कृष्णाच्या गोष्टी-८

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
24 Jul 2024 - 4:59 pm

*धर्मराज्य स्थापना
देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते.

एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे. कृष्णाच्या वेळी अनियंत्रित भ्रष्ट अधिकार व सुखभोग यांच्या अधीन झालेल्या राजसंस्थेला पुन्हा नियंत्रित आणि धर्मन्मुख करणे. हे केवळ अशक्यप्राय होते अशा स्थितीत विशुद्ध तत्वावर विश्वास असणारी नवीन राज्यसंस्था निर्माण करणे हा एकच मार्ग शिल्लक होता. कोणाला हाताशी धरून आपल्या अभिप्रेत असलेली विशुद्ध राज्य संस्थान निर्माण करता येईल याचा विचार करीत असता कृष्णाचे पांडवांकडे लक्ष गेले. त्यांच्यावर अन्याय होत होता. तरीही धर्माधिष्ठित मार्ग सोडायला हे संघटित नेतृत्व तयार नव्हते. त्यांच्याजवळ सामर्थ्य होते. अत्यंत कष्ट करण्याची तयारी होती. अपार सत्यनिष्ठा होती व धर्माचे नियंत्रण मानण्याची स्वाभाविक प्रवृत्ती होती. राज्यावरील स्वतःचे न्याय हक्कांपासून वंचित केले जात असल्यास यांच्या नेतृत्वाला सिंहासनस्थ करणे हा एकच धर्म संस्थापनेचा उपाय आहे हे कृष्णाने ओळखले आणि आपल्या कार्याचे साधन म्हणून पांडवांचा उपयोग करून घेण्याचे ठरवले.

*द्रौपदी स्वयंवर

अ

पांडव आणि आपली आत्या कोणती लाक्षागृहाच्या दाहातून खरोखरच जळून मेली असतील असे कृष्णाला वाटत नव्हते त्यांनी गुप्तपणे पांडवांचा शोध चालविला होता.आपल्या हेरांकडून कृष्णाला पांडव कुंतीसह लाक्षागृहातून निसटून गेल्याची वार्ता समजली होती. पांडव असतील तेथून स्वयंवरासाठी कांपिल्य नगरीत उपस्थित होतील याची अटकळ त्याला होती. म्हणूनच बरोबरच्या सर्व यादवांना द्वारका सोडण्यापूर्वी कृष्णाने आपण या स्वरांवरात फक्त प्रेक्षक म्हणून जात आहोत 'पण' जिंकून द्रौपदी मिळवण्यासाठी जात नाही हे स्पष्ट केले. भारत वर्षातील जवळजवळ सर्व राज्यांनी द्रौपदी स्वयंवर स्थळी गर्दी केली होती. छताशी फिरणाऱ्या लाकडी माशाचा पाच बाणात डोळा फोडण्याची अट द्रौपदीला जिंकण्यासाठी ठेवली होती. शिशुपाल, जरासंध, दुर्योधन, कर्ण सगळ्यांचे प्रयत्न विफल झाले. यादवांपैकी कोणी उठणारच नव्हते.

कृष्णाने ब्राह्मण वेशातील पांडवांना चटकन ओळखले‌ त्यात अलौकिक दैवी वगैरे असा काही भाग नव्हता. सर्वसाधारण माणसापेक्षा कृष्णाची बुद्धी दृष्टी कितीतरी तीक्ष्ण होती ,आधुनिक भाषेत त्याचा 'बुद्ध्यांक' कितीतरी जास्त होता. जमलेले ख्यातमान धनुर्धर राजे 'पण' जिंकण्यात हतप्रभ ठरल्यानंतर ब्राह्मण वृंदातून एक तरुण उभा राहिला आणि त्याने युवराज दुष्टदुम्नजवळ मत्स्य यंत्र भेदण्याची अनुज्ञा घेतली. त्यांना असे उद्गार काढले की "ती परीक्षा कौशल्याची होती. त्यामुळे 'पण' जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला अगदी ब्राह्मण काय वैश्य काय शूद्रानेही केला आणि पण जिंकला तरी आपली बहीण त्याला माला घालेल हे आव्हान विलक्षण होते.

तिथे ठेवलेल्या धनुष्याला सहज त्याने प्रत्यांच्या जोडली आणि मन एकाग्र करून पहिल्याच बाणाने त्यांने भेद घेतला. उपस्थित सभाजनांना याचा आनंद वाटण्याऐवजी त्यांना त्यांचा अपमान वाटला. राजमंडळाने रागाने द्रुपद आणि दृष्टधुम्न यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पांचाल आणि त्यांच्या बाजूने उभे राहिलेले राजे तो ब्राह्मण कुमार यांनी आपल्या सामर्थ्याने त्या सर्वांचा पराभव केला.या उभ्या राहिलेल्या लढाईत त्या तरुण ब्राह्मण कुमाराच्या बाजूने आणखी चौघे ब्राह्मण कुमार उभे ठाकलेले पाहून रामकृष्णांची ती पांडव असल्याबद्दलची खात्रीच पटली.

कृष्ण पांडव राहत असलेल्या त्यांच्या मागेमागे जात घरात शिरून युधिष्ठिराला वंदन केले. आणि मी कृष्ण आहे असे सांगून तिथे जवळच बसलेल्या आत्याला कुंतीलाही वंदन केले. तुम्ही सारे लाक्षागृहातून वाचलात हीच सौभाग्याची गोष्ट आहे .पांचाली मुळे पांचाल आता तुमच्या पाठीशी उभे राहतीलच. पण बलाढ्य धनसंपन्न यादवीही तुमचे पाठीराखे आहेत हे सांगायला मी येथे आलो आहे. तुम्ही येथे भेटाल याची मला अटकळ होती. द्रौपदीचे पाची पांडवांशी लग्न लावून द्यायला त्याने द्रपदालाही राजी केले. यादव बल पांडवां मागे उभे राहिले तरीही विपत्तीच्या काळात नवे राज्य उभा राहण्यासाठी सर्वात अधिक धनाची आवश्यकता लागेल हे ओळखून आहेराच्या रूपाने कृष्णाने अमाप धनसंपत्ती पांडवांना दिली.पांचालाचा आणि यादवांच्या या जोरदार पाठिंबामुळे दुर्बल आणि अगदी निर्धन झालेले पांडव सबल झाले.

