'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!
साधारण अडीच वर्षांपूर्वी मिपावर चार भागांत लिहिलेल्या "दुबई : मरूभूमितले नंदनवन" ह्या प्रवास वर्णनाच्या पहिल्या भागात दुबईतल्या एका सुपर मार्केट मध्ये, तो पर्यंत ऐकून-वाचून माहिती असलेला 'चायनीज सेक्स डॉल' हा प्रकार प्रत्यक्षात पाहायला मिळाल्याचा उल्लेख केला होता.
त्या धाग्यावरच्या दोन-तीन प्रतिसादांमध्येही चायनीज सेक्स डॉलचा विषय आला आणि तेव्हापासूनच त्यावर एखादा लेख लिहिण्याचा विचार डोक्यात घोळू लागला होता. मिपाकरांच्या प्रगल्भते विषयी कोणतीही शंका मनामध्ये नसली तरी तो विचार प्रत्यक्षात आणावा कि नाही ह्याबद्दल मात्र द्विधा मनस्थिती होती. गेल्या रविवारी कुमार१ साहेबांचा दोघांत 'तिसरा' : एक मुलायम स्पर्शक हा 'कंडोम' विषयीचा अतिशय रंजक लेख वाचला आणि आज ज्या 'लव्ह डॉल' / 'रिअल डॉल' किंवा चायनीज सेक्स डॉल म्हणून आपल्याला परिचित आहेत त्या लैंगिक बाहुल्या अर्थात 'सेक्स डॉल्स' वर हा लेख लिहिण्याचा विचार पक्का झाला!
लैंगिक खेळणी (Sex Toys) :-
डिल्डो (Dildo), बट प्लग (Butt Plug), कॉक रिंग (Cock Ring), व्हायब्रेटर (Vibrator), सेक्स डॉल्स, बीडीएसएम (BDSM) टॉईज वगैरें सारखी अनेक 'सेक्स टॉईज' (Sex Toys) अर्थात लैंगिक खेळणी आज आपल्या परिचयाची असली तरी त्यातली काही हजारो वर्षांपासून वापरली जात आहेत.
मी अद्याप वाचला नाहीये पण अन्य वाचनातून आणि जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'वात्सायन' लिखित/संकलित 'कामसूत्र' ह्या चौथ्या(?) शतकातील प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथात गोलाकार काठी, वक्राकार काठी आणि फुलाच्या कळीसारख्या आकाराच्या वस्तूपासून हत्तीच्या सोंडेपर्यंतच्या अनेक प्रकारच्या लैंगिक खेळण्यांच्या आकारांचे तपशील दिले आहेत. कामशास्त्राच्या औपनिषदिक विभागात (कामशास्त्राचा ७ वा विभाग) लैंगिक संभोगासाठी/समाधानासाठी वापरल्या जाणार्या विविध प्रकारच्या साधनांचा उल्लेख आहे.
त्याकाळी डिल्डो किंवा अन्य लैंगिक खेळणी ही लाकूड, रबर, सोने, चांदी, तांबे, हस्तिदंत तसेच प्राण्यांच्या शिंगांपासून बनविलेली असत. जेव्हा पुरुषांना लैंगिक जोडीदार नसतो तेव्हा ते "बाहुल्यांनी" स्वतःला संतुष्ट करत असल्याचेही त्यात म्हंटले आहे.
मैथुनाचे समाधान मिळवण्यासाठी 'पोकळ भोपळे' आणि 'तेल' व 'मलम' लावून प्रक्रिया केलेले 'बांबू' ह्यांचा वापर करून बनवलेल्या कृत्रिम लैंगिक अवयवांबद्दल देखील त्यात भाष्य केले असल्याचेही ऐकिवात आहे.
भारताप्रमाणेच ग्रीक आणि चिनी लोकं देखील प्राचीन काळापासून अशा लैंगिक खेळण्यांचा वापर करत होते. विविध ठिकाणी केलेल्या उत्खननांमधून त्यासंबंधीचे पुरावेही समोर आले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यापासून जगभरात बनवली गेलेली विविध आकारांची लैंगिक खेळणी आणि त्यांच्या बनावटीत कालानुरूप होत गेलेले बदल ह्याचा इतिहासही मोठा रंजक आहे.
वरील फोटोत डावीकडे प्राचीन ग्रीको-रोमन काळातला डिल्डो तर, उजवीकडे चीनच्या जिआंगसू प्रांतातील यिझेंग या शहरात एका उच्चकुलीन व्यक्तीच्या थडग्यात सापडलेला २००० वर्षे जुना ब्रॉन्झचा डिल्डो.
वरील फोटोत डावीकडे चीन मधील आजच्या शांघाय शहराजवळ एका राजाच्या थडग्यात सापडलेला ब्रॉन्झ पासून बनवलेला २०००+ वर्षे जुना 'बट प्लग' (Butt Plug). आणि उजवीकडे अमेरिकन फिजिशियन 'जॉर्ज टेलर' ह्यांनी १८६९ साली तयार केलेला वाफेच्या शक्तीवर चालणारा क्रॅंक व्हायब्रेटर. स्टीम इंजिनला जोडलेला असल्यामुळे कंपनांसहित मागे पुढे होणारा स्वयंचलित डिल्डो हे ह्या यंत्राचे प्रमुख वैशिष्ट्य!
असो, शेकडो-हजारो वर्षांपासून वापरात असलेल्या लैंगिक खेळण्यांचा इतिहास, त्यांच्या निर्मितीत झालेली स्थित्यंतरे हा विषय फार रोचक आणि रंजक असला तरी त्याच्या अधिक तपशिलात न जाता लेखाचा मूळ विषय 'सेक्स डॉल्स' अर्थात लैंगिक बाहुल्यांकडे वळतो.
लैंगिक बाहुल्यांचा इतिहास :-
इतिहास संशोधकांच्या एका गोष्टीचे मला फार कौतुक वाटते, त्यांना कुठल्याही गोष्टीचे वावडे नसते. 'सेक्स डॉल' च्या इतिहासाचा मागोवा घेण्यातही त्यांनी कुचराई केली नाही! त्यापैकी काहीजण सेक्स डॉल्सना २००० वर्षांहून अधिक जुना इतिहास असल्याचा दावा करतात, आणि त्याच्या पुष्ट्यर्थ ते ग्रीक पुराणातील 'पिग्मॅलियन' नावाच्या एका पौराणिक पात्राचा संदर्भ देतात.
ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातील रोमन कवी 'ओव्हिड' (Ovid) ह्याच्या आठव्या शतकात प्रकाशित झालेल्या 'मेटामॉर्फोसेस' (Metamorphoses) ह्या महाकाव्यातल्या त्या संबंधित एका ग्रीक पौराणिक कथेचा मी केलेला स्वैर अनुवाद असा ...
'स्त्री नग्नतेचे' प्रतीक असणारी व्हीनस ही 'प्रेमाची' रोमन देवी. तिच्या शक्तीचा आणि महिम्याचा सर्वांद्वारे आदर केला जातो. सायप्रसच्या 'किप्रोस' (Kypros) बेटावरील 'अमाथस' शहरातील सायप्रियन मुली ह्या 'प्रोपोएटस'च्या (Propoetus) मुली असल्याने 'प्रोपोएटाइड्स' (Propoetides) म्हणून ओळखल्या जात होत्या. ह्या प्रोपोएटाइड्सनी 'व्हीनस'चे देवत्व मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळे क्रोधीत झालेल्या व्हीनस देवीने त्यांना शिक्षा म्हणून वेश्या बनवल्याने त्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.
स्वतः उत्तम शिल्पकार असलेल्या 'पिग्मॅलियन' ह्या सायप्रसच्या राजाने व्हीनसच्या कोपाने समाजातील आपला नावलौकिक आणि प्रेम व लज्जा अशा निसर्गदत्त स्त्रीसुलभ भावना गमावलेल्या 'प्रोपोएटस' च्या मुलींना वेश्याव्यवसाय करताना पाहिल्यावर त्याच्या मनात एकूणच स्त्री जातीबद्दल तिरस्कार निर्माण झाला. त्याने ब्रह्मचारी राहण्याचा आणि शिल्पकलेमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याचा निर्धार केला.
पिग्मॅलियनने आपल्या मनातील आदर्श स्त्रीचे एक सुंदर हस्तिदंती शिल्प घडवले. त्याला ते शिल्प इतके परिपूर्ण वाटले की तो त्यानेच कोरलेल्या मूर्तीच्या प्रेमात पडला. 'गॅलेटीया' (Galatea) असे नाव दिलेल्या त्या शिल्परुपी स्त्री साठी पिग्मॅलियन विविध भेटवस्तू आणतो, तिच्यासाठी एक भव्य पलंग तयार करतो, तिची चुंबने घेतो.
पुढे 'ॲफ्रोडाइट' देवीच्या सणाच्या दिवशी पिग्मॅलियन देवीच्या वेदीवर भेटवस्तू अर्पण करून आपल्या हस्तिदंती मूर्तीचे जिवंत स्त्रीमध्ये रूपांतर करण्याची देवीकडे इच्छा व्यक्त करतो. जेव्हा तो घरी परतून त्याच्या हस्तिदंती मूर्तीचे चुंबन घेतो तेव्हा त्याच्या ओठांना तो स्पर्श उबदार वाटतो. तो पुन्हा मूर्तीचे चुंबन घेतो तेव्हा हस्तिदंती मूर्तीचे काठिण्य नाहीसे होऊन 'गॅलेटीया' चे जिवंत स्त्रीमध्ये रूपांतर होते. ॲफ्रोडाईट देवीच्या कृपेने इच्छापूर्ती झालेला पिग्मॅलियन गॅलेटीयाशी लग्न करतो. त्यांना एक मुलगी होते, जिच्या नावावरून सायप्रसमधील एका शहराला 'पॅफोस' (Paphos) हे नाव पडले.
तर काही इतिहास संशोधकांच्या मते सोळाव्या शतकात मैथुनासाठी वापरण्याजोग्या पहिल्या आदिम सेक्स डॉल्सच्या निर्मितीचे श्रेय फ्रेंच आणि स्पॅनिश दर्यावर्दींकडे जाते. समुद्रातील लांबलांबच्या प्रवासात येणारे एकाकीपणा घालवण्यासाठी कोणी सहचर असावा अशा भावनेतून खलाशांद्वारे जुने कपडे आणि चिंध्या वापरून निर्माण करण्यात आलेल्या ह्या आदिम लैंगिक बाहुल्यांना आजच्या आधुनिक सेक्स डॉल्सची पहिली पिढी म्हणता येईल.
पुढे रंगाकू (Rangaku) काळात डच लोकांनी अशा बाहुल्या जपानी लोकांना विकल्या होत्या आणि तेव्हापासून 'डच वाईव्ह्ज' (Dutch wives) हा शब्द अजूनही जपानमध्ये लैंगिक बाहुल्यांच्या संदर्भात वापरला जातो.
सतराव्या शतकात जपानी लोकांनी डच लोकांकडून 'डच वाईव्ह्ज' खरेदी केल्या असल्या तरी पुढे सुबक, सुंदर अशा लैंगिक बाहुल्या बनवण्यात त्यांनी चांगलेच प्राविण्य मिळवले.
सर्वाधिक खपाच्या तीन जपानी सेक्स डॉल्स अर्थात 'डच वाईव्ह्ज'...
सोळाव्या शतकात फ्रेंच आणि स्पॅनिश खलाशांनी कापड आणि चिंध्यांपासून बनवलेल्या ओबड-धोबड सेक्स डॉल्स ते आज एकविसाव्या शतकात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर निर्माण होणाऱ्या 'सुपर रिअलिस्टिक' सेक्स डॉल्स असा झालेला लैंगिक बाहुल्यांचा प्रवासही मोठा रंजक आहे. मधल्या काळात अनेकांनी वेगवेगळे साहित्य वापरून अशा लैंगिक बाहुल्या बनवण्याचे आपापल्या परीने प्रयोग स्वान्तसुखाय केले, परंतु नव्याने उघडकीस आलेल्या माहितीनुसार १९४१ साली 'पहिल्यांदाच व्यावसायिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून' सेक्स डॉल्सची घाऊक प्रमाणावर निर्मिती करण्याचे श्रेय 'नाझी जर्मनी' कडे जाते.
सुप्रसिद्ध ऐतिहासिक लेखक 'ग्रीम डोनाल्ड' (Graeme Donald) ह्यांनी त्यांच्या 'मुसोलिनीज बार्बर: अँड अदर स्टोरीज ऑफ द अननोन प्लेअर्स हू मेड हिस्टरी हॅपन' (Mussolini's Barber: And Other Stories of the Unknown Players who Made History Happen) ह्या २०१० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी अमेरिकन 'बार्बी डॉल' च्या इतिहासावर संशोधन करताना नाझी जर्मनीच्या 'सेक्स डॉल' प्रकल्पाचा शोध लावला.
