आणीबाणी : लुटमारीचे 'उद्योग' !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
25 Jun 2023 - 11:32 pm

त्या भयानक कालावधी मधली ही बाजु फारशी चर्चेमध्ये नसते...

२५ जुन १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात रीतसर आणीबाणी जाहीर केली. जगाच्या इतिहासात आजवर ज्ञात असणाऱ्या चमत्कारिक आणि भयानक पाशवी राजसत्तांपैकी एक स्वतंत्र भारताच्या नशिबी आली हे या देशाचे दुर्दैव. त्या संपुर्ण कालावधीमधली इंदिरा गांधी यांची हुकुमशाही, संजय गांधींची पाशवी अरेरावी आणि पोलिसांच्या क्रौर्याची परिसीमा या विषयी अनेकवेळा अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. त्या भयंकर परिस्थितीमधून गेलेले लोक आजही अनेक किस्से सांगत असतात. सात आठ वर्षांपूर्वी अडवाणी असे म्हणाले होते की १९४७ च्या आधीचे पारतंत्र्य हा ब्रिटिशांचा गुन्हा असेल तर आणीबाणी हा संपूर्ण स्वकीयांनी रचलेला गुन्हा होता. तितकाच भीषण पण आपल्याच लोकांनी केलेला असल्यामुळे त्याची सल अधिक तीव्र.

भलामण करणाऱ्यांनी कितीही तारे तोडले असले तरी संशोधनाच्या तळाशी एकच बाब राहते तो म्हणजे आणीबाणी हा वैयक्तिक स्वार्थासाठी आख्ख्या देशाला वेठीस धरण्याचा अक्षम्य गुन्हा होता. राजकीय हेतुसाठी असणारा सत्तास्वार्थ तर होताच, शिवाय आणिबाणीमधली आर्थिक स्वार्थासाठी केलेल्या पाशवी बळाची उदाहरणे देखील आज लाज वाटावी अशी आहेत. दुर्दैवाने आपले गल्ले भरण्यासाठी केलेल्या आणीबाणीच्या वापरावर फारसे बोलले किंवा लिहिले जात नाही.

इतकी लुटमार की त्याचे पडसाद आंतराष्ट्रीय स्तरावर देखील उमटले. १० नोव्हेंबर १९७६ च्या आपल्या आवृत्तीमध्ये अमेरिकेतल्या The Washington Post या दैनिकाने भारतात सुरु असणाऱ्या लुटमारीविषयी खरमरीत लिहिले आहे. " The public believe a vast swindle is going on. Sanjay ( Gandhi ) calls up secreteries and says give the contract to so and so." म्हणजे "....लोकांना आता कळून चुकलंय की ( शिस्त निर्माण करण्याचा भास निर्माण करत वास्तवात ) आपण ठार गंडवले जातो आहोत. संजय गांधींनी कोणत्याही सचिवाला फोन करायचा आणि ( नियम किंवा विक्री प्रक्रिया धाब्यावर बसवून ) ज्याला कंत्राट द्यायला सांगितले आहे त्याला द्यायचे." यातले भयानक सत्य असे आहे की यातले प्रमुख लाभार्थी एकच कुटुंब होते. इथे अन्य कुणाचाच विचार नव्हता. कुणी अन्य असलेच तर बकरा बनविण्यासाठी किंवा मुखवटा म्हणून समोर धरलेला एखादा चेहरा.

अगदी चिंधी व्यवहारात देखील कसा हात मारला जायचा याचे अनेक दाखले आहेत. उदाहरणार्थ : जानेवारी १९७५ मध्ये भारत सरकारच्या तेल आणि वायु क्षेत्रात काम करणाऱ्या सुप्रसिद्ध ONGC Limited सहा रोड रोलर खरेदी करण्यासाठी एक निविदा काढली. चार कंपन्यांनी निविदा भरलेल्या. यातली एक सरकारी कंपनी होती : द गार्डन रिच वर्कशॉप. ओएनजीसी जशी नवरत्न कंपनी मधली एक आहे तशी ही गार्डन रिच मिनी रत्न कंपनी. उर्वरित तीन खाजगी कंपन्यांपैकी एक कंपनी MHV चे प्रतिनिधित्व करणारी खाजगी कंपनी. हे MHV प्रकरण तर आणखीन भारी आहे !!!

संजय गांधींनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले नाही. ते इंग्लंड मधल्या रोल्स रॉयल्स कंपनीमध्ये शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाले होते. पण भारतात एक वाकयुद्ध त्या काळात रंगले होते. १९५० साली भारतातल्या पहिल्या मंत्रिमंडळातले पहिले अवजड उद्योगमंत्र्यांनी भारतात एक सामान्य लोकांना घेता येईल अशी कार बनवायची योजना आखली. ती आपली मारुती. ( मारुती ही इंदिरा गांधी यांची कल्पना नव्हे.) प्रत्यक्ष बनविण्याची प्रक्रिया अनेक राजकीय उलथापालथीमुळे रखडवली गेली. पुढे सुमारे अठरा वीस वर्षांनी मैसूर राज्य औद्योगिक विकास महामंडळाने आम्ही ही गाडी बनवायला तयार आहोत, आमच्याकडे तंत्रज्ञान तयार आहे, गाडीचे मॉडेल्स तयार आहेत आणि आम्ही गाडी पाच ते सहा हजार रुपये किमतीमध्ये सामान्य लोकांना देऊ शकतो असे सांगत प्रकरण चर्चेमध्ये आणले. राजकीय स्वार्थाच्या कचाट्यात सापडलेल्या या प्रकरणात त्या महामंडळाला नंतर व्यवस्थित डच्चू दिला गेला. कारण एक वाद असा निर्माण केला गेला की टोयोटा, मॉरिस, फॉक्स वॅगन, रेनॉ इत्यादी सारख्या कंपन्यांना भारतात बोलावून त्यांच्याकडून गाड्या बनवून घ्याव्यात. दुसरी बाजू म्हणत होती की तंत्रज्ञान इथेच विकासित करून आपली स्वतःची गाडी बनवली पाहिजे वगैरे. या वादाकडे संजय गांधी "वगैरेंचे" लक्ष होते. संजय गांधी यांनी रोल्स रॉईसला अर्धवट सोडून राम राम ठोकला आणि भारतात आले.