ही बातमी हस्तिनापुरात पोहोचतात दुर्योधनाच्या विरोधालाही न जुमानता कुरुवृद्ध पितामह भीष्म आणि महामंत्री विदूर यांच्या सल्ल्याने राजा धृतराष्ट्राने महामंत्री विदुराला कांपिल्य नगरीला पाठवून पांडवाना त्यांच्या करवी हस्तिनापूरी बोलवून घेतले. कांपिल्य नगरी द्रौपदी स्वयंवराला पांचालावर हल्ला करण्यात दुर्योधन कौरवांचा पुढाकार होता तरी ही गोष्टी ध्यानी घेऊन पांडवांच्या रक्षणार्थ कृष्ण त्यांच्याबरोबर स्वतः हस्तिनापुरी गेला. खांडवप्रस्थचे राज्य आपण युवराज युधिष्ठिरला बहाल करीत असल्याचे धृतराष्ट्रने घोषित केले.

यावर कृष्ण हसला त्याने युद्धिष्ठिराला राजाचे हे राज्य मान्य करण्याचे सूचना दिली. खांडवप्रस्थ पूर्वीच्या काळी कुरुंची राजधानी होती . वर्षानुवर्षे शेती ओसाड पडली होती ,सारा प्रदेश घनदाट जंगलाने व्यापलेला होता. तरी हे ओसाड गाव राज्य युधिष्ठिराला घ्यायला कृष्णाने अनुभूती दिली. कारण अविकसित प्रदेशाचा योजनाबद्ध रीतीने विकास करता येतो. "तुझ्या चुलत्याने उदार मनाने दिलेल्या या तुझ्या अर्ध्या राज्याकडे पहा. अंधराजाने हा अन्याय करावा आणि भीष्मा सारख्या कुरुवृद्धाने त्याला संमती द्यावी?. केले त्याची फळे ते भोगतीलच म्हणा !पण निराश व्हायचे कारण नाही या भकास भागाचा विकास करून त्या अंध राजाला आपण वेगळाच धडा शिकवू."

विश्वकर्माला मग द्वारका उभारणार्‍या स्थापत्यशास्त्रज्ञाला त्वरित निमंत्रण दिले गेले. खांडवप्रस्थाची ओसाड राजधानी नव्या योजनेप्रमाणे पुन्हा उभारण्याचे काम झपाट्याने सुरू झाले. राजधानी उभारण्याच्या कामावर स्वतः कृष्णाची देखील देखरेख होती. काही दिवसातच त्या वैराण ओसाड भूमीवर उभारलेल्या नव्याने राजधानीतील उंच उंच इमारतींनी आकाश रेषा भेदून टाकल्या. कृष्णाने त्या सुंदर राजधानीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ असे ठेवले. दीर्घ कालावधीत पांडवांशी त्याचे खूपच सख्य निर्माण झाले आणि विशेषतः अर्जुन त्याचा जिवाभावाचा सखा झाला. कृष्णाच्या रूपात पांचालीला एक निर्मळ प्रेमळ भाऊ मिळाला. रक्ताच्या नात्यापेक्षाही नातेपुढे अधिक सुदृढ झाली.
आ

*सुभद्रा हरण
इ

-राजा रविवर्मा यांचे अर्जुन आणि सुभद्रा यांचे एक चित्र

इंद्रप्रस्थ राहणाऱ्या पांडवांनी आपल्या सामायिक पत्नीशी वर्तनाचे नियम ठरवले होते.एकदा अर्जुनाने चोरांनी पळवलेल्या ब्राह्मणांच्या गाईंचे रक्षण करण्याच्या घाईत युधिष्ठिर आणि द्रौपदी यांच्या एकांताचा भंग केला. ठरल्याप्रमाणे अर्जुनाने तीर्थयात्रेला जायचे ठरवले. युधिष्ठिर नको नको म्हणत असतानाही त्याने आपला निर्णय बदलला नाही. या काळात आपल्या भारतभराच्या भ्रमणामध्ये त्यांनी नागकन्या उलुपी त्यानंतर चित्रांगदा यांच्याशी विवाह केला. परतीच्या प्रवासात द्वारके जवळच्या प्रभासपट्टण तिर्थावर तो आला. तिथे त्याला विशेषत्वाने सुभेद्रेची आठवण झाली. सुभद्राच्या सौंदर्याबद्दल द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकत असता भेटलेल्या गद नामक सुभद्रा आणि कृष्णाच्या धाकट्या भावाकडून त्यांनी खूप ऐकले होते. अर्जुन वेष बदलून प्रभास तिर्थावर प्रवेशकर्ता झाला. तरी त्याच्या आगमनाची बित्तम बातमी कृष्णाला त्याच्या हिराकडून कळली कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जून रैवतक पर्वतावर जाऊन राहिला. तिथे त्याने तपाचे सोंग मांडले. एक दिवस सुभद्राही दर्शनासाठी आली आणि अर्जुनाच्या डोळ्याचे पारणे फिटले. रामाने हा कोण विचारणा करता?हा यती चातुर्मासाचे चार महिने रैवतक पर्वतावर काढणार असल्याचे त्याला समजले. यतीच्या व्यक्तिमत्त्वाचा बलरामाच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. पावसाळ्याचे चार महिने डोंगरावर काढण्याऐवजी यतीने ते द्वारकेत व्यतीत करावे अशी विनंती त्यांनी याला केली. यतीने आढेवेढे घेत का होईना ती मान्य केली. बलरामाने लगेच कृष्णाला यतीची सोय द्वारकेत सुभद्रेच्या महाला शेजारी बागेत करण्याचे आज्ञा केली. चातुर्मासात सुभद्रेने अशा तपस्वीची सेवा केल्यास तिला पुण्य लाभेल व तिचे पुढचे आयुष्य सुखाचे जाईल अशी बलरामाची धारणा होती. कृष्णाने मात्र या कल्पनेला कडाडून विरोध केला होता पण किंबहुना त्यामुळे संतापलेल्या बलराम याने आपला हट्ट पुरा केला आणि पुढील चार महिने येतील द्वारकेत सुभद्रा महाला शेजारच्या बागेत प्रस्थापित केले.