'द सन' ह्या ब्रिटिश वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ग्रीम डोनाल्ड सांगतात,
"मी बार्बी डॉलच्या इतिहासावर संशोधन करत असताना मला नाझी सेक्स डॉल्सचे संदर्भ मिळाले आणि मला असेही कळले की हिटलरने त्या बनवण्याचा आदेश दिला होता. फ्रान्स मध्ये शत्रुसैन्याच्या गोळ्यांनी जायबंदी होणाऱ्या / मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा जास्त संख्येने नाझी सैनिक 'सिफिलीस' (syphilis) ह्या 'लैंगिक संक्रमित रोगाने' (Sexually transmitted disease - STD) बाधित झाले होते / मृत्युमुखी पडले होते. फ्रान्स मधल्या जर्मन सैनिकांसाठी सिफिलीस ही एक भयंकर समस्या होती आणि हिटलरला त्याची जाणीव होती."
'ग्रीम डोनाल्ड' ह्यांना त्यांच्या संशोधनातून नाझी जर्मनीच्या 'सेक्स डॉल' प्रकल्पा विषयी मिळालेली माहिती...
१९४० साली एस. एस. चा एक प्रमुख नेता आणि 'ॲडॉल्फ हिटलर' चा अत्यंत विश्वासू सहकारी 'हेनरिक हिमलर' ह्याने हिटलरला पाठवलेल्या अहवालात फ्रान्स मध्ये मुसंडी मारलेल्या नाझी सैन्यातील मोठ्या प्रमाणावर सैनिक पॅरिस मधल्या वेश्यांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्याने सिफिलीस ह्या रोगाने बाधित झाले असून त्यांना रोगग्रस्त वेश्यांशी शरीरसंबंध ठेवण्यापासून परावृत्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे लिहिले होते. तसेच अशा उपाययोजनांचा एक भाग म्हणून आपल्या सैनिकांना लैंगिक सुख मिळवून देण्याजोग्या आकाराच्या (प्रत्यक्षापेक्षा थोड्या कमी उंचीच्या) 'लैंगिक बाहुल्या' तयार करून देण्यात याव्यात जेणेकरून ते रोगग्रस्त वेश्यांशी शरीरसंबंध ठेवण्यापासून परावृत्त होतील अशी कल्पनाही मांडली होती.
हिटलरने ह्या कल्पनेला मान्यता दिल्यानंतर अतिशय गोपनीयता पाळून 'ॲडम झिमरमन' (Adam Zimmerman) ह्यांच्या देखरेखीखाली 'जर्मन स्वच्छता संग्रहालयात' (German Hygiene Museum) नाझी जर्मनीच्या 'मोअर सिक्रेट दॅन टॉप सिक्रेट' अशा ह्या 'सेक्स डॉल' प्रकल्पाची सुरुवात झाली. हवा काढल्यावर घडी घालून सैनिकांच्या बॅकपॅकमध्ये बसतील अशा स्वरूपाच्या बाहुल्या तयार करण्यावर ह्या प्रकल्पाचा भर होता.
ह्या प्रकल्पात सहभागी असलेले मानसोपचारतज्ज्ञ 'रुडॉल्फ चार्जहेमर' (Rudolf Chargeheimer) ह्यांनी बाहुलीमध्ये स्पर्शसुखासाठी काही ठराविक अवयव (चेहरा, स्तन आणि नितंब) कृत्रिमरित्या मांसल असायला हवेत तसेच तिचे शरीर वास्तविक स्त्री सारखे लवचिक असावे असे निकष मांडले होते.
अनेक तज्ञ लोकांशी सल्लामसलत करून सर्व आवश्यक निकषांचे पालन करत हिमलरने हवा भरून फुगवता येण्यासारख्या 'लैंगिक बाहुल्यांच्या' निर्मितीची सुरुवात करण्याचा भाग म्हणून तत्कालीन सुप्रसिद्ध हंगेरियन अभिनेत्री 'केथे वॉन नागी' (Kathy von Nagy) हिला लैंगिक बाहुल्यांना तिचा चेहरा देण्याची विनंती केली, पण तिने हि विनंती अमान्य केल्याने शेवटी (वरील फोटोत डावीकडे दिसणाऱ्या) सोनेरी केसांच्या आणि निळ्या डोळ्यांच्या 'ब्लॉन्ड' सेक्स डॉल्सच्या निर्मितीला १९४१ साली सुरुवात झाली.
नाझी-व्याप्त जर्सी मधल्या सेंट हेलियर येथील जर्मन बरॅकमध्ये ह्या बाहुल्यांची चाचणी घेण्यात आली होती.
१९४२ साली अचानक हिमलरने आपला विचारबदलून हा प्रकल्प बंद करून टाकला. पुढे 'एल्ब नदीकाठचे फ्लॉरेन्स' म्हणून ओळखले जाणारे 'ड्रेस्डेन' हे जर्मनीतील महत्त्वाचे पुरातन शहर दोस्त राष्ट्रांनी केलेल्या पाशवी हवाई बॉम्बहल्ल्यात ८०% बेचिराख झाले. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील काळ्या घटनांपैकी एक आणि 'द बॉम्बिंग ऑफ ड्रेस्डेन' (The bombing of Dresden) म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ह्या बॉम्बवर्षावात नाझी 'सेक्स डॉल्स' ची निर्मिती होत होती ती फॅक्टरी आणि तिच्याबरोबरच ह्या बाहुल्यांसंबंधीच्या सर्व नोंदीही बेचिराख झाल्या.
('ग्रीम डोनाल्ड' ह्यांनी वरील माहिती त्याकाळी 'रेशियल हायजीन अँड डेमोग्राफिक बायोलॉजी रिसर्च युनिट' अंतर्गत सदर लैंगिक बाहुलीची रचना करणाऱ्या टीममधील एक सदस्य असलेले जर्मन शिल्पकार 'आर्थर रिंक' ह्यांच्याकडून मिळवली आहे.)
अवांतरः नाझी सेक्स डॉल्स पासून प्रेरित होऊन जर्मनीत 'बिल्ड लिली' ह्या फॅशन डॉलची निर्मिती सुरु झाली आणि १२ ऑगस्ट १९५५ रोजी त्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. अल्पावधीत अफाट लोकप्रियता लाभलेल्या ह्या 'बिल्ड लिली' बाहुल्यांवरून प्रेरित होऊन Mattel, Inc ह्या अमेरिकन खेळणी उत्पादक कंपनीने तयार केलेल्या 'बार्बी डॉल्स' ९ मार्च १९५९ रोजी अधिकृतपणे विक्रीसाठी बाजारात आल्या. पुढे Mattel, Inc ने 'बिल्ड लिली' चे हक्क विकत घेतल्यावर १९६४ पासून जर्मनीत 'बिल्ड लिली' बाहुल्यांचे उत्पादन बंद झाले तो पर्यंत सुमारे १,३०,००० 'बिल्ड लिली' बाहुल्यांची निर्मिती झाली होती.
असो, इतिहास फार झाला आता थोडे वर्तमानात येउयात...
वरती नमुन्यादाखल दिलेल्या ९ आधुनिक सेक्स डॉल्सच्या फोटोज मधून लैंगिक बाहुल्यांच्या निर्मितीत किती सफाई आली आहे हे जाणवल्याशिवाय राहणार नाही. तसेच सौंदर्यदृष्टी लाभलेल्या कुठल्याही कलासक्त, रसिक व्यक्तीला ह्या सुपर रिअलिस्टीक बाहुल्यांच्या सौन्दर्याची भुरळ न पडल्यास नवल! मी पण ह्याला अपवाद नाही, २०१७ साली दुबईमध्ये प्रत्यक्षात सेक्स डॉल्स बघितल्यावर मी पण हरखून गेलो होतो, जबरदस्त कलाकारीचा नमुना होत्या त्या बाहुल्या!
सेक्स टॉय म्हणून निर्माण करण्यात येणाऱ्या ह्या आधुनिक लैंगिक बाहुल्यांना त्यांची आपली नावानिशी ओळख, त्यांचे आपले एक व्यक्तिमत्व आणि त्यांची अशी काही खास वैशिष्ट्येही दिलेली असतात.
उदाहरणासाठी वरती दिलेल्या एका फोटोतील तीन जपानी सेक्स डॉल्सची ओळख, व्यक्तिमत्व आणि वैशिष्ट्ये पाहू...
बाहुली क्रमांक १.
नाव - एव्हलिन (Avalynn)
उंची - १५८ सेमी.
वजन - ३३ किलो.
फिगर : ३२-२०-३२
प्रकार - सुपर रिअलिस्टिक जपानी सेक्स डॉल.
मटेरियल - सिलिकॉनचे डोके आणि TPE पासून बनवलेले शरीर.
व्यक्तिमत्व - पारंपारिक जपानी पोशाख परिधान केलेली एव्हलिन ही सौंदर्यवती, गौरवशाली जपानी संस्कृतीचा प्रसार करण्याच्या मोहिमेवर आहे. एव्हलिन ही गोंडस, मोहक आणि जगातील सर्वात सेक्सी बाहुल्यांपैकी एक असून आपल्या जोडीदाराला संपूर्णपणे समाधानी करण्यास कटिबद्ध आहे.
वैशिष्ट्ये - सुंदर आणि सेक्सी फिगरची एव्हलिन आपल्या जोडीदाराला योनी, गुद आणि मुख अशा तीनही अवयवांद्वारे लैंगिक सुख देण्यास सक्षम आहे.
बाहुली क्रमांक २.
नाव - स्कार्लेट (Scarlette)
उंची - १६५ सेमी.
वजन - ३४ किलो.
फिगर : ३६-२०-३२
प्रकार - सुपर रिअलिस्टिक जपानी सेक्स डॉल.
मटेरियल - सिलिकॉनचे डोके आणि TPE पासून बनवलेले शरीर.
व्यक्तिमत्व - प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक सुंदर आणि आकर्षक सेक्रेटरी हवी असते, स्कार्लेट ती गरज पूर्ण करू शकते. आपल्या बॉसची सोय करण्यासाठी आणि त्याला हवे ते देऊन संतुष्ट करण्यासाठी ती प्रत्येक वेळी तत्पर असते. तिच्या बॉसला खोडकर वाटणारी स्कार्लेट लोकप्रिय पॉर्न सेलिब्रिटींच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानी आहे.
वैशिष्ट्ये - सुंदर आणि सेक्सी स्कार्लेट आपल्या जोडीदाराला योनी, गुद आणि मुख अशा तीनही अवयवांद्वारे लैंगिक सुख देण्यास सक्षम आहे.
बाहुली क्रमांक ३.
नाव - डोरोथी (Dorothy)
उंची - १५८ सेमी.
वजन - ३२ किलो.
फिगर : ३२-२३-३२
प्रकार - सुपर रिअलिस्टिक जपानी सेक्स डॉल.
मटेरियल - TPE
व्यक्तिमत्व - डोरोथी ही पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मागणी असलेली आणि फॉलो केली जाणारी सेक्स आयकॉन आहे. जपानी मोलकरणीच्या भूमिकेत वावरणाऱ्या डोरोथीने अनेक पुरुषांची मने चोरली असून आता प्रत्येकालाच आपल्या घरी अशी सुंदर दासी हवीहवीशी वाटू लागली आहे.
डोरोथी उंच असून तिचा बांधा जबरदस्त आहे. आपली कामातुरता दाखवण्यासाठी ती सतत जीभ बाहेर काढते. BDSM ची आवड असलेलया डोरोथीचे व्यक्तिमत्त्व खूप आनंददायी असून ती कोणासोबतही राहण्यास तयार आहे.
वैशिष्ट्ये - BDSM साठी योग्य जोडीदार असलेली सुंदर आणि सेक्सी डोरोथी आपल्या जोडीदाराला योनी, गुद आणि मुख अशा तीनही अवयवांद्वारे लैंगिक सुख देण्यास सक्षम आहे.
---
वरील तीन प्रातिनिधिक उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते कि, आधुनिक सेक्स डॉल निर्मिती प्रक्रियेत दर्जेदार साहित्याचा वापर आणि उच्च तंत्रज्ञानाच्या जोडीने मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यासही अंतर्भूत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या लैंगिक जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा, सौन्दर्य आणि मैथुन विषयक कल्पना आणि आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात, काही जणांच्या बाबतीत त्या थोड्याश्या विकृतीकडे झुकणाऱ्याही असतात.
वापरकर्त्यांच्या अशा सर्व प्रकारच्या आवडी-निवडी, कल्पना आणि अपेक्षा विचारात घेऊन आधुनिक सेक्स डॉलची निर्मिती केली जाते. ज्यात 'वय', 'त्वचेचा, डोळ्यांचा आणि केसांचा रंग', 'चेहऱ्याची ठेवण, भुवया आणि ओठांचा आकार', 'केशरचना', 'स्तन, कंबर आणि नितंबांचा आकार', 'उंची आणि जाडी', 'जन्मखूण' अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.
'सेक्स डॉल्स'च्या कारखान्यातील निर्मिती प्रक्रियेतला एक विभाग...
