कृष्णाच्या गोष्टी-७

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
16 Jul 2024 - 2:28 pm

*स्यमंतक मणी
रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला!
ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नामक एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे.असे रत्न गणप्रमुख ऐवजी राजाच्या आगार संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच जवळ त्या मणीची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला.

एका दिवशी सत्राजितचा भाऊ प्रसेन हा मणी गळ्यात घालून जंगलात शिकारीला गेला.अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला व प्रसेन ठार झाला आणि त्या सिंहालाही जांबुवंत नामक एका अस्वलाने हल्ला करून ठार मारले. जांबुवंताने तो मणी हस्तगत करून आपल्या मुलाच्या गळ्यात बांधला.
प्रसेन परतला नाही. त्याच्या गळ्यात स्यमंतक मणीही होता. तो कृष्णाला पाहिजे होता त्या प्रयत्नांत कृष्णाने प्रसेनचे बरे वाईट केले असावे असा सत्राजितला संशय वाटला आणि त्याने सुधर्मा सभेत ते व्यक्त करून कृष्णावर जाहीर आरोपही केले.

कृष्ण काही न बोलता सभेतून बाहेर पडला आणि आपल्या काही सहकाऱ्यांसह प्रसेनच्या शोधात जंगलात गेला. त्याला तेथे प्रसेनचे प्रेत सापडले.सिंहाच्या पंजाचे ठसे होते, त्याचा मागवा घेत पुढे गेल्यावर कृष्णाला आता सिंहाचेदेखील प्रेत सापडले. पण मणी तिथे नव्हता. पुढे अस्वलांच्या पावलांच्या ठशांचा मागवा घेत कृष्ण डोंगराजवळील एका गुहेत पोहोचला. तिथे आत शिरला तेव्हा अस्वलाच्या पिल्लाच्या गळ्यात बांधलेला तो मणी दिसला. पण तो जांबवंताने परत द्यायचे नाकारले त्यामुळे कृष्णाला जांबुवंताशी युद्ध करावे लागले. जांबुवंताच्या ध्यानात आले की हे आपले प्रभू श्रीराम आहे व ते युद्ध थांबून कृष्णाच्या पाया पडला व आपली कन्या जांबुवंती त्यांनी कृष्णाला अर्पण केली व स्यमंतक मणीही त्याच्या स्वाधीन केला.
अ
नंतर कृष्णाने सर्वांसमक्ष तो मणी सत्राजिच्या हाती ठेवला. सर्व हकीकत समजल्यावर आपण कृष्णावर चुकीचा आरोप केला आहे याची सत्राजितला जाणीव झाली व त्यासाठी सत्राजितने आपली सुंदर मुलगी सत्यभामा कृष्णाला देण्याचे ठरवले. तिचा स्वीकार करण्याची त्याला विनंती केली कृष्णाने सत्यभामाचा स्वीकार केला. परंतु मणी आपल्या सासऱ्याच्या जवळच राहू दिला.
आ
हे प्रकरण येथे संपले नाही. कारण कृतवर्मा आणि अक्रूर नामक दोघा गणप्रमुखांना कृष्णविषयी असूया वाटत होती व अक्रुराला स्यमंतकाचा मोह झाला होता. त्यामुळे सत्राजितला मारून कृष्णाचा रोष ओढावून घेण्यासारखे होते. त्यामुळे कृष्ण आणि बलराम द्वारकेत असताना सत्राजितचा काटा काढणे शतधन्व्याला शक्य नव्हते. पण जेव्हा केव्हा ते शक्य होईल तेव्हा कृष्णरोषापासून संरक्षण देण्याचे अक्रूर आणि कृतवर्मा यांनी मान्य केले. त्या बदल्यात शतधन्व्याने सत्राजितकडील स्यमंतकमणी अक्रूरच्या स्वाधीन करावे असे ठरले. तिकडे कुंतीसह पांडवांना वारणावत नगरातील ज्वालाग्रही पदार्थांनी बनवलेल्या राजवाड्यामध्ये राहण्यासाठी पाठवून त्या राजवाड्याला आग लावून कुंती आणि कुंतीपुत्रांना जिवंत जाळण्याचा प्रकार घडला. ही दुःखद बातमी द्वारकेला येऊन धडकली. तेव्हा हस्तीनापुरात होत असलेल्या आत्या कुंती आणि कुंती पुत्रांच्या अंतिम धार्मिक संस्कार प्रसंगी हजर राहण्यासाठी धृतराष्ट्र आणि विदूर आदी मंडळींचे सांत्वन करण्यासाठी रामकृष्ण हस्तीनापुरात पोहोचले‌. आणि हीच संधी साधून शतधन्व्याने एका रात्री सत्राजितच्या घरात शिरून त्याचा खून केला आणि त्याचा स्यमंतक मणी पळवला.