स्त्रियांना आपला भाऊ मुलगा किंवा पती अर्जुनासारखा असावा असे वाटत होते सुभद्राही त्याला अपवाद नव्हती. अर्जुनाला न पाहताही ती त्याच्यावर प्रेम करत होती. एक दिवस त्याने आपणच पार्थ असल्याचे सांगून आपलेही तिच्यावर प्रेम आहे असे सांगितले. संधी मिळता सुभद्रेला घेऊन इंद्रप्रस्थि प्रयाण करण्याचे अर्जुनाने निश्चित केले. आणि राजकन्येलाही ते सांगितले. कृष्णाने पुरवलेल्या रथात सुभद्रेला घेऊन अर्जुनाने आपला रथ इंद्रप्रस्थाकडे दौडविला.यतीने सुभद्राचे हरण केले ही बातमी द्वारकेत पसरली. धोक्याची घंटा घणाघणा वाजू लागली. बलरामाला क्रोध अनावर झाला होता. त्याच्या मनात सुभद्रा आपला शिष्य दुर्योधन याला द्यायची होती. अर्जुनाने तिला पळवली यामागे कृष्णाचा हात असावा असा त्याचा संशय. पण कृष्णाने साफ कानावर हात ठेवले. सुभद्रा हरण इतकी नाजूक आणि हृदयस्पर्शी गोष्ट होती की या प्रश्नावरून यादव आणि पांडव यांचे कायमचे वैर उत्पन्न होण्याचा संभव होता. कृष्णाने रागवलेल्या बलराम दादाला आणि सभेतील यादवांना आपल्या नम्र आणि मृदुल वाणीने शांत केले.त्यांच्या पराक्रमाविषयी स्तुती केली आणि आपल्या मुद्देसूद युक्तीवादाने यादवांना पटवून दिले की "अर्जुनासारखं शूरवीर पती सुभद्रेला शोधूनही मिळाला नसता. क्षत्रियाला अनुरूप अशा पद्धतीने त्याने तिचे हरण केले आहे. यात यादवांचा अवमान नसून सन्मान आहे. तेव्हा अर्जुनाशी व पांडवांशी युद्ध करण्याची भाषा या दोघांनी न करता इंद्रप्रस्थी जाऊन सुभद्रेचे अर्जुनाशी यादवांना शोभेल असे थाटामाटात लग्न लावून द्यावे. भडकलेला संघर्षही शांत झाला यादवांनीही विवेक केला आणि सुभद्राचा अर्जुनाशी मोठ्या धुमधडाक्याने विवाह झाला.

ई

*खांडव वनदाह
उ
कृष्णा अर्जुनाने या अरण्यास सपत्नीक सहलीसाठी जाणे. तेथे अग्नी भेटणे, आपली भूक शमवण्यासाठी त्यांनी खांडववनाचा ग्रास मागणे. तो देण्याची कृष्णा अर्जुन यांनी तयारी दाखवणे या बदल्यात अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य ,दोन अक्षय भाते कपिल ध्वज असलेला रथ, गतीमध्ये वाऱ्याशी स्पर्धा करणारे चार पांढरे घोडे आणि कृष्णाला कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र देणे. कृष्णा अर्जुन आणि पाऊस पडत असतानाही वन जाळून भस्म करणे. त्या तक्षकाचे सारे कूळ पूर्ण नष्ट होणे. मग शरण आल्यामुळे अर्जुन आणि त्याला जीवनदान देणे. मृत्युपकार म्हणून मया सारखा जळास्तूशिल्पज्ञाने कृष्णाच्या सूचनेवरून मयासारखे अलौकिक सभागृह पांडवांना बांधून देणे. सभागृहाच्या बांधणीत विविध रंगी खड्यांचा वापर करून अनेक प्रकारच्या दृष्टीभ्रम निर्माण करणे .पाणी वाटावे तेथे फरशी असणे फरशी वाटावे तेथे पाणी असणे. भिंत वाटावी तेथे दार असणे. दार वाटावे तेथे भिंत असणे.अशा गोष्टी घडल्या.

*राजसूय यज्ञ

महाभारतात युधिष्ठिराला देवर्षी नारदाने तू राजसूय यज्ञ कर असे सांगून. त्यांच्या मनात आपण सम्राट व्हावे ही इच्छा निर्माण केली असा उल्लेख आहे. सर्वदृष्ट राजसत्तांची जरासंधाच्या नेतृत्वाखाली झालेली कोंडी फोडून त्या सर्व राजसत्तांना एकाच धर्म नियंत्रित साम्राज्याखाली आणण्यासाठी ही संधी फार योग्य आहे असे मनाशी ठरवून कृष्णाने युधिष्ठिराची राजसूयाची कल्पना उचलून धरली. धर्म संस्थापनासाठी जरासंध वध जीवनाचे ध्येय मानणाऱ्या कृष्णाचा यामागे उद्देश थोडा स्वार्थी म्हटला म्हणता आला. तरी तो बराचसा पांडवांना हितकारी होता आणि त्याहून अधिक देशातील जरासंधाच्या अत्याचारामुळे पीडित अशा अखिल राजमंडळाच्या हिताचा तो प्रश्न होता. सर्वसाधारण जनतेच्या हिताचा असाही तो प्रश्न होता.