प्रत्यक्ष जीवनातलया 'सेलिब्रेटी', 'पॉर्न स्टार्स', 'विविध कार्टून कॅरॅक्टर्स जसे कि जपानी हेंताई (Hentai), ऍनिमे (Anime) आणि मांगा (Manga) मधली पात्रे', आणि सीजीआय (CGI , Computer-Generated Imagery) चा वापर करून तयार केलेले काल्पनिक चेहरे आणि शरीरयष्टी ह्यांच्या आधारावर निर्मित सेक्स डॉल्स हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत.
पण सध्याचा जमाना कस्टमायझेशनचा (Customization) आहे. ग्राहकाच्या मागणीबरहुकूम त्याच्या वैयक्तिक पसंतीची लैंगिक बाहुली बनवून देण्यातही काही 'सेक्स डॉल' उत्पादक आघाडीवर आहेत.
सेक्स डॉलच्या डोक्यासाठी साचा बनवण्यापूर्वी माती किंवा प्लास्टर पासून फोटोबरहुकूम साकारण्यात येत असलेले 'मॉडेल'...
'सेक्स डॉल्स' फक्त पुरुषांसाठीच नसतात त्या स्त्रियांसाठीही असतात...
सोळाव्या शतकात जुने कपडे आणि चिंध्यांपासून सुरु झालेली लैगिक बाहुल्यांची शरीर निर्मिती आता 'व्हिनाईल' (Vinyl), 'लॅटेक्स' (Latex), 'सिलिकॉन' (Silicone) आणि TPE म्हणून ओळखले जाणारे 'थर्मोप्लास्टिक इलॅस्टोमर' (Ehermoplastic Elastomer) अशा साहित्यावर येऊन स्थिरावली आहे.
स्वस्त आणि मध्यम किमतीच्या (भारतीय रुपयांत अंदाजे १०,०००/- ते १,००,०००/-) बाहुल्या व्हिनाईल आणि लॅटेक्स पासून, तर सुपर-रिअलिस्टिक, अल्ट्रा-रिअलिस्टिक प्रकारात मोडणाऱ्या उच्चं दर्जाच्या (भारतीय रुपयांत अंदाजे १,००,०००/- ते ३,००,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या) बाहुल्या सिलिकॉन आणि थर्मोप्लास्टिक इलॅस्टोमर पासून बनवल्या जातात. त्यांचे सांगाडे बनवण्यासाठी वापर केल्या गेलेल्या PVC, ॲल्युमिनिअम स्टील किंवा प्लॅटिनम अशा धातू आणि इतर साहित्यावर तसेच अन्य गोष्टी जसे कि विग साठी वापरलेला केसांचा प्रकार (कृत्रिम कि नैसर्गिक केस) वगैरे गोष्टींवरही देखील त्यांच्या किमती अवलंबून असतात.
वैयक्तिक पसंतीनुसार वापरकर्ता आपल्या आवडी-निवडी प्रमाणे सेक्स डॉल उत्पादकाला त्याला हवे तसे बदल करण्यास सांगू शकतो.
उदा. 'डोळ्यांचा रंग', 'केसांचा प्रकार (नैसर्गिक/कृत्रिम)' 'त्वचेचा रंग', 'जन्मखूण (गालावर किंवा शरीराच्या कुठल्या भागावर तीळ / मस वगैरे)', 'गुप्तांगावरील केस' (ते हवेत कि नकोत/हवे असल्यास त्यांचे प्रमाण आणि लांबी वगैरे)','स्तन, कंबर आणि नितंबांचा आकार', 'उंची आणि जाडी' इत्यादी.
तयार पर्यायांमध्येही वरीलप्रमाणे कस्टमायझेशन करवून घेण्याची त्याला मोकळीक असते. शेकडोंच्या संख्येने निवडीसाठी उपलब्ध असलेल्या चेहऱ्यांपैकी त्याच्या आवडीप्रमाणे निवड करता येते तसेच केसांच्या 'विग' ची निवडही करता येते.
नमुन्यादाखल काही उपलब्ध चेहरे आणि विग्ज ...
चेहरे
विग्ज
बऱ्यापैकी जुना इतिहास असलेल्या सेक्स डॉलचा वापर जगभरात होत असला तरी त्या खरेदी करण्यामागे केवळ लैंगिक गरजाच कारणीभूत असतात असे नाही. पुरुष, स्त्रिया, समलिंगी व्यक्तींकडून लैंगिक सुखासाठी त्यांचा वापर होतो तर काहीजण निव्वळ शौक म्हणूनही त्या पदरी बाळगतात. काहीवेळा एखादा देश, प्रदेश किंवा ठिकाणाची बदललेली जनसांख्यिकी (Demography) देखील समाजातल्या मोठ्या वर्गाला त्यांच्या वापरासाठी प्रवृत्त करू शकते, ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे चीन.
चीनमध्ये १९७९ ते २०१५ ह्या कालावधीत लोकसंख्या नियोजन उपक्रमा अंतर्गत राबवण्यात आलेल्या 'एक मूल धोरणामुळे' (One Child Policy) लोकसंख्या नियंत्रणात आली पण त्याचा एक दुष्परिणाम असा झाला कि देशाचे एकूण लिंग गुणोत्तर विस्कळीत झाले आणि स्त्रियांपेक्षा अंदाजे ३ ते ४ टक्के अधिक पुरुष अशी विषम सामाजिक परिस्थिती उद्भवली. स्त्री-पुरुषांच्या संख्येत वाढलेल्या अंतरामुळे जसजशी नव्या पिढीतली मुले वयात येऊ लागली तसतशी त्यांना लग्नासाठी उपलब्ध असलेल्या मुलींची संख्याही घटत गेली.
जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीन मध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात पडलेला ३ ते ४ टक्यांचा फरक काय परिस्थिती निर्माण करू शकतो ह्याची कल्पना केली तरी त्यातले गांभीर्य लक्षात येते. तर अशा विचित्र परिस्थितीत सापडलेल्या चिनी पुरुषांना लग्नासाठी स्त्रिया मिळत नसल्याने ते 'सेक्स डॉल' कडे आकर्षित झाले नसते तरच नवल! तसेही चीन मध्ये लैंगिक खेळणी वापरण्याचा प्राचीन इतिहास असल्याने कायदेशीर अडचणींचाही प्रश्न नव्हता. आज जगात सर्वात जास्त सेक्स डॉल्स चा वापर चीनमध्ये होतो तसेच त्यांच्या उत्पादनातही तो देश आघाडीवर आहे. त्यामुळे पूर्वी 'लव्ह डॉल' / 'रिअल डॉल' / 'डच वाईव्हज' किंवा नुसत्या 'सेक्स डॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लैंगिक बाहुल्या आता 'चायनीज सेक्स डॉल' म्हणूनही ओळखल्या जातात.
काही कट्टरपंथी धर्मांमध्ये लैंगिक खेळण्यांद्वारे आनंद मिळवणे हे आजही पाप मानले जात असल्याने काही देशांमध्ये त्यांच्या निर्मिती, विक्री, प्रमोशन आणि आयातीवर कागदोपत्री बंदी आहे, तर अनेक समाज आता विकसित होत आहेत आणि लैंगिक खेळणी स्वीकारण्यास सुरुवात करत आहेत. भूतान आणि चीनसारख्या काही देशांमध्ये तर लैंगिक खेळण्यांना 'भाग्याकर्षक' (Good Luck Charms) मानले जाते.
अर्थात कागदोपत्री बंदी असली तरी मध्यपूर्वेतील एक-दोन आणि अपवादाने जगाच्या पाठीवरील अन्य काही देश वगळता सेक्स डॉल्सचा वापर बहुसंख्य देशांमध्ये होतो. ह्याला युएई सारखा देशही अपवाद नाही. तिथेही कागदोपत्री लैंगिक खेळण्यांवर बंदी असली तरी त्यांना प्रचंड मागणी असल्याने कायद्यातील पळवाटा शोधून तर काही प्रसंगी कायदे धाब्यावर बसवून त्यांचे प्रदर्शन आणि विक्री बिनबोभाट सुरु असते. मोठमोठया मॉल्स, सुपर/हायपर मार्केट्स मध्ये सेक्स डॉल्सच्या 'प्रमोशन' साठी स्त्रियांची बाह्य आणि अंतर्वस्त्रे विकणाऱ्या विभागात 'मॅनीकिन' (Mannequin) च्या ऐवजी ह्या सुंदर, सुबक सेक्स डॉल्सचा कल्पक वापर केला जातो (अर्थात सेक्स 'डॉल निर्मात्या कंपनीने 'फक्त प्रदर्शनासाठी ठेवण्यात येण्यासाठीच्या बाहुल्या' अशा खास उद्देशाने त्या तयार केल्या असल्याने कायद्याच्या कचाट्यात सापडायला नको म्हणून प्रत्यक्ष खरेदी केल्यावर मिळणाऱ्या 'खऱ्या' बाहुली प्रमाणे ह्या 'तोतया' बाहुल्यांना योनी, गुद्वार आणि स्तनाग्रे असे गुप्त अवयव नसतात).
.
.
तसं बघितलं तर 'सेक्स डॉल' हि खाजगी वापराची बाब आहे पण काही देशांमध्ये त्या भाडेतत्वावर सुद्धा दिल्या जातात.
ऑस्ट्रियामध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर असल्याने तिथे लैंगिक बाहुल्यांवर कोणतेही कायदेशीर निर्बंध नाहीत. तिथे १९८० पासून सेक्स डॉल्स वापरात असल्या तरी २०१७ साली एका कुंटणखान्याने ग्राहकांना सेक्स डॉल सेवा देऊ केल्यावर त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली. तेव्हापासून असंख्य कुंटणखाने ग्राहकांना सेक्स डॉल्स सेवा देऊ करण्याबरोबरच त्यांची विक्रीही करत आहेत.
व्हिएन्नामधील सर्वात मोठ्या कुंटणखान्यांपैकी एक कुंटणखाना ग्राहकांना 'थ्रीसम' (Threesome) चा अनुभव मिळवून देण्यासाठी खऱ्या वेश्येबरोबरच एका सेक्स डॉलचीही सेवा देत आहे.
सद्यस्थितीला जगभरात सेक्स डॉलच्या वापरकर्त्यांची संख्या बऱ्यापैकी मोठी असून त्यांचे ऑनलाईन फोरम, सोशल मीडिया ग्रुप्सही आहेत ज्यांवर ते आपापले अनुभव आणि अडचणी शेअर करतात, एकमेकांना मदत करतात. सेक्स डॉल संबंधीचे नवनवीन तंत्रज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण करतात.
असो, लिहिण्यासारखे अजून बरेच काही आहे पण विस्तारभयास्तव आता लेख आवारता घेतो!
कुठलेही तंत्रज्ञान नवीन असताना महाग असते हे आधुनिक 'सेक्स डॉलच्या' बाबतीतही लागू पडते. भविष्यात त्यांच्या किमती आवाक्यात आल्यास पहिल्यांदा पाहताक्षणीच आवडलेला प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट असा हा प्रकार 'एक मानव निर्मित सुंदर कलाकृती' किंवा 'सुंदरशी शोभेची वस्तू' म्हणून तरी पदरी बाळगायला मला नक्कीच आवडेल, तुम्हाला आवडेल का?
तळटीप : लेखात सुंदर सुंदर 'सेक्स डॉल्सचे' अनेक फोटोज दिले आहेत. पण त्यांच्या 'खऱ्या' सौन्दर्याचे फोटोज इथे देणे अशक्य असल्याने कलाप्रेमी/रसिक वाचकांच्या सोयीसाठी गुगल फोटोजवर एक 'खास' शेअर्ड अल्बम तयार केला आहे, ही त्याची लिंक,
https://photos.app.goo.gl/dLD9rH5UvnPP3Fby9
(लेखातले सर्व फोटोज जालावरून साभार.)
प्रतिक्रिया
5 Jun 2023 - 4:40 pm | कुमार१
सांगोपांग माहितीने "भरलेला" रंजक लेख अर्थातच आवडला.
तारुण्यात यांच्याबद्दल फक्त ऐकले होते; बघायचा योग काही आला नाही.. असो !
+११११
लेख 'बघून' डोळे निवले :)
7 Jun 2023 - 5:38 am | टर्मीनेटर
फीत कापून लेखावर दिलेल्या "लेख 'बघून' डोळे निवले :)" अशा 'रसिक' प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
5 Jun 2023 - 4:46 pm | Trump
उत्तम. श्री हिटलर यांना एका चांगल्या गोष्टीचे श्रेय मिळाले ह्याबद्दल आंनद वाटतो.
7 Jun 2023 - 6:08 am | टर्मीनेटर
अरे वाह! मिपावर जाहीरपणे हिटलरचे समर्थन करणारे माझ्याप्रमाणे अजूनही कोणी आहे हे बघून मलासुद्धा आनंद झाला 👍
7 Jun 2023 - 10:44 am | Trump
7 Jun 2023 - 10:45 am | Trump
चांगल्या गोष्टींना चांगलेच म्हणावे भले त्या शत्रुच्या असल्या तरी. माणसाची परीक्षा त्याच्या संपुर्ण कर्तुत्वावरुन आणि त्यावेळीच्या पार्श्वभुमीवर करावी.