संजय गांधी यांनी मारुती लिमिटेड नामक स्थापन केली ( मारुती उद्योग लिमिटेड नव्हे !). दिल्लीमधल्या एका छोट्या गॅरेजमध्ये एक अजिबात न चालणारी, अतिशय निकृष्ट दर्जा असणारी एक सॅम्पल गाडी कशीबशी बनवली आणि नोव्हेंबर १९७० मध्ये आख्ख्या देशाचा पूर्ण विरोध असताना देखील गाडी बनविण्याचे लायसन्स मिळवले. निव्वळ एक शंभर रुपयाचा समभाग असलेले संजय गांधी मारुती लिमिटेड या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बनले. त्यांच्या हयातीच्या शेवटपर्यंत - १९८०- त्यांना किमान गुणवत्ता असणारी एक ही गाडी बाजारात आणता आली नाही. ही कंपनी अखेर भयंकर तोट्यात गेली आणि शेवटी बंद पडली.

संजय गांधी यांच्या मारुतीने एकही कार बनवली नसली तरी कारनामे अगणित केले. मारुती लिमिटेड बनवायच्या आधी आठच महिने आधी त्यांनी Maruti Technical Services Private Limited ( MTS ) नावाची स्वतःची एक खाजगी कंपनी सुरु केली. या MTS कंपनीमध्ये भांडवल होते रुपये २.१५ लाख. त्यातले रुपये १. १५ लक्ष संजय गांधींचे आणि उर्वरित राजीवजींचे. ही संपूर्ण एका कुटुंबाची मालमत्ता असणारी खाजगी कंपनी होती. .... मारुती लिमिटेड या कंपनीला तांत्रिक सहकार्य करीत असल्याच्या बहाण्याने या MTS किती आणि कसे ओरबाडले आहे याच्या अनेक कहाण्या आहेत. सिनेमा बनवण्याचा विचार मी भविष्यात कधी केला तर मारुती फाईल्स वर नक्की बनवणार. पण तिकडे आत्ता - लेखन शब्द मर्यादे मुळे - जात नाही.

या MTS ने आपले (?) साठ टक्के इतके घसघशीत भांडवल टाकून मारुती लिमिटेड या कंपनी बरोबर आणखी एक कंपनी स्थापन केली : Maruti Heavy Works Ltd नांवाची. आपल्या वर सांगितलेल्या ONGC च्या टेंडरच्या माहितीमधली हीच ती MHW कंपनी. तर त्या टेंडरमध्ये द गार्डन रिच वर्कशॉप या कंपनीचे सगळ्यात कमी कोटेशन असून देखील या MHW कंपनीला पर्चेस ऑर्डर देण्याचा फतवा काढला गेला आणि अखेर गार्डन रिचला कसेबसे बाजुला सारून MHW जिंकली !

प्रत्येक राज्याने भरमसाठ रोड रोलर्सची टेंडरे मग काढली. उत्तरप्रदेशने अगणित, हरयाणाने ५०, पंजाबने ४०, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने शंभर वगैरे. संजय गांधींनी सप्लाय केलेले रोड रोलर्स कधीच कुठेच चालले नाहीत. नगाला नग काहीतरी सप्लाय झालेले असायचे !!! त्या MHW कडे रोड रोलर्स बनवायचे तंत्राज्ञान अजिबात नव्हते. अक्षरशः भंगारमधून जुनी इंजिन्स विकत घेऊन, भंगारातलेच सामान रंगरंगोटी करून ही सामग्री विकली जायची. कुणाचीही एक शब्द उच्चारायची हिंमत नव्हती. शिवाय बाजारात मिळणाऱ्या रोड रोलर्सच्या तब्बल चाळीस टक्के किंमत अधिक असायची. रोड रोलर्सच्या अभूतपूर्व व्यावसायिक यशानंतर MHW ने बस बॉडीज बनवायचे धंदे देखील सुरु केले होते. त्यातली लूटमार आणखी कधीतरी.

आणीबाणीने कमीतकमी वेळात इंग्रजांना सर्व बाबतीत लाजविणारे कृत्य देशात केले आहे. इंग्रजाळलेल्या अडाणी भारतीयांनी ना इंग्रजांची गुलामगिरी अजुनी सोडली ना आणीबाणीच्या गुन्हेगारांची....

मांडणीप्रकटनलेखमत

प्रतिक्रिया

कंजूस's picture

26 Jun 2023 - 4:33 am | कंजूस

ते वाचल्याचं आठवतंय. आणि मग कॉंग्रेसचा धसकाच घेतला. लोकशाही हा शब्द पक्षांपुरता वेगळ्या अर्थाने घ्यायचा. 'एकाच कुटुंबातील लोकांनी चालवलेला पक्ष.'(अमेरिकेतल्या लिबरल, रिपब्लिकनचे माहीत नाही.)

