कटी पतंग
तर बरं का, एकदा एका बाप्याची पतंग कटली! म्हणजे कुणी काटली नाही. तर कणीला जिथे मांजा बांधतात ना, तिथेच निसटली. आता लोंबणारा मांजाच नाही, त्यामुळे ती काय टपरी पोरांना भेटली नाही. ती गेली उडत उडत आधीच्या उडवणार्याकडे! तिला वाटलं, आपल्याला बघून त्याला आनंद होईल. पण त्याच्याकडे तर कोर्या पतंगांची थप्पीच होती! आणि एका सुंदर पतंगीला तो कणीच बांधत होता. त्याने कटलेल्या पतंगीला पाहिलं आणि छदमीपणे म्हणाला, तू कशाला आलीस परत? आता तुझा नंबर ही सगळी चळत संपल्यावर! कटलेली पतंग फार निराश झाली. एकदम दिशाहीनपणे उडायला लागली. एका अंबॅसॅडर चालवणार्या डायवरला मिळाली.