7 Jun 2023 - 11:09 am | टर्मीनेटर
१००% सहमत!
पण जेता इतिहास लिहितो! सत्ता आणि वर्चस्वाच्या खेळात इतिहासात कित्येक कुडमुड्यांना इमेज बिल्डिंगद्वारे नायक आणि कॅरॅक्टर असॅसीनेशनद्वारे कित्येक नायकांना खलनायक म्हणुन पेश केले गेले. अजुनही तो खेळ सुरुच आहे.
ह्यावर लिहिण्यासारखे बरेच काही आहे पण विषयांतर नको म्हणुन इथेच थांबतो!
7 Jun 2023 - 11:25 am | Trump
+१
5 Jun 2023 - 4:56 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
5 Jun 2023 - 5:06 pm | गवि
या वस्तू तुम्ही ऑफ ऑल प्लेसेस, दुबईत बघितल्यात?? कुठे नेऊन ठेवलीय दुबई? ;-)
बाकी रोचक टू से द लीस्ट.
7 Jun 2023 - 7:48 am | टर्मीनेटर
मुक्त विहारि । गवि । फाटक्यात पाय
प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
@ गवि
ती आहे तिथेच आहे 😀
'कोक - टू - कोकेन' आणि 'सेफ्टी पिन - टू - सेक्स डॉल' जो जे वांच्छिल तो ते देणारी दुबई म्हणून तर गेल्या अनेक दशकांपासून, पर्यटक ते फिल्मस्टार्स आणि उद्योगपती ते गॅंगस्टर्स अशा सर्वांचीच लाडकी आहे. आणि अर्थातच माझीही 😍
5 Jun 2023 - 5:43 pm | फाटक्यात पाय
असे काही चाकोरीबाह्य वाचनात आले तर मजा येते
5 Jun 2023 - 6:24 pm | चित्रगुप्त
वेगळ्याच विषयावरील नयनरम्य, मोहक, सुंदर लेख आवडला. हा प्रकार ठाऊक असला तरी त्याविषयी इतकी सांगोपांग माहिती नव्हती. अनेक आभार.
मी नववी- दहावीत असताना घरातल्या एका लाकडी दारावर (मुळात हे दार शेजारच्या घरात जाण्यासाठी असल्याने कायमचे बंद होते) वर्तमानपत्राचा कागद, चॉकमाती आणि सरस यांच्या मिश्रणातून बनवलेल्या लगद्यातून एक पूर्णाकृती 'अप्सरा' (चांदोबातील चित्रावरून) बनवून तिला खर्यासारखे रंगवले होते, घरी येणारे ते बघून अवाक व्हायचे. (आज इतक्या वर्षांनंतर या लेखामुळे आठवले).
7 Jun 2023 - 10:35 am | टर्मीनेटर
भारीच! हे वाचल्यावर चांदोबातल्या त्या 'अप्सरा' डोळ्यांसमोर तरळून गेल्या 😍
5 Jun 2023 - 6:26 pm | कर्नलतपस्वी
टर्मीनेटर भौ, अश्लीलता व सभ्यता यांच्या सर्व मर्यादा साभांळून, पौराणिक ते अधुनिक, पुर्व ते पश्चिम, रोमन देवी देवता ते कामदेव, पिग्मॅलियन,वात्सायन,हिटलर अशी चौफेर बॅटिंग करून सजवलेला लेख माहितीपूर्ण झाला आहे त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन.
हिटलरच्या या अद्भुत पण अवश्यक आशा प्रयोगा बद्द्ल वाचले होते.
पण हा जर लेख गदिमांनी वाचला तर कदाचित ते आपल्या काव्यपंक्ती बदलतील.प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट
5 Jun 2023 - 7:10 pm | अहिरावण
काय त्या बाहुल्या, काय ती आयुधे, काय ती सुविधा... एकदम ओक्के
5 Jun 2023 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण आणि नव्या विषयावरचा लेख. उत्तम छायाचित्र आणि उत्तम माहिती.
बाकी, संस्कृती बूडवणा-या या बाहुल्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. चहा-पोहे करून देणा-या बाहुल्यांची गरज असताना तरुण पिढीला बाहुल्यांच्या पाशात ढ़कलण्याचा हा एक पाश्चिमात्य प्रयत्न असावा असे वाटते. ;)
-दिलीप बिरुटे
5 Jun 2023 - 7:46 pm | कर्नलतपस्वी
सहमत प्रा.डाॅ सर.
5 Jun 2023 - 7:50 pm | गवि
असे जुनाट विचार आणि मते ऐकून एक मिपाकर म्हणून शरम वाटली असे प्रांजळपणे सांगू इच्छितो.
5 Jun 2023 - 8:06 pm | प्रचेतस
आता तुम्ही आणि प्राडॉ हे दोन ज्येष्ठ सदस्य मिळून येथे धिंगाणा घालतील असे वाटते.
6 Jun 2023 - 12:46 pm | शाम भागवत
संक्षी असते तर अगदी वाजत गाजत धिंगाणा घातला गेला असता असे नमूद करून खाली बसतो.
:))
5 Jun 2023 - 8:32 pm | फाटक्यात पाय
कंड सूटल्यावर गावाला आग लावण्यापेक्षा घरात आंघोळ केलेली बरी!
5 Jun 2023 - 11:29 pm | चित्रगुप्त
पाश्चात्त्य (विशेषतः) अमेरिकन - जीवनपद्धतीत - जिथे बाळाच्या जन्माच्या आधीपसून त्याचेसाठी वेगळी खोली, त्यात विविध खेळणी, सजावट वगैरे तयार ठेऊन त्या स्वतंत्र खोलीतच त्याला ठेवले जाते, पुढे आई-वडिलांचा घटस्फोट, अठरा वर्षांचे झाल्यावर सवतंत्रपणे रहायला सुरूवात करणे, मग मिळकतीसाठी काहीही करण्याची तयारी ठेवणे ...कुठे 'जुळले' तरी ते किती दिवस चालेल त्याची शाश्वती नसणे, रतिचित्रणादि बघण्याचे व्यसन, वगैरेतून जो एकाकीपणा वाढीला लागतो, त्यापायी कुत्री-मांजरी पाळून त्यांचे लाड करणे, किंवा अश्या साधनांचा प्रयोग करणे याची गरज किमान काही टक्के पुरुषांना तरी भासत असावी (भारतातही संपन्न घरांत आता फारशी वेगळी परिस्थिती नसावी) असे वाटते.
बाकी 'चहा-पोहे' संस्कृतीतील निरागस गोडवा आता ओसरत चालला असला, तरी निदान काही काळ तरी अजून टिकेल, अशी आशा करूया.
अवांतरः अलिकडील काळात लोकप्रिय झालेल्या 'Lady Dimitrescu' ची 'ओवळी' बाहुली पण उपलब्ध आहेसे दिसते. सोवळी आवृत्ती अशी आहे:
7 Jun 2023 - 4:32 am | चौकस२१२
प्रोफेश्वर आप्ल्याला जर असे म्हणायचे असेल " कि हि सोय भारतात उपलब्ध नको" तर एकवेळ सहमत होता येईल पण नेहमीप्रमाणे "पाश्चिमात्य प्रयत्न " हे ताशेरे ओढणे हे नेहमीचा तुमचा भांडवशाही वरील राग दाखवतो ..
या बाहुल्या हि संपूर्ण वयक्तिक बाब आहे
भारतात सेक्सपो जर कोणी आणले तर तुम्हाला बहुतेक फेफरेच येईल
एकीकडे कामसूत्र निर्माण झाला तो हाच का देश ?
7 Jun 2023 - 6:46 am | चित्रगुप्त
मलासे वाटते मला जे काही थोडेसे मत मांडायचे होते, त्याला मी योग्य ते शब्दरूप देऊ शकलेलो नाही.
हे 'नेहमीचा भांडवलशाहीवरील राग' वगैरे वाचून मी आश्चर्यचकित झालेलो आहे. माझ्या कोणत्या लिखणातून हा 'राग' व्यक्त झालेला आहे, ते दाखवल्यास त्यावर मी अवश्य मनन करेन. उलट पाश्चात्य संस्कृतीतील अनेक उत्तमोत्तम गोष्टींचाच मी जास्त पाठपुरावा आणि लेखन करत आलेलो आहे. माझे जास्त वास्तव्य सुद्धा युरोप-अमेरिकेतच असते, जे मला खूप आवडते. खरेतत मुळात मला 'भांडवलशाही' म्हणजे नेमके काय, हेही ठाऊक नाही.
माझ्याच इथल्या एका अन्य प्रतिसादात "(अगर मेरा बस चला तो-) मी अशा डझनभर पुतळ्या घरभर विखरून ठेवीन आणि त्यांची चित्रे रंगवीन" असे लिहीले आहे.
सेक्स डॉल्स, सेक्स्पो, कामसूत्र, खजुराहो इत्यादिकांचे मला अजिबात वावडे नाही, त्यामुळे फेफरे वगैरेंचा प्रश्नच नाही. या बाहुल्या आणि सेक्स्पो बघायला मला नक्कीच आवडेल.
खरोखर मला आश्चर्य याचे वाटते की माझ्या प्रतिसादातून असा अर्थ कसा निघू शकतो.
7 Jun 2023 - 7:10 am | चौकस२१२
चित्रगुप्त साहेब माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हा , तो होता प्रोफेश्वर साहेबांना उद्देशून
नकळत दुखावले गेले असाल तर क्षमा
7 Jun 2023 - 7:52 am | चित्रगुप्त
तरीच म्हणू असे कसे झाले. चला स्पष्ट झाले हे चांगले झाले. अनेक आभार.
7 Jun 2023 - 7:16 am | चौकस२१२
चुकीच्या जागी चिकटवला गेला माझ्यहातून, तो प्रतिसाद , त्रिवार माफी चित्रगुप्तजी
7 Jun 2023 - 11:23 am | टर्मीनेटर
कर्नलतपस्वी । अहिरावण । प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ कर्नलतपस्वी
तेरा वर्षांपूर्वी म्हणजे २०१० साली "Mussolini's Barber: And Other Stories of the Unknown Players who Made History Happen" हे 'ग्रीम डोनाल्ड' ह्यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर बरेच चर्चेत आले तेव्हा अनेकांचा पोटशूळ उठला होता 😀
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्यांना 'चहा-पोहे करून देणा-या' मिळत असतील ते कशाला ह्या बाहुल्यांच्या फंदात पडतील? इथे प्रश्न ज्यांना त्या मिळत नाहीत किंवा मिळाल्यातरी त्यांना 'चांगले चहा-पोहे' करता येत नाहीत अशा अभागी जीवांचा आहे जो ती उदात्त 'संस्कृती' सोडवू शकत नाही 😀
आणि खाली फाटक्यात पाय ह्यांनी म्हटलंय "कंड सूटल्यावर गावाला आग लावण्यापेक्षा घरात आंघोळ केलेली बरी!"
त्याप्रमाणे असे 'अभागी जीव' जर कंड सुटली म्हणून गावाला आग लावायला निघाले तर काय परिस्थिती उद्भवेल? आणि तीच उदात्त 'संस्कृती' त्यांना काय काय लेबले लावेल?
त्यापेक्षा बाहुली बरोबर का होईना, पण गावाला आग लावण्यापेक्षा करुदेत कि त्या बिचाऱ्यांना घरातच अंघोळ 😀
7 Jun 2023 - 12:54 pm | सुबोध खरे
बाकी, संस्कृती बूडवणा-या या बाहुल्या आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. चहा-पोहे करून देणा-या बाहुल्यांची गरज असताना तरुण पिढीला बाहुल्यांच्या पाशात ढ़कलण्याचा हा एक पाश्चिमात्य प्रयत्न असावा असे वाटते. ;)
हा प्रतिसाद बुरसटलेल्या मनोवृत्तीचे दर्शक आहे असे मी स्पष्टपणे म्हणतो आहे.
९० टक्के भारतीय हस्तमैथुन करतात असे सांख्यिकी दाखवते ( हा आकडा बहुधा यापेक्षा नक्कीच जास्त असावा).
यामुळे आपली संस्कृती आजपर्यंत बुडाली नाही.
ब्रम्हचर्य म्हणजेच जीवन आणि वीर्यनाश म्हणजे सर्वनाश असे भंपक विचार पसरवणारे तथाकथित संस्कृतीरक्षक आपल्या देशात मागच्या पिढीत असंख्य होते.
पिंजरा चित्रपटातील वाक्य--मास्तर, समाज तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारलाही नाही.
लैंगिकता हि एक नैसर्गिक उर्मी आहे आणि त्याचे योग्य प्रकारे शमन झाले नाही तर त्यातून विकृती उद्भवू शकते.
आपले लिंग नळ किंवा तत्सम नळकांडयासारख्या आयुधात अडकल्याने अपघात झालेले लोक बहुतेक डॉक्टरांनी पाहिलेले असतात. तसेच योनीत सुद्धा नको नको त्या वस्तू अडकलेल्या आढळतात.