इपित्तर इतिहासकार's picture

26 Jun 2023 - 7:38 am | इपित्तर इतिहासकार

The Washington Post या दैनिकाने भारतात सुरु असणाऱ्या लुटमारीविषयी खरमरीत लिहिले आहे. " The public believe a vast swindle is going on. Sanjay ( Gandhi ) calls up secreteries and says give the contract to so and so."

Washington Post आजकाल खरमरीत भाषेत संपादकीय छापते, भारतात "हिंदू नेशनलिस्ट भाजप सरकार" ने अमुक केले अन् तमुक केले इत्यादी. त्यांची प्रायोरिटी ही सत्य मांडणे नसून त्यांना किंवा त्यांच्या व्यवस्थेला हवे तसे जागतिक चित्र रंगवून अमेरिकन जनतेला पेश करणे होय.

१९

आणीबाणी वेळी वॉशिंग्टन पोस्ट काहीही छापू शकत होते कारण नुकतेच काही वर्षे अगोदर १९७१ चे युद्ध झाले होते. निक्सन अन् सातव्या आरमाराच्या नाकावर टिच्चून झाले होते.....

आणीबाणी नो डाऊट भयानक होती, पण आपण तिच्या नेमक्या भागावर focus करण्याच्या ऐवजी संगोवांगी वर करतो.

मला वाटते आणीबाणीची सगळ्यात मोठी पनौती म्हणजे बेचाळीसावी घटना दुरुस्ती (42 constitutional amendment). मिनी constitution म्हणवली गेलेली ही घटना दुरुस्ती भयानक होती.

बेचाळीसव्या घटना दुरुस्तीबाबत बरेच काही बोलले गेले आहे.
त्यामुळे तसे नवीन काय बोलणार?

सुधीर मुतालीक's picture

26 Jun 2023 - 12:37 pm | सुधीर मुतालीक

वाशिंग्टन पोस्ट मधला बातमी संबधातला हा लेख नाही. तो निव्वळ संदर्भ आहे. शिवाय त्यांच्या बातम्या पूर्वग्रहदूषित आहेत / होत्या असे जरी गृहित धरले तरी मी ONGC चा किस्सा लिहिला आहे त्याच्यावर निक्सनचा काहीच कंट्रोल नव्हता ना हरियाणाने दिलेल्या रोड रोलर्सच्या पर्चेस ऑर्डरवर.  घटना दुरुस्ती वगैरे हिमनगाचे टोक असावे इतक्या भानगडी त्या आणीबाणीमध्ये बाईंनी करून ठेवल्यात. मी दोन्ही उल्लेख केले आहेत : १) साधारण अप्रकाशित बाबींवर हा लेख आहे, ज्याची चर्चा फारशी होत नाही २) किती लिहिणार ? तुम्ही किती वाचणार ? त्यामुळे शब्दमर्यादा आणि अटेन्शन स्पॅनची काळजी घेऊन एखाद दुसराच किस्सा लिहिला आहे.  आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 

मुक्त विहारि's picture

26 Jun 2023 - 9:28 pm | मुक्त विहारि

काय काय करू शकतो?

ह्याचे हे उत्तम उदाहरण

गोवा भारता सोबत स्वतंत्र नाही झाला हे गोमंतकियांचे नशीब आहे. गोव्यांत युरोप सोबत फ्री ट्रेड असल्याने त्या काळी मर्सडिज, बीटल इत्यादी गाड्या सहज उपलब्ध होत्या. साधारण मध्यमवर्गीय सरकारी नोकराला गाडी परवडत असे. आमचे एक नातलग गोव्यांत होते आणि माझ्या आईने सर्वप्रथम त्यांच्या घरी पोर्तुगाल हुन आणलेले वॉशिंग मशीन पहिले आणि ती थक्क झाली होती.

चौकस२१२'s picture

29 Jun 2023 - 8:02 am | चौकस२१२

अजिबात असहमत... फारच उथल विचार, मग तसे तर ब्रिटिश इंडिया च राहिला असता तर अजून प्रगती झाली असती असे म्हणण्यासारखे आहे
शेवटी स्वत्रंतता हि स्वतंत्रता असते ! मग त्यासाठी काही गोष्टीनं मूकावे लागते एवढे आपल्याला लक्षात येत असावे बहुतेक
तुम्ही ज्या खुलया आर्थिक धोरणाचे ( गोव्यात असलेले) समर्थन करीत आहात ते तसे देश्भर असते तर सुरवातीचं काळात जी देशभर काही संस्थांची उभारणी झाली ती झाली नसती .. लांब पल्याचं दृष्टीने सुरवातीला तरी समाजवादी पद्धतीचे वाटणारे धोरण हे देश उभारणीला मदतीचेच झाले ( पुढे त्या नेहरूंविय धोरणाचा अतिरेक झाला हे खरे )
एक गोवेकर म्हणून तुम्हाला गोव्या बद्दल प्रेम असणे साहजिक आहे पण देशच विचार केलं तर वॉशिंग मशीन उपलब्ध होते म्हणून पारतंत्र्य ओके म्हणणे हे फार उथळ झाले

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 10:28 am | इपित्तर इतिहासकार

१०००% सहमत

साहना's picture

29 Jun 2023 - 10:30 am | साहना

> समर्थन करीत आहात ते तसे देश्भर असते तर सुरवातीचं काळात जी देशभर काही संस्थांची उभारणी झाली ती झाली नसती

उलट आहे. आणखीन जास्त आणि दर्जेदार संस्थांची उभारणी झाली असती. आणि नक्की कसल्या संस्था उभ्या राहिल्या ? भारत अजून नायजेरिया चीच बरोबरी करत आहे. उलट प्रचंड प्रमाणांत अधोगती झाली. नशीब १९९० मध्ये इतर देशांनी भारताला मुक्त (थोडीफार) आर्थिक व्यवस्था अंगिकारण्यास भाग पाडले नाहीतर सध्या परिस्थिती पाकिस्तान सारखी असती.