*जरासंध वध
ऊ
ब्राह्मणांच्या वेशात कृष्ण भीमार्जुना सह गिरीनगरात दाखल झाला आणि मध्यरात्री जेव्हा यज्ञ शाळेत जरासंधाची भेट घेतली. तेव्हा कृष्णाने आपणा तिघांची ओळख करून देऊन. जरासंधाच्या दुकृत्यांचा पाढा वाचून त्याच्या जवळच बंदीत असलेल्या ८६ राजांच्या मुक्ततेची मागणी केली. यापेक्षा आमच्यापैकी कोणाही एकाला द्वैयुद्धासाठी असे आव्हान दे हे सांगितले .द्वंद्वासाठी भीमाला निवडण्याआधी जरासंधाने केलेली दर्पोक्ती यासंदर्भात खूप बोलकी आहे जरासंध म्हणाला "मी बंदी केलेल्या राजांपैकी प्रत्येकाला युद्धात जिंकले आहे. जेता या नात्याने मी जितांचा जीवनाचा धनी आहे. त्या पराजित जीवनाचे काय करायचं आहे ते मी माझे ठरवेल. त्यात कोणीही लुडबुड करण्याचे कारण नाही. मी तुमचे युद्धाचे आव्हान स्वीकारतो हवे तर आपण सैन्य लढू तुमची इच्छा असेल, जर तिघांची एकाच वेळी लढण्यास मी तयारी आहे किंवा एक एकट्याशी युद्ध करण्याला माझी ना नाही. जरासंध आणि भीमसेन या दोघांचे युद्ध मला युद्ध अहोरात्र असे १४ दिवस चालले चौदाव्या दिवशी रात्री जरासंध थकलेला दिसला असता. कृष्ण भीमाला म्हणाला, भीमा तू वायुपुत्र आहेस आपले संपूर्ण दैवी बल खर्चून जरासंध्याला मारण्याची हीच ती वेळ आहे.कृष्णाच्या उद्गगाराने भीमाचा उत्साहात वेगळाच झाला व त्याने जरासंध्यावर जोराचे आक्रमण केले. त्याला खाली पाडले. हाताचं बल देऊन शिवणीतून चिरून टाकले. त्याच्या शरीराची दोन शकले आखाड्यात टाकून दिली (जरासंध्याच्या जन्माच्या वेळी दोन शकले जन्मास आली आणि जरा नावाच्या राक्षसीने सांधल्यावर ती एकसंध होऊन तो जिवंत झाला होता ).त्यानंतर कृष्णाने जरासंधाच्या मुलाचा सहदेवाचा मगधाच्या सिंहासनावर राज्याभिषेक केला. आणखी एक नवा आदर्श निर्माण करून मग राजाला पांडवांची सत्ता मान्य करायला लावून कृष्णाने अशा प्रकारे अधार्मिक राजसत्तांचा संघ फोडून टाकला.जरासंध वधामुळे राजमंडलावर इतका विलक्षण दरारा निर्माण झाला होता की पांडव बंधूंच्या नुसत्या आगमनानेच बहुतेक ठिकाणी नव्या धर्म सत्तेला मांडलिकत्वाचे करभार मिळाले.

विष्णूचा अवतार असो वा नसो कृष्णाच्या चारित्राचे मर्म मनुष्यत्व असून देवत्व नाही. ही गोष्ट तशी स्वतःसिद्ध असूनही महाभारताच्या पुढील विस्तारात कृष्णाच्या विष्णू रूपाचा पुन्हा पुन्हा उल्लेख येतो? उदाहरणार्थ जरासंधाच्या वधानंतर जरासंधाच्या रथात बसून कृष्ण भीम अर्जुन इंद्रप्रस्थ जायला निघाले तेव्हा आवश्यकता नसतानाही कृष्णाने गरुडाचे स्मरण केले आणि गरुड त्याच्या रथाच्या ध्वजस्थानी येऊन बसला, असा उल्लेख आहे .त्यातच दुसऱ्या प्रसंगामध्ये आम्हा तिघांपैकी कोणाशी युद्ध ला तयार हो असे जरासंध त्यांना आव्हान दिले तेव्हाही कृष्णाला म्हणे जरासंध यादवाकडून अवध्य आहे हा ब्रह्मदेवाचा आदेश आठवला. तो जरासंधाच्या वधाला प्रवृत्त झाला नाही येथेही कृष्णाच्या दैवी करण्याचा प्रयत्न आहे. जरासंध्याच्या बंदीतून कृष्णाने मुक्त केलेल्या ८६ राजांनी कृष्णाला धन्यवाद देण्याकरता काही कारण नसताना त्याला 'हे विष्णो' असे म्हणत पुकारले.
ऐ

-अत्यंत बारकाव्यासह चित्र रेखाटले आहे, कोणाकडे कोणते काम दिले आहे,या खालील वर्णनाशी पूर्ण मेळ बसत आहे