Woman sues Samsung for $1.8M after cell phone gets stuck inside her vagina
https://www.google.com/search?q=lady+sues+samsung+for+mobile+stuck+in+va...
चहा पोहे करून देणाऱ्या बाहुल्या लग्न करून घरात आणल्यानंतर आपल्या जोडीदाराला लैंगिक सुखाला कधीना कधी पारखे करताना ९९ % घरात दिसून येते. यामुळेच ३५ ते ४५ % विवाहित पुरुष मधून मधून हस्तमैथुन करताना आढळतात. (हा आकडा बहुधा यापेक्षा नक्कीच जास्त असावा). कारण बायको समोर आपण हस्तमैथुन करतो हे कबुल करण्याची हिम्मत किमान ५० % पुरुषांना तरी नाही. याशिवाय यातून वैवाहिक जीवनात वादळ निर्माण होऊ हाकेला हि कल्पना असल्याने पुरुष गप्प राहणे पसंत करतात.
याचे कारण स्त्रियांची कामवासना पुरुषांपेक्षा जास्त उत्कट असते परंतु तिचा जीवनातील कालावधी कमी असतो. यामुळे जितका काळ पुरुष लैंगिक सुखाची अभिलाषा करतो तितकी वर्षे स्त्रियांची कामवासना राहत नाही. या विसंगती किंवा तफावतीमुळे पुरुष जास्त प्रमाणात हस्तमैथुन किंवा वेश्यागमन सारख्या गोष्टींमध्ये भाग घेताना आढळतात किंवा लैंगिक उपासमार सहन करतात .
एकदा माणूस( पुरुष किंवा स्त्री) आणि त्याची कामवासना हे आपण मोकळ्या मनाने स्वीकारले कि त्या वासनेचे शमन करण्याची साधने त्याज्य समजण्याची आवश्यकता नाही हेही लक्षात येईल.
असंख्य ठिकाणी जेथे स्त्री किंवा पुरुष एकटे असतील तेथे कामवासना शमन करण्यासाठी जोडीदार उपलब्ध नसतो. यात विवाहित असूनही स्त्रीपुरुष वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर दोघांनाही संबंध ठेवणे अशक्य असते. यामुळे वेश्यागमनापेक्षा अशा सेक्स डॉल्स या जास्त सुरक्षित आहेत. गुप्तरोगापासून संरक्षण, वेश्येकडे जाण्यात असलेला चोरटेपणा पोलिसांची भीती, वेश्येकडून ब्लॅकमेल होण्याची शक्यता अशा अनेक गुंतागुंतीतून सुटका हे या डॉल्स मुळे होऊ शकते.
हा विषय बराच खोल आहे
क्रमशः
7 Jun 2023 - 1:05 pm | आग्या१९९०
एकदा माणूस( पुरुष किंवा स्त्री) आणि त्याची कामवासना हे आपण मोकळ्या मनाने स्वीकारले कि त्या वासनेचे शमन करण्याची साधने त्याज्य समजण्याची आवश्यकता नाही हेही लक्षात येईल.
+१
7 Jun 2023 - 2:09 pm | बावडी बिल्डर
+१
7 Jun 2023 - 2:17 pm | टर्मीनेटर
+१११११
वैद्यकीय प्रश्नांबाबतची माझ्याकडची (ऐकिव्/वाचलेली) माहिती मी देईनच पण तुमच्यासारख्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीकडुन ती मिळाल्यास उत्तम 👍
ह्या क्रमशःच्या पुढिल क्रमशः च्या प्रतिक्षेत!
7 Jun 2023 - 8:24 pm | सुबोध खरे
या बाहुल्या "सिलीकोन" सारख्या द्रव्याच्या बनल्या असतात त्यामुळे त्यांची त्वचा सुद्धा नैसर्गिक स्त्रियांच्या त्वचेसारखी मृदू आणि मुलायम असते. अशा सुद्धा बाहुल्या निर्मित होतात ज्यांच्याशी संभोग करताना त्यांच्या योनीतुन नैसर्गिक द्रवासारखा चिकट द्रव स्त्रवतो ज्यामुळे वंगण मिळाल्याने संभोग करताना कोरडेपणा जाणवत नाही.
याच "सिलीकोन"द्रव्याचा उपयोग करून स्तनातील इम्प्लांट/ एक्सप्लॅन्ट बनवलेले असतात.
इम्प्लांट हे शल्यक्रिया करून स्तनाच्या आत बसवलेले असतात तर एक्सप्लॅन्ट हे स्तनाच्या बाहेरच्या बाजूस ब्रेसीयरच्या आत बसवलेले असतात ज्याचा स्पर्श, घट्टपणा हा नैसर्गिक स्तनांसारखाच असतो. अशी साधने स्त्रियांची कमनियता वाढवण्यासाठी सर्रास वापरली जातात. बॉलिवूडच्या बहुसंख्य नट्या यांची शरीरे अशी शल्य क्रिया करून "सुधारलेली" आहेत.
दुसऱ्या टोकाला स्तनांच्या कर्करोगानंतर शल्यक्रियेमुळे स्तन काढून टाकला असेल तर किंवा केवळ गाठ काढून टाकल्यामुळे स्तन असमतोल झाल्यास या साधनांचा उपयोग केला जातो. दोन स्तन असमतोल असल्याचा स्त्रीवर फार मोठा मानसिक परिणाम होत असतो. ( लिंगाचा आकार लहान असल्यास पुरुषाच्या मानसिकतेवर फार मोठा परिणाम होतो तद्वत)
अशा कृत्रिम साधनांचा उपयोग आपण लैंगिक सुख मिळवण्यासाठी करणे नैतिक आहे का? अशा तर्हेचे प्रश्न माणसाला बऱ्याच काळापासून पडत आलेले आहेत.
जेथे शासनकर्ते धर्म किंवा संस्कृती च्या पगड्याखाली होते तेथे अनैतिक गोष्टी बेकायदेशीर ठरवल्या गेल्या आणि त्याला कठोर शिक्षा सुद्धा ठरवल्या गेल्या.
ज्याठिकाणी बहुपत्नीत्वाची पद्धत आहे तेथे सुद्धा अशा साधनांचा वापर ( कायदेशीर किंवा बेकायदा) होताना आढळतो. याचे कारण चंचल मानवी स्वभाव हेच आहे.
अतिपरिचयात अवज्ञा या उक्तीप्रमाणे सुंदर बायको असणारे पुरुष मोलकरणीच्या मागे का लागतात हेच उत्तर येथे द्यावे लागेल.
आहार, निद्रा, भय आणि मैथुन या प्राणीमात्राच्या नैसर्गिक उर्मी मध्ये मानवी मेंदू उत्क्रांत झाल्यामुळे आहार आणि मैथुन यात मानवाचे समाधान होताना दिसत नाहीत. यामुळेच जगभर भय आणि निद्रेचा प्रकार वेगळे असले तरी मानवी प्रतिक्रिया सारखीच दिसते.
याउलट जेव्हा जेंव्हा शक्य असते तेंव्हा माणूस आहार आणि मैथुन यात वैविध्य आणण्याचे प्रयत्न करताना जगाच्या पाठीवर सर्वत्र इतिहासकाळापासून दिसते.
यापैकी आहारातील विविधता हि सर्व संस्कृतीत मान्य झालेली असली तरी मैथुन हे संततीशी संबंधित असल्यामुळे बहुसंख्य संस्कृतीत यावर बरेच निर्बंध आलेले दिसतात.
यात फक्त आदिम संस्कृतीत जेथे स्थिर आयुष्य नाही आणि स्त्रीला पुरुषाइतकेच स्वावलंबित्व आहे तेथे मैथुनात बराच खुलेपणा आढळतो. वारसाहक्काने देण्यासारखे काहीच नसते अशा संस्कृतीत स्त्रीवर निर्बंध घातलेले आढळत नाहीत. कारण पितृत्व सिद्ध करून आपल्या संततीला देण्यासारखे काही नसते.
जेंव्हा माणूस शेती करून स्थिर झाला आणि जमिनीचे मालकितत्व रूढ झाले तेंव्हा आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता आपल्याच संततीला जावी यास्तव स्त्रीवर निर्बंध टाकले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून खुल्या संभोगावर नियंत्रण आले.
जितकी बंधने जास्त तितका त्यातून बाहेर पडण्याचा मानवी स्वभाव असतो. यामुळे लैंगिक सुख थेट मिळत नसेल तर कृत्रिम साधनांनी मिळवण्याचा प्रयत्न वाढला. यातून अशी अनेक साधने निर्माण होत गेली.
जसा माणूस फिरता झाला तसा कुटुंबापासून संपर्क तुटत गेला तसे कृत्रिम साधनांनी लैंगिक सुख मिळवण्याची आवश्यकता वाढत गेली.
आणि मागणी तसा पुरवठा या न्यायाने या साधनांचा दर्जा सुधारत गेला.
वैद्यकीय शास्त्राप्रमाणे अशी कृत्रिम साधने वापरणे हे अपायकारक नाही. उलट लैंगिक शमन झाल्यास होणारे लैंगिक गुन्हे कमी होतात.
पौगंडावस्थेतील मतिमंद मुलाला तो आक्रमक होऊ नये म्हणून आपल्या हाताने मैथुन करून "रिता" ठेवणारी माउली माझ्या ऐकीवात आहे.
जेथे पुरुषाचे किंवा स्त्रीचे लैंगिक शमन होऊ शकत नाही अशा व्यक्तीने कृत्रिम साधन वापरणे यात गैर काय आहे?
तरुण विधवा स्त्रीने जिला मुले आहेत आणि त्यामुळे ती परत विवाह करूशकत नाही किंवा इच्छित नाही अशा स्त्रीने अशा तर्हेचे साधन वापरून आपली लैंगिक भूक भागवली तर त्यात गैर काय आहे? किंवा पती जर नपुंसक/ समलिंगी आहे आणि स्त्रीचे समाधान करू शकत नाही अशा स्त्रीने कुठे भीक मागायला जायचे?
पती सीमेवर हुतात्मा झाला किंवा विमान अपघातात मारले गेलेल्या वैमानिकाच्या पत्नीने काय करायचे?
मनोरुग्ण असलेल्या स्त्रीच्या पतीने लैंगिक सुख मिळवण्यासाठी काय करावे? पुरुषाने सुख मिळवण्याचा प्रयत्न केल्यास ती स्त्री इतक्या जोरात आरडा ओरडा करत असे आणि आक्रमक होत असे कि त्या सैनिकाला लैंगिक सुख मिळणे अशक्य झाले होते. अशा व्यक्तीने काय करावे? फसवणूक झालेली स्पष्ट दिसत असले तरी भारतीय कायद्यात अशा माणसाला घटस्फोट मिळण्याची कोणतीही तरतूद नाही
या सर्व व्यक्ती मी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत.
7 Jun 2023 - 8:47 pm | आग्या१९९०
छान माहितीपूर्ण प्रतिसाद.
7 Jun 2023 - 8:52 pm | गवि
एक डॉक्टरच इतके वस्तुनिष्ठ, परखड सत्य पण तरीही माणुसकीच्या ओलाव्यासहित मांडू शकतो. _/\_
8 Jun 2023 - 2:14 pm | रंगीला रतन
एक डॉक्टरच इतके वस्तुनिष्ठ, परखड सत्य पण तरीही माणुसकीच्या ओलाव्यासहित मांडू शकतो. _/\_
+०८०६२०२३
8 Jun 2023 - 6:30 pm | कॉमी
सुरेख प्रतिसाद.
8 Jun 2023 - 7:13 pm | टर्मीनेटर
क्या बात है कॉमी... ह्या धाग्यावर शंभरावा प्रतिसाद तुमचा आला 😀
7 Jun 2023 - 10:51 pm | टर्मीनेटर
अप्रतिम! 'चेरी ऑन द टॉप' प्रतिसाद 👍
हिअर कम्स डॉक्टर सुबोध खरे...
अशाच सुंदर माहितीपूर्ण प्रतिसादाची तुमच्याकडून अपेक्षा होती म्हणूनच मगाशी मी तुम्हाला त्यासंबंधी विनंती केली, कारण मला माहिती होतं तुम्ही निराश नाही करणार!
उण्यापुऱ्या अडीच दिवसात ह्या लेखाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी खरंच कल्पना नव्हती केली. छान साधक-बाधक चर्चा चालू आहे. अनेक मिपाकर पुरुषांबरोबरच तीन महिला सदस्याही 'अशा' विषयाच्या धाग्यावर प्रतिसाद देतात हि खूप मोठी गोष्ट आहे. हा लेख मी लिहिला असला तरी तो समस्त मिपाकरांचा धागा आहे आणि त्यामुळे चर्चेतही सर्वांनी निसंकोचपणे सहभागी व्हावे अशी इच्छा आहे. जी काही तुमची मते असतील ती मांडा, मग ती धागा विषयाच्या किंवा एखाद्या प्रतिसादाच्या समर्थनार्थ असोत कि विरोधातली, पण ती मांडा. ह्या विचारमंथनातून आपल्या हाती काहीतरी चांगलेच लागेल अशी खात्री आहे.