स्वातंत्र्य ह्याचा नक्की अर्थ काय ? सध्या भारतीय लोक अमेरिका आणि ब्रिटिश दूतावासापुढे रंग लावून उभे आहेत ! हा त्यांचा विजय आणि आपल्या तथाकथित स्वातंत्र्याचा पराभव नाही का ?

> वॉशिंग मशीन उपलब्ध होते म्हणून पारतंत्र्य ओके

चांगल्या लिविंग साठी लोक पारतंत्र्य काय देश सोडून जाऊन अत्यंत गर्वाने ब्रिटिश , अमेरिकन, फ्रेंच, ऑस्टेलियन नागरिकत्व घेत आहेत.

उत्पादन क्षेत्राबद्दल बोलूयात कारण त्यात अनुभ व आहे म्हणून
- तुम्ही म्हणताय ते नुसते तयार आयात करणे ( गोव्यात सहज ती उतपादने मिलाळायची तो काळ ) , सगळे ब्रँड परदेशी असते स्थानिक निदान सुरु तरी झाले
- हेवी इंडस्ट्री : आणि डिफेन्स : यावर स्थानिक स्वातंत्र्य असणे हे किती महत्वाचे आहे त्याची कल्पना आहे का?
भेल / हेच एम टी /. इसरो
भारतात ४ ऍडव्हान्स टूल रम ट्रेनिंग सेन्टर निर्माण झाले,
२) चांगलया आणि सहज राहणीमानासाठी परदेशी जाणे आणि त्या त्या देशात स्वतःचे उद्योग विकसित होणे याचाच घोळ घालू नका कृपया ...
आज रहिवाशी देशांत सर्वात जास्त कोळसा आणि खनिजे बनतात पण "value ADDITION " काही नाही

पूर्ण खुली आयात धोरण भारतासारखाय मोठ्या देशाने आणि ते सुधा अगदी सुरवातीला देश नवीन स्वातंत्र्य झालेला असताना हे पायावर धोंडा पडून घेण्यासारखे होते
अर्थात त्याचं उलटे जे केलं गेले त्याचाच अतिरेक झाला हे हि मी मेनी केलं आहे
पण सरसकट गोवा पोर्तुगाल पद्धतीकट राहिले असते तर जास्त बरे हे फार टोकच झाले

"स्वातंत्र्य ह्याचा नक्की अर्थ काय ? सध्या भारतीय लोक अमेरिका आणि ब्रिटिश दूतावासापुढे रंग लावून उभे आहेत ! हा त्यांचा विजय आणि आपल्या तथाकथित स्वातंत्र्याचा पराभव नाही का ? "
उगाच वादासाठी ,,, भारतात भरपूर हुशार लोक आहेत, थोडी गेल्याने बिघडत नाही ..

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 11:42 am | इपित्तर इतिहासकार

भारतात भरपूर हुशार लोक आहेत, थोडी गेल्याने बिघडत नाही ..

अन् जाणारे सगळे हुशार असतातच असेही नाही !

कर्नलतपस्वी's picture

29 Jun 2023 - 12:39 pm | कर्नलतपस्वी

पोटार्थी सारे.

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 12:58 pm | इपित्तर इतिहासकार

कैक भारतीय राज्यांमधून मधून तरुणाई सेंट्रल अमेरिकेत ग्वाटेमाला, होंडुरास, बेलीझ, पनामा वगैरे मध्ये जाऊन तिथून अतिशय खतरनाक अशी जंगले पार करून आधी मेक्सिको आणि मग अमेरिकेत जायसाठी मरमर करतायत....

अहिरावण's picture

29 Jun 2023 - 1:37 pm | अहिरावण

जाऊ द्या हो... उद्या बाजी पलटली तर पहीले हेच वाचवा वाचवा करत येतील....

सध्या ओकत आहेत भारताबद्दल ... ओकु द्या... आईबापसासुसासरेबायको यांच्यावरचा राग निचरा होत असेल होउ द्या

आपण म्हणु.. गेट वेल सुन.. हाय काय नाय काय

अन् जाणारे सगळे हुशार असतातच असेही नाही ! हो मि हि ..
पोटार्थी तर सगळेच , फुरसुंगीघून पुण्यात येणारा काय कि पुण्यातून टोरांटो ला जाणारा काय
मूळ गावाला / देशाला " गुरुदक्षिणा देणे" एवढे केले कि झाले

> तुम्ही म्हणताय ते नुसते तयार आयात करणे ( गोव्यात सहज ती उतपादने मिलाळायची तो काळ ) , सगळे ब्रँड परदेशी असते स्थानिक निदान सुरु तरी झाले
ब्रँड कुठले ह्यावर काहीही फरक पडत नाही. खटारा अँबॅसिडर आणि त्याहून खटारा बजाज स्कुटर (जी काँग्रेसी परिवाराचा आणखीन एक अपराध होता) ह्या निव्वळ पैश्यांचा अपव्यय होता. इतकी वर्षे सरकारी मोनोपॉली द्वारे ह्यांनी भारतीयांचा पैसा चोरून त्यांना निकृष्ट दर्जाची सेवा दिली. आणि आज कुठे आहेत ह्या ? सगळीकडे सुझुकी, होंडा आणि टोयोटा. ज्या स्वस्त आहे, चांगल्या आहेत आणि रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतात. सुझुकी ह्यांचा प्रचंड अपमान काँग्रेस सरकारने केला होता त्यांत मी घुसत नाही.