सूर्यवंशाच्या सर्व राजकुलांचा पाठिंबा मिळवून युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्यासाठी तयार झाला. देश देशांतरीच्या राजांना निमंत्रण गेले ऋषिगण पाचारिले ,देशोदेशीचे विविध वर्गातील लोक राजसूय यज्ञ पाहण्यासाठी राजधानीत हजर झाले. यादव,पांचाल मित्र होते हस्तिनापुराचे धृतराष्ट्र दुर्योधनाधिक कौरव प्राप्त होते. या यज्ञ समारंभात निरनिराळ्या मंडळींकडे वेगवेगळी कामे वाटून दिली होती. भोजन व्यवस्था दु:शासनकडे होती, ब्राह्मणांचा सन्मान अश्वत्थामाकडे होता, येणाऱ्या राजांचे आदरितिथ्य संजयने करायचे होते. भीष्म , द्रोणाचार्य धर्मकृत्यावर देखरेख करायची होती, रत्न पारख दक्षिणा वाटप दान इत्यादीवर कृपाचार्य लक्ष ठेवणार होते, खर्चाचा हिशोब विदुराने ठेवायचा होता, तर येणारे नजराणे दुर्योधनाने स्वीकारायचे होते ‌‌.पण यज्ञात कृष्णाने स्वतःकडे ब्राह्मणांचे पाय धुवायचे काम घेतले होते. असे म्हणतात कृष्ण आदर्श पुरुष होता म्हणून विनयाचा आदर्श प्रस्थापित करण्याकरता म्हणून त्याने हे दासाचे कार्य अंगीकारले?

वैदिक मंत्रांच्या गजरात युधिष्ठिर आणि द्रौपदी यांच्यावर सप्तसरिता व सप्तसिंधू यांच्या जलाने पांजजन्याद्वारे स्वतः कृष्णाने अभिषेक केला. भारत वर्षाचा सम्राट म्हणून युधिष्ठिराला घोषित केले.

*शिशुपाल वध
ओ

प्रथेप्रमाणे पाहुण्यांपैकी एकाची प्रमुख अतिथी म्हणून निवड करून पहिल्याने अर्घ्य देऊन त्यांची पूजा करण्याची पद्धत होती. अग्र पूजेचा मान कोणाला द्यावा म्हणून व पितामह भीष्मांना विचारले असता भीष्माने कृष्णाचे नाव सुचवले. युधिष्ठिरलाही आनंद झाला चेदिराज शिशुपालाला मात्र राज मंडळाचा हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी छद्मीपणाने मोठ्याने हसून शांतेत विघ्न आणले. अग्र पूजेचा मान एका गवळ्याला देणाऱ्या युधिष्ठिराची आणि पितामह भीष्मांची त्याने टिंगल उडवली. नातेसंबंधातील वरिष्ठतेचा विचार करता तो मन द्रुपदला मिळाला हवा होता. विद्वत्ता निकष धरला असता द्रोणाचार्य कृपाचार्य गुरुपुत्र अश्वत्थामा यांचा अधिकार डावलता आला नसता. तप सामर्थ्याचा विचार केला तर म्हणावे प्रत्यक्ष कृष्णद्वैपायन व्यास सभेत हजर होते. उत्कृष्ट धनुर्धारी म्हणून कृष्णाची निवड झाली म्हणावी तर सभेत निशाद राज एकलव्य आणि अंगराज राधेय हजर होते. कुण्या राजाला हा बहुमान द्यायचा असतात अग्र पूजेसाठी भगदत्त कलिंग विराट शल्य शाल्व,कांबोज विंध अनुविंध यांची नावे सहज नाकारता कशी आली असती?पण भीष्मांनी युधिष्ठिराने निवड केली ती एका गवळ्याची? शिशुपाल्याच्या म्हणण्याप्रमाणे युधिष्ठराचा हा वेडेपणा होता‌ आणि यज्ञाला जमलेल्या सर्व पाहुण्यांचा तो अपमान होता.

शिशुपालाने आता आपला मोर्चा कृष्णाकडे वळवला त्याच्या दृष्टीने कंसवध,जरासंधवध घडून आणण्यात कृष्णाचा जो पराक्रम दिसला तो फक्त कपटनीतीचा. त्याला पहिल्याने अर्ध देणे म्हणजे एक एखाद्याने आपली मुलगी छक्क्याला देण्यासारखी होते. युधिष्ठिराने शिशुपालला शांत करण्याचा प्रयत्न केला पण भीष्माने त्याला म्हटले "शिशुपालला काय भुंकायचे ते भुंकू दे" त्यामुळे शिशुपाल कुरुवृद्ध भीष्मावर भयंकर चिडला. त्यांनी अगदी घाणेरड्या शब्दात त्यांची निर्भर्त्सना केली त्यांच्या प्रतिज्ञाची चेष्टा केली. षंढ असल्यामुळे त्यावर पांघरून घालण्यासाठी त्यांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली असे तो म्हणाला. भीष्माला तो नदीपुत्रही म्हणाला .भीम शिशुपालला ठार मारण्यासाठी निघाला पण भीष्माने सावरले. कृष्णाला युद्धाचे आव्हान दिले. म्हणाला "कृष्णा हे युद्धाचे आवाहन आहे कुणाची वागदत्त वधू लढाई न करता पळून नेण्याइतके हे सोपे नाही. गोपींची वस्त्रे पळवणे अगर त्यांना प्रेमात भुलवित ठेवण्यात इतकेही सोपे नाही.

कृष्णाने शिशुपालाच्या आजवरच्या अपराधांचा पाढा वाचला म्हणाला "मी नरकासुराशी युद्ध करीत असताना द्वारकेवर हल्ला करून जी जाळणाऱ्या शिशुपालने ,वृद्ध उग्रसेनाला सतावणाऱ्या शिशुपालने ,प्रत्यक्ष आपल्या मामाचा वसुदेवाचा अश्वमेध यज्ञाचा घोडा पकडून ठेवणाऱ्या शिशुपालने, आणि दुसऱ्यांच्या बायका पळून नेणाऱ्या शिशुपालने आपल्या शौर्याच्या व पराक्रमाच्या गप्पा मारू नये." अलौकिक कथेप्रमाणे युद्ध उभे राहिले तेव्हा कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राचे स्मरण केले आणि शिशुपालावर ते सोडले क्षणात शिशुपालाचे शीर धडापासून वेगळे झाले.