पिताच्या वधाची बातमी सत्यभामेकडून हस्तीनापुरात कळल्यानंतर रामकृष्ण यांना त्याचा अनावर संताप आला.काशी नगरा जवळच्या जंगलात सततच्या दौडीमुळे मरून पडलेला शतधन्व्याचा घोडा त्यांना दिसला. शतधन्वा घाईत जंगलात घुसला आहे हे त्यांच्या ध्यानी आले. कृष्णाने पाय उतार होऊन पाठलाग केला व तो सापडल्यावर त्याला ठार मारले.कृष्णाने जंगलाबाहेर येऊन शतधन्व्याला मारल्याचे वृत्त बलराम दादांना सांगितले पण त्याच्या अंगावर मणी नव्हता हे सांगितले. परंतु बलरामांना येथे वाटले की कृष्णाला आपल्या सासऱ्यांपेक्षा स्यमंतक मण्यातच अजून देखील रस आहे.तेव्हा त्यांना राग आला व ते कृष्णाला दूषण लागत म्हणाले,
"जोपर्यंत तू मला स्यमंतक मणी आणून दाखवत नाही आणि तो मिळवण्यात तुझा रस नाही हे सिद्ध करत नाही तोपर्यंत मी द्वारकेत पाऊल ठेवणार नाही."आणि जवळच असलेल्या मिथिला देशाच्या राजधानीत राहायचे ठरवून ते मिथिलेकडे वळाले असे.स्यमंतक मण्याचा कृष्णाला अगदी वीट आला होता. याच काळात दुर्योधनाने मिथिलेत जाऊन बलराम कडून गदा युद्धाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देखील घेतले.

पण तिकडे अक्रूर दानशूर म्हणून प्रसिद्ध होत होता यज्ञ दीक्षा घेऊन एका मागून एक असे अनेक यज्ञ करत होता. अमाप संपत्ती सुवर्ण ब्राह्मणांना दान करत होता.स्यमंतक बाबत कृष्णाला आपला संशय येऊ नये म्हणून यज्ञदीक्षा हे सोंग त्यांनी घेतले होते.यज्ञाच्या थाटावरून आपले दोष कृष्णाचे ध्यानी आले आहे असे समजताच अक्रूर काशीला निघून गेला कृष्णाला यादव गण संघात संघर्ष नको होता म्हणून त्याने अक्रूराकडे दुर्लक्ष केले.परंतु त्याने त्याला निरोप दिला,

"आपल्या जवळ बरेच दिवस आमचा-सत्यभामेचा स्यमंतक मणी आहे ते परत मिळवण्यात आम्हाला विशेष रस नाही. परंतु जनसामान्यात आणि आमच्या जवळच्या नातेवाईकात आमच्या हेतू विषयी काहीतरी गैरसमज निर्माण झाले आहेत.ते दूर व्हावे म्हणून तो मणी मिथिलेत जाऊन बलराम दादांना दाखवून त्यांच्यासह इथे यावे आणि तो मणी आपल्याजवळ आहे हे सुधर्मा गणसभेत सांगावे."

अक्रूरला कृष्णाची वैर परवडण्यासारखे म्हणून नव्हते म्हणून त्याने कृष्णाचा संदेशाप्रमाणे वागून बलराम दादांसह द्वारकेत प्रवेश केला आणि यादव गणप्रमुखांच्या सभेत मणी सादर केला अक्रुराने ही आपली मुलगी कृष्णाला समारंभपूर्वक देऊन तो मणीदेखील त्याला देऊ केला पण कृष्णाने याचा स्वीकार केला नाही आणि या प्रकरणावर पडदा पडला.