भारत सरकारचा धोरणांनी भोपाळ गॅस दुर्घटना सारख्या दुर्घटना घडून लोकांचा जीव सुद्धा कसा गेला ह्यावर मी अत्यंत विस्तृत लेखन ह्या आधी इथे केलेले आहे. भारतीय सरकारचे पूर्णतः चुकीचे आर्थिक धोरण ह्यामुळे भारतीय तरुणांना सध्या भिकेचा कटोरा घेऊन कतार, सौदी सारख्या देशांत कामे करावी लागतात.

> भेल / हेच एम टी /. इसरो

भेल/ हेच एम टी ह्यांनी नक्की काय दिवे लावले ? आणि मुक्त अर्थव्यवस्थेत भारतांत कित्येक अश्या कंपन्या निर्माण झाल्या असत्या.
इस्रो त्यातल्या त्यांत थोडीफार कार्यक्षम आहे पण तो झाला अपवाद. त्यांत सुद्धा चुकीचं धोरणाने इसरो जास्त प्रगती करू शकली नाही.

> पूर्ण खुली आयात धोरण भारतासारखाय मोठ्या देशाने आणि ते सुधा अगदी सुरवातीला देश नवीन स्वातंत्र्य झालेला असताना हे पायावर धोंडा पडून घेण्यासारखे होते

आणि ह्या समाजवादी धोरणाने काय आता आम्ही भारतीयांनी गळ्यांत मणिहार घालून घेतला आहे का ? अजून सुद्धा भारतीयांची तुलना फार तर नायजेरिआ शी होऊ शकते.

> पण सरसकट गोवा पोर्तुगाल पद्धतीकट राहिले असते तर जास्त बरे हे फार टोकच झाले

पोर्तुगीज कायदे भारतीय कायद्यापेक्षा कैकपटीने चांगले होते आणि सध्या ते गोव्यांत लागू असल्याने ते आपण पाहू सुद्धा शकतो. बहुतेक गोमंतकीय सार्वजनिक जमीन हि स्थानिक कोमुनिदाद संस्थांच्या मालकीची आहे. हिंदू मंदिरे पूर्णतः खाजगी मालमत्ता आहेत आणि युनिफॉर्म सिविल कोड आहे. पूर्णतः जास्त प्रगत युरोपियन कायद्या मुळे हे शक्य झाले. नाहीतर UCC सारखया विषयावर इतर भारतांत झिम्मा सुरु आहे आणि हिंदू मंदिरे तर कधीच सेकुलर झाली आहेत.

अहिरावण's picture

29 Jun 2023 - 1:36 pm | अहिरावण

>>>पूर्णतः जास्त प्रगत युरोपियन कायद्या मुळे हे शक्य झाले

हा हा हा

प्रचेतस's picture

29 Jun 2023 - 2:05 pm | प्रचेतस

पोर्तुगीज कायदे भारतीय कायद्यापेक्षा कैकपटीने चांगले होते आणि सध्या ते गोव्यांत लागू असल्याने ते आपण पाहू सुद्धा शकतो. बहुतेक गोमंतकीय सार्वजनिक जमीन हि स्थानिक कोमुनिदाद संस्थांच्या मालकीची आहे.

गोवा धर्मन्यायधिकरणावरील प्रियोळकरांचे पुस्तक वाचलेत का?

गोवा धर्मन्यायधिकरणावरील प्रियोळकरांचे पुस्तक वाचलेत का?

जरा तरी उलगडून सांगा हो. थोडे तरी चार शब्द पार्श्वभूमी, की नेमके काय आहे. आता लगेच ते पुस्तक कुठे जाऊन वाचणार या धाग्याचे वाचक..?

प्रचेतस's picture

29 Jun 2023 - 2:30 pm | प्रचेतस

थोडे कष्ट घ्या

येथे पहा

थोडे कष्ट? ३२० पानी पुस्तकाची लिंक देऊन म्हणता?

वरील प्रतिसाद मलिकेशी सुसंगत त्या पुस्तकात काय आहे याबद्दल चार ओळी द्याव्या असा अर्थ होता.

वरील प्रतिसाद मलिकेशी सुसंगत त्या पुस्तकात काय आहे याबद्दल चार ओळी द्याव्या असा अर्थ होता.

+१
बाकीच्या दणकादणकीत सहभागी होण्यात रस नाही. पण पुस्तकाबद्दल उत्सुकता आहे.

हा जगभरातील इन्क्विझिशनचा आणि गोव्यातील इन्क्विझिशनचा इतिहास आहे. यात डॉ. डेलॉन यांना गोव्यात इन्क्विझिशनच्या अधिकाऱ्यांनी कसे खोटेनाटे आरोप ठेऊन अटक केली आणि नंतर त्याचे जे हाल झाले त्याबद्दल लिहिले गेले आहे. डॉ डेलॉनने हे सगळे त्याच्या आत्मवृत्तात लिहून जगासमोर आणल्यावर या भयंकर संस्थेला ओहोटी लागली. भारतात सेंट झेव्हियरने इन्क्विझिशनला आमंत्रण दिले.. एका पत्रात तो काय म्हणतो ते पाहा.. ...अखेरीस मी त्यांना योग्य पद्धतीने बाप्तिस्मा दिला आणि त्यांच्या हातात त्यांच्या नवीन नावाची चिठ्ठी ठेवली. मग त्यांना घरी जाऊन त्यांच्या बायका पोरांना घेऊन येण्यास सांगितले. सगळ्यांना बाटवून झाल्यावर मी त्यांना त्यांची देवळे उद्ध्वस्त करण्याचा हुकूम दिला. ज्या माणसांनी त्यांचे देव प्राचीन काळापासून पुजले त्यांच्याच हातून त्या मूर्तींच्या ठिकऱ्या उडताना पाहून माझ्या मनाला किती हर्ष होत होता याची तुम्हाला कल्पना यायची नाही... - सेंट झेव्हियर एका पत्रात.

आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी हे पुस्तक मराठीत देखील आणले आहे आणि ते येथे उपलब्ध आहे.

माहितीबद्दल धन्यवाद

फक्त वाचलेच नाही तर विस्मृतीत गेलेले ते पुस्तक मीच voice ऑफ इंडिया कडून मिळवून त्याच्या प्रति बनवून विविध लायब्रेरीत वगैरे पाठवले. हे पुस्तक नंतर शेफाली वैद्य आणि इतर सोशल मीडिया वाल्यानी जास्त प्रसिद्ध केले. मूळ प्रत माझ्याकडे अजून आहे.

ज्यांना ठाऊक नाही त्यांच्या साठी : अनंत प्रियोळकर ह्यांनी Goa Inquisition वर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले होते. ह्यांत त्यांनी कॅथॉलिक चर्च आणि पोर्तुगीज सत्ताधार्यांनी जे धार्मिक अत्याचार गोमंतकीय हिंदूंवर केले त्याचा इतिहास अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे.

अर्धवट ज्ञान असलेल्या लोकांसाठी :

Inquisition हा काळ साधारण १५००-१७०० चा.

१९११ मध्ये कॅथॉलिक चर्च च्या जुलुमाला विटून पोर्तुगाल मध्ये क्रांती झाली आणि "फर्स्ट रिपब्लिक" ची निर्मिती झाली. चर्च आणि सरकार वेगळे झाले आणि पोर्तुगीज लोक अत्यंत वेगाने कॅथॉलिक चर्च विरोधी झाले. ह्याच काळांत पोर्तुगीज अभ्यासकांनी मेहनत घेऊन कॅथॉलिक चर्च च्या गुन्ह्याचा इतिहास लिहिला. गोव्यांतील चर्च च्या हडप केलेल्या जमिनी लोकांना परत दिल्या, हिंदू मंदिरे आणि धर्माला सामान अधिकार दिले आणि सर्व नागरिकांना समान अधिकार दिला. युनिफॉर्म सिविल कॉड वगैरे गोष्टी ह्याच कालावधीतल्या. ह्या काळांतील पोर्तुगीज कायदे हे फ्रेंच राज्यक्रांती, युरोपिअन रेनेसाँस इत्यादी गोष्टींनी प्रभावित झाले होते आणि "क्लासिकल लिबरल" पद्धतीचे होते. हा कालावधी १९२६ पर्यंत चालला, त्यानंतर सालाझार ह्यांची हुकूमशाही आली आणि त्यानंतर डाव्या लोकांचे अहिसंक क्रांतीचे सरकार. पण १९११ मध्ये चर्च ची जी हकालपट्टी झाली ती मात्र इतर सर्वानीच कायम ठेवली.

१९११ नंतर चा पोर्तुगीज काळ आणि १९४७ नंतर चे भारत सरकार ह्यांत फक्त स्वातंत्र्य आणि जुलुमाच्या दृष्टीकोणातून पहिले तर भारत सरकार कित्येधिक पटीने जास्त जाचक, अकार्यक्षम आणि लोकांच्या स्वातंत्र्य विरोधी होते ह्यांत शंकाच नाही. १९४७ नंतर गोव्याला स्वतंत्र करण्यात इतका काळ गेला ह्यांतच त्यांची अकार्यक्षमता दिसून येते.

टीप: ह्याचा अर्थ गोमंतकियानी स्वातंत्र्याचा हट्ट धरणे चुकीचा होता असे अजिबात नाही. नैतिक दृष्ट्या गोमंतभूमीचे स्वातंत्र्य त्यांचा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही होते.

टीप : मी गोमंतकीय नाही.

चौकस२१२'s picture

29 Jun 2023 - 3:09 pm | चौकस२१२

भेल/ हेच एम टी ह्यांनी नक्की काय दिवे लावले ?
तुम्हाला उत्पादन क्षेत्रातील काय अनुभव आहे हो? मशीन टूल चे तंत्रन्यान , जड यंत्रसामुग्री
हिंदुस्थान अएरॉनॉटिकस
राष्ट्रीय डिझाईन संस्था
मी हे मान्य केले आहे कि सगळं सरकारी या धोरणाचा अतिरेक झाला / शिक्षण धोरण चुकले, नाही कुठे म्हणतोय.. पण महिंद्रा आणि टाटा पण उभे राहिले पण तुम्हाला जर मुद्डमून टोचणारी टोकाची भाषा वापरून लोकांनां दुःवययचे असेल तर करा तसे ( गोवयाचे नशीब कि महाराष्ट्रात विलीन नाही झाला वैगरे )
पण तुम्ही मूळ प्रश्न कि जो होता इतके खुले आर्थिक धोरण सुरवातीला तरी परवडणार होते का याचे उत्तर देतच नाहीत

जाऊद्या मी हि खुल्या अर्थवयवस्थेचा समर्थक आहे पण तसे समर्थन करताना काही जुनी सरकारी घोरणे सरसकट चुकीची होती हे म्हणणे टोकाचे वाटते

दुसरे असे कि गोव्या सारखाय लहान प्रदेशात जे करणे शकय आहे ते सगळ्या भारतात करणे शक्य होते का?