याच प्रसंगी कृष्णाचे नाव अग्रपूजेसाठी सुचवितांना पितामहा भीष्म त्याचा 'जगदीश्वर' म्हणून उल्लेख करतात. कृष्ण सर्वश्रेष्ठ बलवंत क्षत्रिय आहे. पण कृष्णासारखा वेद वेदांगाचे ज्ञान असणारा पुरुष विराळाच असेही ते म्हणाले.पण युधिष्ठिराच्या धर्मराज संस्थापना घोषित करणाऱ्या राजसूय यज्ञात जेव्हा शिशुपाल विघ्न निघाला तेव्हा एका दृष्टीने आपल्या सामाजिक बांधिलकी म्हणून शिशुपालाला त्वरित ठार करण्याचे धर्म संस्थापनेतील तो अडसर कृष्णाने दूर केला होता. कृष्ण नेत्याच्या करवी निर्माण केलेले धर्म राज्याचे स्वरूप काय होते.ते वर्णन महाभारतातील सभापर्वातील ३३ व्या अध्यायात आले आहे.
क

संदर्भ -शोध कृष्णाचा प्रवासी पूर्णत्वाचा
लेखक- प्रा डॉ राम बिवलकर

कथाआस्वादसंदर्भ

प्रतिक्रिया

प्रचेतस याचा योग्य अनुवाद सांगा.

रक्षणाद्धर्मराजस्य सत्यस्य परिपालनात्। शत्रूणां क्षपणाच्चैव स्वकर्मनिरताः प्रजाः ।।१।।
बलीनां सम्यगादानाद्धर्मतश्चानुशासनात्। निकामवर्षी पर्जन्यः स्फीतो जनपदोऽ भवत्।।२
सर्वारम्भाः सुप्रवृत्ता गोरक्षा कर्षणं वणिक्
विशेषात्सर्वमेवैतत्संजज्ञे राजकर्मणः ।।३
दस्युभ्यो वञ्चकेभ्यो वा राजन्प्रति परस्परम् ।। राजवल्लभतश्चैव नाश्रूयन्त मृषा गिरः ।॥४
अवर्षं चातिवर्षं च व्याधिपावकमूर्च्छनम्। सर्वमेतत्तदा नासीद्धर्मनित्ये युधिष्ठिरे ।।५
प्रियं कर्तुमुपस्यातुं बलिकर्म स्वभावजम्। अधिहर्तुं नृपा जग्मुर्नान्यैः कार्यः कथंचन ।।६
धम्यैर्धनागमैस्तस्य ववृधे निचयो महान् । कर्तुं यस्य न शक्येत क्षयो वर्षशतैरपि।।७
(म. भा. स. प. अ. ३३) ।

युधिष्ठिर राज्याविषयहा श्लोक शोधत होते,आता सापडला.

प्रचेतस's picture

24 Jul 2024 - 9:26 pm | प्रचेतस

सत्याचे परिपालन करून धर्मराज राज्य करीत असतां त्याच्या राष्ट्रात शत्रू आणि चोरांचे भय राहिलें नव्हतें. सर्व प्रजा स्वकर्मात तत्पर असून तो प्रजेचे अनुशासनपूर्वक पालन करून धर्मपूर्वक राज्यव्यवस्था पहात असे. त्याच्या राज्यांत योग्य समयीं विपुल पर्जन्यवृष्टि होत असल्यामुळे तृणधान्यांची पूर्ण समृद्धि होती. गोरक्षण, कृषि, आणि वाणिज्य हे सर्व व्यवहार स्वतःला व परक्यांनाही हितावह होतील, असेच चालत असत, राजाच्या पुण्यकर्मामुळेच ही सर्व सुव्यवस्था होती.

ह्या धर्मात्म्या राजाच्या राष्ट्रांत दस्यु, लबाड किंवा राजाचे आवडत्या भाटांच्या मुखांतून कधीं खोटे संभाषण ऐकू येत नसे. सर्वही प्रजाजन राजासारखेच सत्य वदनी होते. स्वभावतः दुष्ट असलेले इतर लोकही असत्य आचरण चरण करीत नसत. अतिवृष्टि, अनावृष्टि, रोग व अग्निप्रलय इत्यादि देवी आपत्तींचा त्या राष्ट्रांत सर्वथा अभाव झाला होता. धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.

Bhakti's picture

24 Jul 2024 - 9:39 pm | Bhakti

वाह! सुरेख!

धर्मराजाचें प्रिय करण्यासाठीं, सत्कार करण्यासाठीं व योग्य तो करभार देण्यासाठीच इतर राजे त्याच्याकडे येत असत. त्याला जिंकण्यासाठीं किंवा त्याच्या राष्ट्रात भेदनीतीचा प्रयोग करण्यासाठीं कधी कोणी येत नसे.

आभारच 😊
ऑनलाईन खुपचं मजेशीर अनुवाद होता.. ;)

शिशुपाल, जरासंध, दुर्योधन, कर्ण सगळ्यांचे प्रयत्न विफल झाले(?)>>>
ह्या प्रसंगी कर्णावर अन्याय नाही का झालेला?

प्रचेतस's picture

24 Jul 2024 - 9:39 pm | प्रचेतस

द्रौपदीचे स्वयंवर होते त्यामुळे तिला तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच. त्यामुळे कर्णावर अन्याय झाला असे म्हणता येत नाही, स्वयंवर न मानता पणाच्या दृष्टीनकोनातून बघितल्यास लावलेला पण वीर्यशुल्का पद्धतीचा होता. मात्र तत्कालीन वर्णव्यवस्थेनुसार तो क्षत्रियांसाठीच राखीव होता. ब्राह्मण हे क्षत्रियांपेक्षा उच्च समजले जात (विश्वामित्राला राजर्षीतून ब्रह्मर्षी होणे किती अवघड गेले हे तर प्रसिद्धच आहे) त्यामुळे ब्राह्मण वेशातील अर्जुन पणास चालून गेला असावा.