*नरकासुर वध
ब्रह्मदेवाच्या वराने अजय झालेला मातलेला प्रागज्योतिष पुराचा राजा नरकासुर त्याने ब्राह्मण, साधू या सगळ्यांचा छळ मांडीला. त्रिभुवनातील संपत्ती जणू त्याने आपल्या आधीन केली. देवमाता आदितीचेही कुंडले त्याने हिरावून आणली. देव, ब्राह्मण, यक्ष, किन्नर अशा विविध जमातीतील षोडस वर्षीय सुंदर कन्यांचे हरण करून त्यांना आपल्या कैदेत ठेवले. या सगळ्या अक्षतयोनि कन्या त्यांचा नरकासुर अपहरण करून त्यांचा व्यापार करणे असा धंदा होता असे निष्कर्ष काही ग्रंथात काढले आहेत.द्वारकेत स्थिरपत झालेल्या कृष्णाच्या कारणावर नरकासुराच्या भयानक अपकृत्यांची विविध माहिती येत होती. अन्यायाच्या विरुद्ध धावून जाण्याच्या त्याच्या स्वभावामुळेच कृष्णाने त्याच्यावर हल्ला चढवला.
इ
सत्यभामाला सारथी म्हणून घेऊन एकटा कृष्ण नरकासुरावर चालून गेला. त्यांनी निसुंद, हरग्रीव पंचनद, वीर ,मूर( यावरून मुराला मारणारा मुरारी हे नाव कृष्णाला मिळाले)अशा एकापेक्षा एक शस्त्रनिपुण असुरांचा वध करून शेवटी दहा दिवसांच्या अहोरात्र चाललेल्या लढाईनंतर प्रत्यक्ष नरकासुरालाही अश्विन वद्य चतुर्दशीच्या अंधारात पहाटे पाच वाजता आपल्या सुविख्यात सुदर्शन चक्राने मारले. परंतु ही एक अनैसर्गिक म्हणावी एवढी ताज्य कथा आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. त्याऐवजी बलाढ्य यादव सेनेसह कृष्णाने प्रागज्योतिषपुराला जाऊन नरकासुराचा पराभव केला ही अधिक वास्तव कथा आहे.

नरकासुर त्या मुलींची विक्री करो अथवा न करो पण शतावधी चांगल्या घराण्यातील मुली त्याच्या बंदीखान्यात होत्या ही गोष्ट निर्विवाद आहे‌.तरी कृष्ण काळात प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर नसून भगदत्त हे बंकिमचंद्रांचे म्हणण.हे त्यांचे म्हणणे नरकासुरवधाचे श्रेय परंपरेने कृष्णाला देणाऱ्या मंडळींना पटण्यासारखे नाही. पण भारतीय महायुद्धात हत्तीवरून लढणारा भगदत्त(नरकासुराचा मुलगा) वृद्ध दाखवला असून त्याच्या डोळ्याच्या पापण्यांचे स्नायूशीतील झाली असल्याने पापण्यांना बारीक डोळा बांधून डोळे उघडे ठेवण्यासाठी तो दोरा कपाळावर बांधलेल्या पट्टीला बांधून ठेवणाऱ्या भगदत्ताला मारण्यासाठी कपाळावरील ती पट्टी तोडून आंधळे कर मग मार असे कृष्णाने अर्जुनाला सुचवल्याचा उल्लेख महाभारताच्या द्रोणपर्वात आला आहे. त्यावरून बंकीमचंद्रांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. तरी कृष्णकाळापर्यंत नरकासुराने खूप वर्षे अनियंत्रित सत्ता भोगली असल्याने त्याचा युवराज भगदत्त नरकासुर वधानंतर कृष्णाने निस्वार्थीपणे प्रागज्योतिष पुराच्या गादीवर बसवला. तेव्हा तो खूपच वयस्कर असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
ई
त्या काळात मूळच्या समाजात या बंदिवान शतावधी स्त्रियांना प्रतिष्ठेचे व सन्मानाचे जीवन जगणे अशक्य होते अशा स्त्रियांची अवस्था कृष्णाने जाणून घेतली. ते लक्षात घेऊन मानवतेचे महान उद्धार भगवान श्रीकृष्ण हे स्वतः पुढे झाले व जसे सुटकेचे तसेच त्यांच्या चांगल्या घराण्यातील मुलींच्या जीवनाची घडी नीट बसून त्यांना प्रतिष्ठेचे व सन्मानाचे जीवन देण्यासाठी त्यांचे उत्तरदायित्व आपलेच आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी त्या कुमारिकांची इच्छा ओळखून त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि स्वीकार केल्यामुळे आपोआपच सामाजिक जीवनातील त्यांचे स्थान निश्चित झाले. भगवंताच्या या लोकोत्तर सामाजिक कार्याला जर विलास म्हणायचे असेल तर तशा महापुरुषांना 'ते के न जानीमहे' एवढेच एक उत्तर असू शकेल. लोकोत्तर पुरुषांचे वागणे असेच असावे लागते औदार्य स्वगृहापासून चालू करावे लागते, असे सांगताना देखील येथे त्यांनी एक उदाहरण दिले आहे.शिवरायांनी ,बाटून मुसलमान झालेल्या बजाजी निंबाळकर याला शिखरशिंगणापूर येथे शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतले ९६ कुळाचे मराठा त्याला आपल्या सामावून घेणार नाहीत. याची त्यांना खात्री असल्याने शिवरायांनी आपली मुलगी बजाजी निंबाळकर यांच्या मुलाला देऊन निंबाळकरांशी सोयरीक जोडली आणि त्याला कुळगोतात सामावून घेतले. ही घटना अलीकडची तरीही कृष्णकृतीच्याच तोडीची !