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 8:19 pm | इपित्तर इतिहासकार

जाऊद्या मी हि खुल्या अर्थवयवस्थेचा समर्थक आहे पण तसे समर्थन करताना काही जुनी सरकारी घोरणे सरसकट चुकीची होती हे म्हणणे टोकाचे वाटते

तुम्ही खुल्या अन् बंदिस्त अश्या दोन्ही नाही तर मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थक आहात अन् ते प्रॅक्टिकल आहे अगदी. पूर्णपणे खुली अर्थव्यवस्था आज अमेरिकेची सुद्धा नाहीये. ती पण मिश्रच आहे, वेलफेअर स्टेट ही सेंट्रल संकल्पना असते कुठल्याही राजकीय विचारात. त्यामुळे अगदी अमेरिका ते चीन कुठलीच अर्थव्यवस्था पूर्णपणे मुक्त अन् पूर्णपणे बंद नाहीच.

नॉर्थ कोरिया हा एकमेव कुप्रसिद्ध अपवाद सोडता पूर्णपणे बंद अर्थव्यवस्था नसेलच जगात, असल्यास कोणीही सांगावी.

सहमत , आत्तापर्यंत पाहिलेली
- पूर्ण खुल्याच्या जवळपास = युनाइटेड स्टेट्स
- मिश्र पण खुल्याच्या जास्त जवळ = सिंगापोर
- मिश्र = ऑस्ट्रेलिया
- मिश्र पण जर थोड्या डावीकडे वळणारी = न्यु झीलंड
- आखाती देश , वर्णन करणे अवघड वाटते ..

ह्या सर्व क्षेत्रांत भारत मागासलेला आहे ! खूपच म्हणजे खूपच मागे आहे. हो कि नाही ?

चौकस२१२'s picture

30 Jun 2023 - 6:19 am | चौकस२१२

कोणत्या? क्षेत्रांत? आणि तुम्ही २०२३ जागतिकर्णमुळे भारतात परदेशी मालकीचे ब्रँड जास्त आहेत याचा आणि मुळात भारतात उत्पादन आणि त्यासाठी लागणाऱ्रे मनुष्य बळ तयार व्हावे यासाठीचे सुरवातीचे प्रयत्न याचे मिश्रण का करताय?
अर्थात आजही भारत बऱ्याच बाबतीत पाश्चिमात्यांबरोबर तुलना करू शकणार नाही खरे पण म्हणून काहीच केले नाही , ब्रिटिश असते तर बरे वैगरे हे काय ?
छोट्या गोव्यात त्याकाळी परदेशी उतपादने सहज मिळत म्हणून पोर्तुगीज कायदे बरे वैगरे काय !

आज चीन +१ यासाठी भारताकडे बघितले जाती त्याचा जास्त फायदा भारताने उठवावा जास्त VALUE ADDITION करावे आणि त्यासाठी सध्याचं सरकारची धोरणे, मध्ये मनमोहन सरकारनी उचललेली पावले आणि काही मूलभूत नेहरू सरकाने केलेले काम या सर्वांचा योग्य असा maaन ठेवायला काय हरकत आहे ?
भारत "मेक इन इंडिया फॉर इंडियन्स अँड मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड" या दोन्ही साठी माझया तरी शुभेच्छा
आज २००+ मी,इलिअन चा इंडोनेशिया स्वतःची गाडी बनवू शकत नाही तिथे भारतात टाटा आणि महिंद्रा बनवत आहेत गोदरेज आहे हे उल्लेखनीय आहे , असे अनेक गोदरेज आणि किर्लोस्कर निर्माण व्हावो हीच इच्छा

इपित्तर इतिहासकार's picture

30 Jun 2023 - 7:24 am | इपित्तर इतिहासकार

ह्या सर्व क्षेत्रांत भारत मागासलेला आहे ! खूपच म्हणजे खूपच मागे आहे. हो कि नाही ?

नाही बुआ मला असे वाटत नाही.

गोवा भारता सोबत स्वतंत्र नाही झाला हे गोमंतकियांचे नशीब आहे.

श्री साहना, तुमचे विचार वेगळे असले तरी हे अती आहे. तुम्ही भारतीयांनी केलेल्या संघर्षाची तुलना मर्सडिज, बीटल,वॉशिंग मशीन यांच्याबरोबर करत आहात.

साहना's picture

28 Jun 2023 - 12:21 pm | साहना

गोवा १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असता तर इतर भारताप्रमाणेच दळिद्री आर्थिक धोरण तसेच इतर कायदे तिथे लागू झाले असते आणि कोंकण प्रांताप्रमाणेच हा प्रदेश दळिद्री राहिला असता. गोवा स्वतंत्र झाला ह्याबद्दल मी दुःख व्यक्त करत नाही, परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य हा गोमंतकीय जनतेचा अधिकार होताच फक्त पोर्तुगीज आर्थिक धोरण (आणि इतर कायदे त्या काही दशकांत) भारतापेक्षा पेक्षा खूप पटीने चांगले असल्याने गोमंतकीय जनतेचा फायदा झाला आणि अजून सुद्धा होत आहे.

साहना's picture

28 Jun 2023 - 12:22 pm | साहना

त्याच प्रमाणे गोमंतक महाराष्ट्रांत विलीन झाला नाही हे सुद्धा गोमंतकियांचे चांगले नशीब आहे.

हे म्हणजे ,मराठीला कोकणी बद्दल आत्मीयता वाटते पण कोकणीच मराठीला झिडकारते असे झाले ! दुर्दैव

भाषा आणि राजकीय सीमा ह्यांचा संबंध नाही. तो संबंध आपण विनाकारण जोडतो.

चौकस२१२'s picture

29 Jun 2023 - 11:30 am | चौकस२१२

मी प्रतीकात्मक स्वररुपात बोलत होतो ..