पण पुस्तकात तर असे लिहिले आहे,

त्याने युवराज दुष्टदुम्नजवळ मत्स्य यंत्र भेदण्याची अनुज्ञा घेतली. त्यांना असे उद्गार काढले की "ती परीक्षा कौशल्याची होती. त्यामुळे 'पण' जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला अगदी ब्राह्मण काय वैश्य काय शूद्रानेही केला आणि पण जिंकला तरी आपली बहीण त्याला माला घालेल" हे आव्हान विलक्षण होते.

म्हणजे याचा संदर्भ/संबंध चुकीचा वाटतोय.

ह्या संदर्भाचा मूळ श्लोक असा >

एतत्कर्ता कर्म सुदुष्करं यः; कुलेन रूपेण बलेन युक्तः |
तस्याद्य भार्या भगिनी ममेयं; कृष्णा भवित्री न मृषा ब्रवीमि ||

उत्तम कूल, रूप आणि बलाने युक्त असणारा जो कोणी हे दुष्कर कर्म करील त्याचीच माझी भगिनी कृष्णा पत्नी होईल हे मी तुम्हाला सत्य सांगत आहे

ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष.

ह्यानंतर त्याने तेथे जमलेल्या अनेक राजांची, क्षत्रियांची नावे घेतली, त्यात कर्णाचे नाही हे विशेष

.
खरचं की!

कर्ण क्षत्रिय आहे हे त्यांना नक्की माहित नव्हते. आधीही दुर्योधन कर्णास राजा करतो ते तो क्षत्रिय आहे हे नक्की माहित असून नव्हे, तर त्याचे गुण आणि रूप पाहता तो सूतपुत्र असूच शकत नही असा तर्क करत. त्यामुळे दुर्योधन सोडल्यास इतर लोकं कर्णाला अजूनही सूतपुत्र मानत असावीत, असे म्हणता येईल काय?

जिथे खुद्द यादवकुळालाच निम्न दर्जाचे मानत ह्याशिवाय श्रीकृष्णाला तर गवळीच असे बहुतेक सारे क्षत्रिय मानत तिथं कर्णाला क्षत्रिय कुणी मानत असेल असे अजिबात वाटत नाही.
दुर्योधनाने अंगदेशाचे राज्य कर्णाला दिले होते पण तो केवळ नामधारी राजा राहिला होता असे दिसते, त्याचे संपूर्ण वास्तव्य हस्तिनपुरातच होते. तसाही राजा धृतराष्ट्रच असताना कर्णाला दुर्योधनाने परस्पर राज्य देण्यातही तसा काहीच अर्थ नव्हता.

तिचा वर निवडण्याचा अधिकार होताच.>>
मग स्वयन्वराचे नाटक कशासाठी.?
महाभारताच्या काही निवडक काळ्या अध्यायापैकी हा एक प्रसंग.
अर्थात जगातील सर्वश्रेष्ठ व्यासमहर्षिन्च्या प्रतिभेला योग्यच आहे.
म्हणूनच महाभारत हे सर्वश्रेष्ठ काव्य आहे.

अजून एक काळा प्रसंग खांडवी वन दाह आहे का? असे संदर्भ शोधतांना अनेक ठिकाणी उल्लेख आहे.जगातील पहिला इकोसाइड ?असाही एका ठिकाणी उल्लेख आहे.परंतू त्याकाळी इकोलॉजी ही संकल्पना थोडीच असणार.आताही शेतीसाठी अशाप्रकारे घनदाट अरण्य जाळून जमीन मिळवली जाते ‌

हा काळा अध्याय आहे असं अजिबात वाटत नाही. स्वयंवराच्या आधी नियमांचे श्लोक पुरेसे बोलके आहेत जे मी खाली उद्धृत केलेच आहेत. त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातूनच ह्या घटनांकडे पाहणे योग्य ठरावे. महाभारतात वर्णव्यवस्था होतीच.

टर्मीनेटर's picture

24 Jul 2024 - 9:55 pm | टर्मीनेटर

आत्ता पर्यंतच्या सर्व भगांपैकी हा भाग जास्त आवडला 👍

Bhakti's picture

24 Jul 2024 - 10:18 pm | Bhakti

जय श्रीकृष्णा !!

कर्नलतपस्वी's picture

25 Jul 2024 - 8:23 am | कर्नलतपस्वी

छान लिहीता अहात. प्रचेतस चे निरूपण लेख आणखीन माहितीपूर्ण करत आहे.

पुस्तकाचे डिटेल्स कळाले तर प्रत्यक्ष वाचता येईल. बकेट मधे टाकले आहे.

भागो's picture

25 Jul 2024 - 10:30 am | भागो

कर्नलतपस्वी
तुमच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे.

कर्नलकाका हे पुस्तक मनोरमा प्रकाशनचे आहे.लेखक डॉ प्रा राम बिवलकर यांचा भगवान् श्रीकृष्णाचा एक चिकित्सक अभ्यास' १९९२ला हा शोधनिबंध/प्रबंध विषय होता.तो त्यांनी 'शोध कृष्णाचा -प्रवासी पूर्णत्वाचा ' या नावाने पुस्तक रूपानें १९९५ ला प्रकाशित केला. दुसरी आवृत्ती १९९८ ला प्रकाशित आहे.
पण ऑनलाईन हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध दिसत नाही आणि प्रत्यक्ष पुस्तकांच्या दुकानात आहे का? हे माहिती करून घ्यावे लागेल.
तुम्हांला जर मिळाले तर माझ्यासाठी एक प्रत घ्या प्लीज 😀
व्यासांनंतर मिपारत्न प्रचेतसच महाभारत फुलवून सांगू शकतील 😃
त्यांनी महाभारताचे वर्ग सुरू केले तर मी नक्कीच ॲडमिशन घेईल ;)

कर्नलतपस्वी's picture

26 Jul 2024 - 10:02 am | कर्नलतपस्वी

+१

अथांग आकाश's picture

25 Jul 2024 - 12:20 pm | अथांग आकाश

वाचतोय! पुभाप्र!!