*पारिजात आणि पुण्यक व्रत
उ
देवमाता आदितीची नकासुराने अपह्रत केलेली कुंडले परत करण्यासाठी कृष्ण सत्यभामेसह इंद्रपुरीला पोहोचला तेव्हा देव मातेला व इंद्राला भेटून द्वारकेला परत असताना नंदनवनातील पारिजात वृक्ष सत्यभामाला आवडला. तेव्हा नंदनवनातील त्या वृक्षाचे रोपटे घेऊन कृष्ण द्वारकेला परत आला. इकडे रुक्मिणीने देखील कृष्णासाठी एक व्रत केले होते .कृष्ण विजयी होऊन परत आल्यावर तिला आनंद झाला. आपल्या प्रिय पत्नीच्या व्रताचे उद्यापन मोठ्या थाटामानाने कृष्णाने साजरा केला.
ऊ
सत्यभामेला रुक्मिणीच्या या भाग्याचा हेवा वाटला म्हणून तिच्या व्रताच्या उद्यापनासाठी आलेल्या महर्षी नारदांनी आपल्यालाही एखादे व्रत सुचवावयाची तिने विनंती केली.नादानी तिला पुण्यक व्रत कर असे सांगितले.सत्यभामेने व्रताची सुरुवात केली व्रतात महेशाची पूजा केली होती. उपवास करायचा होता आणि आपली अत्यंत आवडती वस्तू शेवटी ब्राह्मणांना दान करायची होती. सत्यभामेने प्रामाणिक व्रत पार पाडून नारदमुनींना निमंत्रण दिले. नंदनवनातून आणलेल्या पारिजाताकाला कृष्ण बांधून त्याचे दान नारदाच्या हातावर सोडले. सत्यभामेला नारदाला दान केलेल्या कृष्णाला परत मिळवण्यासाठी सवत्स कपिला आणि भारंभार सुवर्ण नारदाला दक्षिणा म्हणून द्यावे लागले. सत्यभामेजवळ सुवर्ण अपुरे पडले पण रुक्मिणीच्या तुलसी पत्राने कृष्णाची तुला पूर्ण केली ही सारी कथा ह्रद्यतर खरीच पण अलौकिक म्हणून त्याग करण्यासारखी वाटत नाही.
ए

इंद्रपुरी आणि पारिजात वृक्षाचे अस्तित्व या कुठल्याच गोष्टीवर आपला विश्वास नसल्यामुळे पारिजात हरण वृत्तांत आपल्याला मान्य नाही हे बंकिमचंद्रांचे म्हणणे आहे. ते लेखकाला पूर्णतः मान्य नाही.

नरकासुराच्या लढाईच्या निमित्ताने कृष्णाला बरेच दिवस द्वारकेबाहेर काढावे लागले या अवधीत शिशुपालाने द्वारकेवर हल्ला केला. द्वारका जिंकता आली नाही तेव्हा काढता पाय घेतला. पण जाता जाता सगळी नगरी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने या संधीचा फायदा घेऊन आपल्या विश्वकर्मा नामक वास्तुशिल्पज्ञाच्या सल्ल्यानुसार नगरीचा विस्तार केला आणि ती अधिक सुंदर बनवली व आता प्रशस्त बागाही केल्या .