खरं आहे. असंच एक उदाहरण मी पण अनेक वर्षे पाहिलंय. नवऱ्याची फिरतीची नोकरी आणि ४ मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा ठार मतिमंद. मती मंद कुठला, तर त्याही पुढची केस. बाकीची मंदबुद्धी मुले निदान हिंडतात फिरतात तरी कोणातरी कुटुंबीयांबरोबर. पण हा मुलगा १८ वर्षे पलंगावर एकाच जागेवर बसून असायचा आणि कायम त्याचे हातवारे चालू असायचे आणि अधुन मधून आक्रमक व्हायचा, नखं पण कापून देत नसल्याने बचुकुं त्याचे हात बांधून ठेवायचे राहिले तर स्वतःचाच चेहराओरबाडून रक्तबंबाळ करून घ्यायचा. शी, शु ला वेळेवर नेले नाही तर ते पण अंथरुणातच! झोपायचा पण नाही महिना महिना.
त्याचे वडील फिरतीवर गेले कि त्या माउलीला तुम्ही वर उल्लेख केलेला प्रकार करायला लागायचा, नाहीतर खूपच आक्रमक व्हायचा. अशा मुलांना आयुष्य जास्ती नसतं हे खरंतर त्यांच्यासाठी वरदान आहे. हा मुलगा पण १८ वर्षांचा झाल्यावर गेला, पण तो पर्यंत त्या आईवडिलांनी आणि ३ लहान भावंडानी अजिबात तक्रार न करता अतिप्रचंड त्रास सहन केलाय!
ह्या सुंदर प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
8 Jun 2023 - 7:09 am | चौकस२१२
डॉ़क्टर्
माहितीपूर्णक आणि विचहरपूर्वक प्रतिसाद...
तुम्ही मांडलेले प्रश्न अर्थातच शेकडो वर्षे आहेत .. त्याला हा कृत्रिम साधने हा उपाय आहे बरोबर, प्रत्येक समाज त्याला झेपेल तसे याचा उघड वापर करू देतो .. उदाहरण चीन मध्ये अशी दुकाने आहेत पण त्याला सरळ पणे सेक्स टॉय दुकान असे दाखवले जात नाही ... म्हणजे सरकार ला ह्याची जाणीव आहे कि समजला याची गरज आहे पण परंपरा एकदम बदलणे त्यानं अवघड जात असणार आणि त्यामुळे असे "स्मित हासय " केल्यासारखे याला परवानगी
आणि गंमत म्हणजे हि खेळणी बरीचशी चीन मध्येच बनलेली असतात ( कदाचित भारतात पण बनत असतील पण फक्त एक्स्पोर्ट साठी ! )
पाचिमटी देशात सुद्धा नियम वेगवेगेल दिसतात उदाहरण यूरोपीय देशात आणि पॅसिफिक मधील आंग्ल देशात दोन्हीकडे जरी वेश्या वयवसाय/ प्रौढ मासिके कायद्यात बसत आहे तरी दोन्ही कडे याच्या जाहिराती वर निर्बंध वेगळे आहेत , युरोप मध्ये सर्रास टीव्ही वर जे दिसते ते येथे तेवढे "मोकळे धाकेले " नसते
8 Jun 2023 - 10:12 am | सुबोध खरे
प्रत्येक समाज त्याला झेपेल तसे याचा उघड वापर करू देतो
काही गोष्टी अशा आहेत कि त्याचा उघडपणे उच्चार किंवा वापर अशक्य आहे. उदा आपल्या आईवडिलांचा शृंगार.
ज्यामुळे आपला जन्म झाला आहे अशी संपूर्ण सत्य असलेली गोष्ट सुद्धा आपण उघडपणे चर्चा करू शकत नाही.
अनेक गोष्टी अशा आहेत कि त्या बेकायदेशीर नसल्या तरी योग्य किंवा औचित्यपूर्ण नाहीत. उदा स्त्रीरोगतज्ज्ञाने अर्धी चड्डी आणि चिवटे बावटे वाला शर्ट घालून स्त्रीरुग्णांची तपासणी करणे.
तसेच आहे.
निरोध किंवा सॅनिटरी नॅपकिन या गोष्टी कितीही सत्य आणि उघड असल्या तरीही ग्राहक किंवा औषध विक्रेता वेष्टनातूनच नेतो/देतो.
8 Jun 2023 - 10:42 am | कर्नलतपस्वी
आभार.
8 Jun 2023 - 9:14 pm | राजेंद्र मेहेंदळे
सगळे मुद्दे मान्य आहेत, या लेखामुळे बरेच चांगले ब्रेन स्टॉर्मिंग होत आहे, हे बेस्ट
9 Jun 2023 - 11:09 am | अथांग आकाश
खरे साहेब वस्तुनिष्ठ प्रतिसाद खुप आवडला!
5 Jun 2023 - 9:46 pm | कर्नलतपस्वी
या बाहुल्या फक्त कंड च भागवू शकतात. इतर शारीरिक, मानसिक, सामाजिक गरजा पुर्ण करू शकत नाही.
मेडीकली यांचा काय वाईट परिणाम होऊ शकतो यावर विचार लेखात केलाच नाही. एलर्जी,फ्रॅक्चर, जखमा,अन-हैजीनिक परिस्थितीत होणारे त्वचा रोग इ. .
कंडच भागवायची असेल तर इतर काय साधने आहेत ते वयस्क सभासदांना सांगण्याची गरज वाटत नाही.
स्त्रि पुरूष व्यस्त प्रमाण आहे. लिंग निदानावर प्रतिबंध, भ्रुण हत्या, गर्भपात प्रतिबंध बेटी बचाओ, बेटी पढाओ बेटी बढाओ सारख्या योजना कार्यान्वित करून व्यस्त प्रमाण कमी करायचा प्रयत्न होतोय. यावर समाजात जाग येत आहे.
या बाहुल्या आल्यावर हे व्यस्त प्रमाण आणखीन वाढेल.
आगोदरच समाजात एकलकोंडे पणा वाढत चाललाय. कमीत कमी विवाह संस्थेमध्ये एकाला दुसर्याची साथ असते त्याचा आभाव म्हातारपणी या सजीव+निर्जीव कुटुंबातील सजीवाला नक्कीच भासेल. निर्जीवाला काहीच फरक पडणार नाही.
या प्रकारच्या संबध करता कुटुंबातील इतर सदस्य कितपत सहमत असतील?.
ही अनैसर्गिक पद्धत नैसर्गिक पद्धतीला कितपत सुटेबल असेल सांगता येणे कठीण आहे.
5 Jun 2023 - 9:52 pm | आग्या१९९०
भविष्यात AI सेक्स डॉल सगळ्या गरजा पूर्ण करू शकतील.
5 Jun 2023 - 10:47 pm | फाटक्यात पाय
कंड भागवण्याखेरीज दुसरी अपेक्षा नसावी.
मेडिकली वाईट परिणाम? हास्यास्पद! नागपाडा(मुंबई) इथे असलेल्या एका STD क्लिनिकमध्ये काही काळ उमेदवारी केली होती,एका सामाजिक संस्थेसाठी, तेव्हा गुप्तरोगाचे प्रकार जवळून बघितले होते. लोकांना एक आंधळा विश्वास आहे की निरोध वापरल्याने संरक्षण मिळते. अशा लोकांना साष्टांग प्रणाम!
व्यस्त प्रमाण मानसिकतेवर ठरत आहे. मानसिकता बदला, देश पुढे जाईल.
वृद्धापकाळात एक जोडीदार मानसिकदृष्ट्या वा शरीराने थकल्यास हा उपाय हमखास साथ देईल,शिवाय निर्जीव असल्याने व्यभिचाराचे पातक लागणार नाही.
ज्याला आवडते त्याने ते खावं, मला जर अळूचे फतफते आवडत असेल तर चिकन तंदुरी खायला सांगणाऱ्या महाभागांना दुर्लक्षित करावे
6 Jun 2023 - 11:12 am | कर्नलतपस्वी
मला जर अळूचे फतफते आवडत असेल तर चिकन तंदुरी खायला सांगणाऱ्या महाभागांना दुर्लक्षित करावे
शत प्रतिशत सहमत. लहानपणापासून ऐकत आलोय दुसर्यांच्या फाटक्यात पाय घालू नये.
बाकी या गरीब बिचार्या बाहुल्यांचे तोट्या बरोबर फायदे पण दिसतात.
कुठलीच मागणी नाही,तक्रार नाही,जन्मापासून मरेपर्यंत एकच ड्रेस घातला तरी आणी नाही घातला तरी काहीच फरक पडणार नाही. कुठलाच खर्च नाही फक्त आनंदी आनंद.
उमेदवारी केली तर एवढे अनुभव मग ज्यांनी चाळीस वर्ष दवाखान्याची नोकरी त्यांना किती,कसे अनुभव आले असतील.
वृद्धापकाळात एक जोडीदार मानसिकदृष्ट्या वा शरीराने थकल्यास
हवाई किल्ले बनवण्यासाठी जागा, पैसे,सरकारी परवाना काहीच लागत नाही.
लहानपणी ऐकलेली गाणी पुन्हा म्हातारपणी म्हणावी लागतील.
गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?
उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?
पण तीला बिचारीला काय कळणार! हा आनंद सुद्धा फक्त स्वानंदच की!
बाकी आमचं काय! सगळ झालयं,
तुका म्हणे आता उरलो उपकारक पुरता.
आता विसाव्याचे दिन....
संधीप्रकाशात अजुन तो सोने तो माझी लोचने मिटो यावी
तर...
अब व(ह)तन तुम्हारे हवाले साथियों.
फा पा भौ हलकेच घ्या.
6 Jun 2023 - 3:57 pm | फाटक्यात पाय
मला वाटले होते जुगलबंदी होईल, पण तुम्ही स्वस्तात विकेट देत आहात.
तुम्हाला दुखवायचा हेतू मुळीच नव्हता, पण नाविण्याला नको म्हणण्याचा तुमचा सूर पाहून थोडी फिरकी घेण्याचा हेतू होता.
माझ्याकडून तुम्ही दुखावला गेला असाल तर क्षमस्व
6 Jun 2023 - 4:22 pm | कर्नलतपस्वी
फिरकी वेकंट राघवन, बेदी बरोबर संपली.
वन वे ट्रॅफिक आवडत नाय.
चलो बच्चे माफ कर दिया.
5 Jun 2023 - 10:26 pm | प्रसाद गोडबोले
एक दोन (किंव्वा तीन) वेळेस काहीतरी नवीन वेगळे म्हणुन ट्राय करुन पहायला आवडेल.
पण प्रत्यक्शाहुन प्रतिमा सुंदर हे काही मान्य नाही.
संभोगातील सुख हे शिश्नामध्ये / योनीमध्ये निर्माण होत नसुन मेंदु मध्ये निर्माण होत असते, शिश्न /योनी ही तर केवळ साधने आहेत , रेस्ट इट्स ऑल अ टोटली ब्रेन गेम !
नुसता गुलुगुलु बोलण्यातील रोमांन्स , पहिला स्पर्ष , नकारात दडलेला होकार , पहिल्या मिठित घेताना होणारा लटका विरोध , चुंबन करतानाचा जीभेचा लपंडाव , किस करताना अचनक केलेल्या पहिल्या स्क्वीझ नंतर आलेला उत्स्फुर्त सीत्कार, अन-हुक करताना आपला संघर्ष , अन तो लक्षात घेऊन अलगद हसत झटक्यात अन-हुक करुन दिलेला गो- अहेड सिग्नल.... वगैरे वगैरे...
बाकी अजुनही सविस्तर लिहिता येईल पण हा सारा अनुभवाचा मामला आहे ;) आणि हे सर्व ह्या डॉल्स सोबत कितपत अनुभवता येईल ह्याबद्दल शंकाच वाटते .
5 Jun 2023 - 10:41 pm | बावडी बिल्डर
हे सगळं एकदाच होतं. सेक्सडाॅल पूढची पायरी आहे.
7 Jun 2023 - 12:02 pm | टर्मीनेटर
"पण प्रत्यक्शाहुन प्रतिमा सुंदर हे काही मान्य नाही."
पसंद अपनी अपनी 😀
१००% सहमत!
इथेही सेक्स डॉल (मेल असो कि फिमेल) हे एक साधन आहे. त्याद्वारे १००% नैसर्गिक मैथुनाचा आनंद मिळेल असा दावा कोणीही करु शकत नाही. माझ्यामते त्यांचा वापर ही हस्तमैथुनाच्या पुढची लेव्हल आहे, शेवटी इट्स ऑल अ टोटली ब्रेन गेम 😀
हे ज्यांच्या नशिबी नसते त्यांचे काय? त्यांच्यासाठी ह्या डॉल्स एक चांगला पर्याय ठरु शकतील की!