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

25 Jul 2024 - 9:33 pm | सौ मृदुला धनंजय...

सगळेच भाग खूप उत्तम लिहिले आहेत

उग्रसेन's picture

26 Jul 2024 - 10:25 am | उग्रसेन

Pdf पुस्तक लिंक मिळेल का?

नाही ना! लेखक डोंबिवलीचे आहेत.थेट लेखक , कुटुंबीय,मनोरमा प्रकाशनच आता हे पुस्तक उपलब्ध करून देऊ शकतील.नाहीतर ठाणे, डोंबिवलीचे, कोल्हापूर या सार्वजनिक वाचनालयात हे पुस्तक उपलब्ध आहे.

प्रसाद गोडबोले's picture

26 Jul 2024 - 11:08 am | प्रसाद गोडबोले

स्त्रियांना आपला भाऊ मुलगा किंवा पती अर्जुनासारखा असावा असे वाटत होते सुभद्राही त्याला अपवाद नव्हती. अर्जुनाला न पाहताही ती त्याच्यावर प्रेम करत होती. एक दिवस त्याने आपणच पार्थ असल्याचे सांगून आपलेही तिच्यावर प्रेम आहे असे सांगितले.

ह्या "सुभद्रेचे अर्जुनावर प्रेम होते " ह्या विधानाला आधार काय ?

तत्र चङ्क्रम्यमाणौ तौ वासुदेवसुतां शुभाम् |
अलङ्कृतां सखीमध्ये भद्रां ददृशतुस्तदा ||१४||

दृष्ट्वैव तामर्जुनस्य कन्दर्पः समजायत |
तं तथैकाग्रमनसं कृष्णः पार्थमलक्षयत् ||१५||

अथाब्रवीत्पुष्कराक्षः प्रहसन्निव भारत |
वनेचरस्य किमिदं कामेनालोड्यते मनः ||१६||

ममैषा भगिनी पार्थ सारणस्य सहोदरा |
यदि ते वर्तते बुद्धिर्वक्ष्यामि पितरं स्वयम् ||१७||

अर्जुन उवाच||

दुहिता वसुदेवस्य वासुदेवस्य च स्वसा |
रूपेण चैव सम्पन्ना कमिवैषा न मोहयेत् ||१८||

कृतमेव तु कल्याणं सर्वं मम भवेद्ध्रुवम् |
यदि स्यान्मम वार्ष्णेयी महिषीयं स्वसा तव ||१९||

प्राप्तौ तु क उपायः स्यात्तद्ब्रवीहि जनार्दन |
आस्थास्यामि तथा सर्वं यदि शक्यं नरेण तत् ||२०||

वासुदेव उवाच||

स्वयंवरः क्षत्रियाणां विवाहः पुरुषर्षभ |
स च संशयितः पार्थ स्वभावस्यानिमित्ततः ||२१||

प्रसह्य हरणं चापि क्षत्रियाणां प्रशस्यते |
विवाहहेतोः शूराणामिति धर्मविदो विदुः ||२२||

स त्वमर्जुन कल्याणीं प्रसह्य भगिनीं मम |
हर स्वयंवरे ह्यस्याः को वै वेद चिकीर्षितम् ||२३||

इथे सरळ सरळ लिहिलं आहे की सुभद्रेअला पाहुन अर्जुन कामवश झाला . त्याचा कडे पाहुन कृष्ण हसुन म्हणाला की अरे माझी बहीण आहे ती ! तुमा आवडाली असेल तर तुझा विवाह लाऊन देतो ! (विचार करा, आजच्याकाळात तुम्ही तुमच्या मैत्राच्या बहिणीकडे पाहुन 'कामवश' झालात अन ते मित्राच्या लक्षात आले तर काय राडा होईल !)
इतकेच नव्हे तर पुढे अर्जुन स्वतःहुन म्हणतो - की ही मला कोणत्या उपायाने प्राप्त होईल ते सांग , मी काय वाट्टेल ते करेन!

आणि मग पुढे कृष्ण म्हणतो की - क्षत्रियांना स्वयंवर उचित आहे मात्र पोरगी पळवुन नेऊन लग्न करणे हे त्याहुन जास्त उत्तम आहे ! त्यामुळे तु हिला पळवुनच ने, कारण स्वयंवराला उभे केले तर ही कोणाच्या गळ्यात माळ घालेल कोण जाणे , ह्या बायकांचे काहीही सांगता येत नाही !

तस्मात माझ्या आकलनानुसार सुभद्रा अर्जुन प्रेम वगैरे ह्या नंतर रचलेल्या आख्यायिका असाव्यात , अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला.
प्रेम बिम सब झूट आहे !

प्रचेतस's picture

26 Jul 2024 - 11:35 am | प्रचेतस

सहमत.
त्याने राक्षसविवाहच केला.

व्यवस्थित उकल केली आहे.तुम्ही आणि प्रचेतस तज्ञ हेच

अर्जुनाने व्यवस्थित उचलुन नेली असावी सुभद्रेला.
प्रेम बिम सब झूट आहे !

सांगत असाल तर हेच असावे.
बाकी लेखक याप्रमाणेच सौम्य ह्रदयाचे असल्याने सरळ उघडपणे काही गोष्टी मान्य करीत नसावेत 😄

अतिशय विस्तृत वर्णन आणि जागोजागी सुंदर चित्रे दिली आहेत. महाभारत मुळात खूप जास्त आवडते, त्यामुळे वाचताना खूप छान वाटत आहे.