*पौंड्रवासुदेवाचा वध
ऐ
पौंड्र जमात आणि त्यांचे राज्य याचा उल्लेख अनेक देशी-विदेशी ग्रंथात येतो. रामायणात पौंड्राचा दाक्षिणात्य म्हणून देखील उल्लेख येतो पण महाभारतात पौड्र जमात वंग देशाच्या पश्चिम भागात राहणारी होती असा उल्लेख आहे. कृष्णाच्या काळी पौंड्रांचा जो राजा होता त्याचे नाव देखील वासुदेव होते .वासुदेवाचा मुलगा म्हणून कृष्णही वासुदेव आणि सर्व प्राणीमात्रांच्या आत्म्यांचे अंतिम वासस्थान जो कोणी परमात्मा आहे त्याचे देखील वासुदेव नाव म्हटले जाते.पण पौंड्र राजाचा आपणच खरे वासुदेव आहे असा दावा होता आणि द्वारकावासी वासुदेव कृष्णाला तो तोतया वासुदेव म्हणत असे. कृष्णाला त्याने आपली शंख चक्र गदा पद्म ही चिन्हे वापरू नको व ती मला परत कर असा उद्माम संदेश पाठवला होता.ती परत करण्याच्या मिषाने कृष्ण पौंड्रवर्धन नगरीमध्ये गेला आणि त्याने पौंड्र राजाची हत्या केली.वाराणसीचा राजा नेहमी पौंड्राचा पक्ष घेत. त्यामुळे त्याला राग आला आणि द्वारकेवर परतणाऱ्या कृष्णावर त्यांनी हल्ला केला.व युद्ध देखील केले पण त्यात काशी राजा मारला गेला. कृष्णाने वाराणसी जाळून टाकली आणि कृष्ण द्वारकेला परतला.

या सर्व घटनाानंतर आता कृष्णाला यादवांची काळजी नव्हती.यादव बलवंत धनवंत असे झालेले होते. विविध यादव कुळात थोड्याफार कुरबुरी असल्या तरी सारे कृष्णाला मानीत होते. कृष्ण राजा नसला तरी राज मंडळाचा सम्राट राजेश्वर होता.
आता कृष्णाला धर्मराज संस्थापनाच्या आपल्या जीवन उद्दिष्टाकडे वळता येणार होते. कृष्ण आता त्या दृष्टीने भारतभराच्या एकंदर राज मंडळाचे अवलोकन करीत होता.

संदर्भ - शोध कृष्णाचा -प्रवासी पूर्णत्वाचा
लेखक-प्रा डॉ राम बिवलकर

कथाआस्वादसंदर्भ

प्रतिक्रिया

ओह ,माय लव्हली ललना..
हे साई पल्लवीचं कृष्णावरच आवडत तेलगू गाणं खूप दिवसांनी ऐकलं.जरा अर्थ समजून घेतला.

https://youtu.be/RyLlPlpV3Fw?si=5j-kM5PKNENwJFxv

, हे भगवान (कृष्णा) तू काय करत आहेस? मी तुला का पाहू शकत नाही?
मी नेहमी तुझे ऐकले आहे मी धीराने तुझी वाट पाहत आहे हा भ्रम तू का नाही संपवत?... -

राक्षसांचा नाश करून मला जिंकून... तुम्ही खूप खेळ खेळले आहेत तू मला भेटायला खाली का येत नाहीस?
O My Lovely Lalana, Ilane Rammante, अरे माझ्या लाडक्या मुली, तुला मी का यायला हवे आहे?... - अरे माझ्या प्रिय मुली, तुला काय म्हणायचे आहे? अरे माझ्या प्रिय मुली, मला तुझी वेदना समजते. अरे माझ्या लाडक्या मुली, मी जिंकण्यासाठी आलो आहे...अरे माझ्या लाडक्या मुली, मी फक्त खेळकरपणे तुला चिडवत होतो..अरे माझ्या प्रिये..

हे परमेश्वरा, यादव ... - यादव राज्याचे रत्न. असुराचा नाश पुतना । यमुना नदीच्या खोल पाण्यात तू कालिया या विषारी नागाचा नाश केला आहेस

तुम्ही अनेक राजांना मोक्षप्राप्तीसाठी मदत केली आहे. तू तुझ्या सुंदर अवताराने आम्हांला कृपा का करत नाहीस?... -

प्रचेतस's picture

17 Jul 2024 - 2:04 pm | प्रचेतस

स्यमंतक मण्याची गोष्ट तर खुद्द यादवकुळात कृष्णाचा सर्वच कुळांवर प्रभाव नव्हता हेच दाखवते व कृष्णाची मानवीयता सिद्ध करते. यादवकुळ प्रचंड अंतर्विरोधांनी भरलेले होते व परस्परांवर कशी कुरघोडी करता येईल हे बघत होते अन्यथा वृष्णी, शिनी पांडवांकडून, भोज, अंधक कौरवांकडून लढते ना व राम युद्धात तटस्थ राहता ना.

स्यमंतक मण्याची गोष्ट तर खुद्द यादवकुळात कृष्णाचा सर्वच कुळांवर प्रभाव नव्हता हेच दाखवते व कृष्णाची मानवीयता सिद्ध करते.

अगदी!
तरी मानवामध्ये श्रेष्ठ असा मानव कृष्ण त्याकाळी नक्कीच होता.