नकोच ते 😀 मी पण त्यावरच्या प्रतिसादात लिहिण्यच्या ओघात 'वैविध्यपुर्ण अनुभव' लिहित गेलो तर माझ्या घरावर फेमिनीस्ट लोकांचा मोर्चा यायचा 😂 😂 😂
5 Jun 2023 - 10:28 pm | बावडी बिल्डर
मस्त प्रकार आहे हा. टर्मीनेटर साहेबांनी शेअर केलेला अल्बम पाहून ऊत्सूकता चाळवली नी लगेच सेक्स डोल पोर्न गूगलवर पाहून आलो. काही शंकाचे निरसन झाले नाही. जसे सेक्स डोल ह्या कायम एकाच पोजीशन मध्ये असतात का? एका पोर्न मध्ये सेम सेक्स डाॅल वेगवेगळ्या पोसीशन्स मध्ये दिसली ती एकच असावी की वेगवेगळ्या ते कळाले नाही. टर्मीनर सरांनी सांगावे अशी विनंती करतो. ही डाॅल आणली तर ठेवायची कूठे? किंवा आणायची कशी? कुणी पाहीलं तर काय? आपण डाॅल ला एक्सेप्ट करू पण समाज आपल्याला एक्सेप्ट करेल का? गूगलला किंमत पाहीली पावने दोन लाख रूपये आहे. मिपाकर वर्गनी करून घेनार असतील तर कळवावे. पुस्तकांप्रमाने सर्व मिळून घेऊ नी सर्व आस्वाद घेऊ. (अर्थात वेगवेगळा). ;)
पण पावने दोन लाख “बाहेर” खर्च केले तर कितीतरी नवववीन जिवंत वस्तू मिळतील शिवाय रोजगार निर्मीतीही होईल. पण इतकं अफाट सौंदर्य नाही मिळनार. थोडक्यात इमॅजीनेशेनला रिएलीटीत ह्या बाहूल्याच कन्वर्ट करू शकतात.
7 Jun 2023 - 2:06 pm | टर्मीनेटर
मी वाचलेल्या माहितीनुसार, बाहुलीच्या शरीराची लवचिकता तिचा सांगाडा बनवण्यासाठी वापरलेलया मटेरियलवर अवलंबून असते. पुर्णपणे स्टील पासून बनवलेला सांगाडा आणि प्लॅटिनम कोटेड सांधे (जॉइंट्स) असलेल्या बाहुल्या सर्वात लवचिक आणि दिर्घायुषी असतात. त्यांचे हात, पाय, मान, कंबर, गुडघे, पावले, हाता-पायांची बोटेच काय त्यांची पेरेही सजीव माणसांप्रमाणे वळू शकतात. त्यांना जवळपास माणसाप्रमाणे कुठलीही पोजीशन देता येते. अर्थात हे सगळे बहुतेक करुन 'हाय एंड' मॉडेल्स मध्ये मिळते. माझ्या (जालावर) पाहण्यात आलेल्या अशा बाहुल्यांच्या किंमती भारतीय रुपयांत दोन लाख पासष्ट हजारांपासून सुरु होतात.
बाकी PVC आणि ॲल्युमिनिअम आणि स्टील पासून बनवलेल्या सांगाड्याच्या तुलनेने स्वस्त* बाहुल्याही बऱ्यापैकी लवचिक असतात आणि त्यांनाही वेगवेगळ्या पोजीशन्स देता येतात, पण वरच्या प्रकाराएवढ्या नाही. तसेच त्यांचे आयुष्यही कमी असते.
आणायची कशी ह्याची काळजी नसावी, उत्पादक कंपन्या घरपोच सेवा देतात! बाकिचे प्रश्न मात्र ज्याचे त्याने विचारपुर्वक सोडवायचे असतात 😀
*मुळात सेक्स डॉल हा प्रकार स्वस्त अजिबात नाही, त्यामुळे तुलनेने स्वस्त असे लिहिले आहे.
5 Jun 2023 - 10:28 pm | बावडी बिल्डर
मस्त प्रकार आहे हा. टर्मीनेटर साहेबांनी शेअर केलेला अल्बम पाहून ऊत्सूकता चाळवली नी लगेच सेक्स डोल पोर्न गूगलवर पाहून आलो. काही शंकाचे निरसन झाले नाही. जसे सेक्स डोल ह्या कायम एकाच पोजीशन मध्ये असतात का? एका पोर्न मध्ये सेम सेक्स डाॅल वेगवेगळ्या पोसीशन्स मध्ये दिसली ती एकच असावी की वेगवेगळ्या ते कळाले नाही. टर्मीनर सरांनी सांगावे अशी विनंती करतो. ही डाॅल आणली तर ठेवायची कूठे? किंवा आणायची कशी? कुणी पाहीलं तर काय? आपण डाॅल ला एक्सेप्ट करू पण समाज आपल्याला एक्सेप्ट करेल का? गूगलला किंमत पाहीली पावने दोन लाख रूपये आहे. मिपाकर वर्गनी करून घेनार असतील तर कळवावे. पुस्तकांप्रमाने सर्व मिळून घेऊ नी सर्व आस्वाद घेऊ. (अर्थात वेगवेगळा). ;)
पण पावने दोन लाख “बाहेर” खर्च केले तर कितीतरी नवववीन जिवंत वस्तू मिळतील शिवाय रोजगार निर्मीतीही होईल. पण इतकं अफाट सौंदर्य नाही मिळनार. थोडक्यात इमॅजीनेशेनला रिएलीटीत ह्या बाहूल्याच कन्वर्ट करू शकतात.
6 Jun 2023 - 12:58 am | साहना
भारतीय इन्सेल पुरुषांसाठी ह्याला सबसिडी वगैरे देऊन आयात केले तर चांगलेच आहे.
Pradhanmantri Recreational And Therapeutic Intimacy Creating Robotic Intelligent Truelove Initiative = PRATICRITI
फक्त आधार कार्ड लिंक केले कि झाले.
7 Jun 2023 - 2:35 pm | टर्मीनेटर
क्रिएटिव्हिटी आवडली 👍 😂
सबसिडी नको... आधिच राष्ट्रीय संपत्तीची काय कमी उधळपट्टी होत आहे? त्यापेक्षा स्वयंसेवी संस्था/एन.जी.ओ वगैरेंनी पुढाकार घेउन त्या फुकट वाटाव्यात. आणि आयात करण्यापेक्षा 'मेक इन इंडिया' इनिशीएटीव अंतर्गत उत्पादकांसाठी पायघड्या घालाव्यात, त्यातुन देशात रोजगार निर्मितीही वाढेल 😀
6 Jun 2023 - 1:09 am | कपिलमुनी
मर्यादा पाळून लिहिलेला उत्तम लेख..
वेस्ट वर्ल्ड या मालिकेत या पुढील तंत्रज्ञानाने बनवलेल्या बाहुल्या पाहायला मिळतात.. इच्छुकांनी पहिले काही भाग जरूर बघावेत.
7 Jun 2023 - 6:46 am | प्रचेतस
वेस्ट वर्ल्ड पहिला सीजन पाहून झालाय अतिशय वेगळी थीम असूनही कमालीचा संथ वाटला, त्यातले अँड्रॉइड्स जबरदस्त आहेत.
7 Jun 2023 - 3:39 pm | टर्मीनेटर
इंटरेस्टींग...
वेस्ट वर्ल्ड बघीतली नाहिये... प्राईमवर दिसत आहे, बघतो सवडीने.
6 Jun 2023 - 4:35 am | हणमंतअण्णा शंकर...
पाच वर्षांपूर्वी ह्या डॉल्स प्रत्यक्ष 'बघायला' मिळाल्या होत्या. तेव्हाही त्यांची गरज ही ट्रान्जिटरी टेक म्हणून आहे हे जाणवले होते. कितीतरी मोठ्या महानुभावांना यात व्हायेबल बिझनेस दिसत नाही त्यालाही हे एक कारण असावे.
अर्थात तेव्हा मेंदूचिपा किती प्रगत होतील याबद्दल मला शंका होती. नुकतेच न्युरालिंकला मानवी चाचण्यांची परवानगी देण्यात आली. त्यामुळे ह्या डॉल किती प्रगत अवस्थेपर्यंत पोचतील अशी मला शंका आता आहे.
कोणताही अनुभव मेंदूत पुनुरुत्पादित करणे ही खूप दूरची गोष्ट असे मला वाटत नाही.
त्यामुळे या डॉल्स काही काळाने जेजू बेटांसारख्या म्युझियममधल्या एक आर्टिफॅक्ट होतील असे वाटते.
शिवाय या विश्वात जे जे अस्तित्त्वात असते ते नैसर्गिकच असते. तेवढीच एक गंमत म्हणून मलाही अशा डॉल्स एखादेवेळेस ट्राय करायला आवडतील. परंतु सगळ्या जैविक गोष्टी पंचेद्रियपूरक परिपूर्ण होत नाहीत तोवर मला फार मजा येणार नाही. उदा. सांद्रता. गंध. शहारा. इत्यादी गोष्टी सांभाळणे प्रचंड अवघड आहे.
डोळ्यांचे रंग कस्टमाईज करता येणे वगैरे ठीक आहे. प्रत्यक्ष खेळात त्यांची मजा घेणे आणि खेळापूर्वी मनोधारणा तयार करणे यात फरक आहे.
7 Jun 2023 - 4:41 pm | टर्मीनेटर
तसे झाले तर हा व्हर्चुअल रिऍलीटी सारखा प्रकार होईल, आणि त्यातून एकवेळ (रोग नसूनही उगाच ज्याला गंभीर रोग असल्याचे भासवले गेलेल्या) 'स्वप्नदोष' म्हणतात त्याप्रमाणे वीर्यस्खलन होईल पण प्रत्यक्ष शरीराने कामक्रीडा केल्याचे कितपत समाधान त्यातून मिळेल? आणि वीर्यस्खलन न होता तो अनुभव जर फक्त मेंदूंपुरताच मर्यादित रहाणार असेल तर हा मैथुनाचा सर्वात अनैसर्गिक प्रकार ठरेल.
बाहुली बरोबर का होईना पण प्रत्यक्ष शरीराने कामक्रीडा केल्याचे समाधान तरी वापरकर्त्याला मिळत असल्याने जरी आपण म्हणता तसे तंत्रज्ञान नजीकच्या भविष्यात उपलब्ध झाले तरी सेक्स डॉल्स इतिहासजमा होण्याची वेळ लवकर येईल असे वाटत नाही. उलट नव्या तंत्रज्ञानामुळे स्पर्धा निर्माण झाल्यास डॉल्सच्या किमती कमी होऊन त्यांचा खप वाढण्याची शक्यता मलातरी अधिक वाटते.
वरील दोन गोष्टी सोडून बाकी प्रतिसादाशी सहमत!
7 Jun 2023 - 6:44 pm | सुबोध खरे
सगळ्या जैविक गोष्टी पंचेद्रियपूरक परिपूर्ण होत नाहीत तोवर मला फार मजा येणार नाही. उदा. सांद्रता. गंध. शहारा. इत्यादी गोष्टी सांभाळणे प्रचंड अवघड आहे.
भूक लागलेली असताना आपण पटकन एखादा गार ढोण वडापाव किंवा एखादं केळं खाऊन घेतो, तेंव्हा तेथे आपल्या रसनेचे दृष्टीचे आणि घ्राणेंद्रियाचे समाधान होत नाहीच.
परंतु भूक मिटविण्याचे काम मात्र हे अन्न करते. तशीच स्थिती आहे.
ज्यावर प्रेम आहे अशा जोडीदाराबरोबर सजवलेला शृंगार हे वेश्येबरोबर उरकलेल्या संभोगाच्या जवळपास सुद्धा येत नाही तर निर्जीव बाहुलीचा कसा येणार?
6 Jun 2023 - 10:10 am | अथांग आकाश
वेगळ्याच विषयावरील माहितीपूर्ण लेखासाठी अनेक आभार्स!!
आणि मला एका गोष्टीचे कौतुक वाटते, लेखासाठी तुम्हाला कुठल्याही विषयाचे वावडे नसते.
हो नक्कीच आवडेल :-)
6 Jun 2023 - 11:30 am | Bhakti
३२-२०-३२ असा प्रमाणबद्ध लेख!
6 Jun 2023 - 11:41 am | कर्नलतपस्वी
याच्यापेक्षा जास्त सुंदर आणी समर्पक प्रतिसाद होऊच शकत नाही.
प्रतिसाद आवडला.
6 Jun 2023 - 11:49 am | अथांग आकाश
असेच म्हणतो!
याच्यापेक्षा जास्त सुंदर आणी समर्पक प्रतिसाद होऊच शकत नाही.
6 Jun 2023 - 12:31 pm | वामन देशमुख
अगदी मनमोहक, घाटदार, सुंदर लेखशिल्प!
