लेख

टेलिस्कोपने धुमकेतू बघण्याचा रोमांचक अनुभव!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
24 Jan 2023 - 4:52 pm

✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव
✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो
✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक
✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे
✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल

तंत्रभूगोललेखअनुभव

आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
23 Jan 2023 - 10:50 pm

मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे.
समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे.
तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?
— सध्याचे आपले राहते घर आणि त्याबद्दलची आसक्ती, मोह, सवय (तसेच ते सोडण्यातून कदाचित होणारा पश्चात्ताप, असुरक्षिततेची भावना वगैरे)

संस्कृतीजीवनमानप्रकटनलेखअनुभव

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Jan 2023 - 12:03 pm

✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात!
✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड
✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर!
✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन)
✪ सायकलिंगचे मानसिक पैलू
✪ भाषेचा अडथळा? हो आणि नाही.
✪ कल्याण कर्नाटक प्रदेश
✪ ५ दिवसांमध्ये ४३८ किमी पूर्ण

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना

समाजजीवनमानलेखअनुभव

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Jan 2023 - 6:38 pm
समाजजीवनमानलेखअनुभव

पुन्हा एकदा पहाट झाली

सागरसाथी's picture
सागरसाथी in जनातलं, मनातलं
17 Jan 2023 - 8:42 am

गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते.
गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते.
आज सकाळी त्याच्या हाकेला दूरवरुन
उत्तर आले, आणि थोड्याच वेळात आसमंत कावळ्यांच्या कर्कश्य गाण्यांनी गजबजून गेले.

सगळं काही संपून गेल्यावर
कोणी पुन्हा पुन्हा साद घालतो
तेव्हा मनात येतं
याला काही अर्थ नाही.

वाङ्मयप्रकटनलेख

पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
9 Jan 2023 - 6:27 pm

मागच्या वर्षी वाचनालयात पुस्तक शोधत असताना माझ्या हाती किशोर शांताबाईं काळे यांचं कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक लागलं. पुस्तकाच्या मलपृष्टावरील ओळी वाचल्यानंतर दुःख झालं आणि किशोर काळे व त्यांच्या आईबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याच दिवशी हे पुस्तक मी घरी नेलं आणि एका बैठकीत मी ते वाचून काढलं होत.. काही दिवसांपूर्वी मी ते दुसऱ्यांदा वाचलं आणि त्याबद्दल लिहण्याचा मोह आवरला नाही…

वाङ्मयलेखमाहिती

चोरी

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
4 Jan 2023 - 5:56 pm

छोटा कृष्णा मित्रांसोबत  वाड्याच्या  अंगणात  खेळण्यात  गुंग  होता.      "कृष्णा  गौरव्वा  आहे  का  रे  घरात ?"  ह्या प्रश्नाने   त्याचे  मन  खेळातून  बाहेर आले,  त्याची  मान  आवाजाच्या  दिशेने  वळली -  सत्तरी  ओलांडून गेलेल्या  आज्जी  काठी जमिनीला  टेकवून उभ्या  होत्या.  त्याने होकारार्थी  मान  हलवली .  पळत आत जाऊन  वर्दी दिली - "आई  स्वामी  आज्जी  आल्या आहेत. "  गौरव्वा  हातातलं  काम  टाकून  डोक्यावरचा  पदर सावरत  स्वयंपाक  घरातुन बाहेर आली. तोपर्यंत  स्वामीनबाई  सोप्यातल्या आरामखुर्चीत  येऊन विसावल्या  होत्या.  गौरव्वानं   त्यांच्या पायावर डोकं  टेकवलं.

संस्कृतीलेख

मंटी बिंटी आणि घंटी

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
1 Jan 2023 - 2:43 pm

मंटी बिंटी आणि घंटी
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मला प्राणी आवडत नाहीत अन हिने मांजर पाळलं . म्हणजे माझं काय झालं असेल ?...ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांनाच माझं दुःख कळू शकेल .
पापी पेटका सवाल साला ! हुं ! पेट !
एवढी मोठी बाई ! जी नवऱ्याला नाचवू शकते, ट्रेन करू शकते,गोंडा घोळायला लावू शकते, ती उगा एखाद्या प्राण्याच्या मागे का लागावी? तेही मी असताना ! तिला प्राण्यांची फार आवड आहे , फार कळवळा आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. खरं कारण वेगळंच होतं.

हे ठिकाणलेख

शिकार...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जनातलं, मनातलं
29 Dec 2022 - 9:46 pm

मंदिराच्या समोर बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही तिघे मी, दया आणि रवी आकाशाकडे तोंड करून असेच पहुडलो होतो. एकदम निरभ्र आकाश, एक सुध्दा काळा ढग नव्हता. निळीतून काढलेल्या सफेद कपड्यासारखं निळसर पांढरं, कुठे कुठे शेवरीच्या झाडाखाली पडलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, त्यावर अगणित चांदण्याचा अंधुक प्रकाश, या सौंदर्यात भर घालण्यासाठी नुकताच उगवलेला पूर्ण चंद्र. दृष्ट लागावी असं ते दृश्य. क्षणभर वाटलं कुणाची नजर लागू नये म्हणून तरी, एखादा काळाकुट्ट ढग हवा होता,. लहान भावाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून, आई त्याच्या गालावर काजळाचा टिळा लावायची. गोऱ्या गालावर तो टिळा खूपच सुंदर दिसायचा.

कथालेख