कृष्णाच्या गोष्टी-९
***धर्मराज्य हरपले
युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली. महाभारताच्या सभापर्वातील वेदव्यासांचे ते उद्गार काळाची पावले ओळखणारे आहेत.