8 Jun 2023 - 5:40 pm | टर्मीनेटर
अथांग आकाश । भक्ती । वामन देशमुख
प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
@ भक्ती,
कर्नल साहेब आणि अथांग आकाश ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे धागा विषय बरोबर पकडुन, कमीत कमी शब्दांत दिलेला 'अर्थपुर्ण' प्रतिसाद अतिशय आवडला 👍
लेखातली 'एव्हलिन' (Avalynn) डोळ्यांसमोर आली एकदम 😀
6 Jun 2023 - 2:49 pm | चांदणे संदीप
ऐकून होतो या डॉल्सविषयी. पण, इतकी सखोल माहिती आणि चित्रे पहिल्यांदाच पाहिली. टर्मिनेटरजी हॅट्स ऑफ टू यू! ___/\___
तारतम्य आणि संयम बाळगून असेल तर जगात कोणताही विषय टॅबू होणार नाही हे नक्की. आपल्या (काही) पूर्वजांना टॅबू वैग्रे प्रकार शिवला नव्हता त्यामुळेच वेळोवेळी त्यांच्या(च) चरणाशी नतमस्तक होऊ वाटते. :)
अवांतर : वर एका प्रतिसादात श्री हिटलर वाचून फारच हसू आले. =))
सं - दी - प
6 Jun 2023 - 4:37 pm | Trump
अज्ञानात सुख असते. असुद्यात तुम्हाला शुभेच्छा.
8 Jun 2023 - 9:25 am | चांदणे संदीप
हिटलरला श्री हिटलर म्हणण्याइतपत ज्ञान मला मिळालं नाही ह्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.
सं - दी - प
8 Jun 2023 - 11:28 am | Trump
पुन्हा एकदा शुभेच्छा.
8 Jun 2023 - 1:40 pm | चांदणे संदीप
आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद! :)
सं - दी - प
8 Jun 2023 - 5:56 pm | टर्मीनेटर
श्री चांदणे संदीप यांसी सप्रेम नमस्कार 😀
+१०००
कुठे गेले ते लोक, आणि कुठे हरवली आपल्या पुर्वजांची ती प्रगत संस्कृती? आता उरलेत केवळ 'तथाकथीत' संस्कृतीरक्षक 😀
6 Jun 2023 - 4:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
मिपाकरांचा व्यासंग बघुन मला नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे. कुमार सरांच्या लेखावरुन टर्मिनेटर ना धुमारे फुटले आणि हा सुंदर लेख जन्माला आला या बद्दल दोघांचे आभार.
लेख उत्तम माहितीपुर्ण झाला आहे. वैद्यकीय्,सामाजिक्,मानसिक्,आर्थिक् असे अनेक कंगोरे या विषयाला आहेत, पण अर्थातच एका लेखात ते सगळे शक्य नाही. त्यामुळे वेगवेगळे लेख लिहावेत ही विनंती.
8 Jun 2023 - 6:05 pm | टर्मीनेटर
+१०००
अगदी खरे आहे! लेखच्या मुळ आरखड्यात थोडी वैद्यकीय आणि तांत्रीक माहितीही लिहिली होती, पण लेखाची लांबी फारच वाढत असल्याने ती संपादित केली.
पण हरकत नाही, धाग्यावर सुरु असलेल्या चांगल्या चर्चेतुन विषयाच्या अन्य पैलुंवरही प्रकाश पडत आहे!
6 Jun 2023 - 9:34 pm | चित्रगुप्त
कुशळ चितारी विचित्र । तेणें निर्माण केलें चित्र ।
देखतां उठे प्रीति मात्र । परंतु तेथें मृत्तिका ॥ ७॥
नाना वनिता हस्ती घोडे । रात्रौ देखतां मन बुडे ।
दिवसा पाहतां कातडें । कंटाळवाणें ॥ ८॥
काष्ठी पाषाणी पुतळ्या । नाना प्रकारें निर्मिल्या ।
परम सुंदर वाटल्या । परंतु तेथें पाषाण ॥ ९॥
नाना गोपुरीं पुतळ्या असती । वक्रांगें वक्रदृष्टीं पाहती ।
लाघव देखता भरे वृत्ती । परंतु तेथें त्रिभाग ॥ १०॥
खेळतां नेटके दशावतारी । तेथें येती सुंदर नारी ।
नेत्र मोडिती कळाकुसरीं । परी ते अवघे धटिंगण ॥ ११॥
(श्री दासबोध दशक ६, समास ८)
https://sexdollgenie.com/blogs/news/how-sex-dolls-are-changing-cultural-...
कृत्रिम रतिसुखाच्या पलिकडले पण काही उपयोग, विशेषतः एकाकी पडलेले लोक, विधुर वगैरेंना या सिलिकॉन
पुतळ्यांचा होत असावा.
(अगर मेरा बस चला तो-) मी अशा डझनभर पुतळ्या घरभर विखरून ठेवीन आणि त्यांची चित्रे रंगवीन.
6 Jun 2023 - 9:51 pm | नागनिका
नैतिकतेच्या मर्यादा न ओलांडताही हा विषय लिहू शकता येणे शक्य आहे हे सिद्ध केले तुम्ही!.
रच्याकने, येथील संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती इ. गोष्टींमुळे भारतात हे फॅड पसरले नसावे का?
8 Jun 2023 - 10:26 am | सुबोध खरे
येथील संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती इ. गोष्टींमुळे भारतात हे फॅड पसरले नसावे का?
भारतात घरे सरासरी आकाराने लहान आहेत. याशिवाय वैयक्तिक स्वातंत्र्याची कल्पना पाश्चात्य कल्पनेपेक्षा वेगळी आहे. नवऱ्याचे कपाट बायको सर्रास उघडून पाहते किंवा बायकोचे बहुतांश व्यवहार नवऱ्याला माहिती असतात.
मूल १८ वर्षाचे झाले तरी त्याच्या स्वातंत्र्याचा भारतात पाश्चात्य देशांपेक्षा जास्त संकोच झालेला आहे.
यामुळेच एवढी मोठी बाहुली बायको/ आईवडिलांपासून लपवून कुठे ठेवणार हा एक मोठा प्रश्न आहे.
त्यामानाने पिवळी पुस्तके आणि निल चित्रफिती लपवणे फार सोपे आहे.
आपला मुलगा हस्तमैथुन करतो हे बहुसंख्य आईवडिलांना माहिती असतं म्हणून अशा उत्तान गोष्टी सार्वजनिक प्रदर्शनासाठी आईवडिल कधीच मान्य करणार नाहीत.
आपला नवरा/ बायको हस्त मैथुन करतो/ करते हे जोडीदाराला मान्य सुद्धा होणार नाही कारण आपण कुठे तरी कमी पडतो याचा न्यूनगंड ( नवऱ्यासाठी त्याच्या पौरुषत्वाचा तो अपमान असतो आणि स्त्री साठी तिच्या सौंदर्याची कमतरता.
त्यामुळे जोडीदाराबद्दल संताप निर्माण होतो आणि या दोन्हीचे मिश्रण त्यांना ते मान्य करण्यापासून त्यांना थांबवत असते.
बऱ्याच गोष्टी अंधारात असणे/ राहणे हे संसारात नातेसंबंध टिकवण्यासाठी आवश्यक असतात.
त्यातील लैंगिक विसंगती( sexual incompatibility) गुलदस्त्यात राहणे हा एक महत्वाचा घटक आहे.(अज्ञानात आनंद असतो)
8 Jun 2023 - 7:04 pm | टर्मीनेटर
@ नागनिका
माणूस हा अतिशय स्वार्थी प्राणी आहे, वेळ आल्यावर तो 'संस्कृती' वगैरे सारख्या अमूर्त संकल्पनांपेक्षा त्याच्या भौतिक 'गरजांनाच' पहिले प्राधान्य देत असतो. एकत्र कुटुंब पद्धतीही आता बऱ्यापैकी लोप पावत चालली आहे आणि कामानिमित्ताने घरापासून/कुटुंबापासून लांब राहावे लागणाऱ्यांत अविवाहितांप्रमाणेच विवाहित जोडप्यांचेही प्रमाण बरेच आहे. अनेक प्रसंगी नवरा-बायकोंनाही कामानिमित्ताने दीर्घकाळ एकमेकांपासून दूर वेगवेगळ्या शहरांमध्ये/राज्यांमध्ये/देशांमध्ये राहण्याची वेळ येते. अशा संभाव्य वापरकर्त्यांना चांगली प्रायव्हसी मिळत असल्याने त्यांच्याकडून अशा सेक्स टॉईजचा वापर वाढत आहे.
भारतात बहुतांश सेक्स टॉईज हि आयात करावी लागतात त्यात सेक्स डॉल्सचाही समावेश आहे. आपल्याकडे कायदेशीर अडचणी फारशा त्रासदायक नसल्या तरी अधिकृत पणे 'अशा' गोष्टी आयात करून विकणाऱ्या अगदी थोड्या विक्रेत्यांचा अपवाद वगळता बहुतेक विक्रेत्यांचा कल हा 'स्मगल्ड' सेक्स टॉईज विकण्याकडे असतो. त्यामुळे अशा व्यवहारांची कुठलीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने भारतातल्या अशा गोष्टींच्या वापरकर्त्यांची निश्चित संख्या कळू शकत नाही.
सर्वसाधारणपणे अनेक भारतीयांची अशी धारणा असते कि हि असली फॅडं मुंबई, दिल्ली, कोलकाटा, चेन्नई आणि हैदराबाद अशा महानगरांमध्ये आणि काही प्रमाणात मोठ्या शहरांमध्ये चालत असतील. पण वापरकर्त्यांच्या ऑनलाईन कम्युनिटी, सोशल मीडिया वरील पोस्ट्स किंवा युट्युब व्हिडीओज वरील कॉमेंट्स बघता हा प्रकार केवळ महानगरांपुरता मर्यादित राहिला असेल असे वाटत नाही. अशा वस्तूंच्या खरेदीच्या बाबतीत वापरकर्त्यांची 'गरज' , 'आवड' आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'क्रयशक्ती' हि स्थानमहात्म्यापेक्षा अधिक निर्णायक ठरत असावी.
त्यामुळे भरतात हे फॅड पसरले नाहिये असे नाही, पण ह्या वस्तुंच्या खरेदी/विक्रितली अपार्दर्शकता आणि एकुणच वापर्कर्त्यांकडुन राखली जाणारी गोपनियता अशा कारणांमुळे त्याच्या व्यापकते विषयी अजुनतरी कुठला निश्चित असा ठोकताळा मांडता येत नाही!
9 Jun 2023 - 11:24 am | अथांग आकाश
हे समजले नाही!
भारतात सेक्स टॉईज बद्दल काय कायदे आहेत? त्यांच्यावर बंदी आहे का नाही? ते नियम महिती करुन घ्यायला आवडेल!!
16 Jun 2023 - 1:23 pm | टर्मीनेटर
@ अथांग आकाश,
What Indian laws say about porn, sex toys
There is no legal provision in India that expressly bars or permits the sale of sex toys. However, Section 292 of the IPC is often invoked to restrict the sale, exhibition, advertising, import or export of sex toys on the ground of “obscenity”. Many sex toy sellers in India are able to operate as long as the product is not deemed “obscene”—by avoiding nudity in the packaging, or showing women in a demeaning manner, etc. They also label their products as ‘sexual wellness’ items.
तस्मात, ह्या विषयातही भारतातील कायदे थोडे संदिग्ध असल्याने कायदेशीर अडचणी फारशा त्रासदायक नाहित त्यामुळे त्यांची खरेदी/विक्री सुरळीत होत असल्याचे Quora वरील प्रत्यक्ष वापरकर्त्यांचे म्हणणे आहे!
17 Jun 2023 - 10:31 am | अथांग आकाश
धन्यवाद!
6 Jun 2023 - 10:05 pm | चित्रगुप्त
-- परंतु तेथे 'त्रिभाग' --- याचा अर्थ समजला नव्हता. 'त्रिभाग' म्हणजे वाळू-चुना-ताग यावरून तात्कालीन मूर्तीकलेवरही प्रकाश पडतो.
जय जय रघुवीर समर्थ.
7 Jun 2023 - 11:26 am | प्रसाद गोडबोले
_/\_
ह्याला म्हणतात नीरक्षीरविवेक!
सेक्स डॉलच्या धाग्यावर दासबोधातील वचने पाहुन समर्थांनही आश्चर्याचा धक्क्का बसला असेल =))))
नारी स्तनभर नाभीदेशं दृष्ट्वा मा गा मोहावेशम् |
एतन्मांस वसादि विकारं मनसि विचिन्तया वारं वारम् || 3 ||
_/\_
8 Jun 2023 - 7:37 pm | टर्मीनेटर
त्रिभागच काय, तुम्ही वरती दिलेल्या एकाही ओवीचा (कि श्लोकाचा) अर्थ मला समजला नव्हता, पण ह्या भावार्थाच्या फोटोमुळे निदान तीन ओव्यांचा अर्थ तरी समजला 😀
7 Jun 2023 - 6:43 am | प्रचेतस
काय लिवलंय काय लिवलंय.
चारचौघात चर्चिल्या न जाणाऱ्या विषयावर कमालीच्या संयमतेने लिहिलंय. बाहुल्यांची माहिती आवडली, सौंदर्य तर अप्रतिमच, शेअर्ड अल्बम खास जाऊन पाहिला, डोळे निवले हो.