११ साली लिहिलेली हा लेख येणाऱ्या गटारीच्या स्वागतासाठी पुन: पोस्ट करीत आहे.

विनोदलेखअनुभवविरंगुळा

रूम-मेट्स

मिडास's picture
मिडास in जनातलं, मनातलं
14 Jul 2017 - 2:53 pm

रूमचं दार उघडून अनघा बाहेर आली तर तिला निनाद सोफ्यावर मेल चेक करताना दिसला.
“गुड मोर्निंग.” अनघा त्याच्याकडे हसत बोलली.
“वेरी गुड मोर्निंग princess” तीला एक नाटकी सलाम ठोकत निनाद ने प्रत्युत्तर दिले.
“कधी आलास?” आपले मोकळे केस बांधत अनघाने विचारलं.
“आत्ता just आलो. तू ये फ्रेश होऊन. मी चहा बनवतो तोपर्यंत.”
“ओके बॉस” म्हणत अनघा फ्रेश व्हायला गेली. आंघोळ करून ती बाहेर आली तोपर्यंत निनाद साहेब चहाचे कप टी-पॉय वर मांडून सोफ्यावर पाय पसरून आडवे झाले होते.
खुर्चीवर बसत तिने चहाचा घोट घेतला.
“ह्म्म्म, मस्तं झालाय चहा” ती समाधानाने उद्गारली.

मुक्तकसमाजkathaaविचारलेखअनुभवविरंगुळा