श्री सावरकर, श्री गांधी, श्री बाबु गेणु इ. यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाला मिळावे म्हणुन स्वदेशीचा नारा दिला, परदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यास प्रोत्साहन दिले, परदेशी कपड्यांची होळी केली. त्यामुळे तुमचा प्रतिसाद योग्य वाटत नाही.

त्या काली परदेशी वस्तूंची होळी का करायची ह्याला एक तात्विक बैठक होती आणि एक पार्श्वभूमी होती. ती हल्लीच्या काली अप्रस्तुत आहे.

त्या काली परदेशी वस्तूंची होळी का करायची ह्याला एक तात्विक बैठक होती आणि एक पार्श्वभूमी होती. ती हल्लीच्या काली अप्रस्तुत आहे.

तो विषय हल्लीचा नसुन १९४७ आणि १९६१ च्या दरम्यानचा आहे.

> श्री सावरकर, श्री गांधी, श्री बाबु गेणु इ. यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाला मिळावे म्हणुन स्वदेशीचा नारा दिला, परदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यास प्रोत्साहन दिले, परदेशी कपड्यांची होळी केली

हे सर्व ह्या १९४७ नंतरच्या कालावधीत घडलं ?

श्री साहना, तुमचा मुळ प्रतिसाद आणि त्याचे समर्थन मला चुकीचे वाटते. पण मी सदर चर्चेतुन तुर्त रजा घेतो.

इपित्तर इतिहासकार's picture

28 Jun 2023 - 1:21 pm | इपित्तर इतिहासकार

पण, आणीबाणी लागलेली होती तेव्हा/ त्यादरम्यान गोवा खास केंद्रशासित प्रदेश होता की ! १९६१ पासून थेट १९८७ पर्यंत.

म्हणजे आणीबाणी संबंधी जे काही निर्णय अन् (साधक बाधक) निती असतील त्या केंद्रशासित प्रदेशाच्या स्टेटस मुळे गोव्यात....

ह्यात गोवा महाराष्ट्र विलानिकरण, स्वातंत्र्याच्या वेळच्या आर्थिक पॉलिसी इत्यादींचा संबंध काय ?

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 10:51 am | इपित्तर इतिहासकार

इथे प्रचंड विषयांतर होते आहे, आणीबाणी संबंधी चर्चा झाली तर उत्तम होईल असे सुचवून खाली बसतो कसा.

साहना's picture

29 Jun 2023 - 1:23 pm | साहना

आणखी काय चर्चा करायची ? आणीबाणीनंतर इंदिरा गांधी ह्यांचा पराभव झाला आणि जे नवीन लोक सत्तेवर आले ते आणखीन महामूर्ख निघाले. एवढे महामूर्ख कि कालचा गोंधळ बरा होता म्हणून लोकांनी इंदिरा गांधी ह्यांना पुन्हा निवडून आणले ! आणि त्यापुढे बरीच वर्षे बिगर काँग्रेसी मंडळींचा धसकाच जनतेने घेतला.

थोडक्यांत भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील अशी दाट शक्यता आहे.

अहिरावण's picture

29 Jun 2023 - 1:34 pm | अहिरावण

>>>भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील अशी दाट शक्यता आहे.

हा हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2023 - 3:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील

=)) सहमत.

-दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी's picture

29 Jun 2023 - 12:35 pm | कर्नलतपस्वी

परदेशी राहून भारत विरोधी गरळ ओकायची. कधीकाळी मी पण दुतावासा पुढे रांग लावली होती सोईस्कर पणे विसरायचं.

दुसर्‍याचे धागे विषयांतर करून आपलं घोडं पुढं काढायचं हा माझा सफल गनिमी कावा.

जाऊ द्या ना,द्या सोडून.

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 12:58 pm | इपित्तर इतिहासकार

जैसा आदेश.

कर्नल तपस्वी मी कुठे भारतावर गरळ ओकाली? > उलट सुरवातीच्या भारतीय सरकारची काही धोरणे बरोबर होती हे म्हणतोय .. उगा का आरोप करताय?
"दुसर्‍याचे धागे विषयांतर करून आपलं घोडं पुढं काढायचं" अहो सहन यांनी गोवा आणि तेथील पोर्तुगाल पद्धत आणि उर्वरित भारत आणि महाराष्ट्र्र बद्दल काही तरी ना पटणारे बोलली म्हणून मी त्यावर प्रतिसाद दिला ...

कर्नलतपस्वी's picture

29 Jun 2023 - 4:43 pm | कर्नलतपस्वी

केलाय.

कर्नलतपस्वी's picture

29 Jun 2023 - 4:45 pm | कर्नलतपस्वी

व्य नि केलाय.

चौकस२१२'s picture

29 Jun 2023 - 5:52 pm | चौकस२१२

भावमा पोचल्या, धन्यवाद, गैरसमजुतीबद्दल क्षमस्व

विवेकपटाईत's picture

30 Jun 2023 - 11:33 am | विवेकपटाईत

ब्रिटिश आणि अमेरिकन मीडिया नेहमीच भारताविरुद्ध गरळ ओकणाचे काम करतात. ९० टक्के खोट्या किंवा भ्रमित करणाऱ्या बातम्या देतात. सत्ता कुणाचोही का असेना. बाकी सत्तेसाठी आणीबाणी लावली आणि विरोधी पक्ष नेत्यांवर अत्याचार केले, हे एकमेव सत्य.

उनाड's picture

2 Jul 2023 - 6:21 am | उनाड

त्याकाळी आर के लक्षमण यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींच्या मागे संजय गांधी व त्यांच्या हातात एक दोरीने बांधलेली खेळातील मोटार हमखास दिसे.